बाईक्स घेताना - भाग १

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in तंत्रजगत
20 Dec 2014 - 8:47 pm

पूर्वीचे शिर्षक वाचून बर्याच जणांच्या भुवया वर गेल्या त्यामुळे नाम मे चेंज होना
हा धागा लिहिण्याची प्रेरणा म्हणजे मुविंचा http://www.misalpav.com/node/29773 हा धागा …
मी स्वतासाठी आत्तापर्यंत ४ बाईक्स घेतल्या आहेत …आणि वापरून झाल्यावर परत विकल्या … त्यामुळे इथे दुसर्यांना बाईक्स बघताना थोडी मदत व्हावी या उद्देशाने हा लेख (… म्हणा जिल्बी चायला )

बहुतांशवेळा लोकं बाईक घेताना खालील मुद्दे विचारात घेतात

१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. दिसणे
४. ताकद (power)
५. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
६. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
७. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)

वरीलपैकी कोणत्या मुद्याला किती प्राधान्य द्यायचे ते बहुतांशवेळा "वापरणार्याच्या वयावर + विकत घेणार्याच्या खिशावर + पेट्रोलचा खर्च किती परवडतो त्यावर" अवलंबून असतो
माझे वयानुसार ठोकळेबाज निरीक्षण असे (सर्व अंदाज आहेत …. ते सुध्धा फक्त निरीक्षणावरून … त्यामुळे विदा मागणार्यास फाट्यावर मारण्यात येईल :D )

शारीरिक वय १८ पेक्षा कमी

या कार्ट्यान्ना बाइक हातात देऊ नये… चायला बडे बाप के बेटे

मानसिक वय १८ ते २५

यांना मुख्यत्वे शायनिंग मारायची असते त्यामुळे

१. दिसणे
२. ताकद (power)

बाकी मुद्दे गेले तेल लावत …. पाख"रे" इंप्रेस झाली पाहिजेत …. मित्र्रांनी कसली भारी बाइक आहे असे म्हणून दाद दिली पाहिजे …इतकाच उद्देश

मानसिक वय २५ ते ३३

यांच्याकडे नवीन नोकरीचे पैसे आलेले असतात…यांना सुध्धा थोडीफार शायनिंग मारायची असते पण त्याबरोबरच दमड्याम्चे मुल्य (value for money) आणि व्यावहारिक मुल्य सुध्धा बघतात … बर्याचदा स्वताच्या खिशातले पैसे असतात त्यामुळे :)

१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. दिसणे
४. ताकद (power)

काहीवेळा
५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)

मानसिक वय ३३ ते ४०

आर्थिक दृष्ट्या हे बर्यापैकी स्थिर असतात … पण लग्न झालेले असते … बरोबर १-२ कच्चीबच्ची असतात … संसार खर्च वाढलेले असतात …
बर्याचदा या वयात नवीन बाइक घेणारे कमीच असतात कारण बाइक आधीच घेऊन झालेली असते … बाइक घेण्याचे कारण हे कदाचित कार बरोबर १ बाइक असलेली बरी असे असते

१. दमड्या
२. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
३. मायलेज … "कितना देती है"
४. आराम

मानसिक वय > ४० - उपप्रकार १

यांची कार घेण्याईतपत आर्थिक परिस्थिती नसते

१. दमड्या
२. मायलेज … "कितना देती है"
३. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
४. तेलपाण्याचा / सुट्टया भागांचा खर्च
५. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)

मानसिक वय > ४० - उपप्रकार २

हे खरे बायकर्स …. यांना कार पेक्षा बाइक आवडते

१. ताकद (power)
२. आराम … ( थोडाफार दुर्लक्षित मुद्दा )
३. अतिरिक्त वैशिष्ट्ये … (additional features)
४. दिसणे

तर आता विभागवार ठरलेल्या बायकांचे पर्याय बघू

क्रमश:

प्रतिक्रिया

हम्म...बाईक कोच्या बाबतीत
ताकद पावर आपली आपली बघायची,
मी माझी शिडी डॉन गरज पडल्यास 80 च्या स्पिडने पळवेन.
गरज नसल्यास 75 चा मायलेज काढेन.

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 9:06 pm | टवाळ कार्टा

पाखरु, कार, बाईक, दारु हे सगळे पसंद अपनी अपनी या टाईपचे आहेत ;)

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 9:42 pm | टवाळ कार्टा

;)

सतिश गावडे's picture

20 Dec 2014 - 9:55 pm | सतिश गावडे

बाक़ी हापिसच्या गाडीने तासभर झोपून जायचे आणि झोपून घरी यायचे या प्रकाराची सवय झाल्याने दुसर्याने चालवलेली कुठलीही गाडी चालते.

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 5:55 pm | टवाळ कार्टा

कर दी ना छोटी बात :P

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 10:12 pm | टवाळ कार्टा

भौ...जरा थाम्बा...पुढच्या भागात तडका टाकतो ;)

श्रीरंग_जोशी's picture

20 Dec 2014 - 10:21 pm | श्रीरंग_जोशी

खुमासदार अन माहितीपूर्ण लेखन.

काही प्रतिकात्मक फोटो टाकले असते तर अधिक परिपूर्ण वाटले असते.

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 10:27 pm | टवाळ कार्टा

stay tuned \m/

चित्रगुप्त सरांशी प्रचंड सहमत !!

मुक्त विहारि's picture

20 Dec 2014 - 11:08 pm | मुक्त विहारि

निरीक्षण जोरदार आहे....

अर्थात ह्या नियमांना पण अपवाद असणारच...

टवाळ कार्टा's picture

20 Dec 2014 - 11:16 pm | टवाळ कार्टा

बायका म्हणजे आमच्या आवडीचा विषय (इथे शाब्दीक कोट्या करू नयेत) ;)
अणि अपवाद सगळ्याच नियमांना असतात :)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 12:30 am | अत्रुप्त आत्मा

अरे टवाळा!!! :-D काय पण धागा काढलास! :-D

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 11:54 am | टवाळ कार्टा

अरे दांडगा रिसर्च केलाय माझ्या बायका घेताना...आत्ता ते "जनहितार्थ मे जारी" करतोय

विवेकपटाईत's picture

21 Dec 2014 - 8:36 am | विवेकपटाईत

बायका आणिक बाइका दोन्ही मध्ये एक समानता आहे, बायको संसार चालविताना नखरे करते, बाइका रस्त्यावर चालताना नखरे करते. दोघींचा स्वभाव एकच.

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 11:55 am | टवाळ कार्टा

डायवरच्या स्किल वर अवलंबून असते नखरे कसे सांभाळायचे ;)

तुषार काळभोर's picture

21 Dec 2014 - 5:50 pm | तुषार काळभोर

प्रचंड अणुमोदन!!

टवाळ कार्टा's picture

21 Dec 2014 - 7:24 pm | टवाळ कार्टा

योग्य ते बदल केलेले आहेत...अजून पण बदल हवे असतील तर व्यनी करा...पण धागा नका ऊडवू
अजून पुढचे भाग टाकायचे आहेत

चित्रगुप्त's picture

21 Dec 2014 - 7:50 pm | चित्रगुप्त

हा हंत हंत ...
आधीचे शीर्षक, त्याला साजेसे प्रतिसाद अन चित्रे, हे सर्व कुठे गेले ?

मिपा हॅज 'ए' सेन्सॉर्ड बोर्ड . ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2014 - 8:14 pm | अत्रुप्त आत्मा

=)))))

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 8:25 am | टवाळ कार्टा

जौदे....ते चित्र मनात साठवले आहे ;)

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 8:29 am | मुक्त विहारि

आम्ही वाट बघत आहोत.

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 8:38 am | टवाळ कार्टा

आधी सेंसॉर सर्टिफिकेट घ्यायचा विचार करतोय :D

मुक्त विहारि's picture

22 Dec 2014 - 8:41 am | मुक्त विहारि

व्य.नि. कर...

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 8:44 am | टवाळ कार्टा

आधी केलेल्या व्यनीला तर उत्तर द्या...तुमचे काम पहीले...लेख नंतर :)

प्रसाद गोडबोले's picture

22 Dec 2014 - 1:56 pm | प्रसाद गोडबोले

मानसिक वय > ४० - उपप्रकार २

हे खरे बायकर्स …. यांना कार पेक्षा बाइक आवडते

आम्ही सध्या ह्या गटात मोडतो ... केटीएम ३९० प्र.....चं.....ड आवडली ... पण शारिरिक/सामाजिक वय २५-३० असल्याने कार घेणे गरजेचे होते :(

असो .

( आता बाईक घेतली तर हार्लि च घेणार अशा हट्टाला पेटलेला )

प्रगो

टवाळ कार्टा's picture

22 Dec 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

KTM is todays best bang for buck (and possibly since indian biking history)