खाद्यभ्रमंती - पुणे

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
22 Jan 2015 - 11:16 am
गाभा: 

खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.

थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.

चला, सुरूवात मीच करतो.

- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे.
इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे.
इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे.
’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

प्रतिक्रिया

नाखु's picture

31 Jan 2015 - 10:23 am | नाखु

मध्ये "धक्का" मिसळींचे पेवच फुटलय पण सगळे "खिशाला धक्का आणि चवीला धोक्का" अशा आहेत.
१. bay leaf bistro चाफेकर चौक
महागडा मनस्ताप.

२. rosewood डांगे चौक,
जवळ दुसरं काही नसल्याने वासरात लंगडी गाय या न्यायाने बरे!
३. पराठा express विशाल नगर वाकड, पराठा , मिसळ पाव
गेलो नाही सबब पास.
४. slice of heaven , साई चौक जवळ JN रोड पिंपरी sandwich साठी
पिंपरीत पॅटीसवाला हॉटेलात सोडून इतर ठिकाणी रस्त्यावरच खायची शक्यता नाहेच म्हणून कधीही अनुभवले नाहीच.
===
हॉटेल रत्ना: हाटेल बाज राखून हाये . दोन कांपिटेशन असूनही
सावली (निगडी): माझ्या बाय्डीला आणि बछड्यांना आवडलेलं ठिकाण *i-m_so_happy*

थोडंस महागडं जेवायचं असेल तर सिग्री ग्लोबल ग्रील आणि मेनलॅण्ड चायना.
तगडा प्रायोजक मिळाला की नक्की जाईन. *yes3*
माउली चहा (पिंपरीगाव)- मस्त आहे एकदम फक्त १० रूपयांत.अजून एक ठिकाणाचा पत्ता लागलाय जनता मिसळच्य रस्त्याला शेवटी पवनेश्वर मंदीराजवळ चहाचा अस्सल ठेला आहे
जनता मिसळ (पिंपरीगाव): लै भारी चव. धन्य्वाद अजून एक ठिकाणाची फक्त माहीती मिळालीय भेट दिल्यावर अभिप्राय देऊ.
बर्ड व्हॅली (आकुर्डी) - उद्यान खास गोष्टींसाठी फेमस असल्याने हॉटेलात गेलो नाही पण आता एकडाव जावून येऊच.

टाळण्याची ठिकाणं:
वृंदावन :भक्तीशक्तीजवळ उगा "हाईप" केलेले शिवाय महागडे
अन्नपूर्णा : नाविलाज को क्या विलाज कॅटेगरी

वृंदावन :भक्तीशक्तीजवळ उगा "हाईप" केलेले शिवाय महागडे
अन्नपूर्णा : नाविलाज को क्या विलाज कॅटेगरी

वृंदावन तर अगदि टुकार ह्या सदरात जमा होणारं. अन्नपूर्णा नूतनीकरण झाल्यापासून बरंय जरा.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 10:30 pm | आजानुकर्ण

चाफेकर चौकाच्या जवळचं का? (एसकेएफ ला जाणाऱ्या रस्त्यावर आहे ते). त्याच्या बाजूला एक कावेरी म्हणून होतं. तिथं बिअर वगैरे प्यायला गेलात तर चिकन चिली फ्राय मागवा. चांगलं मिळायचं.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 10:35 pm | आजानुकर्ण

सॉरी कावेरी नाही कामिनी! आणि टेल्कोसमोर मालवण समुद्र होतं ते पण चांगलं होतं. आहे का अजून?

गणामास्तर's picture

3 Feb 2015 - 10:59 pm | गणामास्तर

टेल्कोसमोरील मालवण समुद्र आता कामिनी शेजारी शिफ्ट झाले आहे.
टेल्को समोर सध्या जे मालवण समुद्र म्हणून सुरु आहे ते डुप्लिकेट आहे.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 11:03 pm | आजानुकर्ण

ओह ओके. मी टेल्कोसमोरच्या हॉटेलचा 'सरंगा' या नावापासूनचा कष्टमर होतो. गेल्या दहा वर्षात अनेकवेळा नावं बदलली. आता मालकच बदलेलेले दिसताहेत. शाकाहारी मंडळींसाठी काळ्या वाटाण्याची उसळ वगैरे छान मिळायचं तिथे. (बहुदा आता कामिनीशेजारी मिळत असेल)

पिंपातला उंदीर's picture

4 Feb 2015 - 8:55 am | पिंपातला उंदीर

कालच मालवण समुद्र मध्ये चिकन कलेजी थाळी चापली . बेष्ट होती

मृत्युन्जय's picture

31 Jan 2015 - 10:41 am | मृत्युन्जय

फुगेवाडी जकातनाक्याचा अशोक पिंचि मध्येच येइल ना? एक नंबर चहा आहे

प्रचेतस's picture

31 Jan 2015 - 10:42 am | प्रचेतस

हो. पिंचि मधेच.
मसालेदार गोडसर असा चहा. मजा येते पितांना.

तांबडा पांढरा रस्सा खायचा असेल तर थरमॅक्स चौकातील "राजवर्धन" ब्येष्ट.
यशवंतनगर पेट्रोल पंपाजवळ 'पथिक' म्हणून एक हॉटेल आहे, तिथली चिकन दम बिर्याणी जबऱ्या आहे.
तसेच पिंपरीतल्या 'कराची' मधील चिकन नवाबी हंडी,खिमा,मटन पॅटीस,पाया सूप,चिकन बिर्याणी आवर्जून खावी अशीच. हॉटेल बर्यापैकी कळकट आहे पण टेस्ट अफलातून असल्यामुळे तिकडे जरा दुर्लक्ष करायचे :)
आणि महत्वाचे म्हणजे हे हॉटेल पहाटे पर्यंत चालू असते, अर्थात १२ नंतर प्रवेश मागील दाराने.

मिसळ साठी वरती वल्लीने सांगितल्याप्रमाणे 'जनता' मस्तच. त्याच्या थोडे पुढे 'निसर्ग' मिसळ आहे ते सुद्धा मस्तच. मोरया गोसावी मंदिरा जवळ कवींची मिसळ आहे, ते दर चतुर्थी ला उपवासाची मिसळ देतात, फॉर अ चेंज म्हणून खायला छान वाटते.

पुलाव,पाव भाजी अन कॉफी साठी निगडी प्राधिकरणातील 'नायडू' आणि 'शर्मा' दोन्ही मस्त. शर्मा कडील कुल्फी सुद्धा भारी असते. निगडी जकात नाक्या वरील भुर्जीवाला सुद्धा अफलातून आहे.

बाकी ठिकाणे आठवतील तशी भर घालतो.

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 11:13 pm | प्रचेतस

निसर्ग चवीला छान असली तरी अंमळ तिखट असल्याने लै जळजळ होते.
पिंपरीगावातीलच नवमहाराष्ट्र शाळेसमोरची अतिथी मिसळ पण छान आहे.
चिंचवडच्या बालाजी कवीची मिसळ आवडली नाही मात्र त्याचे बटाटेवडे मस्त असतात.

नायडू कुठे आहे?
मी शर्माकडे पावभाजी आणि आईसक्रीम खाल्लेले आहे.

बाकी बोपोडीत खडकीबाजारच्या रस्त्याला वळल्यावर उजव्या बाजूस ४/५ दुकाने सोडून वंदन स्वीट्स अ‍ॅण्ड चाट सेंटर आहे. तिथली आलू टिक्की, बास्केट चाट, कटोरी चाट लै भारी.

गणामास्तर's picture

3 Feb 2015 - 11:20 pm | गणामास्तर

'नायडू' प्राधिकरणात कॅम्प एज्युकेशन शाळे जवळ आहे, राधिका इलेक्ट्रॉनिक्स च्या समोर.

माऊली चहा आणि जनता मिसळ कुठेशी आहे नक्की? मला पिंपरी बाजार (रेलवेस्टेशन शेजारचा), साई मंदीर (क्याम्प) आणि आंबेडकर चौक असे तीन रेफरन्स पॉईंट माहीत आहेत.

-पिंचिंकर आजानुकर्ण

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 10:33 pm | प्रचेतस

पिंपरी गावात.
कराची चौक, जयहिंद हायस्कूल मागे टाकत सरळ पुढे जायचे. एका ठिकाणी डाव्या बाजूला प्रचंड गर्दी दिसेल तोच माऊली चहा. तिथुम सरळ पुढे गेल्यावर लगेच पहिलीच उजवी मारायची की ४/५ दुकाने सोडून जनता दिसेलच.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 10:36 pm | आजानुकर्ण

ओके थ्यांक्यू. ट्राय मारायला पाहिजे एकदा.

नाखु's picture

4 Feb 2015 - 10:08 am | नाखु

तिथे दोन मिसळी आहेत त्यातली जुन्या कौलारू घरातील "वर्जीनल" बाकी ढुप्लीकेट हे लक्श्यात ठेवा..

नाखु सराफ

आजानुकर्ण's picture

4 Feb 2015 - 9:39 pm | आजानुकर्ण

तिथे दोन मिसळी आहेत त्यातली जुन्या कौलारू घरातील "वर्जीनल" बाकी ढुप्लीकेट हे लक्श्यात ठेवा..

पुन्हा एकदा धन्यवाद. सावतामाळी मंदिराजवळ हे ठिकाण असल्याचे एका मित्रानेही सांगितले. आता संधी मिळाली की जाऊन येतो.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 10:31 pm | आजानुकर्ण

विशाल टॉकिज शेजारचं रॉक्सी चालू आहे का अजून. तिथं मुघलाई चिकन लई जबरा मिळायचं. छाया पण चांगलं आहे पराठ्यांसाठी.

प्रचेतस's picture

3 Feb 2015 - 10:35 pm | प्रचेतस

रॉक्सी चालू आहे अजून. शाकाहारी असल्याने फ़क्त चहा पिण्यापुरताच तिथे जायचो.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 10:40 pm | आजानुकर्ण

मी पण खात नाही आता. पण खायचो तेव्हा रॉक्सीसारखं मुघलाई कुठं मिळालं नाही. एकदम लुसलुशीत आणि राजेशाही अशी मसालेदार डिश. किंमत अत्यंत वाजवी. अर्थात इराणी असल्यानं मोठे बाकडे आणि प्रचंड कलकलाट. अँबियन्स वगैरेवाल्यांसाठी नाहीच. (त्याच्या वरच्या मजल्यावर फ्यामिली रुम होती असे वाटते.)

रॉक्सीमध्ये अजूनही फ्यामिली रूम आहे. रॉक्सीच्याच बाजूला बॅन्क ऑफ इंडीयाला लागूनच हैद्राबाद चहा नावाची हातगाडी आहे.
तिथे थोड्या वेगळ्या चवीचा मस्त असा चहा मिळतो.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2015 - 11:20 pm | आजानुकर्ण

हो. एकदा चहा घेतलाय तिथला. मस्त. तिथून विशाल टॉकीजच्या बोळात गेल्यावर उजव्या हाताला एक बेकरी आहे. घरी मिसळपाव/वडापाव करायचा प्लान असला तर गरमागरम ताजे पाव मिळतात.

पावच घ्यायचे असतील तर पिंपरी क्याम्पाताल्या विजय बेकरीला पर्यायच नाही. नुसते खावेत तरी भारी लागतात.

आजानुकर्ण's picture

4 Feb 2015 - 9:53 pm | आजानुकर्ण

ही बेकरी नक्की कुठे आहे? आजपर्यंत पावभाजीसाठी वगैरे आम्ही विशाल टॉकीजजवळूनच पाव आणतोय. नेहमीच ताजे मिळत आलेत. पण नवीन ठिकाण ट्राय करायला काहीच हरकत नाही.

पिंपरी क्याम्प मेन बझार. भाजी मंडईकडे जाणार्या रस्त्यावर.

आजानुकर्ण's picture

4 Feb 2015 - 10:32 pm | आजानुकर्ण

ओके. बघतो.

पिंपातला उंदीर's picture

31 Jan 2015 - 9:51 am | पिंपातला उंदीर

पिंपरी चिंचवड वाल्यांनी हा धागा follow करा . सगळे प्रश्न सुटतील . अगदी वडा पाव चा पण

http://www.maayboli.com/node/12710

अत्रन्गि पाउस's picture

31 Jan 2015 - 9:54 pm | अत्रन्गि पाउस

हॉटेल निसर्ग - नळ stop पुणे
चिकन राजकुमार संतोषी + बाजरीची भाकरी ...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Jan 2015 - 11:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सदाशिव पेठेमधलं "रस्सा: जसा हवा तसा" झॅक जागा आहे चिकन आणि फिश खायची.

कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर 'आशीर्वाद डायनिंग हॉल' मधे छान महाराष्ट्रियन थाळी मिळते
फ़क्त ७० रुपयात ,
सिंहगड रोडवर माणिक बागेतल 'ब्रम्हा गार्डन' पण छान आहे
शनिपारला चितळे बंधूंच्या समोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेजारी एका बोळात 'अम्बिका अमृततुल्य' मधे मस्त चहा मिळतो

नांदेडीअन's picture

12 Mar 2015 - 10:18 pm | नांदेडीअन

कोथरुडला शिवाजी पुतळ्यासमोर 'आशीर्वाद डायनिंग हॉल' मधे छान महाराष्ट्रियन थाळी मिळते
फ़क्त ७० रुपयात

आत्ताच जेऊन आलो.
थाळी फार काही विशेष आवडली नाही.
कदाचित मला न आवडणार्‍या भाज्या असतील म्हणून थोडा भ्रमनिरास झाला असेल.

भोपळा, मसूर आणि बटाट्याची पातळ भाजी या तीनही भाज्या मला फार आवडत नाहीत, आणि आज तीनही भाज्या एकदाच खायला मिळाल्या.

पण सपक (सपक = साधे, आणि चांगल्या अर्थाने साधे बरं का !) वरण फार छान होते.
अगदी घरची आठवण आली.

आतिवास's picture

4 Feb 2015 - 12:08 am | आतिवास

वाचनखूण साठवते आहे.
आता पुण्यात परतले की शोधेन एकेक ठिकाण!

लॉरी टांगटूंगकर's picture

4 Feb 2015 - 9:36 pm | लॉरी टांगटूंगकर

मी पुण्यात असतांना असले धागे का निघत नव्हते?

असंका's picture

7 Feb 2015 - 1:09 pm | असंका

+१...

(अगदी हेच..शब्द छान निवडलेत!)

पिंपरीमधल्या एका ठिकाणाचा उल्लेख राहिलाच.
एच ए कॉलोनी मधील नाशिककर क्याण्टीन.
इथला समोसा आणि खोबरा चटणी केवळ अप्रतिम. वड्यांची चव मात्र हल्ली सोडा जास्त घालत असल्याकारणे बिघडली आहे.
इथले फ़रसाण आणि गुलाबजाम मात्र अगदी दर्जेदार.

बाकी चिंचवडगावातील यशवंत स्वीट मार्ट मधले गुलाबजाम पण एकदम ख़ास. पण इथली सपेशालिटी म्हणजे बाकरवडी. चवील नेहमीच्या बाकरवड्यांपेक्षा बरीच वेगळी पण अफ़लातून.

नांदेडीअन's picture

4 Feb 2015 - 10:32 pm | नांदेडीअन

पौड फाट्याच्या चौकात Borate's Biryani हे TakeAway हॉटेल सुरू झाले आहे.
एके दिवशी वर्तमानपत्रासोबत प्रसिद्धीका आली होती यांची.
"अस्सल काळा रसा... अस्सल बिर्याणी..." ही टॅगलाइन होती त्यात.

काळा रस्सा खूपच ’मसालेदार’ होता.
बिर्याणीसुद्धा फार विशेष वाटली नाही.
तुम्ही जर कर्वे नगरच्या ‘सोलकढी’ची बिर्याणी खाल्ली असेल, तर थोडीफार तशीच चव जाणवेल तुम्हाला.
bb

पिंपातला उंदीर's picture

5 Feb 2015 - 10:48 am | पिंपातला उंदीर

कर्वे रोड ला कोथरूड च्या दिशेने नळस्टोप च्या अगदी थोड पुढ आल की कर्वे रोडवरच (लागू बंधू च्या बाजूला ) हॉटेल खानदेश आहे . एकदम टिपिकल खानदेशी चवीच जेवण मिळत . थोड तिखट अमळ मसालेदार . झणझणीत चव असते . तिथली खानदेशी पद्धतीची शेव भाजी , वांग्याच भरीत आणि मटन फ्राय थाळी आवर्जून चाख्न्यासारखी आहे . तिथे पुण्यातल खानदेशी पब्लिक पडीक असते . अख्ख्या हाटेलात अहिराणी भाषा ऐकू येते . गल्ल्यावर एक मोठ्या पोटाचा मालक बसलेला असतो . त्याला हसताना कधीच पाहिलं नाही इतक्या वर्षात . हॉटेल चा ambiance , वैगेरे निकष असणारया लोकांनी या हॉटेल च्या वाटी न गेलेलंच बर . कधी कधी family दिसतात पण family ला घेऊन जाण्या अगोदर एकट्याने जाऊन रेकी केलेली बरी . चव मात्र झक्कास . तोंडात लिटरभर पाणी जमल राव आठवणीने .

मृत्युन्जय's picture

5 Feb 2015 - 11:11 am | मृत्युन्जय

पार्सल ट्रायलं जाणार. :)

नांदेडीअन's picture

5 Feb 2015 - 11:22 am | नांदेडीअन

हां, छान आहे हे चवीला.

कोथरूडला असलेले खानदेशी झटका म्हणजे यांचीच ब्रॅंच आहे का ?
आणि त्याच खानदेशी झटकाच्या बाजूला खानदेश एक्सप्रेस का अशाच काहीतरी नावाचे अजून एक हॉटेल आहे.
ambiance या दोन्ही ठिकाणी नाही मिळणार, पण चव चांगली आहे.

पिंपातला उंदीर's picture

5 Feb 2015 - 11:24 am | पिंपातला उंदीर

नाहि. नाहि. या हॉटेल खानदेश ची कुथेहि शाखा नाहि

झकासराव's picture

5 Feb 2015 - 6:10 pm | झकासराव

पिंचिचा वेगळा धागा पायजेल वल्ली शेठ. :)

बा द वे, मला भेळ चौकाच्या जवळच "रसोई से" प्रचन्ड आवडत.
व्हेज हॉटेल आणि टिपिकल पन्जाबी डिशेस.
पण माइल्ड चवीच्या जबरी भाज्या. पनीर त्यांच्या घरच्या दुधाचच करतात त्यामुळे फ्रेश आणि मलाइदार.
त्यापेक्षा भारी पनीर फक्त सयाजी बा ने मध्येच खाल्लय.

गोल्डन पाम मधील व्हेज भुना लै आवडलेला.
दोन तीन वेळा पार्सल आणलाय. तिथलं बाकीचं काही फारस आवडत नाही.
त्याच्या पलीकडेच पुणे गेट आहे. तिकडे मित्रमन्डळींसोबत निवान्त पार्टी करायला बरय ते.
पण जेवण वै अ‍ॅव्हरेजच. काही स्टार्ट्र्स बरी ते भारी कॅटेगरीत येतात. मेन कोर्स ठिक ठाक.
नॉनव्हेज वाल्याना पुणे गेट आणि गोल्डन पाम दोन्ही आवडतात अस दिसतय.

मिसळ, आकुर्डीच्या जयश्रीची आवडायची.
नेवाळे एकदाच ट्राय केली. नुसतीच तिखट.

बा द वे, चापेकर चौकात एक काका बुर्जीची गाडी लावतात.
त्यांच्या गाडीवर पुणेरी पाटीला स्पर्धा करेल अशा पाट्या आहेत.
पण बुर्जी, ऑम्लेट आणि अण्ड्याचेच फक्त आयटम्स.
सर्व भारी. मारामारी नावाची देखील डिश आहे. :)

त्याच्या पलीकडेच पुणे गेट आहे. तिकडे मित्रमन्डळींसोबत निवान्त पार्टी करायला बरय ते.

हातभर लांबीची सुरमई .. बिनसाउथइंडियन मसाला भरलेली.. काय सॉलिड असते राव.. लेयरवाले फ्रूट पंच..

गणेशा अरे कुठे आहेस रे?

पिंपातला उंदीर's picture

5 Feb 2015 - 8:48 pm | पिंपातला उंदीर

पुणे गेट ला काल मटण खीमा हाणला. भारि होता
Kheema

असा मी असामी's picture

5 Feb 2015 - 6:20 pm | असा मी असामी

मोरया गोस्वामी मंदिरा जवळची बालाजीची मिसळ मस्त असते. जास्त तिखट नसते.

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 6:21 pm | प्रचेतस

रसोई से ला कधीच गेलो नाही आतापर्यंत.
आता जायलाच हवे एकदा

बाकी पिंपरी चिंचवड खाद्य संस्कृतीवर धागा काढलाच पाहिजे.

मुंबैची कच्छी दाबेली पुणे परिसरात आली तेव्हा पुण्याच्याही आधी सर्वप्रथम पिंपरीत अवतरली होती.
अशोक थेटराजवळची दिलखुश कच्छी दाबेली. २०/२१ वर्षांपूर्वी ती सुरु झाली होती. आता त्याने जवळच मोठं दुकान टाकलंय ते ही बऱ्याच वर्षांपूर्वी पण पहिली चव राहिली नाही आता.

अजून एक ठिकाण राहिलंच. नवमहाराष्ट शाळेच्या मागे कुदळे भेळ. निसर्ग मिसळीच्या शेजारीच.
मटकी, वाफ़वलेल्या मिरच्या टाकून तो अफ़लातून भेळ बनवतो. क्वांटीटी पण प्रचंड. लै भारी आहे ती चवीला.

गणामास्तर's picture

5 Feb 2015 - 7:04 pm | गणामास्तर

बा द वे, चापेकर चौकात एक काका बुर्जीची गाडी लावतात.

वर्‍हाडे नाव आहे त्यांचं. .४-५ दिवसातून एकदा लावतात गाडी.
त्यांच्याकडे सर्व पदार्थ चविष्ट मिळत असले तरी माणूस अतिप्रचंड उर्मट आहे.

असंका's picture

7 Feb 2015 - 1:12 pm | असंका

"रसोई से" खरंच आवडायचं.... व्हे़ज दम बिर्याणी तिथली खाल्ल्यावर मला दम बिर्याणीतल्या दमचा अर्थ कळला होता.

म्हया बिलंदर's picture

5 Feb 2015 - 8:31 pm | म्हया बिलंदर

बाबौ

नितिन५८८'s picture

6 Feb 2015 - 4:24 pm | नितिन५८८

जुनी सांगवी येथे हॉटेल गोमंतक Fish साठी फेमस, डापोडी येथील दत्त बोर्डींग स्वस्तात मांसाहारी जेवणासाठी आणी चव पण छान असते, हॉटेल रानजाई (हिंजवडी उड्डाण पुलाशेजारी)मटण भाकरी स्पेशल, हॉटेल आपुलकी (चाकण तळेगाव रोडवर ) मटण भाकरी स्पेशल, पानशेत रोडला nonveg घेऊन जायचे तिथले हॉटेलवाले बनवून देतात मासात शेतात बसून जेवता येते (हॉटेल शेतकरी, हॉटेल समाधान)

सविता००१'s picture

6 Feb 2015 - 4:49 pm | सविता००१

इथे लिहिणार्‍यांचं
कारण आता हा धागा कुणीतरी एकत्रित स्वरूपात (म्हणजे मूळ धाग्यात असलेली ठिकाणे आणि प्रतिक्रियांमध्ये आलेली ठिकाणे एकत्र करून ) माहिती स्रोत- मिसळपाव संकेत स्थळ असं लिहून व्हॉट्स अप वर पाठवलाय .
आता जोरदार फिरतोय. मला वेगवेगळ्या ५ ग्रूप्स मधुन आजच्या दिवसात आला.

नांदेडीअन's picture

6 Feb 2015 - 10:22 pm | नांदेडीअन

अरे वा ! :)

असंका's picture

7 Feb 2015 - 1:17 pm | असंका

होय..मला पण आला एका मित्राकडून! फोटो गायब आहेत.

आयला , काय सांगतेस ? मला पाठव बरं तो मेसेज :)

सविता००१'s picture

9 Feb 2015 - 2:53 pm | सविता००१

पण आला हा धागा.. :)

नांदेडीअन's picture

9 Feb 2015 - 3:12 pm | नांदेडीअन

काय म्हणता ?
लिंक द्या ना.

पिंपातला उंदीर's picture

9 Feb 2015 - 3:14 pm | पिंपातला उंदीर

नांदेडीअन यान्चे अभिनन्दन : )

नांदेडीअन's picture

9 Feb 2015 - 3:16 pm | नांदेडीअन

हाहा
अहो मी तर फक्त सुरूवात करून दिली.
या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या प्रत्येकाच्या बोटांचे आणि पोटाचे धन्यवाद. :)

सविता००१'s picture

10 Feb 2015 - 11:43 am | सविता००१

आणि हे झाले २००
:)

तुषार काळभोर's picture

10 Feb 2015 - 11:56 am | तुषार काळभोर

पुणे-सोलापूर रस्त्यावर कुंजीरवाडी गावात 'स्नेहल' नावाचं मांसाहारी हॉटेल आहे (मगरपट्टा सिग्नलपासून १६किमी पुर्वेकडे)
चिकन्/मटन थाळी...असा शिंपल मेनु.
(शाकाहारी थाळी पण मिळते, पण ती कुणाला खायचीये?!!)
एक छोटी प्लेट चिकन/मटन सुक्के, एक 'बाउल' म्हणता येईल एव्हढी वाटी रस्सा (अनलिमिटेड), चपाती/ज्वारीची/बाजरीची भाकरी (अनलिमिटेड), साधा मोकळा भात (अनलिमिटेड), एक्स्ट्रा सुक्के चार्जेबल.
चिकनमिळते) रु. १५०
मटन थाळी रु. १७०
स्पेशल थाळी (५० एक्स्ट्रा: यात आळणी चिकन/मटन प्लेट एक्स्ट्रा मिळते)

चवः (जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण आवडत असेल तर)... जन्नत!!!!!!!!!!!!

(जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण आवडत नसेल तन)... अरेरे..!

(जर पुण्याच्या ग्रामीण भागातलं चुलीवरचं गावरान मसाल्यातलं मांसाहारी जेवण ट्राय केलं नसेल तर).. ट्राय कराच!!

(असं जेवण आम्च्या घरी वर्षातून एकदाच बनतं, लोणीच्या उरसाला)

खंडेराव's picture

12 Mar 2015 - 10:35 pm | खंडेराव

c

नितिन५८८'s picture

17 Mar 2015 - 1:13 pm | नितिन५८८

F.C रोड, ललित महल शेजारी - सर मिसळ (नविन चालू झालय, चव छान )
सोमाटणे फाटा: रुपेश मिसळ
औंध आणि चिंचवड: निसर्ग मिसळ हाऊस सांगवी फाटा - डाळ वडे (सायंकाळी हाथगाडी असते)
बाणेर रोड - idlicious (सर्व सौथ इंडिअन, special बिशीबेळी भात, इडली, मेदू वडा )
सांगवी - हॉटेल गोमंतक (sea फूड special)
वाकड (हिंजेवाडी पुलाशेजारी ) - हॉटेल रानजाई (मटन भाकरी special )
दापोडी - दत्त बोर्डिंग (कमी पैशात मस्त मांसाहारी जेवण )
पानशेत रोड: घरगुती शाकाहारी तसेच मांसाहारी (मटन , चिकन घेऊन जाणे ते बनवून देतात)

औंध संघवी नगर : भेळ (संघवी नगर end ला )

यशोधरा's picture

11 Nov 2016 - 11:17 am | यशोधरा

सरमिसळ ठीकठाक, इतके खास नै.

नांदेडीअन's picture

9 Apr 2015 - 11:57 am | नांदेडीअन

पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते ?
चितळे सोडून.

प्रचेतस's picture

9 Apr 2015 - 5:00 pm | प्रचेतस

चिंचवडला प्रदीप आणि यशवंत. पैकी यशवंतची एकदम वेगळ्या धर्तीची आहे.

नांदेडीअन's picture

9 Apr 2015 - 5:29 pm | नांदेडीअन

धन्यवाद.
शहरात नाहीये का एखादे ? :(

प्रचेतस's picture

9 Apr 2015 - 5:47 pm | प्रचेतस

तिथले माहित नै.

नाखु's picture

11 Jun 2016 - 12:21 pm | नाखु

पुण्यात चांगली बाकरवडी कुठे मिळते ?
चितळे सोडून.

त्यांची चव राखून आहेत आणि अता सगळीकडे केंद्रे थाटली आहेत त्यांनी.

पिंची काका हलवाईंचा ग्राहक नाखु

ganu's picture

9 Apr 2015 - 4:57 pm | ganu

रास्ता पेठच्या M.S.E.B.हापिस्च्या डाव्या अन्गाला मसाला ताक अप्रतीम
चवदार मिळते.

नांदेडीअन's picture

18 Jun 2015 - 7:23 am | नांदेडीअन

काल कोथरूडच्या गार्निशमध्ये (यशवंतराव चव्हाण नाट्यगॄहाजवळ) पनीर मालवणी खाल्ली.
फार छान चव होती.
भाजीसोबत जी वेगळी ग्रेव्ही दिली होती, ती तर अमृततुल्यच !

हेमंत लाटकर's picture

9 Nov 2015 - 11:28 pm | हेमंत लाटकर

छान खाद्यधागा!

सामान्य वाचक's picture

11 Jun 2016 - 8:45 am | सामान्य वाचक

महर्षी नगर मधले नागब्रह्म
1 नंबर साउथ फूड
अप्पे इडली बटर डोसा सगळेच पदार्थ चविष्ट
आणि शेवटची फिल्टर काप्पी
खा खा खाऊन प्रति माणूस 200 च्या वर बिल काय जात नाय
पण छोटे आणि बाकडी स्टाईल बसायची जागा आहे
त्यामुळे ambiance ०
पण चवि बद्दल वाद नाय

अभ्या..'s picture

11 Jun 2016 - 2:20 pm | अभ्या..

काय सांगता?
आप्पे हाटेलात मिळतात?
.
कुणि पुणेस्थित मिपाकर नागब्रह्म इथे माझ्यासाठी आप्पेकट्टा साजरा आणि स्पॉन्सर करेल काय?

आमच्या हिरवीनीने बनवलेल्या चीज आप्प्यांईतके जगात भारी काहीच खाणे नसू शकते हे मात्र ठाम मत आहे.

सामान्य वाचक's picture

11 Jun 2016 - 2:55 pm | सामान्य वाचक

तुमच्या कडे आधी आप्पे कट्टा करू
मग नागब्रह्म चा कट्टा करू
आणि मग ठरवू

आमच्याकडे कट्टा करायला हरकत नाही पण तुम्हाला आप्पे कसे मिळणार? आमची हिरवीन फक्त माझ्यासाठी करते. :-P

सुबोध खरे's picture

11 Jun 2016 - 3:15 pm | सुबोध खरे

हे म्हणजे ते पहा शंकर भगवान
फक्त पुण्यवान माणसांनाच दिसतील म्हणण्यासारखे आहे.

अभ्या..'s picture

11 Jun 2016 - 3:44 pm | अभ्या..

हीहीहीहीहीही.
डोक्टरसाहेब समजून घ्या ना तुम्ही.
उगी लग्नाआधीच कीती राबवायचे बिचारीला. ;)
(एकदा लग्न झाले की असले काही लिहिणार नाही की बोलणार नाही. गप्प आप्पे खाणार)

सुबोध खरे's picture

11 Jun 2016 - 8:47 pm | सुबोध खरे

आय माय स्वारी.
मला माहित नव्हतं तुमचं लग्न झालेलं नाही.
तरीच ती "फक्त तुमच्यासाठीच" आपलेसे (आप्पे) करते

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2016 - 6:37 pm | श्रीगुरुजी

महर्षी नगर मधले नागब्रह्म
1 नंबर साउथ फूड

+१

एक दुरुस्ती. ते नाव "नादब्रह्म" आहे. आप्पे व इतर सर्व दाक्षिणात्य पदार्थ अत्यंत उत्कृष्ट असून तेथील फिल्टर कॉफी देखील अतिशय चविष्ट आहे. सांबारात मात्र डाळीचा दाणा चुकुनही सापडत नाही. नुसतेच पाणी देतात. चटणी अतिशय चविष्ट आहे.

सामान्य वाचक's picture

11 Jun 2016 - 7:25 pm | सामान्य वाचक

ते नागब्रह्म च आहे

पूर्ण नाव
नागब्रह्म हट

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2016 - 2:17 pm | श्रीगुरुजी

ओह! माझीच वाचण्यात चूक झाली असणार.

आतिवास's picture

11 Jun 2016 - 3:18 pm | आतिवास

हा लेख मुख्य पानावर जेव्हा जेव्हा आला, तेव्हा प्रत्येक वेळी वाचनखूण म्हणून ठेवायचा प्रयत्न केला. पण जमलं नाही, आजही जमलं नाही.

उल्का's picture

11 Jun 2016 - 3:37 pm | उल्का

अरे वाह!
खाद्यभ्रमन्ती-आमची मुंबई नाही का मिपावर?
असल्यास लिन्क द्या ना.

सही रे सई's picture

1 Sep 2016 - 8:17 pm | सही रे सई

सिंहगड रोडला गंगा भाग्योदय मधे यम्मी पराठा ओपन झाले आहे. मस्त गरमागरम पराठे मिळतात तिथे. खूप प्रकारचे पराठे आहेत. तिथे जाऊन खाल्ले तर जास्त चांगले लागतात. पार्सल आणले होते पण ती मजा नाही त्यात.

कैवल्यसिंह's picture

9 Nov 2016 - 11:48 pm | कैवल्यसिंह

१) सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते. हॉटेल तसे छोटेसेच आहे जेम-तेम १० ते १२ माणसच एकावेळेला जेवू शकतात पण मटणाची चव अप्रतिमच आहे. ईथे बिर्याणी मिळत नाही. पण मटण पुलाव झक्कास मिळतो.
इकडे चिकन जास्त मिळत नाही बहुधा मिळतही नसावे बहुतेक.. मटण थाळीत ज्वारी, बाजरी भाकरी, मटणाचा रस्सा, साधा भात, सोबत कांदा, पापड, कोशिंबीर किंवा लोणचे आसे आसते. सुक्या थाळीत सुके मटण, मटणाचा रस्सा, ज्वारी, बाजरी भाकरी, साधा भात, लोणचे किंवा कोशिंबीर व कांदा.. तसेच कलेजी फ्राय हि वेगळी डिशही मिळते. व मटन पुलाव हवा आसल्यास एक्स्ट्रॉ पे करावे लागते. पण चव अप्रतिमच...

२) कोथरुड बसस्टॅड जवळ शिवाजी पुतळ्या जवळ 'मालवणी नाका' नावाचे हॉटेल अप्रतिम मालवनी मांसाहारी जेवन मिळते. मालवनी फिश करी व तळलेले मासे, फ्राय मासे मालवनी पद्धतीने बनवतात. सोलकढी एकदम झक्कास आसते.

३) डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात. खासकरुन बटर चिकन, चिकन लॉलीपॉप्स, चिकन कबाब. इकडे व्हेज डिशेस पण मिळतात पण त्या काही खास नसतात. फक्त एकच आडचण ती म्हणजे इथे कुपन पद्धत आहे. म्हणजे आपल्याला जे पदार्थ मागवायचे आहेत त्यांचे कुपन काढावे लागतात. व पैसे पे करावे लागतात. व नंतर वेटरला ते कुपन द्यायचे आसते. पण जेवन काचैका आसते. गर्दीसुद्धा भरपुर आसते. त्यामुळे वेटिंगवर रहावे लागते १५ ते २० मिनिटांसाठी.

४) कोथरुड बसस्टँड जवळ/समोर जो पादचरी पुल आहे ना तिथे.. पी.के. बिर्याणी हाऊस वाल्यांनीच नविन हॉटेल काढले आहे. 'पी. के मटण भाकरी' म्हणून आजुन गेलो नाहीये पण जाईन एखाद दिवशी. त्या हॉटेलच्या जागी आधी 'द कोल्हापूर दरबार' नावाचे मांसाहारी हॉटेल होते. मस्त चिकन व मटण थाळी मिळायच्या. पण ते हॉटेल भाडेकरारावर होते त्यामुळे भडेकरार संपला म्हणून ते हॉटेल मालकाला बंद करावे लागले..

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 12:20 pm | महासंग्राम

सदाशिव पेठेमधे 'हॉटेल नागपूर' अप्रतिम नागपूरी मांसाहारी जेवण मिळते.

हे आजच ट्राय करण्यात येईल.

डेक्कन जिमखान्या जवळ जे.एम (जंगली महाराज) रोडवर 'बोरावके'ज् कु-कुच-कु चिकन' नावाचे हॉटेल आहे. चिकनच्या सर्व डिशेस अप्रतिमच आसतात

या बद्दल असहमत तिथे एकदाच तंदुरी चिकन घेतले होते. कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.

कैवल्यसिंह's picture

11 Nov 2016 - 12:31 pm | कैवल्यसिंह

कैच्याकाई तेलकट होते. जणू काही तेलात तळून आणलेत ते.

माझा अनुभव चांगला आहे.. कारण १८ ते २० वर्षांपासुन जातोय मी. टेस्टमधे काहीही फरक पडला नाही. त्या वेळेला जी टेस्ट होती ती आजही आहे..

बोरावके'ज् कु-कुच-कु > बेकार आहे.

1. नवनाथ चहा पिंपले गुरव--चहा अगदी मस्त फक्त 10 रूपयांत
२. अशोक हॉटेल --दापोडी--नाशाता साठी आति उत्तम..

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 4:01 pm | महासंग्राम

बादवे, सदाशिव पेठेत असलेलं 'रस्सा' आता म्हात्रे पुलाजवळ डी.पी रोड ला स्थानांतरित झालं आहे. तिथली बिर्याणी आणि कोल्हापूरी जेवण सुंदर असते.

नॉनव्हेज चे माहेरघर हा सदाशिव पेठेचा नावलौकिक कमी होत चालला आहे हल्ली !!!

कैवल्यसिंह's picture

11 Nov 2016 - 4:45 pm | कैवल्यसिंह

आवारे लंच होम/खानावळ मधले झणझणीत चिकन व मटण एकदमच भारी... रूमाल जवळ बाळगल्या शिवाय पर्यायच नसतो.. पण आत्ता ती खानावळ चालु आहे का नाही ते माहीत नाही. चालु आसल्यास कृपया कळवावे. म्हणजे एखाद दिवशी जाता येईल.

बिर्याणीसाठी 'पी. के बिर्याणी हाऊस' व 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' हि दोन्ही बिर्याणीची रेस्टॉरंटस् झकास आहेत. त्यातल्या त्यात 'एस. पी'ज बिर्याणी हाऊस' मला खुप आवडले. त्याच्याकड व्हेज-नॉनव्हेज या दोन्ही प्रकारातल्या बिर्याणींचे खुप ऑप्शन्स आहेत..

महासंग्राम's picture

11 Nov 2016 - 5:03 pm | महासंग्राम

आवारे अजूनही सुरु आहे. चवहि तशीच अप्रतिम. पिके सुद्धा सुंदर .एस. पी. ची चव पार बिघडली आहे.
बिर्याणीचाय नावाने साजूक तुपातला मसाले भात देतात हल्ली.

कैवल्यसिंह's picture

11 Nov 2016 - 6:50 pm | कैवल्यसिंह

आवारेचा नेमका पत्ता देता का? खुप वर्ष झालीय आता पत्ता विसरुन गेलोय.. बहुतेक सदाशिव पेठ मधेच आहे ते...

कैवल्यसिंह's picture

12 Nov 2016 - 3:38 pm | कैवल्यसिंह

मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड' हे रेस्टॉरंट/हॉटेल आता पुण्यात..

येथे बोंबील फ्राय, फिश कोशिंबीर, मटणाचा मालवणी हिसका, क्रॅब तंदूरी, टायगर प्रॉंन्स, लॉबस्टर, कोळंबीचं मस्त लोणचं आशी विविध तोंपासु पदार्थ मिळतात.. पन भरपुरच महाग आहे..

हे रेस्टॉरंट बंडगार्डन येथील आयनॉक्स सिनेमा गृहाजवळ मेट्रोपोलिस इकडे नविन शाखा सुरु झाली आहे..

मुंबईचे फेमस 'गजाली सी-फूड' हे हॉटेल आता पुण्यात.

नांदेडीअन's picture

20 Jul 2017 - 9:16 pm | नांदेडीअन

बर्‍याच दिवसांपासून पिंपरी मार्केटजवळच्या महादेव पॅटिसवालाबद्दल ऎकून होतो.
लोकांना जशी चहाची तलफ लागते, तशी मला चटपटीत खायची तलफ लागत असते अधूनमधून.
काल रात्री अशीच तलफ लागली होती म्हणून रेनकोट घालून भर पावसात बाईकवर जाऊन हे ठिकाण शोधून काढलेच.
लगेच पॅटिसची ऑर्डर दिली.

पूर्ण पॅटिस संपवेपर्यंत मनात एकच विचार होता, की हे पॅटिस इतके फेमस का झाले असेल ?
सगळीकडे मिळते अगदी तसेच पॅटिस आहे हेसुद्धा.
चव खराब किंवा वाईट होती असे मुळीच म्हणत नाहीये मी, पण जेवढा गाजावाजा झालाय, तेवढे नक्कीच विशेष नाहीये हे पॅटिस.
पॅटिस संपवल्यानंतर एक गुलाबजामुन मागवले.
तेसुद्धा फार काही विशेष नव्हते.
अती जास्त अपेक्षा ठेवून एखाद्या ठिकाणी पोटोबा करायला गेल्यावर आपला पोपटोबा होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण.
असो.

महादेव पॅटिसवालामधून बाहेर पडताक्षणी Kalyani A1 हे छोटेसे पाणीपुरी-भेळ सेंटर दिसले.
काहीही अपेक्षा न ठेवता एक प्लेट पाणीपुरी खायचे ठरवले.
इथे मात्र उलटे झाले.
अपेक्षेपेक्षा खूप टेस्टी पाणीपुरी खायला मिळाली.
एक प्लेटची दोन प्लेट कधी झाल्या कळलेच नाही.
यापूर्वी इतकी चांगली पाणीपुरी मी फक्त दोनच ठिकाणी खाल्ली होती.
एक म्हणजे कॅम्पमधले जयशंकर पाणीपुरीवाला आणि दुसरी कोथरूडच्या डीपी रोडवरच्या बधाई स्वीट्समधली पाणीपुरी.
Kalyani A1 च्या पाणीपुरीची चव बरीचशी जयशंकर पाणीपुरीसारखीच आहे.

कोणाला पिंपरीतील स्ट्रीट फुडसाठी फेमस असलेली ठिकाणं माहीत असतील, तर कृपया शेअर करा.

pattice

sweet

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Apr 2021 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असल्यास माहिती टाकावी ही नम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 1:03 pm | चौकस२१२

माझेही उत्तर भारतात गेल्यावर काहीसे असेच व्हायचे ... एकदा दिली हुन आग्र्याला जाताना सकाळच्या थंडीत रस्त्याच्या बाजूल खाल्ले,,, गरम होते म्हणून मजा आली पण जडच
याला कारण असे असावे :
मराठी लोकांना कदाचित पराठा आणि खास करून मेथीचा म्हणले कि गुजराथी पद्धतीचा खुसखुशीत THEPLA सदृश खाण्याची सवय झाली असावी ,, पण मुळात उत्तरेतील पराठा हा प्रकार जाडजूडच असेल !

असो अजून एक गोष्ट भारतात मिळाली तर जरूर खा... फक्त वाटतात किसाचा पराठा म्हणजे स्विस पद्धतीचा " पोटॅटो रोस्टी"

चौकस२१२'s picture

1 Apr 2021 - 1:04 pm | चौकस२१२

फक्त वाटतात किसाचा पराठा
फक्त बटाट्याच्या किसाचा

पॉपकॉर्न's picture

19 Apr 2021 - 4:04 pm | पॉपकॉर्न

डांगे चौकातून रावेतला जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजुला हॉटेल समाधान आहे. मटन, चिकन अतिशय उत्तम असते. चिकन/मटन सुक्के, एक वाटी रस्सा (अनलिमिटेड), चपाती/ज्वारीची/बाजरीची भाकरी
इथे मटन/चिकन सोबत मिळणारा भात अप्रतिम सुगंधित असतो. हे सर्व मोदी लॉकडाउन पुर्वी आता उठा लॉकडाउन मध्ये काय परिस्थिती आहे महिती नाहि.