नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
प्रतिक्रिया
17 Mar 2015 - 8:35 pm | सुबोध खरे
भारताचे GDP PER CAPITA १४९८.८७ USD (2013),
आणी इंग्लंड चा आरोग्यावर खर्च PER CAPITA ३४०५ USD. हा बाकी सर्व देशांपेक्षा कमी आहे म्हणून त्याची तुलना दाखविली आहे. इंग्लंड अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्राची तुलना करताना हा एक महत्त्वाचा मुद्दा (अनवधानाने कि सोयीस्कर रित्या) विसरला जातो.
सर्व उत्पन्नाच्या दीडपट आरोग्यावर खर्च?
नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या ?
इंग्लंड इतका आरोग्यावर खर्च करायचा तर भारताला १८७५ अब्ज डॉलर्स खर्च करावा लागेल.
भारताचा आरोग्यावर खर्च PER CAPITA USD ६१ (२०१३)
मोठ्या मोठ्या गोष्टी कर्ण सोपं आहे.
20 Mar 2015 - 5:34 pm | आजानुकर्ण
तुमचे वाक्य वरीलप्रमाणे होते. त्याचा प्रतिवाद म्हणून यूकेची आरोग्यसेवा सर्व विकसित देशांत सर्वोत्तम कशी आहे याची आकडेवारी मी फक्त दिली. भारतात आरोग्यवर खर्च कमी आहे हे मान्यच आहे. जर सरकारला स्वतः खर्च करायचा नसेल तर कॉर्पोरेट इस्पितळे व विमा कंपन्या अकाऊंटेबल कसे होतील हे पाहणे आवश्यक आहे.
अकाऊंटॅबिलिटीचा मुद्दा काढला की डॉक्टर लोक अमेरिकेचे उदाहरण देत 'रुग्णांचा खर्च वाढेल' असे म्हणतात. हे म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटर आणायची बातमी आली की लगेच बिल्डर लोक 'गरीबांना घरे परवडणार नाहीत' अशा बातम्या सोडतात त्या पद्धतीचे वाटते.
प्रामाणिक व्यवसाय करणारे एकांडे डॉक्टर आहेतच. मात्र कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय हे कदाचित तुम्हाला अनुभवास आले नसावे किंवा पटत नसावे. त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.
20 Mar 2015 - 8:57 pm | सुबोध खरे
"कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय" हे फार जेनेरिक झालंय.
मूळ एक वस्तुस्थिती हि आहे कि उच्च दर्ज्याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च हा प्रचंड वाढलेला आहे.त्याला लागणाऱ्या साधन सामुग्रीचा भांडवली खर्च प्रचंड आहे. आणी हि सामुग्री पाच ते सहा वर्षात नवी घ्यायला लागते. त्यामानाने तो देण्याची मानसिकता लोकांची नाही. कॉर्पोरेट रुग्णालया मध्ये येणारा खर्च हा खरं तर मध्यम वर्गालाही परवडणारा नाही. परंतु त्याच्या तुलनेत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा देणारी पर्यायी व्यवस्था सरकारने गेल्या वीस वर्षात खिळखिळी करून ठेवलेली आहे.त्यामुळे परवडतहि नाही आणी दुसरा उपायही नाही अशा कात्रीत सापडलेला समाज कॉर्पोरेट रुग्णालयाला दुषणे देताना दिसतो. कॉर्पोरेट रुग्णालयात येणारा माणूस हा अतिशय उच्च दर्ज्याच्या सेवेची अपेक्षा ठेवतो. पण त्यासाठी करायच्या खर्चाची तयारी नाही/ परवडत नाही आणी त्याची तुलना जवळच्या नर्सिंग होमशी होते. उदाहरणार्थ. एखादा माणूस अपरात्री छातीत दुखायला लागले तर अशा रुग्णालयात जातो तेथे ई सी जी काढला त्यात समजा काही स्पष्टपणे निघाले नाही तर तेथील डॉक्टर स्ट्रेस टेस्ट किंवा अन्जीयोग्राफी करायला सांगतात. आता हि जर नॉर्मल आली तर हाच रुग्ण दुषणे देत फिरतो. आणी जर नाही सांगितली आणी रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला तर हा दुसर्या रुग्णालयात जातो आणी आयुष्यभर पहिल्या रुग्णालयाला शिव्या देत राहतो. त्यातून शंभरात एक रुग्ण पैसे द्यायचे नसतील तर वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला भरतो. (असे काही खटले मी स्वतः पाहिलेले आहेत)
या सर्व आगीत तेल ओतायला आयुषचे लोक आहेतच. बघा साधे ग्यास्मुळे छाती कोंडली असताना अन्जीयो ग्राफी करायला लावली. यातील किती लोक रात्रीबेरात्री छ्तीत दुखणाऱ्या रुग्णाला ई सी जी शिवाय पाहायला तयार होतील. त्यांनी केलेल्या बेछूट आरोपांमुळे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती गोंधळलेली झालेली आहे. मी अगोदर म्हटले आहे त्याप्रमाणे ९० % लोकांनी अन्जीयोग्राफी केली नाही तर काहीही होत नाही परंतु तुम्ही त्या ९० % मध्ये आहात कि १० टक्क्यात आहात हे सांगणे फार तर ज्योतिषाला शक्य आहे.म्हणजे काय ९० % लोक अशा आयूश वाल्यांच्या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवून कॉर्पोरेट रुग्णालयाला दुषणे देताना आढळतात. ज्यांना प्रत्यक्ष हृदय विकार येतो ते मात्र तेथे पोहोचलो म्हणून वाचलो असे सांगताना आढळतात. आपल्या म्हणण्याप्रमाणे अगदी ५० % कॉर्पोरेट रुग्णालयात लुबाडणूक असेल तरीही हा नोर्म झालाय हे आपले म्हणणे किती संयुक्तिक आहे?
सर्वसामान्य माणसाने आरोग्य विमा उतरवणे हि अतिशय आवश्यक गोष्ट झालेली असूनही दुषणे देणारया लोकांपैकी प्रत्यक्ष किती लोकांचा असा विमा आहे हे पाहणे मनोरंजक ठरावे.असा विमा उतरवायला सांगितले तर मला काय धाड भरली आहे पासून कशाला पैसे फुकट घालवायचे पर्यंत सर्व तर्हेचे संवाद ऐकायला मिळतात. जितक्या लोकांकडे मोटार गाडी आहे त्यापैकी किती लोकांकडे आरोग्य विमा आहे हि पण पाहणी मनोरंजक ठरावी. माझ्या अंदाजाप्रमाणे हि आकडेवारी फक्त २५ टक्क्याच्या आसपास आहे. (तरुण असताना मला काय धाड भरली आहे आणी पन्नाशी झाल्यावर विमा फारच महाग आहे म्हणून). मी एक वाक्य स्पष्ट पणे माझ्या रुग्णांना सांगतो. तुम्हाला तुमच्या शरीराचे पैसे मोजायला लागलेले नसल्यामुळे तुम्हाला त्याची किंमत नाही. मोटार तुम्ही हप्ता भारत घेता म्हणून दर ६ महिन्याला त्याचे सर्व्हिसिंग करून घेता पण किती वर्षात शरीराची तपासणी करत नाही? सर्वसाधारण पन्नाशिला पोहोच्लेल्या माणसाची अशी तपासणी गेल्या दहा वर्षात एखाद्या वेळेसच झालेली असते. सारंश आपल्याला आपल्या शरीराचीच किमत नाही.
कॉर्पोरेट रुग्णालयात सेवा महाग आहे हि वस्तुस्थिती आहेच आणी तेथेही लुबाडणारे डॉक्टर आहेत हीही वस्तुस्थिती आहे परंतु तो नॉर्म आहे हि फारच अतिशयोक्ती आहे.
डिस्क्लेमर -- मी कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयात काम करत नाही किंवा त्यातील कोणत्याही कॉर्पोरेट रुग्णालयाचे समभाग माझ्याकडे नाहीत. आरोग्य विम्याची माझ्याकडे एजन्सीहि नाही. २३ वर्षे सरकारी नोकरी, चार वर्षे कॉर्पोरेट रुग्णालयात काम आणी गेली ५ वर्षे खाजगी व्यवसाय असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
21 Mar 2015 - 12:04 am | डॉ सुहास म्हात्रे
जर सरकारला स्वतः खर्च करायचा नसेल तर कॉर्पोरेट इस्पितळे व विमा कंपन्या अकाऊंटेबल कसे होतील हे पाहणे आवश्यक आहे.
याला +१. बर्याच वेळाने, हे एक वाक्य समस्येच्या मूळाकडे थोडासा इशारा करताना दिसले !
मात्र याचा अर्थ...
अ) खूप कमी किंमतीत खूप चांगली सेवा देण्याची सक्ती असा नसावा. (कारण तसे केल्यास कोणीच अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यासाठी गुंतवणूक करणार नाही... आणि सर्व रुग्णालयांचा स्तर सद्याच्या सरकारी रुग्णालयांच्या बरोबर नाही तरी त्यांच्या आसपास गेला तर नवल नाही.)
असा नाही तर...
आ) सेवेची किंमत तिच्या स्तराशी आणि गुंतागुंतीशी निगडीत असावी (जशी ती इतर कोणत्याही व्यवसाय / उद्योगधंध्यात असते.)
असा असावा.
ते तसे का असावे याची काही महत्वाची कारणे अशी आहेत...
१. पूर्वी, म्हणजे अगदी दीडदोन दशकांपूर्वी पर्यंत,
अ) अनेक प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकिय सेवा भारतात उपलब्ध नव्हत्या
आ) रुग्णालयातल्या खोल्या व इतर अ-वैद्यकीय अतिरिक्त सेवा खूपच सामान्य स्तराच्या असायच्या आणि त्यात डॉक्टर व रुग्णांना काही विशेष वाटत नसे.
इ) अनेक अत्याधुनिक उपचार आपल्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून त्यांचा विचारही केला जात नव्हता.
अर्थातच या सगळ्यांचा परिणाम रुग्णाचा खर्च / बिल कमी होण्यात होत असे.
२. सद्या जी मोठी अद्ययावत रुग्णालये उभारली गेली आहेत / जात आहेत, त्यांच्यात जगातल्या सर्वोत्तम सेवा मिळू शकतात. आज अश्या खूपच कमी वैद्यकिय सेवा आहेत ज्या भारतात कोठेच मिळू शकत नाहीत आणि त्याकरिता परदेशात जाणे आवश्यक आहे. पूर्वी अद्ययावत वैद्यकिय उपकरणे भारतात आणणे हे आयात परवाने मिळणे दुरापास्त असल्याने आणि डोईजड कर असल्याने जवळ जवळ अशक्य होते. गेल्या दोन एक दशकांत भारत सरकारने या आयातीवरची बंधने व कर लक्षणिय रित्या कमी केलेले आहेत.
३. अत्याधुनिक उपकरणे, ते वापरण्याचे डॉक्टरने घेतलेले प्रशिक्षण, त्यांची देखभाल आणि सुटे भाग, अत्याधुनिक पण म्हणूनच अजूनही पेटंट कायम असलेली औषधे, इत्यादी आजकाल भारतात मिळणे सोपे झाले आहे. या सगळ्यांचा उपयोग केल्या जाणार्या सेवा देण्यामधे अद्ययावत रुग्णालयांत चढाओढ होत आहे. हे रुग्णांचा उपचाराच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र यामुळे खर्चही वाढला आहे... विषेशतः आयात होणार्या गोष्टींचा खर्च पाश्च्यात्य देशात असलेल्या किंमतीत आणि परकिय चलनात करावा लागतो. त्यातच गेल्या दशकात डॉलरच्या तुलनेने भारतिय रुपयाच्या (जवळ जवळ ५०% किंवा जास्त) पडलेल्या दराचा परिणाम या सेवा अजूनच महाग होण्यात झाला आहे.
४. यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे रुग्णांच्या खोल्यांचा स्तर वाढला आहे. अगदी फाईव्ह स्टार म्हणण्याजोग्या खोल्या सोडल्या तरी इतर सर्वसाधारण खोल्यां आणि इतर अ-वैद्यकिय सेवांच्या बाबतीत रुग्ण (व त्यांचे नातेवाईक) चोखंदळ झाले आहेत. हे नक्कीच चांगले आहे. पण दर सुधारणा तिच्याबरोबर तिची किंमत घेऊन येते हे कोणालाही मान्य करावेच लागेल... आणि वैद्यकिय असो वा अवैद्यकिय, सेवा जितकी जास्त उच्च स्तराची असेल त्याप्रमाणात तिची किंमत वाढत जाते.
वरचे वस्तुस्थितीचे त्रोटक विश्लेषण पाहिल्यास सद्या अद्ययावत वैद्यकिय सेवेची किंमत का वाढली आहे आणि सतत का वाढत आहे हे ध्यानात येईल. मुख्य म्हणजे ही चिंता जागतीक असून भारत या बाबतीत अपवाद नाही.
अजून एक महत्वाचे...
भारतातील अद्ययावत रुग्णालयाने "मेडिकल टुरीझम" व्दारा परदेशातल्या रुग्णांना पाश्च्यात स्तराची सेवा देणे हे सामान्य झाले आहे. या रुग्णालंयांच्या सेवेची पद्धत आणि दर्जा पाश्चात्य देशातल्या रुग्णालयांच्या बरोबरीचा असूनही शिवाय त्यांचे दर पाश्च्यात्य रुग्णालयांपेक्षा कमी असल्याशिवाय शक्य नाही हे समजायला अर्थतज्ञाची गरज नाही. हे सर्व माहीत असूनही, एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी विसरली जाते की त्याच एका उपचारांची भारतीय रुग्णाला भरावी लागणारी किंमत बहुतेक वेळेस मेडीकल टूरीझम रुग्णापेक्षा कमी असते असेच दिसते.
=======
अजून काही वस्तूस्थिती
हे सर्वमान्य जागतिक सत्य आहे की, व्यावसायीक रुग्णालये चालविण्यात जेवढा रुग्णसेवा हा उद्देश असतो तितका आर्थिक फायदा हा सुद्धा उद्देश असतो... किंबहुना तसे असावे हेच जनतेच्या फायद्याचे आहे, कारण...
अ) संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्या माणसांची या जगातली संख्या या जगातल्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे सेवा शक्य होईल इतकी मोठी कधीच नव्हती आणि तशी कधीच असणे शक्य नाही याबाबत दुमत नसावे. शिवाय, संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्या रुग्णालयांची अत्याधुनिक रुग्णसेवा देण्याइतकी चांगली आर्थिक अवस्था नसते. जरी अश्या सेवेची किंमत अतुलनिय असते हे निसंशय तरी पण तेथे बहुतेक वेळेस प्राथमिक स्वरूपाची सेवा दिली जाते हे पण नि:संशय. त्यामुळे बहुसंख्य जनतेला अत्याधुनिक आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी व्यावसायीक रुग्णसेवा करणार्यांची आवश्यकता जगात सर्वच देशांत आहे.
आ) व्यावसायिक रुग्णसेवा देणार्या रुग्णालयातील गुंतवणुक्दारांना / व्यावसायिकांना योग्य तो परतावा / वेतन न मिळाल्यास त्यांना ते रुग्णालय चालू ठेवण्यात रस राहील असे म्ह्णणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. योग्य परतावा न मिळाल्यास व्यावसायिक रुग्णसेवा आस्तित्वात राहणे शक्य होणार नाही आणि बहुसंख्य नागरिक अत्याधुनिक आरोग्यसेवेला मुकतील. कारण...
इ) गुंतवणूकदार आणि वैद्यकिय व्यावसायीक समाजातल्या इतरांसारखी माणसेच असतात, त्यांनाही स्वतःच्या व कुटुंबाच्या रोजच्या खर्चांची, शिक्षणाची, सुखाची आणि भविष्याच्या तरतुदीची व्यवस्था करण्याची इच्छा व जबाबदारी असते, हे विसरून चालणार नाही.
======
सारांश
अर्थातच, कोणत्याच मोठ्या रुग्णालयात लुबाडणूक होतच नसेल असा माझा दावा नाही. पण वर दिलेल्या व्यावसायीक रुग्णालये चालविण्यामागील अर्थकारण आणि वस्तुस्थितीच्या त्रोटक विश्लेषणाने हे सिद्ध व्हावे की कोणत्याही सबळ पुराव्याविना सरसकट सगळ्या रुग्णालयांवर आरोप करणे न्यायपूर्ण होत नाही.
======
एका बाजूला कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय व केवळ ऐकीव माहितीवर दावा आहे असे स्वतः कबूल करून, वर सरसकटीकरण करून केलेला...
मात्र कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय हे कदाचित तुम्हाला अनुभवास आले नसावे किंवा पटत नसावे. त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.
हा दावा धारिष्ट्याचा आहे आणि दखलपात्र होऊ शकतो!
त्यामुळे त्यावर इतर काही स्वतंत्र टिप्पणी करण्याचे मुद्दाम टाळले आहे.
======
21 Mar 2015 - 12:54 am | आजानुकर्ण
आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या अडचणींचेच दाखले मिळत होते. निदान पेशंटचाही काही प्रश्न आहे हे आता हळूहळू मान्य होतेय ही प्रश्न सुधारण्याच्या दृृष्टीने प्रगती आहे यातच समाधान मानतोय.
हे वाक्य तर अजिबात समजले नाही. कसली दखल आणि कुठे दखलपात्र? एफआयआर वगैरे संदर्भात काही आहे काय?
21 Mar 2015 - 1:15 am | डॉ सुहास म्हात्रे
मतांत सुधारणा होते आहे हे वाचून आनंद झाला :)
कोणत्याही, विषेशतः गुंतागुंतीच्या आणि अनेक हितसंबंधी (स्टेकहोल्डर्स) असलेल्या, विषयाबद्दल सर्वांगिण सबळ माहितीशिवाय, विषयाचा सर्वांगिण अभ्यास करून, मूळ कारणे शोधून काढल्याशिवाय, केवळ ऐकीव माहिती अथवा वरवरच्या समजूतीने ठाम मतप्रदर्शन करणे सरतेशेवटी मूळ उद्देश्याला हानीकारक ठरू शकते.
"रोग केवळ त्याच्या वरवर दिसणार्या लक्षणांवर उपचार करून बरा होत नाही तर त्याच्या मूळ कारणांवर उपचार केल्याने होतो." हे वाक्य वाच्यार्थाने कोणत्याही क्षेत्रातल्या समस्येला लागू पडते.
======
हे वाक्य तर अजिबात समजले नाही. कसली दखल आणि कुठे दखलपात्र? एफआयआर वगैरे संदर्भात काही आहे काय?
यासाठी तुमचा हा दावा वाचा...
कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय
अश्या गंभीर सरसकट आरोपासाठी तुम्हीच असे म्हटले आहे...
त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.
कोणत्याही जबाबदार दाव्यासाठी यापेक्षा खूप जास्त आणी सबळ पुरावे असायला पाहिजे असे मला वाटते.
======
21 Mar 2015 - 6:35 pm | आजानुकर्ण
अहो काका माझं मत तेच आहे. ११ मार्चला (दहा दिवसांपूर्वी) मी लिहिलेला प्रतिसाद पाहा. मला संपादकीय अधिकार नसल्याने मी तो नंतर एडिट केलाय असेही नाही.
हेच वाक्य मी वर लिहिल्यावर आता तुम्हाला कुठेतरी दिग्दर्शन होत असल्याची जाणीव झाली.
कॉर्पोरेट हॉस्पिटलबाबत डॉ. आनंदी गोपाळ यांनी थोडी अंतर्गत माहिती दिली होती तो प्रतिसाद कदाचित तुम्ही वाचला नसावा. अर्थात डॉ. मंडळींनी दिलेल्या प्रतिसादाबाबत सबळ आणि जास्त पुराव्यांची मागणी झाली नसल्याने तो कदाचित योग्य माहितीवर आधारित असावा असे मानून मी पुढले मत बनवले होते. असो.
21 Mar 2015 - 11:41 am | सुबोध खरे
आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या अडचणींचेच दाखले मिळत होते. निदान पेशंटचाही काही प्रश्न आहे हे आता हळूहळू मान्य होतेय ही प्रश्न सुधारण्याच्या दृृष्टीने प्रगती आहे यातच समाधान मानतोय.
आतापर्यंत डॉक्टरांवर अन्याय याचे किती धागे निघाले आणि त्यात किती डॉक्टरनी आपले रडगाणे गायले याची काही विदा द्याल का?
डॉक्टर किती पैसे लावतात हा तर एक अतिशय लाडका विषय ( श्रमिक वर्गाची पिळवणूक सारखा)
रुग्णांवर सतत अन्याय किती होतो आहे. डॉक्टर कसे चोर, डाकू आणि लुटालूट करीत आहेत याचे किती तरी प्रतिसाद आणि धागे आपल्याला मिपावर सहज मिळतील. उदा. शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली आणि फी फक्त ८००००/- म्हणजे फार स्वस्तात सोडले आपल्याला.
नाहीतर आजकाल चोर सुद्धा फक्त १/२ मिनिटात ५००००/- ची गळ्यातली चेन काढून नेतात.
त्यामानाने फार कमी पैसे घेतले त्यामुळे आपल्या मित्राचे मनापासून अभिनंदन.
ता.क.: बायपास सर्जरी हे एक मोठे फॅड आहे!
तेंव्हा हा मानभावीपणा पुरे झाला.
मी एक साधा सरळ प्रश्न विचारतो आपल्यापैकी किती लोकानी रेल्वेच्या आरक्षणाच्या कारकुनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे? तो सकाळी आठ ते चार मानेवर खडा ठेवल्यासारखा काम करत असतो. काही चूक झाली तर पैसे त्याला स्वतःच्या खिशातून भरावे लागतात. आपण समजा दोन तास रांगेत उभे आहात आणि दहा वाजता तो माणूस पाच मिनिटे चहा प्यायला गेला तर लगेच आपण त्याच्या नावाने खडे फोडू लागता. मी माझ्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक सेवा हि अशीच आहे हे असे उदाहरण देऊन सांगत असतो.
डॉक्टरला एक साधा माणूस म्हणून पहा कि.
जीव वाचला (आणि पैसे घेतले नाही) तर एकदम देव. आणि जीव वाचला पण भरपूर पैसे घेतले तर लुबाडणूक आणि जर रुग्ण दगावला तर एकदम सैतान कसाई दरोडेखोर ???
असो या कथ्याकुटातून काहीही निष्पन्न होणार नाही हे माहित असूनही मी काही सत्य परिस्थिती काही सुजाण लोकांच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना त्यातून लोणी घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे ज्यांना ताक फुंकायचे आहे त्यांनी तसे करावे.
21 Mar 2015 - 6:51 pm | आजानुकर्ण
एवढं इमोशनल व्हायची गरज काय आहे हे मला कळत नाही. डॉक्टर-साधा माणूस-कामाबद्दल समाधान वगैरे मुद्दे कशासाठी काढताय. अनरेग्युलेटेड बिझनेस असला की त्यात गैरप्रवृत्ती वाढतात हे वेगळं सांगायला नको. आता हेल्थ इन्शुरन्स आणि हेल्थकेअर इंडस्ट्रीच्या साट्यालोट्यातून या गैरप्रवृत्तींचा सुकाळ दिसतोय. बिल्डर-राजकारण्यांच्या साटेलोट्यात जे दिसतंय तेच इथे आहे. दोन्ही ठिकाणी ग्राहक/रुग्ण हे नशीबावर हवाला ठेवून चाललेत.
१९९२ पर्यंत भारतात सेबीसारख्या संस्थांना पुरेसे अधिकार नव्हते. डिमटेरिलयाझेशन वगैरे गोष्टी नव्हत्या. शेअरचे फिजिकल पेपर्स हस्तांतरित केले जायचे. हर्षद मेहताचा घोटाळा झाल्यावर रेग्युलेशन आले आणि सामान्य गुंतवणूकदारांना एक अकाऊंटेबल सिस्टम मिळाली. तोच प्रकार अँफीसारख्या संस्था आल्यानंतर म्युच्युअल फंडांबाबत झाला. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी, आयआरडीए वगैरेंसारख्या रेग्युलेटरी संस्थांमुळे या सर्व सेवाकंपन्या ग्राहकांना अकाऊंटेबल होतायत. त्याच धर्तीवर हेल्थकेअर-हेल्थइन्शुरन्स रेग्युलेशन असायला हवे इतकंच मला म्हणायचंय. आज हेल्थ इन्शुरन्स आवश्यक आहे असं तुम्ही म्हणताय. हेल्थ इन्शुरन्सचे एक्सक्लुजन पेपर्स पाहिलेत का? हेल्थ इन्शुरन्सची कागदपत्र पाहिली तर योग्य कवरेजची खात्री करुन घेण्यासाठी त्या ग्राहकाला वकीलीतली एलएलबी आणि मेडिसिनची एमडी या दोन्ही पदव्या असल्या तर काहीतरी शाश्वती मिळेल असे आज चित्र आहे. उदा. मित्राच्या इन्शुरन्सचे पेपर पाहिले त्यात. 'हॉस्पिटलायझेशनमध्ये कॅथेटरचे पैसे देणार नाही' असे काहीतरी एक्सक्लुजन होते. आता पेशंटला कॅथेटर म्हणजे काय हे माहिती असणे ही आवश्यकता आहे काय? मग कॅथेटरचे पैसे देणारा इन्शुरन्स कोणता असावा बरे? (हे एक उदाहरण झाले. अशी एक्सक्लुजनची १२-१५ पाने असतात). त्यासाठी आजकाल १ हेल्थ इन्शुरन्स घेण्याऐवजी २ वेगवेगळे घ्या म्हणजे कवरेजचे 'चान्सेस' वाढतील अशा काहीतरी युक्त्या सांगितल्या जातात. हा काय प्रकार आहे?
भरपूर पैसे ही जीव वाचवण्याची किंमत नसते. उपचाराची जी रास्त किंमत आहे ती घ्यावी. उगीच इन्शुरन्स आहे म्हणून चार्जेस लावायचे आणि जीव वाचवला म्हणजे उपकार केल्याच्या थाटात पेशंटकडून कृतज्ञतेची अपेक्षा करायची हा दांभिकपणा आहे.
21 Mar 2015 - 6:57 pm | सुबोध खरे
लुबाडणूक करणे हा नॉर्म समजणार्यांकडून "कृतज्ञतेची अपेक्षा" करायची म्हणजे आपण शाकाहारी आहोत म्हणून सिंह आपल्याला खाणार नाही असे समजण्यासारखे बालबुद्धीचे आहे.
21 Mar 2015 - 6:11 pm | हाडक्या
एक्का काका ... अतिशय सहमत.. दोन्ही बाजूंनी मतं मांडलीयत तुम्ही.
पण खूप सारे प्रश्न पण उपस्थित होतायत मग. याची वेगळी चर्चा होऊ शकते. शक्य असेल तर वेगळा धागाच करता का ?
21 Mar 2015 - 6:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
हा म्हटलं तर गुंतागुंतीचा आहे आणि खरं तर अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक, इ (गैर)समजूतींनी गुंतागुंतीचा बन(व)लेला आहे. त्यामुळे त्यावर किती चर्चा झाली तरी एकमत होणे कठीण आहे. पण कमीत कमी प्रामाणिक कारणशोध होऊन व्यावहारीक उपाय मान्य केले गेले तरी खूप आहे.
आपल्याकडे सर्व "जीवनावश्यक" हे लेबल लागलेल्या सेवा (उदा. वैद्यकीय, रेल्वे, अग्निशमन, पाणी, वीज, इ) जागतिक दर्जाच्या मिंवा किमान उच्च दर्जाच्या असाव्या असे मत असते... पण त्यांच्या उच्च दर्जासाठी अगदी पाश्च्यात देशातले नाही तरी इथले योग्य ते मुल्य मोजायला लागते हे मात्र सोईस्करपणे विसरले जाते. राजकारणीही लोकांच्या या एकांगी आणि स्वार्थी विचारांचा पुरेपूर फायदा घेऊन त्यांच्या स्वतःच्या फायद्याचे कायदे-नियम बनवून मजा बघतात आणि मजा करतात ! ही वस्तूस्थिती दु:खदायक आहे, पण दुर्दैवाने खरी आहे.
22 Mar 2015 - 12:45 am | हाडक्या
समजा मूल्य मोजायला लोक तयार झाले तरीही
हे कमीत कमी कोणीतरी निश्चित करावे असे वाटते. ते कोण करणार, डॉक्टरच त्यासाठी योग्य आहेत ना.
आजकाल कट प्रॅक्टिस, मनमानी कन्सल्टंट फीज (मी माझे आयटीत आहे हे सांगायला आज काल घाबरतो कारण रिक्षावाल्यापासून डॉक्टरपर्यंत प्रत्येकजण झटक्यात दर वाढवतो! रिक्षावाल्याशी भांडता येते, एखाद्या विजिटसाठी डॉक्टरशी नाही.), कर चुकवेगिरी यासारख्या गोष्टी ज्या वैद्यकीय पेशासंदर्भात सर्वसामान्य बनत चालल्या आहेत ते अतिशय चूक आणि वाइट आहे.
आता हा अतिशय योग्य मुद्दा म्हणून म्हणू इच्छितो की डॉक्टरला इंजिनीअर अथवा मेकॅनिकशी नका ताडू.
फार तर फायरमनशी तुलना करा. जसे की तुमच्या घरी आग लागलीय आणि आता फायरमन विझवण्यासाठी त्याच्या गुंतागुंतीनुसार पैसे चार्ज करतोय.
लोक संकटात असतात म्हणून दवाखान्यात येतात आणि म्हणून डॉक्टरांंबद्दल चर्चा होते हो. ते मनावर न घेता, भावनिक न होता डॉक्टर किमान इथे तरी बोलू शकतात ना.
कोणीतरी साध्या मारुतीची आणि मर्सिडिजची तुलना केली होती उदा. म्हणून , त्याबद्दल असे म्हणता येईल की अहो इथे सर्वांनाच मर्सिडिज (हे शरीर) दिलीय हो, आणि ती विकून मागितली तरी दुसरी बैलगाडीपण मिळत नाही मग मर्सिडिज आहे तर त्याचा खर्च पण तसाच हा युक्तिवाद आणि विचारसरणी इथे नै पटत.
हे मात्र खरं. सध्या आमदारांच्या टोलमाफीचा आजचा दंगा पाहून तर हे अधिकच पटलं.
16 Mar 2015 - 11:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
यूएससारख्या ठिकाणी प्रचंड रेग्युलेशन आणि नियम करुन डॉक्टर व इन्शुरन्स कंपन्या दोघांनाही अकाऊंटेबल केलं आहे.
खरी वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. याबाबत अभ्यास केल्यास नक्की मतपरिवर्तन होईल. प्रचंड रेग्युलेशन आणि नियम केल्याने व विशेषत: कायद्याच्या प्रचंड दबावाखाली दबलेल्या अमेरिकन आरोग्यसेवेला "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असे सार्थक नाव पडले आहे. तेथिल आरोग्यसेवा फार महागडी आहे यामागे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्तराचा जेवढा हात आहे तेवढाच (काहींच्या मते त्यापेक्षा बराच जास्त जास्त) रुग्ण आपल्यावर खटला भरणार याची खात्री करण्यासाठी घेतलेल्या काळजीपोटी केलेल्या (शुद्ध शास्त्रीय विचाराने अनावश्यक ठरू शकतील पण न केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडवू शकतील अश्या) रुग्णाच्या तपासण्या, प्रशासकिय प्रोसिजर्स, इ चा हात आहे. आजच्या घडीला अमेरिकेसकट कोणताही देश अमेरिकन आरोग्यसेवेचे मॉडेल आदर्श आहे असे म्हणत नाही... किंबहुना आदर्श कसा नसावा याचे उदाहरण म्हणून खुद्द अमेरिकन तज्ञ बर्याच वेळा त्याचा उल्लेख करतात !
कॅनडात आरोग्यसेवा तुलनेने सुलभपणे मिळते पण महागडेपणाच्या बाबतीत तो देश अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून आहे.
युकेच्या आरोग्यसेवेचा दर्जा उच्च आहे व खर्च इतर विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे. परंतु ती सेवाही सरकारला दिवसेदिवस डोईजड होऊ लागली आहे.
शिवाय युके, अमेरिका, इ देशांतील नित्याच्या शस्त्रक्रियेसाठी (रुटीन ऑपरेशन्स) लांबच लांब प्रतिक्षायाद्या असतात व बहुतेक वेळेस अनेक महिने वाट पहायला लागते. भारत, थायलंड, फिलिपिन्स, इ देशांत "मेडिकल टूरिझम"च्या झालेल्या भरभराटीमागे हा सेवाविलंब, खार्चिकता आणि सेवेचा तुलनात्मक दर्जा ही तीन फार महत्वाची कारणे आहेत.
अमेरिकन आरोग्यसेवेबद्दलची तज्ञांची (यात अमेरिकन तज्ञ आणि अमेरिकन कायदेमंडळाचे सदस्यही अंतर्भूत आहेत) सर्वमान्य मते अजिबात गुपीत नाहीत. झटपट माहितीसाठी Mirror, Mirror on the Wall, 2014 Update: How the U.S. Health Care System Compares Internationally हा कॉमनवेल्थ फंडाचा ताजा अहवाल उपयोगी पडेल.
एक झलक म्हणून त्या अहवालातले २०१४ सालच्या आकड्यांसह ११ विकसित देशांची तुलनात्मक माहिती देणारे हे टेबल बरेच काही सांगून जात आहे. त्यात कॅनडा आणि अमेरिकेचे सर्वसाधारण मानांकन क्रमांक अनुक्रमे १० आणि ११ आहेत...
असो. आरोग्यसेवेसारख्या फार महत्वाच्या आणि लोकांच्या जिवनमरणाचा संबंध असलेल्या विषयावर वरवरच्या माहितीवरून आणि एखाद्या स्वानुभवावरून मते बनवली जाऊ नयेत यासाठीच हा लेखनप्रपंच केला आहे.
17 Mar 2015 - 12:16 am | आजानुकर्ण
लोकांचे सरासरी आयुर्मान, अॅक्टिव आयुष्याची वर्षे वगैरे पॅरॅमीटर्सवर विकसित देश हे चांगली आरोग्यसेवा पुरवणारे देश आहेत. या देशांमध्ये संपूर्ण खाजगी आरोग्यसेवा असणारी अमेरिका आणि कार्यक्षम आरोग्यसेवा असणारे इतर विकसित देश अशी विभागणी केली आहे. सरकारी आरोग्यसेवा असूनही या देशांमध्ये बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला समाधानकारक आरोग्यसेवा मिळते आहे. अमेरिकेत जिथे खाजगी आरोग्यसेवा आहे तिथे इन्शुरन्स कंपन्या आणि हेल्थकेअर प्रोवायडर यांच्या नफेखोरीमुळे प्रश्न बिकट झाल्याने अफॉर्डेबल केअर अॅक्टसारख्या सुधारणा कराव्या लागल्यात. (सरकारचे फंडिंग थांबवून गवर्नमेंट शटडाऊन करण्यापर्यंत वेळ आली होती.)
भारतात आजकाल इन्शुरन्स कंपन्या किंवा कॉर्पोरेट हॉस्पिटल्स यांच्याशी डील कराव्या लागणाऱ्या बहुसंख्यांना काय प्रकारचे अनुभव येतात याची केवळ झलक या धाग्यावर दिसली आहे. सध्याची अंदाधुंदी कमी करण्यासाठी सध्या हे दोन मॉडेल समोर आहेत. चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी आपण सरकारी मॉडेल आणू शकतो किंवा अमेरिकेसारखे रेग्युलेटेड खाजगी मॉडेल आणू शकतो. कदाचित यापेक्षाही वेगळे मॉडेल भारतात निर्माण करणेही शक्य आहे. मात्र आताचा स्टेटस को बदलणे आवश्यक आहे हेच अनेकांना पटतं नाही असं दिसतंय.
भारत व इतर देशात मेडिकल टूरिझम वाढण्याचे कारण हे भारतातील सेवा त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत स्वस्त आहे इतकेच आहे. रुपयांमध्ये कमावणाऱ्यांना रुपयात खर्च करताना ते टुरिझम वाटण्याची शक्यता बरीच कमी आहे.
17 Mar 2015 - 5:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारत व इतर देशात मेडिकल टूरिझम वाढण्याचे कारण हे भारतातील सेवा त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत स्वस्त आहे इतकेच आहे.
इतकेच कारण आहे ?!!!
म्हणजे दोन दशकांपूर्वी भारतातली वैद्यकिय सेवा पाश्च्यात्य देशांइतकीच किंवा जास्त महाग होती की काय ?!
मी वर फक्त तीन महत्वाची कारणे दिली आहेत. अगदी वरवर संशोधन केल्यास अजून सापडतील.
दुसर्यांदा उर्धृत करायचा दोष पत्करून माझे विधान परत (आणि या लेखासंदर्भात शेवटच्या वेळी) देत आहे (इथले बरेच प्रतिसाद ते विधान सिद्ध करण्यासाठीच आहेत असे दिसत आहेत !)...
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजुतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
असो.
17 Mar 2015 - 6:05 pm | असंका
सेफ टारगेटस. अगदी खरं आहे.
16 Mar 2015 - 10:03 pm | सुबोध खरे
पण वैद्यकीय व्यवस्था समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवली जावी हे काही 'लई' मागणं नसावं.
\
\टिपिकल स्वप्नाळू कम्युनिस्ट प्रतिसाद (utopian)
जेथे सरकार निम्म्याहून जास्त जनतेला अन्न वस्त्र आणि निवारा सारख्या मुलभूत सुविधासुद्धा पुरवू शकत नाही तेथे वैद्यकीय "व्यवस्था"पुरवण्यासाठी पैसा आणायचा कुठून?
बाकी चालू द्या
17 Mar 2015 - 12:13 am | काळा पहाड
तुम्ही असं का गृहीत धरताय की वैद्यकीय सेवा ही अन्न वस्त्र आणि निवारा या "नंतर" येते? आणि डॉक्टरसाहेब, जर इथली जनता काँग्रेस चे काळे ढग हाकलून लावू शकते, जर नोकरशाहीला सकाळी ९ वाजता ऑफिसला जाण्याची जबरदस्ती केली जावू शकते, तर हे ही होईल.
16 Mar 2015 - 11:58 pm | संदीप डांगे
स्वधर्म यांचा मूळ प्रश्न:
मूळ मुद्दा असा की, खरंच एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो.
मला या प्रश्नात साम्यवाद दिसून येतोय. कुणीतरी आपल्या अनावश्यक आणि अनैसर्गिक अधिकारांचा वापर करून आपले शोषण करतो अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात आली किंवा आणल्या गेली की समजावे साम्यवाद शिरतोय. सर्व माणसे समान, कामाचे समान दाम ही घोषणा कामगार सभेत छान वाटते ऐकायला.
चर्चेत हॉस्पीटल्सची महागडी बिले, किंमतीनुसार न मिळणारी सुविधा, कट-प्रॅक्टीसेस, अनैतिक कृती वैगेरे अवांतर गोष्टींवरच भर दिला गेला. त्यामुळे डॉक्टरांचे फी आकारणे हे सुद्धा ह्या क्षेत्रातल्या अनैतिक गोष्टींमधली एक आहे असेच वाटायला लागले. जे चुकीचे आहे असे माझे मत आहे.
डॉक्टरांच्या पैशांवर डोळे मोठे करणार्या पब्लिकला आपला फ्लॅट ५ लाखात घेउन ५ वर्षात ४० लाखाला विकतांना हाच विचार का सतावत नाही?
इथल्या डॉक्टरांनी आपापल्या परीने चांगली उत्तरे दिलीत पण आम्ही खर्च करतो, मेहनत घेतो, वेळ घालवतो, अनुभवाचा पैसा आहे वैगेरे उत्तरे देऊन माझ्यामते थोडीशी सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न झाला तो पटला नाही.
हा वरचा प्रश्न नुसता डॉक्टरांनाच नाहीतर सेवाक्षेत्रातल्या सगळ्याच व्यावसायिकांना सतावतो. जेव्हा माणूस देणेकर्याच्या भुमिकेत असतो तेव्हा कितीही पैसे द्यावे लागले तरी 'नेहमीच' जास्त वाटत असतात. कारण आपण भारतियांना मुळात श्रमाचा, कौशल्याचा काही खास आदर पुर्वीपासूनच नाही. दुसर्याने फक्त शारिरीक, बौद्धिक, वैचारिक मदत केली तर त्यात 'एवढे पैसे घेण्यासारखं एवढं काय?' असा साधारण भाव असतो. वस्तूची किंमत देतांना, वस्तूचा वापर, उपभोग घेतांना हा विचार केला जात नाही. वस्तू तयार करायला कारखाना लागतो, त्याला प्रचंड पैसा लागतो, शिवाय ती वस्तू आपल्या हातात असते. असे सगळे ज्ञान सामान्य माणसाकडे असते. म्हणून त्यात जास्त त्रास होत नाही. फारतर भावताव करून आपल्याला अमूक एक रुपयांची सूट मिळवता आली याचं सुप्त समाधान. पण हातात असलेल्या वस्तुच्या खर्या किंमतीचं त्याला कधीच ज्ञान होत नाही.
इंटँजिबल अॅसेट्स च्या बाबतीत लोकांच्या कपाळावर आठ्या येतातच हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एक कंपनी लोगो बनवायचे सुमारे ५ ते १५ हजार घेतो. दिसायला घड्याळाच्या डायलएवढ्या दोन-तीन वर्तुळं, त्रिकोण, चौकोन असलेल्या रंगीत चित्राला बनवायला फारसा वेळ लागत नसणार हे अगदी बालबुद्धीलाही सुचते. त्यात कंपुटरवर तर बनते आजकाल असे म्हणून काही लोक हे किंमत अत्यंत अवाजवी आहे असं म्हणतात. कारण १० मिनिटांच्या कामाचे १० हजार फारच होतात हा विचार. हेच काम ('असंच' नाही) रोड्साईड डीटीपीवाला त्यांना १०० रुपयात करून देतो. कुणी आणि डिझायनर ५०० रुपयात करून देतो. त्यामुळे मी देणारा वेळ, माझा अभ्यास, कला, अनुभव, झालेलं नाव याच्याशी त्यांना काहीच घेणे-देणे नसते. कारण त्यांच्या हातात फ्रीज, टीवी सारखी दृश्य वस्तू पडत नाही म्हणून फसवल्या जातोय का असा भुंगा सतावतो.
याबाबतीत एक जुना किस्सा: सरकारने 'काळ्या नंबरप्लेट बदलून पांढर्या करा'चा हुकूम काढला. मी पण एकएक काळा-पांढरा डबा घेऊन आपल्या कलेतून पॉकेट्मनी कमवायला सुरुवात केली. एक मुलगा साधारण १२वीतला आपली लुना घेऊन आला (ब्रह्मे नाही हो) २५ रुपये फार होतात म्हणे, एवढासा तर रंग लागतोय. मी म्हटले, भाऊ, स्किलचे पैसे आहेत. तर तो देव-ग्राहक म्हणाला ते तर गॉड-गिफ्ट आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काय कष्ट पडतात? सवयीचं आहे तुमच्या. १५ रुपये घ्या. मी म्हटले घे हा रंगाचा डबा आणि ब्रश. फक्त मला १०च रुपये दे आणि बस रंगवत आपली नंबरप्लेट. उद्या पोलिसाने पकडले तर सांग आपलं दिव्यज्ञान आणि वाचव ५०० रुपये कसे ते?
दुसर्याच्या श्रमाची किंमत करा, तो जो मागतोय त्या मोबदल्यात तुमच्या हातात काय पडतंय याचा दूरगामी परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो की नाही याचा विचार करा. कोण काय मागतंय यापेक्षा त्यातून माझा काय फायदा आणि त्या फायद्याचं माझं मूल्यमापन काय हा प्रश्न स्वतःला विचारला की कुणाचेही पैसे डोळ्यात येणार नाही. तुमच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करणारा भले तिथे ८च तास उभा असेल. पण तुम्ही त्या आठ तासाच्या जिवावर कदाचित विसेक वर्ष अजून आनंदानं जगणार आहात. त्याचे ते पैसे आहेत. बाकी परवडत नसेल तर मी सुरुवातीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सरकारी दवाखाने आहेत.
17 Mar 2015 - 5:14 pm | स्वधर्म
चर्चा बरीच झडली. त्यातून मला कळले ते असे:
- महाकुशल लोकांच्या कामाचे मोल करणे बरेच अवघड अाहे. वरवर दिसतो तसा साधा हिशोब लावून कदाचित उपयोग नाही. माझा दृष्टीकोण ओव्हर-सिंपलिफाइड होता. बदलाची गरज अाहे.
- परवडले तर घ्या, नाहीतर फूटा हे काही अपवादात्मक तत्व नाही. सर्रास वापरले जाते. तो काही बहुसंख्य लोकांना सतावणारा मुद्दा नाही.
- मागणी - पुरवठा - किंमत ही साखळी बरीच खोलवर काम करतेय. सहजासहजी ‘शेवटच्या पायरीवरच्या माणसाचा’ विचार होण्याचे दिवस संपले.
- व्यकतीगत उत्कर्ष हे वाटते त्यापेक्षा मोठेच मूल्य अाहे.
- मी कुठेच सर्वांना समान मोबदला मिळावा असे मत मांडले नव्हते, अाजूबाजूच्या लोकांच्या जीवनमानाशी काही ताळमेळ असावा, समाजात अनलिमिटेड अार्थिक डिसपॅरिटी नसावी, असे मत होते. अत्यंत भाडवलशाही प्रधान, व्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक असलेल्या देशातही एखाद्या शिक्षकाचा पगार अाणि संगणक अभियंत्याचा पगार पाहता, एवढी डिसपॅरिटी अाढळत नाही. अापल्याकडे मात्र ही सर्वत्र केवढी अाहे. कित्येकांना त्यात साम्यवाद, जळजळ इ. दिसले. हे मात्र समजले नाही.
डाॅक्टर या एकाच व्यवसायिकावर रोख नव्हता, पण चर्चा मात्र तोच फोकस धरून झाली. त्या जागी कदाचित इतर काही उदाहरणे अाणायला हवी होती. किंवा मूळ लेखातच ती तृटी राहून गेली. असो, पण ते उदाहरण घेतल्याने खोलवर चर्चा झाली हेही खरे. इथे काही प्रतिक्रिया मात्र कारण नसताना व्यक्तीगत अाल्या, ते टाळता अाले असते.
17 Mar 2015 - 6:23 pm | स्पा
काय ठरल म शेवटी ?
17 Mar 2015 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रत्येकाचे आपापला मुद्दा बरोबर आहे हे बर्याच अंशी ठरवून झाले आहे. बोला, तुम्हाला काय ठरवायचं आहे ? ;)
17 Mar 2015 - 6:24 pm | असंका
ठिक आहे. फार फरक असूच नये उत्पन्नात. पण त्यासाठी इतरांचे उत्पन्न जास्ती का हाच एक प्रश्न विचारावासा का वाटला? इतरांचे उत्पन्न कमी का असंही विचारता आलं असतं. त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येइल असंही विचारता आलं असतं-
उगाच ज्यांनी आपल्या प्रश्नाला आपल्या मताविरुद्ध उत्तरे दिली त्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून जात आहात.
17 Mar 2015 - 6:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
चला ३०० झाले.
17 Mar 2015 - 6:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
३०० प्रतिसाद धाग्यास पडल्याबद्दल टाके घालायची सुई, एक इंपोर्टेड स्टेथोस्कोप, २१ हायपोडेर्मिक सिरिंजेस, पोटदुखीवरची २१ घरगुती औषधे ह्या पुस्तकाची एक पायरेटेड कॉपी देउन धागाकर्त्याचे उपचार केले जात आहेत.
(अखिल मिपा मापंकाढे समिती)
17 Mar 2015 - 6:38 pm | असंका
फुकट ना? ;-)
17 Mar 2015 - 7:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हो...अहो सत्कार आहे हा....शालजोड्या संपल्यात नैतर त्यापण देणार होतो.
17 Mar 2015 - 6:39 pm | स्पा
पुरे झाले आता
चिपाड झालेय साफ धाग्याचे :)
20 Mar 2015 - 1:49 pm | इरसाल
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/03/150319_private_health_sector_re...
आज हे वाचले
20 Mar 2015 - 7:33 pm | काळा पहाड
याला खरं तर पर्यायच नाही. मोदी सरकारने खरं तर दोन गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष केलंय त्यातली एक गोष्ट आहे वैद्यकीय सेवा आणि दुसरी शिक्षण. अर्थात शेती हा एक इश्यू आहेच पण शहरी जनतेसाठी तरी महत्वाच्या अशा या दोनच गोष्टी. सरकारनं असं का केलं हे समजायला मार्ग नाही.
22 Mar 2015 - 6:27 pm | आजानुकर्ण
Corruption ruins the doctor-patient relationship in India हा डॉ. डेविड बर्गर यांनी ब्रिटिश मेडिकल जर्नमध्ये लिहिलेला लेख या प्रश्नाचे विस्ताराने वर्णन करतो
http://pbtindia.com/wp-content/uploads/2014/06/BMJ-Article-May-2014-Heal...
डॉ. समीरन नंदी यांनी भारतीय दृष्टीकोणातून या लेखाला दिलेली सहमती
http://indianexpress.com/article/opinion/columns/first-give-the-patient-...
दोन्ही लेख खूपच छान.
22 Mar 2015 - 6:28 pm | आजानुकर्ण
लेखातील वाक्य
22 Mar 2015 - 7:11 pm | नगरीनिरंजन
अरेरे.. वाईट वाटलं. पेशंट दगावल्यावर डॉक्टरांना धरुन मारणार्या व हॉस्पिटलची तोडफोड करणार्या लोकांना नावं तरी कोणत्या तोंडाने ठेवायची?
22 Mar 2015 - 7:53 pm | आजानुकर्ण
डॉ. बर्गर यांनी जागतिक वैद्यकीय सेवेची इंटिग्रिटी राखण्यासाठी विकसित देशांनी भारतातल्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतून डॉ. झालेल्यांना झालेल्यांना potentially corrupt मानून त्यांची पदव्या अग्राह्य धरण्यास पुढाकार घ्यावा अशा आशयाचा सल्ला दिला आहे.
22 Mar 2015 - 7:53 pm | आजानुकर्ण
त्यांच्या पदव्या*
23 Mar 2015 - 1:12 am | डॉ सुहास म्हात्रे
आजूबाजूला उघडपणे घडणार्या गोष्टींची कारणपरंपरा समजायला भारतियांना पाश्च्यात लेखांची गरज पडते हीच तर खरी शोकांतिका आहे. तसे आपल्याला बर्याच गोष्टी पाश्चिमात्य लोकांनी कान पकडून सांगितल्यानंतरच पटण्याची प्रथा आहेच म्हणा !
दादासाहेब/नानासाहेब/बाबासाहेब/ इ नी सरकारकडून खाजगी मेडिकल / इंजिनियरिंग / बी एड कॉलेजचा परवाना मिळवला की आपण कौतूकाने त्यांचा उदोउदो करतो. इतकेच नाही तर तेथे ७५ / ५० / २० / १० लाखांची डोनेशन देऊन त्या कॉलेजांत नावे दाखल होऊ लागली की त्या कौतूकाला अजूनच असूयायुक्त उधाण येते; काही लोक तेथे पैसे हातात घेऊन आपल्या पाल्याचे नाव दाखल करायला रांगेत उभे राहतात. अनेक दशलक्ष भरून कॉलेजात दाखल झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक खर्च केलेले पैसे कमीत कमी वेळात फायद्यासह कसे परत मिळवायचे याचा विचार करत नसतील, असा विचार करणे किती शहाणपणाचे आहे ???
इथे डॉक्टरांच्याबद्दल तावातावाने तक्रार करणार्यांतील किती लोकांनी या कॉलेजेसच्या सरकारी खिरापतीचे (कमीत कमी अश्या कॉलेजमधील डोनेशनचे) कौतूक न करता त्याविरुद्ध आपल्या लोकप्रतिनिधीकडे तक्रार केली आहे, किंवा ही पद्धत गैर आहे म्हणून मोर्चा नेला आहे ? त्यापेक्षा सॉफ्ट टारगेट असलेल्या डॉक्टरांविरुद्ध / हॉस्पिटल्सविरुद्ध सरसकटीकरण करून ऐकीव माहितीच्या बळावर मत बनवून एखाद्या संस्थळावर अथवा खाजगीत शेरे मारणे आणि एखाद्या हॉस्पीटलची मोडतोड करणे जास्त सोईचे आणि सुरक्षित आहे हा "सारासार विचार" सहजपणे केला जातो...
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
"आपली कृती गैर होती आणि समस्येचे मूळ कारण दुसरेच होते" हे नंतर केव्हातरी आपल्याला पाश्चिमात्य लोक सांगतिलच... आणि आपला पूर्वेतिहास पाहता तेव्हा ते आपल्याला नक्कीच पटेलसुद्धा !!!
23 Mar 2015 - 4:06 am | आजानुकर्ण
ब्रिटिश मेडिकल जर्नल हे वैद्यकीय क्षेत्रात सन्मान्य समजले जाते असा माझा समज होता. या विषयातही आपले आणि बाहेरचे असा स्पृश्यास्पृश्यपणा करायचा असतो ही अक्कल अजूनही मला आलेली नाही. हळूहळू येईल म्हणा. व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून आलेल्या एका पाहुण्या डॉक्टरला थोडक्या काळात जो भ्रष्टाचार दिसला त्याचे पुरावेच आतापर्यंत मागितले जात होते. हिम्मतराव बावस्करांचाही या कटप्रॅक्टिसबाबत लेख आला होता. दुर्दैवाने त्याचा दुवा सापडत नाहीये. मात्र आता नावाजलेल्या जर्नलमधील लेख दिसल्यानंतर मूळ कट-प्रॅक्टिस-भ्रष्टाचार आणि अकाउंटॅबिलिटीबाबत बोलण्याऐवजी भारतीय आणि पाश्चिमात्य अशी टिप्पणी रोचक आहे.
___/\___ या टिप्पणीबाबत आणि त्यामागच्या अध्याहृताबाबत निःशब्द झालोय. कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे मिळवण्यासाठी कोणते मार्ग वैध आणि कोणते मार्ग अवैध आहेत याची जाणीव हिपोक्रेटसची ओथ घेणाऱ्या डॉक्टरांना नसावी! हा युक्तिवाद पाहून डॉ. बर्गर सांगतात त्याप्रमाणे अशा दशलक्ष भरुन डॉ. पदवी विकत घेतलेल्यांना पोटेन्शियली करप्ट असा शिक्का मारुन इतर देशांनी त्यांची पदवी अमान्य करणे हा एक योग्य उपाय होईल असे वाटते.
गरीब रुग्णांकडून विनाकारण सीटीस्कॅन, एमराय अशा चाचण्या कमिशनसाठी करवून घेणारी इस्पितळे आणि डॉक्टर मंडळी अजून तुम्हाला सॉफ्ट टारगेट वाटतात याचे बाकी नवल वाटते.
असो. या विषयावर आता माझ्याकडे नवीन काही प्रतिसाद देण्यासारखे नाही. डॉक्टरांसारख्या सॉफ्ट टारगेटवर टीका करणारा व त्यांच्या पैशावर जळणारा समजून फारतर मला गप्प केले असे समजा.
23 Mar 2015 - 10:34 am | सुबोध खरे
कर्ण साहेब
वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार नाही असे कोणीच म्हणत नाही. किंवा त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. समाजातील सर्वसामान्य माणूस जेवढा भ्रष्ट आहे तितकेच डॉक्टर भ्रष्ट आहेत.
परंतु आपण दिलेला दुवा आपले "नोर्म" किंवा १०० % डॉक्टर भ्रष्ट आहेत याच्या समर्थनार्थ जालावर खोदकाम करून काढलेला दिसतो आहे. कारण याचे सर्व दुवे उत्तर भारतातीलच आहेत.
कारण साधे सरळ आहे. आपण बिहार व उत्तर प्रदेशात गेलात तर जवळ जवळ सगळी यंत्रणा किडलेली आहे.
पण तशीच परिस्थिती सगळ्या भारतभर आहे हे म्हणणे म्हणजे बिहार मध्ये मास कॉपी करणे चालू आहे म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्या केंद्रांवर आहे असेच म्हणण्यासारखे आहे. आपण जर महाराष्ट्र गुजरात दक्षिण भारतात गेलात तर परिस्थिती अशी नाही हे आपल्याला कळेल.
खाजगी वैद्यकीय महाविद्यालये हि ताबडतोब बंद केली पाहिजेत याबद्दल दुमत अजिबात होण्याचे कारण नाही. तेथील परिस्थिती भयावह आहे. काही दिवसांनी तर आपल्याला नुसता प्रवेशच नव्हे तर परीक्षा पास होण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतील अशी परिस्थिती असेल. आज आपल्याला एम बी बी एस होण्यासाठी ५० ते ७५ लाख रुपये खर्च येतो आणि एवढे होऊन या मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाबद्दल न बोलणे हे श्रेयस्कर राहील.
एम यु एच एस ची परिस्थितीसुद्धा वाईट आहे. कारण बर्याच्षा आरक्षणाच्या उमेदवारांना पास होण्यासाठी शैक्षणिक दर्ज्याची पातळी इतकी खाली आणलेली आहे कि काही दिवसांनी केवळ परीक्षेत उपस्थित राहिलात कि पास म्हणून जाहीर करण्यात येईल. (याचे कारण राजकीय हस्तक्षेप). मी प्रत्यक्ष पाहत असलेली हि परिस्थिती भविष्यात भयावह होण्याची दाट शक्यता आहे. ( आरक्षण वादी यावर गोंधळ घालतील हे गृहीत धरून मी लिहित आहे). या कारणास्तव मी अजूनही एम डी चा परीक्षक होण्याचा सन्मान गेली ५ वर्षे नाकारत आलो आहे. लायकी नसलेल्या उमेदवाराला आरक्षण असलेल्या --(आर्थिक/ खाजगी महाविद्यालयातील किंवा जातीवरून सरकारी महाविद्यालयातील) विद्यार्थ्याला उत्तीर्ण करण्याचे पाप मला माझ्या माथी नको म्हणून.आणि याच कारणास्तव मला अजूनही सहा. प्राध्यापक वरून प्रोफेसर( प्राध्यापक) म्हणून मान्यता मिळालेली नाही. (२०१० पासून अर्हता असूनही.)
असो मूळ विषय काय आणि यावर आपण केलेलं खोदकाम काय याचा तसा जवळचा संबंध नाही तेंव्हा मी आता येथे थांबतो.
23 Mar 2015 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
अजानुकर्णसाहेब, नमस्कार !
"समस्या आहे" हे कोणीच नाकारले नव्हते; माझ्यासह अनेक जणांचे जुने प्रतिसाद वाचल्यास त्यात तसा उल्लेख 'आता' दिसू शकेल. त्याबद्दल पाश्च्यात्य जर्नलमधला एक लेख वाचून तुम्हाला खात्रीलायक पुरावा मिळाला असे वाटले, हे खरेच गमतीदार आहे (काहीजण याला काखेत कळसा... इत्यादी इत्यादी असे काहीसे म्हणतील) पण तेही विरळ नाही... तेव्हा असो ! :)
पण इथे मुख्य आक्षेप होता तो
(अ) सरसकटीकरणाला;
(आ) समस्येच्या मूळ कारणांकडे दुर्लक्ष केले जात आहे;
(इ) मूळ उपाय केल्याशिवाय समस्या ठीक होणार नाही; आणि
(ई) मूळ कारणावरचा उपाय करण्यासाठी लोकांत धारिष्ट्य नाही; यावर.
मात्र हे सगळे अनेकदा स्पष्ट करूनही तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले गेले आहे आणि काहीतरी नविन फाटा फोडला गेला. असे करणेही फार विरळ नाही त्यामुळे फारसे आश्चर्य वाटले नाही... म्हणून परत असो :)
एखादी समस्या खरेच सोडवायची असली तर हे खालचे फारच साधे पण मूलभूत वचन फार महत्वाचे आहे...
"समस्या सोडविण्यासाठी प्रयास करणे महत्वाचे असते, पण तो प्रयास कोणत्या दिशेने करायचा हे माहीत असणे-नसणे यावर यशापयश अवलंबून असते."
तेही असोच.
प्रयासाच्या योग्य दिशेकडे संभाषण वळवण्याचे माझे प्रयत्न, 'फायदा-व्यय गुणोत्तर' खूपच व्यस्त होत चालल्याने, आता आवरते घेत आहे. तुमच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा !
=======
अवांतर :
१. कोणत्याही अगदी पियर रिव्ह्युड जर्नल्समधल्याही (ज्यात ब्रिटिश मेडिकल जर्नलची गणना होते) एका लेखातले दावे/निर्णय कधीही सार्वकालीन सत्य (पक्षी : देवाचा शब्द) समजले जात नाहीत. तसे समजणे शास्त्रिय तत्वात बसत नाही. (माहित नसल्यास नोंद करावी). ते दावे इतर संशोधकांच्या स्वतंत्र संशोधनाने सिद्ध व्हावे लागतात. पियर रिव्ह्युड जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले निर्णय स्वतंत्ररित्या सिद्ध न होऊ शकल्यास काही कालाने बाद केले जातात.
२. ब्रिटिश मेडिकल जर्नलमधील शोधनिबंध पाहू-वाचू शकणे ही नि:संशय फारच चांगली गोष्ट आहे. त्या आणि इतर मान्यवर जर्नल्समधेही (इथे यादी आहे) पाश्चिमात्य देशांसह इतर अनेक देशांतील वैद्यकीय सेवांबद्दल अनेक "स्कॉलरली आर्टीकल्स" सापडतील. त्यांचे वाचन नक्कीच मनोरंजक होईल याची खात्री आहे. कमीत कमी सर्वांगिण माहिती मिळून आपण केलेला वाद एकांगी तर नाही ना याची खात्री करता येईल. शास्त्रिय पद्धतीने वाद करण्यासाठी हे तत्व मूलभूत समजले जाते.
23 Mar 2015 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे
निम्न स्तरात बर्याचदा भोंदु डॉक्टर असतात. खर तर ते बेअरफूट डॉक्टर्स असतात. सभोवतालच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेउन त्यानुसार त्यांना परवडेल अशा फीया ते ठेवतात. जास्त फी लोकांना परवडणारी नसते. जीवापेक्षा काही महाग नाही हा विचार तिथे नसतो. समजा काही बर वाईट झाल तर देवाची इच्छा! आधुनिक व योग्य उपचाराअभावी मरणारी कितीतरी माणसे असतात.
पण डॉक्टर या पेशाची सरासरी प्रतिमा ही देवा कडून कसाई कडे चालली आहे हे कुणी नाकारु शकत नाही.
23 Mar 2015 - 11:07 pm | आयुर्हित
आधुनिक व योग्य उपचाराअभावी मरणारी कितीतरी माणसे (x) असतात.
हे जसे खरे आहे, तसेच
आधुनिक पण अयोग्य उपचाराअभावी मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात,
हेही तितकेच खरे आहे.
24 Mar 2015 - 12:09 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अभावी का मुळे?
24 Mar 2015 - 1:41 am | हाडक्या
चोप्य पस्ते एररमस्ति.. :)
24 Mar 2015 - 8:28 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहज एक शंका म्हणुन विचारतो.
एररमस्ति म्हणजे एररम+अस्ति का एरर्+मस्ति????? =))
24 Mar 2015 - 10:48 am | डॉ सुहास म्हात्रे
>>> चोप्य पस्ते एररमस्ति..
शेवटची दोन टिंबे पाहता ते पूर्ण वाक्य "चोप्य पस्ते एररमस्ति अस्ति ।" असेच असावे =))
24 Mar 2015 - 11:04 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
*ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
24 Mar 2015 - 3:16 pm | हाडक्या
एक्का काकांना पैकीच्या पैकी मार्क.. ;)
24 Mar 2015 - 6:09 pm | बॅटमॅन
एक नंबर =)) =)) =))
24 Mar 2015 - 9:25 am | आयुर्हित
आधुनिक पण अयोग्य उपचारामुळे मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात,
24 Mar 2015 - 11:30 am | आयुर्हित
दूषित रक्तामुळे पाच वर्षात ८,९८३ जण एचआयव्हीग्रस्त
24 Mar 2015 - 8:20 am | आनंदी गोपाळ
ही हिपोक्रेटसची ओथ नक्की काय असते, व ती आपल्या देशातले डॉक्टर लोक कधी व कशी 'घेतात' हे मला कुणी समजवून सांगेल का?
ते समजले नंतर दर दोन मिनिटांनी 'हिपोक्रेटिक ओथ' म्हणून उर बडवणार्या हायपोक्राईट्सना पुढचं समजवून सांगता येईल.
24 Mar 2015 - 8:58 am | सुबोध खरे
गोपाळराव,
कशाला वितंडवाद घालताय?
इंग्रजीमध्ये म्हण आहे.
Don"t argue with a fool.
First he will bring you down to his level and then beat you with experience
24 Mar 2015 - 9:16 am | आनंदी गोपाळ
उचल्ला कळपाट की लागले बडवायला, असले पंडित आजकाल फार झालेत.
त्यामुळे अनेकदा न राहवून लिहिलं जातं.
शिवाय धडधडीत धंदेवाईकपणा करणारे वैदूही जेव्हा लोकांना इथे ज्ञानदान करू लागतात, अन लोकांच्या ते ध्यानी येत नाही, तेव्हा नाईलाजाने आपले कपाळ बडवायच्या ऐवजी काँप्युटरचा कळपाट बडवून थोडी (दु:)उत्तरं देतो ;)
असो. मी आता कल्टी.
24 Mar 2015 - 10:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
*biggrin* :-D :D +D =D :biggrin:
24 Mar 2015 - 1:22 pm | प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन तुमची खरड वही बघा ना. एक प्रश्न विचारला आहे तुमच्या कडुन खरी माहीती मिळेल म्हणुन.
26 Mar 2015 - 12:30 am | आनंदी गोपाळ
मिपावरील खव वा संदेशांत तुमच्याकडून आलेले काहीच दिसले नाही. कृपया पुनः पाठवणार का?
24 Mar 2015 - 9:37 am | ब़जरबट्टू
कसलेही कष्ट न घेता केवळ इतर प्रतिसादांच्या जोरावर लेखक जेव्हा असे त्रिशतकी धागे करतात, तेव्हा त्यांचे इनोमिश्रित कौतुक वाटते, व साले असले ज्वलंत विषय आपल्याला का सुचत नाही याची एक मिपाकर म्हणून लाज आहेच... :(
24 Mar 2015 - 11:21 am | टवाळ कार्टा
इतके काय मनाला लावून घेता...सुपारी देता का? दिवसाला १ रुपया/प्रतिसाद या प्रमाणे १०० दिवस धागा "तेवत" ठेवला जाईल...एका दिवसात जास्त प्रतिसाद हवे असल्यास टोटल दिवस कमी होतील (५ प्रतिसाद्/प्रतीदिवस...२० दिवसांसाठी सेम रेट)
आज"च" रोख उधार कधीच नै ;)
24 Mar 2015 - 11:32 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन काही चांगली पॅकेज आलीयेत डोक्यात.
24 Mar 2015 - 11:49 am | टवाळ कार्टा
करू की...कोण म्हणते मराठी माणसाला धंदा जमत नै...इथेच दुकान टाकू :)
24 Mar 2015 - 1:19 pm | ब़जरबट्टू
हीच तर गोम आहे ना भाऊ, पैसे देऊन तर खुप काही तेवत ठेवता येते... इथे बघा कशी मान्यवर मंडळी साद आली का प्रतिसादाचा पाऊस पाडत्तात.. हे असले काहीतरी सांगा..
असा विषय सांगा, असा विषय सांगा की प्रतीसादांचा धो धो पाऊस पडला पाहिजे. निद्रिस्त, सन्यासी, संसारी सारे आडी कामाला लागले पाहिजे... :) मग बघू कमिशनचे.... :))
24 Mar 2015 - 1:32 pm | टवाळ कार्टा
मग असे केले तर त्याला कंपूबाजी म्हणतात ;)
24 Mar 2015 - 3:21 pm | हाडक्या
टका, तुम्ही इथे नव्हता म्हणून तुम्हास सांगणे भाग पडतेय, कंपुबाजी वायली अन सांघिक कामगिरी वायली.
आमची सांघिक कामगिरी आहे असे सांगितले की संमंदेखील तुमचे कौतुक करते असे ऐकून आहे तेव्हा इथून पुढे लक्षात ठेवा हे (म्हणजे मिपा-कायद्याच्या कचाट्यात सापडणार नै तुम्ही). ;)
24 Mar 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा
आमाला नाय वो माहित कंपूबाजी काय अस्ते...इतके पण जुना नाय झालो अजून
24 Mar 2015 - 2:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये गुन्हा आहे. कंपुबाजी करताना रंगे हात सापडला की अवतारसमाप्तीची शिक्षा होते.
24 Mar 2015 - 6:12 pm | बॅटमॅन
किंवा खास कक्षात इतर कंपूबाजांसोबत रवानगी होते. ;)
25 Mar 2015 - 11:47 am | पलाश
काही वर्षे जुना असलेला पोटदुखीचा हा विकार कमी होणारच नाही असं दिसतंय एकंदरीत!!! ;) :)
25 Mar 2015 - 11:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पण तिथे वशिल्याशिवाय एंट्री नै असं ऐकलयं. आणि तो कक्ष तिकडे सोडुन इकडेचं जास्त अॅक्टीव्ह असतो असं निदर्शनास आलेले आहे. =))
@पलाश, पोटदुखीवर इलाज करणारे डॉक्टर इथेचं आहेत की =))
24 Mar 2015 - 2:32 pm | अत्रन्गि पाउस
चौशतका कडे मुंगीदौड चालू आहे ...
24 Mar 2015 - 4:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण असो...!! =))
24 Mar 2015 - 5:15 pm | अत्रन्गि पाउस
होऊन जाऊ दे !
24 Mar 2015 - 5:40 pm | हाडक्या
चिमणराव कधीपासून लाजायला लागले.. आँ? (लगीन ठरलं की कांय ?)
24 Mar 2015 - 6:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मी नै ज्जा!!!!!! =))
25 Mar 2015 - 4:36 am | खटपट्या
सत्कारासाठी काही वैद्यकीय पॅकेज वगैरे जाहीर करताय का ?
बाकी आगामी चौशतकासाठी, आखिल भारतीय वाजवी फी आकारणार्या डॉक्टरांच्या संघटनेतर्फे मोफत वैद्यकीय तपासणीचे पॅकेज देउन सत्कार...
25 Mar 2015 - 8:34 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पॅकेज जाहिर करणं आमच्या डिपार्टमेंटात येत नाही. =))
चौशतकानंतर काय करायचं ह्याविषयी जेपी, कार्यकर्ते आणि मंडळींमधे चर्चा चालु आहे. =))
व्यनि केलाय.
24 Mar 2015 - 11:23 pm | बाबा धुमाळ
अलीकडे सर्जन पंचांग पाहून ऑपरेशनचा दिवस ठरवतात. थोडा कट ज्योतिषबाबाला दिला पाहिजेल
25 Mar 2015 - 9:09 am | चैतन्य ईन्या
दुर्दैवी आहे हे सगळे. राखीव जागा हव्या होत्या पण आता अतिरेक झालाय. समाजाचे इतके तुकडे पडले आहेत कि तुम्ही काही सांगायला गेलात कि गेल्या ५००० वर्षांची भाषा चालू होते. आत्ताची आर्थिक सुस्थिती हि गेल्या ६० वर्षांची फळे आहेत. पण पुढले चित्र भीषण आहे. ह्याच अतिरेकामुळे इंग्रजी शाळांची मागणी वाढली कारण त्या विनानुदानित आहेत. पण तिथेही आनंदच आहे. पण खरी समस्या १२ नंतरची आहे. ज्या पद्धतीत निकृष्ट दर्जाची पिढीच्या पिढी बाहेर पडत आहे त्याचे परिणाम अजून १०-२० वर्षात दिसतील. फाजील आणि एकच एक घोषवाक्य अमक्या मुले आह्माला शिकायला मिळाले नाही वगैरे. मुदलात किती लोहारांनी महारांना त्यांचे द्यान दिले आणि किती कुम्भारणी बाकीच्यांना द्यान दिले? किती चाम्भारांनी बाकीच्यांना दिले. असो.
सगळ्यात दुर्दैव म्हणजे आपले शासन. ह्यांच्या उलट सुलट निर्णयाने सगळ्या अनुदानित शाळांची वाट लावली. पूर्वी पुण्यात नुमवी, भावे वगैरे चांगल्या नावाजलेल्या शाळा आता त्यांची अवस्था बघवत नाही. दुसरीकडे मिशनरी शाळा अल्पसंख्याक लोकांच्या म्हणून त्यांना नियम नाहीत. मग ते आपले दर्जा टिकवून आहेत. एकेकाळी ह्या शाळांना कोणी भिक घालत नसे. काळाचा महिमा. पद्धतशीरपणे शासन शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडले. सगळ्या राजकारण्यांनी स्वताचे उखळ तेवढे पांढरे करून घेतले. काय ते भारती आणि डीवाय पाटील कॉलेजेस. पर्यायाच नाही मग चांगली मुले आली स्वतः अभ्यास वगैरे करून आता हे नावाजले पण बक्कल कमावून घेतले. तीच अवस्था विना अनुदानित शाळांची. आपण काय व्यवस्था करतोय ह्याचे भान नाहीये. सगळीकडे नुसते बजबजपुरी. संशोधन वगैरे गेला केरात. लाज वाटली पाहिजेल कि भारतीय मुले मोठ्या संखेने बाहेर शिकायला जातात. पण सध्या एका समाजाबद्दल इतका तिरस्कार निर्माण केलाय कि तुम्ही बोलूच शकत नाही. ह्याचे परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागतील तेंव्हा कदाचित कदचीत डोळे उघडतील पण सध्या तसे होणे अवघड आहे. कारण फक्त अह्मीच खरे अशी काहीशी वृत्ती फोफावली आहे.
25 Mar 2015 - 10:57 am | संदीप डांगे
गल्ली चुक्या क्या तुमारा भौ...? बेछूट गोळीबार...?? कहींपे निगाहे कहींपे निशाना...???
25 Mar 2015 - 12:55 pm | असंका
हेच चालू आहे ह्या धाग्यावर.... वर ज्या लिंक दिल्या आहेत त्यात त्यांनी खाजगी मेडीकल कॉलेज बद्दल लिहिलं होतं. त्या सुतावरून हे आता इथपर्यंत आलेलं आहे.
26 Mar 2015 - 3:25 am | चैतन्य ईन्या
वरकरणी चुकली राव पण जरा खोलात विचार करून बघा. शाषन आपला हात काढून घेताय आणि सगळी प्रायव्हेट वगैरे हि राजकारण्यांची आहेत. एकालाही समाजासाठी वगैरे काही कोलेज चालवायची इच्छा नाहीये तर बक्कल फी मिळते त्यासाठी आहे. पण जे काही आहे ते खरोखर चांगले आहे का? खरे म्हणजे वरती खरे साहेबांनी जे लिहिले आहे त्यावरून मी वरचे लिहिले. पण हे सगळे पार हल्ली वयाच्या २-३ वर्षापासून प्रायव्हेट कोलेजला जाने. भरमसाठ फी भरणे कारण सगळ्यांना चांगले शिक्षण मिळावे असे स्वतः शासनालाच वाटत नाहीये. नुसते कायदे करायचे पण धड एकही गोष्टीत अंमलबजावणी नाही. ह्याचे परिणाम आता अजून १०-२० वर्षात दिसून येतील बघा. आताही येताच आहेत. भरमसाठ डी. एड कॉलेजेस काढली आणि काय दर्जा आहे त्यातून शिक्षक बाहेर पडायचा. काय झाले त्याने. कुत्र हाल खात नीह्ये. तीच अवस्था आता इंजिनियर लोकांची पण झालीये. खरे तर आताचे इंजिनियर म्हणजे पूर्वी बीए वगैरे सारखे मुख्यत्वे शिक्षण प्रकार झालाय. डॉक्टर लोकांची काय वेगळी अवस्था आहे. माझ्यासमोर ३ केसेस आहेत. १) सवर्ण ज्याला शक्य असून बीजे वगैरे मध्ये पूर्वी मिळाली नाही. मग भरपूर फी भरून प्रायव्हेट मध्ये घेतली आणि आता कापतो आहे लोकांना. २) आमची कामवाली बोंब मारते त्यांच्याच जातीतला डॉक्टर पण गुण येत नाहीये नुसताच पास झाला. हि वाक्ये आहेत. ३) एक उत्तरेकडचा ओळखीचा आहे. कुठूनतरी कर्नाटकातून वगैरेहून डॉक्टर झालाय भरपूर डोनेशन भरून. आता खर्च वसुली साठी येत जाता कापतोये.
माझ्या सध्या पाहण्यात आलाय कि जवळपास प्रत्येक घरात सीझर होतंय. खरोखर त्याची गरज आहे काय? हे बरेच वर्ष बघतोये. मला तरी चक्क फसवणूक वाटते. सगळ्याचेच कसे काय बुवा? अपवाद म्हून १-२ आहेत म्हणा पण ते खरोखर अपवाद आहे. तुम्ही बाहेर जावा इंग्लंड वा अमेरिकाला उगाचच तिथे होत नाहीत सीझर मग इथेच का? आमच्या भावाला तर डॉक्टर म्हणाला कि दिवाळीला पाडव्याला करू पत्रिका चांगली येईल. च्यायला अरे हे काय आहे? अर्थात असे करून घेणारे पण आहेत महाभाग.
दुसरा प्रकार म्हणजे थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. च्यामारी हे काय? मला स्वतःला २ वेळा परदेशात ताप आला एकदा डॉक्टरणे काहीच न देता फक्त परासीटीमोल घे म्हणून घरी हाकलले आणि दुसर्यावेळी दिले अंतीबायोटिक्स पण उगाचच असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी वगैरे काही दिली नाही. आता बोला भाऊ. कायतरी चुकतंय का नाही? पण मुळात खोलात जायची कोणालाच इच्छा नाहीये. असो नेहमीप्रमाणे भरपूर अन्दाधुंदी माजली की मग कदाचित लोकांना जाग येईल तोपर्यंत इतकी लोकसंख्या आहे मेले २-४ काय फरक पडतोय.
आत्ताच माझी मामी वारली. रस्त्यात चालताना पडली म्हणून डॉक्टरकडे गेलो तर त्याने फार काही चेकअप केलेच नाही. टाके घालून घरी आले सगळे. पण हा प्रश्न कोणालाच पडला नाही कि ती का पडली. निदान डॉक्टरणे तरी विचारावे. पुढे ७ दिवसात मोठा हृदयविकाराचा धक्का आला आणि गेली. तेंव्हा पुन्हा विचार चमकून गेला ज्या डॉक्टरकडे गेलो होतो त्याची खरोखर तितकी तयारी होती का? पण आपण काही डॉक्टर नाही आणि आता दुसरीकडून खात्री पण करून घेता येणार नाही.
26 Mar 2015 - 11:49 am | मार्मिक गोडसे
तुम्ही बाहेर जावा इंग्लंड वा अमेरिकाला उगाचच तिथे होत नाहीत सीझर मग इथेच का?
इतके दूर कशाला जाता आपल्याकडील सरकारी हॉस्पिटलातही सिझेरचे प्रमाण फार कमी आहे.
थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची.
अहो प्रायव्हेट डॉक्टरांच्या फी मुळे आपल्या पोटात जळजळ होउ नये म्हणून अँटासीडची गोळी देतात डॉक्टर, सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर देतो का कधी मोठ्या डोसाबरोबर अँटासीडची गोळी? सिंपल लॉजीक आहे.
27 Mar 2015 - 5:15 pm | एस
मिपावर सतत टाकल्या जाणार्या जातीयवादी प्रतिसादांचा आणि लेखनाचा तिटकारा आला आहे. मानवतावादी समानतेचा आग्रह धरणार्या माझ्यासारख्याला इथे जास्त काळ राहणं शक्य नाही. उद्वेगाचे मळभ साचले आहे.
30 Mar 2015 - 3:20 pm | हाडक्या
+१ .. :(
25 Mar 2015 - 5:00 pm | अत्रन्गि पाउस
मग असे थंड राहून कसे चालेल ...या बरे पुढे ...
26 Mar 2015 - 12:19 pm | काळा पहाड
कुणीतरी मला सांगेल का की खालील अपेक्षेत चूक काय आहे: सरकारने आणखी सरकारी मेडिकल कॉलेज काढावीत जेणेकरून स्पर्धा निर्माण होवून फीया कमी होतील. सध्याच्या डॉक्टर लोकान्वर फारच ताण पडत असल्यामुळे त्यांच्या फीया महाग आहेत. सध्याच्या दहा पट डॉक्टर तयार झाले की फी कमी होईलच ना.
26 Mar 2015 - 1:16 pm | संदीप डांगे
कुणीच चुकीचं म्हणत नाही याबद्दल.
खरेसाहेबांनी सांगितलेली परिस्थिती बघता दहा पट डॉक्टर जरा कठीणच दिसतंय. तरी नामुम्किन अजिबात नाही. पण काय जन्ता जनार्दनाने तसा सरकारवर दबाव आणायला पाय्जेल. रोजच्या समस्यांसाठी जनताजनार्दनास भांडायला येळ न्हाय तो कदिमदी उपटणार्या वैद्यकिय समस्यांबद्दल आंदोलन उभारणे जरा कठिणच दिसतंय... आता लोकप्रतिनिधी नावाची जमात लोकांच्या समस्या मांडायला आणि सोडवायला नेमून दिलेली आहे पण ती स्वतःच्याच समस्या निर्माण करण्यात आणि सोडवण्यात व्यस्त आहे. २०-२५ वर्ष भांडल्यावर कुठे सरकारला समस्येची जाणिव होते मग समित्या बसतात, मग अहवाल येतात, धूळ खात पडतात. फास्टर फेणेला निवडून दिलंय ते बेणं आपल्या बोलवत्या धन्यांना आणिक धनदांडगं कसं करता येइल याच विचारात रातदिस एक करतंय. जनतेसाठी खरंच काम करणारं सरकार कधी प्रत्यक्षात येइल काय?
26 Mar 2015 - 11:40 pm | आनंदी गोपाळ
अजूनही उजेड पडलेला दिसत नाहिये.
अहो, ससूनला जा. तिथे १० रुपयांत ट्रीटमेंट होते. फी कमी हवी असेल तर तो एकच इलाज आहे तुमच्यासारख्यांसाठी.
काँपिटिशन वाढून फी कमी होण्यासाठी, फुकटात डॉक्टरकी करायला पब्लि़क काय बिनडोक वाट्लं का तुम्हाला? तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कालेजात माझ्या खर्चाने अॅडमिशन घेऊन देतो. तुम्ही फक्त अभ्यास करून डिग्री घ्या, अन मग दुकान टाका. त्यानंतर बघू किती कमी फीमधे ट्रीटमेंट करता ते.
येता का?
26 Mar 2015 - 11:43 pm | आनंदी गोपाळ
अब्यास = साडे ५ वर्ष एम्बीबीएस, नंतर १ वर्ष सरकारी नोकरी, नंतर ३ वर्षं पीजी. म्हणजे आजपासून ८ वर्षे, तेही तुमच्या अभ्यासाने डायरेक्ट पास झालात तर. ठेसनं लागलीत तर किती वर्षे लागतील ते वेगळे. पहा बुवा, जमतंय का..
27 Mar 2015 - 12:05 am | काळा पहाड
मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं (पण मला रक्त बघूनच कसं तरी होतं त्यामुळे ती शक्यताच नाही). तरी सुद्धा जर मी डॉक्टर झालो असतो, तर ती मी सेवा मानूनच केली असती. अर्थात फक्त डॉक्टरच एवढी वर्ष शिकत नाहीत. कित्येक संशोधक १२+३+२+पीएच्डी एवढा वेळ घेतातच. बाकी ठेसनं, दुकान.. तुम्ही विद्रोही वाले का हो?
8 Apr 2015 - 8:04 am | आनंदी गोपाळ
महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ नाही.
आध स्वतः डॉक्टर व्हा, मग इथे इतर डॉक्टरांना तत्वज्ञान शिकवा. तुमचा व्यवसाय कसा करावा हे शिकवायला मी (जागतीक गरीबांची कणव मनी आणून) येत नाही.
दुकान मी नाही, तुमच्या सरकारी लोकांनी शॉप अॅक्ट लायसन दवाखान्यांच्या गळ्यात मारून तयार केलंय. :)
मी पण 'सेवा मानूनच' करतो. फक्त त्यासाठी माझी वाजवी फी वाजवून घेतो. परवडत नसेल, तर ससून आहेच :) तुम्ही "सेवा मानून" तुमचा पोटापाण्याचा व्यवसाय करत जा, पगार घेत जाऊ नका. असे केलेत, तर जिथे तुम्ही उपचार घ्याल त्या-त्या सर्व सरकारी इस्पितळांतील तुमच्यावरील सर्व उपचारांचा खर्च मी उचलीन हे वचन देतो.
माजोरडेपणा तुम्ही अजून पाहिलाच नाहिये. :)
8 Apr 2015 - 8:39 am | अत्रन्गि पाउस
हे अजिबात ऐकून घेणार नाही
सत्ता, अधिकार, पैसा, ज्ञान, शारीरिक ताकद ह्यातील एक किंवा अधिक जवळ बाळगून असलेले, समोरच्या अगतिक माणसाशी, ज्या गुर्मीत आणि मस्तीत वागतात बोलतात, हे रोज अनुभवास आले नाही तरी केव्हाही येईल, ह्याची खात्री असतेच ...
अस्सल माजोरडा तर संधी मिळेल तिथे आपला माज दाखवतोच ... कारण केव्हा सव्वाशेर भेटेल आणि आपला माज उतरवेल ह्याची त्या माजोरड्यांना सतत भीती असतेच ...
26 Mar 2015 - 11:58 pm | काळा पहाड
हे बघा, तुम्ही अफेक्टेड पार्टी आहात. तुम्ही असंच बोलणार. बाकीचे काय वर्षात डिग्री घेतात का? उगीच डॉक्टरच तेवढे प्रचंड हुशार असतात आणि ढोर मेहनत करतात आणि बाकीचे कमी अक्कल वाले असतात असं जे चित्र तुम्ही लोकांनी उभं केलंय त्याच्यात कितपत सत्यता आहे हे एकदा पडताळून पहा. डॉक्टर लोक इथे ज्या प्रकारे आणि ज्या विखारी पणे (don't argue with fool सारख्या कमेंट्स) उत्तरं देतायत ते बघून डॉक्टरांबद्दल भ्रमनिरास होत चाललाय. तुम्ही फुकट डॉक्टरकी करा असं कुणीच म्हटलेलं नाही. पण काँपिटिशन निर्माण करायला समाजाचं जर त्यात हित असेल तर काहीच प्रत्यवाय नसावा. तुम्हाला तुमचं बिझनेस मॉडेल बदलावं लागेल आणि ते कसं बदलायचं ते तुम्ही पहालच.
सारख्या माजोरड्या कॉमेंटस जर तुम्ही लोक देत असाल तर हा प्रयोग करून पहायला सुद्धा काहीच हरकत नाही.
बाकी दुसरं काही नाही तर निदान स्वतःच्या पेशाबद्दल तरी निदान जरा आदर बाळगा. शी!
27 Mar 2015 - 1:26 pm | सुबोध खरे
पहाड साहेब
don't argue with fool हा प्रतिसाद आयुर्हीत यांच्या "आधुनिक पण अयोग्य उपचारामुळे मरणारी माणसे ही ४ पट जास्त (4x) असतात," या बालबुद्धीच्या प्रतिसादाला होता.बिनबुडाचे बेफाट आरोप करणे आणि आधुनिक वैद्य्कावर टीका करून आपले उपचार कसे चांगले हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यात जाहिरातीचा बराचसा भाग हि आहे. तेंव्हा तो विषय सोडून द्या.
राहिली गोष्ट
"पण काँपिटिशन निर्माण करायला समाजाचं जर त्यात हित असेल तर काहीच प्रत्यवाय नसावा."
एक एम बी बी एस डॉक्टर करण्यासाठी ५० खाटांचे रुग्णालय असावे लागते. म्हणजे जेजे किंवा के इ एम सारख्या ठिकाणी २०० विद्यार्थ्यांना २००० खाटांची रुग्णालये आहेत. नुसतीच तेवढी बांधून नव्हे तर ती चालवावी लागतात. त्यासाठी तिथे रुग्ण यावे लागतात. त्यांना फुकट औषधे द्यावी लागतात फुकट उपचार करावे लागतात. या गोष्टी करण्यासाठी प्रचंड भांडवलीच गुंतवणूक नव्हे तर चालू ठेवण्यासाठी अफाट खर्च करावा लागतो. यानंतर तेथे शिकवण्यासाठी तज्ञ डॉक्टर नोकरीवर "टिकवून" ठेवावे लागतात. तुमच्या साठी उदाहरण म्हणून मी ए एफ एम सी चे उदाहरण देत आहे. तेथे १२५ विद्यार्थ्यांसाठी कमांड रुग्णालय १२०० खाटा. MH CTC ४०० खाटा, MH खडकी ३०० खाटा अशा १९०० रुगणांसाठी खाता उपलब्ध आहेत. २००६ ला मी तेथून निवृत्त होण्याच्या वेळेस दर वर्षी च्या पाच एम डी च्या रुग्णांसाठी आम्ही तेरा सहाय्यक प्राध्यापक आणी प्राध्यापक शिकवण्यासाठी होतो. ( तीन वर्षाच्या पंधरा विद्यार्थ्यांसाठी तेरा डॉक्टर-- यातील दहा कमीत कमी १० वर्षे अनुभव असलेले आणी तीन डॉक्टर वीस वर्षे अनुभव असलेले). इतका कर्मचारी वर्ग "टिकवून" ठेवणे हि गोष्ट सोपी नाही. आज महाराष्ट्र शासनाच्या किंवा महापलिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात माझ्या विषयात चांगले शिक्षक मिळत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. कारण बढती मध्ये असलेल्या आरक्षणामुळे खुल्या वर्गातील डॉक्टर पेन्शन घेऊन सोडून गेले आहेत /जात आहेत .त्यांना खाजगी महाविद्यालये पूर्ण पगार देऊन आपल्या गळाला लावून घेतात. आरक्षित वर्गातील चांगले डॉक्टर बाहेर मिळणाऱ्या चांगल्या पगारामुळे सरकारी नोकरीत येत नाहीत. यामुळे आज रेडीयोलोजी या विषयात सरकारी महाविद्यालयात चांगले शिक्षक नाहीत हि वस्तुस्थिती आहे. अशीच परिस्थिती थोड्या फार फरकाने इतर सर्व विषयात आहे. अशा परिस्थितीत आपण म्हणता कि सरकारने भरपूर वैद्यकीय महाविद्यालये काढावीत. "सध्याच्या दहा पट डॉक्टर तयार झाले की फी कमी होईलच ना." याचा भांडवली खर्च करण्याचीच सरकारची ऐपत नाही मग ती चालवावीत कुणी? आणि कशी? हवेत मनोरे बांधणे सोपे आहे.
खाजगी महाविद्यालये चालतात का तर सरकारी प्रयत्न अपुरे आहेत म्हणून.मग ५० लाख भरून होणारे डॉक्टर आपल्याला सरळच विचारतात कि आम्ही समाजसेवा का करायची?
हि वस्तुस्थिती आहे. त्यात आपण म्हणता चायनीज डॉक्टर आणायचे. मुळात त्यान्चे चांगले डॉक्टर इकडे का येतीलइथल्या पेक्षा ५० ते ६० पट पैसे अमेरिकेत मिळतात तेथे जातील कि. मग इकडे येणारे बहुसंख्य चायनीज डॉक्टर टाकाऊच असतील त्यांचा दर्जा कुणी तपासायचा आणि त्यांच्या कडून उपचार आपण आपल्या नातेवाईकांसाठी घ्याल का? मग काय त्यांना सरकारी नोकरी द्यायची आणि गरिबांना गिनी पिग बनवायचे? इथल्या प्रतिसादांच्या दर्ज्याबद्दल काय म्हणावे? कोणी लुटारू वाटमारी करणारे म्हणतात. कोणी ड्रायव्हर बरोबर तुलना करतात. कुणाला लश्करातील लोकांनी बोनस मागावा असे वाटते.
चारशेच्या जवळपास प्रतिसादांपैकी एकही प्रतिसाद हे म्हणत नाही कि डॉक्टरला किमान संगणक किंवा धुलाई यंत्र किंवा फ्रीज दुरुस्त करणाऱ्या माणसापेक्षा(३५० रुपये) किंचित का होईना जास्त दर लावता यावा.( होम व्हीजीटचे चारशे रुपये तरी ) यातील एकही माणूस रात्री दोन वाजता फोन घेतहि नाही मग घरी येणे तर दूरच राहिले. माझ्या दवाखान्यात सुताराने आपल्या अर्ध्या तासाच्या कामाचे बाराशे रुपये घेतले आणि प्लम्बर ने ८०० रुपये. वर जो उठतो तो डॉक्टरने समाजसेवा केली पाहिजे हा उपदेश देतो.
तेंव्हा समाजाकडून माझी काहीच अपेक्षा नाही. त्यांनी मला आदर द्यावा( आदराचा काहीही उपयोग नाही. आयुष्याची अनमोल अशी २३ वर्षे देऊन लष्करातून बाहेर पडल्यावर या आदराची व्यवहारात काडीचीही किंमत नाही हे व्यवस्थितपणे समजून आलेले आहे) असेही मी म्हणत नाही. मला माझा व्यवसाय कोणताही उपदेश न देता स्वच्छपणे करू द्यावा. आपल प्रतिसाद अर्थातच अज्ञानातून आलेला आहे हे स्पष्ट आहे त्यामुळे आपल्या बद्दल मला राग नाही.
27 Mar 2015 - 1:31 pm | टवाळ कार्टा
शब्दा शब्दाशी सहमत
27 Mar 2015 - 4:09 pm | काळा पहाड
डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून लाजवू नका. मी वयाने आणि अनुभवाने तुमच्यापेक्षा फारच छोटा आहे. मला जी काळजी वाटते ती समाजातल्या गरीब रुग्णांबद्दल वाटते आणि त्या दृष्टीने तुम्ही मला साम्यवादी म्हटलं तरी मला वाटतं मला वाईट वाटणार नाही. कुठलाही गरीब (पाकिस्तानी सोडून) उपचारांविना मरू नये आणि प्रत्येकाला त्याच्या किमान गरजांपुरतं अन्न वस्त्र आणि निवारा मिळावा या माझ्या (कदाचित भाबड्या पण प्रामाणिक) अपेक्षा आहेत. सरकार २०११ च्या आकड्यांनुसार जीडीपीच्या ८.०५% खर्च करत आहेच. तेव्हा सरकारसाठी हा प्रायॉरिटीचा मुद्दा आहेच. पण हा खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. वर्ल्ड बँकेच्या माहितीनुसार भारतात प्रत्येक १००० लोकांमागे फक्त ०.७ डॉक्टर्स आहेत. तेच अमेरिकेत २.५ डॉक्टर्स आणि ब्रिटन मध्ये २.८ डॉक्टर्स आहेत. आणि हे फक्त फिजिशियन आहेत. म्हणजे स्पेशलिस्ट पाहिले तर हा रेशो आणखीनच विकृत असणार हे उघड आहे. यामुळेच बहुधा भारताची बहुसंख्य लोकसंख्या आरोग्य सेवेच्या बाहेर आहे. तेव्हा ही सरकारची जबाबदारी ठरते की एवढ्या लोकसंख्येला पुरवण्यासाठी तितकेच डॉक्टर हवेत आणि ते एकतर ट्रेन करावे लागतील किंवा बाहेरून आयात करावे लागतील (जसं ब्रिटन करतं). तुम्ही जे प्रॉब्लेम्स सांगताय (उदा: एक एम बी बी एस डॉक्टर करण्यासाठी ५० खाटांचे रुग्णालय असावे लागते) ते मी नाकारत नाही, पण ते लॉजिस्टिकल इश्श्यूज आहेत. एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो. आरोग्य प्रश्न येत्या दशकात (विशेषतः नवीन जीवनशैली मुळे तयार होणारे) ज्या प्रकारे उग्र रूप धारण करणार आहेत ते पहाता कुणीतरी याकडे गंभीर नजरेनं पाहील अशी आशा आहे. परवडत नाही म्हणून रोगाला सहन करणार्यांची संख्या सध्याच फार जास्त असावी आणि बरेच लोक त्यामुळे मृत्यूमुखी सुद्धा पडत असावेत. आणि एका मोठ्या समाजाला फार काळ आरोग्य व्यवस्थेच्या बाहेर ठेवून फक्त एका ठराविक आर्थिक प्राप्ती असणार्या समाजाला (फक्त उच्च 'च' प्रतीच्या) आरोग्य सुविधा विकण्याचा धंदा डिमांड सप्लायच्या नियमानुसार चालू असला तरी समाजाला आणि त्याच्या नेत्यांना त्यावर उत्तर शोधावंच लागेल. सध्या जसं बिल्डर फक्त लक्झुरियस २+ बीएचके चे फ्लॅटच बनवतात आणि ते न परवडणारी बहुसंख्य जनतात झोपडपट्टीत रहायला मजबूर आहे तसंच काहीसं आरोग्य व्यवस्थेचं आहे. पण इथे मामला जिवाचा आहे. आणि जीव वाचवण्यासाठी कोणताही गुन्हा क्षम्य असतो. तस्मात, समाज यावर उत्तर शोधेलच. जर इथली कॉलेजेस ५० लाख घेत असतील तर चायनातली कॉलेजेस त्याहून फारच कमी घेतात हे आपणाला माहीत असेलच. इथले बरेच विद्यार्थी चायनाच्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकतायत. शेवटी समाजाला भले उच्च दर्जाची आरोग्य सेवा मिळणार नसेल तर साधारण दर्जाची मिळायला काय हरकत आहे?
27 Mar 2015 - 4:17 pm | अत्रन्गि पाउस
अगदी अगदी !!
27 Mar 2015 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो.
नक्कीच शक्य आहे. पण...
असे काही करण्यापेक्षा "खाजगी मेडिकल कॉलेजची भेट देऊन स्वतःच्या आणि विरुद्ध पक्षातील महत्वाच्या व्यक्तींचा राजकीय पाठिंबा कमावणे" हा व्यवहार राजकारणात जास्त सोपा आहे. स्वहितापुढे जनतेच हित दुय्यम समजले जाते. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे भरडली जाणारी जनतापण हा प्रकार मोठ्या कौतूकाने पाहते-सांगते.
नेत्याने तसे आपोआप करायला जनतेच्या नशीबात ली क्वान यू सारखा नेता असावा लागतो. गेल्या दोन शतकात तरी जगभरात असे दोनच नि:स्वार्थी आणि लोकाभिमुख (बेनेव्हॉलंट) सर्वेसर्वा पाहण्यात आले आहेत.
27 Mar 2015 - 5:32 pm | स्वधर्म
काळा पहाड साहेब,
या वाक्याच्या शब्दाशब्दाशी सहमत. अारोग्य खर्चाबाबत तुंम्ही समाजाची बाजू फार म्हणजे फारच मुद्देसूद मांडली अाहे. डाॅक्टरांचीही काही बाजू अाहे, पण एकंदर डाॅक्टर म्हणजे कुणी समाजाचा अन्यायग्रस्त, दुर्बल घटक, साॅफ्ट टार्गेट वगैरे दृष्टीकोन खरंच वस्तुस्थितीला धरून नाहीत.
27 Mar 2015 - 6:56 pm | सुबोध खरे
पहाड साहेब
आपण केलेली तुलना अगदी योग्य आहे. घर या (अन्न वस्त्र निवारा यापैकी एका) मुलभूत समस्येला जसे बिल्डर आणि राजकारणी यांचे साटे लोटे जबाबदार आहेत. तसेच आरोग्यसेवेत राजकारणी आणि शिक्षण सम्राट यांचे आहेत. पण बिल्डर आणि राजकारणी यांच्या साटे लोत्यात तुम्ही सिव्हिल इंजिनियरला दोषी ठरवत नाही. तो बिचारा केवळ एक टेक्निकल एक्स्पर्ट आहे. रस्ता खचला किंवा पूल पडला किंवा एखाद्याची आयुष्यभराची कमाई घरात घालून घर न मिळाल्याने तो रस्त्यावर आला. यात सिव्हिल इंजिनियरला दोषी ठरवत नाही.मुंब्रा येथे काही इमारती पडल्या आणि बरीच माणसे मेली तेंव्हाही प्रश्न जीवाचाच होता. तेथेही कंत्राटदार आणि विकासक काही दिवस "आत" गेले आणि आता बाहेर आहेत. लोकांनी काय केले?
तशीच परिस्थिती इथे आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या नाड्या या डॉक्टरांच्या हातात नाहीत कि ते यात काहीहि करू शकत नाहीत. त्यांना कितीही वाटत असले तरीही ते यात बदलही घडवू शकत नाहीत. परंतु एक्का साहेबांनी म्हटल्याप्रमाणे soft target असल्याने त्यांच्यावर हल्ला कुणीही करावा. आपले शिक्षण सम्राट ( ज्यांची मोठी मोठी खाजगी वैद्यकीय महाविद्यालये आहेत) मोठे मोठे राजकारणी आहेत. त्यातील एक तर आरोग्य मंत्री होते. त्यानी सार्वजनिक आरोग्य सेवेचा कसा पद्धतशीर खेळखंडोबा केला यावर दहा तरी लोक पी एच डी करू शकतील.
के इ एम रुग्णालयातील CT स्कॅन मशीनच्या देखभालीचे कंत्राट न केल्यामुळे ते चार महिने बंद होते याला तेथील डॉक्टरनी कितीही कंठ शोष केला तरी काहीही होत नाही. रुग्णांना बाहेरून CT स्कॅन करावा लागला. यावर सर्वांनी तेथील डॉक्टरचे त्या CT स्कॅनवाल्यांशी साटे लोटे आहेत म्हणूनच असे झाले म्हणून शिव्याशाप हि खाउन झाले. अत्यवस्थ रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातून फक्त मार खाणे राहिले होते. अशा अनेक कथा आहेत. आज सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस कोणत्याही सार्वजनिक गोष्टीकडे संशयी नजरेनेच पाहत आहे.( प्रत्येक माणूस स्वच्छ आहे हे गृहीत धरून)
यामुळेच गुरुतुल्य अशा डॉक्टर वि नि श्रीखंडे यांनी खेदाने म्हटले आहे कि डॉक्टरांच्या सेवाभावाची समाजाला किंमत उरलेली नाही.
जाता जाता- चिनी वैद्यकीय महाविद्यालयात एका वर्षाची फी साडे तीन ते चार लाख आहे शिवाय राहण्याचा खर्च सव्वा ते पावणे दोन लाख. जेवण्याचा आणि जाण्या येण्याचा खर्च वेगळा. असा खर्च पाच वर्षे केल्यावर आपण एम बी बी एस होणार आणि परत आल्यावर विदेशात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना अर्हता मिळवण्यासाठी एम सी आय ची परीक्षा द्यावी लागते त्यात पास होणार्यांचे प्रमाण १०-१२ टक्के आहे. हे सर्व गृहीत धरून परत आलेल्या विद्यार्थ्यांपैकी किती जण "सेवा"भावी असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे.
8 Apr 2015 - 8:24 am | आनंदी गोपाळ
रवी/सोमवारी पनवेलला होतो. अधिक काय लिहू?
27 Mar 2015 - 6:58 am | यसवायजी
जाँदेना बे. मला वाटायचं की निदान जापनीज तेल मालिशवाला असेल. च्यायला हे तर पोपट घेऊन फिरणारं हाय. नादाला लागू नका. (अधिक माहितीसाठी व्यनी करू नका. इथेच विचारा)
~~जनहितार्थ जारी~~
27 Mar 2015 - 1:34 pm | टवाळ कार्टा
या धाग्यावरच्या गोंधळात मला अजून १ समजलेले नाही
समजा १ व्यक्ती जीचे वार्षिक उत्पन्न साधारण २.५ लाख आहे...त्या व्यक्तीच्या पालकांपैकी कोणाला हार्ट संबंधीत उपचार घ्यावे लागले तर त्याच्यासमोर काय पर्याय असतील्/आहेत ज्यामुळे उपचार करणार्या डॉक्टरला त्याचा मोबदला व्यवस्थित मिळेल परंतू त्या व्यक्तीवर आर्थिक बोजा पडणार नाही
27 Mar 2015 - 1:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मेडिकल इन्शुरन्स.
27 Mar 2015 - 1:57 pm | टवाळ कार्टा
हा पर्याय अजून बहुसंख्य लोकांपर्यंत पोचलेला नाहीये..आणि डायबेटिस असेल तर पहिले ४ वर्षे काही आजार कव्हर होत नाहीत...अजून काही??
27 Mar 2015 - 1:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चॅरिटी. :(
27 Mar 2015 - 2:05 pm | टवाळ कार्टा
वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न असलेल्याला कोणी गरिब नाही समजत...त्यामुळे चॅरिटीचे बरेच पर्याय बंद होत असावेत
27 Mar 2015 - 3:28 pm | पिलीयन रायडर
नारायण हृदयालय कमी पैशात हृदयावरील उपचार करते. देवी शेट्टी ह्यांच्या ह्या हॉस्पिटल बद्दल बहुदा सत्यमेव जयते मध्ये ऐक्लं होतं. मुलाच्या वेळेसही हेच नाव सर्वात आधी सुचवल्या गेले. पण एकदा खात्री करुन घ्यावी.
27 Mar 2015 - 3:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
जरूर चौकशी करा. डॉ देवींनी वैद्यकीय व्यवस्थापनात अनेक क्रांतीकारी बदल करून उपचारांच्या किंमती लक्षणियरित्या कमी केलेल्या आहेत. पाश्च्यात्य देशातही (काहींना यामुळे डॉ देवींच्या क्षमतेबद्दल खात्री वाटेल ;) ) त्यांच्या व्यवस्थापकीय प्रारुपाचे (मॉडेल) अध्ययन केले जात आहे.
27 Mar 2015 - 4:14 pm | मोदक
एक्काजी..
सहज सुचले म्हणून...
दवाखान्यात किंवा विशेषतः वैद्यकीय शस्त्रक्रियेदरम्यान या थोरामोठ्यांनी तयार केलेल्या प्रारूपांबद्दल किंवा प्रोटोकॉल बद्दल (डॉ नीतू मांडके यांनी असे अनेक प्रोटोकॉल तयार केले असे वाचले आहे) आम्हाला समजेल अशा भाषेत कृपया एखादी लेखमालिका लिहा..
शस्त्रक्रियेआधी डॉक्टरांनी वॉश घेणे, OT ची तयारी किंवा शस्त्रक्रियेदरम्यान पेशंटच्या नातेवाईकांना कोणत्या प्रकारे / पद्धतीने माहिती देणे अशा साध्या गोष्टींपासून सुरूवात केली तरी चालेल.
27 Mar 2015 - 2:55 pm | सुबोध खरे
ट का शेट
आरोग्य विमा हेच उत्तम साधन आहे. ४५ वर्षच्या दोन माणसांसाठी दर वर्षी ३ लाखाचा आरोग्यविमा ६-८००० /- इतका येतो आणि तोच जर मधुमेह असेल तर १० -१२ हजार पर्यंत जातो. जसे वय वाढत जाते तसा त्यावरील हप्ता वाढत जातो. तेंव्हा पंचवीशीच्या मुलाला आपल्या आईवडिलांसाठी दर महिना ५०० रुपये हा खर्च अवाढव्य नाही. परंतु आपल्याकडे याबद्दलची जागरुकताच नाही. त्यामुळे बहुसंख्य लोक आजारी पडेपर्यंत काहीच करीत नाहीत.
प्रत्येक आईबाप आपल्या मुलांसाठी तोंडचा घास काढून देतात शिवाय आपल्या भविष्यासाठी हि तरतूदहि करतात परंतु आपल्या उमेदिच्या काळात आपल्या वाढत्या वयात येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची काहीही सोय करीत नाहीत हि वस्तुस्थिती आहे. जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल. शिवाय चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. कारण मला काय धाड भरलीये पासून होय हो करायचाय ( आळशीपणा) अशा विविध कारणामुळे ते होताना दिसत नाही.
27 Mar 2015 - 3:02 pm | टवाळ कार्टा
अगदी सहमत...पण ज्यांना अजून"ही" हे समजलेले नाही ती सुध्धा माणसेच आहेत की
जर २५ वर्षाच्या मुलाने आपल्या चाळीशीच्या नंतर येणाऱ्या खर्चासाठी दर वर्षी १२०००/- रुपये (दर महीना रुपये १०००/-) ppf( भविष्य निर्वाह निधी) मध्ये ठेवले तर चाळीशीला ३ लाख ७४ हजार रुपये होतात. यानंतर हे पैसे तसेच व्याजावर ठेवले तर आयुष्यभर येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची बर्यापैकी सोय होऊ शकेल.
हे सहीच
चाळीशी होण्याच्या अगोदर आपला आरोग्य विमा केला तर जवळ जवळ सर्व वैद्यकीय खर्च या दोन्ही तून निघू शकेल.
हे समजले नाही....जरा आणखी माहिती मिळेल काय?
27 Mar 2015 - 3:05 pm | सुबोध खरे
चाळीशीनंतर आपल्याला रोग होण्याची शक्यता वाढते आणि विमयाचा हप्ता चाळीशी नंतर वाढत जातो. म्हणून चाळीशीच्या एक वर्ष अगोदर विमा काढला तर हप्ता थोडा कमी असतो
27 Mar 2015 - 3:08 pm | टवाळ कार्टा
आरोग्यविम्याचा हप्ता दर वर्षी वेगळा वेगळा असतो ना?
27 Mar 2015 - 3:24 pm | काळा पहाड
डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न. माझी अशी समजूत होती की विम्याचा हप्ता एक वर्षासाठी असतो (उदा: ८००० रुपये) आणि तो दर वर्षी वेगळा भरावा लागतो आणि तो विमा फक्त त्या वर्षासाठीच लागू असतो. असा एखादा विमा आहे का की ज्या साठी मी साठी पर्यंत दर वर्षी पैसे भरेन (उदा: दरवर्षी ८००० रुपये), त्यातून मला ६० वर्षांपर्यंत काही कव्हर मिळणार नाही पण त्यातून ६० वर्षांनंतर होणार्या रोगांवर मला कव्हर मिळेल? मला कव्हरची गरज तेव्हाच असणार असेल (बहुधा).
27 Mar 2015 - 3:55 pm | टवाळ कार्टा
मला पण असेच माहित आहे :(
27 Mar 2015 - 4:05 pm | अनुप ढेरे
life long renewal असलेल्या पॉलिसी असतात.
27 Mar 2015 - 4:15 pm | अत्रन्गि पाउस
...अजून काही माहिती आहे का ह्या विषयी?
27 Mar 2015 - 5:28 pm | अनुप ढेरे
बहुदा आता प्रत्येक नव्या पॉलिसीला ही सोय असणं सक्तीचं आहे. गूगल करा.
27 Mar 2015 - 6:00 pm | आजानुकर्ण
विम्याचा विषय निघाल्यामुळे लिहितो. आरोग्यविमा हा गाडीच्या विम्यासारखा आहे. आहेे तीच पॉलिसी रिन्यू केली जात असली तरी तो दरवर्षी नवा काढावा लागतो. (काही कंपन्या सवलतीच्या दरात दोन वर्षाच्या कालावधीचे विमे विकतात).
नवीन विमा काढताना तुमचे वय 35च्या आत असल्यास कुठलाच त्रास न होता सहज विमा मिळतो. पस्तिशी उलटल्यानंतर काही खाजगी विमाकंपन्या शारीरिक तपासणी करण्याची मागणी करतात. या तपासणीमध्ये एखादा आजार निघाला तर तो प्री-एक्झिस्टिंग डिसिज या कलमाखाली 3 वर्षापर्यंत उपचारासाठी अपात्र होतो. किंवा एखादा आजार विमाकंपनीसाठी प्रचंड खर्चिक आहे असे लक्षात आले (उदा. कॅन्सर) तर तो कायमचा अपात्र ठरवून विमा कंपनी कवरेज जेऊ शकते. सरकारी विमाकंपन्या 40 किंवा 45 नंतर विमा देण्यापूर्वी शारीरिक तपासणीची सक्ती करतात असे दिसते. केवळ याच कारणासाठी 35च्या आत विमा काढलेला बरा.
बहुतेक सर्व कंपन्या लाईफलाँग रिन्यूअल देत असल्या - तरी सर्वच देत नाहीत. त्यामुळे विमा घेताना लाईफलाँग रिन्युअल उपलब्ध आहे याची काळजी घेतलेली बरी. 3 वर्षानंतर विमापॉलिसी दुसऱ्या कंपनीकडे पोर्ट करता येते. मात्र त्यातही साधारण एकाच प्रकारच्या पॉलिसीमध्ये ट्रान्सफर होते.
जसजसे वय वाढत जाते तसतसा विम्याचा प्रीमियम वाढतो. 35 पूर्वी विमा काढल्यानंतर प्रीमियम कमी असतो हे त्या वयाच्या ब्रॅकेटपुरतेच खरे आहे. 35 पूर्वी विमा काढून तो 45 वयापर्यंत रिन्यू करत आल्यावर प्रीमियम वाढलेला असेल हे मी जितपत नियम वाचलेत त्यानुसार खरे आहे. (कोणी दहा-बारा वर्षापूर्वी 35च्या आत विमा काढून आता जुन्याच प्रीमियमवर 45त तो रिन्यू केला आहे असे प्रत्यक्ष उदाहरण पाहिल्याशिवाय या नियमाची सत्यासत्यता कळणार नाही).
उपचाराचा जितका जास्तीतजास्त खर्च अपेक्षित आहे तितक्या कवरेजचा विमा घ्या. 3लाख रुपये विमा हा एका कुटुंबासाठी अत्यंत अपुरा आहे. हार्ट सर्जरीला एका व्यक्तीला अडीच लाख लागतात. जर एखादे कुटुंब अपघातग्रस्त झाले तर 3 लाख रुपयात नवरा बायको व मुलगी असा तिघांचा उपचार होणे अशक्य आहे. आजच्या दरानुसार प्रत्येक व्यक्तीला किमान पाच लाखाचा विमा संरक्षण असावे.
त्यासाठी पन्नाशीच्या आत असाल तर फॅमिली फ्लोटरसारखे कवर घेतलेले चांगले. त्यात एकाच पॉलिसीवर कुटुंबाला संरक्षण मिळते.
विमा घेताना कंजूषी न करता क्रिटिकल इलनेस वगैरे सर्व पर्याय उपलब्ध असलेला विमा घ्यावा. जसे वय वाढेल तसे विम्याचे संरक्षण तपासून पाहून त्यात बदल करावा. बेसिक इंडेम्निटी पॉलिसीसोबत टॉप अप किंवा सुपर टॉप अप पॉलिसीही घ्यावी. सुपरटॉपअप पॉलिस्यांमध्ये पहिली विवक्षित रक्कम रुग्णाने भरायची असते व उरलेला खर्च ती विमाकंपनी भरते. उदा. उपचाराचा खर्च 25 लाख रुपये होतोय असे उदाहरण घेतले तर पूर्ण 25 लाखाची इंडेम्निटी पॉलिसी खूपच महाग पडेल. (5 लाखासाठी 8 हजार प्रीमियम तर 25 लाखासाठी 40 हजार प्रीमियम) त्याऐवजी 5 लाखाची बेसिक इंडेम्निटी पॉलिसी घेऊन (8 हजार प्रीमियम) 25 लाखाची सुपर टॉप अप पॉलिसी घेतली (5 हजारापर्यंत प्रीमियम) तर 13-14 हजारात 30 लाखाचे कवरेज मिळते. सुपर टॉप अप पॉलिसीमध्ये सुरुवातीचे 3-4 लाख डिडक्टिबल हे तुम्ही तुमच्या बेसिक पॉलिसीतून भरु शकता.
5 लाखाचे कवरेज काढायचे असेल तर 3 लाखाचा विमा एका कंपनीकडून व 2 लाखाचा विमा दुसऱ्या कंपनीकडून असे काढले तर विम्याच्या कवरेजची खात्री होईल. (एखाद्या कंपनीने विशिष्ट आजाराचा विमा नाकारला तर दुसऱ्या कंपनीकडून तो मिळू शकतो).
www.aisiakshare.com/node/2996 इथे थोडी आणखी चर्चा आहे.
27 Mar 2015 - 2:59 pm | सुबोध खरे
जर पैसे नसतील तरीही के इ एम किंवा नायर रुग्णालयात हृदयरोगाचे बायपास पर्यंत इलाज होतात. तेथे बायपासचा खर्च साधारण सव्वा लाखापर्यंत येतो. ( यात सर्जन लुबाडण्याचा प्रश्न नाही. कि त्यांना काहीही मिळत नाही). इतर आजारांचा त्याप्रमाणे कमी जास्त. फक्त रांगेत बसावे लागते आणि चार चकरा माराव्या लागतात. आता पिवळ्या कि तांबड्या रेशन कार्ड धारकाना बर्याच रुग्णालयात राजीव गांधी योजने खाली दीड लाखापर्यंत इलाजाची सोय होते.
27 Mar 2015 - 3:03 pm | सुबोध खरे
४०० झाले
27 Mar 2015 - 3:07 pm | टवाळ कार्टा
जेपी, चिमणराव आहात कुठे...सत्कारमुर्ती खोळंबलेत तुम्च्याकडून सत्कार करुन घ्यायला :)
27 Mar 2015 - 4:20 pm | नाखु
स्वस्तातली सर्कारी इंजेक्शने आणि हिमालयीन जडीबुटी शोधतोय आणि टका मोफत चुंबक* पाणी हुडक्तोय असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर स्.दा.धांदरफळे कळवितो.
*चुंबक पाणी नस्ते कल्पना तर्क लढवू नयेत.
अखिल मिपीय लगोलग हातासरशी सत्कार संघातर्फे ज्ञान हितार्थ प्रसारीत.
27 Mar 2015 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हाबिणंदन!!!!
27 Mar 2015 - 5:16 pm | अत्रन्गि पाउस
४१९ आणि पुढे आगेकूच चालूच आहे ....
अर्धसहस्रकासाठी शुभेच्छा ...सगळ्यानांच
27 Mar 2015 - 5:33 pm | बॅटमॅन
४२० नंबरचा प्रतिसाद माझा!
27 Mar 2015 - 8:36 pm | अत्रन्गि पाउस
वा वा
25 May 2015 - 11:59 pm | काळा पहाड
http://www.dailyrounds.org/blog/why-i-will-never-allow-my-child-to-becom...