गाभा:
कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मालेगाव मधील बॉम्बस्फोटमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक कबुली दिल्याची बातमी नुकतीच वाचनात आली.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3684027.cms
भारतामधील दहशतवाद एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. या बाबत आपल्याला काय वाटते???
प्रतिक्रिया
7 Nov 2008 - 2:43 pm | महेश हतोळकर
बातमीच्या सत्यतेबद्दल शंका आहे. त्याच बातमीत पुढे दिनेश अग्रवाल यांनी ' हे खरं नाही ' असही म्हटलं आहे. असो. पूर्ण तपासाअंती खरे काय ते कळेलच.
महेश हतोळकर
7 Nov 2008 - 2:56 pm | प्रकाश घाटपांडे
javascript:openWindow( "/esakal/11072008/TajyabatmyaPuneMumbaiNational0D8ADC6C99.htm")बातमीत नाव लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहत असे आहे. मटाच्या अगोदरच्या बातमी त विनोद नाव होते. मटाच्या सदर बातमीत श्रीकांत पुरोहित म्हटलय. हे वार्ताहार नावाचा गोंधळ करतात असे वाटते.
मी याचा अनुभव घेतला आहे. इंटॅलिजंट पुणे या प्रभात च्या इंग्रजी साप्ताहिकात ज्योतिष चाचणीत माझे नाव महेश घाटपांडे असे लिहिले होते. सदर चुक मला करेक्शन साठी ड्राफ्ट पाठवला तेव्हा मी कळविली होती तरी छापुन येताना परत चुकीचेच नाव आले.
असो. पण पुरोहितांचे कुठलेही गुन्हेगारी स्वरुपाचे रेकॉर्ड नव्हते. लष्करात ही ते प्रामाणीक अधिकारी म्हणुन ओळखले जात.
यात काहीतरी गोम आहे. जर वृत्त खरे असेल तर त्यांच्या डोक्यात धर्माधिष्ठीत हिंदु देशप्रेमापोटी मुस्लिम द्वेष हा घटक असणार आहे. अर्थात हा केवळ अंदाज
प्रकाश घाटपांडे
8 Nov 2008 - 4:59 pm | अनामिका
इतक्या लवकर या प्रकरणावर भाष्य करणे चुकीचे ठरेल.
भारतात एखाद्या संघटनेला बदनाम करणे अथवा एखाद्या चुकीच्या घटनेत तीचे अथवा तिच्याशी संलग्न असलेल्या व्यक्तींची नावे जोडणे हा प्रकार नवीन नाही.
आपला वैयक्तिक अथवा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अश्या प्रकारचे हतखंडे सर्रास वापरले जातात.
त्यातुन लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या निमित्ताने सैन्यातील मराठी अधिकार्यांना लक्ष केले जातेय यामुळे शंका घेण्यास वाव आहे. मागिल मालेगाव स्फोटाचे आरोपी पकडताना ज्या एटिएस ला घाम फुटला तिलाच इतक्या सहजपणे नुकत्याच झालेल्या मालेगाव स्फोटातील संशयीत आणि इतर सगळे धागेदोरे इतक्या त्वरेने मिळाले यावर कोण शेंबड पोर विश्वास ठेवील?
नक्किच काही तरी शिजतय.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदु यांना लक्ष करणे हाच हा षडयंत्राचा उद्देश असावा.
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/