हिंदू दहशतवाद

कवटी's picture
कवटी in काथ्याकूट
1 Nov 2008 - 4:16 pm
गाभा: 

दहशतवाद तसा भारताला नविन नाही. गेली कित्तेक वर्ष आपण दहशतवाद पहातोय्/झेलतोय. कुठेही दहशतवादी हल्ले झाले, बाँबस्फोट झाले की "दहशतवादी कुठल्याही जातीचा/धर्माचा नसतो, दहशतवाद हाच त्याच धर्म" असे सांगणार्यांची चढाओढ लागते. मात्र गेले काही दिवस मालेगाव बाँबस्फोटा बद्दल अटक झालेले साध्वी प्रज्ञा, मेजर उपाध्ये आणि कुलकर्णी यांचा उल्लेख विविध वाहिन्यांवर सतत "हिंदू-दहशतवादी" असा केला जातो. ते दहशतवादी आहेत वा नाहीत हा विषय वेगळा. पण जेंव्हा खास धर्मासाठीच म्हणून दहशतवाद पसरवणारा विशिष्ठ गट जात्/धर्म विरहीत मानायचे आणि याना मात्र "हिंदू-दहशतवादी " म्हणायचे हे कितपत पटते?

या विषयावर आजचा सामनाचा अग्रलेख बोलका आहे. सैन्यातील अधिकार्‍याना असे दहशतवादी ठरवण्यामागे व्यापक कट आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
मिपाकर सदस्य यावर( आपापले FBI, CBI, ISI, CIA, मोसाद इ. काँट्याक्ट्स वापरुन माहिती मिळवून) प्रकाश टाकतील काय?

प्रतिक्रिया

अनामिका's picture

1 Nov 2008 - 6:53 pm | अनामिका

बाळासाहेब सामनामधे लिहित नाहीत हे सत्य असले तरी आज छापुन आलेला लेख अत्यंत योग्य असाच आहे.बाळासाहेब ही भुमिका घेतील ही अपेक्षा होतीचपण शस्त्र उचलण्यावाचुन दुसरा पर्याय जर हिंदुंना आत्मरक्षणासाठी उरला नसेल तर काय करावे ?
पुढिल वर्षी अपेक्षित असलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि सद्य परिस्थितीत काँग्रेसला सत्तेतुन पाय -उतार होण्यावाचुन दुसरा पर्याय नसल्याचे लक्षात घेता आणि या अनुशंगाने विचार करता हिंदुत्ववादी संघटनां व मुख्यत्वे करुन अखिल भारतिय विद्यार्थि परिषदेचा संबंध प्रकरणाशी जोडला जाणे हे सगळे अतिशय संशयास्पद वाटते. आणि त्याही पेक्षा काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हे प्रकरण उघडकीस येणे ,शिवाय ११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमधे झालेले बाँबस्फोट व त्यामधे आधी एटिएस ने पकडल्यालेल्या आरोपीं बद्दल निर्माण झालेला संशय या सगळ्या पार्श्वभुमीवर विचार करता हे जरा पचनी पडण कठिण आहे.
काही ही व कसेही करुन भाजपा आघाडिला सत्तेत येण्यापासुन रोखण्यासाठीचे हे कारस्थान नसेल कशावरुन? ज्या देशात आय बी वर रॉ सारख्या गुप्तहेर संघटनांचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी करुन घेणारे राजकिय पक्ष असल्यावर काहीही होवु शकते. शेवटि काय तर पोलिस देखिल हुकमाचे ताबेदार आहेत या देशात्?स्वतःच्या सदसदविवेक बुद्धिला स्मरुन काम करणार्‍या अधिकार्‍यांची संख्या नगण्य आहे. चुकुन -माकुन जर यात तथ्य अढ्ळलेच तर त्यांना देखिल तोच न्याय द्यावा .कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे.आणि इस्लामच्या नावाखाली कत्तली करणारे आणि हिंदुत्ववादाचा प्रसार आणि प्रचार करणारे यात मुलभुत फरक हा असायलाच हवा. "एकाने गाय मारली म्हणुन दुसर्‍याने वासरु" मारण्यात काय अर्थ आहे. पण मला मनातुन वाट्ते आहे की हे सगळ हेतुपुरस्सर घडवुन आणण्यात येत असावे.
मुसलमानांना दुखवणे परवडणारे नाही या सुडोसेक्युलर पक्षांना ?ज्या लोकांनी या देशाला स्वातंत्र्य गांधि आणि नेहरु यांच्या मुळेच मिळाल्याच गोबेल्स प्रचार गेली साठ वर्षे केला त्यांच्याकडुन कुठल्याही चांगल्या गोष्टिची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.या जगात स्वतःचा धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे जसा तो मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना आहे तसाच तो हिंदुना देखिल आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!१
"सावरकरांचे हिंदुत्व मानणारी"
"अनामिका"
अनुदिनी-
http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2008 - 7:56 pm | llपुण्याचे पेशवेll

अनामिकाताईंशी सहमत.
अजून एक. जेव्हा जेव्हा दिल्लीश्वरांना फाट्यावर मारून मराठी माणसानी प्रयत्न केले आहेत तेव्हा तेव्हा मराठी माणूसच धर्मोध्दारक आणि देशोद्धारक ठरला आहे.
पुण्याचे पेशवे

भास्कर केन्डे's picture

1 Nov 2008 - 8:34 pm | भास्कर केन्डे

अनामिका ताईंशी सहमत.

वर्षानुवर्षे मुस्लिम अतिरेक्यांना पाठिशी घालणारे या प्रकरणात मात्र आरोप सिद्ध व्हायच्या अगोदर पासूनच "हिंदू अतिरेकी, हिंदू अतिरेकी" असा वारंवार उल्लेख करत आहेत यावरुन काहीतरी कट कारस्थान असल्याचा दुर्गंध येत आहे हे नक्की. पण वेताळ म्हणतात तसे प्रतिक्रिया द्यायला थोडी वाट पहावी लागेल. अर्थात वाट पहावी का नाही असा रास्त प्रश्न हिंदूंसमोर आहे. कारण शंकराचार्यांच्या अटकेत राजकारण असतानाही बहुतेक हिंदूंनी तपास पूर्ण होऊ द्यावा असा पवित्रा घेतला होता. काय झाले त्याचे??

आपला,
(प्रश्नांकित) भास्कर
आम्ही येथे वसतो.

तपास चालु आहे. परंतु अटकेपाठीमागे काहातरी शिजत आहे नक्की.
वेताळ

कवटी's picture

1 Nov 2008 - 9:11 pm | कवटी

कोणतेही मत व्यक्त करणे घाई चे ठरेल

अहो वेताळभौ,
ते अतिरेकी/दहशतवादी आहेत की नाही हे न्यायव्यवस्था ठरवेलच हो.
पण इतर दहशतवादी निधर्मी आणि हेच तेवढे हिंदू दहशतवादी ! हे कसे काय ?

(लालभाईंची रिकामी) कवटी

अभिजीत's picture

1 Nov 2008 - 10:10 pm | अभिजीत

दहशतवादी कारवायांमधे संशयित म्हणून हिंदु धर्मातले लोक सापडले ही बातमी मुळात सनसनाटी आहे.
याचा उपयोग राजकारणातले हिशोब चुकते करण्यासाठी करता येउ शकतो हे उघड सत्य आहे.
काँग्रेसी/डाव्या राजकारणाला अतिशय उपयोगी पडणारा हा मुद्दा आहे.

अर्थात हे 'हिंदु दहशतवाद' वगैरे मुद्दे फार ताणता येणार नाहीत याची जाणिव प्रमुख राजकिय पक्षांमधे असावी. कारण राजकारणातून हा मुद्दा सरकारच्या निर्णयात उतरला तर त्याचे परिणाम भयंकर होउ शकतात. एकदा दहशतवादाला धार्मिक रुप दिले तर धर्माधिष्टीत संघटना दहशतवाद विरोधी कायद्याच्या अंतर्गत आणाव्या लागतील आणि त्यातुन जनमत कोणत्याही सरकारविरोधी जाउ शकते.

त्यामुळे संशयितांच्या धर्माचा राजकिय फायदा मिळवण्यापुरते हे प्रकरण तापवले जाइल आणि नंतर याला बगल दिली जाइल असे वाटते.

अर्थात या निमित्ताने मीडिया निष्पक्ष नाही हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.

तसेच, गेल्या काही दहशतवादी हल्ल्यात स्थानिक पातळीवरचे लोक सहभागी होताना दिसत आहेत हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. 'हल्ल्यांमधे परकीय शक्तीचा हात आहे' हे पालुपद कमी झाले आहे हे लक्षात घ्यावे. त्या परकीय शक्तिने आपले हातपाय आता मालेगाव, जयपुर, सुरत वगैरे शहरापर्यंत पसरले आहेत हा यातला सर्वात वाढता धोका.

- अभिजीत

नेटकिडा's picture

2 Nov 2008 - 12:01 am | नेटकिडा

काँग्रेसी/डाव्या राजकारणाला अतिशय उपयोगी पडणारा हा मुद्दा आहे.

काँग्रेसची निवडणुकीची तयारी चालु झाली.

निखिलराव's picture

3 Nov 2008 - 4:47 pm | निखिलराव

काँग्रेसची निवडणुकीची तयारी चालु झाली.
१००% सहमत...

अनामिका's picture

23 Nov 2008 - 1:23 am | अनामिका

या व अश्याच प्रकारच्या प्रकरणांवर प्रकाश टाकणारे काही लेख
http://www.rediff.com/news/2008/oct/27tarun.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3706065.cms
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3720348.cms

"अनामिका"

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jul 2012 - 12:30 pm | परिकथेतील राजकुमार

आसामच्या बातम्या वाचताना सहज ह्या लेखाची आठवण झाली.

कवटी's picture

3 Aug 2012 - 2:59 pm | कवटी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15333089.cms
मटाची ही बातमी बघा.
मुजाहिदीन की हिंदुत्ववादी?

मुजहिद्दीनचे नाव घेतोस तर मग ज्या हिंदू संघटना असे बाँब फोडू शकतात त्यांची नावे घे ना...
सरसकट सगळे हिंदूत्ववादी का?
नाहीतर मग सरळ " बाँबस्फोटा मागे कोण? मुसलमान की हिंदू?" असे छाप.
त्यावेळी शेपूट उलटी तोंडापर्यंत येते......