वास्तविकता आणि स्विकार या दोन गोष्टींनी परिवर्तनाची सुरूवात होते. ‘परिवर्तन’ म्हणजे ‘बदल’, मग तो आपल्या स्वभावात असो किंवा आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत असो. तुमच्या जीवनात वेळ बदललेली असणे म्हणजेच तुमच्या परिस्थितीत परिवर्तन होणे आणि हे शक्य आहे केवळ या दोन गोष्टींच्या मदतीने.
तुम्ही ज्या ठिकणी उभे आहात त्याच ठिकणी विचार करायला सुरूवात करा, मी काय कारत आहे? कशासाठी करत आहे ? आपल्या सभोवती कशी परिस्थीती आहे. मग ति परिस्थिती आर्थिक असो मानसिक असो नाते संबंधा विषयी असो सामाजिक संबंधाविषयी असो किंवा तुमच्या स्वत:विषयी काही समस्या असो. या सर्व परिस्थितींमधे तुम्हाला वास्तविकता बघता आली पाहिजे.जेव्हा तुम्हाला वास्तविकता कळेल तेव्हा तिचा स्विकार करा. आता तुम्ही म्हणाल वास्तविकता काशी बघायची? आणि त्याचा उपयोग काय? तर ते पुढे हळूहळू स्पष्ट होईल.
पहिलं शाश्वत सत्य इश्वरा विषयी आहे. या विश्वला निर्माण करणारी व नष्ट करणारी एक शक्ती असते. एक अशी शक्ती जिच्या अस्तित्वामुळे या विश्वाला प्रत्यक्ष रूप येत आणि अशी शक्ती वस्तवात आहे. ही शक्ती आहे म्हणुनच सजीवात जिवन आहे आणि र्निजिव वस्तु त्याच्या गुणांनी युक्त आहेत. त्याच शक्तीला लोक वेगवेगळया नावाने स्मरण करतात. तिच शक्ती या ‘दृश्य आणि अदृश्य’ जगताच्या सुक्ष्म कणात व अर्णुअणुत आहे या सत्याला ओळखल्यानंतर आपल्या पुर्वजांनी त्या परा शक्ती वर श्रध्दा ठेवायला सुरूवात केली आणि तिला ईश्वर असे सार्वजनिक नाव दिले. मग काही लोकांना या शक्तीचा वापर करण्याची याची कला आवगत झाली.
मग या शक्तीचा वापर करून काही महान व्यक्तींनी समाजिक सभ्यता स्थापन केली आणि जे समाज हिताचे नियम त्यांनी बनवले, त्या नियमांना आधार म्हणुन त्यांनी परा शक्तीच्या समर्थ्याला शब्द रूपात मांडले. पण पुढे चालून काही विज्ञानवादी महान व्यक्तींनी त्या परा शक्तीच्या शब्दरूपी व्यक्तीमहत्वाला अमान्या केलं आणि भौतिक दृष्टया त्यांची अमान्यता योग्यही होती.
अशा ईश्वरावर श्रध्दा ठेवणं किंवा न ठेवणं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे. पण ती शक्ती अस्तित्वात आहे’ हे एक शाश्वत सत्य आहे.
दुसर शाश्वत सत्य आहे तुमच्या विषयी, ‘तुम्ही’ म्हणजेच आत्म्या विषयी आहे. साधारणत: आत्मा म्हणजे एक रहस्यमयी वस्तू मानली जाते पण सर्वप्रथम आत्मा ही वस्तु नाही आणि तसेच ती रहस्यमय ही नाही. पण आत्मा शक्तीशाली जरूर आहे कारण आधी सांगितलेल्या पराशक्तीचा अंश म्हणजेच आत्मा. यात रहस्य काहीच नाही कारण ज्याला आत्मा म्हणतात ते तुम्हीच आहात. ज्याप्रमाणे सगळया ब्रम्हांडात डोळयांना दिसणार्या, इंद्रियांना जाणवणार्या वस्तू व पदार्थ असून इंद्रियांना न जाणवणारी शक्ती आहे त्याप्रमाणे माणसाच्या शरीरामध्ये सुध्दा तुमच्या व इतरांच्या इंद्रियांना न जाणवणारी अशी आत्मशक्ती अस्तीत्वात असते. वस्तवात तो माणुस म्हणजेच आत्मा असतो. समजा तुम्ही विचार करात आहात की, ‘मी आत्मा आहे’ तेव्हा तुमच शरीर म्हणजे आत्मा नाही. तर तुमच्या शरीराने ग्रहण केलेली गोष्ट म्हणजे आत्मा. आपण म्हणतो ‘माझं शरीर’ त्यात ‘माझं’ हा शब्द वेगळा आणि ‘शरीर’ हा शब्द वेगळा. माझं या शब्दाला तुम्ही आत्मा या शब्दाने बदलू शकता. तसेच ‘आत्मा’ हा शब्द ‘परा शक्ती’ या शब्दाने बदलू शकता.
एक उदाहरण पहा:.
एका तलावामधे १२ हौद बांधले.
प्रत्येक हौदामधे पाच पाच टाक्या ठेवाल्या
प्रत्येक टाकीमधे एक एक बादली ठेवली
आणि प्रत्यक बादलीमधे एक एक ग्लास ठेवला....
तर तलावामधे असलेले पाणी म्हणजे पराशक्ती आणि ग्लासमधे असलेलं पाणी म्हणजे आत्मा. म्हणजेच या विश्वात जे आहे तेच आपण आहोत.
“प्रत्येक जिव हा अव्यक्त ब्रम्हच होय.”
-स्वामी विवेकानंद
वर मी जे काय सांगितलं व जे पुढे सांगणार आहे ते फक्त लक्षात असू दया. त्या संबंधात कुठलीही कल्पना करू नका.
तुम्हाल ईश्वरा विषयी जास्त काही सांगितल नाही कारण, त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतोच असं नाही. ईश्वरा विषयी एवढच सांगू शकतो क ीत्याचं अस्तित्व आहे. आणि त्याला शरण गेल तर माणसाला जास्त संकटांना समोरं जावं नाही. पण आत्म्याला पूर्णपणे जाणून घ्यावं लागेल, कारण आत्मा म्हणजेच तुम्ही आहात.
न जायते म्रियते वा कदाचि
न्नायं भुत्वा भविता वा न भूय: ।
अजो नित्य: शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे ।। २० ।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता म्हणजेच,
‘हा जन्मत नाही किंवा मरतही नाही; हा जन्मला होता व पुन्हा: नाहीसा झाला असेही कधी होत नाही. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत पुराणतन(खुप पुर्वीचा) पुरूष आहे. शरीराचा नाश झाला, तरी ह्याचा नाश होत नाही’.
इथे ‘हा’ म्हणजे तुम्ही म्हणजेच आत्मा. आत्मा म्हणजे तुम्ही हे जरा स्पष्ट करून सांगतो.
एका प्रश्नाच उत्तर दया : “तुम्ही कोण आहात?” हा प्रश्न ऐकताच तुम्ही स्वत:कडे बोट करून म्हणाल “मी हा आहे” पण ज्या गोष्टीला तुम्ही ‘मी’ म्हणत आहात ते तुमचं शरीर आहे. मग तुम्ही कोण आहात?
तुमचे हात, तुमचे पाय, तुमचं नाक,तुमचे डोळे, तुमचे कान, तुमच्या शरीराचे इतर अवयव,तुमच शरीर मग ‘तुम्ही’ कोण आहात?
तुम्ही कोण आहात? हा प्रश्न कदाचित तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल आणि त्याची वेगवेगळी उत्तरे ही तुम्ही दिली असतील. पण इथं सांगण्याचा तात्पर्य असं की तुमच्या शरीराहून वेगळे तुम्ही ‘आत्मा’ आहात.
‘आत्मा’ म्हणजे एखादी काल्पनिक वस्तू नाही किंवा आत्मा म्हणजे इंद्रियांनी पाहाता येणारी वस्तू नाही, किंवा तुमच्या शरीरात आत्मा या या ठिकाणी आहे असं ही म्हणता येणार नाही, किंवा तुम्ही असं म्हणु शकत नाही की, मी आत्मा आहे, किंवा तुम्ही विचार करत आहात की मी आत्मा आहे हेही शक्य नाही. हा विचार आहे आणि विचार हा आत्मा नाही तर विचार करणारा आत्मा आहे.
तुम्ही म्हणाल की, मी आत्मा आहे.जर तुम्ही आत्मा पाहूच शकत नाही, तर तुम्ही म्हणुच शकत नाही कि मी आत्मा आहे.
तुम्ही स्वत:ला स्वत:च्या किंवा दुसर्यांच्या नजरेतून बघत असतात. आणि याची तुम्हाला सवय होते.त्यामुळे जेव्हा तुम्हाल आत्म्या बद्दल सांगितलं जातं व तुम्ही मान्य करता की, मी आत्मा आहे. तेव्हा तुमच्या सवयी नुसर तुम्ही स्वत: ला स्वत:च्य किंवा दुसर्याच्या नजरेतुन बघता. आणि स्वत:ला आत्मा म्हणजे कुणीतरी विशेष मानता. आत्म्याचा खारा अर्थ जाणुन घेण्यासाठी तुम्हाला ‘जप ही क्रिया’ करावी लागेल, पुढे आपण त्या विषयी चर्चा करणार आहोत.
माझा आत्मा असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुमच्या मनाच्या स्थितीला तुम्ही आत्मा म्हणता. मानसशास्त्रात दोन गोष्टी असतात एक म्हणजे भ्रम आणि दुसरी विभ्रम.
भ्रम होणे सर्वसामान्य गोष्ट आहे. अंधारात एखादया ‘दोरीवर पाय पडला’ तर ‘सापावर पाय पडल’ असा भ्रम होतो.
पण विभ्रम होणे ही सामान्य गोष्ट नाही. विभ्रम होणारी व्यक्ती मानसिक पातळी वर असंतुलीत असते. “मी खुप महान आहे”, “मला पोट नाही”, “मी उडत आहे”, “मला भूक लागत नाही”, “मी देवचा अवतर आहे”, “भूत दिसणे”, “मी आत्मा आहे”. हे सगळे विभ्रमच्या कक्षेत येउु शकता.
वरिलपैकी “मी आत्मा आहे” हा विभ्रम आत्म्याच्या बाबतीत होवु शकतो. पण पुढे सांगितलेल्या ‘वस्तविकता’ या विषयाला नीट समजून घेतल्यावर असा विभ्रम होणार नाही.
परिस्थिती
नासतो विदयते भावो नाभावो विदयते सत: ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभि: ।। १६ ।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता
“जे नाही ते आहेसे होत नाही व जे आहे ते नाहीसे होत नाही,असा नाही व आहे (सत व असत )ह्या दोहोंचा तत्त्वज्ञानी पुरूषांनी अंत पाहिला आहे.म्हणजे शेवट पाहून त्याच्या स्वरूपाचा निर्णय केला आहे”.
माणसाच्या मनाला नेहमी अस वाटत असतं कि आपल्या सभोवतीची परिस्थिती आपल्याला जशी हावी तशी असायल पाहिजे. स्वत:चे नाते संबंध, आपलं भविष्य,समजिक व आर्थिक उंची या विषयी आपल्या सधारणत: काही कल्पना असतात. आणि त्यानुसार आपण वागत असतो. आपल्याला नेहमी वाटत असतं की या परिस्थितीत बदल हा माझ्या मनाप्रमाणे व्हावा. पण मुळात मनला असे बदल पाहिजे असतात. जे सत्यात शक्य नाही. आणि या गोंधळात आपण आपल्या भोवती वेगळच जग निर्माण कारतो. आणि त्याच जगात राहातो. जर माणसाला स्वत:ची परिस्थिती बदलायची असेल तर त्याला सत म्हणजेच सत्य बघण्याची दृष्टी पाहिजे. सत्य म्हणजे फक्त सत्य बोलण असं नाही. तर सत्य म्हणजे सत्य विचार करनं.
आणि तिसरं शाश्वत सत्य हेच आहे किवस्तविकतेत जे आहे ते नाहीसे होत नाही ववस्तविकतेत जे नाही ते आहेसे होत नाही. आत वस्तविकता म्हणजे काय ते आपण समजून घेवू.
वास्तविकता
तर आत जाणुन घेउु ‘वास्तविकता’ म्हणजे काय?
त्या आधी वास्तविकतेचा फायदा काय ते बघा. वास्तविकता जेव्हा समजते तेव्हा कर्माची (ध्येयाची) जाणीव होते. काही कल्पना अशा असतात की त्याच्या मुळे आपल्याकडून ध्येयाला अनुसरून नसलेलं काम केलं जातं. पण वस्तविकता जेव्हा समजते, तेव्हा आपली सगळी कामे ध्येयाला अनुसरून असतात.
आता ‘वास्तविकता’ म्हणजे काय?
वास्तविकता म्हणजे ‘सत्य परिस्थिती’, जर तुम्हाला वास्तविकता बघायची असेल तर सगळे काल्पनिक विचार, अवास्तविक इच्छा सोडून दया. वर्तमान स्थिती कशी आहे याच अवलोकन करा. भविष्याविषयी स्वप्न पहाणं सोडून दया. कारण ‘स्वप्न आणि ध्येय’ याच्यातला फरक समजला तर स्वप्न बघण्याची गरजच नाही.
काही लोक स्वप्नाळू असतात ,उघडया डोळयांनी स्वप्न पाहणारे असतात. असे लोक स्वप्न पाहते वेळी काल्पनिक जगात रमून जातात. त्यातच स्वप्न व वास्तव यांची सरमिसळ होते आणि अशा वेळी स्वप्न एक असतं व वास्तव एक असतं. स्वप्न बघण्याची एक पध्दत आहे.
उदा. मला मंगळ ग्रहावर जायचं हे झालं स्वप्न. त्यालाच आपण ध्येय ही म्हणू शकतो. पण तुम्ही जर म्हणाल की, मी मंगळ ग्रहावर जाणार तिथे मजा करणार,तिथे हे करणार तिथे ते करणार. तर हा झाला स्वप्नाळु स्वभाव. लेखक अशी स्वप्न पाहु शकतो कारण त्याला माहीत असतं की आपण कल्पना करत आहोत. पण भविष्यात किंवा वर्तमानात स्वत:ला काही निवडक अनुभव यावेत अशा प्रकरची कल्पना ही घातक असते.
स्वीकार
स्विकार म्हणजे स्विकारणे, इथे हा शब्द वास्तविकता स्विकारणे या अर्थाने आहे.
सामन्यत: नेहमीच वास्तविकता इतकी दाहक असते की ती स्विकारण्यास माणूस तयार होत नाही. आणि वास्तविकता जो स्विकारत नाही तो स्वप्नाच्य जगात जगणं पसंत करतो. पण यशस्वी तोच होतो जो वास्तविकतेला सामोरा जातो. कुणीही असो त्याला वास्तवितेला सामोरं जावच लागत. त्यामुळेच जे वास्तविकतेचा स्विकार करायला शिकतात ते वस्तविकतेत जगायला शिकतात.
समजा तुम्हाला सिनेमा बघायला जायच आहे. ऐनवेळी तुम्हाला महत्वच्या कामानिमित्त जाव लागणार आहे. अशा वेळी आधी वास्तविकाता जाणुन घ्यावी लागेल, मग दोन्ही पैकी कुठं जायचं हे ठरवावं लागेल. हवा तो निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार तुम्हाला असतो.पण जर तुम्ही महत्वच काम पूर्ण करण्यासाठी गेलात तर तुम्हाला स्विकारावं लागेल की तुम्हाला कामानिमित्त यावं लागलं. आणि जर तुम्ही सिनेमाला गेलात तर तुम्हाला महत्वच काम सोडून गेल्यामुळे होणारं नुकसान स्विकारावं लागेल. जर तुम्ही न स्विकारता कोणत्या ही एका रास्त्यानं गेलात. तर तुम्ही एकही काम पुर्ण करू शकणार नाही. जेव्हा आपण वास्तविकता स्विकारतो तेव्हा आपण व्यथित होतो. एक तर स्वत:च्या चुकांमुळे किंवा दुसर्याच्या चुकांमुळे. या सगळया चुकांचा स्विकार करायला शिका. स्वत:च्या चूका आपण मान्य करतो. पण दुसर्यांच्या चूका? अशी परिस्थिती अनेक वेळा उत्पन्न होते की, दुसर्यांंच्या चुकांमुळे आपला तोटा होतो. तेव्हा हे स्विकार करावं लागेल कि चूका कराणारी व्यक्ती आपल्या संपर्कात आहे. पण स्वत:च्या चूका दुसर्यावर टाकून दुसर्याला दोष देणे योग्य नाही.
दुसर्याकडुन चुक झाली तर त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याच प्रमाणे स्वत:कडून झालेल्या चुकांसाठी मिळालेली शिक्षा स्विकारायला हवी. चूकांचा स्विकार केल्यामुळे बुध्दी स्थिर राहते.
चुका का स्विकारायच्या? किंवा वास्तविकता का स्विकारायची? तर आपल्या चूकांमधे व दोषांमधे सुधारणा घडवण्यासाठी.
सर्वात महत्वाच म्हणजे आपल ध्येय निश्चित करते वेळी सुध्दा वास्तविकता स्विकारावी लागते.
स्थिर बुध्दि
जेव्हा तुम्ही वास्तविकता जाणण्यास सक्षम होता. तेव्हाच तुम्ही ध्येय निश्चित करू शकता. आणि ध्येयाला अनुसरून कर्म करू शकता. कोणतही काम करण्यासाठी माणसात ते काम पुर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे अशी क्षमता प्रत्येकात असते. पण ज्यानां चित्त एकाग्र करून काम करण्याची सवय असते. त्यांना काम करतानां अडचणी येत नाही.
चित्त एकाग्र करण्यासाठी मनातील अनावश्यक गोष्टी काढून टाकल्या पाहिजे. अशीच एक अनावश्यक पण प्रत्यक माणसाच्या मनात असणारी गोष्ट म्हणजे ‘इच्छा’. कोणत्याही वस्तुची इच्छा असणे हा मनाच स्वभाव पण या इच्छांमध्ये आसक्ती असायला नको.
पण त्या आधी आपल्याला ‘इच्छा व ध्येय’ यांच्यातला फरक माहीत हवा. हा फरक समजुन घेण्यासाठी इच्छा म्हणजे काय हे माहीत असायला हवं.
कोणतीही इच्छा उत्पन्न होण्याची सुरूवात विषयापासुन होते. विषय म्हणजे इंद्रियांना मिळणारे अनुभव, इंद्रियांनी विषयाची जाणिव होते. मग मनाकडून विषयाचे चिंतन केल जातं. विषयाच्या चिंतनामुळे त्याविषयाची आवड उत्पन्न होते. आवडीमुळे त्या विषयाच्या अनुभवास कारणीभूत वस्तु मिळवण्याची इच्छा निर्माण होते. मग क्षणाक्षणाला ती इच्छा मनात अस्तित्वात असते. जर इच्छा पुर्ण होत नसेल तर क्रोध उत्पन्न होते. क्रोध म्हणण्यापेक्षा त्याबद्दल चिड निर्मण होते. राग आल्यामुळे माणसाची विवेकबुध्दी नष्ट होते. जर बुध्दीचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होते.
इच्छांचा कितीही त्याग केला तरी त्या पुन्हा पुन्हा निर्माण होतात. जो पर्यंत इंद्रियांवर नियंत्रण मिळवून विषयांना स्वाधिन मनाने स्विकारायला जमत नाही तोपर्यंत इच्छा उत्पन्न होत राहतात.
मनाचे दोन प्रकार असतात एक अंतर्मन व दुसरं बाह्य मन . बाह्य मनात जे विचार पुन्हा पुन्हा येतात असे विचार संस्कार रूपाने अंतर्मनात कोरले जातात. आपण सहज ( अचानक ) ज्या प्रतिक्रिया देतो त्या मनावर होणार्या संस्कारावर अवलंबुन असतात. जप क्रिया केल्याने अंतर मन आपल्या नियंत्रणात येत. ंमन आपल्या नियंत्रणात असेल तरच शुध्द बुध्दीने वावरता येत.
ज्याची बुध्दी इच्छाराहित असते अशी स्थिती एकाग्रतेची स्थिती असते. भगवद् गितेमधे एक सिध्दांत आहे:
ध्यायतो विषयान्पुंस: सगस्तेषुपजायते ।
सगत्संजायते काम: कामात्क्रोधोऽभिजायते ।।६२।।
क्रोधाभ्दवतिसंमोहो संमोहात्स्मृतिविभ्रम: ।
स्मृतिभ्रंशाद् बुध्दीनाशो बुध्दीनाशात्प्रणश्यति ।।६३।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता
अर्थ :
सदोदित विषयांचे चिंतन करणार्या पुरूषाला त्या विषयाची आवड उत्पन्न होते, त्या आवडी पासून इच्छा उत्पन्न होते, त्या इच्छेपासून ( प्रतिबंध झाल्यानें )क्रोध उत्पन्न होतो.।। ६२ ।।
क्रोधामुळे विवेक सुटत जातो. अविवेकामुळे विस्मराण होते, विस्मराणामुळे निश्चयात्मक बुध्दी नष्ट होते, आणि बुध्दी नाश झाला कि सर्वस्वाचा नाश होतो. ।। ६३ ।।
(अध्याय दुसरा)भगवद् गीता
त्यासाठी विषयांवर उपाय म्हणून दुसरा श्लोक सांगितला आहे:
नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यत्र्छण्वन्स्पृशच्त्रिघ्रन्नन्गच्छनस्वपश्वासन् ।। ८ ।।
प्रलपन्विसृजगन्गृहन्नुन्मिषन्निमिष न्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता
अर्थ :
कर्मयोगी तत्ववेत्त्यानें पाहतांना, ऐकतांना,स्पर्श करतांना,वास घेतांना, खातांना, झोपतांना, श्वासोच्छास करातांना, ।। ८ ।।
तसेच बोलतांना, त्याग करतांना, ग्रहण करतांना, डोळयांच्या पापण्या उघडतांना किंवा मिटतांना देखील इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठायी आपोआप प्रवृत आहे असे ओळखून मी काहीच करत नाही असे समजावे. ।। ९ ।।
(अध्याय पाचवा)भगवद् गीता
म्हणजेच ‘विषय’ हे इंद्रियाशी संबंधीत असतात आणि आत्मा म्हणजे आपण इंद्रियाशी किंवा विषयाशी जोडलेलो नाही आहोत.
इंद्रिय विषय इंद्रियांच्य ठिकाणी प्रवृत असतात. एखादी वस्तु पाहतांना तुमच्या मनामध्ये तुम्हाला जे काय वाटतं ते विषय आहेत. असे हे विषय मनात अनेक विचार निर्माण करतात. मग चित्त वेगळ्याच ठिकाणी गुंतल्यामुळे भीती, चिंता, लोभ, आसक्ती यांन सारखे विचार हि निर्माण होतात. त्यासाठी विषयाना स्वत: सोबत न जोडता जे काय विचार मनात येत आहेत ते स्वभावत: मनात येत आहेत हे समजुन घेतलं पाहिजे.
ज्याला हे जमलं त्याची बुध्दी स्थिर राहाते.
कर्म
कर्म म्हणजे तुम्ही जे काय ‘करतात’ ते कर्म प्रत्येकाला करावंच लागतं. कारण जो कामाचा त्याग करतो. वास्तवात तोही कर्मच करत असतो. साध्या भाषेत सांगायच तर जो आळशी माणुस काम नको म्हणून कर्म न करण्याचा आग्रह करतो त्याच्याकडून त्याचा स्वभाव कर्म करून घेत असतो, पण त्याला माहीत नसतं क ी,आपण कर्म करत आहोत. या कारणामुळे अशी कर्मे त्याच्या प्रगतीसाठी निरूपयोगी,कधी-कधी प्रतिबंधक तर असतातच शिवाय दु:खदायक ही असतात. तुम्हाला नक्की कधीतरी असं वाटलं असेल कि आपण हे सगळं काय करतो आहे आणि कशासाठी? कारण वास्तवत तुम्ही म्हणजे आत्मा काहीच करत नाही सगळी मानसिक व भौतिक कर्म त्रिगुणांमुळे आपल्याकडुन केली जातात.
जर कर्म करायचचं आहे तर माणसाने अस कर्म केल पाहिजे की, ज्यामुळे माणसाला सुख,शांती व समाधान मिळेल.
कर्म म्हणजे काय?
कर्म म्हणजे आपण केलेल्या क्रिया. क्रिया दोन प्रकारच्या असतात,
१) मानसिक क्रिया (अभौतिक क्रिया)
२)भौतिक क्रिया
१) मानसिक क्रिया (अभौतिक क्रिया) :
मानसिक क्रियांमध्ये मुख्य आहे विचार करणे. आपण विचार करतो ते एक प्रकारचं कर्म आहे.
२) भौतिक क्रिया:
चालणे, बोलणे अशा सगळया शारीरिक क्रिया यांना भौतिक क्रिया म्हणता येईल.
माणुस काहीही करत नसला तरी विचार करणे ही मानसिक क्रिया आणि श्वासन क्रिया कारातच असतो. झोप घेणे, विश्रांती घेणे ही सुळ एक क्रियाच आहे. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे आपल्याला क्षणाक्षणाला कर्म करावचं लागेल. आपण जे काय कर्म करतो ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. अशाप्रकारे क्रियांवर नियंत्रण मिळवणार्याला विवेकबुध्दी प्राप्त होते.
पण त्यासाठी कर्मफलआसक्तीचा त्याग करावा लागतो. कर्मफलआसक्ती म्हणजे कर्म केल्यावर मिळणार्या गोष्टी बद्दल मनात कलेला विचार.
कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन ।
मां कर्मफलहेतुर्भुमी ते संगोऽस्त्वकर्मणि ।। ४७ ।।
अर्थ:
कर्मकरण्यापुरता तुझा अधिकार आहे, फल(मिळणे किंवा न मिळणे हे) केव्हाही तुझ्या अधिकारांतील म्हणजेच ताब्यतील नाही । म्हणुन तु ( माझ्या कर्माचे ) अमुक फल मिळावे असा हेतु मनात ठेवुन काम करणारा होउु नकोस, आणि कर्मे न करण्याचा आग्रह तु धरू नकोस.
कर्मफलआसक्ती मागील मनोवैज्ञानिक कारण समजून घेण्यासाठी वर्तमान बुध्दी म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. “वर्तमान बुध्दी म्हणजे वर्तमान कळात स्थिर असणारी बुध्दी.”
आपण जेव्हा एखाद काम( कर्म ) करत असतो तेव्हा आपली एकाग्रता त्या कामात असते. पण जेव्हा आपण त्या कामाच्या मिळणार्या मोबदल्या (फला) बदल विचार करतो. तेव्हा लगेच आपली एकाग्रता भंग पावते. साधाराणत: सगळेच काहीतरी मिळवण्यासाठीच काम करतात काहीतरी मिळवण्याच्या विचारांंमुळे कर्मफला विषयी विचार करण्याची सवय लागते व आपण दिवस रात्र, क्षणाक्षणाला कर्मफला विषयी विचार करतो, मग कमामध्ये चित्त एकाग्र होत नाही. कर्मफलआसक्ती माणसची गतिमानता कमी करते. माणूस कर्मामधे गतिमान तेव्हाच होतो जेव्हा तो कमफलआसक्तीचा त्याग करतो.
“बुध्दौ शरणमन्विच्छ कृपणा: फलहेतव:” फलाकडे नजर ठेवून काम करणारे लोक कृपण म्हणजेच दिन किंवा तुच्छ असतात. कर्मफला विषयी चिंतन करणार्याची विचार शक्ती विवश म्हणजेच लाचार बनते.म्हणजे त्याल सत्य दिसून ही तो लाचार असतो. अशा परिस्थीतीत त्याची निर्णय घेण्याची क्षमता कमी होते किंवा त्याने घेतलेले निर्णय चुकतात.
दलदलीत सापडलेला माणूस जसा स्वत:चा मृत्यू पाहत असुनही काहीच करु शकत नाही. त्याचप्रकारे कर्मफलासक्त व्यक्ती स्वत:चा तोटा कळत असुन ही काहीच करु शकत नाही.
कर्म या संज्ञे संदर्भात येणारी अजुन एक गोष्ट म्हणजे ‘यश किंवा अपयश’. पुर्ण शक्तीने काम करत असताना यश आणि अपयश या दोन गोष्टींकडे कधीही लक्ष देवु नये. यश आणि अपयश, चांगलं व वाईट, मान व अपमान, शीत व उष्ण अशा प्रकारच्या व्दंदांना समान व संतुलीत दृष्टीने बघण्याला समबुध्दी असे म्हणतात.
कर्म या संज्ञे संदर्भात येणारी अजुन एक गोष्ट अशी की, कर्म हे त्रिगुणांकडुन केल जांत.
प्रकृते: क्रियमाणानि गुणै: कर्माणि सर्वश: ।
अहंकारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ।। २७ ।।
अर्थ:
वस्तुत: सर्व कर्मे प्रकृतिच्या सत्व,रज,तम या गुणांकडून केली जातात. पण अहंकाराने ज्याच्या अंतकरणाला मोह पडलेला असतो, तो मुढ मीच कर्ता आहे असे समजतो.
जेव्हा आपला जन्म होतो तेव्हा पासुनच आपल्याला स्वत:ची जाणीव होते आणि जीवन जगत असतांना आपल्या इंद्रियांमुळे तुम्ही या संपुर्ण जगाशी जोडले जातात. वास्तवत जन्मापूर्वी तुम्ही या जगाशी जोडलेले असतातच पण या वेळी तुम्ही इंद्रियांमुळे जोडले जातात. दुसर्या वेळी तुम्ही या जगाशी तर जोडले जातात पण यावेळी तुम्हाला स्वत:च वेगळ अस्तीत्व असत आणि त्यालाच अहंकार म्हणतात. जीवण जगत असतांना तुम्ही जे काय सुख व दु:ख भोगतात त्या आधारावर तुम्हाला हा अभ्यास म्हणजेच सराव होतो कि, मी जगा पासुन वेगळा आहे त्यालाच अहंकार म्हणतात.
आणि या अहंकारामुळेच माणुस असं समजुन चालतो कि , सर्व कर्मे मीच करात आहे. प्रकृतिचे म्हणजेच नैसर्गिकत: आपले जे गुण आहे त्याच्याकडून सर्व कर्मे केली जातात. जेव्हा तुम्हाला त्रिगुणांचे स्वरुप कळेल तेव्हा या गोष्टी समजण्यास सोप्या जाईल.
त्रिगुण
आता मी तुम्हाला एक महत्वचं विज्ञान सांगणार आहे. सर्व प्रथम त्रिगुण म्हणजे काय ते समजावून घेवू. माणूस संपुर्ण आयुष्यभर या तीन गुणांमधे जगत असतो. दिवसातून कितेक वेळा आपण एक गुणातुन दुसर्या गुणात जात असतो. माणसाच वर्तन हे एका वेळी एक किंवा दोन मिळून अशा प्रकारे असतं. प्रत्येक माणसाच्या मनाचा तीन पैकी एक असा प्रधान( प्राईम ) गुण असतो.
इथ ‘गुण’ म्हणजे वर्तन ‘त्रि’ चा अर्थ तीन. प्रत्येक गोष्टीच वर्तन तीन प्रकारात विभगलं गेलं आहे. वर्तन हे भावना व प्ररणा यांच्या वर अवलंबुन असतं, भावना व प्ररणा या जन्माने किंवा संस्काराने प्राप्त होतात. आत्मा म्हणजेच तुम्ही स्वत:पासून वेगळे असे त्रिगुण पुढील प्रमाणे:
१) सतोगुण : प्रकाश आणि ज्ञान
२) रजोगुण : भोग आणि लोभ
३) तमोगुण : अज्ञान आणि मोह
माणसाने नेहमी सत्वगुणात असायला पाहिजे, त्यासाठी आधी त्रिगुणांचा अभ्यास करावा लागेल. हे समजल्यवर रजोगुण व तमोगुण यांना दाबुन सत्वगुण जीवणात आणावा लागेल.
आपण कोणत्या गुणात आहोत हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला नाडी विज्ञान माहीत पाहिजे आपल्य शरीरात ७२ हजार नाडया असतात. त्यांपैकी प्रमुख तीन आहेत, आपल्या माहितीसाठी दोन महत्वाच्य आहेत.
१) इडा
२) पिंगला
ही योग शास्त्रातील नावे आहेत आपण सोप्या भाषेत डावी नाडी व उजवी नाडी असे म्हणू दोन्हीं नाडया मेंदुच्या डाव्या व उजव्या भागाला जोडलेल्या असतात. या दोन्ही नाडया शरीराच्या दोन भागात प्राण व अपान प्रवाहीत करत असतात. ज्या भागात प्राण प्रवह असतो त्या भागातील मेंदु वर्तमानत कार्यरत असतो.
डावा मेंदू कार्यरत झाल्यावर मन कार्यरत होते. व उजव मेंदू कार्यरत झाल्यावर बुद्धी कार्यरात होते.
सधारणत: एका नाडीतुन प्राण प्रवाहीत होतो व दुसर्या नाडीतुन अपान. ज्या नाडीतुन प्राण प्रवाहीत होतो त्या बाजुची नाकपुडी चालु असते, म्हणजेच त्या नाकपुडीतून हवा सहज (जास्त ताकत न लावता) येउु-जाउु शकते, त्यावेळी दुसरी नाकपुडी बंद असते.
डावी नाकपुडी चालु असते तेव्हा व्यक्ती तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो.
२) उजवी नाकपुडी चालु असते तेव्हा व्यक्ती रजोगुणाच्या प्रभावाखाली असतो.
३) दोन्ही नाकपुडया चालु असतात तेव्हा व्यक्ती सत्वगुणाच्या प्रभावाखाली असतो.
यापैकी तिसरी स्थिती सगळ्यात चांगली. पण कोणती नाडी चालु किंवा बंद करायची यासाठी दोन पध्दती आहे, एक बाह्य प्रयत्न व दुसरी अतंर प्रयत्न. बाह्य प्रयत्नात ‘प्राणायाम’ ही क्रिया करावी लागते, अंतर प्रयत्नात ‘जप’ ही क्रिया करावी लागते.
सर्व सजीव हे त्रिगुणांच्या प्रभावा खाली कर्म करत असतात. याआधी सांगितल्या प्रमाणे हे तीन गुण माणसाकडून कर्म करवून घेत असतात. वस्तवात आत्मा हा अकर्ता आहे.
प्राणायाम क्रिया
प्राणायाम म्हणजे प्राणाचे विविध आयाम म्हणजेच असे विविध अभौतिक क्षेत्र. प्राणायाम ही योगशास्त्रातली एक प्रमुख क्रिया आहे, पण इथ आपल्याला मानसिक संयम साधण्याकरिता ही क्रिया करायची आहे. त्यामुळे जास्त खोलात न शिरता समजुन घेउुया.
यात उजवी नाकपुडी अंगठयाने बंद करुन डाव्या नाकपुडीतून प्राणवायू आत घ्यायचा नंतर बोटाने डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीतून प्राणवायू सोडायचा. अस पाच सहा वेळा केल्यावर उजव्या नाकपुडीतून प्राणवायू सोडावा. ही क्रिया सकाळी करणं योग्य असतं ही प्राणयाम क्रिया केल्यानंतर मन शांत होतं. प्राणयाम अशास्त्रशुध्द पध्दतीने केल्यास धोकादायक असतो.
आपण आतापर्यंत खुप काही बोललो, बर्याच गोष्टी समजणार्या होत्या. काही गोष्टी न समजणार्या होत्या.काही गोष्टी अशा होत्या की त्यांची योग्य व्याख्या कुठंच मिळत नाही. या अशा सुक्ष्म गोष्टी फक्त ध्यानाव्दाारेच समजू शकतात. ‘ध्यान’ म्हणजेच एखादया गोष्टी वर लक्ष एकाग्र करणे. आणि एकाग्रतेसाठी जप क्रिया आवश्यक आहे.
मी जे काय सांगितलं त्या गोष्टी जप केल्याशिवाय समजणार नाही, आणि त्या गोष्टी तुम्हाला समजल्याच नाही. तरी तु सगळेच त्यांचा स्वीकार कराल असे नाही, कारण ज्या वेळी तुम्ही त्या गोष्टीचा स्विकार कराल त्या वेळी एक शक्तीशाली चरित्र म्हणुन तुम्ही जगसमोर याल ( ‘आणि असे लोक खुप कमी असतात’ ). म्हाणून आता जप क्रियेमधील विज्ञान तुम्हाला सांगणार आहे.
आपल्या मेंदुमधे अनेक विचार येतात आणि जातात, पण त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं. विचारांना नियंत्रणात आणण्यासाठी त्या विचारांन स्वीकर आवश्यक असतं, त्या विचारांमधे मनला भ्रमीत करणार्या कल्पना नाही पाहिजे.
जप क्रिया ही अतिप्रचिन योगीक पध्दत आहे या पध्दतध्डीारे विचारांवर नियंत्रण मिळवता येतं. धर्मशास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे कि इश्वराच्या अनुभुतीसाठी जप क्रिया करावी.
सर्वच धर्मामधे माळेवर पवित्र शब्द मोजण्याची पध्दत आहे, या पध्दतीचा वापर करुन कितेक महान लोकांनी या आदर्श समाजची रचना केली. पण काही लोक ‘धर्मिक क्रिया’ म्हाणुन या गोष्टीकडे कधीच लक्ष देत नाही. जप करण्यासाठी एक ‘पवित्र शब्द’ हवा असतो जो आपल्याला अध्यात्मिक गुरुकडुन मिळु शकतो. जप करण्याच्या अनेक पध्दती आहे, त्यात प्रभवी पध्दत म्हणजेच मनातल्या मनात जप करणे. ज्या ठिकाणी (स्पेस) तुम्ही विचार करतात तेथे पवित्र शब्द पुन्हा पुन्हा म्हणायचा असतो त्यालाच जप म्हाणतात.
समजा तो शब्द आहे अबक तर अऽबऽक म्हणजल्यानंतर लगेच लक्ष अ वर जायला पाहीजे पुन्हा ब ,क आणि लगेच पुन्हा अ वर लक्ष गेलं पहिजे. यामुळे तुमच्या विचारां लय प्राप्त होते. तसेच श्वसाल सुध्दा लय प्राप्त होते. त्यांमुळे तुमचे विचार गतिमान होतात.
त्यासाठी तुम्हाला तो शब्द म्हणत राहावा लागेल जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा तेव्हा तो शब्द म्हणत राहाव लागेल. जर तुम्हाला वाटत असेल कि नेहमी पवित्र शब्दच उच्चरत बसायचा तर मग बकि काम केव्हा करायच तर जेव्हा तुम्हाला सवय होते तेव्हा तो शब्द तुमच्या मनाच्या माघच्या (ब्रगग्राउुंडला) पटलावर जपला जातो. त्यामुळे जपाचा सर्व सामन्य फायदा असा आहे कि, तुमच्या मनातले अतिरिक्त विचार नाहीसे होतात, परिणामी तुम्ही पुर्ण बुद्धि वापर करु शकता.
जेव्हा तुम्ही हा जप कराल खुप जास्त प्रमाणात तेव्हा तुम्हाला सवय होईल आणि तुमच काम करत असतानां सुध्दा तुम्ही जप करु शकता. जप करत असतांना जे विचार येतात ते विचार वास्तववादी, आत्मविश्वसाने भरलेले व सर्वमान्य असे असतात. असे विचार मांडणर्या लोकानां बुळ्ीमान म्हणतात.
पण हे सगळं कस घडतं? लक्ष दया, आधी सांगितल्या प्रमाणे आपल्या दोन्ही नाकपुडयातुन प्राणवायु व अपाणवायु वाहत असतात. आपल्याला हया दोन्ही वायुची गति समान करायची असते. त्याकरिता आधी या दोन्ही वायुंना नियंत्रित करावं लागेल.
जप क्रिया करत असतांनापुढील विघ्न म्हणजेच अडथाळे निर्माण होतात :
(१) आळस : जर आळस आला तर कोणतही काम पुर्ण होत नाही तर जप काय होणार.
(२) आजारापण : जर स्वस्थ बरोबर नसेल तर कोणत्याच कमात मन लागत नाही, त्यामुळे जप क्रिया करण्यास अदथाळा येतो.
(३) मानसिक तणाव : मानसिक तणावत जप क्रिया घडत नाही.
(४) संशय : जप करुन काय फायदा होईल असे विचार मनात आले तर संशय निर्माण होते. त्यामुळे आपण जप करु शकत नाही.
(५) भोगासक्ती : जर मन विषय भोगण्यात गडलेले असतील तर जप करण्यास मान होत नाही.
जेव्हा तुम्ही जप करायला शिकाल तेव्हा जप करते वेळीसुध्दा विध्न येतात. ते पुढील प्रमाणे :
(१) निद्रा : जप शिकत असताना तुम्हाल झोप येवु शकते. जर झोप आली तर सावध राहायला पाहिजे.
(२) भ्रम : सुरवातिला जप कराते वेळी भ्रम होतात. जसे की, कानात मोठे मोठे आवाज होणे,आपल शरीरा कुठं तरी दुर जावुन पडलं आहे अस वाटणे. पण आपण वस्तविकते बद्दल विचार केल्यास असे भ्रम होत नाही.
(३) संशय : संशयाबद्दल मी आधी सांगितलं आहे. आपाण जे काय करत आहोत त्या वर आपला विश्वास असायला पाहिजे.
(४) अकर्मण्यता : जप क्रिया करतानां विचार नाहीसे झाल्यामुळे काम करावसं वाटतं नाही पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कि, माणसाल प्रत्यक सेकंदाला सेकंदाच्या प्रत्येक भागाला काम करावच लागतं. म्हणुन धेयाल अनुसरुन कर्म करायलच पहिजे.
(५) मृत्युभय : जप करात असतांन मराणची भीती वाटते ती भिती वाटु न देता जप करायला पाहिजे.
प्रतिक्रिया
5 Feb 2015 - 2:04 pm | प्रसाद१९७१
केव्हडा मोठा लेख, स्क्रोल करायलाच वेळ लागला
5 Feb 2015 - 2:08 pm | पिनुराव
नविन आहे मी
5 Feb 2015 - 2:07 pm | पिनुराव
काहि चुक झाल्यास "नया है वह" म्हणा.
5 Feb 2015 - 2:16 pm | जेपी
बर्याच दिवसांनी जपाला बसतोय.
ओम पॉपकॉर्नाय नम:
5 Feb 2015 - 2:26 pm | पिनुराव
अरे व्वा ! नविन मन्त्र बनवलाय वाटत ?
5 Feb 2015 - 3:21 pm | आदूबाळ
सर, कुठे आहात तुम्ही, सर?
लेखकासाठी: जे तुमच्या बादलीत आहे ते सरांच्या हौदात होतं...
(ह. घ्या.)
5 Feb 2015 - 4:45 pm | पिनुराव
अरे बाप रे तुम्ही पुर्ण वाचल हा हा हा हा हा हा हा
5 Feb 2015 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा
जे तुमच्या बादलीत आहे ते सरांच्या हौदात होतं. >>
खरच रे खरच!
कुठे - गेलात हो..... (पां डुब्बा चे :-D ) सssssssssर! :-D या णा .... गडे धाऊन! 
5 Feb 2015 - 6:04 pm | बॅटमॅन
जळी स्थळी काष्ठी पाषाणी पां डुब्बा दिसलाच पायजे का ओ =))
5 Feb 2015 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
@पां डुब्बा दिसलाच पायजे का ओ >> =)) अर्रे मेल्या हलकट खाटुका.. इथे तर दिसायालाच पाहिजे! :-D कारण त्यानी की नै,याच सरांन्ना एक संदेस चारिला होता! :-D
मग, यायला णको का ८ वण! :P
5 Feb 2015 - 10:13 pm | स्पा
खिक्क
माझे लाडके सर
मिस करतो खुप
5 Feb 2015 - 10:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
माझे लाडके सर
मिस करतो फार
हे जास्त बरं दिसेल नाही का ?
: यमक्या इए
5 Feb 2015 - 10:30 pm | अत्रुप्त आत्मा
हे बघ रे खाटुका! =))
माझे लाडके सर =)))))
5 Feb 2015 - 4:50 pm | पिनुराव
हे सगळ लिहिला तेव्हा मी केवळ १७ वर्षाचा होतो आणि वेळे आभावी यात काही एडीट केलेलं नाही
5 Feb 2015 - 4:52 pm | पिनुराव
आता केवल २२ च आहे. त्या मुले समजून घ्या एवढ्या भयानक कॉम्मेंत्स करू नका
5 Feb 2015 - 5:09 pm | सस्नेह
सतराव्या वर्षी एवढा व्यासंग ? धन्य !
5 Feb 2015 - 5:16 pm | जेपी
वय आणी व्यासंग यांचा संबध असतो असे मानत असाल तर तो तुमचा भ्रम आहे.
याची बेशर्त स्विक्रुती करा *biggrin*
5 Feb 2015 - 5:20 pm | सस्नेह
ज्ञानियाचा फोटू शेजारीच असताना ही चूक मी कशी करेन ? =D
5 Feb 2015 - 7:48 pm | तुषार काळभोर
"वयाच्या मानाने बरं लिहून गेला.."
श्रेयाव्हेर": डॉक.
5 Feb 2015 - 5:12 pm | तिमा
वाचायला घेतलं तेंव्हा ६० वर्षांचे होतो. आता किती वय झालं असेल कुणास ठाऊक!
5 Feb 2015 - 5:26 pm | सस्नेह
=))
5 Feb 2015 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
6 Feb 2015 - 4:24 pm | विअर्ड विक्स
:))))
6 Feb 2015 - 7:12 pm | जातवेद
*lol*
7 Feb 2015 - 12:59 pm | सतीश कुडतरकर
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
5 Feb 2015 - 6:28 pm | क्लिंटन
बापरे नुसता हा लेख वाचायला आणखी सतरा जन्म घेतले तरी यातले एक सतरांशही मला कळणे शक्य नाही.
तेव्हा तूर्तास तुमचे मिपावर स्वागत या पलीकडे काही लिहित नाही :)
5 Feb 2015 - 6:50 pm | बाबा पाटील
च्यामारी खरच काय लिवलय हो बाप्पु,कुणाला कळाला आसन तर जरा इस्काटुन सांगा वाईच.*dash1* *DASH* *WALL*
5 Feb 2015 - 7:29 pm | दिपक.कुवेत
आधीच ऑफिस मधे बॉस नामक प्राणी पिडत असतो त्यात मिपावर हलकं (विरंगुळा ह्या अर्थाने) याव तर हे असं??? प्लीज जरा माणसांना समजेल अश्या भाषेत परत भाषांतर करुन ईथे टाईप कराल का??
5 Feb 2015 - 7:30 pm | विशाखा पाटील
हा लेख म्हणजे एक मोठा ग्रंथ आहे. समजून घेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला, पण आत्मा रजोगुण आणि तमोगुणातच भटकत असल्यामुळे कर्मसिद्धीस गेले नाही.
एवढं अकाली ज्ञान आपण कसं काय मिळवलं, याचं आश्चर्य वाटलं.
5 Feb 2015 - 8:55 pm | अत्रुप्त आत्मा
@अकाली ज्ञान >> ठठो! :-D
5 Feb 2015 - 9:08 pm | अजया
=))
5 Feb 2015 - 9:49 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
5 Feb 2015 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
पण आत्मा रजोगुण आणि तमोगुणातच भटकत असल्यामुळे कर्मसिद्धीस गेले नाही.
अआ, बघा लोक काय म्हणतायत तुम्च्याबद्दल ;) :)
5 Feb 2015 - 7:35 pm | विवेकपटाईत
लेख आवडला , तीन-चार भागात टाकला असता तर जास्त चांगले झाले असते. समजायला सौपी गेला असता.
तुमच्या वयात मी अर्थात २२ व्या वर्षी आयुष्य शनी बाजारात (जनकपुरी येथील) हिरवळ पाहण्यात व्यर्थ घालविले, जेणे करून हृदयावर एवढे घाव पडले कि गेल्यावर्षी हृदयाला दुरुस्त करावे लागले.) असो.
5 Feb 2015 - 9:43 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
पोद्दार-पावसकर बाईंचा णाणावाड्यातला षिष्योत्त्म सापडला =))
काय अफाट साधणा म्हणायची बाप्पा? त्या मायावी श्रीक्रुष्णाणंतर आपणचं. कुठे आहेत आपले दोन्ही चरणंकमळं? पायावर डोके दणादण आपटावे म्हणतो. आपल्या विश्वरुपदर्शनाने गारठलो म्हाराजा....तलावामधे असलेली व्हीस्की आणि ग्लासात असलेलं पाण्याच्या अथांग भोवर्याच्या गर्तेत मी बुडुण चाल्लोय रे भगवंता....ह्या जण्म्मृत्युच्या फेर्यातुन तुचं मला तार रे बाबा...!!!
अहं ब्रम्हास्मी...
5 Feb 2015 - 11:05 pm | अत्रुप्त आत्मा
@कुठे आहेत आपले दोन्ही चरणंकमळं? पायावर डोके दणादण आपटावे म्हणतो. >>> =)) पळून गेले असतील! =))
6 Feb 2015 - 2:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
*dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO: *dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO: *dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO: *dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO: *dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO: *dash1* *DASH* *WALL* *wacko* %) %-) :-$ :$ :wacko: :WACKO:
6 Feb 2015 - 2:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हे असं झालं गुरुजी माझं काल.
6 Feb 2015 - 2:08 pm | सविता००१
बेक्कार हाणलं :)
6 Feb 2015 - 12:12 am | नाटक्या
चार पाच वर्ष लागतील वाचायला आणि समजुन घ्यायला तर ४-५ जन्म बहुदा!!!
6 Feb 2015 - 12:16 am | रामपुरी
हा कुणाचा डुआयडी म्हणायचा?
6 Feb 2015 - 11:01 am | पिनुराव
मी लिहीलेलं कुणीतरी वाचत आहे आणी त्यावर प्रतिक्रिया देत आहे, ऐवढं माझ्या साठी खुप आहे
तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत की वाईट !!
खरंच मला समजत नाही आहे
पण आता मी माझे विचार साध्य भाषेत आणि मनोरंजक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करेल आणि तुमची भाषा व विचार जाणुन, समजुन घेण्याचा प्रयत्न करेल
6 Feb 2015 - 12:19 pm | वगिश
लिहीलय छान,माझ्या कुवती बाहेर आहे.
6 Feb 2015 - 11:05 am | जेपी
मी लिहीलेलं कुणीतरी वाचत आहे आणी त्यावर प्रतिक्रिया देत आहे, ऐवढं माझ्या साठी खुप आहे
तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत की वाईट !!
खरंच मला समजत नाही आहे
पण आता मी माझे विचार साध्य भाषेत आणि मनोरंजक पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न करेल आणि तुमची भाषा व विचार जाणुन, समजुन घेण्याचा प्रयत्न करेल
माझा डु आयडी आहे का ? *scratch_one-s_head*
6 Feb 2015 - 11:19 am | पिनुराव
माझा डु आयडी म्हणजे
6 Feb 2015 - 12:17 pm | वगिश
मला सखाराम गटने ची आठवन आली.
6 Feb 2015 - 10:19 pm | असा मी असामी
हेच सांगायला आलो होतो...
6 Feb 2015 - 12:27 pm | ज्ञानोबाचे पैजार
दुजेपणी ठाव द्वैत ते फेडिले | अद्वैत बिंबले तेजोमय ||
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक | निवृत्तीने चोख दाखविले ||
तुम्ही बरीच माहिती गोळा केली आहे.
त्या माहितीचे आकलन करुन घेण्यासाठी बराच अवधी आहे तुमच्या कडे.
सध्या तरी ह्या गाण्याचा आनंद लुटा.
https://www.youtube.com/watch?v=CJJgZAwR9f0
पैजारबुवा,
6 Feb 2015 - 12:33 pm | नाखु
वाचेल तो "वाचे" ल *beee*
न वाचेल तो नक्की वाचेल!! *biggrin*
दुपारचे १२ वाजलेत गीतगंगा मध्ये ऐकूया सुमधूर गीत " बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला"
6 Feb 2015 - 1:19 pm | पिनुराव
जेवढी माहिती लिहीलेली आहे तेवढी समजल्या नंतरच प्रकाशित केली.
या व्यतिरीक्त माहीती मीसळपाव वर मीळ॓ल अशी आशा आहे.
6 Feb 2015 - 1:31 pm | जेपी
गुर्रुरदेवे रचला पाया शिष्य चढला रे कळशी. *wink*
6 Feb 2015 - 1:51 pm | पिनुराव
मी न पाया न कळसावर
फक्त नजर माझी कळसावर
पाय माझे वाळवंटी पंढरपुराच्या
आणि ग्यानबा तुकाराम जिभेवर
6 Feb 2015 - 2:02 pm | प्रमोद देर्देकर
पहिले काही ओळीत आत्मा आत्मा करताय तेव्हा आधी मला वाटलं की आमच्या गुरुजींना तुम्ही भेटला आहात आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं ते लिहलंत की काय. मग आम्ही (म्हणजे मी आणि ट.का. काका) एवढे दिवस लाईनीत आहोत त्याचा काय फायदाच नाही झाला म्हणायचा.
नंतर कळले की हे लिखाण समजुन घेण्यासाठी सगा, संक्षी, विटेकर वगैरे प्रभृतींचा एकाच दिवशी आणि एकाच वेळी क्लास लावावा लागेल, मग जी डोक्यात भेळ तयार होईल की यंव.
मग काय बिशाद आहे हे असले लेख न समजण्याची.
असो मि.पा. वर स्वागत.
6 Feb 2015 - 2:43 pm | धडपड्या
सदर लेखक स्वत:च म्हणत आहेत, की, समजल्यावर प्रकाशित केलंय लेखन... त्यांनी १७ व्या वर्षी लिहिलेलं आत्ता २२ व्या वर्षी समजलयं... आता स्वत: लेखकालाच एवढा काळ लागतोय म्हटल्यावर आपला पामरांचा काय पाड लागणार त्यांच्यापुढे??
6 Feb 2015 - 2:54 pm | अजया
मग त्यांनी रेडा कितव्या वर्षी वदवला असेल बरं?
6 Feb 2015 - 3:01 pm | पिनुराव
आता इथं रेडा कुठुन आला
6 Feb 2015 - 3:16 pm | धडपड्या
सध्या तरी, कोणीच 'खपल्या गेलो आहे, वारल्या गेलो आहे' मोड मध्ये नाहीत.. अन्यथा त्यांना चित्ररथ गंधर्वाकडून कन्फर्मेशन घ्यायची सुपारी दिली असती.. सध्या लोकल कथांवरच विसंबून रहावे लागेल...
6 Feb 2015 - 3:21 pm | पिनुराव
तुम्ही माझ्याकडे specific दृष्टकोनातुन बघताय. स्वतःच्या अनुभावाशी मला जोडुन पाहु नका.
आणि राहीला प्रश्न रेड्याचा तर तो प्रसंग ज्ञानेश्वर महाराजांबद्दल आहे
महाराज आणि राव यातला फरक कळायला हवा तुम्हाला
6 Feb 2015 - 2:57 pm | पिनुराव
अर्थातच अध्यातमीक गोष्टी शब्दात सांगायला कठीण असतात आणि मी जे सांगतोय ते वर्तन माझ्या वागण्यातून दिसायला हवं. बोले तैसा चाले दॅट्स लोल
आणि समजनं आणि उमजनं हे माहित असेल तर माझ्या भावना आपणा पर्यंत पोहोचतील.
6 Feb 2015 - 3:18 pm | धडपड्या
" बोले तैसा चाले दॅट्स लोल " म्हणजे काय ओ?
6 Feb 2015 - 3:25 pm | पिनुराव
बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले
6 Feb 2015 - 2:52 pm | बॅटमॅन
लोकांच्या मेंदूला उगीच पिन मारणारे म्हणून पिनुराव असा आयडी घेतला काहो?
6 Feb 2015 - 3:12 pm | पिनुराव
लोकांच सोडा तुमच्या डोक्याला काय पिन लागली ते सांगा
6 Feb 2015 - 4:04 pm | जेपी
पीन....
हॅ...हॅ...हॅ
बॅट्याच्या प्रतिक्षेत
6 Feb 2015 - 4:08 pm | बॅटमॅन
ही ही ही ;)
र्हस्वदीर्घाचे महत्त्व अशा ठिकाणी कळते बघा. पिन आणि पीन मध्ये किती जमीन-अस्मानाचा फरक आहे ;)
6 Feb 2015 - 4:23 pm | पिनुराव
आता पीन चा पिन तुम्हीच केला त्याला मी तरी काय करणार
9 Feb 2015 - 9:31 pm | पैसा
आँ?!
6 Feb 2015 - 4:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रोगाचं "पिन"चुक निदान केल्याबद्दल डॉ. बॅट्टाचार्य ह्यांस येक ष्टेपलर-"पीन"बॉक्स आणि काळा केप देउन सत्कार करण्यात येतं आहे.
-अखिल भारतीयं मापंकाढे मंडळ-
6 Feb 2015 - 5:16 pm | बॅटमॅन
मापंकाढे मंडळ >>>> =)) =)) =))
6 Feb 2015 - 10:07 pm | हाडक्या
ह्या ह्या ह्या..
पिनुराव, ते यं आणि पं वरचा अनुस्वार लक्षात घ्या हं.. :))))
8 Feb 2015 - 11:16 pm | माम्लेदारचा पन्खा
हे आ॑मी आज ह्या ठिकानी झाईर करतो....
6 Feb 2015 - 3:33 pm | असंका
लेख वाचायची हिंमत होत नाहिये हे खरंच...
पण हे पिनुराव पण कमी वाटत नाहियेत. मनापासून लिहितात असं दिसतंय...
6 Feb 2015 - 3:36 pm | अजया
त्यांची प्रत्येक प्रश्नाचे निराकरण करण्याची वृत्ती वाखाणण्यासारखी आहे.
6 Feb 2015 - 3:41 pm | प्रमोद देर्देकर
बहुतेक संक्शीच प्रकटले असावेत.
6 Feb 2015 - 3:56 pm | पिनुराव
नाही सर
तुमचे मित्र fake account सुरु करुन पुन्हा आले असं तुम्हाला वाटत असेल तर चुकीच आहे माझा मिसळपाव वर दुसरा दिवस आहे.
6 Feb 2015 - 4:02 pm | आदूबाळ
बालसंक्षी!
---
बादवे: जेपी कुठाहेत? पण्णास झाल्याबद्दल एक रेडा आणि एक खांब देऊन सत्कार नाही का केला?
6 Feb 2015 - 4:54 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
रेडा आणि खांब =))
खपलो...!!!!!
6 Feb 2015 - 4:57 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
6 Feb 2015 - 7:14 pm | जेपी
खपलो!!!>>>
चला आता यष्टी- व्यष्टी- संमेष्टी ची अंत्येष्टी करायला हरकत नाही. *wink*
6 Feb 2015 - 4:40 pm | प्रमोद देर्देकर
अरे वा तुम्हाला कसे हो माहिती संक्षी कोण ते? आणी काल परवा नविन आयडी घेतल्यावर तर आज दुसराच दिवस असणार ना?
त्यातुन एव्हढा मोठ्ठा लेख पाडताना तुम्हाला कोणाचीच मदत लागली नाही. कारण इथे जो नविन येतो तो पहिले टंकन मदत मागतोच.
असो
इती लेखन सीमा.
6 Feb 2015 - 4:52 pm | पिनुराव
सगळा data केवळ copy past केला आहे. माझ्या pc मधुन आणि उपरोक्त लेख हा 2 वर्षांपूर्वी पासुन टाईप करुन ठेवलेला होता. आधी तो KF-kiran font मध्ये होता.त्याला मी Unicode मध्ये convert केलं आणी मग इथं टाकला
थकलो मी काय काय explain करावं लागतं
6 Feb 2015 - 5:01 pm | प्रचेतस
मला तर हे सगळे लेख इथे दिसताहेत
http://lcmysteries.blogspot.in/2015/01/blog-post.html?m=1
ते वैभव पवार तुम्हीच का ओ?
6 Feb 2015 - 5:32 pm | पिनुराव
हो तर मीच आहे
6 Feb 2015 - 5:02 pm | पिनुराव
आणि तुम्ही एवढा वेळ पासुन संक्षी वगैरे म्हणत आहात .
सिम्पल लाॅगिक आहे की ते तुमचे मीत्र असणार.
पतांजलि, चाणक्य वगैरे मंडळी बाबत ही असाच घोळ करुन ठेवला आहे इतिहासकरांनी.
6 Feb 2015 - 5:16 pm | बॅटमॅन
पतांजलि>>>>उगीच कुणीतरी फतकल मारून बसल्याचा भास झाला.
6 Feb 2015 - 5:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
असं कसं असं कसं? अहो अध्यात्मिक साधना बघा त्यांची वयाच्या सतराव्या वर्षीची. त्यांना संक्षीचं काय पण पाsSSssSSर संत ज्ञानेश्वरांच्या रेड्यापर्यंतच्या सर्वांच्या आठवणी असतील =))
आणि संक्षी असा डोईशॉट लेखं पाडतीलं असं वाटत नाही.
6 Feb 2015 - 4:40 pm | पिनुराव
@all लिहण्याच वय केवळ ऐवढ्या करिता सांगिल की, लेखात माझ्या काही चुका झाल्यातर तुम्ही त्या समजुन घ्याव्य.
मी तुमच्या कृपेचा पात्र वगैरे व्हवा म्हणून,
तुम्हीतर नेमका ह्याच गोष्टींचा issue केला
6 Feb 2015 - 5:00 pm | सस्नेह
कृपया राग मानू नका. तुम्ही चांगले लिहिता. काही पथ्ये पाळाल तर उत्तम मिपा-लेखक होऊ शकाल.
१. खूप दीर्घ लेख (वरील लेखाप्रमाणे) असेल तर दोन भागात टाका.
२. दोन लेखांमध्ये काही दिवसांचे अंतर असू द्या.
३. प्रत्येक प्रतिसादावर रिअॅक्ट होणे टाळा.
शुभेच्छा ! =)
6 Feb 2015 - 5:07 pm | पिनुराव
मनापासून धन्यवाद केवळ ऐवढीच अपेक्षा होती . आणि दोन लेखांत किती दिवसांचे अंतर पाहीजे?
6 Feb 2015 - 5:12 pm | अजया
पहिलं बालवर्गात गेलं की च करा दुसर्याचा विचार.
6 Feb 2015 - 5:13 pm | क्लिंटन
पोट धरधरून गडाबडा लो़ळायची स्मायली आहे का हो कोणाकडे?
6 Feb 2015 - 5:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:
षटकार
*yahoo* *YAHOO* *YAHOO!* :YAHOO: :yahoo:
6 Feb 2015 - 5:42 pm | अत्रुप्त आत्मा
6 Feb 2015 - 7:46 pm | डॉ सुहास म्हात्रे
*ROFL*
9 Feb 2015 - 1:54 pm | चिगो
=)) :D
(सरकारी) चिगो
6 Feb 2015 - 5:10 pm | धडपड्या
अनुमोदन...
इथे होणारी टिका, टिंगल टवाळी, पर्सनली तुमची होत नाही.. तेव्हा लगेच रिअॅक्शन देणे टाळा.. कदाचित त्यातूनही चांगले काही शिकायला मिळेल..
सर्वांच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठिशी आहेतच..
6 Feb 2015 - 4:47 pm | वेताळ
तुम्ही उत्कृष्ट लेखक होवु शकाल.
6 Feb 2015 - 5:09 pm | विशाखा पाटील
पिनुराव, तुमचा अभ्यास आणि कळकळ लक्षात येतेय. तुमच्या लेखनाबाबत मला जाणवलेलं असं -
लेखाला योग्य शीर्षक नाही, त्यामुळे कोणत्या विषयावर लेख आहे, हेच नेमके कळत नाही.
सुरुवातीला थोडी प्रस्तावना दिली असती, तर विषय कळायला सोपे गेले असते.
अनेक विषय एका पाठोपाठ एक मांडले आहेत आणि एकातून दुसरा मुद्दा सहजपणे पुढे आलाय, असं झालेलं नाही.
वाचकांना समजेल अशा भाषेत हेच तुम्ही क्रमश: आणि साध्यासोप्या भाषेत मांडलं असत, तर या विषयात रस असणाऱ्यांना कदाचित ते भावेल. (मी या विषयावर प्रथमच एवढं वाचलं, हे नमूद करते.)
तुम्ही यासाठी कोणकोणते संदर्भ वापरलेत, त्याचाही उल्लेख असायला हवा, असे वाटते.
(टीप - तुम्ही त्रिगुणाबद्दल लिहिलंच आहे, त्यामुळे तुम्हाला राग येणार नाही, हे गृहीत धरलंय.)
6 Feb 2015 - 5:16 pm | पिनुराव
खुप खुप धन्यवाद
मार्गदर्शनासाठी bi smile
6 Feb 2015 - 5:22 pm | वेल्लाभट
म्हणजे हे जे काय लिहिलं आपण १७ व्या वर्षी ते सगळं ठीक;
पण का म्हणजे?....
म्हणजे असं म्हणजे काय झालेलं म्हणजे?
6 Feb 2015 - 5:38 pm | बॅटमॅन
काही नाही. असं आम्हांलाही लै कायबाय वाटायचं. आमच्याही डायर्या आहेत जुन्या. सगळाच इतिहास काय बाहेर काढायचा थोडाच असतो ;)
11 Feb 2015 - 12:19 pm | वेल्लाभट
कसं बोललात !!!!
11 Feb 2015 - 3:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डायर्या नको. एखादं "प्रकरण" टाक =))
11 Feb 2015 - 3:52 pm | अत्रुप्त आत्मा
@एखादं "प्रकरण" टाक>>


6 Feb 2015 - 6:15 pm | श्रीगुरुजी
अभिनंदन! पदार्पणातच शतक मारणार तुम्ही. कदाचित द्विशतकही!
माईसाहेब मोड ऑनः
इतक्या लहान वयात केवढं गहन लिहिलंस रे पिनुरावा. ह्यांना हा लेख दाखवला आणि सुनावलं की 'बघा, पिनुरावनी अवघ्या १७ व्या वर्षीच हा लेख लिहिला. आणि तुम्ही १७ वर्षाचे असताना सातवी-आठवीलाच गटांगळ्या खात होता.'. ह्यांना ते खूप झोंबलं. लगेच हे तोंडापुढचा संध्यानंद बाजूला करून ताडकन म्हणाले की 'अग त्या पिनुरावाला या वयात असले गहन लेख लिहायच्या ऐवजी जरा इकडची तिकडची जरा हिरवळ बघायला सांग.'. ह्यांना कोणाचं कौतुकच नाही.
माईसाहेब मोड ऑफः
6 Feb 2015 - 6:42 pm | पिनुराव
माझ्या मार्गदर्शकांनी प्रतिसाद न देण्याची सुचना केलेली आहे पण तुमची प्रतिक्रिया खुप चांगली आहे.
हिरवळी बघता-बघता लोक मोठे मोठे काम करतात .
हिरवळी बघत आत्मसाक्षातकार सुध्दा होऊ शकतो.
6 Feb 2015 - 6:46 pm | सुबोध खरे
गुरुजी
तुम्ही म्हणजे अगदी माई साहेबांच्या "ह्यांच्या" पंच्यालाच हात घातलात .
7 Feb 2015 - 1:28 pm | श्रीगुरुजी
:YAHOO:
6 Feb 2015 - 9:35 pm | धडपड्या
क्या बात है....!! पदार्पणातच सेंचुरी!!! मजा आहे राव...
जेपी सर, आता विशेष सत्कार हवा.. कळशी, खांब, रेडा यांसोबत आणखी काय देणार??
7 Feb 2015 - 11:47 am | वैभव जाधव
१०० ला भिंत. १००० ला समाधीच बहुतेक.
6 Feb 2015 - 9:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शेंचुरी.
6 Feb 2015 - 9:44 pm | जेपी
शेंच्युरी निमीत्त श्री.पिनुराव आणी समस्त मिपाकरांचा सत्कार एक एक पीन,रेडा आणी जपाची माळ देउन करण्यात येत आहे.
शुभच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते.
6 Feb 2015 - 9:51 pm | तुषार काळभोर
पाळणा पण द्या.... ग्यापनंतर येणार्या दुसर्यासाठी.... अन् तोपर्यंत पहिल्यासाठी!
6 Feb 2015 - 10:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
6 Feb 2015 - 9:59 pm | पिनुराव
तुमचा रेडा 'पीन व्यवस्थित घरी घेऊन जातो.
7 Feb 2015 - 11:41 am | स्वामी संकेतानंद
१६-१७ व्या वर्षी होतं असं... मलाही काहीबाही 'व्हायचं' वेळी-अवेळी.. मग 'योग्य मार्गाला' लागलो सुदैवाने. आशा आहे तुम्ही अजूनही जीव-ब्रह्म-माया वगैरेच्या सागरात गटांगळ्या खात नसणार. '....जो उबरा सो पार' अवस्थेला लागला असणार तर ठीक नायतर 'माया महाठगनी हम जानी'....
7 Feb 2015 - 4:31 pm | अत्रुप्त आत्मा
आशा आहे तुम्ही अजूनही जीव-ब्रह्म-माया वगैरेच्या सागरात गटांगळ्या खात नसणार. '....जो उबरा सो पार' अवस्थेला लागला असणार तर ठीक नायतर 'माया महाठगनी हम जानी'....
11 Feb 2015 - 11:31 am | मदनबाण
ह्म्म...
ज्यांना रस असेल त्यांनीच खालील इडियो पाहण्याचे "कष्ट" घ्यावेत !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }