खाद्यभ्रमंती - पुणे

नांदेडीअन's picture
नांदेडीअन in काथ्याकूट
22 Jan 2015 - 11:16 am
गाभा: 

खाण्या-पिण्यासाठीच्या पुण्यातल्या चांगल्या जागांचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा का ?
बादशाही, श्रेयस, पीके, गुडलक, वैशाली या हॉटेल्सची महती एव्हाना पुण्याच्या बाहेरसुद्धा पोहोचली असेल.

थोडा वेळ काढून काही नवीन हॉटेल्सची नावं सांगा, जेणेकरून माझ्यासारख्या खादाडांना खाद्यभ्रमंती करता येईल.

चला, सुरूवात मीच करतो.

- चांदणी चौक (बावधन) जवळचे ’टेस्टी टंग्स’ चाटसाठी चांगले आहे.

- औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

- कर्वे नगरच्या स्पेन्सर चौकात महिन्याभरापूर्वी ’ममता डायनिंग हॉल’ सुरू झाला आहे. कमी पैशात फार चांगली थाळी मिळते इथे.

- कर्वेनगरलाच आंबेडकर चौकाजवळ ’कॅफे स्क्वेअर’ नावाचे एक छोटेसे चायनिज हॉटेल आहे.
इथले चायनिज पदार्थ इतरत्र मिळतात तसेच आहेत, पण इथली शेजवान चटनी मला खूप आवडते.

- विमान नगरच्या दत्त मंदिर चौकाजवळ ’लझीझ’ नावाचे एक हैद्राबादी हॉटेल आहे.
इथली चिकन बिर्याणी पुण्यातल्या सर्वोत्तम चिकन बिर्याणींपैकी एक आहे.
’कुबानी का मिठा’ ही स्वीट डिशसुद्धा मस्तच !

प्रतिक्रिया

पहिले ३ फोटो पाहुन मला भस्मा अ‍ॅटॅक झाल्याची जाणिव झाली आहे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 12:11 pm | मदनबाण

अरे हो... एक राहिलच...
मी पहिला ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 12:18 pm | मृत्युन्जय

१. तुम्ही सांगितलेल्या टेस्टी टंग्स मध्ये डॉलर जिलबी आणि मालपुआ अप्रतिम मिळतो. गुलाबजामही अतिशय सुंदर

२. आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर.

३. कोथरुडला (पौड रोड) स्ट्यु आर्ट हे अतिशय अप्रतिम छोटेसे हॉटेल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्यु अतिशय दर्जेदार मिळतात. हंगेरियन गुलाश खास प्रसिद्ध.

४. कोल्हापुरचे राजमंदिर आइसक्रीम आता पुण्यात सुरु झाले आहे. कोथरुड डीपी रोड (म्हातोबा मंदिरापासुन गणंजय सोसायटीवर जाणारा रस्ता) वर आहे. येथील रेड पेरु आइसक्रीम केवळ अप्रतिम. बाकीचीही आइसक्रीम बरी आहेत. पायना स्ट्रॉबेरी हा एक वेगळा फ्लेवरही मिळतो इथे.

५. ढोले पाटील रोडवर द्रविडा'स बिस्ट्रो नव्याने सुरु झाले आहे. सिटी पॉइंट मध्ये. उत्कृष्ट दाक्षिणात्य पदार्थ मिळतात. इथली थाळी देखील सुंदर.

६. रोल्स मॅनियाच्या शाखा ठिकठिकाणी आहेत. त्यांचे सगळेच रोल्स सुंदर आहेत.

७. औंधला स्किप्स नावाचा कॅफे आहे. येथील ब्रेकफास्ट आणि सँडविचेस अतिशय सुंदर.

८. कोथरुडला करिष्माच्या येथील खाऊ गल्लीत सिन सिटी नावाची बेकरी आहे. येथील सर्वच केक्स सुंदर. खास करुन इटालियन कसाटा, हनी अल्मंड तर लय भारी.

९. कोथरुडला कोकण एक्स्प्रेसच्या गल्लीत मस्ती मिसळ आणि पौड फाट्यावर किमायाच्या पुढच्या (कोथरुड कडुन नळ स्टॉप कडे जाताना) गल्लीतली कोल्हापुरी मिसळ निरातिशय सुंदर.

१०. बावधनला त्रिकाया नावाचे हॉटेल आहे. अँबियन्स दर्जेदार. जेवण आवडेलच असे नाही. पण येथील लेमन कॉरियंडर सुप अतिशयच दर्जेदार.

११. ठिकठिकाणी डेयरी डॉन आइसक्रीम आहे. यांच्या कडे डेयरी डॉन स्पेशल आणी अमेरिकन नट सुंदर मिळते.

१२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर.

१३. भाउ पाटील चौकात दिल्ली चाट दरबार सुरु झाले आहे. अस्सल दिल्ली साएड चाट आणि छोले भटुरे मिळतात (इथे काळे छोले असतात आणि ते काळा मसाला वापरतात. त्यामुळे सर्वांनाच आवडेल असे नाही)

बाकी नंतर सांगेन

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 12:24 pm | मृत्युन्जय

अजुन ३:

१४. मॉडेल कॉलनीत ऑरियँटल वोक आहे. इथले बर्मीज खाउ सी जरुर ट्राय करावे.

१५. मॉडेल कॉलनीतच हॉल्ली क्रेप्स आहे. इथले क्रेप्स सुंदर. अर्थात क्रेप्स हा प्रकार सगळ्यांना आव्डेल असे नाही. आपल्याला डोसे ठराविक प्राकारातच खायला आवडतात. क्रेप्स म्हणजे अगदी डोसे नसले तरीही हा प्रकार याच कारणाने अनेकांना आवडत नाही.

१६. करिष्मा लेनमध्ये आणि शबरी, एफ सी रोडच्या बाहेर पुर्वी स्पाइस आइस्क्रीम मिळायचे. आताचे माहित नाही. काही फ्लेवर्स खुपच सुंदर होते. मिळत असेल अजुनही तर नक्की ट्राय करा.

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 12:25 pm | मृत्युन्जय

अजुन १:

१७. जे जे गार्डनचा वडापाव पुण्यात प्रसिद्ध आहेच. त्यांची एक शाखा आता नळ स्टॉप वर समुद्रच्या लायनीत, कॉटनकिंगच्या बाजुला सुरु झाली आहे. वडापाव अप्रतिम

नांदेडीअन's picture

22 Jan 2015 - 12:27 pm | नांदेडीअन

हा वडापाव फेमस आहे हो खूप.
फेमस जागांची नावं मुद्दाम दिली नाहीत.

गार्डन वडापाव खायचा असेल तर कॅम्पात जा, न पेक्षा कोथरुड महेश विद्यालयजवळचा कोथरुड वडापाव ट्राय करा.

आपटे रोडवरच्या शाहजी पराठा हाउस मध्ये पराठे अप्रतिम मिळतात. थोडे महाग आहेत. पण वर्थ व्हिजिट. साधा अँबियन्स चालणार असेल तर त्यांची मूळ शाखा लक्ष्मी रोडवर आहे. तिथे किंमती कमी आहेत. इथला चुर चुर नान, अमृतसरी नान आणि बनारसी आलू पराठा केवळ अप्रतिम. दाल लसूनी पराठीही उत्तम. लस्सी देखील सुंदर.

असहमत.. बरे आहेत पराठे पण अप्रतिम किंवा उल्लेखनीय नाहीत. जाडेभरडे वाटले. चुरचुर नान बरे, पण मेथी पराठा म्हणजे खुसखुशीत मेथी तोंडात येणारा ठेपला नसून अगदीच पालेभाजीची हिरवी प्युरी माफक प्रमाणात कणकेत एकजीव मिसळून नुसता हिरवा रंग आणलेली जाडी चपाती वाटली.

आलू, गोबी पराठ्याचेही तसेच. तव्यावरचा पातळसर अन खुसखुशीत पराठा जास्त छान लागतो. यांचे तसे नव्हते.

अर्थात पसंद अपनी अपनी हे शेवटी आहेच.

मृत्युन्जय's picture

31 Jan 2015 - 12:12 pm | मृत्युन्जय

शाहजीज चे पराठे पातळ नाहित हे नक्कीच. किंबहुना त्याच कारणासाठी मला ते जास्त आवडले. स्टफिंग सढळ हस्स्ते वापरले जाते. मेथी पराठी बद्दल माझा पास. सगळ्या प्रकारच्या पराठ्यांमध्ये हा स्गळ्यात जास्त नावडता, कधीच खात नाही (अपवाद घरी करुन ताटात कंपल्सरी वाढलाच जातो तेव्हाचा). पुर्वी मी चैतन्यच्या पाराठ्यांचा चाहता होतो. पण त्यांची क्वालिटी पारच ढासळली आहे. तरीही बरे असतात तसे.

अनुप ढेरे's picture

22 Jan 2015 - 12:26 pm | अनुप ढेरे

बेष्ट धागा...

१२. भांडारकर रोडवर एक फ्रेंच बेकरी आहे. नाव नीट्से आठवत नाही (ले प्स्लेजर की कायसे नाव आहे). येथील मेकरुन आणि चीझकेक खुप सुंदर.

होय, ला प्लेझीर नावाचं हाटील. छोटसं आहे. पण मस्तं (आणि महाग). सँडिविचं खाल्ली होती दोन. लय भारी.

जॅक डनियल्स's picture

24 Jan 2015 - 5:56 am | जॅक डनियल्स

ला प्लेझीर, हे एका आपल्यासारख्या मध्यमवर्गीय मराठी माणसाचे फ्रेंच हॉटेल आहे.
सिद्धार्थ महाडिक - राष्ट्रीय बॅडमिंटनपटू आणि नंतर मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी शेवटी सिडनी मधून बेकरीचे शिक्षण !
या भांडवलावर याने भांडारकर रस्त्यावर फ्रेंच बेकरी टाकली आणि यशस्वी करून दाखवली. खूप प्रयोग करत राहणे हा या बेकरी चा आत्मा ...त्यामुळे खाणे थोडे महाग असले तरी समाधान देऊन जाते.

बॅटमॅन's picture

22 Jan 2015 - 2:14 pm | बॅटमॅन

द्रविडा'ज बिस्त्रो हे ईअरमार्कवल्या गेले आहे. नक्की जाऊन पाहीन. बहुत धन्यवाद.

लझीझदेखील लवकरच ट्राय औट करण्यात येईल.

मृत्युन्जय's picture

3 Feb 2015 - 11:36 pm | मृत्युन्जय

द्रविडाज बिस्ट्रो इयरमार्कवले आहेस म्हणुन थोडेफार सांगतो:
१. हे जरी दाक्षिणात्य हॉटेल असले तरी ते ऑर्गॅनिक फूडसाठी जास्त प्रसिद्ध आहे.
२. मला त्यांची कंसेप्ट आवडली. मस्त टोपलीत वगैरे खाद्यपदार्थ आणुन ठेवतात.
३. स्टाफ हा नौकरवर्ग न वाटता सगळे मालक आहेत असे वाटते. अ‍ॅटिट्युडमुळे नाही तर सर्व्ह करण्याच्या त्यांच्या मनापासूनच्या इच्छेमुळे. सर्व्हिस प्रॉम्प्ट नाही म्हणता येणार पण आतिथ्यशील वाटते. माझा घसा खराब आहे म्हटल्यावर त्याने कुठल्यासे हर्ब्स मिसळुन फिकट गुलाबी रंगाचे पाणी गरम करुन आणुन दिले (गुड फॉर सोर थ्रोट यु नो. आवर शेफ सजेस्टेड दिस फॉर यु). (हे फुकट होते हे जास्त महत्वाचे. फुकट ते असेही पौष्टिक)
४. चव थोडी सपक आहे. मी रस्सम नाही चाखु शकलो. पण बाकी पद्दार्थ थोडे माइल्ड क्याटेगरीतले होते.
५. ते जवळजवळ प्रत्येक गोष्ट कस्टमाइझ करुन देतात. सॅलेड, इडली, डोसा, उत्तपा, पराठा सगळे कस्टमाइझ करुन देतात.
६. बर्‍याच गोप्ष्टी ते पॉर्शन बेसिस वर देतात. पॉर्शन म्हणजे मध्यम (छोटी ते मध्यम या मधली खरे म्हणले) आकाराची वाटी. हाफ बिर्याणी म्हणजे एक मिडीयम बाउल वगैरे. पॉर्शन बेसिस वर अस्ल्ल्याने क्वांटिटी गंडते. आपण समजा फ्राइड पनीर सागितले की तो पनीरचे ३ आयताकृती तुकडे आणुन ठेवतो. चव चांगली होती आणि पोर्शन कमी होते तशी किंमत पण कमी होती. पण आपला क्वांटिटीचा अंदाज त्यामुळे चुकु शकतो.
७. या पॉर्शन आणि कस्टमाइझच्या भानगडीत ते बराच घोळ घालतात. उदा. एखादे स्पेशल चाय हॉटेल असेल तर ते असा गोंधळ घालतील:

१. ब्लॅक टी की रेग्युलर
२. रेग्युलर असेल तर मसाला की बिन मसाला.
३. साखरेचा की बिनसाखरेचा
४. ब्लॅक हवा असेल तर लेमन की दार्जीलिंग की अर्ल ग्रे की जस्मिन की आसाम की अजुन काही
५. ब्लॅक विथ शुगर की विदाउट शुगर
६. रेग्युलर डिप की लाँग डिप
७. दूध हवे असेल तर डेयरी व्हाइटनर की साधे दूध
८. साधे दूध हवे असेल तर गाईचे की म्हशीचे की शेळीचे.
९. म्हशीचे हवे असेल तर चितळे की गोकुळ की वारणा की कात्रज
१०. गाईचे हवे असेल तर काठेवाडी की जर्सी.

शेवटी तुम्ही वैतागता. पण मला हा असा चॉइसचा खेळ आवडला.

मला इथली बिर्याणी आणि फ्राइड पनीर मनापासून आव्डले. किंमत रास्त होतीणिसर्व्हिस तत्पर नसली तरीही आगत्यशीर होती. रचना आणि प्रेझेंटेशन आवडले. फूड बाबत म्हणाल तर दक्षिणायन याहुन १०० पट जास्त उत्तम पदार्थ द्यायचे.

अनुप ढेरे's picture

4 Feb 2015 - 9:58 am | अनुप ढेरे

परवाच जाऊन आलो. रस्सम भारी होतं. बिर्याणी देखील अप्रतीम. पण सर्वीस खूSSSSप स्लो.

बॅटमॅन's picture

5 Feb 2015 - 6:18 pm | बॅटमॅन

मुद्दाम कालच जाऊन आलो.

रस्सम- ऑस्सम. थोऽडे अजून टँगी चालले असते. पण कपात घेऊन चहासारखे पिताना जाम मज्या आली.
सांबार- अजून बरेच मसालेदार पायजे होते. सपक वाटले. मालकाला सांगितल्यावर तो म्हणाला की भातासोबत वेगळे अन इडलीसोबत वेगळे सांबार देतो. इडली घेतल्यामुळे सपक सांबार नशिबी आले.
चटण्या- लाल टोम्याटो चटणी ओक्के ओक्के. नारळ चटणी छान होती.
आप्पम व व्हेज स्ट्यू- गंडलेला प्रकार होता. आप्पमच्या कडा छान जाळीदार होत्या पण सेंटरला ओलाकच्च लागत होता. व्हेज स्ट्यूदेखील जरा गंडलेला होता. याच्या तुलनेत सौथ इंडीजमधला व्हेज स्ट्यू म्हणजे वर्ल्ड अपार्ट. बट देन किंमतीतही फरक आहेत.
उत्ताप्पा- नथिंग टू ग्रेट.

ताक- अप्रतिम. असे ताक लै कमी ठिकाणी प्यालोय. बहुधा हलकी फोडणी टाकत असावेत असे वाटले. जे काय असेल ते असो, पण जे कै पेय समोर आले ते अप्रतिम होते.

आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे.

मृत्युन्जय's picture

7 Feb 2015 - 1:16 pm | मृत्युन्जय

आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे.

खरं आहे रे. ती क्वालिटी इतर कुठेच नाही. साउथ इंडिज मध्ये पण नाही.

अगदी अगदी. साऊथ इंडीजमधला तो कै करी स्ट्यू फक्त ट्रेडमार्क आहे. तो आणि आप्पम हे पदार्थ तिथे जगात भारी. बाकी काही लय खास नाही. दक्षिणायनमध्ये जी क्वालिटी होती त्याच्यापेक्षा भारी क्वालिटी सौथमध्येही दिसली नाही. सौथमध्ये त्याच्या तोडीचे होते आजवर पाहिले ते सर्व.

दक्षिणायन बंद झाल्यापासून हॉटेलोहॉटेली भटकतो आहे पण अत्रुप्त आत्म्यासारखी स्थिती झालीये. आमचे वैकुंठ काही सापडायला तयार नाही.

आणि दक्षिणायनच्या आठवणीने खरेच हळवा झालो. काय क्वालिटी होती च्यायला. ते बंद व्हायला कारणीभूत असलेल्यांना माझा तळतळाट लागणार आहे.

आम्हालाच तळतळाट लागणार रे तुझे ;)

बाकी ते दक्षिणायन लै बकवास होतं. अशी माजुरडी हाटेलं बंदच व्हायला हवीत. पैशे ढिगाने घ्यायचे पण क़्वांटीटी अगदीच कमी, बरे निदान क्वालिटी तरी हवी ना तर तीही नाही.
सालं त्या दिवशी दक्षिणायन मधून अर्धपोटी बाहेर पडून नंतर मग संगली स्पेशल भेळपुरी आणि मराठवाडा पेश्शल लोणी धपाटे खावे लागले. किमान ७ ते ८ मिपाकर साक्षी आहेत ह्या गोष्टीला.

पण ह्या बाट्याला दक्षिणायनचं लैच कौतुक :-/

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 3:22 pm | बॅटमॅन

बाकी काहीही बोल पण क्वालिटीबद्दल बोलायचं काम नाय सांगून ठिवतो हां. अर्धपोटी बाहेर पडला ते क्वांटिटीमुळे, क्वालिटीमुळे नव्हे.

श्या घालायच्या तर नेमक्या आणि योग्य मुद्यावर घातल्या पायजेत. ;)

अरे क्वालिटी पण आवडली नै रे इतकी.
सौथैंडीज लैच उजवं वाटलं त्यापेक्षा.

शेवटी आवडनिवड ही सब्जेक्टिव्ह असते म्हणा.

पण

दक्षिणायन रसम विरुद्ध सौथिंडीज रसम

दक्षिणायन मुळगापुडी इडली विरुद्ध सौथिंडीज मुळगापुडी इडली

आणि एकूणच दक्षिणायन डोसा विरुद्ध सौथिंडीज डोसा

अशा स्नॅक बेस्ड तुलनेत दक्षिणायन कोसो आगे आहे. तेच आप्पम इ. मध्ये सौथिंडीज पुढे आहे. शिवाय दक्षिणायनमधले टोम्याटो राईस, पुळिओगरे, बिशिबेळेभात, हे सौथिंडीजमध्ये मिळतही नाहीत तिथल्या लंचमध्ये.

सांबाराबाबतीत दोन्ही मोर ऑर लेस सेम. सेम अबौट चटण्या.

इडली, डोसा, उत्तप्पा, भात, रसम या पाच प्रकारांत दक्षिणायन उजवे तर आप्पम, स्ट्यू, इ. मध्ये सौथिंडीज उजवे.

सबब, तुलनाच करायची झाली तर क्वालिटीच्या बाबतीत दक्षिणायनचा नाद नाही.

असो, अजून हळवे नको व्हायला.

प्रचेतस's picture

9 Feb 2015 - 3:49 pm | प्रचेतस

हाहाहा.

बाकी दक्षिणी पदार्थांबद्दलच बोलायचं तर हैद्राबादेतील चटणीज चा नादच खुळा.
इतकं भारी जगात कुठंच नै.

बॅटमॅन's picture

9 Feb 2015 - 3:55 pm | बॅटमॅन

याबद्दल बरेच ऐकले आहे. गेल्याने जात आहे रे, आधी गेलेचि पाहिजे!

मृत्युन्जय's picture

9 Feb 2015 - 4:34 pm | मृत्युन्जय

चटणीज ला नाही गेलास अजुन? अर्रे केवळ त्यासाठी हैद्राबाद ची एक ट्रिप मार. चार चटण्या + मुळगापुडी + सांबार. सगळे अनलिमिटेड. दैवी चव. घासाघासात निव्वळ ...... हैद्राबादेत जाउन एकवेळ बिर्याणी नाही खाल्ली किंवा कराचीची बिस्कीटे नाही चाखली किंवा मोती नाही घेतले तरी चालतील पण चटणीज इज अ मस्ट.

अरे बापरे. तोंडातून ओहोळ वाहू लागले. नको नको, मी जातो मी जातो मी जातो............

त्रिवेणी's picture

13 Jun 2016 - 1:18 pm | त्रिवेणी

चटनीज
चटनीज ची इडली.

कपिलमुनी's picture

9 Feb 2015 - 7:02 pm | कपिलमुनी

पेसर अट्टू !
अहाहा !!

चटनीज हाटेलाच्या आठवणी लै जुन्या आहेत. उ. गृहाचे बांधकाम चालू असल्यापासून बघितले आहे. मग त्यांचे उद्घाटन झाले. कोणताही पदार्थ सुरेखच असतो असा अनुभव आला होता. चिरंजीवी दोसा की अशाच नावाचा कोणतातरी एक पदार्थ माझा आवडता. चटनीजमध्ये न जाऊन १० वर्षे तरी झाली असतील, किंवा जास्तच!

मृत्युन्जय's picture

9 Feb 2015 - 4:31 pm | मृत्युन्जय

चेन्नैच मुरुगन देखील खासच. चटणीज एवढेच मल तेही आवडते. दाक्षिणायन मला त्याच लीगमधले वाटायचे. सांबर, रस्सम आणि चटणीज बद्दल बोलायचे झाल्यास. अर्थात चटणीज आणी मुरुगन दक्षिणायन पेक्षा खासच आहेत हे मान्यच करावे लागेल. निव्वळ सुख आहे ते.

आणी हो. दक्षिणायन बद्दल काय पण बोलायचे नाय

:)

चेंनैच्या मुरुगनबाबत बरंच ऐकलेले आहे. कधी योग आला तिकडे जायचा तर अवश्य जाऊच.
बाकी चटनीज म्हणजे निव्वळ अप्रतिम रे. अगदी घासाघासात सुख.

इकडे औंधला बनाना लिफ नावाची सौथींडीयन आंध्रा स्टाईल मेस आहे. अप्रतिम रस्सम, सांभार आणि केळफ़ुलाची भाजी मिळणारी. कुणी गेलंय का तिथे? एक मित्र प्रचंड तारीफ़ करत होता.

बनाना लीफ औंधमध्ये आहे का? आता जातोच. बहुत धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

9 Feb 2015 - 7:07 pm | मृत्युन्जय

बनाना लीफ बंद झाले बहुधा. एकदा गेलो होतो मी शटर डाउन बघुन परत आलो.

बादवे "इकडे औंधला" या शब्दांचा अर्थ काय? तु औंधात कुठे असतोस की काय कामाला?

प्रचेतस's picture

9 Feb 2015 - 7:12 pm | प्रचेतस

अरे ते दुपारीच चालू असते फ़क्त.

मी हिंजवडीला आहे रे. पण बनाना लिफ ला गेलो नाही कधी. बाकी नावावर जाऊ नकोस. नाव जरी लै भारी वाटत असलं तरी ती आंध्रा स्टाइल लहानशी मेस आहे.

मृत्युन्जय's picture

16 Feb 2015 - 2:06 pm | मृत्युन्जय

बनाना लीफला जाउन आलो.

माझे मतः

१. इडली / मेदु वडा उपलब्ध नव्हता कारण तो फक्त दुपारी १२ पर्यंतच असतो. नंतर बॅटर तितकेसे चांगले उरत नाही असे हॉटेल चे मत होते.
२. डोसा उत्तम होता. पण फक्त त्यासाठी मी फार मोठा प्रवास करणार नाही. बर्‍याच ठिकाणी चांगले डोसे मिळतात.
३. चटण्या (लाल आणी पांढरी) चांगल्या होत्या. पण परत तेच, केवळ चटण्यांसाठी फार पाय तुडवत जाण्यासारखे काही नाही.
४. रस्सम ठीकठाक होता. दक्षिणायन मध्ये यापएक्षा १०० पट चांगला रस्सम मिळायचा. थोडी टँगी थोडी तिखट अशी जी चव हवी ती दोन्ही थोडी कमी होती.
५. सांबार चांगला होता. पण मला स्वतःला शिवसागर चा सांबार अधिक आवडतो (दक्षिणायन तर प्रश्नच नाही). सांबर मध्ये सुद्धा तो टँगी पंच मिसिंग होता (योग्य मराठी शब्द कोणीतरी सुचवा रे).
६. फिल्टर काप्पी अप्रतिम होती. केवळ याच साठी लांबवर प्रवास करायला लागला तरी हरकत नसावी.
७. मी इडली / वडा खाउ न शकल्याने त्याबद्दल फारशी प्रतिक्रिया देउ शकत नाही. \
८. स्वच्छतेला १० /१०
९. किंमतीत १० पैकी ९

मी परत जाइन का? नक्की जाइन की. माझ्या हापिसापासुन २ मिनिटाच्या अंतरावर आहे. तत्पर सर्विस आहे, अतिशय रास्त दरात उत्तम पदार्थ मिळतात, वेगळे बरेच पदार्थ जे इतर दाक्षिणात्या हाटेलात मिळत नाहित ते इथे चाखता येतील. चवीच्या बाबतीत जरी मला इतरही बरीच चांगली उपहारगृहे माहिती असतील तरी बनाना लीफ बाबत तक्रार करायला फार जागा नाही, चव चांगलीच आहे (याहुन चांगली इतर ठिकाणी असते ही गोष्ट वेगळी. थोडक्यात म्हणजे कंप्लिट व्हॅल्यु फॉर मनी आहे. माझे हापिस इथुन उठुन कोथरुडात गेले तर मात्र मुद्दाम वाट वाकडी करुन जाइन की नाही हे सांगता येत नाही.

बनाना लीफ विश्रांतवाडी मध्ये आहे.
औंधवाल्यांचीच ब्रांच आहे की कुणाची ते माहित नै पण.

नांदेडीअन's picture

22 Jan 2015 - 12:26 pm | नांदेडीअन

@ मृत्युन्जय जी

खूप खूप धन्यवाद.
यातल्या २-३ ठिकाणीच गेलोय.
एक-एक ट्राय करतो आता. :)

अनुप ढेरे's picture

22 Jan 2015 - 12:34 pm | अनुप ढेरे

हा धागा दखल मध्ये आणता येईल काय संपादक मंडली?

विशाल कुलकर्णी's picture

22 Jan 2015 - 12:36 pm | विशाल कुलकर्णी

लै भारी धागा ! धन्यवाद श्रेष्ठी :)

सुबोध खरे's picture

22 Jan 2015 - 1:01 pm | सुबोध खरे

एक विनंती
लोकांनी जेथे काही खाल्ले असेल तेथिल वर्णन फोटोसकट टाकावे. अन्यथा असे मुंबईतील ७५ ठिकाणांचे शाकाहारी पदार्थांचे वर्णन माझ्या कडे व्हाट्स अप्प वर पण आहे मग त्याला मजा येत नाही.
नुसतेच मधुबालाबद्दल वर्णन करायचे आणि फोटो टाकायचे नाही यात मजा नाही यासारखे.मग लोकांनी आपल्या कल्पनांचे मनोरे रचा.

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 1:13 pm | मृत्युन्जय

बरोबर आहे. नुसतीच लिस्ट देउन मजा येत नाही. पण ही (मी दिलेली) वॉट्सअ‍ॅपची लिस्ट नाही हो. मी सगळीकडे जाउन आलेलो आहे. अन्न पुढ्यात आल्यावर ते फोटो काढण्याइतके पेशन्स नसतात माझ्याकडे. पुढच्या वेळेस पासुन ट्राय करेन खरे. :)

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2015 - 11:47 pm | बोका-ए-आझम

द्या ना ते मग. हा डाॅक्टरी सल्ला आवर्जून पाळू आम्ही!;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Jan 2015 - 12:43 am | निनाद मुक्काम प...

सहमत

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2015 - 1:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आशा डायनिंग हॉल्,सुवर्णरेखा डायनिंगहॉल खूप जुने ,बहुदा आपटेरोड वरचे.कोथरूड वाढले व पुण्यात खाण्याची मजा गेली असे ह्यांचे मत.

उदय के'सागर's picture

22 Jan 2015 - 2:16 pm | उदय के'सागर

सुवर्णरेखा डायनिंग हॉल ला लोक का गर्दी करतात ठाऊक नाही. दैनंदिनी खानावळ म्हणून जात असाल तर चांगलं आहे पण हॉटेल म्हणून जात असाल तर फार काही ग्रेट नाही. महाविद्यालयीन जीवनात माझी हीच खानावळ होती त्यामुळे रोजरोज तिथे खाल्ल्याने मला विशेष वाटत नसावं पण ऐरवी जायलाही तिथे का जावं असा प्रश्न पडतो. आपल्या घरी जे जेवण असतं तेच तिथं मिळतं साध्या भाज्या, चटण्या, कोशिंबीरी (श्रेयस किंवा दुर्वांकूर सारखं लग्नबाज जेवणही नसतं). पोऴ्या म्हणजे तर, झटकून घ्याव्या लागतात एवढं पीठ असतं त्यावर, अगदी रखरखीत कोरड्या. गरम खाल्ल्या तर ठीक नाहीतर थोडा जोर देऊन तोडून खायच्या. पण तिथला गरम-गरम भात-आमटी, केवळ अहाहाहा :)
महाराष्ट्रीय थाळीच्या बाबतीत आत्तापर्यंत श्रेयस आवडलं (दुर्वांकूर मात्र आजीबात आवडत नाही, त्यांचा दहीवडा आणि बटाटेवडा अपवाद).

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 2:49 pm | सविता००१

बद्दल प्रचंड सहमत
बंडल आहे अगदी.

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2015 - 11:45 pm | बोका-ए-आझम

लग्नबाज!रोफललो! दगाबाज, रं*बाज तसा लग्नबाज!:)

विजुभाऊ's picture

24 Jan 2015 - 12:28 pm | विजुभाऊ

सुवर्णरेखा बद्दल सहमत एखाद दिवस तेथेले जेवण बरे वाटते.
मात्र सुवर्णरेखा (प्रभात रोडवर) स्वच्छतेचा अभाव आढळला.
चमचे वाट्या नीट धुतलेल्या नसतात

मृत्युन्जय's picture

24 Jan 2015 - 12:40 pm | मृत्युन्जय

सुवर्णेरेखा ही खानावळच आहे. बरी खानावळ इतकेच. हॉटेलची अपेक्षा घेउन तिकडे जाउच नये. मला व्यक्तिशः अजिबातच आवडत नाही. त्यापेक्षा आशा कितीतरी चांगले.

सुवर्णरेखा हे प्रभात रोडवर आहे की होते? असल्यास कुठे आहे?

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 3:45 pm | मृत्युन्जय

प्रभात रोडवरच आहे. प्रभात पोलिस चौकीवरुन डेक्कन कडे येताना चौक पार केल्यावर २-३ बिल्डींग सोडुन उजव्या हाताला सापडेल. पैसे वाया आहेत. एक पोटभरु खाणावळ यापेक्षा जास्त काही नाही.

सूड's picture

22 Jan 2015 - 2:56 pm | सूड

असे ह्यांचे मत.

ह्यांचे म्हणजे कोणाकोणाचे?

नाखु's picture

23 Jan 2015 - 10:33 am | नाखु

आदरार्थी "एकवचन" असावे.
तुम्हाला अपेक्षीत "बहुवचन" नसावे !!

खरे खोटे नानां ची माई (माईंचे नाना) जाणे.
ग्रेट्थिंकर्नी यावर प्रकाश टाकावा.

नांदेडीअन's picture

22 Jan 2015 - 1:17 pm | नांदेडीअन

माझ्याकडे बर्‍याच फोटो आहेत, पण त्या जागा बहुतांशी लोकांना माहित आहेत.
नवीन माहिती मिळावी या उद्देशानेच खूप पॉप्युलर असणार्‍या जागांबद्दल लिहिले नाही.

सौंदाळा's picture

22 Jan 2015 - 1:49 pm | सौंदाळा

bounty sizzlers कल्याणीनगर, पुणे.
अप्रतिम शाकाहारी आणि मांसाहारी सिझलर्स मिळतात. सोबतीला चालत असेल तर थंडगार बिअर.
कसे जावे: पुणे नगर रस्त्यावर रामवाडी जकात नाक्यच्या चौकातुन उजवीकडे वळावे. बिशप स्कुलची इमारत गेली की पुढच्या बाजुला उजव्या हाताला छोट्याशा रस्त्यावर वळालात की लगेच दिसेल.
पोलीस ग्राउंड नंतर लगेच दिसणारे फर्र्ग्युसन रस्त्यावरील याना सिझलर्स देखिल चांगले आहे असे ऐकले आहे.

उदय के'सागर's picture

22 Jan 2015 - 2:18 pm | उदय के'सागर

याना सिडलर्स चा चिझ गार्लीक ब्रेड जरुर जरुर ट्राय करावा, अतिउत्तम. बाकी बांउटी सिझलर्स बद्दल सहमत. अगदी आँथेटीक सिझलर्स खायचे असतील तर बाँटी इज अ बेस्ट प्लेस.

कपिलमुनी's picture

22 Jan 2015 - 2:39 pm | कपिलमुनी

+११११

अप्रतिम चवीचे सिझलर्स

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2015 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाऊंटी बद्दल आमच्या घरातल्या सिझलरप्रेमी मंडळींचे मत काही चांगले नाही.

पुण्यात "ऑथेंटिक सिझलर्स" काही दशकांपासून फक्त कँपातील वेस्ट एंड थिएटर जवळच्या "द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात.

कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे (नाव विसरलो)... चव चांगली असली तरी ते ऑथेंटिक म्हणता येणार नाही. सॉसेस भारतीय जिभेला आवडतील अशी तिखट आहेत... माझ्या मते जरा जास्तच. पण आमच्या काही नातेवाईकांना ती फार आवडली !

अनुप ढेरे's picture

23 Jan 2015 - 6:34 pm | अनुप ढेरे

योको सिझलर्स?

आदूबाळ's picture

23 Jan 2015 - 11:15 pm | आदूबाळ

"द प्लेस" (The Place - Touche The Sizzler) मध्ये मिळतात.

ये ब्बात एक्काकाका - हेच लिहायला आलो होतो.

भरपूर भूक ठेवून जाणे - द प्लेसचे सिझलर्स बरेच मोठे असतात.

पिलीयन रायडर's picture

31 Jan 2015 - 11:46 pm | पिलीयन रायडर

कल्याणीनगरमधल्या मारीप्लेक्स मॉल्मध्ये एक सिझलर जॉईंट आहे

"याना" सिझलर्स...

चांगले आहेत इथले सिझलर्स.. एफ.सी रोडवर पण एक शाखा आहे.

मनिमौ's picture

22 Jan 2015 - 2:08 pm | मनिमौ

अप्रतिम . विमान नगर मधे nyati मिलेनियम मधे एक रोल चे दा दुकान आहे. छान चव आहे.relax पावभाजी सहकार नगर

उदय के'सागर's picture

22 Jan 2015 - 2:26 pm | उदय के'सागर

माझ्या माहितीतील काही ठिकाणं :
१. बाणेर भागातल्या हॉटेल्स बद्दल फार माहिती नसल्यास, तिथे 'वे डाऊन साऊथ' नावाचं फाईन-डाईन रेस्टॉरंट आहे. असंख्य प्रकारचे डोसे/उत्तपे. खूप छान चव, मात्र फार महाग.
२. बाणेर-पाषाण रस्त्यावर सॅफरन नावाचे रेस्टॉरंट आहे, सी-फूड उत्तम.
३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jan 2015 - 6:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

३. एम.जी. रोडवरील 'मार्झो-ओ-रीन' मधे चवदार सँडवीच मिळतात. आणि होममेड टाईप पिझ्झाज्/बर्गर ही मस्त असतात.
हे पुणे खाद्यसंस्कृतीतील एक अग्रगण्य प्राचीन पण अजूनही टिकून असलेले ठिकाण आहे !

बोका-ए-आझम's picture

22 Jan 2015 - 3:00 pm | बोका-ए-आझम

पुण्यात शिकत असताना (१९९६-९८) च्या सुमारास डेक्कनवरच्या जनसेवा मध्ये बरेचदा गेलोय. मस्त होतं. बाकी एम.जी. रोडवरच्या मार्झोरिनचे चिकन सँडविच आणि शेक्स लाजवाब! दोराबजीची बिर्याणीही सुपर्ब!

छान धागा आहे. साधारणतः चांगला अँबीयन्स हायर-मीडल बगेट रेंज १२ -१४ जणांना डिनरपार्टीसाठी रेस्टॉरण्ट्सची माहिती हवी आहे. प्रिफरेबली गार्डन रेस्टॉरण्ट. (मुख्य म्हणजे आसनव्यवस्था कंजस्टेड (अगदी पाठीला पाठ टेकुन) नसावी.)

मृत्युन्जय's picture

22 Jan 2015 - 4:13 pm | मृत्युन्जय

साधारण कुठल्या भागात करायची आहे पार्टी? शाकाहारी की मिश्राहारी, कॉकटेल्स हवेत की नकोत?

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 3:28 pm | अत्रुप्त आत्मा

औंधला असलेल्या ’कढाई’मध्ये रबडी जलेबी आणि पाणीपुरी चांगली मिळते.

आवो...डिटेलमदी पत्ता द्या..! आजच जाऊण खान्याची परचंड मंजी परचंड विच्छा व्हायलिया!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jan 2015 - 4:05 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआअ http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif

घावलं...घावलं! झुम्याटूवर घावलं, http://www.sherv.net/cm/emo/funny/1/running-around-smiley-emoticon.gif पावलं पावलं,..आमाला विनटरन्येट पावलं! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy.gif

सिरुसेरि's picture

22 Jan 2015 - 3:44 pm | सिरुसेरि

पटवर्धन बागेजवळचा खिडकी वडा प्रसिदध आहे .

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2015 - 5:29 pm | दिपक.कुवेत

चला पळा आता.....

पैसा's picture

22 Jan 2015 - 7:22 pm | पैसा

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! लढ बाप्पू!

अवांतरः धागा आणि फोटो खासच आहेत! मृत्युंजय ची पुण्याबद्दलची माहिती बघून अवाक्!

+१११११११११११११११११११११११११११११११

सहमत...

अभिजीत अवलिया's picture

23 Jan 2015 - 10:01 am | अभिजीत अवलिया

Ajun yeudya list. Mhanje ek ek karun sarv thikani jaata yeil. (Plz kunitari saang na ithe Marathi madhe kase type karayche)

मोहनराव's picture

23 Jan 2015 - 5:32 pm | मोहनराव

निदान सहीला तरी जागलं पाहिजे ....

१ कोथरूड बसस्टँड जवळाचं एशियन मेलॅज अतिशय चांगलं हॉटेल आहे, वातावरण, चव, सर्विस एकदम मस्त.
इथं व्हेज प्लॅटर + हॉट सिझलर ब्राउनी एकदम सही प्रकार आहे.

२. गणेश पेठ गुरुद्वारासमोरचं उत्तम, नावाप्रमाणेच उत्तम आहे. बुंदीचे लाडु आणि गरमगरम गुलाबजामुन अगदी एक नंबर तसंच खास पंजाबी डोडा नावाची मिठाई इथं मिळते, ते सुद्धा एक नंबर. (मिठाईचं दुकान आहे)

३. द्रविड बरिस्ता ढोले पाटील रोड - टाळणेबल आहे - सर्विस फारच अपरिपक्व आहे, तुम्ही काय ऑर्डर दिलि आहे हे सुद्धा लक्षात ठेवत नाहीत, तुम्हालाच येउन विचारतात काय ऑर्डर होती ते.

४. विश्रांतवाडीच्या एमेसीबी ऑफिससमोर दिल्ली चाट पराठा हाउस आहे, अगदी स्वस्त आणि मस्त पराठे आणि समोसे.

५. कर्वेनगरच्या काकडे सिटि शॉपिंग सेंटर मधल्या फुलांच्या / पुजा सामानाच्या दुकानाच्या समोर एक पाणिपुरीवाल्या काकु असतात, जबरदस्त पाणिपुरी असते त्यांच्याकडे.

६. पुणे स्टेशन समोरच्या शिवकैलास मधली कुल्फी+बासुंदी हा एक जीवघेणा प्रकार आहे, कॅम्पातल्या द प्लेस मध्ये सिझलर खाउन चालत चालत इथं यायचं अन एक कुल्फि +बासुंदी खायची लई भारी.

७. मंडई गणपती जिथं वर्षभर असतो तिथं समोरचे सातपुते बासुंदीवाले, कोंळ्शाच्या शेगडीवर केलेली गरम बासुंदी, फक्त इथं आधी ऑर्डर द्यावी लागते आणि आपला डबा घेउन जावा लागतो, पण चव एकदम जबराट, फक्त दुध आणि साखरेची बासुंदी, एक नंबर प्रकार आहे हा.

८. गणेशखिंड एमेसेबी ऑफिस जवळची बंगाली हॉटेलं कुठं गेली कुणाला माहित आहे का ते सांगा, अगदी उत्तम बंगाली जेवण अतिशय स्वस्तात मिळायचं तिथं.

९. रास्ता पेठ एमेसेबी ऑफिसचं कँटिन हा एक स्वस्त आणि पोटभर खाण्याचा चांगला पर्याय आहे, १५/- मध्ये अंडा करी बाहेर कुठंही मिळत नसेल बहुधा.

असो, अजुन सांगेनच, आणि हो या सर्व ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा जाउन अनुभव घेउन हे लिहिलेलं आहे.

यसवायजी's picture

25 Jan 2015 - 12:09 pm | यसवायजी

तो बटाटेवडा कुठला होता हो? पत्ता परत एकदा सांगा की.

५० फक्त's picture

25 Jan 2015 - 7:25 pm | ५० फक्त

अरे होत तो एक राहिलाच, दुर्वांकुरच्या समोरचा बोळ, म्हणजे दुर्वाकुरच्या दारात अलका कडं तोंड करुन उभं राहिलं की डाव्या हाताचा बोळ, त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल मंदिर आहे पुढं गेल्यावर.

अजुन एक, गांधी लॉन्स च्या लायनीत म्हणजे कोथरुड आय्सिआय्सिआय्च्या समोर एक काळुबाई गार्डन वडापाव नावाचं दुकान आहे, अगदी खास मराठी वडे असतात त्याच्याकडे.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2015 - 7:32 am | अत्रुप्त आत्मा

@त्याच बोळात नवी पेठ विठ्ठल मंदिर आहे पुढं गेल्यावर. >>> अहो पचास...तो आमच्या नवि पेठेतला आण्णा'चा वडापाव! लै मंजी लै जबराट चव. शाळेत असताना, तो ७५पैशाचा १ वडापाव मंजी फायश्टार हाटीलातल्या पार्टीसारका वाटायचा. एकावेळी ६/७ तरी सहज खायचो तेंव्हा.. पण फुडं अण्णा गेला..आता म्हणे त्येचा कोनतरी रिलेटीव्ह चालिवतो ति गाडी..चव अजुनंही बर्‍यापैकि तीच आहे.. कदाचित दिवंगत अण्णाचा फोटू दिसतो गाडीवर लावलेला,म्हणून वाटत असेल..पण बरं आहे अजून. आणि त्याची एक्झॅट खूण मंजी नवी पेठ विठ्ठल मंदिरा अलिकडं,जनता दूधगृह(थोटे यांचे. ;) ) समोर!

विंजिनेर's picture

28 Jan 2015 - 12:28 pm | विंजिनेर

काय तो वडापाव. वा वा.. जुन्या आठवणी जागवल्या राव!
आम्ही पण शाळेतून येताना खायचो..

पुढे, काही वर्षांनी, जगातील पर्फेक्ट वडापावाचा शोध लागला - जुन्या बेडेकर मिसळ/साठे गादी कारखान्यासमोरच्या वडाखाली, नारायणपेठेत तो वडापाव मिळतो. अजूनही,फक्त संध्याकाळी ३तास असतो.

मृत्युन्जय's picture

28 Jan 2015 - 1:25 pm | मृत्युन्जय

जुन्या बेडेकर मिसळ

म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन म्हणतो. सध्या तरी मी गार्डन आणि शिवदीपच्या प्रेमात आहे. गोखले (अण्णा) आणि भोला देखील सुंदरच.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jan 2015 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणजे नक्की कुठे? एकदा खाइन म्हणतो.>>> +++१११

बासुंदीची ठिकाणं बद्दल आभारी. 'सिरवि'ची खाल्ली आहे फक्त एक विचारायचे आहे ."दुध आणि साखरेची बासुंदी" म्हणजे काय? बासुंदीत साखर घालावी लागते?

अमोल केळकर's picture

24 Jan 2015 - 10:41 am | अमोल केळकर

क्या बात है, पुणे तिथे काय उणे ?

धन्यवाद

अमोल केळकर

कुमार परिसर कोथरूड मधील मेट्रोमिक्स छोटेसे आहे पण काही पदार्थ मस्त असतात...त्यांचे रोस्टेड कॉर्न अँड गार्लिक सूप,चॉको मिंट मुस मस्ट ट्राय

औंध नागरस रोड ला पवार मावशींची हातगाड़ी आहे...त्यांचा वडापाव खुप मस्त असतो...पण फ़क्त सकाळी ...

सहकार नगर - रिलॅक्स पावभाजी..अप्रतिम...

शिवाजी पुतल्याजवक कोथरूड ला खत्री आइसक्रीम ....त्यांचे गुलकंद तसेच उन्हाळ्यात मैंगो आइसक्रीम मस्ट ट्राय..

कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ डीपी रोड ला बधाई स्वीट्स मधली पानीपुरी अप्रतिम....

अजूनही बरेच आहेत..आठवेल तसे लिहीन..

नांदेडीअन's picture

12 Mar 2015 - 10:25 pm | नांदेडीअन

कोथरूड यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ डीपी रोड ला बधाई स्वीट्स मधली पानीपुरी अप्रतिम....

तुम्ही नाट्यगृहाजवळ म्हणालात म्हणून मी १५-२० मिनिटे नाट्यगृहाजवळच शोधत होतो.
शेवटी थकून एका ऑटोवाल्याला विचारले तेव्हा नेमका पत्ता कळाला.
बरोबर १ किलोमिटर पुढे आहे नाट्यगृहाच्या.

असो,
पाणीपुरी मस्तच आहे !
वारंवार जाणे होईल आता इथे.
धन्यवाद :)

अहो नाट्यगृह ही ठळक खुण झाली..DP रोड लिहिले आहे ना..
पण पाणी पूरी आवडली ना...

विनटूविन's picture

24 Jan 2015 - 4:34 pm | विनटूविन

पापाजीज: अगदी साधे पण चवीचे जेवण, तंदूर स्पेशालिस्ट, मकईकी रोटी, सरसोदा साग भन्नाट होते. लसूनी टिक्का पण मस्त होता.

मुक्त विहारि's picture

25 Jan 2015 - 6:02 am | मुक्त विहारि

म्हणजे नक्की कुठे?

कात्रज की हडपसर की लोणावळा की शिरुर?

आजकाल पुण्याची व्याप्ती फार वाढत असल्याने, पुढे मागे शिरूर पण पुण्यात सामील व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

पुण्या बाबतीत फार अनभिज्ञ आहे.

विलासराव's picture

25 Jan 2015 - 2:00 pm | विलासराव

म्हणजे नक्की कुठे?

पूर्णानगर, चिंचवड. लिहीलय त्यांनी मुवी.
कात्रज की हडपसर की लोणावळा की शिरुर?

आजकाल पुण्याची व्याप्ती फार वाढत असल्याने, पुढे मागे शिरूर पण पुण्यात सामील व्हायची शक्यता नाकारता येत नाही.

मुवींना पार्टी असं झालं तर.

गुळाचा गणपती's picture

25 Jan 2015 - 11:35 am | गुळाचा गणपती
अभिदेश's picture

26 Jan 2015 - 12:31 am | अभिदेश

।हे सोन्या मारुति चौका जवळ आहे.

स्रुजा's picture

28 Jan 2015 - 3:23 am | स्रुजा

आवडीचा विषय आणि मस्त मस्त प्रतिसद. खास करून मृत्युंजय आणि ५० फक्त यांना मनापासून दाद !

थोडा माझा खारीचा वाटा :

१. श्रीजी ची कुल्फी आणि पान मसाला आईस क्रीम उत्तम
२. अप अन अबुव्ह फारसं खास राहिलेलं नाही आता पण बाहेरचा पान वाला झकास पान बनवून देतो . मला अनुभव मिठा मसाला पानाचा फक्त .

३. शीतल मध्ये कर्वे पुतळ्याजवळ छान साउथ इंडिअन आणि फार च छान पाव भाजी मिळते . बाहेरचा पान वाला पण मस्त पान बनव्तो.
४. तुळशीबागेत अगत्य (अगत्य च न? , हो बहुदा ) आहे आत , तिथे पाव भाजी अप्रतिम . तुळशी बागेत जाऊन पाव भाजी न खाता येणे हा दखल पा त्र गुन्हा आहे .
५. एशिअन मिलांज चे चायनिस आणि स्टार्टर्स मस्त .
६. इ स्क्वेअर च्या वर एक ऑल स्टर फ्राय आहे , तिथले वोक अप्रतिम आणि बाकीचं जेवण ही अगदी लक्षात राहण्याजोगं . किंमत पण लक्षात राहते पण ठीक आहे फार महाग नाहीये . आतला अम्बियांस तर फार च सुन्दर. दुपारच्या वेळी एखादे वेळेस गेलं की आतल्या झुळझुळीत वातावरणात सगळा शीण जातो पळून .

७. तिथेच नॉट जस्ट जाझ बाय द बे आहे. तिथला लंच बुफ्फे अत्यंत आवडता प्रकार. संध्याकाळी गेलात तर मस्त लाइव मुझिक चालू असतं , आवडत्या माणसाबरोबर संध्याकाळ अगदी मनासारखी जाते .

८. म्यारीऑट चा स्पैस किचन चा बुफ़ॆ पण सगळी हौस भागवतो . आता काही तरी १००० रुपये आहे म्हणे पण पैसा वसूल .

९. शिवसागर औंध मधलं आणि जंगली महाराज रोड वरचं : नाचोज , पाव भाजी (जगातली सगळी कडची पाव भाजी खावून यायचं स्वप्न होतं एके काळी माझं, असो … ) आणि एस पी डी पी म्हणजे फ़ुल्ल ऑन .
१०. कोपा कबाना मध्ये जे काही २-३ वेळा खाल्लं , सगळं भावलं . हे वाकड च्या जवळ आहे .
११. पोलका डॉट्स औंध आणि नगर रोड दोन्ही कडे थाई फूड मस्त म्हणजे अगदी मस्त च . बाकी पण चांगलं मिळत असेल पण आम्ही थाई ला इतके चटावलो होतो की दुसरं काही मागवयाचोच नाही.
१२. त्रीकायाची आठवण कुणी तरी काढलीच आहे तर वेज लोकांसाठी त्यांचा जस्मिन राइस आणि ग्रीन थाई करी एकदा तरी खाच .
१३. गुड लक ला विसरून कसं चालेल ? त्यांचा बन मस्का , स्क्र्याम्बल्ड एग आणि चिकन बद्दल मी पामराने काय बोलावं ?
१४. थोडं डेक्कन चौकातून पुढे जाऊन एफ सी रोड वर चैतन्याचा पराठा पण छान मिळतो . कॉलेज मध्ये परवडणाऱ्या आणि आवडणाऱ्या दोन्ही यादींमध्ये फार थोडी ठिकाणं होती , चैतन्य पहिल्या नंबर वर विराजमान होतं बराच वेळ .
१५. कोरेगाव पार्कात प्रेम'स मध्ये छान अड्डा नाही तर डेट दोन्ही साठी मस्त जागा , त्यांचं जेवण पण छान , खूप खाल्लंय इथलं पण , सगळं आवडलेलं आहे .
१६. काटा किर्र ची मिसळ किती हि मोठी रांग असली तरी एखाद्या खावीच , मग आयुष्य बदलून जातं .
१७ . पुरेपूर कोल्हापूर : नावात च सगळं महात्म्य आलं . मात्र कोल्हापुरी सोडून फार काही भानगडीत पडू नका . मिसळ आणि अस्सल कोल्हापुरी मात्र बोटे अक्षरशः तोंडात घालायला लावणारी चव . एरंडवण्यात सगळं जेवण मिळतं आणि कर्वे नगर मध्ये फक्त मिसळ (की उलटं ??) असं आहे मात्र .
१८. राम कृष्ण क्याम्प मधलं थाळी साठी प्रसिद्ध आहे , आणि ते प्रसिद्धी ला जागतं .
१९.एफ सी च्या वाडेश्वर ची मोहीम हाती घ्यावी आणि नियमित पणे हजेरी लावून सगळे पदार्थ निदान एकदा खाल्ल्याचं पुण्य पदरात पाडून घ्यावं .
२०. कल्याणी नगर, बालगंधर्व च्या समोर दोन्ही ठिकाणी राजधानी आहे . इथे जाऊन किंवा पार्सल पण थाळी मस्त मिळते . एका कुठल्या तरी छोट्या समारंभाला जेंव्हा केटरर इतक्या कमी (२०) लोकांसाठी तयार होईना तेंव्हा इथून आम्ही मिनी थाळी आणली होती आणि बेत मस्त झाला होता.
२१. एफ सी वर च हॉर्न ओके प्लीज मध्ये एक रस्टिक फील आहे , जेवण पण छान
२२. एरंड वण्यात च अभिषेक आहे शुद्ध शाकाहारी , इथे पण डोळे झाकून मेनू वर बोट ठेवावं आणि तृप्त व्हावं .
२३. वाह मराठी मगर पट्ट्याचं पण छान आहे म्हणे , आम्ही गेलो नाही पण आई बाबांनी पसंती कळवली आहे .
२४. मेनल्यांड चायना मध्ये पैसे आणि वेळ खर्च करायची तयारी ठेवून जावं पण एक सुंदर अनुभव गाठीशी राहणार याची खात्री .
२५. शबरी (तुकाराम की ज्ञानेश्वर ? पादुका चौकात ) ची मराठी थाळी पण मस्त .
२६. म्हात्रे पुलाजवळ निसर्ग चं सी फूड आणि सोलकढी एक नंबर .
२७. नगर रोड जवळ कल्याणी वेज आहे , तिथलं पंजाबी आणि सौथ इंडिअन दोन्ही छान .
२८ . कोथरूड लाच हल्ली क्रस्टीज सुरु झालाय साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी , तिथे पण व्हरायटी मेनू आहे , चवीत फेरबदल म्हणून खास आवडला .
२९ . लक्ष्मी रोड जवळ चं भागात ताराचंद जिता जागता चमत्कार आहे , तो याची देही एकदा अनुभवावाच .
३०. कोंढवा भागात देव अंकल'स किचन आहे , देव अंकल गेले दीड एक वर्षांपूर्वी पण त्यांचं आतिथ्य आणि त्याहून लाजवाब जेवण यांची चव अजून रेंगाळते आहे . ते गेले असले तरी एकदा जाउन याच .
३१. बाणेर चं भैरवी आणि शाकाहारी ग्रीन पार्क पण इकडच्या पब्लिक साठी सही ठिकाणं .

बास करते आता तुम्हाला वाटेल मी घरी कधी जेवलेच नाही .
वि. सू . : हे सगळे अनुभव साधारण १ -२ वर्षापूर्वीचे आहेत पण अनेक वेळा जाऊन चवीत कधी बदल झाला नाही अशीच ठिकाणं सुचवली आहेत . कुणी गेलं तर निराशा व्हायची शक्यता कमी आहे . एखाद दुसरं ठिकाण वरच्या यादीत आलं असेल तर माझा अति उत्साह समजून सांभाळून घ्या .

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना च जवळपास ही ठिकाणं माहिती असतील , मी या निमित्ताने एकदा फिरून आले ,आणि हो धागा एकत्र यादी करायची म्हणून काढलाय अशी माझी समजूत असल्याने थोडी फार माहिती असलेली ठिकाणं पण टाकलेच .

बाबौ! यातलं एकही ठिकाण यावेळी ट्रायता आलं नाही. फारसं कुठं खाऊच शकले नाही. तुझी यादी मात्र चांगली आहे. हा धागा वाखू म्हणून साठवला आहे.

बास करते आता तुम्हाला वाटेल मी घरी कधी जेवलेच नाही .

बरोबर!! अगदी वाटायलाच लागलं होतं, फक्त शब्द सापडत नव्ह्ते.

*biggrin* :-D :D +D =D :biggrin:

कॉलेज आणि नोकरी चा काळ धरून केली आहे हो एवढी खादाडी.

रेवाक्का , नक्की जा आणि कर च ट्राय :)

मृत्युन्जय's picture

29 Jan 2015 - 4:07 pm | मृत्युन्जय

शीतल : फार च छान पाव भाजी मिळते

तिथे तुम्ही शेवटची पाव भाजी खाउन बराच काळ लोटला असावा. माझा असा समज होता की दाल फ्राय आणि पाव भाजी जगातला कुठलाही आचारी चुकवु शकत नाही. शीतलने माझा तो भ्रम मागच्याच आठवड्यात मोडला. अन्नाला नावे ठेववत नाही पण इतकी भिकार पावभाजी मी जन्मात खाल्ली नव्हती. पानात घेतलेली संपवली इतकेच. रंग, वास, चव या सगळ्याच गोष्टींचा अभाव होता. पुढच्यावेळेसपासुन मी एकवेळ झाडावरचा पाला ओरबाडुन पावा बरोबर खाइन पण शीतलची पावभाजी खाणार नाही.

शीतलची इडली मात्र सुंदर असते.

स्रुजा's picture

30 Jan 2015 - 12:45 am | स्रुजा

अरे अरे ! एक ठिकाण हुकलं म्हणायचं पाभा साठी.

माझी शेवटची शीतल वारी २-२.५ वर्षांपूर्वी झाली होती.

अर्धवटराव's picture

28 Jan 2015 - 4:32 am | अर्धवटराव

नॉर्थ मेन रोड कोरेगावपार्क. आता आहे का माहित नाहि, पण तिथले पराठे आणि समोसे लाजवाब.

खेड शिवापूर पुण्याच्या कक्षेत येईल का?

तिथे हजारो हॉटेल्स आहेत आणि सगळीच "गावरान","चुलीवरची","साजुक तुपातले मटणवाली","मटक्यात शिजवलेल्या स्वैपाकाची" वगैरे.

चाळीसपन्नासवेळा तिथून जातानापैकी पंधरावीसवेळा वेगवेगळी हाटेले ट्राय केली अन वनपत्रेपासून सर्वांकडे चवीबाबत निराशा झाली.

नुकतंच एक जगदंबा म्हणून हाटेल मात्र झ्याक लागलं. हे "जगन्नाथ भेळ"च्या शेजारी, मागच्या बाजूला आहे. मटणरस्सा झणझणीत अन तृप्त करणारा. सोबत ज्वारी अन बाजरीची चक्क घरच्यासारखी खुसखुशीत भाकरी विथ तूपवाटी, खर्डा, सुके मटण आणि शेवटी इंद्रायणी भात म्हणजे याच भागात उगवणार्‍या तांदळाचा काहीसा चिकट अन मऊ भात.. हा तर अफलातूनच.. शिवाय इथलं पिठलं म्हणजे स्वर्गीयच..

एकदम रेकमेंडेड ठिकाण..

एरवी गावरान घरगुती वगैरे असे काही असले की ते माझ्या स्पेशल आवडीच्या लिस्टवर नसते.. कधीकधी इतका वीट येतो पाट्या बघून की मला कोणीतरी "शहररान, बाजारु, हॉटेलगुती" जेवण द्याल का ? असे विचारावेसे वाटते.

पण या हॉटेलने सुखद अनुभव दिला.

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 2:54 pm | कपिलमुनी

+१००
अनपेक्षित लॉटरी लागलेले ठिकाण !

मी-सौरभ's picture

28 Jan 2015 - 2:24 pm | मी-सौरभ

मनपा जवळ्च सुदामा लई भारी आहे :')

कपिलमुनी's picture

29 Jan 2015 - 2:56 pm | कपिलमुनी

धागा खाद्यभ्रमंती बद्दल आहे !

बाकी पेयभ्रमंतीच्या धाग्यामध्ये पण जबर्‍या पोटेन्शियल आहे !

मस्तच धागा. लग्गेच वाचनखूण साठवली आहे!

यसवायजी's picture

28 Jan 2015 - 7:54 pm | यसवायजी

ममता डायनिंग हॉल
रविवारी जाणं झालं। अनुभव तितका बरा नव्हता। १४०रु.थाली.सीताफल रबड़ी होती, पण पाणचट होती.

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 10:42 am | नांदेडीअन

किंमतीच्या मानाने बरेच आहे की.
सिताफळ रबडीबाबत मात्र सहमत !

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 2:26 am | मधुरा देशपांडे

वर बरेचसे आलेत. अजुन थोडी अ‍ॅडिशन.
१. शुक्रवार पेठेत केळकर संग्रहालयाच्या जवळचे बापट उपहारगृह. इथली कारल्याची भाजी, भाकरी, मटकी आणि मटार उसळ एकच नंबर. होस्टेलला असताना घरचे असे काही खायला मिळावे असे वाटले की बापट फिक्स असायचे. आणि हो, इथेच अस्सल पुणेरी पाट्या पण बघायला मिळतील. फुकटात. ;)
२. जेएम रोडवर सुप्रीमची पावभाजी. फक्त खूप ताटकळत वाट बघावी लागते. त्यामुळे हल्ली नको वाटते.
३. कमला नेहरु पार्कजवळ सकाळी साबुदाणा खिचडी, उपमा, पोहे सगळेच भारी मिळते. इथेच संध्याकाळी मिळणारे चाट, खास करुन पाणी पुरी. आणि खास म्हणजे बासुंदी चहा. हा बासुंदी चहा तर प्यायलाच हवा. अप्रतिम असतो.
४. लॉ कॉलेज रोडवर श्रीकृष्ण हॉटेल मधली दाल खिचडी. इथली थाळी नाही आवडली विशेष.
५. एरंडवणेत गणेश भेळच्या जवळच एका गल्लीत असलेले मानकर डोसा. त्यांचा चीज कट डोसा आणि चटणी. इतरत्र कुठल्याच मानकर डोश्याच्या दुकानात अशी चव नाही.
६. वर खत्री मस्तानीचा उल्लेख आला आहेच. त्यांची गुलकंद मस्तानी आवडती.
७. मॉडेल कॉलनी/शिवाजीनगर मध्ये (खूप आत खोपच्यात आहे हे हॉटेल. नेमका रस्ता सांगणे अवघड आहे) राधिका व्हेज. पुर्वी इथला मसाला पापड ऑस्सम होता. आता नाही. पण बाकी कुठलाही पदार्थ घेतला तरी उत्तम.
८. जहांगीर हॉस्पिटलजवळचे वहुमन कॅफे.
अजुन आठवले तर लिहितेच.

यसवायजी's picture

29 Jan 2015 - 9:54 am | यसवायजी

कमला नेहरु पार्कजवळ सकाळी साबुदाणा खिचडी, उपमा, पोहे सगळेच भारी मिळते.
>>>>>>>
आता नाही मिळत वाटतं. २ वर्षांमागे बऱ्याच टपर्या बंद केल्यात.

मधुरा देशपांडे's picture

29 Jan 2015 - 3:03 pm | मधुरा देशपांडे

ओह ओक्के. कित्येकदा सकाळी ऑफिसला जाताना नाश्त्यासाठी चांगले होते. :( प्रतिसादात विसु लिहायची राहिली. ही सगळी माहिती दोन वर्षांपुर्वीची. ;)

स्रुजा's picture

30 Jan 2015 - 12:47 am | स्रुजा

यादी भारी. तू आणि मी अनेकदा आजू बाजूने गेलो असणार. तुझ्या आणि माझ्या (सगळ्याच) फूटस्टेप्स फार च जुळतायेत :)

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 10:05 am | पिंपातला उंदीर

कोथरूड मधल्या शिवतीर्थ नगर च्या कमानीमधून आत जायचं . उजव्या बाजूला झकास non-veg नावाच छोट शॉप कम टपरी आहे . फ़क़्त संध्याकाळी ७ ते ९ या वेळात उघडी असते . फक्त पार्सल मिळत . तिथल्या चिकन ची चव कातिल असते . कोथरूड मधल्या लोकांनी लाभ घ्यावा . दोन तासात चिकन संपत . तेल मसाले तिखट याचा सढळ वापर असतो . जहाल चव असते . त्याच्याकडे पोळ्या असतात . त्या पण छान . कधी मधी फिश पण असत . ह्याची टपरी पहिले मोरे विद्यालय स्टोप समोर होती .

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 10:45 am | नांदेडीअन

आज रात्रीच्या जेवणाचा बंदोबस्त झाला. :)

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 10:48 am | पिंपातला उंदीर

कशी वाटलि चव ते टाका इथे. जमल तर फोटु. इकडे चिन्च्वडात आल्या पासुन लै मिसुन राहिलो त्या चविला

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 11:03 am | नांदेडीअन

नक्की टाकतो फोटो.
चव चांगली नसेल तर इंटरनेटच्या बॅन्डविड्थसहित जेवनाचे पैसेसुद्धा तुमच्याकडून वसूल करण्यात येतील. :D

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 11:13 am | पिंपातला उंदीर

चव चान्गली असेल तर काय देनार? तिथलि एक डिश प्रायोजित करा आम्च्या साठि *i-m_so_happy*

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 11:17 am | नांदेडीअन

चव चांगली असेल तर तुमचे जाहिर आभार मानणार आणि झोमॅटोला रिक्वेस्ट करणार या टपरीला ऍड करण्यासाठी. :)

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2015 - 11:20 am | पिंपातला उंदीर

मायला म्हन्जे आम्च्या नशिबि नुसते कोरडे शब्द आणि तुम्हि रस्सा हाणनार *lol* *LOL*

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 9:45 pm | नांदेडीअन

भाऊ... भाऊ... भाऊ...

निव्वळ अप्रतिम होते हो !!!

ग्रेव्ही दिसायलाच फार तिखट दिसत होती, पण प्रत्यक्षात असायला हवी तितकीच तिखट होती.

१२० रूपयात एक मोठी वाटी भरून रस्सा आणि ७-८ छोटे छोटे चिकनचे पिसेस होते.
अधाशी म्हणा किंवा हावरट म्हणा, पण सांगतोच.
पोळ्या संपल्या होत्या आणि रस्सा बराच उरला होता. तशीच वाटी लावली तोंडाला आणि रस्सा संपवून टाकला.

तृप्तीचा ढेकर देऊनच हे सगळे टाईप करतोय.

एक अड्डा मिळवून दिला राव तुम्ही.
दर १०-१५ दिवसाला तिकडे जायला काहीच हरकत नाही आता.
खूप खूप धन्यवाद !

पिंपातला उंदीर's picture

31 Jan 2015 - 9:20 am | पिंपातला उंदीर

धन्यवाद . भारीच आहे जागा ती . किंमत थोडी वाढलेली दिसते पण . मी ९० रु. प्लेट पार्सल न्यायचो . पण तुम्ही फोटू टाकणार होते राव

नांदेडीअन's picture

31 Jan 2015 - 10:22 am | नांदेडीअन

घरच्या प्लेटमध्ये काढलाय हो फोटो.
चपातीसुद्धा फारशी फोटोजेनिक दिसत नव्हती म्हणून टाकला नव्हता फोटो. :D

chicken

पिंपातला उंदीर's picture

31 Jan 2015 - 3:14 pm | पिंपातला उंदीर

मोक्ष मिळाला . एवढी कातिल डिश बाजूला असताना पोळी कडे लक्ष कोण देणार ? आभार

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 11:22 am | नांदेडीअन

एफ.सी. रोडवरचे कॉर्न क्लब तर सगळ्यांनाच माहित असेल.
एकदम स्वस्त आणि जबरदस्त !

माझ्या वडिलांना मका खूप आवडतो.
साधारण वर्षभरापूर्वी त्यांना एकदा तिथे घेऊन गेलो होतो.
फॅन झालेत ते आता कॉर्न क्लबचे.
ते पुण्याला आले आणि त्यांनी मला कॉर्न क्लबला घेऊन जाण्याचा आदेश दिला नाही असे होत नाही.
पुण्याहून नांदेडला जाताना इथले पार्सल घेऊनच आम्ही गाडीत बसतो.

इथले स्विट कॉर्न सूप, कॉर्न पॅटिस, कॉर्न हुर्डा हे माझे फेवरेट पदार्थ.
पिझ्झा आणि टिक्की चाटसुद्धा चांगले आहेत.

hoordapattice

कॉर्न क्लब या एका वेगळ्याच आणि छान कल्पनेतून आलेल्या रेस्टॉरंटच्या पूर्वी खूप शाखा होत्या. मुंबई ठाण्यातही. आम्हीही त्याचे फॅन्स होतो. नंतर धडाधड बंद पडत गेल्या. त्यालाही किमान आठदहा वर्षं झाली. का अयशस्वी झालं असेल याचा विचार नेहमी मनात यायचा. चव तर चांगली होती.

पण मला वाटतं की मोनोक्विझिन म्हणता येतील असे एकाच पदार्थाचे डेरिव्हिटिव्ह्ज हा प्रकार ग्राहकांना पुन्हापुन्हा खेचून आणण्यात कमी पडत असावा. जरी पिझ्झा, सँडविच, कॉब्ज आणि अन्य बरेच काही ठेवले तरी ज्यात त्यात कॉर्नच शेवटी .. "सर्वातमका शिवसुंदरा" अप्रोच नंतर कंटाळवाणा होत असावा खाणार्‍यासाठी. व्हरायटी हवीच.

चिगो's picture

31 Jan 2015 - 7:37 pm | चिगो

"सर्वातमका शिवसुंदरा" अप्रोच

=)) :D कसली म्हणजे कसली हुच्च कोटी आहे ही, गवि.. पुनरपि फॅन झालो तुमचा..

अवांतर : पुढचा लेखसंग्रह/पुस्तक कधी काढताय मालक?

फोटो पाहून पुण्याला खास खाद्यभ्रमंतीसाठी येण्याची इच्छा झाली आहे.

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 11:47 am | नांदेडीअन

शेगाव कचोरी..
गुणवत्तेसाठी ISO चे मानांकन मिळाले आहे या कचोरीला.
खरंच नेहमीपेक्षा वेगळी आणि टेस्टी आहे इथली कचोरी.
पत्ता : डेक्कन बस डेपोच्या बाजूच्या गल्लीत.

या कचोरीबद्दल इथे अधिक वाचता येईल.

kachori

ठाण्यातही आहे यांची शाखा. खरोखर खुसखुशीत अन टेस्टी. पण प्र चं ड तेल प्यायलेली.

ISO गुणवत्तेसाठी की प्रोसेस कम्प्लायन्ससाठी अशी शंका ते तेल पाहून येते?

आयेसो हे गुणवत्तेसाठी नस्तेच मुळी.

तेच.. आय मीन मूळ शेगाव एसटी कँटीनने जारी केलेल्या प्रोसेसनुसार बनवले जाते असे सिद्ध होत असावे फक्त.

मृत्युन्जय's picture

30 Jan 2015 - 5:07 pm | मृत्युन्जय

शेगाव कचोरीबद्दल (पुण्यात मिळणार्‍या) माझे काही फारसे चांगले मत नाही, म्हणजे इतर ठिकाणी मिळणार्‍या कचोरीपेक्षा बरीच बरी आहे. पण एकदा इंदौरची कचोरी खाल्ल्यावर जगात इतर कुठलीही कचोरी आवडत नाही.

इंदौरी कचोरी जवळपास जाणारा प्रकार पुण्यात औंधला (जयहिंद शेजारी) इंदौर स्पाइस मध्ये मिळतो. बरीच चांगली आहे. कचोरी १० रुपये आणि कचोरी चाट १५ रुपये. खाली कचोरी चाटचा फोटो देत आहे. चांगली होती. पण नुसती कचोरी जास्त चांगली आहे (त्याचा फोटो नाही)

Indore Kachori

पुण्यातली जगात भारी अशी कचोरी अप्पा बळवंत चौकात रतन मिठाईवाल्याकडे मिळायची.
इतका तुफान धंदा चालत असूनही रतनवाल्याची जागी आज पुस्तके/स्टेशनरीचे दुकान आहे.

महासंग्राम's picture

4 Nov 2015 - 1:33 pm | महासंग्राम

अगदी बकवास शेगाव कचोरी च्या नावाला बट्टा लावलाय या दुकानाने … भंगार स्टाफ, अस्वछ्पणा सगळाच भंगार

स्मिता चौगुले's picture

10 Nov 2016 - 2:53 pm | स्मिता चौगुले

सहमत .. इथे वाचून खास कचोरीसाठी गेले होते या भागात , तेही नवर्‍याला सोबत चलण्याचा आग्रह करुन .
कचोरी खाल्ली आणि माझा आग्रह किति फोल होता हे मला त्या चविमुळे आणि नवर्‍याच्या 'याचसाठी केला होता अट्टाहास' (उफहासात्मक) चे भाव पाहून कळले.

प्रचेतस's picture

30 Jan 2015 - 11:52 am | प्रचेतस

लक्ष्मी रोडवरील आर. भगत ताराचंदचा उल्लेख कुणीच कसा काय केला नाही याचे आश्चर्य वाटले.
तिथल्या मऊसूत पोळ्या, भेंडी फ्राय, तळलेला कुरकुरीत कांदा अगदी मनसोक्त घातलेली डबल दाल फ्राय निव्वळ अप्रतिम आणि नंतर ताक. अहाहा.

सुदैवाने भगत ताराचंदच्या मूळच्या मुंबैतील जव्हेरी बाजारातील शाखेतही जेवण्याचा योग एकदा आलेला आहे.
अफाट स्वादिष्ट आहे.

मृत्युन्जय's picture

30 Jan 2015 - 1:07 pm | मृत्युन्जय

लिहिणार होतो. लिहिणार होतो. पण एका दुष्टाने अशी बातमी दिली की ते आता बंद प्डले आहे. त्यानंतर तिथे जाउन बातमीची शहानिशा करण्याचा वेळ मिळाला नाही. भगत ताराचंद म्हनजे निव्वळ सुख. मुंबैलाही गेलो होतो. का कुणास ठाउक मुंबईची चव जास्त आवडली होती.

मी याच महिन्याच्या सुरुवातीला जाऊन आलोय. चालू होतं तेव्हा तरी.

नांदेडीअन's picture

30 Jan 2015 - 3:53 pm | नांदेडीअन

एकदाच गेलो होतो इथे. (पुण्यातले)
जेवण चांगलेच होते, पण ताक मात्र आहाहा...

ताक मागवल्यावर वेटरने विचारले होते बॉटल आणू की ग्लास.
मला वाटले ग्लासापेक्षा थोडीशीच मोठी असेल बॉटल, म्हणून मी बॉटल मागवली.
वेटर जेव्हा ती बॉटल घेऊन येतांना दिसला तेव्हा कळाले काय दिव्य पार पाडावे लागणार आहे ते.
पण खरं सांगतो, मी एकट्यानेच संपवले सगळे ताक.

बॅटमॅन's picture

30 Jan 2015 - 4:20 pm | बॅटमॅन

हाथ मिलाओ फेलो ताकप्रेमी. मीही कितीही ताक पिऊ शकतो. एकच नंबर!!!!!!!!!!

नांदेडीअन's picture

31 Jan 2015 - 10:11 am | नांदेडीअन

*drinks*
*new_russian*

बाकी ते ताक बियर सदृश बाटलीत येते. =))

हेमंत बेंडाळे's picture

30 Jan 2015 - 12:57 pm | हेमंत बेंडाळे

पुणे तिथे काय उणे
पण पिंपरी चिंचवड भागात फार पंचाईत होते तिकडचे काही भेटेल का?
चांगला असा वडा पाव कुठे भेटेल नवी पेठ च्या अण्णा च्या तोडीचा?

आमचा काही
१. bay leaf bistro चाफेकर चौक
२. rosewood डांगे चौक, सर्व काही चांगल
३. पराठा express विशाल नगर वाकड, पराठा , मिसळ पाव
४. slice of heaven , साई चौक जवळ JN रोड पिंपरी sandwich साठी

प्रचेतस's picture

31 Jan 2015 - 9:26 am | प्रचेतस

उपरोक्त चारही ठिकाणी जाऊन आलोय. एकही धड नाही.

नांदेडीअन's picture

31 Jan 2015 - 10:16 am | नांदेडीअन

नवीन सांगवीजवळ साई स्वाद नावाचे एक छोटे हॉटेल आहे.
नेहमी गर्दी असते इथे.
पण फॅमिलीसोबत जाण्यासारखा ऍबियंस नाही.
इथले चिकन अद्रकी फार लाजवाब आहे.
ट्राय करा कधी.

पिंपरी चिंचवडमधली काही चांगली ठिकाणे

हॉटेल रत्ना: पिंपरीतले अगदी जुन्या हाटेलांपैकी एक. इथल्या भाज्या आणि गार्लिक नान लै भारी.
सावली (निगडी): इथले लसुणी पालक सूप अवश्य प्याच., रुमाली पराठा इथली खासियत.
रामदेव धाबा (निगडी): चिरपरिचित ठिकाण. मला इथल्या भाज्या इतक्या खास वाटत नाहीत तरी राजस्थानी पद्धतीचे जेवण्यासाठी उत्तम ठिकाण.
थोडंस महागडं जेवायचं असेल तर सिग्री ग्लोबल ग्रील आणि मेनलॅण्ड चायना.
माउली चहा (पिंपरीगाव)- कुठलाही मसाला न घालता केलेला अतिशय कडक चहा. जबर्‍याच आहे एकदम फक्त १० रूपयांत.
जनता मिसळ (पिंपरीगाव): लै भारी चव. नुकताच नाखुकाकांबरोबर जाऊन आलोय.
बर्ड व्हॅली (आकुर्डी) - ज्यांना गोड भाज्या आवडतात त्यांनी इथला पनीर शाही कुर्मा अवश्य खाच. डेझर्ट अगदी. नुसताच बशीभर खावा.

मृत्युन्जय's picture

31 Jan 2015 - 10:07 am | मृत्युन्जय

पिंचि मधल्या खालील ठिकाणांबद्दल बरेच ऐकुन आहे. त्याबद्दल काही लिहिले नाहिसः

१. पिंपरी मार्केट मधले दाल पक्वान्न
२. जयश्री, दे धक्का, नेवाळे
३. वासु वडापाव

मी वरीलपैक्की एकाही ठिकाणी गेलेलो नाही. पण ऐकुन आहे. नेवाळेला गेलोय. मला ते आवडले देखील होते (बर्‍याच जणांना नाही आवडत)

प्रचेतस's picture

31 Jan 2015 - 10:29 am | प्रचेतस

दाल पक्वान तर राहिलेच रे.
महादेव पॅटिसवाला इथले सगळ्यात भारी. तसे पिंपरीत बर्‍याच ठिकाणी दाल पकवान मिळतात. टिपिकल सिंधी पदार्थ. काही ठिकाणी दोन पांढर्‍या आणि पिवळ्या अशा दोन प्रकारच्या वरणात हा पदार्थ दिला जातो.

जयश्री, दे धक्का, नेवाळे ह्या तीन्ही ठिकाणच्या मिसळी फारशा आवडल्या नाहीत. नेवाळे नुसतीच महातिखट. तिखटाचा डबाच ओततात ते पण त्यांच्याकडची बटाटा भजी एकदम मस्त.
जयश्री पण फार तेलकट, दे धक्का मध्ये रस्सा कांदा लसूण मसाल्याचा बनवतात मात्र मटकी किंवा इतर तत्सम कडधान्ये अजिबात टाकत नाहीत. दे धक्का माझ्या घराशेजारीच आहे.

वासू वडापाव छान आहे तसेच पिंपरी क्याम्पातील अशोक थियेटरच्या बाजूचा कदम वडेवाला पण भारी. त्याच्याकडची शेंगदाणा चटणी एकदम मस्त.

आजानुकर्ण's picture

5 Feb 2015 - 8:34 pm | आजानुकर्ण

जयश्री मिसळ म्हणजे बजाज ऑटोच्या समोर होती तिथे का? मला वाटतं तो सर्विस रोड झाल्यावर ती बंद झाली. आता कुठे नवीन ठिकाणी शिफ्ट झाली आहे काय?

प्रचेतस's picture

5 Feb 2015 - 9:10 pm | प्रचेतस

अजुन आहे. बजाज ऑटो च्या समोरून जो अण्डरपास येतो त्याच्या समोरच हायवेलगत आत मधे आहे. हाटेलवजा मोठं दूकान टाकलंय.
पण चव् मला आवडली नाही. तिखट आहे नुसतीच.

आजानुकर्ण's picture

5 Feb 2015 - 9:39 pm | आजानुकर्ण

मी दहा वर्षापूर्वी वगैरे खाल्ली होती. तेव्हा नेवाळे वगैरेपेक्षा बरी होती. एक कासारवाडीला 'मिसळ हाऊस' नावाचं दुकान होतं. रेल्वे स्टेशनला अगदी लागून. तिथंही बरी मिळायची मिसळ. पण लवकरच ते बंद पडलं वाटतं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

6 Feb 2015 - 9:52 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

होय तीचं ती. आता चवं बिघडली. २-३ वर्षांपुर्वीपर्यंत चांगली असायची चव आणि क्वांटीटी पण!!