नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
प्रतिक्रिया
12 Mar 2015 - 4:20 pm | बॅटमॅन
अरे वा!
खरेच अगदी मस्त प्रकार आहे हा. बहुत धन्यवाद!
12 Mar 2015 - 12:36 am | आनंदी गोपाळ
मोठाली हॉस्पिटल्स चालवणारे नॉनमेडिको हलकट एम्बीए झालेले अॅडमिनिस्ट्रेटर नोकरीला ठेवतात अन ते ज्युनियर डॉक्टरांना अमुक महिन्यांत इतक्या बायपास नैतर तितक्या हिस्ट्रेक्टॉम्या करा नाहीतर तुमची अॅटॅचमेंट रद्द करू असल्या 'बिझिनेस टार्गेट' धमक्या देतात, ही तुमच्या समाजाची 'हेल्थ इंडस्ट्री'??? तिथे तुमच्या आयुष्याला सेल्स टार्गॅट ठरवलं तर वाईट वाटत नाही का?
एथिक्स लावून डॉक्टरला दाबून मारणार, अन तिकडे हे 'हेल्थ इंडस्ट्रियालिस्ट' कट वाटायला ओपनली पीआरओ ठेवणार, निर्लज्जपणे जाहिरात करणार वर सांगणार की आम्हाला एमएमसीचा कंट्रोल लागू नाही??
सरकारी नोकरांना पैसे खाऊ घालून बिनडोक कायदे पास करून खासगी इमानदार सेवा देणारे दवाखानेच चालणार नाहीत, असा कावा रचणारे कोण आहेत? कॉर्पोरेट हॉस्पिटल अन इन्श्युरन्स्वाले, की डॉक्टर्स?
खिशात २० रुपये घेऊन तापाची सुई घ्यायला जा बरं अमेरिकेतल्या दवाखान्यात? अन सांगा त्याला की माझा इन्शुरन्स नाही म्हणून?
त्या नॉनमेडिकोजनी हे सगळं केलं, तरी बिलातले ८० हजार डोळ्यात आले लोकांच्या, बाकीचे दीड पावणेदोन लाख गेले कुठे?? ते नाही विचारलंत?
बालाजी तांबेचे "बिझिनेस एथिक्स" मी नको पाळू? कंप्यारिझन पण नको? का?? क्वालिफाईड डॉक्टरांचं डॉक बॅशिंग करायला तर भल्ती मजा येते बा! तांबे बॅशिंगही करायचं बघा की कधीतरी.
12 Mar 2015 - 1:23 pm | काळा पहाड
अॅडमिनिस्ट्रेटरला पॉटॅशियम क्लोराईडचं इंजेक्शन देता येणार नाही का गुपचुप? है कै नै कै. तेवढीच समाजसेवा.
12 Mar 2015 - 1:49 am | खटपट्या
वर डॉक्टर आणि मेकॅनिकची होणारी तुलना पाहून एक चपखल बसणारा विनोद आठवला..
एक मेकॅनिक डॉक्टरला म्हणतो. "काय हो, तुम्ही जे काम करता तेच मी करतो ना. मी गाडीचे पार्ट्स बदलतो आणि तुम्ही शरीराचे बदलाता." तरीही तुम्ही एवढे जास्त पैसे कसे घेता?
डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव.." :)
12 Mar 2015 - 7:48 am | खटासि खट
मेकॅनिकचा धंदा करायला डिग्री लागत नाही. बिल्डरला सिव्हील इंजिनीयर असावं अशी अट नाही. कारखाना टाकणा-याने मेकॅनिकल इंजिनियर असावे अशीही अट नाही. पण हॉस्पिटल टाकणा-याने, दवाखाना टाकणा-याने वैद्यकीय प्रमाणपत्रधारक असावं अशी अट आहे. वकीलांच्या बाबतही अशी अट आहे. असं संरक्षण असल्याने जबाबदारी कुणाची वाढते ?
12 Mar 2015 - 8:25 am | संदीप डांगे
सर्टीफिकेट, डिग्री असणार्यांनाच धंदा करू देणे हे संरक्षण जनतेला आहे हो. धंदा करणार्याला धंदा नीट मिळावा म्हणून नाही.
13 Mar 2015 - 8:08 am | खटासि खट
धन्यवाद बेसिक्सबद्दल.
म्हणजेच ज्याला धंदा करायचा आहे त्याने कापडाचं दुकान टाकण्यापासून बाटलीला हजर स्टॉकमधे बुचं बसवून मिळतील आणि फुगे फुगवून मिळतील पर्यंत कुठलाही धंदा करायला कायद्याने बंदी नाही असेच ना ?
12 Mar 2015 - 2:45 pm | कपिलमुनी
डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव.." :)
मग मॅकेनिक म्हणाला , मी पूर्ण बंद पडलेली गाडी चालू करून दाखवतो .. तु करशील काय ;)
12 Mar 2015 - 4:51 pm | इरसाल
क मेकॅनिक डॉक्टरला म्हणतो. "काय हो, तुम्ही जे काम करता तेच मी करतो ना. मी गाडीचे पार्ट्स बदलतो आणि तुम्ही शरीराचे बदलाता." तरीही तुम्ही एवढे जास्त पैसे कसे घेता?
डॉक्टर म्हणाले, "मित्रा, तु गाडीचे जे पार्टस बदलतोस ते गाडी चालू असताना बदलून दाखव..
मेकॅनिकः बरोबर आहे पण मी बंद पडलेले इंजिन चालु करु शकतो तुम्ही करुन दाखवा !
12 Mar 2015 - 8:45 am | अजया
सर्टिफिकेट हे त्या त्या धंद्याचे संरक्षण असते की धंदा करायचा परवाना?
12 Mar 2015 - 8:53 am | अजया
डाॅक्टर स्वतःचा अनुभव,शिक्षण ,त्याचे शिक्षणासाठी घेतलेले कष्ट,काॅम्प्लिकेटेड केसेसचा ताण हे सर्व लक्षात घेऊन,तुमची गाडी नाही तर अाख्खा सजीव ठिकठाक करण्याचा प्रयत्न करत असतो.त्याला स्वतःची फी ठरवण्याचा अधिकार अाहेच
दुसरं अनेक लोकांना केस गेल्यावर डाॅक्टर का हतबल झाले असतील हे न समजता सोबतच्या,ऒळखीच्या शुन्य वैद्यकिय माहिती असणार्या लोकांनी ,हे असं अाधीच केलं असतं तर हा आज जिवंत असता असल्या वक्तव्यांवर जास्त विश्वास असतो,हे मी पाहिलेलं आहे.फक्त ते आधी का हे सल्ले द्यायला आले नाहीत मग,हा प्रश्न त्याना कोणी विचारत नाही.अाॅपरेशन क्रिकेटची मॅच नाही.अरे,मी सांगतो अमका वन डाऊन आला असता ना तर मॅच आपलीच होती!!
12 Mar 2015 - 9:04 am | पिवळा डांबिस
डॉक्टर, वकील हे व्यवसाय आहेत, नोकर्या नव्हेत. (नोकर्यांतही स्पेशल स्किलवाले स्वतःचा चार्ज लावतात आणि एम्प्लॉयर्स तो देतात ही गोष्ट अलाहिदा)
त्यांना वाटेल तो चार्ज ते लावू शकतात.
मिळाला तर यशस्वी होतात, न मिळाला तर डब्यात जातात.
आपल्याला परवडलं तर त्यांच्याकडे जावं, न परवडलं तर त्यांचा नाद सोडून आपल्याला परवडाणारा समव्यावसायिक शोधावा...
उगाच आमच्या शेजारचा वकील ५०० रुपयांत केस लढतो मग राम जेठमलानी एका दिवसाचे १ लाख रुपये का घेतात असा वाद करण्यात काहीही अर्थ नाही.
यशस्वी व्यावसायिकांनी जर काही केसेस कमी पैशात/ मुफ्त केल्या तर तो त्यांचा भलेपणा...
पण त्यांच्यावर कमी पैसे घेण्याची मागणी करण्याचा समाजाला काहीही अधिकार नाही.
मला उपचार ब्रीच कॅन्डीच्या तोडीचे हवेत पण पैसे मात्र मी ससूनइतकेच देईन आग्रह अनाठायी आहे.....
12 Mar 2015 - 9:15 am | खटपट्या
सहमत. अजुनही एका रुग्णाकडून फक्त ३० रू. फी घेणारे डॉक्टर बघीतले आहेत. एका दिवसात १० जण आले तर ३०० होतात. शिक्षण, दवाखान्यावर केलेला खर्च्/भाडे हे सर्व पाहता कसे चालत असेल असा विचार येतो मनात. त्यांच्याबद्दल कोणी काही बोलत नाही.
12 Mar 2015 - 10:13 am | सुबोध खरे
पी डां साहेब
राम जेठमलानी एका दिवसाचे १ लाख घेत असत या गोष्टीला आता कमीत कमी २० वर्षे झाली. आता ते (आणि त्यांच्या दर्जाचे वकील) नुसती आपली कागद पत्रे वाचायला एक लाख घेतात. त्यात काही तथ्य आढळले तर ते केस हातात घेतात आणि एका सुनावणीचे दहा लाख घेतात अशा आठ ते दहा सुनावण्या एका दिवसात ते करतात. श्री फली नरिमन १९७२ साली केस वाचण्याचे रुपये १०००/- घेत असत (वडिलांचा प्रत्यक्ष अनुभव). आजही एम बी अगरवाल सारखे डॉक्टर( ल्युकेमियासाठी भारतातील अग्रगण्य म्हणून गणले जाणारे किंवा डॉक्टर रमाकांत पांडा आपली अन्जीयोग्राफी पाहून सल्ला देण्यासाठी रुपये २०००/- च घेतात.
माझी केस सर्वोच्च न्यायालयात असताना २००३ साली एका मध्यम दर्ज्याच्या वकिलास एका सुनावणीचे रुपये ४५०००/- देत होतो.
तेंव्हा या तुलना करण्यात अर्थ नाही.
12 Mar 2015 - 10:22 am | पिवळा डांबिस
सहमत आहे.
मी सांगितली ती जेठमलांनींची गोष्ट ही ८०च्या दशकातली आहे....
बादमें, हम तो भये परदेस....
12 Mar 2015 - 9:45 am | सुबोध खरे
गोपाळराव कशाला जळ जळ करून घेताय?समाजाला डॉक्टर आणि शिक्षकाने गरिबीत राहून समाजसेवा करायला पाहिजे आहे. तेंव्हा आपण कितीही जळजळ करून घेतलीत तरी निष्पन्न काय होणार?
बाकी डॉक्टर आणि ड्रायव्हरची तुलना एकदम बेष्ट- जाता जाता एक विचार डोक्यात आला कि दहावी नंतर ३ महिने ( वाहन चालवण्यासारखे डॉक्टरीचे) प्रशिक्षण आणि परवाना देऊन डॉक्टर तयार करता आले तर भारतात असलेला वैद्यकीय सेवेचा मोठा तुटवडा भरून काढता येईल काय?
वीस मिनिटांच्या शल्यक्रियेसाठी १२ हजार रुपये घेऊन तळहातावरच्या किलाॅईडची शल्यक्रिया करणाऱ्या डॉक्टरचे नाव आणि पत्ता कळेल काय? कारण अशा शल्यक्रियेसाठी फार मोठे कौशल्य लागते. थोडीशी चूक झाली( किंवा एखादा स्नायू आणि ताणा त्यात अडकला) तरी माणसाचा हात कायमचा आखडू शकतो. माझ्या अशा रुग्णांना नक्कीच मी त्यांच्याकडे पाठवेन.
वीस मिनिटावरून एका विनोदाची आठवण झाली-- एका दंतवैद्याकडे रुग्ण विचारत होता कि दात काढण्याचे किती पैसे त्यावर दंतवैद्य म्हणाले ५०० रुपये. रुग्ण --अहो पाच मिनिटाच्या कामा साठी पाचशे रुपये? त्यावर ते दंतवैद्य शांतपणे म्हणाले तुम्हाला पाहिजे तर तोच दात मी पंधरा मिनिटे लावून काढतो आणि त्यातून तुम्ही भूल द्यायचे औषध नको म्हणालात तर त्याचे १०० रुपये कमी करतो.
एक अतिशय ताजा अनुभव म्हणून सांगतो आहे-- आमच्या सासुबाई ना ह्र्युदय विकाराचा झटका आला म्हनून पनवेलला एका रुग्णालयात दाखल केले त्याचे बिल बारा तासाचे रुपये ७०,०००/- आले. यातील ३५,०००/- रुपये एका तातडीच्या इंजेक्षनचे होते(RTPA)बाकी त्यांच्या साठी वापरलेल्या सामुग्रीचे आणि आय सी यु चे २५ हजार आणि डॉक्टरांचे १०,०००/- . बारा तास दोन तज्ञ डॉक्टर त्यांच्यावर अक्षरशः डोळ्यात तेल ठेवून लक्ष ठेवत होते. त्यामानाने हे पैसे काहीच नाहीत. दुर्दैवाने त्या सुधारत असताना परत ह्र्युदय विकाराचा एक झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. जर त्या जागल्या असत्या तर हे पैसे पूर्ण सत्कारणी लागले असते. यानंतर आमचा मेहुणा बँकॉक ला असतो त्याला येईपर्यंत वेळ जाणार होता म्हणून "ब्रिटो" या कंपनीची शीतपेटी मागवली आणि त्यात त्यांना ३५ तास ठेवले त्याचे बिल रुपये ३५ हजार झाले. (आईस्क्रीम ठेवतात तसा फ्रीझर आणि वर काच लावलेली). प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणे याचा खरा अर्थ मला समजला. बारा तास प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देणे आणि शीत पेटीचे भाडे यांची एकाच किंमत पाहून डोळे कोरडे झाले.
रच्याकने-- मेहुणा मिळेल ते पहिले विमान पकडून मुंबईत आला तेंव्हा त्याच्या दिल्ली मुंबई तिकिटाचे विमान कंपनीने रुपये १५,०००/- घेतले. (तेवढेच तिकीट बँकॉक -दिल्ली प्रवासाचे होते) दोन महिने अगोदर तिकीट काढले तर दिल्ली मुंबई चे रुपये ३,०००/- तीन हजार फक्त होतात.तेंव्हा हा धागा वाचताना एक विचार आला कि दोन महिने अगोदर बुकिंग केले तर बायपासचे तीन लाख होतात मग तातडीचे म्हणून १५ लाख घ्यायला काय हरकत आहे?
नाही तरी आता रेल्वे सुद्धा डायनामिक प्राईसिंगमध्ये गोव्याचे तिकीट दुप्पट घेतात. मग डॉक्टरनीच काय घोडे मारले आहे?
बाकी काही प्रतिसाद मोदकरावांच्या दुव्यावर सापडतीलच
डॉक्टरने समाजसेवेचे व्रत सोडून द्यावे अशा मतापर्यंत आलेला.
सुबोध खरे
12 Mar 2015 - 9:59 am | पिवळा डांबिस
त्रस्त डॉक्टरा, शांत हो!!
तुला अलिकडे खूप मनस्ताप झालाय याची कल्पना आहे...
टाळूवर एखादं एरंडाचं पान ठेवून बघ!!!
आयुर्वेदवालेही खूष!!!!
:)
12 Mar 2015 - 11:17 am | अजया
तत्काळ सेवेचे वेगळे पैसे!!क्या बात है!!किती खरी गोष्ट!!असे लावले चार्जेस तर काय पोट दुखेल लोकांचं =))
12 Mar 2015 - 11:57 am | काळा पहाड
लोकांचं पोट दुखेल तर किती बरं असा विचार करणारे आणि त्यावर हसणारे डॉक्टर आहेत हे समाजाचं दुर्दैव.
12 Mar 2015 - 1:22 pm | अजया
साधा साबण ,त्याची मेकिंग काॅस्ट किती असते आणि आपण घेतो कितीला? तिथे विचारायला जाता येतं का इतकी किंमत का लावली आहे?
डाॅक्टर हा भारतीय स्त्रीसारखा पाहिजे लोकांना.घरातली कामं करुन,सगळ्यांचं सगळं करुन स्वतः झीजणारा.मग त्याला देव्हार्यात बसवा.
स्वतःच्या स्कीलचे पैसे नोकरीत पण वाजवुन घेता ना? मग डाॅक्टरने घेतले तर तुम्ही का प्रश्न विचारत आहात.याला पोटदुखीच म्हणणार.
12 Mar 2015 - 1:37 pm | काळा पहाड
प्रश्न तुमच्या लॉजिकवर नाही, तुमच्या टोनवर आहे. थोडासा सूडाचा वास येतोय त्या स्टेटमेंट ला. बाकी एक लक्षात घ्या. डॉक्टर हे समाजाचा भाग आहेत. ते आयसोलेटेड काम करत नाहीत. जितकं तुम्ही समाजाला नाडायचा प्रयत्न कराल, तितका समाज लवकर उत्तर शोधायचा प्रयत्न करेल. चायना वरून डॉक्टर मागवेल, एम बी बी एस ऐवजी तीन वर्षांचा डिप्लोमा सुरू करेल, प्रचंड प्रमाणात मेडिकल कॉलेज सुरू करून बल्क प्रमाणात डॉक्टर तयार करायचा प्रयत्न करेल, कायद्यात बदल करेल. डॉक्टरांचा संबंध पेशंटच्या आयुष्याशी येतो हा जसा त्यांच्या फायद्याचा विषय आहे, तसाच दुर्दैवाचा पण आहे. समाज त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक अॅक्शनवर आपलं मत बनवतो. साबण नाही परवडला तर स्वस्त घेतला जातो. तसं डॉक्टरबाबत करता येत नाही. साबण नाही घेतला तर माणसाचा जीव जात नाही. तेव्हा ही तुलना चुकीची आहे. सर्वात शेवटी, स्वतःची सेवा ही सेवा आहे की धंदा हे डॉक्टरवरच आहे. जितकं डॉक्टर त्याचा धंदा करत जातील, तितकं ते व्हल्नरेबल होत जातील. डॉक्टरवरचा ह्ल्ला ही मोठी घटना समजली जाते. वकीलाला बडवलं तर लोक म्हणतात बरं झालं. डॉक्टरांना आदरणीय व्हायचंय की वकीलांप्रमाणे व्हायचंय हे त्यांनीच ठरवावं.
12 Mar 2015 - 1:51 pm | अजया
डाॅक्टरकी समाजसेवा म्हणून लोकाना त्यांच्या सोयीने पाहिजे आहे.बाकी सर्व हास्यास्पद चायनीज डाॅ इ. सोडुन दिले आहे!
साबणाचे उदा. एवढ्यासाठी की तिथे तुम्हाला कोणी प्रत्यक्ष दिसत नाही ना का इतकी किंमत कसली विचारायला.कोणीतरी लिहिलंय त्याला उद्देशुन आहे ते.या सर्जरीची इतकी किंमत!!
स्वस्तातल्या साबणासारखे स्वस्तातले डाॅक्टरही आहेत.तिथे जायचा पर्याय असतोच.मग तिथे जायचं नाही आणि मोठ्या सेट अप मध्ये जाऊन लुटलं म्हणून गळा काढायचा हे कसं?
12 Mar 2015 - 2:01 pm | काळा पहाड
अहो कोणी साबण अडीच लाखाला विकत नाही हो म्हणून विचारत नाही. दुकान्दार काय सांगणार? तो थोडाच बनवतो साबण? बाकी तसाही आम्ही बिग बझार मध्ये जावून पैसे वाचवायचा प्रयत्न करतोच. त्या पलिकडे सामान्य माणूस करणार काय?
आम्ही स्वस्तातलेच शोधतो. आम्हालाही मोठ्या सेटपची हौस नाहीये. ती काय फॅशन आहे का मिरवायला? पण "तुम्ही किती घेता" हे कसं विचारायचं हे सांगा बघू एकदा. दुसरं म्हणजे आम्हाला काय झालंय हे डॉक्टरकडे गेल्याशिवाय कळत नाही. मग डॉक्टर किती पैसे घेणार हे कसं कळणार? बरं तिथे निगोशिएशन सुद्धा करता येत नाहीत. गुपचुप पैसे द्या आणि बाहेर पडा. म्हणजे मार पण खा आणि रडू पण नका पैकी प्रकार झाला.
12 Mar 2015 - 2:06 pm | अजया
याचीच फी आहे ती!रडलात तर रुमाल देऊ!फ्री!!
मला मारी अंत्वानेत झाल्याचा फिल येतोय आता!ब्रेड नसेल तर केक खा!!
चालू द्या!
12 Mar 2015 - 12:06 pm | काळा पहाड
डॉक्टरसाहेब, डॉक्टर नावाच्या लोकांबद्दल समाजाच्या मनात जनरली आदर असतो. कदाचित त्यांना उपाय नसतो म्हणूनही असेल. पण सगळं ऐकलं असताना (कट प्रॅक्टिस, उगीचच सर्जरी करायला लावणे इत्यादी), आपला फॅमिली डॉक्टर (ही जमात आता नामषेश होते आहे) तसा नसेल असं सामान्य जनांना वाटतं हे खरं. खरं सांगायचं तर डॉक्टर म्हणून नव्हे, तर माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा विचार कुणी तरी करतंय याची लाज वाटली.
बाकी असाच विचार सैन्यातल्या लोकांनी केला तर त्यांना किती बरं ना? युद्ध सुरू झालं तर १५ लाख प्रत्येकी बोनस द्या तर लढाई वर जातो. काय म्हणता?
12 Mar 2015 - 12:42 pm | सुबोध खरे
का हो पहाड साहेब
सरकारी विमान कंपनी "आमची गरज" असताना पाच पट पैसे लावते, सरकारी रेल्वे दुप्पट पैसे लावते त्याबद्दल आपण काहीच बोलणार नाही.
"माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा विचार कुणी तरी करतंय याची लाज वाटली". अशी नुसती तुलना केली तरी तुम्हाला आमच्या बद्दल लाज वाटली.
डॉक्टरनेच समाजसेवा करायला पाहिजे का? माझ्या दवाखान्यासाठी सरकारी वीज कंपनी रुपये १०. ६१/- अधिक इंधन अधिभार हा दर लावते तेच आमच्या वरच्या मजल्यावरील घरगुती ग्राहकांना दर रुपये ४. १६/- अधिक इंधन अधिभार.
म्हणजे सरकार आम्हाला धंदेवाईकच समजते.मग हा समाजसेवेचा भार डॉक्टरच्याच डोक्यावर का?
येऊ घातलेले सरकारी नियम जर आपण पाहिलेत तर एका एम बी बी एस डॉक्टरला दवाखान्यासाठी कमीत कमी ४५० चौरस फुट जागा पाहिजे. मुलुंड सारख्या ठिकाणी २४०००/- चौरस फुटाला व्यापारी जागेचा दर असताना दवाखाना घ्यायचा असेल तर एक कोटीच्या वर पैसे लागतील.( हे नियम आयुश ला लागू नाहीत). असे असताना डॉक्टरने काय करावे हि अपेक्षा आहे?
राहिली गोष्ट लष्कराबद्दल-- तेथे मी माझ्या तारुण्याची २३ वर्षे घालविलेली आहेत. लष्करात कितीही वेळ आणी जीव तोडून काम करा त्याची कुणाला किंमत नाही हे बाहेर आल्यावर मला व्यवस्थित समजलेले आहे.
"मग माणूस म्हणूनसुद्धा कुणी असा (लष्कराला युद्धासाठी बोनस) विचार करण्याबद्दल मला आपली लाज वाटते" असे मी म्हणालो तर आपल्याला कसे वाटेल.
जाऊ द्या. तुमच्याशी वाद घालून काय होणार आहे? लोकांची विचारसरणी काय आहे ते मला माहित आहे त्यामुळे मी या धाग्यावर प्रतिसाद देत नव्हतो.
यापुढेही गप्प बसतो. बर झालं माझी दोन्ही मुलं डॉक्टर होत नाहीत.
आपण म्हणता ते पूर्ण मान्य आहे, सगळ्या डॉक्टर न सरकारने किमान वेतन योजने प्रमाणे पगार द्यावा आणी डॉक्टरने आपले आयुष्य समाजाच्या सेवेत व्यतीत करावे. काय म्हणता ?
12 Mar 2015 - 1:02 pm | काळा पहाड
साहेब, मी तुमच्या बोलण्यातली विसंगती दाखवत होतो. मी लष्कराला युद्धासाठी बोनस या संकल्पनेचं पुष्टीकरण करत नव्हतो. लष्कराला युद्धासाठी बोनस ही संकल्पना जितकी विचित्र वाटते, तितकंच डॉक्टरांनी अशा प्रकारचे पैसे आकारणं विचित्र वाटेल असं मला म्हणायचं होतं. बाकी तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे हे मला मान्य आहे. डॉक्टरनी पैसे जरूर कमवावेत. पण अव्वाच्या सव्वा पैसे आकारणं (कारण लोकांना ऑप्शन नाही हे डॉक्टरांना माहीती आहे) आणि मेडिकल प्रॅक्टीस मध्ये ज्या गैर बाबी चालतात त्यावर माझा आक्षेप होता.
भारतीय व्यवस्था तुटवड्याच्या अर्थकारणावर चालते. तुटवडा करा आणि फायदा कमवा हा इथला मंत्र आहे. यात फक्त डॉक्टरच नाहीत, बिल्डर, शिक्षक, आयटीवाले आणि बाकीचे सगळेच येतात. तेव्हा लष्करात फारतर भारतीयांची बरोबर किंमत केली जाते आणि बाकीच्या ठिकाणी भारतीयांची किंमत त्यांची जेवढी लायकी नसते तेवढी दिली जाते असं म्हणा हवं तर. भारतीय लोकांनी स्वतःचं ओव्हरव्हॅल्युएशन चालू केलंय म्हणून तर त्यांना पाट्या टाकण्यासाठी एवढे पगार दिले जातात. लष्करात असं नसेल फार तर.
12 Mar 2015 - 11:50 am | चिरोटा
महागड्या हॉस्पिटल्समुळे हे होते. हेच डॉक्टर सरकारी रुग्ण्यालयात तशाच प्रकारची ऑपरेशन्स अर्ध्या किंमतीत करतात.
हॉस्पिटल्स चालवणे हा धंदा असल्याने पेशंटला जास्तीत जास्त कसे खर्चात टाकता येईल् हा धंदेवाईक विचार असतो.त्यातही मेडिकल इन्श्युरन्स असेल तर सोन्याहून पिवळे..
मोठ्या प्रसिद्ध हॉस्पिटल्समध्ये काम करणारे डॉक्टर्स खूप कुशल असतात हा गैसमज आहे.
न्युरोसर्जरी सारखे काही अपवाद सोडले तर बहुतांशी सर्जन्स्,डॉक्टर्स हे सामान्य वकुब असणारे असतात.
12 Mar 2015 - 12:59 pm | पिलीयन रायडर
माझ्या मते डॉक्टर आणि मेकॅनिक अशी तुलना हास्यास्पद आहे.. डॉक्टरचा स्किलसेट असा असतो की त्याची किंमत अशी करता येणार नाही. त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यामुळे ते हवी ती फीस आकारु शकतात. ज्यांना प्रवडेल त्यांनी जावं, अन्यथा जाउ नये. कुणीतरी आयुष्याची अनेक वर्ष शिक्षण घेऊन, सेट अप साठी बराच पैसा लावुन, मला परवडेल अशा दरात काम करावं, समाजसेवा म्हणुन व्यवसायाकडे बघावं ही अपेक्षा आपण ठेवु शकतच नाही.
पण डॉक्टरांनी सुद्धा एकदा हे मान्य केलं की हा त्यांचा "व्यवसाय" आहे, समाजसेवा नाही की मग हलगर्जीपणामुळे रट्टे पडले तर वाईट वाटुन घ्यायचं नाही. मग लोक "कस्ट्मर" सारखेच वागतील. "डॉक्टरसाहेब" वगैरे मान न मिळता, जाब विचारण्यात येतो तो ह्यामुळेच.. अनेकदा आम्हालाही अनेक वाईट डॉक्टरांचा अनुभव येतो.. साधं सर्दी तापाचं निदान चुकवुन भलतीच औषधं (पार टॅमीफ्ल्यु च डायरेक्ट) देणार्या महान बाई मला भेटल्या आहेत. मग असा धंदा नीट करता येत नसेल तर लोक गप्प का बसतील. तुमचा व्यवसाय हाय रिस्क आहेच. पण तो केवळ कुणाच्या जीवाचा संबंध अस्तो म्हणुनच नाही तर लोकांच्या त्या लेव्हलच्या भावना पण गुंतलेल्या असतात.. म्हणुनच त्याच लेव्हलचा वेळ आणि पैसा तुम्ही गुंतवला असतो.. आणि तशीच फीस सुद्धा आकारत असता. मग तशाच परिणामांना सुद्धा सामोरं जावं लागतं.. नेहमीच तुमची चुक असेल असं नाही.. पण आजकाल आजुबाजुला पाहता अनेकदा केवळ पैसा काढायचा म्हणुन डॉक्टर मढ्याचेही चार्जेस लावताना दिसतात. ओल्या सोबत सुकंही जळतं म्हणतात ना त्यातली गत होते मग.. चांगल्या डॉक्टरांवरही मारहाण सहन करायची वेळ येऊ शकते. तुमचा आणि आमचा.. दोघांचाही नाईलाज आहे..
12 Mar 2015 - 2:18 pm | मराठी_माणूस
मेकॅनिकशी तुलना बरोबर नाही. मेकॅनिक्स विनम्र असतात आणि त्यांच्याशी चर्चा शक्य असते.
12 Mar 2015 - 3:01 pm | कपिलमुनी
मेकॅनिकचे पण चार्जेस वेगवेगळे असतात.
12 Mar 2015 - 3:29 pm | मराठी_माणूस
हो, पण त्यांच्याशी त्या बाबतीत पण चर्चा शक्य असते. तुम्ही स्पष्टीकरण मागु शकता आणि त्यालाही त्यात काही वावगे वाटणार नाही.
12 Mar 2015 - 2:58 pm | सूड
ह्या स्वधर्मचा आयडी बदलून नारद करा बघू!! काडी टाकून दिलीन आणि आता धाग्यावर हजेरी तरी लावल्ये का बघा? लोकं बसलीत वाद-प्रतिवाद करत.
12 Mar 2015 - 8:00 pm | स्वधर्म
कृपया खाली पहा.
12 Mar 2015 - 9:14 pm | सूड
आता काय उपयोग? बूंद से गयी वो हौद से नही आती.
12 Mar 2015 - 3:00 pm | कपिलमुनी
सर्व माहगड्या डॉक्टरचे रेट आपल्याला माहीत असतात. तिथेच उपचार घेण्याची सक्ती नसती.
आपल्याला परवडेल तिथेच उपचार घ्यावेत.
माझ्या वडिलांना अॅटॅक आला तेव्हा अँजिओप्लास्टी केली . वायसीएम मधे एक ब्लॉक असेल तर ८०,००० आणि २ ब्लॉक असतील तर ११०,००० खर्च सांगितला होता. पुण्यामधे नामांकित हॉस्पिटलमध्ये तोच खर्च ३५०,००० आला पण माझ्या समोर दोन्ही पर्याय खुले होते.
तिथे सुद्धा स्टेंट बसवताना विचारले होते , २५,००० ते १,००,००० पर्यंतचे स्टेंट आहेत तुम्हाला कोणता बसवायचा आहे. प्रतेक स्टेंटचे फायदे तोटे सुद्ध सांगितले होते.
माझ्या बजेटनुसार मी केले . जर माझ्याकडे पैसे नसते तर मी सरकारी दवाखान्यात केले असते.
फक्त या मधे मला एक गोष्ट खटकली होती ती म्हणजे स्टेंट ची किंमत . माझा एक मित्र एम आर आहे त्याने डॉ. ना सांगितले तुम्ही कंपनी सांगा मी तुम्हाला तो स्टेंट आणून देतो कारण ज्या स्टेंट ची किंमत ५०,००० लावली तो निम्म्या किमतीत तो आणायचा ( बाकीचे डॉ. , हॉस्पिटल यांचे कमिशन असते) . याला डॉ. नी आणि हॉस्पिटलने परवानगी दिली नाही.याचा सरळ अर्थ त्यांना ते कमिशन् सुद्धा हवे होते.
माझा डॉक्टरच्या फी वर आक्षेप नाही पण कट प्रॅक्टीस आणि या कमिशन्खोरीवर मात्र आहे..
अवांतर : आपल्यापैकी कितीजणांना स्वतःचा पगार हा स्वतःच्या स्किलसेट, अनुभव यांच्यापेक्षा कमी चालेल ?
12 Mar 2015 - 3:28 pm | सातबारा
गोपाळराव व गंगाधरपंत मुटेंचा सूर सारखाच लागल्याचे पाहून अंमळ मौज वाटली.
12 Mar 2015 - 3:28 pm | सांगलीचा भडंग
डॉक्टर व विषय अगदी ज्वलंत आहे पण तो फक्त पब्लिक फोरम वर लिहिताना . तावातावा ने काहीही लिहिता येते ( असे केले पाहिजे , तसे केले पाहिजे ) .पण स्वत: किव्वा कुटुंब यावर एखादी गोष्ट आदळली असली कि सगळे मोठे विचार चुलीत जातात. प्रश्न आयुश्याचा असतो. त्यामळे थोडे जास्त पैसे गेले तरी चालतील पण रिस्क घायची तयारी नसते
समजा स्वाईन फ्लू ची एक लस आली आहे . ती सरकारी दवाखान्यात फुकट आहे पण खाजगी कडे त्याच गोष्टीचे २५०-५०० घेत असतील तरी बरीच लोक तिथे जातील. कारण काय तर सुया कुठल्या वापरल्या / औषध एक्सपायर नसेल ना / फ्रीज मध्ये साठवले असेल का अश्या बर्याच शंका मनात येतात .
पण हीच गोष्ट समजा चष्मा फुकट देत असतील सरकारी दवाखान्यात तर सगळे तिथे रांगेत उभे राहतील कारण तिथे रिस्क कमी आहे
12 Mar 2015 - 4:11 pm | आजानुकर्ण
१. सीनियर म्यानेजमेंटचे प्रेशर आणि पैसे कमावण्याचा दबाव फक्त डॉक्टरांवरच असतो असा गैरसमज दिसतोय. आजकाल कुठल्याही क्षेत्रातील उच्चशिक्षितांवर साधारण सारखाच ताण असतो. मात्र अशा अतिताणाच्या कामातून उद्भवलेल्या स्ट्रेस-हार्टप्रॉब्लेम्स यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या डॉक्टरांपेक्षा हवालदार किंवा नॉन हेल्थकेअर (आयटी-बिझनेसमन) व्यक्तींची संख्या जास्त दिसते. अर्थात हे पेपरात वाचलेल्या बातमीतून बनवलेले मत आहे. याचा प्रतिवाद करणारा विदा मिळाला तर नक्कीच आवडेल.
२. सीनियर मंडळींचे प्रेशर असल्याने पैसे कमावण्यासाठी आम्हाला कसेही वागावे लागते (कधीकधी अनैतिक) याचे कुठेतरी सुप्त समर्थन दिसते.
३. आम्ही धंदा चांगला केला नाही तर आमच्याकडे पेशंट येणार नाहीत म्हणून आम्हाला चांगला धंदा करावाच लागतो. असं स्पष्टीकरण फसवणूक करणाऱ्या ब्रोकरने दिले तर चालेल का?
४. डॉक्टरी हा उच्चशिक्षित मंडळींनी सचोटीने करायचा व्यवसाय आहे. जेवढे मार्केटदराने आहेत तेवढे पैसे खुशाल घ्यावेत. ज्यांच्याकडे विशेष कौशल्य आहे त्यांनी प्रीमियम घ्यावे. मात्र जसे पैसे घेतलेत तशी सेवा मिळत नसेल तर वरुन ग्यारंटी कार्ड आणा, आम्ही फक्त दुरुस्त करतो बनवत नाही अशी मारवाडी दुकानदार छाप उत्तरे द्यावीत याचे वाईट वाटते. रुग्णांचे जीवनमरण हा डॉक्टरांसाठी एक रोजचा आकडा असला तरी डॉक्टरांच्या चुकीमुळे अनेक घरे उद्ध्वस्त होऊ शकतात.
डॉक्टर आणि मेकॅनिक वगैरे तुलना करुन त्यावरच चर्चा चालू असल्याने आता कंटाळा आला. वरील सारांश लिहून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद.
12 Mar 2015 - 7:59 pm | स्वधर्म
धागा काढल्यानंतर काही कारणाने (नेहमीचेच - अाॅ़िसमधला क्रायसिस) तेवढे सतत प्रतिसाद देणे शक्य झाले नाही, त्याबद्दल क्षमस्व. सर्व प्रतिसाद वाचल्यावर वाटले, की इथे डाॅक्टरांच्या फीविषयी काही वस्तुनिष्ठ चर्चा होण्यापेक्षा दोन तट पडले अाहेत. एक डाॅ लोक कसे कापायला बसलेत, निव्वळ धंदाच करतायत असे म्हणणारा, दुसरा (खुद्द डाॅ लोकांचा ) - उलट तेच कसे ‘अन्यायग्रस्त’ अाहेत हे मांडणारा. नंतर ही चर्चा मग वैद्यकीय व्यवसाय, विमा व त्यातील नैतिकता इत्यादीवर घसरली. ज्याच्याकडे दुर्मिळ कौशल्य असेल, तो त्याला वाट्टेल ती फी लावणारच, परवडली तर सेवा घ्या, नाहीतर फूटा, असे मानले, तर प्रश्नच मिटला. मला वाटलेले फीबद्दलचे मत मी दुरूस्त करायला तयार अाहे, पण मूळ मुद्दा असा की, खरंच एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत? या महाकुशल लोकांबाबत यांना खरंच हा विचार कधी येतो का? हे एवढे पैसे त्यांना खर्च तरी करता येत असतील का असे वाटले. अायफोन, मर्सिडीस वगैरेबाबतही हेच मत अाहे. दहा पट महाग वस्तू दहापट मूल्य देते असे नाही वाटत. बाकी कुणी त्याला जळजळ म्हणोत, कुणी सामाजिक जाणिव, कुणी इतर काही.
- स्वधर्म
12 Mar 2015 - 8:03 pm | कपिलमुनी
देउ पण नयेत !
12 Mar 2015 - 9:18 pm | vikramaditya
कोकीलाबेन अंबानी (फोर बंगलो, अंधेरी) ईस्पितळाची बिल्स बघितली तर अक्षरष: वेड लागेल.
ह्या बाबतीत कोणाला काही अनुभव असेल तर शेअर करावा.
प्रत्येक एचओडी ला टार्गेट देवुन काम करवणारे 'कॉर्पोरेट' रुग्णालय.... नावातील नफेखोरीचे जिवंत उदाहरण!!!
12 Mar 2015 - 9:54 pm | आयुर्हित
मुंबईतील मोठया रुग्णालयांच्या धोरणाविषयी नेहमी चर्चा होते. सरकारकडून मदत घेणारी ही धर्मादाय रुग्णालये गरिबांकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी समाजातील आर्थिकदृष्टया निम्न वर्गातील रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याची अपेक्षा आहे. परंतु तशी सेवा दिली जात नाही. धर्मादाय रुग्णालयासंबंधीचे कायदे असे सांगतात की, या धर्मादाय रुग्णालयांनी १० टक्के खाटा दरसाल ५० हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणा-या वर्गासाठी राखून ठेवल्या पाहिजेत. त्याचबरोबर त्यांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. ५० हजार ते एक लाख रुपये उत्पन्न असणा-या वर्गातील गरीब रुग्णांसाठी आणखी दहा टक्के खाटा आरक्षित केल्या पाहिजेत आणि त्यांना सवलतीच्या दरात उपचार दिले पाहिजेत. मात्र, प्रत्यक्षात तसे होत नाही. या संबंधातील माहिती धर्मादाय आयुक्तांकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली आहे. ही माहिती इतकी धक्कादायक आहे की, केवळ दोन टक्के खाटा या गरीब रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु त्या सरासरी चार दिवस एवढया उपलब्ध होतात. ही रुग्णालये गरिबांना मोफत उपचार देण्यास तर स्पष्ट नकार देतात. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असली तरी त्यांना ओपीडीमध्ये तपासून सोडून दिले जाते आणि त्यांना देणे अपेक्षित असलेल्या खाटा भरपूर शुल्क देणाऱ्या खासगी रुग्णांसाठी वापरून त्यातून हजारो रुपये कमावले जातात. ‘केहात’ (सेंटर फॉर इन्क्वॉयरी हेल्थ अँड अलाईड थिम्स्) या संस्थेच्या संचालिका पद्मा देवस्थळी यांनी या धर्मादाय रुग्णालयांच्या व्यापारी वृत्तीवर टीका केली आहे. त्यांनी या रुग्णालयांच्या नफेबाजीवर एक अहवालच तयार केला आहे. शहरामधील काही नामवंत रुग्णालये या सदरात मोडतात. ब्रीच कँडी, लीलावती, हिरानंदानी, जसलोक, बॉम्बे, सफी आणि कोकीलाबेन अंबानी ही धर्मादाय रुग्णालये मुळात धर्मादाय आहेत, हे ब-याच लोकांना माहीत नाही आणि इथे गरिबांना असे उपचार देण्यासंबंधी कायदा आहे, हेही ब-याच लोकांच्या गावी नाही. ही रुग्णालये खासगी आहेत आणि हजारो लाखो रुपये खर्चण्याची ऐपत असणा-या श्रीमंत लोकांनाच तिथे जाणे परवडते, असाच लोकांचा समज आहे. देशात गरिबांसाठी योजना खूप आहेत पण त्या योजनांची माहिती गरिबांपर्यंत पोहोचत नाही आणि या अज्ञानामुळे हे गरीब लोक त्यांच्यासाठी असलेल्या योजनांपासून वंचित राहतात. त्याचा फायदा अन्य लोक घेतात. वर उल्लेख केलेल्या रुग्णालयात एकंदर १६०० खाटा धर्मादाय आहेत. त्यातील ८०० खाटा मोफत उपचार घेणा-या रुग्णांसाठी तर ८०० खाटा सवलतीच्या दरात उपचार घेणा-या रुग्णांसाठी आहेत. म्हणजे त्या तशा असल्या पाहिजेत, असा नियम आहे. पण हा नियम कोणी पाळत नाही. म्हणून ‘केहात’ या संघटनेने शहरातील निरनिराळ्या रुग्णालयांच्या स्थितीची माहिती लोकांपर्यंत पोहाचवली पाहिजे, अशी शिफारस केली आहे. ज्या रुग्णालयांमध्ये या सवलतींची अंमलबजावणी केली जात नसेल त्या रुग्णालयांना तशी कडक समज दिली पाहिजे. या रुग्णालयांच्या बाहेर तिथल्या उपचारांच्या दरांची माहिती देणारे फलक लावले पाहिजेत. सवलतीच्या दरातील किती खाटा उपलब्ध आहेत आणि त्यांचे दर काय आहेत, त्यांचीही माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे
साभार प्रहार : रुग्णालयांकडून लुटालूट
13 Mar 2015 - 2:21 am | डँबिस००७
डाँक्टरांची उपचार सुद्धा नको म्हणुनच की काय केजरीवाल बेंगरूळुला जाउन नॅचरोपॅथीचा उपचार घेऊन आलेत, आणि त्यांना तसा सल्ला अण्णा हजारेनींच दिला होता म्हणे.
13 Mar 2015 - 10:09 am | आयुर्हित
राजकीय विरोधक असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला ऐकत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोदींचे योगासनांचे गुरू एच. नागेंद्र यांच्याकडून खोकल्यावर उपचार घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शेषाद्री यांचे नागेंद्र हे नातेवाईक आहेत. ते स्वत: जरी बेंगळूर येथे राहत असले तरी गुजरात सरकारमधल्या बहुतेक सर्व मंत्र्यांना योगासने व योगविद्येवर आधारीत जीवनशैलीचे मार्गदर्शन ते नियमित करतात.
आत्तापर्यंत दोन लाखांवर दम्याच्या रुग्णांना नागेंद्र यांनी बरे केले असल्याचे सांगितले जाते. अशा नागेंद्र यांच्या योग उपचारशैलीचा फायदा केजरीवाल घेतील
खोकलामुक्तीसाठी केजरीवाल घेणार मोदींच्या योगगुरूंची मदत
13 Mar 2015 - 10:12 am | पिवळा डांबिस
केजरीवालना दमा आहे का?
13 Mar 2015 - 10:29 am | आयुर्हित
और अनियंत्रित मधुमेह
13 Mar 2015 - 12:19 pm | पिवळा डांबिस
परानी खांसी म्हणजे काय ते मराठीत (वा इंग्रजीत)सांगा, आमचं हिन्दी तितकसं चांगलं नाही..
अनियंत्रित मधुमेह हे कळलं.
पण त्यांना दमातज्ञाकडे जे पाठवलंय ते त्यांना नक्की दमाच आहे का?
आणि तुम्ही किंवा मोदींनी (त्यांनी पाठवलंय असं वर वाचलं म्हणुनच म्हणतो हो) त्यांची परीक्षा (नाडीपरीक्षा किंवा अन्य जी काही आयुर्वेदात असते ती)केलीये का?
की आपलं उगाच खोकला येतो म्हणजे दमा असणार म्हणून पाठवा दमा स्पेशालिस्टाकडे असा प्रकार आहे?
आणि बाय द वे: ह्या दमा स्पेशालिस्टांचे रेट्स काय आहेत? कारण हा धागा डोक्टरांच्या रेट्सवरून सुरू झालाय म्हणून एक विचारतो. (ह्यात उपहास आणण्याचा हेतू नाही. मला खरोखरीच ह्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन प्रॅक्टिशनरसचे रेटस माहिती नाहीत म्हणून विचारतोय).
डिस्क्लेमरः श्री. केजरीवाल यांना कुठल्याही उपचारांनी का होईना पण आरोग्य लाभावं ही सदिच्छा!
13 Mar 2015 - 12:35 pm | आयुर्हित
वरच्या Heading पट्टीतील line space कमी ठेवल्याचा परिणाम आहे.
पुरानी खांसी चा अर्थ जुनाट खोखला असावा.
वरच्या दमा स्पेशालिस्टांचे रेट्सबद्दल अजून काही अनुभव नाही.
पण माझ्याकडे एक आगळीवेगळी पद्धती आहे, जिचा घरबसल्या वापर करून कुठलाही दमा संपूर्ण घालवता येतो!
13 Mar 2015 - 1:00 pm | पिलीयन रायडर
बाकी सगळं जाउ द्या.. ह्या आयुर्हितांना आवरा कुणीतरी..
एक तर हे नीट काही सांगत नाहीत. काहीही विचारा "मला प्रत्यक्ष भेटा.. व्यनि करा.." हेच उत्तर देतात.
काहीतरी मार्केटिंग स्किम आहे हे नक्की..
13 Mar 2015 - 1:22 pm | रुस्तम
+१११
13 Mar 2015 - 1:45 pm | आयुर्हित
जैसी जिसकी सोच!
13 Mar 2015 - 1:52 pm | पिलीयन रायडर
बरं माझी सोच च बेक्कार आहे..
तुम्ही का नाही जाहिर सांगत की नक्की कसं "रोग्याच्या मुळावर" उपचार करता येतात?
माझा सिंपल फंडा आहे.. एखादी गोष्ट अत्यंत मानव हिताची आहे.. आणि कुणाला तरी ती ठाउक आहे.. तर ज्याला खरंच लोकांविषयी वाटतं तो ती सरळ सर्वांदेखत सांगेल.. ज्याचा स्वतःचा स्वर्थ त्यांत गुंतला आहे, तो सांगणार नाही..
13 Mar 2015 - 2:15 pm | आयुर्हित
धाग्यावर सर्वांच्या फायद्यासाठी "कॉमन" उपाययोजनाच सांगता येतात आणि तो १०१% देत गेलो आहे.
प्रत्येक रुग्णाचा आजार, प्रकार, गंभिरता, समज,आजाराची मूळ कारणे,इतर असलेले आजार व त्यांची गंभिरता, मानसिक शक्ती, आवड, निवड, धार्मिक तत्वे, व्यवसाय, दिनचर्या, क्रयशक्ति व त्यामूळे आलेली मानसिकता ह्यात जमीन आस्मान एवढा फरक असतो.
यामूळेच उपाययोजनेत फरक करावाच लागतो.
एकाचे औषध हे दुसर्यासाठी विष ठरु शकते.
13 Mar 2015 - 2:17 pm | पिलीयन रायडर
मला हेच उत्तर अपेक्षित होतं.
पण मग जर मी जाहिररित्या तुम्हाला माझा आजार सांगितला तर तुम्ही मला जाहीररित्या उत्तर देणार का?
13 Mar 2015 - 3:52 pm | आयुर्हित
आपल्याला सिरीअसली जर उपचार करायचमार्ग काढायचा असेल तर व्यनी करावा.
विचारलेल्या सर्व प्रश्नाची सविस्तर माहिती पुरवावी.
13 Mar 2015 - 5:42 pm | पिलीयन रायडर
सगळी माहिती देऊ.. पण जाहिररित्या..
तुम्ही पण जाहिररित्या सांगा की उपचार काय आहेत ते..
तुम्ही इथे डॉक्टरांना आव्हान दिले आहेत की म्हणे ९९% बायपासची गरज नसतेच. त्यांच्याकडे बायपास का करायची ह्याची शास्त्रोक्त कारणे आहेत. तुम्ही का नाही करायची ह्याची "जाहीररित्या" सांगा.
13 Mar 2015 - 5:48 pm | कपिलमुनी
गुरूमंत्र आहे कानातच सांगायचा असतो
13 Mar 2015 - 5:55 pm | आयुर्हित
ज्यांना मनापासून बरे व्हायचं आहे ते आपले व्यनी करतात आणि माहिती घेतात.
मी माझा वेळ आणि सल्ला फक्त मदत मागणार्यानच देत असतो.
आपण नाही माहिती घेतली तरी चालेल.
कुणाला बळजबरी नाही.
धन्यवाद.
कळावे, लोभ असावा.
13 Mar 2015 - 6:05 pm | पिलीयन रायडर
तुम्ही देता ती माहिती एखाद्याच्या जीवाशी खेळणारी सुद्धा सु शकते. वर स्पंदनाने सांगितलेल्या गोळ्या लोक शहानिशा न करता "कुठलाही रोग मुळापासुन बर्या करणार्या गोळ्या" म्हणुन खात आहेत. त्याचे होणारे साईड इफ्फेक्ट्स काय हे कुणी तपासलय? तुम्ही सुद्धा असंच काही करत असाल तर तुम्हाला जाब विचारु शकते मी..
इथे तुम्ही कायम आरोग्यविषयक जाहिरात करणारेच प्रतिसाद जास्त दिले आहेत. त्यातुनही तुम्ही लोकांना "निरोगी..आनंदी व्हायचे असेल तर भेटा" टाईप होलसेल व्यनि सुद्धा केले होते. अशी जाहिरातबाजी तुम्ही मिपावर करत असताना एक "टारगेट कस्टमर" म्हणुन मी ही माहिती विचारु शकते..
तुम्ही तुमच्या ह्या एका धाग्यावर सुद्धा बायपास.. दमा अशा मेजर रोगांवर माझ्याकडे अक्सीर इलाज आहे असा दावा जाहीररित्या केला आहे. तसे असताना कुणी काऊंटर केल्यास त्याचे उत्तर जाहीररित्या देणे तुमचे कर्तव्य आहे. मी तुम्हाला स्पेसिफिक माझ्यावर इलाज करा असा आग्रह करत नसुन तुमची "उपचारपद्धती" काय हे विचारत आहे. ती तुम्हाला सांगता आली पाहिजे (आणि प्लिझ.. रोगाच्या लक्षणापेक्षा मुळ कारणावर इलाज करणे अशी फालतु उत्तरं देऊ नकात)
जाहिरात करत आहात तर ती तरी धड करा..
13 Mar 2015 - 6:13 pm | आयुर्हित
कुणाला बळजबरी नाही.
धन्यवाद.
कळावे, लोभ असावा.
13 Mar 2015 - 6:12 pm | रुस्तम
त्या जाहीररित्या सल्ला मागत आहेत ना. मग तुम्हाला, त्यांना जो सल्ला व्यनितून देणार तो जाहीररीत्या द्यायला काय प्रोब्लेम आहे?
13 Mar 2015 - 6:18 pm | आयुर्हित
कारण फक्त चौकशी करणाऱ्यांना कोणीच Entertain करत नसतो.
13 Mar 2015 - 6:22 pm | पिलीयन रायडर
आणि जो जाहिररित्या सांगु शकत नाही त्यावर कुणी विश्वास ठेवत नसतो..
13 Mar 2015 - 6:39 pm | आयुर्हित
नका ठेवू, काही जबरदस्ती नाही आपल्यावर.
ह्या गोष्टी व्यनीतूनही होवू शकतात हे सांगूनही एवढी साधी गोष्ट आपल्याला कळत नाही?
(धागा इतरही वाचत असतात त्यांनाही कळली असेलच आता आपली ही गोष्ट)
13 Mar 2015 - 6:46 pm | बॅटमॅन
ठीके होमियोहित साहेब. तुमच्यासाटी कायपन. होमेपदीपन. (म्हसरान्ला चाल्नारी.)
13 Mar 2015 - 9:22 pm | रुस्तम
चौकशी विना सल्ला. तुम्ही सगळ्या गोष्टी चौकशी न करताच करता अस दिसतय.
13 Mar 2015 - 4:08 pm | रुस्तम
नो जाहिररित्या ओन्ली व्यनि प्लीज
13 Mar 2015 - 4:13 pm | कपिलमुनी
बीजीनेस शिक्रेट हाये त्ये !
तुमाले काहून सांगाचा
13 Mar 2015 - 4:22 pm | रुस्तम
टॉप शिक्रेट हाये त्ये ! शिक्रेट फॉर्मुला !!!
13 Mar 2015 - 2:14 pm | स्पंदना
अग मी त्यांना या आधीपण याच धाग्यावर विचारलं आहे "सबिंसा (sabinsa) किंवा (sami labs limited) या कंपनीच्या औषधांबद्दल आहे का म्हणुन" त्यांनी वाचलेले दिसत नाही.
13 Mar 2015 - 2:16 pm | पिलीयन रायडर
हो ना..
अणि मलाही वाटतय की ते तसंच काहीसं असावं.. आता बघु काय म्हणतात ते.
13 Mar 2015 - 10:35 pm | पिवळा डांबिस
ओह, पुरानी खांसी! मला वाटलं की हिंदीमध्ये हा काही वेगळाच खांसीचा प्रकार आहे की काय!
नेव्हर माईन्ड, टायपो आमचेही होतात अनेकदा, समजू शकतो.
स्पेशालिस्टांच्या रेट्सबद्दल विचारलं कारण काही नॉन्-अॅलोपाथी स्पेशालिस्टांचे रेट्सही भरभक्कम असतात. असोत बिचारे. आणि ह्या उपचारपद्धती दीर्घकालीन समजल्या गेलेल्या असल्यामुळे प्रत्येक वेळचे पैसे धरून दीर्घ कालात बरेच होतात असा अनुभव आहे.
आमच्या मते, अॅलोपाथी डॉक्टर मोंगलांसारखे एकदम धाड घालून लुटतात तर नॉन-अॅलोपाथी डॉक्टर्स इंग्रजांसारखं दीर्घकाळ शोषण करून लुटतात!! :)
अर्थातच मिपावरचे सगळे डॉक्टर, वैद्य, हकीम, मांत्रिक, जडीबुटीवाले, अॅक्युप्रेशर/पंक्चरवाले सोडून!!
आम्हाला दमा नसल्याने आम्हाला तिचा काही उपयोग नाही. पण श्री. केजरीवालांना कळवलंत तर ते कदाचित उपयोग करून घेतील...
13 Mar 2015 - 2:31 am | डँबिस००७
डोळे येण्यावर घातल्या जाणार्या औषधामुळे डोळे जाण्याची शक्यता असते, हे किती लोकांना माहीती असते ? डोळे येण्यावर दिले जाणार्या स्टूरॉईड ड्रॉप्सच्या जास्त वापरामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते असे प्र सिद्ध नेत्र तज्ञ काल टीव्हीवर सागत होते. पण असे सल्ले डॉक्टर तुम्हाला कधीच देत नाही !! का देत नाही ?
माहितीतल्या ह्र्दयरोग्याला औषधामुळे देन्ही किडन्या निकामी झालेल्या पाहील्या आहेत. डॉक्टरने त्या रुग्णाला ४-५ वर्षे असे औषध दिले जे सगळीकडे (अमेरीकेत आणि युरोप मध्ये) बॅन् आहे, त्या औषधामुळे ह्या रुग्णाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात. आता तो कोणाकडे तक्रार करणार ?
13 Mar 2015 - 12:48 pm | काळा पहाड
'स्वाइन फ्लू'च्या वाढत्या संसर्गाच्या प्रतिबंधात्मक लसीची मागणी वाढल्याचा गैरफायदा घेत एका कंपनीच्या लसीचा 'काळाबाजार' डॉक्टरांकडून काही दिवसांपासून सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका कंपनीची ७१४ रुपयांना मिळणारी लस डॉक्टरच खरेदी करून तिप्पट दराने थेट पेशंटना विकत असल्याची माहिती हाती आली आहे.
लसींची वाढती मागणी आणि 'स्वाइन फ्लू'चा वाढता उद्रेक याचा गैरफायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी डॉक्टरमंडळी पुढे सरसावली आहेत. त्यामुळे केमिस्टांकडे असलेली लस पेशंट डॉक्टरांकडे घेऊन गेल्यास त्यांना 'आमच्याकडूच लस विकत घ्यावी लागेल. केमिस्टांकडील लस चालणार नाही', असा दम डॉक्टर भरू लागले आहेत. त्यामुळे पेशंट थेट डॉक्टरकडून लस टोचून घेत असून, त्यासाठी त्यांना आठशे ते अडीच हजार रुपयांपर्यंतची रक्कम मोजावी लागत आहे. डॉक्टरांकडून लसींचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. हा काळाबाजार रोखण्याची पेशंटकडून मागणी होत आहे.
13 Mar 2015 - 8:35 pm | आजानुकर्ण
आयुर्हित,
माफ करा पण तुमचे प्रतिसाद वाचून मला साईनफेल्डमधील होलिस्टिक हीलरची आठवण येते.
www.youtube.com/watch?v=uH5IMv2jeuk
13 Mar 2015 - 11:01 pm | आयुर्हित
it is in the interest of medical industry that you always remain sick!
14 Mar 2015 - 12:29 am | काळा पहाड
पण सगळेच बिचार्यांच्या मागे लागले आहेत. इतकं पण एखाद्याला 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' करू नये.
14 Mar 2015 - 8:50 am | vikramaditya
सुद्धा ब-याच डॉक्टरांचा खास गुण आहे. एक डॉक्टर दुस-या डॉक्टरचे मत कधीच ग्राह्य धरत नाही. "Unless they are a part of the same chain"
सेकंड ओपीनीअन चा विषय काढतात डॉक्टर कपाळ्याला आठ्या घालतात. पेशंट मेला तरी चालेल पण मी म्हणेन तेच योग्य असा अॅट्यीटुड असणारे बरेच डॉक्टर बघितले. सेकंड ओपीनीअन घेणारच तर मी सांगतो त्याच डॉक्टर कडुन घ्या म्हणणारे पण आहेत.
दुसरीकडे गेलात तर मी जबाबदार नाही म्हणणा-या डॉक्टरला जेव्हा विचारले की " बरं आता शंभर टक्के जबाबदारी घेता का? मग रुग्णाला इथेच उपचार करवतो" तर बोलती बंद.
बाकी विषय फार मोठा आहे. बरेच प्रतिसाद ह्यावर प्रकाश टाकतात.
14 Mar 2015 - 9:31 am | प्रकाश घाटपांडे
हेल्थ केअर इंडस्ट्रीत मानवी अवयव मूल्यवान आहेत. मग एखाद्याला वाटल की बास झाल जगण आपण आपले शरीर वैद्यकीय क्शेत्राला डिसमेंटल करुन द्याव. त्याची किंमत आपल्या कुटुंबियांना द्यावी. थोडकयात म्हणजे मानवी अवयवाचा व्यापार वैध असू द्यावा. शरीर माझ आहे त्याच काय करायच हे मला ठरवू द्यात. मरण येत नाही म्हणुन जगताहेत असे कित्येक लोक असतात. तसा शरीर विक्रय करायच्या ऐवजी असा शरीर विक्रय करु. अनेक गरीब कुटुंबात आर्थिक हातभार मिळेल. पुर्वी रक्त देउन पैसे मिळण्याची सोय होती. दान द्यायच्या ऐवजी विकत देउ! काय बिघडल.
असा विचारप्रवाह भविश्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
14 Mar 2015 - 10:32 am | हेमन्त वाघे
तसेच मला वाटते कि सरकारने बर्याच लोकांना मृत्यू दंड द्यावा. अति भ्रष्टाचारी . बलात्कारी आणि child molestar ला आणि अजून काही गुन्हेगारांना जगण्याचा काहीही हक्क नाही. तरी कडक कायदे करूनं वर्षाला १५-२० हजार लोकांना मृत्यू दंड देवून त्यातील ८० % लोकांचे अवयव विकता येतील. जर जास्ती झाले तर विदेशी लोकांना चढ्या भावात विकून नफा कमावता येईल .
मी हे मी गंभीर पणे लिहित आहे.
14 Mar 2015 - 11:06 am | सुबोध खरे
मानवी अवयवाचा व्यापार हि आपल्याला वाटते तितकी सोपी गोष्ट नाही.
गर्दच्या आहारी गेलेली तरुण मुले पैश्याच्या लोभाने आपली मूत्रपिंडे विकण्यासाठी आलेली मी पाहिलेली आहेत. एकदा त्यांनी मूत्रपिंड विकले आणि ते आपल्या नातेवाईकाला बसवले कि लोक त्या गर्द पीडीत तरुणाला( रुग्णालयातून डिसचार्ज देववून) अक्षरशः रस्त्यावर सोडत असत. आणि असे तरुण त्या शल्यक्रियेतून पूर्ण बाहेर यायच्या अगोदरच शरीराने आणि पैश्याने लुबाडले जाऊन बेवारशी रस्त्यावर मृत्युमुखी पडलेले पाहिलेले आहेत.(याचा मी नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे) एखाद्याला धमकी देऊन त्याचे अवयव विकत घेणे किती सोपे होईल हे पहा. आज जर कोणी अगदी जवळचा नातेवाईक असेल तरच हे अवयव रोपण करता येते. हा कायदा सैल केला तर काय होइल ते पहा.
प्रतिसाद देणे एकदम सोपे आहे
14 Mar 2015 - 1:12 pm | प्रकाश घाटपांडे
मला व्यक्तिशः प्रतिसाद देणे देखील सोपे वाटत नाही.पण मी भविश्यात विचारश्रेणी अशी असू शकते असे शेवटी लिहिले आहे.
15 Mar 2015 - 12:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
आज एक व्हॉट्सअॅप संदेश वाचनात आला. त्यातले काही प्रश्न रोचक (आणि खोचक) वाटले म्हणून त्याची नक्कल खाली देत आहे. विशेषतः शेवटचा पॅराग्राफ आपल्या समाजातले एक महत्वाचे सत्य सांगून जातो...
India's Doctors,
When was the last time,
you heard,
there is a national emergency of pending cases in Indian courts so judges and lawyers must work 16 hr a day till all cases are cleared.
When was the last time, you heard,
There are so many vacancies in officer cadres of Indian Army that national security is at risk,
so all management graduates from IIMs must join army for 5 years
When was the last time,
you heard,
there is a crisis in education system as we have very few teachers going to village schools,
so all engineering grads must dedicate 3 years of their life after graduation for this cause
When was the last time,
you heard,
so many children, adults and old people are suffering from mental agony and remain untreated,
so all bollywood actors, musicians, artists must do a 3 month crash course in art therapy and serve this population for 3 years and not pursue any commercial activity at all
When was the last time,
you heard,
millions of people in India are dying due to lack of medical investigations and medications
so all manufacturers of medical equipment and pharma companies must set up factories at their own cost and supply entire output for almost free to rural areas
When was the last time,
you heard,
A politician was jailed and served a lifetime bar from any elections because a clerk did not fill a form properly that was mandatory by law
When was the last time,
you asked,
Why software companies pay residential rate property tax and doctors clinics are treated and taxed as "Commercial establishments"?
When was the last time anybody gave a F*** to what is happening to medical services in India?
Then why majority hardworking medical professionals are maligned and treated like criminals because of a small percent of crooks, lame regulators and apathetic short sighted governments get a free run of the country?
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
16 Mar 2015 - 1:33 pm | स्वधर्म
त्यांना कोणी झोडपत नाही, मग डाॅक्टरांनाच का झोडपायचं, हा तुमचा प्रश्न बरोबर अाहे. ही चर्चा एकूणच वैद्यकीय सेवा, त्यातले अनेक घटक इत्यादीवर घसरत चालल्यामुळे मी वर पुन्हा एकदा मूळ प्रश्न / विचार मांडण्याचा प्रयत्न केला अाहे, तो असा:
>> एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो. समजा एखाद्याकडे काही रेअर स्कील अाहे, तरी अापल्या अाजूबाजूला रहाणार्या, बसने लटकत रोज दहा तास काम करणार्यापेक्षा किती जास्त पैसे मिळावेत?
अाता इथे कोणीतरी उदाहरण दिले अाहे, त्याप्रमाणे डाॅक्टरएेवजी सर्वोच्व न्यायालयातल्या वकीलांबाबतही हा प्रश्न विचारता येईलच. हा विषय केवऴ मागणी - पुरवठा यावर सोडून देता येईल काय?
- स्वधर्म
16 Mar 2015 - 2:05 pm | असंका
हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे?
कधी 'अॅटलास श्रग्ड' नावाची 'अॅन रँड' या लेखिकेची कादंबरी वाचली आहे का? माझ्या मते नसावी...ती वाचल्यास काही मुलभुत प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील.
16 Mar 2015 - 3:26 pm | काळा पहाड
अर्थातच जो कष्ट घेतो त्याच्याकडेच. धंदा असल्यामुळे डॉक्टरांनी एका ऑपरेशन चे एक लाख किंवा दहा लाख रुपये, डॉलर किंवा पौंड घेण्यात काहीच प्रत्यवाय नाही. पण मग सगळंच मार्केट फोर्सेस च्या रूलप्रमाणं व्हावं. स्वाईन फ्लूची लस त्यांच्याकडूनच (तिप्पट किंमतीत) घेण्याची जबरदस्ती डॉक्टरांनी का करावी? आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत.
१. मेडिकल शिक्षणासाठी स्वस्तात (एडेड/सरकारी) फी वगैरे असते असा माझा समज आहे. त्याला मेरिट ने प्रवेश दिला जातो. जे प्रायव्हेट प्रॅक्टिस करणार असतील त्यांच्यासाठी ती बंद करून सगळीकडेच एन-एडेड फी लागू करावी.
२. जे सवलतीच्या फीत शिकतील त्यांना कायमची गव्हर्नमेंट सर्व्हिस मँडॅटरी करावी. त्यांना खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही असा कायदा करावा.
३. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट इस्पितळे सुरू करावीत.
16 Mar 2015 - 4:10 pm | मोदक
आमच्याकडूनच औषधं घेतली पाहिजेत असं सांगणार्या हॉस्पिटल्स वर कायदेशीर खटले दाखल करावेत.
खटले कोणी दाखल करावेत?
16 Mar 2015 - 4:17 pm | काळा पहाड
आरोग्य विभागानं. शेवटी कायदे समाजासाठीच असतात. आणि समाजाचा प्रतिनिधी सरकार असतं. म्हणून आरोग्य विभागानं. जसं स्त्री भ्रूणहत्ये विरोधी तक्रार करता येते तशीच ही किंवा तत्सम तक्रार स्वीकारली जावी. आणि संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणे किंवा अतिप्रचंड पेनल्टी लावता येईल.
16 Mar 2015 - 4:26 pm | मोदक
म्हण्जे आरोग्य विभागाला तक्रारी देण्याचे काम सामान्य नागरिकच करणार - बरोबर..?
का येथेही आरोग्य विभागाने गैरप्रकारांचा "तपास करून, उघडकीस आणून" मग खटले दाखल करावेत..?
16 Mar 2015 - 4:33 pm | काळा पहाड
हो तसंच. जसं अॅन्टी करप्शन ब्यूरो ची साईट आहे तशी आरोग्य विभागाची साईट अशा तक्रारी स्वीकारू शकते ना?
16 Mar 2015 - 4:55 pm | मोदक
नागरिकांनी आवाज उठवण्याची आवश्यकता असेल तर नवीन सेटअप* करण्याची काय गरज आहे? सध्याच्या यंत्रणेमध्ये डॉक्टर / हॉस्पीटलच्या मनमानीविरूद्ध दाद मागण्याची सोय असेलच की.
*आरोग्य विभागाने तक्रारींची दखल घेवून खटले दाखल करण्याची - थोडक्यात एक "मध्यस्थ" होण्याची
16 Mar 2015 - 5:01 pm | काळा पहाड
सध्याची यंत्रणा कोणती? सगळे डॉक्टर आरोग्य विभागाअंतर्गत तर येतात. मी या प्रकारचा कायदा असण्याबद्दल बोलत होतो. आहे की नाही मला माहित नाही, नसला तर केला पाहिजे. कारण असा कायदा नसेल तर आरोग्य विभाग कारवाईच करू शकणार नाही.
ता.क. अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात.
16 Mar 2015 - 5:24 pm | मोदक
सध्याची यंत्रणा कोणती?
न्यायदान यंत्रणा. यामध्ये आपण सामान्य नागरिक खटले दाखल करू शकतो.
असे खटले दाखल केल्यानंतर त्याचा निकाल कधी लागणार किंवा तुमच्या हयातीत तरी लागेल का.. याची खात्री कोणीही देवू शकत नही. त्यामुळे हा मुद्दा बाद. (हा मुद्दा तुमच्या दृष्टीने बाद नसेल तरी हरकत नाही)
अशाच प्रकारचा कायदा शाळांनाही लागू करायला हवा. इथूनच कपडे घ्या, इथूनच बूट घ्या असे यांचे नियम असतात.
समजा पुण्यामध्ये काही लाख मुले शाळेत जातात. त्यातल्या ५०% शाळा असे नियम करतात. मग अशा हजारो मुलांपैकी सर्वांचे पालक अशा मुजोर आणि अन्यायकारक नियमांना बळी का पडतात..?
कारण.. या असल्या शाळा आणि ही हॉस्पीटल्स या गोष्टी "Perquisites" आहेत. सक्ती नाही.
(शाळा / उपचार हे मुलभूत हक्क आहेत आणि सरकारने याची तरतुद केलेली आहे)
पांचगणीच्या शाळेपासून ते गल्लीतल्या नगरसेवकाने टाकलेल्या इंग्लीश मिडीयम दुकानापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तेही नको असतील तर सरकारने ZP शाळा उघडलेल्या आहेतच - कोठे जायचे हा सर्वस्वी तुमचा निर्णय असताना त्यामध्येही एखादा नियम असावा, रेग्युलेशन असावे या मागण्यांना सरकारदरबारी काडीचीही किंमत मिळणार नाही.
तुम्हाला मुलांना डेहराडूनला पाठवायचे आहे परंतु ती सेवा जिल्हा परिषद शाळेच्या फी मध्ये मिळावी ही अपेक्षा रास्त नाही.
आपण असे समजू की चरक शुश्रुतांच्या काळापासून डॉक्टर लोक दुनीयेला असेच लुबाडून पैसे कमावत आलेले आहेत. साधा उपाय आहे. "त्यांचे उपचार घेवू नका"
समजा डॉक्टर लोकांनी बळजबरी केली तर सांगा "मला तुमच्याकडून उपचार नकोत"
शक्य आहे?
16 Mar 2015 - 3:36 pm | स्वधर्म
हे ठरवायचा अधिकार कुणाकडे असावा? जो कष्ट घेतो त्याच्याकडे, की जो कष्ट घेतो तो सोडून इतर सर्वांकडे?
>> जो हे कष्ट करतो, तो जर या समाजातच रहात असेल, समाजावरच अवलंबून असेल, समाजातूनच पैसे मिळवत असेल, अन समाजातच खर्च करत असेल, तर हे मूल्य ठरविताना निदान समाजातील इतर घटक किती व कसे मिळवत अाहेत, हे तरी पहावे. त्या तुलनेत अापण किती शुल्क अाकारतो, त्याचा विचार सुजाण घटकांनी तरी करायला नको काय? फक्त अापल्याला असणार्या वेळापेक्षा, गरजू/ मागणी अाधिक अाहे, म्हणून केवळ प्रचंड ( सर्वसाधारण घटकाच्या मिळकतीच्या १००/२०० पट) फी अाकारणे हे कितपत बरोबर अाहे?
>> 'अॅटलास श्रग्ड' नावाची 'अॅन रँड' या लेखिकेची कादंबरी
वाचली होती, बर्याच वर्षांपूर्वी, खूप अावडली होती. नंतर त्या विचारातला एकांगीपणा जाणवला व पटला नाही. शेवटी लेखिकाही असायलममध्ये मृत्यू पावली, असे माहिती अाहे.
16 Mar 2015 - 3:43 pm | काळा पहाड
एम आर पी च्या पेक्षा जास्त किंमत घेणे हे काळाबाजार या सदराखाली येते हे आपल्याला माहीत आहे. असाच प्रकार सर्व्हिसेस च्या बाबतीत (उदा: रिक्षावाल्याने बंदच्या दिवशी ५० रुपया ऐवजी ५०० रुपयाची मागणी करणे) आहे का?
16 Mar 2015 - 4:12 pm | असंका
नाही. हा विषय दुसर्याने सांगायचा नाहीच. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. आपण जेव्हा अशा पद्धतीने मखलाशी करायचा प्रयत्न करतो तेव्हा स्वत:ला पण असल्या हल्ल्याला तोंड द्यावे लागेल हे विसरतो. आपण जरी बसने लटकत जात असलो तरी इतर बैलगाडीतनं जात असतील; अगदी चालत जाणारंही कुणीतरी असतंच. मग आपणही चालत जायचं असं वाटायला पाहिजे का? कुणा कुणाकडे तर कामच नसतं. मग आपणही असलेलं काम न करता बसायचं का? इतरांकडे बघून अशा गोष्टी ठरवायच्या का?
समाजातील इतर घटकांनी किती मानधन घ्यावे, किती क्षमता मिळवावी, किती कष्ट घ्यावे हे आपणच ठरवायचा अट्टाहास कशाला? एखादा व्यकती अगदी अव्वाच्या सव्वा मानधन घेत असेल, तर जाऊ नका त्याच्याकडे. दुसर्याकडे जा.
ज्याची जी क्षमता आहे, तेवढे तो पैसे मिळवतो. दुसर्याला मिळणार्या अधिकच्या पैशाकडे बघू सुद्धा नका.
फारच मुद्देसूद. म्हणजे ती जेव्हा एखाद्या वस्तूला "फावडं" म्हणाली असेल, तेव्हा ते नक्कीच फावडं सोडून दुसरं काहीतरी असणार! मान्य!
16 Mar 2015 - 4:43 pm | काळा पहाड
मग डॉक्टरकी सारखं पवित्र कार्यच कशाला स्वीकारायला हवं असं करायचं तर? बाकी ठिकाणीसुद्धा पैसे मिळवता येतात. जे कार्य एखाद्याच्या जीवाशी निगडीत आहे त्यात नफेखोरी करू नये असं वाटतं. बाकीची कुठलीच कामं अशी जीवाशी निगडीत नाहीत. आणि समजा नफेखोरी करायचीच असेल (आणि मरणार्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खायचंच असेल) तर डॉक्टरांना समाजाच्या संरक्षण परिघाबाहेर ठेवावं. डॉक्टरांना ठेवू देत प्रायव्हेट सिक्यूरिटी गार्ड. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिस दलाला प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. चालेल का?
16 Mar 2015 - 5:37 pm | असंका
बरोबर. जरा इतर कार्य जी अपवित्र किंवा कमी पवित्र आहेत त्यांची नावं सांगा ना प्लीज.
16 Mar 2015 - 6:01 pm | काळा पहाड
ज्यात जनतेचे हित महत्वाचे असते ती पवित्र सदरात येतात. उदाहरणार्थ, वैद्यकीय, ज्ञानदान, मंत्रीपरिषद, राज्यपाल, न्यायाधीश इत्यादी. सर्वसाधारण पणे अशा कार्यात शपथ घेतली जाते. बाकीची सगळी कामं म्हणजे खानावळ टाकणे, बैलगाडी चालवणे, व्यापार करणे, दलाली करणे, करविषयक सल्ले देणे :) इत्यादी कामं पवित्र सदरात येत नाहीत. या गोष्टींचा संदर्भ व्यक्तीगत फायद्याशी असतो. आणि तुमचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही सरकारला कर देता. तुमचा टोमणा मला खरं तर कळाला नाही.
16 Mar 2015 - 6:08 pm | मोदक
ज्यात जनतेचे हित महत्वाचे असते ती पवित्र सदरात येतात.
मग येथेही डॉक्टरांचे सरसकटीकरण करता येणार नाही. हृदयरोगतज्ञ आणि मेंदूचे विकार वाले डॉक्टर सोडले तर बाकी सर्वप्रकारच्या आजारांना "स्पेशल उपचार" केले नाही तरी माणूस जिवंत राहू शकतो.
उदा - पायाला दुखापत झाली आणि त्याचे पर्यावसन पाय कापण्यात झाले तरी काय फरक पडतो? शेकडो हजारो लोक हातापायांशिवाय जगत आहेतच की.
16 Mar 2015 - 6:33 pm | काळा पहाड
तुम्ही डॉक्टर आहात का?
की वकील?
दुसरा प्रश्न हा अपमानास्पद रित्या विचारला गेला आहे याची कृपया नोंद घ्यावी. :)
गंभीर दृष्ट्या विचार करता शेकडो हजारो लोक आहेत हा खरा प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आपण या अफाट संख्येनं संवेदनाहीन होतो आहोत?
जगात इतके बलात्कार होतात तर एका निर्भयाचा झाला तर काय फरक पडतो?
जगात इतके मृत्यू होतात तर एकाचा अपघात झाला तर काय फरक पडतो?
जगात इतक्या लोकांना वैद्यकीय उपचार मिळतच नाहीत आणखी काही जणांना नाही मिळाले तर काय फरक पडतो?
काही जणांना वेदना होतात तर काय फरक पडतो?
आपण "स्पेशल" गोष्टीबद्दल बोलतच नाही आहोत. आपण फक्त जिवंत ठेवण्याबद्दल बोलत नाही आहोत. आपण एका अशा गोष्टी बद्दल बोलतोय की ज्यामुळे दोन डॉक्टर्स हे देवांत गणले गेले (http://en.wikipedia.org/wiki/Ashvins). आपण एका अशा परंपरेबद्दल बोलतोय जिथे एका डॉक्टरने दुसर्यांसाठी आपले प्राण अर्पण केले (http://en.wikipedia.org/wiki/Dwarkanath_Kotnis). जिथे एका डॉक्टरने दुसर्यांसाठी आपलं आयुष्य अर्पण केलं (http://en.wikipedia.org/wiki/Prakash_Amte).
इतर डॉक्टरांना ते कदाचित शक्य नसेल पण त्यामुळे आदर्श गोष्टी कशा बदलतील? युग बदललं म्हणून काळ्या प्रॅक्टीसेस ना राजमान्यता मिळाली असं कधी होतं का? भ्रष्टाचाराचं आणि नफेखोरीचं इतरांनी समर्थन करणं आणि एका शिक्षकानं समर्थन करणं यात फरक असायला नको का? माझा व्यवसाय हा 'धंदा' आहे असं म्हणणारा वैद्य, सैनिक, मंत्री आणि गुरू हा तिरस्करणीयच हवा, कारण त्याला तो करायला कोणी भाग पाडलं नव्हतं.
बाकी वकीली आर्ग्युमेंट मध्ये जिंकालही कदाचित तुम्ही.
16 Mar 2015 - 6:52 pm | मोदक
मी डॉक्टर नाही. वकीलही नाही.
(हे उत्तर प्रांजळपणे दिले आहे, अपमानास्पद पद्धतीने बोललो तर तुमच्यात आणि माझ्यात काय फरक राहणार? किमान तो असावा म्हणून तुमच्या पायरीला खाली उतरत नाहीये असे समजा) :)
बाकी वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोठे झालात की परत धागा वर काढा. आपण बोलू मग.
**********************
आजचा सवाल - अकारण आक्रस्ताळेपणा करणे हे मुद्दे संपल्याचे लक्षण समजावे काय?
**********************
16 Mar 2015 - 7:02 pm | काळा पहाड
मोदकसाहेब, हलके घ्या असं सांगायला विसरलो. तुमच्या माझ्यात फरक आहे हे आधी कळालं असतं तर तुम्हाला उत्तर देण्याची 'हिमाकत' झाली नसती. तस्मात, क्षमस्व. विनोद करायचा एक (बहुधा अयशस्वी) प्रयत्न केला होता. असो. तुम्ही माझी पायरी दाखवून दिलीत हे बरं झालं.
बाकी वाढदिवसाची भानगड कळाली नाही. तरी पण असोच.
16 Mar 2015 - 7:04 pm | मोदक
अर्रर्र - मी पण नेमके तेच टंकायला विसरलो.
असो. :)
16 Mar 2015 - 6:54 pm | असंका
न्यायाधीश पवित्र!! (काही शंका नाही. मान्य आहे ही गोष्ट.) पण "वकिल" म्हणलं की अपमान होतो!! वा!!
16 Mar 2015 - 6:10 pm | असंका
आणि खाजगी गुप्तहेर वगैरे? ;-)
16 Mar 2015 - 6:31 pm | असंका
खरं म्हणजे आपल्या वरच्या प्रतिसादातला शब्द अन शब्द एखाद्या हिर्या मोत्यापेक्षा कमी नाहिये. पण हे खालचं वाक्य मला फारच कोडयात टाकतंय..जरा कृपा कराल का विस्तार करण्याची-
याशिवाय जी पवित्र कार्ये वर आपण वर्णिली आहेत त्यात करासंबंधी नक्की काय तरतुदी आहेत तेही सांगणेचे करावे...म्हणजे त्यात फायदा करून घेण्यासाठी ते सरकारला कर वगैरे काही देत नाहीत असं म्हणायचंय ते तर उघडच आहे. पण हे साध्य कसं केलं जात असेल?
16 Mar 2015 - 6:36 pm | काळा पहाड
अकौंटंट साहेब, तुम्ही जिंकलात. आय विथड्रॉ. अभिनंदन.
16 Mar 2015 - 6:42 pm | असंका
काय म्हंजे कायच कळ्ळं नाय... दुर्दैव माझं.
16 Mar 2015 - 6:54 pm | मोदक
काय नाय वो..
१०० पैकी २० मार्क पडूनसुद्धा डिस्टिंक्शन हवी होती. :))
16 Mar 2015 - 6:56 pm | असंका
हां बहुतेक..पण मी आशेला आलो होतो! आज काय तरी नवीन कळणार!!
;-)
16 Mar 2015 - 10:59 pm | स्वधर्म
याचीच दुसरी बाजू अशी, की अापल्या अाजूबाजूचे कसे जगतायत की मरतायत, अर्धपोटी, रस्त्यावर राहतायत का, याकडे बघू सुध्दा नका. फक्त अापल्याला ‘जास्तीत जास्त’ मोबदला मिळतोय ना, मग बाकी अापल्या अाजूबाजूला काही का परिस्थिती असेना! तुंम्हाला हा विचार खरंच पटतो?
बाकी तुमच्या फावड्याने कंन्फ्यूज केले अाहे.
17 Mar 2015 - 10:22 am | असंका
हो. फक्त थोडा बदल करून, कारण आपले काय मत आहे माहित नाही, पण जगात मिळणार्या वस्तु एवढ्या जास्त नाहीत. त्या मिळवाव्या लागतात. त्यामुळे माझे मत असे-
फक्त अापण ‘जास्तीत जास्त’ मोबदला "मिळवतोय" ना, मग बाकी अापल्या अाजूबाजूला काही का परिस्थिती असेना!
आपल्या आजुबाजुची परीस्थिती म्हणजे काय हे आपल्याला कळत आहे असं आपल्या कुठल्याच प्रतिसादावरनं मला दिसत नाही. तेव्हा हे परीस्थितीचे दाखले देणं बंद करा किंवा अगदी विस्तृतपणे काय परीस्थिती आहे ते इथे सांगा.
(बिनकामाचे उसासे टाकणं तुम्ही मी सांगून तर काही बंद करणार नाही. त्यापेक्षा जे काम करतायत (- हो, जास्तीत जास्त मोबदला घेऊन) त्यांना असंवेदनशील, माणुसकीहीन ठरवणं जास्त सोपंय. चालू द्या.)
मग वेगळ्या शब्दात सांगतो. "बालादपि सुभाषितं ग्राह्यम". एखादी गोष्ट जर योग्य असेल, तर ती कुणी सांगितली याने काय फरक पडतो? रामाने तर रावणाकडनं ही सल्ला घेतला होता म्हणतात. मग अॅन रँड ही असायलम मध्ये गेली, तिने आत्महत्या केली, याचा तिने त्याच्या आधी जे लिहिलं आहे त्याच्याशी काय संबंध आहे? त्या एका घटनेमुळे तिने जे जे लिहिले ते सगळे चुक असं कसं म्हणता येइल? आपण त्याचा संदर्भ देणं ही मुळात एक असंबद्ध गोष्ट आहे, असं मला वाटतं.
16 Mar 2015 - 7:24 pm | सुबोध खरे
एका माणसाच्या कामाची किंमत दुसर्या माणसाच्या कामाच्या १००/२०० पट असू शकते? भले मग तो कितीही कुशल असो.
आपली चप्पल तुटली तर चर्मकार त्याला टाका घालून देतो त्याला आपण १० रुपये देता. आपल्या पत्नीचे मंगळसूत्र वाढवले(तुटले) तर सोनार १० रुपयात काम करतो का? कि ५००/- रुपये घेतो. मग त्याच्या विरुद्ध काय कार्यवाही करता ? यात चपलेची किंमत ती काय आणि सोन्याच्या दागिन्याची किंमत काय? असा प्रश्न विचारला जातो.##
मोटारसायकल चे सर्व्हिसिंग केले तर खर्च रुपये २५० येतो. सध्या कारचे केले तर २५००/- येतो. सफारी सारख्या गाडीचे १२०००/- येतो आणि मर्सिडिस एस क्लासचे सर्व्हीसिंग एक लाख रुपये आहे. काम एकच पण त्यावर लागणारी मजुरी मोटार सायकल ला १०० रुपये आहे सफारीला २०००/- आहे मर्सिडिस ला रुपये २०,०००/- आहे. असे का? बदललेल्या सुट्या भागाचे पैसे प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. ( मर्सिडीझच्या डावीकडच्या आरशाची किमत फक्त सव्वालाख रुपये होती २००४ मध्ये)
धुलाई यन्त्राचा/ फ्रीज चा किंवा संगणकाचा घरी येणारा तंत्रज्ञ नुसते घरी येण्याचे ३५० रुपये घेतो. तितके पैसे आपल्या फ्यामिली डॉक्टरची व्हिजीट फी म्हणून देण्याची किती लोकांची तयारी आहे? यात दोन्ही लोकांच्या कौशल्याची पातळी एकाच आहे हे आपण गृहीत धरलेले आहे.
## याच न्यायाने आपल्या धुलाई यंत्राची/ फ्रीजची/ संगणकाची किंमत किती आणि आपल्या आयुष्याची किंमत किती?
असो. डॉक्टर लुटालूट करतातच मग त्यांना कशाला फी द्यायची?
कावीळ झाली कि सगळे जग पिवळे दिसते असे आमचे "हे" म्हणतात असे त्या "ह्या" म्हणत होत्या.
16 Mar 2015 - 11:53 pm | स्वधर्म
डाॅ. साहेब, चर्चा वळणावर अाणल्याबद्दल अाभारी अाहे. निदान अापण इतर गोष्टींशी तुलना करून काहीतरी बेसिस दाखवण्याचा प्रयत्न केला अाहे. मनापासून धन्यवाद.
पण इथे एक गोंधळ होतोय. माझाच बरं का. यात मर्सिडीस हा प्रकार अापण सोडून देऊ, कारण त्यांचे प्रायसिंग हेच मुळी वेगळ्या बेसिसवर अाहे. ती गाडी म्हणे सामान्य कुणालाही घेताच येत नाही. अाणि काही (‘नतद्रष्ट’ ?) असेही म्हणतात, की ती म्हणे अालेला खर्च अाधिक योग्य नफा या किमतीला विकली, तर कोणी घेणारच नाही. तिच्या किमतीत समाजातल्या ‘फालतू’ लोकांनी ती घेऊच न शकणे, याचे मूल्य समाविषट अाहे. म्हणून तिची गोष्टच न्यारी. अापण सोडून देऊ. पण इतर उदाहरणे घेता येतील. यातला माझा गोंधळ असा:
- अापण एकूण वैद्यकीय खर्चाविषयी बोलत नाही अाहोत. इथे बरीच चर्चा त्यावर झडलीय, पण तो मूळ मुद्दा नव्हता. शहरात वैद्यकीय खर्च चौपट वगैरे असणार हे मान्यच. शहरातले जागेचे भाव, कर्मचार्यांचे पगार हेही दुप्पट चौपट असतात. पण अापला मुद्दा फी विषयी अाहे. दुचाकीचा मेकॅनिक व सफारी कारचा मेकॅनिक यांच्या पगारात किती फरक असेल? मला वाटते जास्तीत जास्त पाच ते दहा पटीचा असू शकेल. अगदी खेड्यातला मेकॅनिक समजा महिना पाच हजार मिळबत असेल, तर मुंबईतला सफारीचा मेकॅनिक पन्नास हजार मिळवत असेलही. हा फरक १००/ २०० पटीचा नाहीए. महाकुशल डाॅ साध्या फॅमिली डाॅ.च्या फीच्याही कित्येक पट फी चार्ज करत अाहेत.
हे कुणाला म्हणत अाहात माहीत नाही, पण, असं म्हणायची खरंच गरज होती का?
17 Mar 2015 - 10:16 am | सुबोध खरे
@स्वधर्म
साहेब आपण चर्मकाराच्या आणि सुवर्णकाराच्या मोबदल्याची तुलना सोयीस्करपणे विसरला आहात.
मोटार सायकल आणि मोटार गाडीची देखरेख करणाऱ्या "व्यवसाय"करणाऱ्या तंत्रज्ञाची तुलना विसरलात आणि तुलना फक्त नोकरी करणाऱ्या तंत्रज्ञांची करता आहात. नोकरीत कधीच इतके पट पैसे मिळत नाहीत किबहुना बहुसंख्य कौशल्य असणारे लोक नोकरी न करत व्यवसाय करतात याचे हेच कारण आहे.
माझे स्वतःचे उदाहरण देत आहे. मी लष्करातून निवृत्त होताना २००६ साली माझा पगार रु ४५,०००/- होता आणि माझा क्ष किरण तंत्रज्ञ बारावी + एक वर्ष प्रशिक्षण याचा पगार १५ हजार रुपये होता. माझी नोकरी २३ व्या वर्षी सुरु झाली आणि तो पगार १८ व्या वर्षपासून मिळवू लागला. त्याचा अनुभव ४ वर्षे होता आणि माझा १८ वर्षे होता.
आता अशी आपल्याला सोयीस्कर तुलना करून आपल्याला सोयीस्कर अर्थ आपण काढत आहात याला पूर्वग्रह दुषित मत नाही तर काय म्हणायचे?
रेअल स्किल ची महाप्रचंड फी -- मी एक उदाहरण देत आहे. मागच्या आठवड्यात माझ्याकडे एक गरोदर स्त्री आली होती. तिची सोनोग्राफी करताना मला असे लक्षात आले कि तिच्या बाळाला ARNOLD CHIARI SYNDROME हा जन्मजात आजार आहे यात मूल कमरेपासून खाली लुळे असते आणी मेंदूत पाणी झाल्यामुळे मुलाचा बुद्ध्यांक पण कमी होतो ( मतीमंदता) जवळ जवळ पाऊण तास मी त्या मुलाची तपासणी करीत होतो. आणी एकदा पूर्ण खात्री झाल्यावर मी त्यांना सांगितले कि तुम्ही गर्भपात केला तर बरे होईल कारण असे मुल आयुष्यभर वाढवणे हा तुमच्यावर, त्या मुलावर आणी तुमच्या नंतर त्याच्या भावंडावर अन्याय आहे. तुम्ही एक सेकंड ओपिनियन घ्या. कारण माझ्यासाठी तुम्ही एक रुग्ण आहात पण तुमच्या साथी ते स्वतःचे मूल आहे. आणी तसे (सेकंड ओपिनियन) घेण्यासाठी मी लिहूनही दिले.
या कौशल्यासाठी मी त्यांच्या कडून १५००/- (रुपये पंधराशे फक्त) घेतले तर ते महाप्रचंड होते का? मग मी चर्मकाराच्या १०० पट पैसे घेतले तेही चुकीचेच आहे का ? (किंवा सुवर्णकाराच्या दुप्पट पैसे घेतले)
तुमच्या म्हणण्याप्रमाणे सिटी बसच्या ड्रायव्हरचे सुद्धा कौशल्य तितकेच आहे मग त्याच्या कौशल्याला इतके पैसे कमी का?
आणखी काय लिहावे?
17 Mar 2015 - 10:39 am | प्रसाद१९७१
डॉक्टर साहेब - तुम्ही प्रतिवाद करायचे कष्ट घेऊ नका. तुम्हाला जस्टीफाय करायची काही गरज नाही.
लोकांना दारू, गाड्या, फ्लॅट, फर्निचर, इंटीरीअर ह्यांच्यावर पैसे खर्च करायला पैसे आहेत, पण डॉक्टरची फी द्यायला नाहीत.
माझ्या मते डॉक्टर च्या ज्ञान आणी कौशल्या पेक्षा डॉक्टर्स कमीच फी घेत आहेत.
17 Mar 2015 - 12:04 pm | अत्रन्गि पाउस
इतक्या महत्वाच्या सल्ल्यासाठी १५०० रुपये योग्यच आहेत ...आणि तो सल्ला अत्यंत स्पष्टपणे दिल्याचा फार मोठा दिलासा आहे ... दुर्दैवाने असे अनुभव जर यायचेच असतील तर ते अशा पद्धतीने आलेले त्यातल्यात्यात चांगले ...
कुठल्याही विषयातल्या तज्ञाने आपले मत हे (जरूर पडल्यास शक्याशक्यतेचा उल्लेख करून) निस्संग्न्निध आणि ठासून दिलेले असावे ... ( आज उत्तर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाउस होण्याची शक्यता आहे टाईप घुमवले जाणे नको)
असो ...
17 Mar 2015 - 12:12 pm | असंका
काय करताय डॉक्टरसाहेब? कुणाकडून किती अपेक्षा ठेवताय? जरा मऊ लागलं तर कोपरापासून खणून बघतात लोक. त्यांना काय विचारताय जास्त झाले का कमी? या विषयावर भाष्य करायची आपली जागा नाही ही जाणीव पण नाही इथे कुणाला. समजा ते म्हणाले फारच जास्त घेतलेत मग?
17 Mar 2015 - 4:39 pm | स्वधर्म
अापण जी केस सांगितली, त्यात अापण दिलेली सेवा, सल्ला हा पैशाने मोजता येणारा नाही. तुंम्ही केलेले निदान, दिलेला सल्लाही हार्ट सर्जरी इतकाच जीवन-मरणाचा सवाल अाहे. अापण लावलेली फी रिझनेबल अाहे, हे दिसतेच अाहे. त्यात सगळा सेट-अप, कर्मचार्यांचा पगार, इतर ओहरहेड्सही अाले, असे गृहित धरतो. साधा हिशोब करता अापल्या तुलनेतही हार्ट सर्जनचे चार्जेस सहा - सात पट अाहेतच. मला एक सामान्य माणूस म्हणून तुमचे कौशल्य, ज्ञान, जबाबदारी हार्ट सर्जनहून तितक्या पटीत कमी वाटत नाही. तुंम्हाला ते तसे वाटते का? तुंम्हाला काय वाटते हे फार महत्तवाचे अाहे, कारण अांम्ही अशी कौशल्यांची तुलना करूच शकत नाही. अाणि म्हणूनच धागा काढला होता. माफ करा, तुंम्ही व्यक्तीगत संदर्भ दिल्याने, हा प्रश्न व्यक्तीगत झाला अाहे.
मी चर्मकार - सुवर्णकार तसेच सर्वांना समान मोबदला असे कधीच म्हणालो नव्हतो, तो फरक जरूर असावा असेच मत होते. फक्त त्यात एवढी प्रचंड डिसपॅरिटी का दिसते, ती कितपत बरोबर अाहे, याविषयी इतरांना काय काय वाटते हे जाणून घेण्यात रस होता.
पुन्हा एकदा धन्यवाद.
25 Mar 2015 - 1:44 pm | स्वधर्म
तीन चार दिवसांनी धाग्यावर अालो तर पुन्हा बर्याच प्रतिक्रीया अालेल्या दिसल्या. डाॅ. खरे यांनी बरेच प्रतिसाद दिले अाहेत. मला मात्र डाॅक्टरसाहेबांनी वर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले असेल, ही अाशा होती. ही सगळी चर्चा प्रमाणाची, तफावतीची अाहे. त्यांचे मत महत्वाचे अाहे, असे माझे अजूनही मत अाहे.
वाट पहाणारा,
- स्वधर्म
25 Mar 2015 - 9:39 pm | सुबोध खरे
स्वधर्म साहेब
तुम्ही कोणताही चष्मा लावत नाही त्यामुळे मी स्व्च्छ मनाने उत्तर देत आहे.
हृदय शल्य चिकित्सकाच्या आयुष्याचा लेखा जोखा--
एक हृदयाची शल्यक्रिया करणारा डॉक्टर एम बी बी एस नंतर कमीत कमी सहा वर्षे (तीन वर्षे एम एस साठी आणि जर पुढे प्रवेश मिळाला तर एम सी एच साठी तीन) पदवी मिळवण्यासाठी शिकत असतो. यानंतर साधारण पाच ते सात वर्षे त्याला प्रत्यक्ष शल्यक्रियेचा अनुभव घेण्यासाठी लागतात. एम सी एच केल्यावर कोणी त्याला लगेच बायपास ची शल्यक्रिया करू देत नाही. एवढा अनुभव घेतल्यावर ती सर्जन बाजारात उतरतो. तोवर त्याचे वय कमीत कमी ३५ असते. या वयाला त्याला सहाय्यक सर्जन म्हणून मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळते ज्यात त्याचा पगार आजमितीला दीड लाखच्या आसपास असतो. साधारण एखाद्या प्रथितयश सर्जनच्या बरोबर तो काम करू लागल्यावर दोन एक वर्षाने त्याला सहाय्यक म्हणून रुग्णाकडून मिळणार्या सेवाशुल्कातील भाग मिळतो. अशी अजून दोन तीन वर्षे काढल्यावर तो पूर्ण वेळ हृदय शल्य चिकित्सक म्हणून काम करू लागतो. या वेळेपर्यंत त्यःच्या कामाची वेळ सकाळी ७ पासून रात्री कितीही आणि रविवारी अर्धा दिवस.
कारण सकाळी सात वाजता आदल्या दिवशी शल्यक्रिया केलेल्या रुग्णांच्या प्रगतीचा आढावा (प्रथम आय सी यु आणि नंतर वार्डात) आणि त्याबरोबर सल्ला. किंवा जो रुग्ण डिसचार्जवर जाणार आहे त्याच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता. हे सर्व करेपर्यंत नउ वाजतात. यानंतर तो शल्य क्रिया गृहात जातो. जर दोन शल्यक्रिया असतील आणि सर्व व्यवस्थित असेल तर त्या आटोपेपर्यंत संध्याकाळचे पाच वाजतात. जेवण शल्यक्रियागृहातच आटोपले जाते. यानंतर तो बाहेर येऊन तो आय सी यु मध्ये असलेले आजचे आणि कालचे रुग्ण पाहायला जातात. त्यांचे सर्व आटोपेपर्यंत सात वाजतात. यानंतर तो शल्यचिकित्सक बाह्य रुग्ण विभागात रुग्ण तपासणी करतो. बायपाससाठी आलेल्या रुग्णांच्या अन्जीयोग्राफी इ पाहून त्यांना सल्ला देणे शल्यक्रिया आवश्यक असेल तर त्याची तारीख देणे. रुग्णाशी सल्लामसलत करणे आणि बायपासच्या बद्दल आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतीची कल्पना देणे. इ इ या सर्व गोष्टीना कितीही वेळ लागू शकतो.
हे सर्व जर प्रथितयश शल्यचिकित्सका बद्दल आहे. होतकरू शल्यचिकित्सकाला एकाच ठिकाणी एवढे रुग्ण मिळत नाहीत त्यामुळे त्याला दोन अजून ठिकाणी पॉली क्लिनिक किंवा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग चालवावा लागतो. अशात येणारे अर्धे रुग्ण हे "सेकंड ओपिनियन" वाले असतात.म्हणजे तास दीड तास घालवून अन्जीयोग्राफी इ पाहून एक हजार रुपये घेताना रुग्णाच्या नातेवाईकांच्या शिव्या हि खायला लागतात. (नुसते रिपोर्ट पहायचे १००० रुपये फार होतात म्हणून). हे सर्व कमी म्हणून रविवारी सकाळी सुद्धा शनिवारी शल्यक्रिया केलेल्या रुग्णांना पाहायला यावे लागते.
त्यातून आपण शल्यक्रिया केलेला रुग्ण रात्री अपरात्री धापा टाकू लागला तर आपली झोप अर्धवट टाकून यावे लागते. रुग्ण दगावला तर त्यामुळे कुरतडणारे मन शिवाय त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारे शिव्याशाप.
हे सर्व मिळून अर्धे आयुष्य संपल्यावर मिळणारा चाळीशीनंतर थोडाफार पैसा सुद्धा लोकांच्या डोळ्यात येतो. त्यातून डॉक्टर नीतू मांडके सारख्या उत्कृष्ट सर्जनला तणावामुळे आलेला अकाली मृत्यू पहिले कि असे वाटते कि कितीही मोबदला दिला तरी तो अपूर्णच आहे. आमच्या सख्ख्या काकांची बायपास सर्जरी मी पाहिली आहे. त्यांचे शल्य्क्रीयेला घेण्यापूर्वी बिघडत चाललेलं हृदय मी पाहात होतो असे असताना प्रत्यक्ष शल्यक्रियेच्या दरम्यान एकाच विचार डोक्यात होता कि जर त्यांचे हृदय चालू झालेच नाही तर काय? आपल्या काकांचे असे अंत्य दर्शन आपल्याला घ्यावे लागेल काय हा विचार आजही मी माझ्या चुलतभावाल आणी बहिणीला बोलून दाखवलेला नाही. सुदैवाने आमचे काका ८ वर्षानंतर आजही सुस्थितीत आहेत. यासाठी ७००००/- च काय तीन लाख जरी दिले तरी ते कमी होतील. . या तुलनेत मी अगदी पंचेचाळीस मिनिटे घालवून रुग्णाकडून १५००/- रुपये घेतो तेंव्हा रुग्ण माझ्या दवाखान्याच्या बाहेर पडला कि मी सुद्धा दवाखान्याला कुलूप लावून बाहेर पडू शकतो. रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी मिसळपाव कट्ट्यावर उपस्थित राहू शकतो. अर्थात सर्वच रुग्णांकडून १५००/- मिळत नाहीत साधी सोनोग्राफी असेल तर ८००/- किंवा १०००/- मिळतात. दर दिवसाआड एखादा रुग्ण १०००/- रुपये जास्त आहेत हे म्हणतोच परंतु मी त्यांना सांगतो कि हा माझा दर आहे. सार्वजनीक किंवा सेवाभावी संस्थानी चालविलेल्या केंद्रात करून घ्या तेथे ६०० ते ७०० रुपयात होईल.मी एक साधे उदाहरण देतो. मुलुंड हून अंधेरीला गेलात तर रेल्वे चे तिकीट १० रुपये, बसचे २५ रुपये, रिक्षाचे २०० रुपये TAXI चे ३०० रुपये आणी मेरू चे ४०० रुपये होतात. तुम्हाला जे परवडते ते तुम्ही स्वीकारा.
जे लोक महापालिकेच्या रुग्णालयातून येतात त्यांना मी हटकून सवलत देतो. पण जे लोक सवलत घेणे हा आपला हक्क समजतात अशा दीड शहाण्या लोकांना मी एक रुपया सुद्धा सवलत देत नाही. मी वरिष्ठ नागरिकांना एक रुपया सुद्धा सवलत देत नाही.( याचे कारण नंतर केंव्हा तरी). एका दीड शहाण्या एन जी ओ बाईने समाजसेवा नावाची काही गोष्ट आहे कि नाही असा टेचात सवाल विचारला होता तेंव्हा तिला मी स्पष्ट शब्दात विचारले कि तुम्ही कधी दोन दिवस म्यागी खाऊन काढले आहेत काय/ किंवा कधी मिल्कमेड आणी पाव खाल्ला आहे काय? मी लष्करात हे सर्व केले आहे. २३ वर्षे मी लष्करात माझे तारुण्य घालवले आहे तेंव्हा मला सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी करीन. तुमच्या एन जी ओ चे पैसे कुठून येतात आणी त्याचा लेखाजोखा काय आहे ते मला माहिती आहे माझे तोंड उघडायला लावू नका असे म्हणून तिला स्पष्ट शब्दात गेट आउट म्हणून सांगितले
माझे सोनोग्राफी यंत्र २५ लाख रुपयाचे आहे. आणि त्याच्या वार्षिक देखभालीचा खर्च(AMC) २ लाख रुपये आहे( ८%) कर्जाचा हप्ता आणी व्यावसायिक जागेचे भाडे असताना मला लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वस्तात सोनोग्राफी करणे परवडेल काय?
असे असूनही मला आयुष्यात कधीही हृदय शल्यचिकित्सक व्हावेसे वाटले नाही किंवा त्यांच्या बद्दल असूयाही वाटली नाही. वाटली ती करूणाच. याचे कारण ज्यांचा व्यवसाय चालत नाही किंवा दुर्दैवाने व्यवसायाच्या सुरुवातीला अपयश आल्याने कच खाऊन वर्षानुवर्षे एक ते दीड लाखावर प्रथितयश सर्जनचे सहाय्यक म्हणून दहातील सात हृदय शल्यचिकित्सक दिवसातील बारा तास काम करीत आहेत हि वस्तुस्थिती आहे. हि परिस्थिती कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणून नाही. अखिल भारतीय परीक्षेत मी तिसरा आलो असताना मी रेडीयोलोजी घेतले कारण मला इतर लोकांपेक्षा स्वतःचे कुटुंब जास्त प्यारे आहे. आयुष्यभर समाजसेवा करण्याचा माझा पिंड नाही. आयुष्यात फार काम केल्याने कुणाचे भले झाले आहे यावर माझा विश्वास नाही. मी कधीच दिवसात ८ तासापेक्षा जास्त काम करू शकत नाही. मग मला जेवढे मिळते त्यात मी आनंदी आहे. माझ्याकडे इंडिका आहे आणी मी होंडा युनिकोर्न या मोटार सायकलीवर आनंदात फिरतो.
यावर काही विद्वान लोक त्यांची तुलना चेनचोर किंवा पाकीटमार किंवा दरोडेखोरांबरोबर करतात बायपासची आवश्यकताच नाही असे म्हणतात. किंवा त्यांची तुलना ड्रायव्हरच्या कौशल्याबरोबर करतात त्याला काय म्हणावे?
याहून अधिक काय सांगावे?
25 Mar 2015 - 9:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
प्रतिसाद प्रचंड आवडलेला आहे आणि १००% सहमत आहे. शाळेमधल्या डॉक्टर झालेल्या दोन जणांची सर्जन होण्यासाठी चाललेली धडपड नेहेमी पाहाण्यात येते.
25 Mar 2015 - 10:20 pm | अत्रन्गि पाउस
डॉक्टरांना आहे
कप्तान साहेबांना वेगळा प्रतिसाद दुपारीच दिलेला आहे :)
25 Mar 2015 - 10:19 pm | अत्रन्गि पाउस
आपल्या संतुलित प्रतिसादांचा मी नेहेमीच चाहता राहिलो आहे ... फार छान समजावून सांगितलेत ...
खरोखरच कठीण परिस्थिती आहे ...
26 Mar 2015 - 12:22 am | स्वधर्म
डाॅक्टरसाहेब, मनात अालेल्या साध्या विचारावर मी एक पोस्ट लिहीली अाणि त्यावर अनेक प्रतिक्रीया अाल्या. अत्यंत सुदैवाचा भाग म्हणजे तुमच्यासारख्या डाॅक्टरांनीही त्यावर लिहीले. वर तुंम्ही जो ‘हृदय शल्य चिकित्सकाच्या आयुष्याचा लेखा जोखा’ समजावून सांगितला अाहे, तसा माझ्यासारख्या सामान्य माणसाला कधीच समजला नसता. म्हणूनच तुम्हाला काहीसा व्यक्तीगत वाटणारा प्रश्न विचारताना अवघड वाटत होते, तरी विचारला व तुमच्या उत्तराची वाट पहात राहिलो. अाज रात्री तुमचा प्रतिसाद वाचल्यावर हा धागा काढल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
एखादा माणूस हृदय शल्य चिकित्सक होतो, त्याच्यामागे काय असते, हे एरव्ही फी मोजूनही कळले नसते. एम बी बी एस नंतर सहा वर्षे शिक्षण, पाच ते सात वर्षे सहाय्यक म्हणून काम व त्यानंतर स्वतंत्रपणे हृदय शल्य चिकीत्सक होणे. त्यातही दहापैकी तीनच लोकांना स्वतंत्र काम करायला मिळणे ही अतिदुर्मिळ कौशल्यामागची तपश्चर्या केवळ तुंम्ही सांगितल्यामुळेच समजली. या धाग्यावर अालेल्या फार थोड्या लोकांनाच ही पार्श्वभूमी माहीत असेल, अशी शक्यता अाहे. तुंम्ही ती इतक्या सुंदर (काहीतरी त्यापेक्षा चांगला शब्द हवा) रीतीने समजून सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. विशेष म्हणजे तुंम्ही एखाद्या हृदय शल्य चिकित्सकाकडे कसे पाहता, हे ज्या मोकळेपणाने कसलाही अाव न अाणता, सांगितले अाहे, तसा नितळ दृष्टकोन ही खास दाद देण्यासारखी गोष्ट!
एखाद्या गोष्टीबद्दल अापला काही दृष्टीकोन असावा, त्यातल्या खाचाखोचा नंतर अाधिकारी माणसाने दाखवून द्याव्यात, हळूहळू अापल्याला उलगडत जावे अाणि शेवटी अापल्याला त्यातली मेख कळो यावी, हे अमूल्य अाहे. मी अाता हृदय शल्य चिकीत्सकाकडे एका वेगळ्याच नजरेने बघू शकेन. पैसा अाणि कौशल्य यापेक्षा अाधिक काहीतरी मला नक्की दिसेल. हा दृष्टीकोनातला बदल, ही अमूल्य भेट दिल्याबद्दल मनापासून अाभार मानतो.
- स्वधर्म
मिपा राॅक्स!!
26 Mar 2015 - 12:57 am | आजानुकर्ण
+१
26 Mar 2015 - 10:48 am | रुस्तम
सहमत....
26 Mar 2015 - 7:21 am | श्रीरंग_जोशी
ही तपशीलवार कारणमीमांसा खूप पटली. परंतु हे सर्व लिहायची वेळ यावी हे आपलं सर्वांचच दुर्दैव आहे.
27 Mar 2015 - 10:03 am | अजया
डाॅ खरेंच्या प्रतिसादातील शब्दशब्दाशी सहमत.मोठ्या प्रमाणात डाॅक्टर मित्रपरिवार असल्याने(मोठ्या हाॅस्पिटलमध्ये अनेक वर्षे माझे डेंटल डिपार्टमेंट चालवल्याने)हे सर्व फार जवळुन अनुभवलंय.त्यामुळेच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशा प्रकारचे प्रतिसाद डाॅक्टर व त्यांच्या फी याबद्दल आले की पडद्यामागचं आठवुन फार वाईट वाटतं.किंबहुना डाॅक्टरएवढा इनसिक्युअर्ड व्यवसाय कोणाचा नसेल!
27 Mar 2015 - 10:08 am | अनुप ढेरे
डेंटिस्ट लोकांना हे फार जवळून रोज बघायला लागत असेल राइट?
27 Mar 2015 - 10:39 am | अजया
अगदी अगदी!! आत्तासुध्दा ^_~
16 Mar 2015 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
त्यांना कोणी झोडपत नाही, मग डाॅक्टरांनाच का झोडपायचं, हा तुमचा प्रश्न बरोबर अाहे.
मला असे म्हणायचे नव्हते. आणि या तुमच्या वाक्यात दिसणारा तर्कही मला मान्य नाही.
माझ्या वरच्या प्रतिसादात माझे जे मत दिलेले आहे त्याबद्दल अजून थोडे विस्ताराने...
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
या वाक्यांचा अर्थ असा आहे...
१. प्रत्येक अन्यायकारक गोष्टीचा विरोध, निषेध, प्रतिकार आणि कायदेशीर प्रतिबंध जरूर केलाच पाहिजे. एखादी अन्यायकारक गोष्ट माफ केली होती या कारणाने दुसरी अन्यायकारक गोष्ट माफ करणे बरोबर नाही. कारण तसे करणे म्हणजे एकूण दोन चुका माफ केल्या असे होईल... दोन अन्याय होतील. मग तिसरा तेच कारण देऊन माझी (तिसरी) चूक माफ करा असे म्हणेल... आणि अश्या प्रकारे अन्यायांच्या साखळीला अंत राहणार नाही.
मात्र...
२. कोणत्याही अन्यायाचा प्रतिकार करण्याअगोदर त्या अन्यायाचे मूळ कारण शोधून त्या खर्या/मूळ कारणावर कृती करावी. तसे न केल्यास निर्दोष माणसाला शिक्षा देण्याची चूक होउ शकते. शिवाय, अन्यायाचे मूळ कारण तसेच कायम राहल्याने अन्यायही दूर होणार नाही, हे वेगळेच !
३. अन्यायाची खरी कारणे शोधण्याइतका सारासार विवेक बर्याच वेळा दाखवला जात नाही किंवा सरळ सरळ माहीत असलेली कारणे सोईची नसल्याने त्यांच्याकडे डोळेझाक केली जाते. सर्वात वाईट म्हणजे खर्या कारणामागे असलेल्या खर्या दोषी माणसाला आपण शासन करू शकत नाही याचा मनात साठलेला राग सहज सापडू शकेल आणि उलटवार करणार नाही अश्या व्यक्तीवर/संस्थेवर काढला जातो.
४. माझ्या प्रतिसादात दिलेल्या व्हॉटसअॅप संदेशात एका वैद्यकिय व्यावसायीकाने स्वतःची बाजू आणि सद्यस्थितीबद्दलचे त्याचे मत मांडलेले आहे. विशेषतः त्या संदेशाचा शेवटच पॅराग्राफ बारकाईने वाचल्यास याबाबतीत त्याने बरेच काही सांगितले आहे हे ध्यानात येईल.
======
(मुख्य म्हणजे तो व्हॉट्सअॅप मेसेज मी लिहीलेला नाही हे मी माझ्या मूळ प्रतिसादात लिहिलेले आहेच.)
16 Mar 2015 - 11:59 pm | स्वधर्म
एक्का साहेब, तुमचे न्याय- अन्यायाचे विश्लेषण योग्यच. फक्त इथे अापल्या रेअर स्कीलची महाप्रचंड फी अाकारण्यात कुणावर अन्याय होतोय का, अाणि तुमच्या मते त्यातले मूळ कारण कोणते ते सांगा.
17 Mar 2015 - 12:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
असामान्य कसब (रेअर स्किल) या त्याच्या संज्ञेत आणि व्याख्येतच त्याच्या असामान्य फीचे स्पष्ट होत नाही का ? तरीही जरा असा विचार करून बघा...
१. असामान्य कसब कमावण्यासाठी असामान्य बुद्धी, वेळ, पैसा आणि श्रम खर्च झालेले असतात... अर्थातच इतका खर्च केल्यावर त्या कसबाची किंमत जास्त राहणारच. तो ही कुटुंबाच्या आणि इतर जबाबदार्या असणारा समाजाचा घटक आहे... किंबहुना कोणा डॉक्टरने कमी फी आकारून आलेल्या कमी उत्पन्नामुळे त्याच्या मुलांना सामान्य शाळा-कॉलेजात टाकले तर आता डॉक्टरच्या जास्त फी बद्दल तक्रार करणारी मंडळीच त्याची गणना मूर्ख माणसांत करतील आणि तो डॉक्टर (सुशिक्षित, वगैरे, वगैरे) असूनही आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात कमी पडला असे म्हणतील, नाही का ? एखादा डॉक्टर पायी अथवा सायकलवर हाउस व्हिजिटवर आला तर लोकांची (आणि त्यांच्या शेजार्यांची) मानसिक अवस्था काय असेल हे सांगायला नकोच ! तेव्हा अश्या बर्याच गोष्टी डॉक्टरला एक माणूस म्हणून आपल्या कुटुंबासाठी करायच्या असतात आणि इतर बर्याच गोष्टी त्याला त्याचे ग्राहक (रुग्ण) आणि समाजाच्या समजुतीकरता करणे भाग असते. मुख्य म्हणजे या सर्व गोष्टींना अर्थबळ लागते आणि ते त्याने कमवावे तरच तो डॉक्टर आणि माणूस म्हणून यशस्वी झाला असे समाज (तुम्ही, आम्ही, सगळे आपण) मानतो.
२. सद्याच्या स्पर्धेच्या जगात कोणीही डॉक्टर/हॉस्पिटल्ससह व्यावसायिक/संस्था आपल्या सेवेची/उत्पादनाची फारच आवासवा किंमत मागू शकत नाही. असे केल्यास ग्राहक सरळ त्याच्या प्रतिस्पर्ध्याची स्वस्त सेवा घेतील आणि त्याचा व्यवसाय बुडीत खात्यात जमा होईल.
३. वैद्यकीय विम्यात जे गैरकारभार दिसतात ते मुख्यतः अनुशासनातील (रेग्युलेटरी) कमतरतेने झालेले आहेत. सर्वसाधारणपणे वैद्यकीय विमा एका प्रकारे समतोल स्पर्धा (लेव्हल प्लेइंग फील्ड) निर्माण करतो. कारण, त्याच विम्याच्या हप्त्याच्या रकमेत ग्राहकाला विमा कंपनीच्या यादीतले त्याच्या पसंतीचे व्यावसायिक व रुग्णालये निवडता येतात. याचा परिणाम ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी रुग्णालयांनी आपली सेवा जास्तीत जास्त आकर्षित करण्याकडे होतो. सद्या आपल्याकडे सेवेचा तुटवडा (विशेषज्ञ, रुग्णालये, रुग्णखाटा [इंडोअर बेड्स], खास सेवा, इत्यादींची लोकसंख्येच्या मानाने कमी संख्या) आहे. सेवेची/उत्पादनाची कमतरता आणि शासकीय (रेग्युलेटरी) कमतरता यांचा संगम असलेल्या परिस्थितीत नेहमीच भ्रष्टाचार वाढतो. सद्याच्या विमा कंपन्या व रुग्णालये यांच्या साट्यालोट्यामागे हेच मुख्य कारण आहे.
४. वर डॉ खरेंनी म्हटल्याप्रमाणे बर्याचदा असे दिसून येते की भारी किंमतींच्या ऐषआरामी वस्तूंसाठी (महाग दारू, कपडे, टीव्ही, मोबाईल, गाडी, इ) झालेला खर्च वाजवी समजणारा माणूस डॉक्टरच्या सेवेची किंमत कमीत कमी असावी असे तावातावाने म्हणतो याचे नवल वाटणे स्वाभाविक नाही का ? एका बाजूला सेवा घेताना डॉक्टर व्यावसायिक आहे असे म्हणायचे पण त्याला मोबदला देताना ती सामाजिक सेवा म्हणायचे, हे सुसंगत नाही.
५. डॉक्टर हे असंघटित आणि उलटवार करणार नाही ही खात्री असणारे मृदू लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट) आहे. त्यामुळे ऐकीव माहितीवर किंवा एखाद्या अनुभवावर त्याच्यावर टीका आणि शारीरिक हल्ला होण्याचे प्रसंग नेहमीचे आहेत हे हा लेख, त्यावरचे प्रतिसाद आणि माध्यमातल्या बातम्या पाहून सहज कळते. पण, आपल्या कराचा गैरव्यवहार होत आहे आणि आपल्या घराशेजारचा परिसर अस्वच्छ ठेवल्यामुळे रोगराई वाढीस लागत आहे, हे सर्वमान्य असूनही किती लोक आपल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधीला (कॉर्पोरेटर, आमदार, खासदार, इ) दोष देण्याचे आणि त्याच्या घरावर मोर्चा नेण्याचे धाडस दाखवतात ?
६. आपल्या पक्षातील आणि विपक्षातील विरोधकांना खूश ठेवण्यासाठी मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजेसच्या परवान्यांची खिरापत वाटली जाते हे काही मोठे गुपित नाही. अशी कॉलेजेस अनेक दशलक्ष रुपयांची डोनेशन्स घेऊन शिक्षणाचा बाजार मांडतात हे पण काही गुपित नाही. अश्या वेळेस कॉलेजेसचे परवाने देणार्या आणि घेणार्यांच्या विरुद्ध काही करण्याचे धाडस नसणारे, किंबहुना त्याच्या राजकीय ताकदीचे कौतुक करणारे जेव्हा, डॉक्टरने स्वतःचा वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून मिळवलेल्या कसबाचे, त्यांच्या समजुतींच्या आधारावर मूल्यमापन करू लागतात तेव्हा त्यांची भावना बरोबर आहे हे लक्षात ठेवूनही त्यांच्या रागाचा रोख चुकीच्या ठिकाणी असतो, हेच सत्य आहे.
हा विषय वाटतो तितका सरळ नाही आणि त्याची कारणे वरवर दिसतात त्यापेक्षा खोलवर रुजलेली आहेत. पण वरच्या त्रोटक पार्श्वभूमीवर खाली उर्धृत केलेले माझे पूर्वीचे विधान अधिक स्पष्ट होईल...
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजुतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!
16 Mar 2015 - 3:55 pm | प्रभाकर पेठकर
मला एक समजत नाही. जर स्वस्तात दुसरा चांगला खाजगी डॉक्टर उपलब्ध असेल तर महागड्या खाजगी डॉक्टरकडे रुग्णाने का जावे?
जर दुसरा चांगला स्वस्त खाजगी डॉक्टर उपलब्ध नसेल आणि तरीही आपल्याला जगायचे असेल सरकारी दवाखान्यात जावे.
तेही करायचे नसेल तर नाईलाजाने महागड्या डॉक्टरकडेच जावे. तक्रार करू नये. जीव वाचविण्याचे मोल गरजवंताने तरी करू नये.
डॉक्टरने अव्वाच्यासव्वा शुल्क आकारणे नैतिक की अनैतिक हे ठरविणारे आपण कोण? प्रत्येक उद्योग धंद्यात अवास्तव किमती असतातच. औषध कंपन्या औषधे, स्टेंट, हृदयाचे वॉल्व्ह ह्यांच्या किमती किती प्रमाणात त्याच्या उत्पादनशुल्काशी प्रामाणिक असतात?
महागड्या डॉक्टरांकडे रुग्ण नाही आले तर त्याला शुल्क घटविण्याव्यतिरिक्त कांही मार्ग उरेल का?
जेवणखाण, कपडे, अत्तरे, मद्य, पर्यटन वगैरे अनेक बाबतीत आपण महागड्या वस्तू/सेवा टाळतच असतो. तेच वैद्यकिय सेवेबाबतही अंगिकारले तर तक्रार उरणारच नाही.
16 Mar 2015 - 4:30 pm | काळा पहाड
सध्याही हे असंच असतं ना? आधी स्वस्त डॉक्टर आणि मगच महाग शोधला जातो. अर्थात तसं अध्यारूत असतं. पण एकतर सामान्य जनांना हे प्रसंग रोजचे नसल्याने इथली डाळ स्वस्त की तिथली याप्रमाणे डॉक्टर शोधणं शक्य नसतं. तेवढं ज्ञान नसतं आणि डॉक्टर सुद्धा याबाबतीत खरं सांगतील असं नसतं. त्यामुळे मौखिक जाहिरातीवर चांगल्या (स्वस्त नसेल तरिही अतिमहाग नसलेल्या) डॉक्टरचा शोध केला जातो.
नसतील तर समाजानं याबाबतीत कायदे करायला हवेत. नाक दाबलं की तोंड उघडतं हे सत्य आहे, माणसांच्या बाबतीत सुद्धा आणि कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा.
16 Mar 2015 - 7:01 pm | आजानुकर्ण
दोनवेळा इमर्जन्सी सर्विसेसमध्ये जावे लागल्याने साधारण फ्लोचार्ट कसा असेल याची कल्पना करु शकतो. पहाटे दीडदोन वाजता अटॅक किंवा सीझर्स वगैरेचा त्रास सुरु झाल्याने ताबडतोब इस्पितळात जायचे आहे. इमर्जन्सी केअर देणारी ३ इस्पितळे साधारण सारख्याच अंतरावर आहेत. या इस्पितळांमध्ये यापूर्वी कधीही जावे लागले नसल्याने कुठे स्वस्त/महाग आहे याची काहीच कल्पना नाही.
त्यामुळे मित्र १ ला फोन केलाः अरे सॉरी तुला रात्री जागं करतोय. जरा इमर्जन्सी केअरमध्ये जावं लागतंय. तुझे बाबा 'विक्रमादित्य कुर्ला' इस्पितळात होते ना? कशी काय आहे सेवा? जाऊ का?
मित्र १ः अजिबात जाऊ नकोस. निव्वळ कापतात तिथे. प्रचंड महाग आणि यूजलेस सेवा. त्यापेक्षा तू 'लोहमान्य' इस्पितळात जा. मित्र २ त्याच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी तिथे गेला होता.
मित्र २ ला फोन केलाः अरे सॉरी तुला रात्री जागं करतोय. जरा इमर्जन्सी केअरमध्ये जावं लागतंय. तुझी आई 'लोहमान्य' इस्पितळात होती ना? कशी काय आहे सेवा? जाऊ का?
मित्र २ अजिबात जाऊ नकोस. निव्वळ कापतात तिथे. सगळी लुटालूट त्यापेक्षा तू 'निराजय' इस्पितळात जा. मित्र ३ त्याच्या बायकोच्या शस्त्रक्रियेसाठी तिथे गेला होता.
मित्र ३ ला फोन केलाः अरे सॉरी तुला रात्री जागं करतोय. जरा इमर्जन्सी केअरमध्ये जावं लागतंय. तुझी बायको 'निराजय' इस्पितळात होती ना? कशी काय आहे सेवा? जाऊ का?
मित्र ३ अजिबात जाऊ नकोस. निव्वळ कापतात तिथे. सगळी लुटालूट आणि खोटारडेपणा. त्यापेक्षा तू 'कुर्ला' इस्पितळात जा. मित्र १ त्याच्या बाबांच्या शस्त्रक्रियेसाठी तिथे गेला होता.
तोपर्यंत घरची व्यक्ती धापा टाकू लागते. नाईलाजाने इस्पितळ १ मध्ये नेऊन पुढचे पुढे पाहू या धोरणाने कुठेतरी दाखल केले जाते. पहिले दहा-बारा तास प्राथमिक तपासणी व प्रथमोपचार करुन जनरल वार्ड कम कॅज्युअल्टी विभागात 'रुम रिकामी होत आहे' याची वाट पाहत आपण बसतो. कधीतरी रुम रिकामी होते व अॅडमिट करुन घेतले जाते. (मात्र शेवटच्या फायनल बिलात २४ पैकी १२ तास जनरल वार्डमध्ये घालवले असले तरी स्पेशल रुमचे पूर्ण दिवसाचे चार्जेस लावलेले असतात याकडे दुर्लक्ष करायचं असतं बरं का. मात्र डॉक्टरांच्या विजिटमध्ये त्यांनी फक्त २ मिनिटासाठी खोलीत येऊन 'काय कसं वाटतंय' एवढा प्रश्न विचारला तरी त्यांना मात्र तासाच्या दराने पैशे द्यायचे.)
एखाद्या राजकारण्याचा उपचारात मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयावर हल्ला झाल्याची बातमी वाचली की मला आधी अशा हल्लेखोर प्रवृत्तींचा राग येत असे. मात्र हलगर्जीपणामुळे हताश झालेल्या नातेवाईकांकडे सद्य व्यवस्थेत दुसरा काहीही उपाय नाही हे पाहता या हल्ल्यांमुळे निदान नफेखोर-भ्रष्ट रुग्णालयांवर थोडा चाप बसेल असे वाटून मनातल्या मनात थोडे बरे वाटते. हे लिहितानाही मला खरे तर अपराधी वाटत आहे.
16 Mar 2015 - 10:00 pm | टीपीके
हा प्रतीसाद फक्त तुम्हाला नाही परंतू मूळ चर्चा विषय आणि ९९% प्रतीसादांची काही सांगड बसत नाही. ९९% प्रतीसाद वैद्यकीय व्यवसायातील अनैतीक प्रथांवर आहेत , उदा. गरज नसताना शस्रक्रीया, महागडी औषधे इत्यादी, आणि मला वाटते येथील डाॅक्टर्स पण त्याचे समर्थन करणार नाहीत. पण मुळ मुद्दा हा एखाद्या निष्णात डाॅक्टरांच्या फी चा आहे आणि मला नाही वाटत हे डाॅक्टर्स फार फी घेतात (हे फक्त निष्णात डाॅक्टरांसाठी, परीस्थीतीचा गैरफायदा घेणाऱयांसाठी नाही)
जनरली या लेव्हलला असणारे डाॅक्टर्स निदान १५-२० वर्ष तरी अनुभवी असतात आणि त्या रेंज मधे तितके अनुभवी आणि यशस्वी लोक जवळपास तितकेच कमवतात
या चर्चेत पवीत्र व्यवसाय , सरकारी महाविदयालयातील फी हे काही फार पटणारे मुद्दे वाटत नाहीत कारण हे मुद्दे अनेक व्यवसायांन्ना लागू होतात आणि त्या साठी फक्त डाॅक्टरांना झोडपायचे कारण नाही. तसेही यातील अनेक डाॅक्टर्स काही सेवाभावी संस्थांच्या कार्यात सहभागी होत असतातच की
16 Mar 2015 - 5:59 pm | कपिलमुनी
औषधांच्या किंमती या केवळ उत्पादन मुल्यावर ठरवता येत नाही.
एखादी लस किंवा औषध बाजारात आणण्यासाठी जे अविरत संशोधन करावे लागते त्या साठी फंडिंग करावे लागते त्याची कॉस्ट खूप आहे. त्यातही प्रतिस्पर्धी कंपनीच्या अगोदर औषध बाजारात आणावे लागते \ पेटंट घ्यावे लागते अन्यथा संपूर्ण पैसे पाण्यात जातात.
शेकडो टेस्टस घ्याव्या लगतात. भारतासारख्या ठिकाणी सरकारी अडथळे असतातच .
एकदा औषधाचे पेटंट मिळाले की पुढची काही वर्षे कॉस्ट कव्हर करतात कारण प्रतिस्पर्धी कंपन्या याच प्रकारचे औषध आणतात.
मग पुढे सुरू होते पैशाचा खेळ ! कंपनी फायद्यात हवी असेल तर फार्मासिस्टचे मार्जिन वाढवा . डॉक्टरांना खूष ठेवा .. हॉस्पिटलसोबत टायअप करा. प्रतिस्पर्धी कंपनीला मागे टाका ! बिजिनेस टार्गेट्स इ.ई .
या सर्वात डॉक्टर केवळ एक भाग आहे. फक्त त्यांच्याकडूनच सचोटी आणि कमी पैशाची अपेक्ष का करावी ?
16 Mar 2015 - 6:20 pm | सूड
हे म्हण्जे पोराला आधी कॉन्व्हेन्टमध्ये टाकायचं आणि मग इंग्लिशमध्ये बोलायची सक्ती करतात म्हणून त्यांच्या नावाने शिमगा करायचा.
गैरव्यवहार असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजूत तोलून कसं चालेल? तूर्तास वाढदिवसाच्या शुभेच्छा!! आणि हे असले सतरादा चर्वितचर्वण झालेले विषय आवरता आले तर बघा.
धन्यवाद!
16 Mar 2015 - 7:54 pm | सुबोध खरे
जे सवलतीच्या फीत शिकतील त्यांना कायमची गव्हर्नमेंट सर्व्हिस मँडॅटरी करावी. त्यांना खाजगी प्रॅक्टीस करता येणार नाही असा कायदा करावा.
अगदी अगदी .
सगळ्याच सरकारी कोलेजात हा नियम ताबडतोब लागू करा. सरकारी कॉलेजातील इंजिनियर्सनि फक्त सरकारी नोकरी केली पाहिजे. वकिलांनी सरकारी वकीलच बनले पाहीजे. शिक्षकांनी सुद्धा शाळेत नोकरी केली पाहिजे सर्व खाजगी शिकवण्या क्लासेस या शैक्षणिक वर्षापासून बंद झाले पाहिजेत. सगळी घरे सगळे रस्ते पूल इ फक्त सरकारी कंपन्यांनीच बांधली पाहिजेत. सगळ्या सरकारी कॉलेजातून फार्मसी केलेल्यांनी सरकारी नोकरी किंवा सरकारी औषध निर्मिती कंपन्यातच नोकरी केली पाहिजे.
एकदम बेष्टेष्ट तोडगा.
३. जास्तीत जास्त गव्हर्नमेंट इस्पितळे सुरू करावीत.
जास्तीत जास्त सरकारी बांधकाम कंपन्या, औषधी कंपन्या, कॉलेजेस, प्रत्येक खेड्यात न्यायालये घरे रुग्णालये एक्स्प्रेस वे,संगणक कंपन्या हि ताबडतोब सुरु केली पाहिजेत.
भारतीय राज्यघटनेच्या कलम १४ प्रमाणे सर्वाना समान वागणूक आणी सरकारी नोकरी मिळाली"च" पाहिजे
16 Mar 2015 - 9:06 pm | काळा पहाड
डॉक्टरसाहेब,
काही वाईट नाही. समाजाच्या पैशातून होणार्या शिक्षणातून समाजाच्या उपयोगाची कामं होणं यात चुकीचं काय आहे? नाहीतर मग घालावेत स्वत:चे पैसे आणि खुशाल लुटावं जनतेला. जेव्हा सरकारी शिक्षण सब्सिडाईझ्ड केलं गेलं तेव्हा हाच विचार असणार. हे लॉजिकल सुद्धा आहे. नंतर त्याची नेहमीप्रमाणेच वाट लागली असणार. नाहीतर समाज जे कररुपाने पैसे भरतो, आणि जे शिक्षणासाठी वापरले जातात, ते नक्की कशासाठी केलं जातं असं आपल्याला वाटतं?
या सूचनेत चुकीचं काय आहे? सरकारी बांधकाम कंपन्या, एक्स्प्रेस वे, संगणक कंपन्या या नसल्या तर माणूस मरत नाही. रुग्णालये नसली तर मरू शकतो. जनतेच्या आरोग्याची काळजी करणं हा तर सरकारच्या मूलभूत कर्तव्यापैकीच एक असतं आणि म्हणूनच सरकारी इस्पितळांना प्रायव्हेट करण्याचा विचार सुद्धा केला जात नाही. सरकार संगणक कंपनी काढत नाही पण प्रत्येक तालुक्याच्या गावी सुद्धा सरकारी इस्पितळ असतं. बर इथेच वर सांगितलं गेलं की डॉक्टर्स संख्येने कमी आहेत म्हणून त्यांचे दर जास्त आहेत. तसं जर असेल तर त्यांची संख्या आणि त्यांच्यांपर्यंत सामान्यांची पोहोच (अॅक्सेस) हे मोठ्या संख्येनं रुग्णालयं उघडूनच साध्य होणार आहे. की तुमचं असं म्हणणं आहे की रुग्णालयांच्या तुटवड्याचा फायदा घेवून, भाव वाढवून, काही डॉक्टरांना श्रीमंत होता यावं म्हणून सरकारनं ही मूलभूत जबाबदारी नाकारावी? कलम १४ बद्दल मला माहिती नाही आणि या वाक्याचा मला या प्रश्नाशी काही संबंधही वाटत नाही. पण वैद्यकीय व्यवस्था समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोचवली जावी हे काही 'लई' मागणं नसावं.
16 Mar 2015 - 9:36 pm | आजानुकर्ण
+१ अगदी सहमत. Healthcare is exception to efficiency of markets. सेवा घेणारा ग्राहक आणि सेवा देणारा हेल्थकेअर प्रोवायडर हे इक्वल फूटिंगवर नसतात. शिवाय जीवनमरणाचा प्रश्न असल्याने ग्राहक तारतम्याने विचार करु शकत नाही. कॅनडा, यूकेसारख्या विकसित देशांमध्ये नॅशनल हेल्थ सर्विस सारख्या सेवा देणे सरकारचे कर्तव्य मानले जाते. यूएससारख्या ठिकाणी प्रचंड रेग्युलेशन आणि नियम करुन डॉक्टर व इन्शुरन्स कंपन्या दोघांनाही अकाऊंटेबल केलं आहे.
आपल्याकडं डॉक्टरांचा प्रायवेट बिझनेस अनरेग्युलेटेड असावा ही मागणी तर आहेच, शिवाय पूर्णपणे अकार्यक्षम सरकारी आरोग्यसेवेची त्याला जोड आहे.
16 Mar 2015 - 10:15 pm | सुबोध खरे
अमेरिकेत वैद्यकीय सेवा नियंत्रित regulated आहे. पण ती सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. अमेरिकेत दिवाळखोरीचे सर्वात महत्त्वाचे कारण वैद्यकीय खर्च आहे.
एका डॉपलर सोनोग्राफीचा दर एका इंजिनियरच्या महिन्याच्या पगार एवढा आहे.४०००-५००० डॉलर (२.५ लाख रू). बाकी शल्यक्रिया वगैरे तर अशक्य. आपल दात दुखत असेल तर दंतवैद्याला भेटण्यासाठी आपल्याला २ महिनेपर्यंत सुद्धा थांबावे लागू शकते. आपल्याला गुलाबी चिठ्ठी मिळाली(pink slip) किंवा जर आपला आरोग्य विमा नसेल तर सामान्य वैद्यकिय सेवासुद्धा आपल्याला दिवाळखोरीत ढकलू शकते.
इंग्लंडची राष्ट्रीय आरोग्य योजना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. तिथे आपल्याला जी उपलब्ध आहे तीच सेवा आपल्याला घ्यावी लागते. आपल्या कानात दुखत असेल तर आपला फ्यामिली डॉक्टर ठरवेपर्यंत आपण कानाच्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही. त्यामुळेच कानाचा डॉक्टर रोज पाच रुग्ण बघतो आणि आपल्याला पूर्ण न्याय देतो. किंवा आपण पाच ते दहापट पैसे देऊन खाजगी सल्लागार ( कन्सलटंट) कडे जाऊ शकता.
जाऊद्या. तुम्ही म्हणता तसं खरं.
वितंडवादात काय अर्थ आहे
16 Mar 2015 - 10:43 pm | आजानुकर्ण
तुमची माहिती ऐकीव आहे की प्रत्यक्षानुभवावर आहे हे माहिती नाही.
http://www.commonwealthfund.org/publications/fund-reports/2014/jun/mirro...
यूकेची राष्ट्रीय आरोग्य योजना ही सर्व विकसित देशांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिका इतर सर्व विकसित देशांमध्ये सरकारी आरोग्यसेवा आहे आणि सर्व देशांतील आरोग्यसेवेचा दर्जा अमेरिकेपेक्षा चांगला आहे. अमेरिकेत अफॉर्डेबल केअर अॅक्ट (ओबामाकेअर) येण्यापूर्वी आरोग्यविमा नसणाऱ्यांसाठी आरोग्यसेवा घेणे हे मोठ्या प्रमाणावर खर्चिक होते हे खरे. मात्र त्यामागे इन्शुरन्स कंपन्यांची चापलुशी आणि हेल्थकेअर प्रोवायडरचा अवाढव्य खर्च ही कारणे होती. ओबामाकेअर ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर देत नसली तरी कवरेज डिनायलला विरोध आणि इन्शुरन्सची सक्ती यामुळे किमान मिनिमम आरोग्यसेवा परवडणे शक्य झाले आहे. याचबरोबर सर्व इन्शुरन्स प्रोवायडरना आरोग्यखर्चाचा अंदाज देणारी माहिती दरवर्षी दोनवेळा ग्राहकांना देणे बंधनकारक आहे.
भारतात मात्र सर्वच पातळ्यांवर उजेड आहे. इन्शुरन्स कंपन्या कोणालाही कसल्याही कारणासाठी किंवा कारणाविना कवरेज डिनाय करु शकतात. एक्झिंटिंग डिसिझेस वगैरेंचे कवरेज इन्शुरन्स कंपन्यांच्या मनमानीनुसार चालते. कुठलेही इस्पितळ कसलाही चार्ज लावू शकतात. इन्शुरन्स कंपन्या लावलेले चार्जेस चुकीचे आहेत असे सांगून पैसे देण्यास नकार देऊ शकतात. इन्शुरन्स कंपनी पैसे देतेय म्हटल्यावर इस्पितळे भरमसाट बिले फुगवून लावू शकतात. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियापर्यंत तक्रार केली तरी कुठेच दाद मिळत नाही.
शिवाय राजकारणी पैसे खातात, आम्हाला इंटर्नशिप करावी लागते, कॉर्पोरेट प्रेशर असते, प्लंबर ५०० रुपये घेतो वगैरे कारणेही तयार आहेतच.
16 Mar 2015 - 10:44 pm | आजानुकर्ण
'अमेरिका इतर सर्व विकसित देशांमध्ये' ऐवजी 'अमेरिका वगळता इतर सर्व देशांमध्ये' असे वाचावे.
16 Mar 2015 - 10:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सहमत.
पण विमा कंपन्यांमधे सुद्धा पाठपुरावा केला तर बर्यापैकी पैसे परतावा मिळु शकतो. कॉर्पोरेट इंशुरन्स असेल तर काम अजुन सोपं होतं. थेट कंपनीमधुन दबाव आणायचा एकतर रिफंड किंवा सर्व्हीस द्या म्हणुन किंवा पुढच्या वर्षी कंपनीच्या दारात येउ नका म्हणुन.
16 Mar 2015 - 10:56 pm | आजानुकर्ण
कॉर्पोरेट इन्शुरन्स नाकारला जात नाही हे खरंय पण भारतात ऑर्गनाईझ्ड सेक्टरमध्ये किती लोक कामं करतात? बाकीच्यांचं काय हा प्रश्न निर्माण होतोच. आरोग्यसेवा ही लक्झरी नाही ती प्राथमिक गरज आहे.