२०१३ च्या हिमाचल सहली नंतर एप्रिल ची कोकण ट्रीप सोडली तर २०१४ नोव्हे संपेपर्यंत फिरण्यासाठी खुप कमी वेळ मिळाला. कारण तसे खास होतेच कन्यारत्नामुळे आम्हाला बाकी संपुर्ण जगाचा विसर पडला होता. या काळात मी मिपा वरती नव्हतो, नेट वरती कुठेच नव्हतो.. नाही म्हणायला कंपणीतील कंपल्सरी ट्रीप मुळे गोव्याची ट्रीप आणि गोवा आवडल्याने नंतर केलेला दुधसागर ट्रेक वगळता कुठलीही भटकंती या काळात झाली नाही. त्याची कसर भरुन काढण्यासाठी यावेळेस राजस्थानच फायनल केले गेले होते. पण बाळ लहान आहे नको असे ग्रुहमंत्र्याकडुन मिळालेले कारण (ग्रुहमंत्र्यांचा स्वता राजस्थान दौरा झाल्याने आम्हाला नेहमी प्लॅन बदलावा लागत आहे.. हे वेगळे कारण आहे, ठिक आहे पुढच्या वेळेस पाहु असे ठरवुन तलवार म्यान करण्यात आली). त्यात मुंबईला रामराम करुन पुनश्च पुण्यात आल्याने सुट्ट्यांसाठी थोडीशी घासाघीस होतीच. म्हणुन राजस्थान सारखे आकर्षक ठिकाण पुन्हा एकदा दूर जात होते याच्या मनाला यातना होत होत्या. नोव्हें ची हक्काची सुट्टी रद्द झाली होती.. त्याच्या बदल्यात डिसेंबर ला सुट्टी घेता येणार होती.
आता जवळ कोठे फिरायला जायचे हा प्रश्न होता.. शिवाय आमच्या आराध्याची ही पहिलीच ट्रीप असणार होती.. त्यामुळे चांगले पण जवळचे ठिकाण नक्की करायचे असे ठरले.. पण जवळ म्ह्ंटले की महाबळेश्वर सोडले तर कुठले ठिकाण लक्षात येईना आणि मग अनेक वर्षापासुन जायचे जायचे म्हणुन मागे राहिलेले अजिंठा - वेरूळ आठवले. दरवेळेस ३-४ दिवस बाहेर जायचे म्हंटले की हक्काचे महाबळेश्वर आणि कोकण हेच ठरते. परंतु अजिंठा- वेरुळ खरे तर भारताची शान आहे, एकदा तरी येथे जायलाच हवे.. त्यात ही तुम्ही कलेचे शौकीन असाल तर येथे जरुर भेट द्यावीच असे मनापासुन वाटते.
भराभर प्लॅन करण्याची तयारी केली पण औरंगाबाद ला कधीच जाण्याचा प्रसंग आला नव्हता.. कोठे आणि कसा मुक्काम करावा येथुन सुरुवात झाली होती. ४ वर्षापासुन एकत्र ट्रीप करुया असे म्हणत असलेला आमचा नाशिक चा मित्र आणि फॅमिली यावेळेस हॉटेल बुक केल्या नंतर कॅन्सल झाली आणि आम्ही एकटेच तेथे फिरणार हे नक्की झाले.
औरंगाबाद ला हॉटेल न घेता, वेरुळ्च्या लेण्या शेजारील कैलास हॉटेल सरळ बुक केले होते. आणि आणखिन कोणी बरोबर नसल्याने १ दिवस ट्रीप मध्ये आनखिन वाढव्ता आला आणि पैठण - देवगड - शनि शिंगणापुर पण मस्त पैकी करता आले.
रविवारी १४ डिसेंबर ला पुण्यातुन सकाळी निघुन १२ वाजता वेरुळ ला पोहचलो.. हॉटेल आवडले तरी पटकण आवरुन बाहेर पडलो.. जेवन मित्रांनी सांगितल्या प्रमाणे वृंदावनलाच केले आणि वेरुळ (एल्लोरा) लेण्या पाहण्यास आम्ही निघालो. आत गेल्यावर पहिल्यांदाच १६ नंबरचे प्रसिद्ध कैलास लेणे दिसले आणि आमची पावले आपोआप तिकडेच वळाली... कैलास लेणे खरेच खुप मोहक आहे, हे पाहताना संध्याकाळ कशी झाली हे कळालेच नाही. दूसर्या दिवशी सकाळीही ६ वाजता गेट उघडते त्यावेळेस आत जाणारा मी पहिलाच होतो. कैलास लेण्यालाच मला जवळ जवळ एकुन ६ तास लागले पहायला ( ते ही कमी पडतात) मला कळत नाही लोक एका दिवसात संपुर्ण वेरुळ लेणी कशी पाहत असतील. असो.
वेरुळ लेणी :
वेरुळ : लेण्यांसाठी जगप्रसिद्ध असलेले भारतातील स्थळ. ते महाराष्ट्रात औरंगाबादच्या वायव्येस सु. ३२ किमी. वर वसले आहे. या गावाजवळून इला नदी वाहते. सर्वसाधारणपणे येथील लेण्यांची निर्मिती इ.स. सहाव्या शतकापासून पुढे टप्प्याटप्प्याने होत गेली. वाकाटकांच्या ऱ्हासानंतर चालुक्य आणि कलचुरी या दोन राजवंशांच्या संघर्षकालातच ही लेणी कोरली गेली. राष्ट्रकूट घराण्याच्या ताम्रपटात (आठवे शतक) या स्थळाचा उल्लेख `एलापुर' असा केलेला असून त्यात येथील उत्कीर्ण लेण्यांचाही संदर्भ दिला आहे. अजिंठा येथील कलापरंपरा हरिषेण या वाकाटक सम्राटाच्या मृत्यूनंतर म्हणजे पाचव्या शतकाच्या अखेरीस खंडित झाली आणि तेथून बाहेर पडलेले शेकडो कलावंत नव्या राजवटीच्या आश्रयाखाली वेरूळच्या लेण्यांवर काम करू लागले, असे एक मत आहे. वेरूळ शिल्पाचा शैलीदृष्ट्या विचार करता हे मत थोड्याफार फरकाने ग्राह्य वाटते. सहाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात, बहुधा कलचुरींच्या आश्रयाखाली हे काम सुरू झाले असावे. रामेश्वर लेण्याच्या समोर सापडलेली कलचुरी नाणी या कयासाला दुजोरा देतात.
महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर तेराव्या शतकात वेरूळ गुंफामध्ये वास्तव्य करून होते, असा स्थानपोथीमध्ये उल्लेख आहे. यानंतरची वेरूळची जी माहिती मिळते, तीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळची पाटीलकी चालवीत होते, असे कळते. अठराव्या शतकात अहिल्यादेवी होळकर (कार. १७५६–९५) यांनी इला (येलगंगा) नदीच्या काठी ⇨घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. अहिल्यादेवींनी माणकेश्वर मंदिराचा (कैलास लेण्याचा) जीर्णोद्धार करून तिथल्या धूपदीपासाठी वर्षासन बांधून दिले, अशीही माहिती मिळते. अगदी अलीकडे या लेण्यांच्या परिसरात सातवाहनकालीन (इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. तिसरे शतक) वास्तूंचे अवशेष सापडल्याची नोंद झाली आहे.
सध्याच्या गावाच्या पश्चिमेला असलेल्या बालाघाटच्या टेकड्यांत, औरंगाबाद-वेरूळ या मार्गावरच दक्षिणेकडून उत्तरेकडे लेणी खोदण्यात आलेली असून त्यांची एकंदर संख्या चौतीस आहे. पुरातत्त्वखात्याने क्रमांक न दिलेली अनेक लहानमोठी लेणी या डोंगरात पसरलेली आहेत. मुख्य समूहातील दक्षिणेकडील भागात बारा लेणी असून ती बौद्ध धर्मीय लेणी आहेत. त्यानंतर सतरा लेणी हिंदू धर्मीय असून, त्यानंतर उत्तरेकडील पाच लेणी जैन धर्मीय आहेत. वेरूळच्या बौद्ध लेण्यांचा प्रारंभ सहाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यापक प्रमाणात सुरू झाल्याचे दिसते. परंतु त्यातील अनेक प्रकल्प पुरेशा द्रव्यबळाअभावी इ. स. ६०० च्या आसपास बंद पडले असावेत. बौद्धांनी अर्धवट सोडलेल्या कित्येक गुंफा नंतर हिंदू लेण्यांमध्ये परिवर्तित केल्या गेल्या असाव्यात. हिंदू शिल्पप्रवृत्तीचा पहिला टप्पा प्रामुख्याने पाशुपत शैव संप्रदायाशी निगडित आहे. सहाव्या शतकाच्या सुरुवातीपासून ते चालुक्यांच्या कलचुरींवरील निर्णायक विजयापर्यंत-म्हणजे सातव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत-तो पूर्ण होतो. दुसरा टप्पा राष्ट्रकूटांच्या प्रवर्धमान शासनकाळात भक्तिसंप्रदायाच्या छटा दाखवणारा तर तिसरा टप्पा, ज्यात प्रामुख्याने जैन लेणी येतात, तो उत्तर राष्ट्रकूट काळात म्हणजे दहाव्या शतकाच्या शेवटीशेवटी पूर्ण झालेला दिसून येतो. यादवकाळातही काही तुरळक काम येथे झाले असावे. आठव्या शतकात येथील स्थापत्यकलेला बहर आला आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती या काळात झाली.
वेरूळच्या लेण्यांमधील १ ते १२ क्रमांकांची लेणी बौद्ध, १३ ते २९ हिंदू आणि ३० ते ३४ जैन, अशी आहेत. क्रमांक १६ चे विख्यात कैलास लेणे आहे.
लेणे १६ : सौंदर्यशाली कैलास लेणे
कैलास लेण्याचा `माणकेश्वर' असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून, ते वेरूळचा मुकुटमणी आहे. `आधी कळस मग पाया' अश्या पद्धतीने एकाच कातळात वरुन खाली अआणि पुढुन मागे अश्या पद्धतीने हे लेणॅ कोरलेले आहे, या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (कार. सु. ७५६-७७३) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली.
कैलास लेणे हे सौंदर्यशाली शैलमंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव-चालुक्यकालीन शैलींची संमिश्र छटा जशी दिसून येते, तसेच विमान, गोपुर इ. घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते.
मेन गेट मधुन आत आल्यावर दिसणारे कैलास
पहाटे घेतलेला किर्तीस्तंभ आणि हत्ती यांचा फोटो. राष्ट्रकुट राज्याची विजयाची निशानी होती ही.शैव धर्म प्रभाव आणि सत्ता यांचे प्रतिक
नंतर काही वेळाने लख्ख प्रकाशात पुन्हा तोच फोटो
लेण्या मध्ये प्रवेश करताना
नटराज
वराह आणि नृसिंह विष्णुअवतार
गजान्त्लक्ष्मी
महिषासुर वध
हत्ती, बैल, मेंढी, घोडा असे वेगवेगळ्या वाहनांवर बसलेले देव
गंगा
छतावर असलेला सिंह
महाभारत युद्ध पट
मंदिराच्या बाजुने असणारा हत्तींच्या कोरीव मुर्ती
साईड अँगल ने
संपुर्ण लेण्याला पहिल्यांदा अश्या मातीपासुन बनवलेल्या रंगानी रंगवलेले असणाअर, आणि संध्यासमयी तो रंग असा सोनेरी साज लेवुन चमकत असेल. असे द्रुष्य पाहताना ज्या हाताने हे घडविले त्यास किती सुख मिळाले असेल. नवनिर्मिती सारखा आनंद हा जीवनातील सर्वोच्च आनंद असतो.
विजयस्तंभ आणि घोडा
पद्मनाभ : शेषनागावरती विष्णु आणि नाभीतुन कमळावर बसलेला ब्रम्हा. ( पद्मनाभ मंदिर, त्रिवेंद्रमला हीच मुर्ती खुप आकर्षक आहे)
शिव
वामन आवतारातील मुर्ती शी आमचे बाळ बोलताना, सपुर्ण वेरुळ मध्ये बप्पा बप्पा करुन बोलत असल्याने आम्हाला फिरायला आनखिनच आनंद झाला होता.
कैलास लेण्याचेच उपलेणे असलेले लंकेश्वर लेण्यात उंध पायर्या अंधारात चढुन जावे लागते
आत लंकेश्वर लेण्यातील काही मुर्ती पाहु
सभांडपातील नक्षीदार खांब
शिवनृत्य.. मला सर्वात आवडलेल्या मुर्तीपैकी ही एक मुर्ती.
शंकर पार्वती, बाळ गणेश आणि बाजुला कर्तीकेय ( मी लावलेला अर्थ)
अंधार्या गर्भगृहा मध्ये अंदाजे क्लिक केले, आणि फ्लॅश मुळे शंकराची ही वेगळी मुर्ती दिसली, त्याच्या पुढे खांबासम शिवलिंग आहे.
पुन्हा खाली येवुन , मुळ कैलाश लेण्याच्या दूसर्या स्तरावर जाण्यासाठी आम्ही निघालो.. येथेच वाद्यमंदप, नंदि मंडप, गौण मंदिर, पुजा मंडप, स्तंभ मंडप आहेत.
नंदिवर बसलेले शिव पार्वती
अश्या पद्धतीने मार्कींग करुन मुर्ती घडविण्याचे काम केले जात असावे
बाजुचे गौण मंदिर
नंदि मंदप
वरुण दिसणारा शेजारील लंकेश्वर उपलेण्याकडे जाणारा मार्ग
स्मित हाश्य असलेली शिव मुर्ती
नंदिमंडपातील नंदि( आराध्याचा आवडता बप्पा)
बाजुने
आता आम्ही, कैलास लेण्याच्या वरती जाण्यास निघालो, कातळातुन वरतुन खाली कोरलेले मंदिर वरुन पाहण्यात मजा येते.
सुरुवात :
१.
आराध्या आणि कैलाश मंदिर
२.
३.
मंडपावरील चारही दिशेला असणारे आवेषपुर्ण सिंह
४.
५.
६
७ सिंहाचा जवळुन फोटो
८
क्रमशः
मार्गदर्शन आभार : परम मित्र वल्ली, प्रा.बिरुटे सर, रितेश(औरंगाबाद)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही वाट भटकंतीची १२ : हिमाचलhttp://www.misalpav.com/node/29393
ही वाट भटकंतीची ११ : तुंग:http://misalpav.com/node/22303
ही वाट भटकंतीची ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
ही वाट भटकंतीची ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
ही वाट भटकंतीची ६ - कार्ला लेणी.
ही वाट भटकंतीची ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
ही वाट भटकंतीची ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
ही वाट भटकंतीची ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
ही वाट भटकंतीची २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
ही वाट भटकंतीची १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323
प्रतिक्रिया
8 Jan 2015 - 8:16 pm | एस
फोटो फारच बाहेर जाताहेत. त्यामुळे आत्तातरी फक्त स्क्रोल करत धागा पाहिला. नंतर सविस्तर प्रतिसाद देईन.
8 Jan 2015 - 9:19 pm | प्रचेतस
क्या बात है गणेशा.
सुंदर फोटो आणि तितकेच छान वर्णन.
आता ह्या शनिवारी म्हणजेच परवा आमच्या मिपाकर मित्रांबरोबरच वेरुळला जाणार आहोत तेव्हा परत उजळणी होईलच.
वामन आवतारातील मुर्ती शी आमचे बाळ बोलताना>>>>
आराध्या वामन अवताराशी बोलत नसून कालारी शिवाबरोबर बोलतेय. ती मार्कंडेयानुग्रहाची मूर्ती आहे. :)
8 Jan 2015 - 10:09 pm | कंजूस
किती सुसंगत वर्णन आणि सादरीकरण केलं आहे. तुमचे कन्यारत्न फारच नशिबवान आहे. आधिच्या धाग्याच्या कड्या दिल्यात खूपखूप धन्यवाद. तुमचा सर्वाँचा आराध्य बाप्पा चांगली भ्रमंती घडवणार आणि राजस्थान लवकरच करवणार.
9 Jan 2015 - 7:39 am | मुक्त विहारि
आणि तितकेच सुंदर फोटो...
9 Jan 2015 - 8:06 am | अजया
छान फोटो आणि वर्णन.लेक एकदम गोड आहे हो तुमची!
9 Jan 2015 - 8:20 am | जयन्त बा शिम्पि
एकाच शब्दात सांगावयाचे तर " झकास " ! !
9 Jan 2015 - 12:41 pm | अत्रुप्त आत्मा
9 Jan 2015 - 2:45 pm | पदम
सुंदर फोटो आणि छान वर्णन.
11 Jan 2015 - 2:28 pm | पैसा
खूप छान माहिती गोळा करून लिहिलंस, आणि फोटोही मस्त आहेत.
13 Jan 2015 - 5:11 pm | मॅक
महिती सुरेख आहे...फोटो पण छान...
कधी जाण होणार आहे काय माहित....
17 Feb 2015 - 2:28 pm | गणेशा
सर्वांचे मनापासुन आभार.. दुसरा भाग लिहिण्यास उशीर लागला आहे मान्य, लवकरच देत आहे दुसरा भाग.