माझे भ्रंमण संचाचे महिन्याला बील ( देयक) येत असते आणि मी किती पैसे भरायचे हे पाहुन संकेतस्थळाच्या साह्यानेच भरत असतो. यावेळेस नकळतच मी सर्व रकाणे पाहत होतो, उदा. मागचे देयक, भरलेले पैसे, या महिन्याचे देणे, किती तारखेपर्यंत भरावयाला हवे आणि न भरले तर विलंब शुल्क. यात पाहता पाहता माझ्या लक्षात आले की देयक ४०० रुपये होते आणि विलंब शुल्क १०० रु जास्त असे दाखवलेले होते.
सहज सहज हिशोब करता लक्षात आले की अंदाजे २० % विलंब शुल्क म्हणून लावलेले होते, पूर्वीही वीज देणे / दूरध्वनी चे देयक रु.१५० असेल तर ५ / ७ रु विलंब शुल्क असे.
मोबाईल कंपन्या इतके विलंब शुल्क कसे लावु शकतात याचाच मला अचंबा वाटत आहे. यावर सरकारी / ग्राहक समितीचे काही नियंत्रण इत्यादी आहे काय?
मी त्यांच्या ग्राहक सेवेला याबद्दल लिहिणार आहेच, परंतु मिपावर याचा परामर्ष असावा म्हणून हा लेखप्रपंच.
प्रतिक्रिया
13 Mar 2015 - 4:26 pm | कंजूस
विलंब शुल्क कमीतकमी शंभर रू असेल.
13 Mar 2015 - 7:13 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पाच-सात रुपये शुल्क लावण्याचा काळ केव्हाच गेला रे कलंत्र्या.डॉक्टरांनी पाहिजे तेवढी फी आकारावी,मोबाईल कंपन्यांनी पाहिजे तेवढे शुल्क आकारावे.. असे सध्या मिपाकरांनी मान्य केले आहे.
13 Mar 2015 - 8:14 pm | हाडक्या
माई आहेत..! माई आहेत..!!
आम्हाला वाटले तो डॉक्टरांचा धागा वाचता वाचता माईपण नानांच्या मागे मागे पोचल्या की काय ..? ;)
13 Mar 2015 - 8:16 pm | पॉइंट ब्लँक
म्हणून प्रिपेड वापरणे लई भारी.
13 Mar 2015 - 8:24 pm | विजय१९८१
कस्ट्मर केअर ला फोन करा अनि नम्बर पोट्रेबिलिटि बद्दल विचारा कारण विचारल तर सान्गा दर वेळि बिल वेळेवर भरतोय १००/- कमी करा नाहितर दुस्र्या सर्विस प्रोव्यायडर कडे जातो. अनुभव आहे.विलंब शुल्क कमी करतात.