नुकतेच एक पुस्तक हाती आले.आजकाल पुस्तके घरी येत असतात, पण वाचायला वेळ मिळेलच असे नाही. मिळाला तरी सलग पुस्तक वाचुन होत नाही. रोज थोडे थोडे वाचुन लिंक लागतेच असे नाही.तरी वाचायची हौस काही जात नाही. जित्याची खोड....
तर ह्या पुस्तकाचे नाव निसर्गपूर्ण. कोणी एक लेखक नाही पण दोन संपादक. पुस्तकाची टॅगलाईनच सांगते की निसर्गाच्या विशिष्ट पैलूंचे अभ्यास आणि जतन करणार्या निसर्गप्रेमींचे आत्मकथन.पुस्तक हाती आले आणि एकामागुन एक प्रकरणे वाचत गेलो. प्रत्येक प्रकरणाचा लेखक त्याच्या विषयात मास्टर. कोणी निसर्गमित्र,पर्यावरणस्नेही, कोणी प्राणीअभ्यासक,वनस्पतीशास्त्रज्ञ,फॉरेस्ट ऑफिसर, कोणी देशोदेशीच्या विविध प्रकल्पांमध्ये काम केलेला,कोणी आपल्याच पदराला खार लावुन नोकरीधंद्याचा व्याप सांभाळुन काम करणारा तळमळीचा कार्यकर्ता एक ना अनेक.
नुसती नावांची यादी बघितली तरी कल्पना यावी. ऑलिव्ह रीडली जातीच्या कासवांचे संवर्धन करणारे भाउ काटदरे, वनस्पतीतज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर,बँकेची नोकरी सांभाळुन पक्ष्यांच्या २००च्या वर प्रजातीं चा डेटा गोळा करणारे शरद आपटे,कास पठार आणि राधानगरी जंगल वाचवण्यासाठी झटणारे मधुकर बाचुळक र प्राण्यांच्या पोटातील परजीवींवर संशोधन करुन महत्वाचे निष्कर्श काढणारे मिलिंद वाटवे आणि सर्पतज्ञ अनिलकुमार/निलमकुमार खैरे असे अनेक.
माझे या सगळ्या बाबतचे ज्ञान अगाध असल्याने पुस्तकाचे फार डीटेल्स ईथे देउ शकत नाही आणि तसेही हे सर्व पुस्तकातच वाचण्याएव्हढे रंजक आहे.एक मात्र आहे की मेडीकल,इंजिनीअरींग,सी.ए. आणि तत्सम "चलती" विषय सोडुन ईतर क्षेत्रांमध्ये भरपूर वाव आहे आणि त्यात वर्षानुवर्षे काम करणारे आणि जागतिक पातळीवर मान मिळवलेले लोकही आपल्या आसपास आहेत हे अशी पुस्तके वाचुन समजते.
कधीकाळी मी सुद्ध बी. एस्सी नंतर एम.एस्सी करण्याचे स्वप्न पाहात होतो आणि अशाच एखाद्या विषयात झोकुन देउन काम करु ईच्छीत होतो.पण मार्केट डिमांड म्हणा, विचारात बदल म्हणा किंवा मार्गदर्शनाचा अभाव म्हणा ईंजिनीअरींग केले आणि पोटापाण्याला लागलो.
मात्र अशी पुस्तके वाचनात येतात आणि मना पासुन वाटते आयला लाईन चुकली राव!!!
प्रतिक्रिया
6 Dec 2014 - 1:40 pm | सविता००१
कित्ती वेळा असंच वाट्तं खरं!
वाचलंच पाहिजे हे पुस्तक!
6 Dec 2014 - 2:09 pm | सस्नेह
छान आहे.
प्रकाशक कोण सांगाल का ?
6 Dec 2014 - 4:43 pm | खेडूत
ऊर्जा प्रकाशन
यात निसर्गावर अपार पण जागतं प्रेम करणारी आपल्याच अवतीभवतीची माणसं आपापली गोष्ट सांगत आहेत. त्यांचं निसर्गावरचं प्रेम बहुमुखी आणि सखोल तर आहेच पण ते विज्ञानाचा हात धरून विकसित होत गेलं आहे. त्यामुळं, त्याचं मोल कितीतरी अधिक. या पुस्तकात आपले अनुभव लिहिलेल्या या निसर्ग-आचार्यांमध्ये प्रकाश गोळे, प्रकाश आमटे, प्र. के. घाणेकर, मिलिंद वाटवे, भाऊ काटदरे, किरण पुरंदरे, श्री. द. महाजन यांच्यासारखे ज्येष्ठ आहेत, तसेच अभय शेंड्ये, अपर्णा वाटवे, केतकी घाटे, मानसी करंदीकर यांच्यासारखे तरुणही.
संपादन : श्रीनिवास पंडित. संकलन : राजीव पंडित
7 Dec 2014 - 12:46 pm | राजेंद्र मेहेंदळे
प्रतिसाद द्यायला उशीर झाला. खेडुत ह्यांनी दिलेले डिटेल्स बरोबर आहेत.
6 Dec 2014 - 4:46 pm | सत्याचे प्रयोग
बायको बाबतही असेच होते का?
6 Dec 2014 - 5:56 pm | विवेकपटाईत
लग्नाला २८ वर्षे झाली तरी ही असेच वाटते....
6 Dec 2014 - 10:32 pm | hitesh
बैकोलाही असेच वाटaत असेल का ?
6 Dec 2014 - 10:48 pm | मुक्त विहारि
सध्या तरी पुस्तक विकत घेणे हाच पर्याय शिल्लक आहे.
7 Dec 2014 - 2:24 pm | सतिश गावडे
पुस्तक मिळवून वाचेन तसंच "आपली लाईन चुकली" असं वाटून दुसर्यांच्या "लाईनमध्ये" काम करणार्यांबद्दलही आदर आहे.
मात्र दुसर्याच्या "लाईन"बद्दल ओढ वाटल्यानंतरही आपली लाईन चुकली असं न वाटणारेही खुप आहेत. एखाद्या प्रज्ञावंताला एकाच वेळी अनेक क्षेत्रांचा ओढा असेल तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही.
वल्लीसोबत जेव्हा कधी लेणे, गड आणि किल्ले पाहायला बाहेर जतो, तिथल्या दगडाच्या मूर्त्यांबद्दल जेव्हा त्यांच्या शैलीबद्दल, त्यांच्या निर्मितीकाळाबद्दल, त्या शिल्पांमागच्या मिथक कथांबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा आम्हालाही वाटते की याची "लाईन" चुकली की काय.
दुसर्या दिवशी पहाटे वेरुळला जायचे म्हणून एके दिवशी वल्लीच्या घरी मुक्कामाला गेलो होतो. रात्री जेवता जेवता काकू आपल्या "दगडवेडया" मुलाला म्हणाल्या, "तू पुरातत्व खात्यात नोकरी का पाहत नाहीस?". मात्र स्वतः वल्लीच्या बोलण्यात तो त्याच्या सध्याच्या नोकरीबाबत समाधानी नाही असं कधीच आलं नाही. उलट तो त्याचं काम आनंदानं करतो. :)
7 Dec 2014 - 4:19 pm | नाखु
आपल्या "दगडवेडया" मुलाला हे असे द "गडवेडया" मुलाला
द्=इन्ग्लिश द