आजकाल स्त्री भृणहत्या हा विषय चांगलाच चर्चेत आहे.स्त्रीला समाजात सन्माननीय स्थान मिळावे या साठी सगळ्यांचीच खटपट चालली आहे.
एका बाजूला आपण पाहत आहोत हल्ली एक मुलगी असलेले पालक सुद्धा दुसऱ्या अपत्याची वाट न पाहता मुलीला उच्च शिक्षण मिळावे म्हणून धडपडत असतात, (समाजातील हा बदल नक्कीच लक्षवेधक आहे.)
तर दुसऱ्या बाजूला पाहतो मुलगा होण्याची वाट पाहण्यात, संगोपन करण्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही मुली जन्माला घातल्या जातात.(शेवटास मुलगा होतो कि नाही देव जाणे.)
जास्त मुली असणाऱ्या मातेला उगाच अपराधी वाटत असे. (तिचा दोष नसूनही)
एक काळ असा होता की समाज काय म्हणेल या भीतीने मुलीला अडवले जात होते.हे करू नको,ते करू नको,इथे जाऊ नको,तिथे जाऊ नको.
बर हे सर्व सांगणारया .बहुदा स्त्रियाच असत.म्हणजे ,स्त्रीला मागे खेचणारी ही स्त्रीच असते असे चित्र निर्माण होत असे..कधी ती आई असे,तर कधी सासू,नणंद,शेजारीण असे..प्रसंग निरनिराळे असत.पण उद्देश स्त्रीला मागे खेचण्याचाच असे. (आता खुपसे चित्र बदलले आहे.आता ह्याच नातलग वा शेजारणी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतात,)
आणि तरीही समाजातील काही बोलक्या घटना पहा.
मी दवाखान्यांमध्ये बघितले आहे बऱ्याच वेळा असे चित्र दिसते मुलगा झाला कि बाळंत झालेल्या बाईसाठी स्पेशल रूम घेतात,आणि मुलगी झाली कि जनरल वार्ड घेतात.प्रत्यक्षात पाहिले तर प्रसव वेदना दोन्ही वेळी सारख्याच असतात.मग हा फरक कशासाठी?
त्या आधीही म्हणजे गर्भारपणी पती पत्नीला प्रेमाने सांगतो,जर मुलगा झाला तर तुला अमुक दागिना करीन. ह्या मी पाहिलेल्या घटना आहेत,(अर्थात सगळेच असे असतात असे नाही.)
अजून त्याही अगोदर आपण पाहिले, म्हणजे गर्भधारणा निश्चित होते त्यावेळी सगळे आनंदित होऊन एकमेकांना आनंदाची बातमी देताना म्हणतात,'आपल्याकडे कृष्ण येणार आहे"
मला मान्य आहे कृष्ण सर्वांचा आवडता आहे त्याच्या बाललीला सगळ्यांना मोहवतात.पण असं का म्हटलं जात नाही की आपल्याकडे 'राधा' येणार आहे...
आणि माझ्यासारख्यांनी असं म्हटलं तरी ते किती जणांना आवडेल?.................
प्रतिक्रिया
21 Sep 2014 - 4:12 pm | भिंगरी
सदर लेख मिपा च्या चेपुवर या आधी प्रकाशला आहे.
21 Sep 2014 - 4:39 pm | तिमा
जुळं होऊन एकाच वेळी जन्माला आले तर सख्ख्या बहिण-भावाला राधा आणि कृष्ण म्हणावे लागू नये, म्हणून असेल कदाचित!
21 Sep 2014 - 10:30 pm | कवितानागेश
बरोबर लिहिलं आहेत भिंगरीताई.
जोपर्यंत 'राधे'ला जपणं आणि आणि तिला सासरी पाठवताना हुंडा देणं हे प्रकार सुरु आहेत, तोपर्यंत तिला समान वागणून मिळणं कठीण आहे.
गरीब वर्गात अजून एक पाहिलेली कटू गोष्ट म्हणजे मुलगा कमावता होउन 'हाताशी' येतो, पण मुलीला मात्र दुसर्याकडे पाठवायचय, तिचा काय उपयोग? उलट तिच्यावर खर्चच जास्त होणार, असा अविचार दिसतो.
हे बघून खरंच खूप वाईट वाटतं.
ज्यांचा प्रत्यक्ष हॉस्पिटल्स, दॉक्टर्स यांच्याशी संबंध येतोय, त्यांना या प्रश्नाची धार निश्चितच कळू शकेल.
23 Sep 2014 - 3:10 pm | काउबॉय
जोपर्यंत त्यात राजा राणी पेक्षा जास्त मुल्याचा समजला जातोय. जय भारत, जय हिंद
आता क्रांति हवीच
23 Sep 2014 - 3:45 pm | सूड
+१
9 Dec 2014 - 6:58 pm | भिंगरी
सर्व मिपाकरांना कळवण्यात येत आहे की आमच्याकडे राधा आली.
कोल्हापूरात घुगर्या जिलेबी वाटून धूमधडाक्यात बारसे झाले.
मिपाकरांसठी स्पेशल जिलेबी पाडत आहे.
येणार येणार म्हणता राधेचे आगमन झाले,
"पालवी" असे नामकरण झाले.
9 Dec 2014 - 7:08 pm | दिपक.कुवेत
फोटो डकवा कि ईथे लहानग्या राधाचा. नावहि छान आहे.
10 Dec 2014 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राधाच ठेवा की नाव मग...! :)
-दिलीप बिरुटे
12 Dec 2014 - 6:04 pm | काळा पहाड
राधा नाव म्हणजे सो डाऊनमार्केट यु नो.. सध्या चिन्मय, आर्या, गार्गी, मैत्रेयी, रिदम, जिया आदींचा जमाना आहे.
12 Dec 2014 - 6:05 pm | काळा पहाड
भिंगरीताई, एक राहूनच गेलं.. अभिनंदन...
12 Dec 2014 - 6:08 pm | भिंगरी
धन्यवाद! का प
12 Dec 2014 - 6:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सॉरी.... :(
आलोच एक राधा एक मिरा गाणं ऐकून. :)
-दिलीप बिरुटे
9 Dec 2014 - 7:10 pm | भिंगरी
नेहमीची रड
डकवता येत नाही.
9 Dec 2014 - 7:36 pm | टवाळ कार्टा
अभिनंदन :)
9 Dec 2014 - 8:08 pm | गणेशा
अभिनंदन ! आमच्याकड पण मुलगीच. आणि तीच हवी होती.
लेख आपण टाकलाय बरका.. पण आजकाल मला वाटते मुलगा मुलगी भेद खुप कमी झाला आहे.
उलट मला तर वयक्तीक रीत्या मुलगीच चांगली वाटते.
आमच्याकडं मुलगी झाल्यावर तिच्य नावापासुन पुढील बर्याच गोष्टी मीच ठरवणार असे ठरले होते.
मुलगा झाल्यावर आमची ही ..
सांगण्याचा उद्देश मी बाळ होण्या अगोदर खुप (सगळॅए मुलींचीच) नावे निवडली होती. त्यात "पालवी" पण होते.
पण गणेश नावाला सुटेबल आराध्या च वाटल्याने ते ठेवले नाव.
आणि एक मुलगी असण्याचा अभिमान आहे मला.
9 Dec 2014 - 10:58 pm | भिंगरी
गणेशराव,
अभिनंदन आपलेही.
आणि आराध्याला खुप खुप आशीर्वाद!
10 Dec 2014 - 3:59 pm | विवेकपटाईत
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन.
मला ही पहिली मुलगीच होती, आता ती सासरी गेली, हे वेगळ.
डोळ्यांत अश्रू , मनात आनंद
आईच्या हृदयी फुटला आता
मायेचा पाझर.
उबेच्या कुशीत, असा सुरु झाला
चिमुकल्या चिमणीचा संसार.
10 Dec 2014 - 4:27 pm | भिंगरी
भिंगरी ताई, घरात लक्ष्मी आली, अभिनंदन.
धन्यवाद!विवेकजी.
पण ज्या दिवशी मला नात झाल्याचे निरोप सगळ्यांना गेले,त्यावेळेसच्या प्रतिक्रिया भिन्न भिन्न होत्या.
माझ्याकडचे म्हणजे दोनही मुलगे,जावा,दिर,पुतण्या सगळे खुश होते.मला तर मुलगीच होउ दे अशी इच्छा होती ती पुर्ण झाली.
शेजारी पण खुश झाले.
सूनबाईच्या माहेरच्यांचा आवाज थोडा नरम होता. पण आमचा उत्साह पाहुण त्यांची नाराजी पळाली.
समोरची मंदिरातल्या पंडीतची बायको तोंडावर निराशेचे भाव आणून वदली,लडकीही हुई क्या?
बारशाला आलेली एक महिला म्हणाली आमच्याकडे म्हणतात्,पाप केलेले असेल तर मुलगी होते.
आता बोला!!!!!!
कुठे नेऊन ठेवतात हे लोक 'समाज आपला'.
10 Dec 2014 - 4:36 pm | टवाळ कार्टा
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले ;)
10 Dec 2014 - 4:52 pm | भिंगरी
आपण खूश असलो की झाले...दुनीया गेली तेल लावत>>>...
हे तंत्र मी कायम वापरते.
पाप केलेले असेल तर मुलगी होते.
असले विचार करणार्या स्त्रियाच असतात बहुदा,म्हणूनच एक स्त्री असूनही मला अशा स्त्रियांचा राग येतॉ.
10 Dec 2014 - 7:31 pm | टवाळ कार्टा
\m/
10 Dec 2014 - 5:07 pm | रुस्तम
>>>लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले <<<
12 Dec 2014 - 7:24 pm | डॉ सुहास म्हात्रे
लगेच विचारायचे...तुमच्या पालकांनी काय पाप केलेले
+१००
12 Dec 2014 - 5:47 pm | भिंगरी
पापाचा स्त्री जन्माशी संबंध असेल तर,
जगात इतक्या महान स्त्रिया जन्माला आल्या त्यांच्या पालकांनी काय केले असेल?
<<<<<< पाप की पुण्य? >>>>>>
12 Dec 2014 - 7:18 pm | आनन्दा
मला मुलगी झाली तेव्हा मी न्युट्रल होतो.. मला मुलगा हवा - मुलगी हवी असे काही नव्हते.
पण ते नवजात बाळ पाहिले आणि म्हणले गेले सगळे खड्ड्यात - हे बाळ आपले आहे हे महत्वाचे. मुलगा की मुलगी हा विचार करण्यात काय अर्थ?
12 Dec 2014 - 8:09 pm | भिंगरी
आनन्दा!!!!!!!!
ते नवजात बाळाच साजरं गोजरं रुपडं पाहीलं की सार काही विसरून जातो आपण.
13 Dec 2014 - 1:03 am | अर्धवटराव
आमच्या चिंरजीवांच्या आगमनावेळी आमची परिस्थिती मोठी विचित्र होती. मुलगा झाला तर आनंद, मुलगी झाली तर अत्यानंद. मुलीकरता आमचा कल जास्त होता. पण च्यायला, आमच्याच (म्हणजे माझ्या) टारगटपणाने पुनर्जन्म घेतला :D
मुलगी दत्तक घ्यावी म्हणुन बराच प्रयत्न केला... पण आपल्याक्डे दत्तक प्रोसेस पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे :(
13 Dec 2014 - 1:13 am | मुक्त विहारि
....पालकांना डिस्करेज करायला बनवली आहे कि काय कोण जाणे?
सहमत आहे...
पण बर्याच वेळा काही वेगळ्या कारणांमुळे पण कुणी दत्तक मुले-मुली घेत असतील तर? कदाचित तसे होवू नये म्हणूनच ती "दत्तक" प्रक्रिया किचकट करून ठेवली असावी.
ह्या "दत्तक प्रक्रियेशी" कुणी संबंधीत मिपाकर असेल तर तो जास्त माहिती देवू शकतो.
13 Dec 2014 - 1:20 am | सखी
हो मुलं योग्य घरी जावीत, मधल्यामधे भलतीकडे जाऊ नयेत म्ह्णुन ब्-याच देशात नियम गेल्या काही दशकांमध्ये कडक केले आहेत, पण मुलांच्या भविष्याचा विचार करता ते आवश्यक आहेत असेच वाटते.
अभिजित यांची ही मालिका जरुर वाचा दत्तकविधान-१, बहुगुणींनी पहिल्याच भागाच्या प्रतिसादात पुढच्या सगळ्या भागांच्या लिंक्स दिल्या आहेत.
13 Dec 2014 - 1:25 am | मुक्त विहारि
धन्यवाद...
13 Dec 2014 - 1:45 am | अर्धवटराव
त्या संदर्भातल्या गुन्ह्यांविषयी वाचलं आणि ते नियम योग्यच वाटले... पण मुलीची हौस तशीच राहिली :(
13 Dec 2014 - 1:13 am | मुक्त विहारि
अभिनंदन..
13 Dec 2014 - 12:13 pm | भिंगरी
धन्यवाद!!!!!!!!!! अर्धवटराव आणि मु.वि.
मला मुलींची हौस आहे,ती मी ४ पुतण्यांमध्ये भागवली.आता त्या लग्न होउन एक एक मुलांच्या आई झाल्या आहेत मग मी माझी हौ आमच्या सोसायटीतील गुरख्याच्या मुलीला कपडे, खेळणी देउन भागवत होते.तीही आता मोठी होत चालली आहे. पण आता माझ्याकडे हक्काची नात आली आहे.ती आल्यावर माझे मिपा मिपा खेळ खेळणे कमी होईल.
13 Dec 2014 - 4:59 pm | तुषार काळभोर
आम्हाला तर मुलगी होणार याची इतकी खात्री होती, की मुलीचं नाव पण ठरवून ठेवलं होतं...मुलगा झाल्यावर काय नाव ठेवायचं याचा विचारही केला नव्ह्ता!!
.
.
.
३ महिने नावनोंदणी पण केली नाही, नाव ठरलं नसल्याने..
14 Dec 2014 - 5:02 pm | बोका-ए-आझम
:)
14 Dec 2014 - 5:44 pm | जेपी
भिंगरी आज्जे आभिनंदन.
अवांतार-आज्जे जरा जरा गरगरायच कमी कर... *biggrin*
14 Dec 2014 - 8:22 pm | भिंगरी
धन्यवाद!!!!!!!!!! बोका-ए-आझम, जेपी
आज्जे जरा जरा गरगरायच कमी कर...
म्हणजे नक्की काय करू?
15 Dec 2014 - 12:00 pm | असंका
कोल्हापूरच्या होय आपण? आम्ही पण....
मला पण एक लेक आहे आणि गंमत म्हणजे तिचे नाव राधा या अर्थी अनया असे ठेवले आहे. तिचा जन्मच गोकुळाष्टमीचा. त्यामुळे.
15 Dec 2014 - 12:03 pm | भिंगरी
मी नाही,सून कोल्हापूरची आहे,सध्या माहेरी आहे.
15 Dec 2014 - 12:07 pm | असंका
करेक्ट...! म्हणून कोल्हापुरात बारसं...
अभिनंदन राहिलेच...
हार्दिक अभिनंदन!
15 Dec 2014 - 12:09 pm | भिंगरी
धन्यवाद!!!!!!!!!!
कं.अ.