जीवन सदैव आनंदात घालवणे प्रत्येकाला प्रिय असते व प्रत्येकजण त्यासाठी सदैव धडपडत असतो.
परंतु कुटुंबातील एखाद्या जवळील व्यक्तीला जर अचानक काही आजार जडला किंवा आजारपणामुळे महिनोंमहिने त्रास सुरु असेल तर कुटुंबातील सर्वांच्या आनंदावर विरजण पडते.
एखाद्या व्यक्तीला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने
१) वय
२) लिंग
३) आहारातील घटक
४) आहाराची घेण्याची वेळ
५) आहार घेण्याची सवय
६) आहार तयार करण्याची पद्धत
७) आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक
८) शैक्षणिक पार्श्वभूमी
९) व्यवसाय
१०)कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य
११)कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास
१२)समंजसपणा
१३)मानसिक दृष्टीकोन
१४)घरातील भावनिक वातावरण
१४)आराम व झोप
१५)शारीरिक व्यायाम
१६)योगासने व प्राणायाम
१७)मानसिक व्यग्रता
१८)धार्मिक संस्कार व मान्यता
१९)कर्मावरील विश्वास
२०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती
२१)वैयक्तिक स्वच्छता
२२)वातावरणातील रासायनिक प्रदूषण
२३)संसर्ग
२४)संगत
२५)स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र
२६)खाद्यान्नातील जैविक शक्ती
२७)आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार
२८)आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया
ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते.
एखादा आजार झाल्यानंतर त्यावर उपाय करणे जरी शक्य असेल तरी ते अधिक त्रासदायक, अधिक खर्चिक व मानवीकार्य तास वाया जाणारे असू शकते. पण आपणही कदाचित केव्हातरी आजारी पडू शकतो ही शक्यता विचारात घेतली व त्यातून बचाव करण्याचे योजिले तर एकतर आपण लवकर आजारी पडणार नाही.किंवा अगदी पडलोच तर लवकर त्यातून बरे होवू शकतो व आजारपणापासून होणारा त्रास, खर्च व बहुमुल्य असणारे मानवीकार्यतास नक्कीच वाचवू शकतो.
वरील सर्व विचाराधीन घटक व त्यामुळे केले जाणारे रोगप्रतिबंधात्मक उपाय हे ही प्रत्येकासाठी वेगवेगळे असतील.
त्यापैकी जे "सार्वजनिकरित्या जाहीर होवू शकणारे", "सार्वकालिक लागू पडणारे", "शास्त्रीय व अशास्त्रीय", "आर्थिक व अर्थशास्त्रीय" उपाय कोणते ते आपण पुढील लेखात सविस्तर पाहूच.
तोवर आपल्या अजून काही जास्त/वेगळ्या अपेक्षा असतील तर त्या प्रतिक्रियेत लिहाव्यात.
(क्रमश:)
प्रतिक्रिया
8 Apr 2015 - 11:00 am | hitesh
प्रतिसाद लिहिला होता. कुठे गेला ?
8 Apr 2015 - 11:19 am | टवाळ कार्टा
शैक्षणिक पार्श्वभूमी
धार्मिक संस्कार व मान्यता
यांचा आणि "रोगप्रतिबंधात्मक उपाय" याचा संबंध काय कोणी सांगेल???
8 Apr 2015 - 1:52 pm | आनन्दा
उदा..
जर उद्या मला कोणी सांगितले की रोज एक पेग मारला की सारे आजार दूर राहतात.. तर माझे धार्मिक संस्कार आणि मान्यता मला ते करू देणार नाहीत. किंवा इतर देखील बरेच आजार धार्मिक्संस्कारांमुळे होऊ शकतात - उदा.. थंडीत रोज ३ वेळेस गार पाण्याने आंघोळ केल्यास होणारा न्युमोनिया वगैरे.. त्यांना बहुधा याबद्दल बोलायचे आहे
8 Apr 2015 - 2:24 pm | तुषार काळभोर
मग धार्मिक संस्कार आणि मान्यता यांच्यापेक्षा स्थल-काल-वक्ति अनुरुप वर्तन हे जास्त योग्य राहील.
केवळ धार्मिक संस्कार म्हणून इंग्लंडच्या गारठ्यात ३वेळा गार पाण्याने आंघोळ करणेही चुकीचे अन् इंग्लंडच्या गारठ्याची सवय म्हणून भारतात टाय-कोट वापरणेही चुकीचे.
महत्वाचे आहे व्यावहारिक दृश्ट्या शहाणपणाने वागणे.
8 Apr 2015 - 2:40 pm | टवाळ कार्टा
मग बार आणि त्यांच्या आतील देव्हारे यांच्याबाबत लॉजिक?