काल शनिवारी माथेरान पैनरमा मिनी ट्रेक केला. अगदीच वाया नाही गेला. दोन शेकरू, एक नंदननाचण, आणि एक हिरवा साप पाहिला. फोटो आमच्या कैमऱ्यात बसत नाहीत भाईर जात्यात. माहितीच्या पाट्यांचे बसतात.ते इथे देत आहे.
१)माथेरान नकाशा
नकाशाचा फुल फोटो इथे
२)माथेरान नकाशा - उत्तरभाग
या नकाशाचा फुल फोटो इथे
३)माथेरान नकाशा - दक्षिण भाग
या नकाशाचा फुल फोटो इथे
माथेरानला मी ८०सालापासून जात आहे आणि एक हिलस्टेशन म्हणून नाही तर एक भटकंतीची जागा म्हणून. नंतर कुटुंबासमवेत गेलो तरी राहण्यासाठी कधी गेलो नाही फक्त सकाळी जाऊन संध्याकाळी परत. माथेरानचा इतिहास, तिथली जैवविविधता यावर आता मराठीतूनही चार पाच चांगली पुस्तके
निघाली आहेत तीच माहिती इथे पुन्हा लिहित नाही. इथे राहून मजा करणे हे काही ठराविक लोकांनाच जमले आणि मानवते याचे कारण अर्थातच पायी फिरावे लागणे आणि अतिशय सुस्तपणात दिवस घालवणे.माथेरानची हॉटेल्स हा एक वेगळाच मोठा विषय आहे. नेहमी येणारे ठराविक जागीच राहतात, आपापली आवड. प्रत्यक्ष तिथे राहिल्यावरच सोयी गैरसोयी कळतात.माथेरानला यायचे बरेच पर्याय आहेत आणि त्याचेही वेगळे अनुभव आहेत. सर्वात मुख्य म्हणजे माथा शांत ठेवणे आणि खिसा कसा भराभर रिकामा होतो याकडे थंड डोक्याने दुर्लक्ष करणे. यासाठी इथे वर्षभर सुखद गारवा ठेवलेला असतो. एकदाका हे जमलं की पर्यटक पुन्हापुन्हा येतच राहतात आवडत्यांना घेऊन.
ट्रेकिंगकरांना माथेरान वर्षभर बोलावते आणि कमी खर्चात भरपूर आनंद देते त्यामुळेच माझी आवडती जागा आहे. तुमचेही अनुभव लिहा आणि इथे प्रश्न विचारा.
१)टोल १ला
२)टोल २रा
३)टैक्सी दरपत्रक
४)पाटी
५)वरून दृष्य
६)अंजनीची फुले
७)जेवण वाटेवर
८)टोल ३रा
प्रतिक्रिया
11 Jan 2015 - 11:29 am | डॉ सुहास म्हात्रे
पायी फिरावे लागणे आणि अतिशय सुस्तपणात दिवस घालवणे.
हेच फार आवडते... म्हणून माथेरान आवडते ठिकाण आहे. विशेषतः एखादे गुजराती हॉटेल निवडले तर सकाळी मस्त न्याहारी, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहाबरोबर नाश्ता, रात्रीचे जेवण... आणि आठवड्याभरात तरी एकही पदार्थ दोनदा नाही; असे लाड कोण करणार ? याशिवाय खनिज तेलावर चालणार्या गाड्यांना बंदी आणि डोंगरमाथ्यावरचे स्थळ असूनही भटकंती करायला अनेक सुंदर जागा असलेले दुसरे कोणते पर्यटनस्थळ मिळणे कठीण आहे.11 Jan 2015 - 12:58 pm | दिपक.कुवेत
माथेरान ट्रिप चांगलीच लक्षात आहे...का? तर तिथे असलेल्या लाल मातीच्या रस्त्यांमुळे. त्या लाल मातीत चालून चालून वैताग आलेला शीवाय कपडेहि लालीलाल झालेले. त्यामूळे अजूनहि जाण्याचा धसका घेतलाय. वरील भटकंतीचे एवढे कमी फोटो का?
11 Jan 2015 - 2:40 pm | कंजूस
माथेरान सावकाश आणि सवडीने अनुभवयाचं असतं. एकाच ट्रीपमध्ये सर्व पॉइंटस करायची धडपड करायची नसते. मग ते आवडू लागतं. कधी उन्हाळयात कधी पावसाळ्यात कधी ऑफ सिजनमध्ये. चहा घेता घेता मालकाशी गप्पा मारायच्या. प्रत्येकाकडे काही श्टोरी असतेच. एकदा एको पॉइंटजवळच्या एका हॉटेलात बोलता बोलता मालक सावंत म्हणाले "मी तुमच्यासारखाच इकडे निरनिराळ्या वाटेने येत असे. मला माथेरान फार आवडायचे मग एक दिवशी हे हॉटेलच टाकले इथे. आता पंधरा वर्षे झाली."
मी पहिली पावभाजी ७९साली माथेरानमध्येच पावसाळयात खाल्ली त्यावेळी चार महिने मिनीट्रेन, टैक्सी बंद असायच्या आणि तीनच हॉटेल्स चालू असायची एमटिडीसी,खान आणि महागडे रगबी. मी आणि माझा मित्र तीन दिवस एमटिडीसीत राहिलो होतो. दोन्हीवेळा चालत गेलेलो.दिवसभर धुक्यात भटकायचं आणि संध्याकाळी डाळभात वांग्याची भाजी खायचो. सकाळी स्टेशनसमोर ब्रुनपाव मस्का चहा मिळायचा. एकेक मजा आठवते.
11 Jan 2015 - 2:48 pm | खटपट्या
जेव्हा जेव्हा माथेरानला गेलो, प्रत्येक वेळेला ते नवीन वाटले. संध्याकाळ तर खूपच रम्य!!
11 Jan 2015 - 5:37 pm | मुक्त विहारि
आता ह्यावेळी नक्कीच जाणार...
माणशी २००/- रुपयात जाणे-येणे होते का?
16 Jan 2015 - 10:14 pm | साधा मुलगा
मी सुद्धा याच आशेने मित्रांबरोबर गेलो होतो.
नुसते आत शिरण्याआधी taxi चे ७० (नेरळ पासून ) आणि प्रवासी कर ५० असा द्यावा लागतो. फोटो मध्ये दाखवले आहेच.
कुठल्याही हॉटेलात शिरण्य आधी तिथले दर बघा.
कारण साधे टपरी वाले सुद्धा नाश्ता जेवनाचे अवाच्या सव्वा भाव लावतात.
तरी एका दिवसाची ट्रीप माणशी ३००-४०० मध्ये होऊ शकेल.
तुम्ही खायच्या वस्तू बरोबर घेऊन गेलात तर एखादवेळी होऊ शकेल २०० मध्ये.
काय आणि कसा खर्च करता त्यावर अवलंबून आहे.
17 Jan 2015 - 6:01 am | कंजूस
२५ मार्च ते ५एप्रिल दरम्यान माथेरानला जावे यावेळेस सर्व हॉटेल्स रिकामी असतात प्रतिव्यक्ती नाशता-जेवण-राहाणे चे एक दिवसाचे सातशे ते एक हजार रू सांगणारे हॉटेलवाले संपूर्ण रूम चारशे ते सातशे रुपयांत देतात.मिनीट्रेनचे तिकीटही हमखास मिळते.
शनिवार रविवार सोमवार अथवा तीन चार सुट्ट्या जोडून येतात तेव्हा जाऊ नये.
11 Jan 2015 - 6:18 pm | तिमा
माथेरानला पायी, रेल्वेने, टॅक्सीने अशा सर्व मार्गांनी गेलो आहे आणि असंख्य वेळा राहिलोही आहे. पायी जाण्यांत जेवढी मजा येते तेवढीच त्या मिनीरेल्वेने जाण्यातही येते. पॉईंटस आरामात, तब्येतीने बघायला मजा येते याच्याशी सहमत. काही जुन्या पॉईंटस कडे जाण्याचा मार्ग आता बंद झाला आहे. उदाहरणार्थ, गार्बट पॉईंट. तिथे मोठ्या ग्रुपने जावे लागे, कारण व्याघ्रदर्शन होण्याची शक्यता!
कपडे लाल होतात, पण रहाण्याच्या अवर्णनीय आनंदापुढे तो त्रास नगण्य.
11 Jan 2015 - 6:57 pm | कंजूस
एकवेळ जाताना टैक्सीने आणि दुपारी अडीचच्या मिनी ट्रेनने परत असा आमचा एक दिवसाचा प्लान असायचा. परंतू टैक्सिवाल्यांनी मिनीट्रेनचे रेजर्वेशन मार्च २०१२ पासून बंद करायला लावले त्यामुळे फारच लोचा झाला. दुपारी खादाडी झाली की फक्त ट्रेन पकडून सहा वाजता घरी यायचो आता हातात तिकीट नसल्याने बाजार ते टैक्सी स्टैंड अडीच किमीची तंगडतोड करावी लागते.आता दोन दिवस राहिल्याशिवाय माथेरानची मजा घेता येत नाही.
11 Jan 2015 - 7:18 pm | अजया
अाठवणीतले पहिले हिलस्टेशन माथेरानच.एकतर डोंबिवलीहुन सरळ जाता यायचं हा फायदा!तेव्हा लांबच्या लांब चालायला काही वाटायचेही नाही.घोड्यावरुन फक्त श्रीमंत आणि गुजराती लोक जातात असं वाटायचं.माथेरान वेगवेगळ्या ग्रुप्सबरोबर वेगवेगळ्या ऋतुंमध्ये पाहिलंय.स्टेशन समोरच्या प्रसन्न हाॅटेलचे बुकिंग तेव्हा डोंबिवलीहुन होत असे.तिथे राहाणे आणि गुजराथ भवन ला खाणे ठरलेले असायचे.एकदा काॅलेजला असताना आगाऊपणा करुन तिघी मैत्रिणीच वाटलं जावंसं म्हणून गेलो होतो.तेव्हा सनसेट पाॅईंटहुन परतताना माथेरानचा प्रसिध्द गर्द काळोख आणि रमतगमत चालल्याने लोकं पुढे जाऊन आम्हीच मागे पडलो होतो.तेव्हा जीव मुठीत धरुन हाॅटेलपर्यंतचा प्रवास केला होता!तेव्हा दिवाडकर मध्ये राहिलो होतो.
स्वच्छ हवेच्या दिवसात माथेरानच्या पठाराचे प्रबळ इर्शाळमधुन कधीतरी माझ्या गावातुन दर्शन होते.दस्तुरीहुन चालत निघाल्यावर येणारा पहिला पाॅइंटहुन अामचे गाव तिथल्या रिलायन्स बाॅम्बे डायिंग कंपन्यांच्या चिमण्या दिसतात.प्रथम पाहाताना गंमत वाटली होती.काॅन्फरन्सच्या निमित्ताने उषा आदि पंचतारांकित हाॅटेलातही राहाणे झालेय.पण तिथले डिस्को,पावसाळ्यात दारु पिण्यासाठीच माथेरानला येणारे लोक यांचा तिटकारा आला होता.
अाता मात्र चाल चाल करायचा कंटाळा येतो.निवांत बरे वाटते!
11 Jan 2015 - 8:40 pm | कंजूस
छान आठवणी अजया !
त्या प्रसन्न हॉटेलचं बुकिंग व्हायचं (सौ॰ संत ते करायच्या)त्याच बिल्डींगमध्ये मी राहायचो आता दोन बि॰ पुढे राहतो.
12 Jan 2015 - 1:09 am | बोका-ए-आझम
माथेरान अप्रतिम आहेच आणि पायी भटकायला तर फारच छान! इतके वेळा तिथे जाऊनही टाॅय ट्रेनने जाण्याचा योग आला नव्हता तो यावेळी आला. फक्त एकच गोष्ट खटकते ती म्हणजे त्या हाताने ढकलायच्या रिक्षा!
12 Jan 2015 - 12:22 pm | वेल्लाभट
अरे वा... मस्त ! एकदम जवळ आणि सुंदर ठिकाण..
12 Jan 2015 - 2:12 pm | मॅक
छान...
16 Jan 2015 - 7:02 pm | पैसा
मी माथेरानला एकदाच गेले होते. घोड्यावर बसणे हे दिव्यच आहे. असा काही विचित्र हलतो की त्यापेक्षा चालत गेलेले परवडले असे वाटायला लागते. त्यातच नवर्याचा घोडा अचानक जोरात पळू लागला आणि घोडेस्वाराची जाम धावपळ झाली होती. बाकी मात्र जाम मज्जा आलेली. आम्हीही दिवाडकर हॉटेलमधे राहिलो होतो.
22 Jan 2015 - 10:53 am | कोमल
भरपुर ठिकाणे झाली पण च्यामारी इकडे जायचा योग अजून नाही आला.
राहाण्याच्या ठिकाणाबाबत अजून कोणी सांगु शकेल का.
कारण गूगलवून पाहिलं पण हॉटेलचे दर भयंकर आहेत असं दिसतयं
22 Jan 2015 - 12:32 pm | मदनबाण
कंजूस मामा... मी काय म्हणतो... तुम्ही एव्हढी मस्त भटकंती करत आहात... तर छान कॅमॅरा सुद्धा का नाही बाळगत ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - {Mawaali }
22 Jan 2015 - 1:55 pm | कंजूस
@मदनबाण ,८५सालचे कैनन AE 1 चे किट वाईड28mm टेली 70-200 ,५०एमेम f१.८ दहा वर्षे वापरले ते आता फिल्मकैमरा असल्यामुळे पडून आहे आणखी डिएसेलार नाही घेणार. आता मोबाइलच्या ५मेपि वर चार वर्षे निभावतोय प्रिंटस चांगले येतात फैमिली रेकॉर्ड म्हणून चालतात. (नोकिआ ७२०च्या काल झाइस इतके चांगले नाहीत) काही मिपावर नसलेले लेख माझ्या वर्डप्रेसमध्ये आहेत.
@कोमल ,गुगलून नेटवरची हॉटेलच्या मागे लागाल तर एका वर्षात एकच महागडी ट्रीप करता येईल. हजार बाराशे रुच्या खाली रुम भाडे असणारी हॉटेल्स नेटवरून बुक होत नाहीत ती रिकामीच असतात.
माथेरानसाठी दोन दिवस एमटिडीसीत राहून सर्वे करायचा आणि स्वस्त हॉटेलांचे फोन नं घेऊन ठेवायचे.
पोस्टाच्या पुढे गिरिविहार(उदय आचार्य ,02148230231मुंबई फोन02224456885)(ऑफ सिजनला स्वस्त रुम भाड्यावर मिळते) ,
राममंदिरासमोर हॉटेल सत्कार सोनावणे 9423806501 (रू४५० ते ६०० रुमभाडे)पाहून ठेवा
22 Jan 2015 - 2:00 pm | मदनबाण
आणखी डिएसेलार नाही घेणार.
डिएसएलआरच वापरायला हवा ? कॉपॅक्ट कॅमेरा बाळगायला हरकत नसावी.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }
10 Mar 2015 - 12:00 pm | कंजूस
माथेरान चालताफिरताकट्टा-फोटो .८ मार्च. सहभागी मिपाकर सुधांशु नूलकर, डॉक्टर सुबोध खरे, मुक्तविहारि आणि कंजूस.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
10 Mar 2015 - 12:43 pm | प्रचेतस
वाह..!!!
सगळेच दिग्गज लोक्स आहेत.
10 Mar 2015 - 5:20 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:22 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:23 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:24 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:25 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:27 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:33 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:36 pm | सुबोध खरे
10 Mar 2015 - 5:44 pm | धर्मराजमुटके
शेवटचा फोटो भन्नाट ! पाहून परवेश रावलच्या बाबूभाईची आठवण झाली (परेश रावलचे माझ्या मुलाने केलेले नामकरण). अरे ये गुंडा लोग गाडी मेरे भरोसे छोड के गये है रे बाबा ! मै नही आ सकता तुम्हारे साथ !
10 Mar 2015 - 7:00 pm | सूड
डॉकनी टाकलेले फोटो दिसतायेत, कंजूसकाकांनी टाकलेले दिसत नाहीयेत.
10 Mar 2015 - 7:08 pm | कंजूस
डॉ॰ फोटो फारच मस्त. मला त्या केसट्रल(देवससाणा ?)च्या फोटोबद्दल फारच उत्सुकता होती. देवाचं नाव घेऊन तो शिकार करतो म्हणे.एक जरी चांगला फोटो मिळाला तरी ट्रीप वसूल झाल्याचे समाधान मिळते.
11 Mar 2015 - 12:14 pm | रवीराज
फोटो मस्तच आहेत.