जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत?

Sanjay Kokare's picture
Sanjay Kokare in काथ्याकूट
16 Jan 2015 - 1:17 am
गाभा: 

जागतिकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत एकीकरण करणे होय.
किंवा
जागतिकीकरण म्हणजे एकाचवेळी सर्व जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे.
जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे.
जागतिकीकरण मुळे उत्पादन करण्यास अनुकुल असणार्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधी वाढत आहे.

परंतु काहींच्या मते जागतिकीकरणामुळे देशातील गृह उद्योग लोप पावत असुन देशी वस्तुंची जागा ही विदेशी वस्तुंनी घेतली आहे म्हणजेच लोक विदेशी वस्तु खरेदी करत आहे.
परंतु माझ्या लोक ही वस्तु ही देशी आहे की विदेशी हे न बघता त्या वस्तुची उपयोगिता व किंमत बघुन विकत घेतात.
जर आपण चांगल्या वस्तु देशात तयार केल्या तर त्या वस्तुना देशातच नव्हे विदेशात मागणी वाढते.
त्यामुळे जागतिकीकरण देशाच्या विकासासाठी आहे अस मला वाटत..

तरी आपण सर्वांनी मला " जागतिकीकरणात देश ही संकल्पना सुसंगत? " यावर अधिक मार्गदर्शन करावे ही विनंती

प्रतिक्रिया

hitesh's picture

16 Jan 2015 - 1:46 am | hitesh

देश ही कल्पना फार उशीरा आलेली आहे.

वाळव्ट सोडुन भारतात आलेले व अयोध्यापती झालेले बाबर महाराज पासपोर्टवर शिक्का घेऊन किंवा विसा घेऊन आले होते का ? आणि जे इथले मूलनिवासी (?) होते त्यांच्याकडे तरी कुठे रेशन कार्ड वोटर आयडी पासपोर्ट होता ?

हितेश सर बरोबर आहे तुमच म्हणण?....

टवाळ कार्टा's picture

16 Jan 2015 - 2:19 pm | टवाळ कार्टा

अयोध्या नै कै...दिल्ली...तुम्चा इतिहास म्हण्जे न बै अग्गदिच कच्चा :)

hitesh's picture

17 Jan 2015 - 2:30 am | hitesh

दिल्ली तर जिंकलीच.. पण अयोध्याही जिंकली होती ना ?

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

हो पण "बसले" दिल्लीतच ना

लंबूटांग's picture

16 Jan 2015 - 2:16 am | लंबूटांग

लंबुटांगजी आपण दिलेल्या लिंक वर जागतिकीकरणाविषय काहीच माहीती दिसत नाही आहे

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Jan 2015 - 10:24 am | माईसाहेब कुरसूंदीकर

जागतिकरणामुळे देशांच्या सिमा फिकट होउन जग हे एक राष्ट्र असल्याचा अनुभव येत आहे.

हे फक्त वस्तूंच्या खरेदी-विक्री संदर्भातच रे संजया.बाकी जागतिकीकरणाच्या तुतार्या फुंकणारे जर्मनी,स्वीडन सारखे
देश वस्तू आयात करायची वेळ आली की 'तू तू मै मै' करायला लागतात आशियातल्या देशांबरोबर.

hitesh's picture

16 Jan 2015 - 11:02 am | hitesh

असं काय नाय हो माई ,

कालच्या पेप्रात आहे .. नथुरामाचे पिस्तुल इटलीतुन आले होते.

पिस्तुलापासुण बायकोपर्यंत ...काहीही परदेशातुन आणता येते.

आपल्याला वरील विषयावर असलेली माहीती द्यावी

पैसा's picture

17 Jan 2015 - 8:52 am | पैसा

निरागस प्रतिसाद. हितेश अख्खा लेख लिहिणार आहेत आता इटलीतून काय काय आणता येते याबद्दल! =))

लिहीव म्हणाव हितेश सरांना

टवाळ कार्टा's picture

17 Jan 2015 - 2:46 pm | टवाळ कार्टा

खिक्क

परंतु जागतिकीकरण हे सर्व देशांना अपरिहार्य आहे..

त्यामुळे कोणालाही नाकारता येणार नाही

स्पा's picture

17 Jan 2015 - 8:44 am | स्पा

मस्त जिलबि

हितेसभाय आणि माईचा निरागस संवाद वाचून ड्वाले पानावले
=))

स्वप्नज's picture

18 Jan 2015 - 9:34 pm | स्वप्नज

असेच म्हणतो.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2015 - 8:47 am | अत्रुप्त आत्मा

मथळा वाचुन उघडला धागा
पण मूळ विषयाला सं'कुचित जागा
वाढती ना कुणी,मग कुठ्ठे आता मागा?
मग स्वयंप्रतिसादांच्या फुलल्या बागा
---------------------------------
=)) ... =)) .... =))

अर्धवटराव's picture

18 Jan 2015 - 8:52 pm | अर्धवटराव

=))

सतिश गावडे's picture

18 Jan 2015 - 10:06 pm | सतिश गावडे

बुवा कशाला उगाच त्रागा
आधी तुम्ही चांगले वागा
फुलतील संस्कारांच्या बागा
आता कामाला तुम्ही लागा

-सीलाधर

खटपट्या's picture

18 Jan 2015 - 10:55 pm | खटपट्या

सीलाधार ????

खिक्क !! :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2015 - 7:25 pm | अत्रुप्त आत्मा

बुवा कशाला उगाच त्रागा
आधी तुम्ही चांगले वागा
फुलतील संस्कारांच्या बागा
आता कामाला तुम्ही लागा

-सीलाधर

आगागा...! आगागा...! आगागा...! =))

मदनबाण's picture

18 Jan 2015 - 10:56 pm | मदनबाण

जागतिकीकरणात
हे कै अस्ते ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Loot Liyo Mohe Shyam... { रमा माधव }

जागतिकीकरण का आगतिकीकरण ?

साधा मुलगा's picture

20 Jan 2015 - 8:09 pm | साधा मुलगा

जागतिकीकरण आणि त्या संबंधी विषयात मला उमजलेल्या काही गोष्टी आणि मते. अर्थात मी काही तज्ञ नाही. चूक भूल द्यावी घ्यावी.

जागतिकीकरणामुळे आणि नवे शोध व तंत्रज्ञानामुळे जग एका विशाल खेद्यासारखे वाटते.
WTO वगैरे करारांमुळे तर व्यापारातील अडचणी आणि अडथळे कमी करण्याचे प्रयत्न झालेले आहेत.
त्यामुळे विविध देशांतील उद्योग त्यांच्या देशातील मार्केट saturate झाले कि नवीन मार्केटसाठी ते नव्या देशांकडे बघू लागतात.
Factors of production म्हणजे land, labour आणि
capital जर सहज रित्या उपलब्ध असतील आणि त्या देशाचे कायदे आणि धोरण परकीय गुंतवणूक आणि उद्योगास पोषक असतील तर नक्कीच तिथे बहुदेशीय कंपन्या विस्तार करायला बघतात.
जर बाहेरील गुंतवणूकदार एखाद्या देशात गुंतवणूक करत असतील (चांगल्या returns च्या अपेक्षेने) तर नक्कीच त्या देशाचा फायदा होतो.
जागतिकीकरण एखाद्या देशास मारक अथवा नकोसे वाटेल जेव्हा एखादा उद्योग त्या देशाला अथवा त्या भागातील लोकांना त्या उद्योगाचा फायदा पोहोचवत नाही तेव्हा.
त्यातून मिळणारा नफा, उपलब्ध होणार्या नोकर्यांची संधी याचा फायदा जर स्थानिक नागरिकांना होत नसेल तर नक्कीच त्याच्याविरोधात आवाज उठणार.
परकीय उद्योग आपल्याकडील साधन संपत्ती लुटून नेत आहेत, तसेच ते उद्योग स्थानिक उद्योगांना मारक ठरत आहेत अशी भावना असल्यास राष्ट्रवाद , प्रांतवाद उफाळून येणार.
हे थांबवायचे असल्यास त्या देशातील सरकार आणि त्यांचे धोरण महत्वाची भूमिका बजावतात. परदेशातून आलेला पैसा आणि उद्योग याचा आपल्या लोकांना जास्तीत जास्त फायदा आपल्या देशातील लोकांना कसा होईल हे त्या त्या देशातील सरकारने बघणे उचित ठरते.
बाकी कुठलाही देश सर्व क्षेत्रात स्वयंपूर्ण होऊ शकत नाही, वस्तू,सेवा,कुशल कामगार ,भांडवल, तंत्रज्ञान आदी गरजा भागवण्यासाठी त्याला दुसर्या देशांशी व्यापार करणे हि अपरिहार्यता आहे.
फक्त हाच व्यापार अथवा व्यवहार शांततेने मार्गाने,बळाचा (दोन्ही आर्थिक आणि सैनिकी) वापर न करता, दोन्ही देशांना फायदेशीर ठरणारा असला पाहिजे. असे जर झाले तर सर्व राष्ट्रामध्ये एकमेकाबद्दल विश्वास वाढेल, कटुता कमी होईल आणि मग देश ही संकल्पना फक्त कागदावरच राहील.

संदीप डांगे's picture

20 Jan 2015 - 9:34 pm | संदीप डांगे

अमेरिकेतल्या सौंदर्यप्रसाधनांना अफाट भारतीय मार्केटात उतरायचे असते. तेंव्हा जिलब्या पाडल्यासारख्या टिनपाट भारतीय पोरी धडाधड विश्वसुंदऱ्या होऊन भारत देशाचा अभिमान वाढवतात. यालाच जागतिकीकरण म्हणतात. त्यात देशाचं महत्व नाकारून कसे चालेल.

क्रिकेट वर्ल्डकपच्या सर्व देशांमधल्या पेप्सी किंवा कोकच्या जाहिराती बघा. जागतिकीकरणात देश किती महत्वाचे आहेत कळेल.

(भारतीय विश्वसुंदऱ्याना टिनपाट म्हटले आहे त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्यास माझ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून नये.)

आजानुकर्ण's picture

20 Jan 2015 - 9:42 pm | आजानुकर्ण

हा हा.

मदनबाण's picture

21 Jan 2015 - 2:35 pm | मदनबाण

अमेरिकेतल्या सौंदर्यप्रसाधनांना अफाट भारतीय मार्केटात उतरायचे असते. तेंव्हा जिलब्या पाडल्यासारख्या टिनपाट भारतीय पोरी धडाधड विश्वसुंदऱ्या होऊन भारत देशाचा अभिमान वाढवतात. यालाच जागतिकीकरण म्हणतात.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Deewani... { Kailash Kher }