संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा

आयुर्हित's picture
आयुर्हित in काथ्याकूट
24 Mar 2015 - 9:37 pm
गाभा: 

पूर्वपीठीका:
स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया, डेंगी, गॅस्ट्रोपासून इबोलासारख्या संसर्गजन्य आजारांवर भविष्यात नियंत्रण मिळविणे शक्य व्हावे आणि आरोग्य विभागाचा इतर खात्यांशी समन्वय साधला जावा, यासाठी महाराष्ट्र संसर्गजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण कायदा करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या संदर्भातील आदेश आरोग्य खात्याला दिले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा कायदा संमत करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
संपूर्ण बातमी संसर्गजन्य आजारासाठी कायदा

तथ्य: संसर्गजन्य आजार

संसर्गजन्य आजार Google Search

संसर्गजन्य आजार होवू नये यासाठी आपण सर्वांनी करायचे काही प्रारंभिक उपाय:
१) स्वच्छ व शुद्ध पाणी पिणे
२) स्वच्छ, शुद्ध व ताजे, सुपाच्य, झाकून ठेवलेले अन्न खाणे व शिजवलेले अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवणे.
3) उघड्यावरील अन्न पदार्थ न खाणे.
४) सर्व लहान मुलांना वयानुसार योग्यवेळी लसीकरण करत जावे. दरवेळेला नवीन सुई वापरली जाईल व लशी योग्य तापमानात ठेवलेल्या असणे याची दक्षता घ्यावी.
५) आजारी व्यक्तींपासून लांब व जपून रहाणे. अगदी जवळ जावे लागल्यास नाकावर संरक्षण करणारे कापड(वा फिल्टर) असलेले मास्क(मुखवटा?) वापरणे.
६) आपले हात स्वच्छ व निर्जंतुक ठेवणे व लहान मुलांनाही याची सवय लावावी.
७) आपली व आपल्या कुटुंबियांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे व त्यासाठी दररोज योग्य तो आहार व व्यायाम करण्याची काळजी घेणे.
८) लैंगिकसंबंध जोडताना योग्य ती खबरदारी घ्यावी.
९) सर्व पाळीव प्राण्यांना योग्य ते लसीकरण करावे.
१०) घरातील घनकचरा ओला व सुका असे व्यवस्थितरित्या वर्गीकरण करून मगच तो द्यावा.
११) रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन होत आहे ह्याची खात्री करावी.
१२) सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, राज्य सरकार व भारत सरकार यांचेकडून निर्धारित सुविधांबद्दल वेळोवेळी नजर ठेवावी व वेळेत न केलेल्या कामाबद्दल त्या त्या खात्याला सूचना देवून प्रसारमाध्यमात आवाज उठवावा.
१३) हा कायदा सर्वसामान्य नागरिकांसाठीच व त्यांच्या आरोग्यासाठीच बनवला जात असल्याने त्याचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी होईल याची खबरदारी घ्यावी व योग्य उपयोग करून घ्यावा.

सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, राज्य सरकार व भारत सरकार यांचेकडून अपेक्षा:
१) गावातील सांडपाणी तसेच नदीत ना सोडता ते पूर्ण प्रक्रिया करून मगच सोडणे.
२) घनकचरा व्यवस्थापनास प्राधान्य देवून त्यातील अत्यंत घातक पदार्थ वेगळे काढले जावून recyle करावे.
३) गावात, शहरात कोठेही कचरा साठू ना देणे.
४) नदीत व समुद्रात कोठेही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात असेल तर तेथे योग्य ते संयंत्र बसवावे.
५) रुग्णालयातील जैविक कचरा व्यवस्थापन त्वरित व योग्य पद्धतीने व्हावे.
६) औद्योगिक कारखान्यांकडून घनकचरा व घातक रसायने, सांडपाणी व्यवस्थापन होईल याची तजवीज करावी.
७) पारा व इतर घातक रसायन असलेल्या विजेरी सदृश्य विद्युत व PCB(printed circuit board)सदृश्य ऋणविद्युतकणशास्त्र (इलेक्ट्रॉनिक्स) आधारित वस्तूंची योग्य विल्हेवाट लावली जावी व त्यासाठी योग्य ती सूचना अशा वस्तूंच्या आवरणावर लिहिली जावी.
८) कुंभमेळा व मोठ्या यात्रेला जाणाऱ्या व्यक्तीला योग्य ती लस देण्यात यावी.
९) परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची विमानतळावर योग्य वेळात योग्य ती तपासणी व्हावी व काही शंका असल्यास त्यांना योग्य ते मार्गदर्शन व त्वरित योग्य उपचार व्हावेत.
१०) आरोग्यदायक वस्तूंचा काळाबाजार करण्याऱ्या व्यक्तीला/कायदेशीर अस्तित्व असलेल्या संस्थेला त्वरित रोखले जावे
११) योग्य प्रक्रिया ना करणाऱ्या व्यक्ती, व्यक्तीसमूह, समाज, गाव व कायदेशीर अस्तित्व असलेल्या संस्था यावर त्वरित कारवाई व्हावी.

ह्यातील प्रत्येक शब्द व वाक्य हे विस्तृतपणे लिहिता येतील पण अशी सर्व माहिती आंतरजालावर उपलब्ध आहेच.
अजून काही शंका असल्यास मिपावरील मान्यवर त्याचे योग्य ते समाधान करतील व ज्ञानात भर घालतील अशी माफक अपेक्षा.

सर्वात महत्वाचे : Prevention is better than cure.

प्रतिक्रिया

लैंगिकसंबंध जोडताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

:)))) .. :))))) .. :))))

अजून माहिती हवी असल्यास व्यनि करावा.

बाकी मी पयला..

यसवायजी's picture

24 Mar 2015 - 11:17 pm | यसवायजी

:))
माझी प्रतिक्रया जाणून घेण्यासाठी व्यनी करावा.

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 10:23 am | टवाळ कार्टा

हेच्च लिहायला आलेलो...बाकी ते "सुपाच्य" म्हणजे कस्ले खाणे???
rofl
rofl
rofl

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 10:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

व्यनि कर सांगतो.

सुबोध खरे's picture

25 Mar 2015 - 11:18 am | सुबोध खरे

सुपाच्य म्हणजे पचपचीत नव्हे
किंवा सुपातीलही नव्हे.
बाकी व्य नि मध्येच सांगतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Mar 2015 - 11:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मलाही व्यनि करा.

बाबा पाटील's picture

25 Mar 2015 - 12:27 pm | बाबा पाटील

जे खाल्यावर शेजारच्याच्या नाकातील केस जळत नाही ते सुपाच्य*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:

अजून माहिती हवी असल्यास व्यनि करावा:- मिपा आयुर्वेदाचार्य श्री येळाजि झोंबे

hitesh's picture

25 Mar 2015 - 1:36 pm | hitesh

छान.

हे सगळे जन्तेने करायचे.

मग मोदी फडणवीस काय काय करणार ?

टवाळ कार्टा's picture

25 Mar 2015 - 1:55 pm | टवाळ कार्टा

p
p
p1

होबासराव's picture

25 Mar 2015 - 1:47 pm | होबासराव

का हे रोग फक्त भाजप असलेल्या राज्यातच पसरतायेत का ? दिल्ली मध्ये सुद्धा स्वाइन फ्लू ने बराच हल्लकल्लोळ माजवलाय कि... अहो नाना थोड ग्रेट थिंकिंग करा, प्रत्येक गोष्टित राजकारण नका आणु.

hitesh's picture

25 Mar 2015 - 1:50 pm | hitesh

नाहं नाना नाहं माई

*biggrin* :-D :D +D =D :biggrin: