पुण्यावर जळु नका

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
17 Oct 2014 - 5:42 pm
गाभा: 

आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही. आपल्याकडच्या 'मत्सर ' ह्या शब्दाला इंग्रजीत 'एन्वी' असे म्हणतात, पण 'जळणं' या शब्दाला न्याय देऊ शकेल असा पर्याय नसावा. 'जळणं' हा मनुष्यप्राण्याचा बेसिक इनस्टीक्ट असावा नव्हे तो तर तो आपल्या जीन्समधे आदिमकाळापासून एम्बेड झाला असावा. म्हणूनच तर शेजाऱ्याकडे नवं मॉडेल आलं की, आपल्याकड 'बेबी हमारी बडी गाडी अब बडी नही रही ' असं झाल्यावर लगेचच 'बेच दे' म्हणून मोकळे. लहानपणापासून म्हातारे होईपर्यंत आपण कोळसा होईपर्यंत जळत असतो. अशा वेळेस 'जळणं'च्या सैतानाला हरवण्यासाठी प्रभूचा मुलगा आठवतो. 'लव दाय नेबर' म्हणणारा, मूतिर्मंत करुणा येशू ख्रिस्त. आपलं जळणं संपवायचं, असं म्हणून काही होणार नाही. मत्सराला प्रेमाची रिप्लेसमेण्ट द्यायला हवी. प्रकाश आला की अंधार आपोआप जातोच. 'दुनियावालोदूर जलनेवालोंसे दूर' असं दूर दूर फक्त गाण्यातच जाता येतं. वास्तवात नाही. पण स्वत:तलं 'जळणं' संपवलं, थोडं मन मोठं केलं, की मग त्याची गरजही उरत नाही. कारण आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही.

प्रतिक्रिया

यसवायजी's picture

17 Oct 2014 - 5:44 pm | यसवायजी

अप्पर सर्कीट लावण्यात यावे.

बॅटमॅन's picture

17 Oct 2014 - 5:56 pm | बॅटमॅन

सहमत.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2014 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

कचकुन सहमत! ;-)

अप्पर लोवर सर्किट अप्लीकेबल नाही इथे, फंडामेंटल मजबूत आहे, शिवाजी महाराजांनी आय पी ओ आणला तेंवा पासूनच स्क्रिप्ट अप ट्रेंड मध्ये आहे, बाजीरावाने जबरदस्त ग्रोथ आणली पुढे, महात्मा फुले, आगरकर नी अकौन्तेबिलीती व सोशल रेस्पोन्सिबिलीती रेशो उत्कृष्ठ पातळीवर नेउन ठेवला.
म्हणून हि स्क्रिप्ट पोर्टफ़ोलिओ मध्ये असावी.

कुठल्या पिक्चरच्या 'स्क्रिप्ट' बद्दल बोलत आहात? की आपल्याला 'स्क्रिप' असे म्हणायचे आहे?

पगला गजोधर's picture

18 Oct 2014 - 12:50 pm | पगला गजोधर

'स्क्रिप' असे म्हणायचे आहे,प्रतिसाद वाचकांनी 'स्क्रिप' असेच रेट्रोस्पेक्तीव इफेक्टने समजून घ्यावे, अशी विनंती.

कपिलमुनी's picture

17 Oct 2014 - 6:02 pm | कपिलमुनी

लोअर सर्किट्च लागणार ..भाव नाय राहिला पयल्यासारखा

जेपी's picture

17 Oct 2014 - 6:04 pm | जेपी

सहमत.

स्वामी संकेतानंद's picture

17 Oct 2014 - 6:07 pm | स्वामी संकेतानंद

हरि ओम!

होबासराव's picture

17 Oct 2014 - 6:09 pm | होबासराव

>"प्रकाश आला की अंधार आपोआप जातोच. 'दुनियावालोदूर जलनेवालोंसे दूर' असं दूर दूर फक्त गाण्यातच जाता येतं. वास्तवात नाही. पण स्वत:तलं 'जळणं' संपवलं, थोडं मन मोठं केलं, की मग त्याची गरजही उरत नाही. कारण आपल्याकडे एखादी गोष्ट नाही, म्हणून स्वत:ला अपूर्ण मानत असू. तर ती असतानाही आपण पूर्ण बनू शकत नाही."
चला थोडी प्रगति आहे बट स्टील देअर इज रुम फोर मोर इम्प्रुवमेन्ट...

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Oct 2014 - 6:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

१९ तारखेची पहाट उगवेस्तोवर काही खरे नाही...
पुण्यावर धागे काढणर्यांनी तोवर जरा कळ काढावी असे म्हणते.

होबासराव's picture

17 Oct 2014 - 6:27 pm | होबासराव

नाना आणि माई दोन्हि आय डि लॉगिन आहेत... एक प्रतिसाद एका आयडि ने तर त्याच्या विपरीत प्रतिसाद दुसरया आय डि ने....खेळ मांडला ~ ~ ~

कोण जळतंय आमच्या पुण्यावर म्हणून बाह्या सरसावून आलो होतो. पण धागा बघून एक पुणेकर म्हणून ... वगैरे वगैरे.

सूड's picture

17 Oct 2014 - 8:44 pm | सूड

वशाडी येवो !!

पैसा's picture

17 Oct 2014 - 10:19 pm | पैसा

पुण्यावर जळू नका म्हणताय खरे, पण तुम्ही पुणेकर दिसत नाही.

पुणेकर होण्याची सुप्त इच्छा असेल त्यांची ;)

पगला गजोधर's picture

17 Oct 2014 - 11:26 pm | पगला गजोधर

आपणास काय ठावे ? कि आम्ही कुठचे ?

अस्सलं पुणेकर अशी छपरी 'उत्तर' घेऊन कधीच धावत येणार नाही.. असो, अभ्यास वाढवा!

असो पुण्यावर जळु नका, म्हणजे झाले.

अलिबाग :)

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 4:03 am | सतिश गावडे

तुम्ही अलिबागचे नसाल तर अलिबागला नाव ठेवायचे कारण नाही.

अलिबाग आमच्या रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. (निदान वेगळा दक्षिण रायगड जिल्हा होईपर्यंत तरी ;) )

आम्ही हिंगण्यात राहत असल्यामुळे पुणेकर आम्हाला हींग लावून विचारत नाहीत.

वडगाव, धायरी, नर्हे, आंबेगाव, वारजे आणि उत्तमनगर- शिवणे सह "नवे पुणे" शहर झालेच पाहीजे.

पगला गजोधर's picture

18 Oct 2014 - 8:24 am | पगला गजोधर

बर अलिबागवरपण जळू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 9:43 am | अत्रुप्त आत्मा

@जळू नका >>> काय जळजळीत धागा आहे नै!??? :-D

पैसा's picture

18 Oct 2014 - 4:04 pm | पैसा

खरा पुणेकर जळू नका म्हणायचा नाही. उलट त्याला लोक जळतात म्हणून आनंद वाटेल. शिवाय "आणखी लाकडे आणू का?" असेही तो विचारू शकतो.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Oct 2014 - 11:25 am | अविनाशकुलकर्णी

काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की काही जण ( पुणेरी भाषेत "अजाण बालके" ) कधी कधी असा इतका फालतू प्रश्न विचारतात की " तुम्हाला पुणे का आवडते ?"

आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..?

आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने ,
पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !

उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे
( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .,

गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे
( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. ,

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,
जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,
मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,
लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,
शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,
पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,
'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,
इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,
'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे ,
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे ,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे ,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे ,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,

नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि
चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या
आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे
पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,

- नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!

आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

आता मग मी विचार केला की एका छोट्या उत्तरात सांगून टाकावे कि बुवा आम्हाला पुणे का आवडते..?

आमच्या कडे मुद्दाम मराठीत बोला म्हणून कधी सांगावे लागत नाही, True freedom of thoughts , म्हणून प्रत्येक जण आपले स्वतः चे मत मांडू शकतो, आणि ते सुद्धा सर्वांना पटेल अशा पद्धतीने ,
पुण्यात काही उणे नाही वगेरे ठीक आहे , पण पुणे आवडायला काहीतरी कारणच हवे असे मला वाटत नाही !

उन्हाळ्यातले काही दिवस ( रात्री नव्हे) सोडले तर उरलेल्या दिवसात असलेले cool पुणे ,
किरकोळ पानझडीचे दिवस सोडले तर हिरवे असलेले पुणे,
पावसासाठी थेट लंडन शी comparison होणारे एकमेव शहर म्हणजे पुणे
( अहो कधी पण येऊ शकतो आणि या चौकात असेल तर पुढच्या चौकात पण असेल याची काही ग्यारंटी नसते म्हणून .,

गिनीज बुकाला सुद्धा नोंद करायला लागली असे आमचे Two Wheelers चे पुणे
( आणि ते चालवणारे आम्ही धन्य पुणेकर .. ,

सोन्याच्या फाळाने नांगरलेले शिवबाचे पुणे,जीजाउंच्या नजरेत भरलेले पुणे,मालुसर्यांच्या 'सिंव्हा' सारख्या मर्दानगी चे पुणे,
पेशव्यांच्या 'सर्व' पराक्रमांचे पुणे ,लाल महालात 'तोडलेल्या' बोटांचे पुणे,शनिवार वाड्यात 'सांडलेल्या' रक्ताचे पुणे,
अटके पार लावलेल्या झेंड्याचे पुणे,पानिपतात तुटलेल्या स्वप्नाचे पुणे,'ध' चा 'मा' केलेल्यांचे पुणे ,
'न' ला 'न'च आणि 'ण' ला 'ण'च म्हणणारे पुणे ,इथून तिथवर असलेल्या पुलांचे पुणे ,'कोटी'सूर्य असलेल्या पु.लं. चे पण पुणे ,
नावात इंग्लिश असून सुद्धा मराठीतच शिकवणाऱ्या रमण बागेतले आणि टिळक रोड वरचे पुणे ,
सव्वाशे दीडशे वर्षांपासून अखंड पुणेकर घडवणाऱ्या नु म वि, भावे स्कूल चे पुणे ,
आब आणि रुबाब वाल्या बिशप्स लॉयलाज मिराज आणि हेलेनाज चे पण पुणे,
SP , FC , BVP , SIMBY ,MIT आणि वाडिया चे पुणे ,
आणि त्यातल्या तोंडाला रुमाल लावून ( की बांधून?) Two Wheeler वाल्या पुणे RTO कडून License to kill इशू करून घेतलेल्या जगातल्या सर्वात सुंदर मुलींचे पुणे ,
Info Tech park चे पुणे, Koregaon Park चे पुणे, कॅम्पातल्या श्रूजबरी वाल्या कयानींचे पुणे,
चितळ्यांच्या बाकरवडी चे पुणे,वैशाली च्या yummy सांभार चे पुणे,रुपालीच्या भन्नाट कॉफी चे पुणे,
तुळशीबागेतल्या स्वस्ताई चे पुणे आणि कधी कधी Shoppers Stop ,Lifestyle आणि Central चे पुणे,
college बंक मारून अलका नीलायम आणि मंगला चे पुणे,
Office मधून गायब होऊन तिच्या सोबत चे Adlabs आणि R Deccan वाले पुणे ,
पगडी आणि पुणेरी जोड्यांचे पुणे,Nike आणि Reebok वाले पण पुणे ,
खास बेडेकर, श्री आणि कधी कधी रामनाथ च्या मिसळीचे पुणे,आणि JM Road च्या Mac आणि KFC चे पुणे,
कधी कधी वोहुमन च्या चीज ओम्लेट आणि गुड लक च्या मस्का पाव विथ cutting चे पुणे ,
कॅड बी आणि कॅड एम चे पुणे,सोडा शॉप चे पण पुणे,अभिनव चे एकदम हटके कलाकारी पुणे,
University मध्ये शिकणार्यांचे पुणे आणि University च्या जंगलात 'दिवे लावणार्यांचे' पुणे ,
कधी ही न थकणाऱ्या लक्ष्मी रोड, MG रोड आणि Hongkong गल्ली चे पुणे
( तिथली साधी डोक्या ची पिन सुद्धा HONGKONG वरून येत नाही .. ,

नेहमी निवांत असणाऱ्या पाषाण रोड आणि नालाह पार्क चे पुणे,
खवय्यांसाठी जीव देणाऱ्या German Bakery चे पुणे,
आणि चवी साठी जीव टाकणाऱ्या खवय्यांचे पुणे,
शनिवार वाड्याने नाकारून सुद्धा जिला तमाम पुणेकरांनी हृदयात स्थान दिले त्या तेव्हाच्या सुंदर आणि आत्ताच्या थंडगार मस्तानीचे पुणे,
बादशाही,जनसेवा आणि आशा च्या Veg 'थाळी' वाले पुणे ,Friday Night ला Blue Nile ,तिरंगा आणि एसपी ज च्या 'नळी' वाले पुणे,
सदशिवातल्या बिनधास्त Nonveg वाले पुणे,आणि रमझान मधल्या त्या मोमीनपुर्यातले रात्रीचे लजीज पुणे,
मस्त पैकी दहा बारा दिवस कल्ला करणाऱ्या आमच्या गणपती बाप्पांचे पुणे,
पुण्याच्या ढोलांचा 'आव्वाज' जगात पसरवणाऱ्या आमच्या अजय - अतुल चे पुणे ,
आमच्या डोंगरांवरच्या पर्वती,तळजाई आणि चतुश्रुंगी चे पुणे,
आमच्या पेठांमधल्या थोरल्या आणि धाकट्या शेख सल्ल्यांचे पुणे,
Synagogue चे लाल देऊळ करणार्यांचे पुणे, शिकणाऱ्यांचे पुणे आणि
चांगलेच शिकवणाऱ्यांचे पण पुणे,'सरळ' मार्गी प्रेमिकांच्या 'Z' bridge चे पुणे,
मुंबईकर पेन्शनरांचे पुणे आणि... देशाचा defense शिकवणाऱ्या आणि करणाऱ्या
आमच्या Southern Command चे पुणे,तुकोबा आणि ज्ञानोबाच्या पालखी चे पुणे,
बेचाळीस किलोमीटरच्या Marathon चे पुणे,स्पोर्ट्स City पुणे, कधी कधी pot holes वाले पण पुणे,
सगळी कडे खोचक पाट्या लावून शहाण्याला शब्दांचा मार देणारे पुणे,
ताजमहाल पाहून सुद्धा "बरा बांधलाय पण मेलेल्या बायको साठी एवढा खर्च केलान " अशी तोंडभर स्तुती करणारे पुणे,
फटकळ , खवचट , उद्धट यांना विशेषण समजून छाती फुगवणारे पुणे ,
'इथे उचलून धरलं तर जगात कोणाची पडण्याची टाप नाही' अशी ख्याती मिरवणारे पुणे !,
०२० चे आणि MH "बारा" चे पुणे,आणि कधी कधी जुळे भावंड मानून घेणाऱ्या MH १४ चे पुणे ,
जोशी कुलकर्णी आणि नेन्यांचे पुणे,सणस शिरोळे दाभाडे आणि बहिरटपाटलांचे पुणे,
शेख खान आणि D 'souza ,D 'casta चे पण पुणे,
पेशवे पार्कातल्या पांढर्या मोराचे आणि वाघाचे पुणे,
आठवणींच्या बोगद्यातून अजूनही शिटी वाजवत जाणाऱ्या " फुलराणी ' चे पुणे ,
भक्ती मार्ग वरून जाताना अजूनही आठवणाऱ्या "त्या फुलराणी' चे पुणे,
ज्यांच्या कडून आयुष्यात एकदा तरी मुलाखत घेतली जावी अशा आमच्या सुधीर गाडगीळांचे पुणे,
अक्ख्या जगाला अभिमानाने नखं दाखवणाऱ्या गिनीज बुकातल्या चिल्लाळांचे पण पुणे ,
जादुई महालात राहणाऱ्या , सबंध जगाला मायाजालात मोहून टाकणाऱ्या प्रवासी जादुगार रघुवीरांचे
पुणे ,
अडीच किलो काचा खाणाऱ्या , १९४ कप चहा पिणाऱ्या , एका पायावर सलग ३५ तास उभे राहणाऱ्या ,
अखंड ७५ तास टाळ्या वाजवणाऱ्या आणि हे सर्व विक्रम ज्यात छापले त्या ७६० पानी गिनीज बुकालाच खाणाऱ्या अजब विक्रमादित्य धनंजय कुलकर्णींचे पुणे,
भरत, टिळक आणि बालगंधर्व चे पुणे,पुरुषोत्तम आणि फिरोदिया च्या जल्लोषाचे पुणे,
bollywood ला acting ची अक्कल शिकवणाऱ्या wisdom tree चे पुणे,
आणि जगभरातल्या फिल्म्स जपून ठेवणाऱ्या 'NFAI ' चे पुणे ,
काही गाण्याच्या तर काही निव्वळ खाण्याच्या रसिक "सवाई" चे पुणे ,
बाळासाहेबांच्या भाव सरगम चे पुणे,नुकत्याच मावळलेल्या स्वर भास्कराचे पुणे,
उगवती वरच्या ,वसंतरावांच्या तरुण वारशाचे पुणे ,पुरुष ते पुलोत्सावातल्या नाना चे पुणे,
घांशिराम कोतवालाचे पुणे आणि घांशिराम मधल्या नाना , डॉक्टर आगाश्यांचे पण पुणे ! ,
शुद्ध चारित्र्याच्या खलनायक निळू फुल्यांचे पुणे ,दादा कोंड्क्यांच्या त्यांच्या सोबतच गेलेल्या चैत्रबनाचे पुणे,
कपूर साहेबांच्या विस्मृतीतल्या राज बागेचे पुणे ,फक्त आठवणीत राहिलेल्या मिनर्वा, भानुविलास आणि नटराज चे पुणे,
आशियातल्या पहिल्या multiplex चे पुणे,

- नवरात्रीतल्या नऊ रात्री देवी पुढे घागरी फुंकणारे पुणे,
आणि 31 December आणि गटारी च्या रात्री रेकॉर्ड ब्रेक दारू बरोबर हुक्का अन बिड्या फुंकून फुल्टू Chill होणारे पुणे,
रात्री उशिरा सगळ्या रस्त्यांवरच्या मोकाट कुत्र्यांचे पुणे,जगातल्या सगळ्यात "प्रेमळ" आणि "स्वस्त" रिक्षांचे पुणे,
गोगलगायीशी स्पर्धा करणाऱ्या PMPML चे पुणे , प्र चंड बडबड करून समोरच्याला दमवणाऱ्यांचे पुणे आणि
कमीत कमी शब्दात प्रचंड अपमान करण्याचे सामर्थ्य बाळगणारे पुणे,
लग्नाची शान पुण्यातच असे म्हणणारे मंगल कार्यालयांचे पुणे,प्रत्येक पेठेतल्या खास पुणेरी मारुतींचे पुणे,
आमच्या केसरी सकाळ प्रभात आणि आता मटा , Mirror वाल्यांचे पुणे आणि आज का आनंद आणि संध्यानंद चे पुणे,
दसऱ्या ला गावभर गुबगुबीत झेंडू मिरवणारे पुणे… आणि Valentine day ला गुलाबाला दमवत झुलवणारे पुणे,
दिवाळीतल्या आतिषबाजी वाले पुणे,Christmas ला MG Road ला हौसे ने केक खाणारे पुणे,
भर उन्हात दुपारी सुद्धा अमृततुल्य मधला चहा पिणारे पुणे,
ऐन december च्या थंड रात्री Icecream किंवा Chilled Beer रिचवणारे पुणे,सुसाट गल्ली आणि बोळांचे पुणे,
Express highway ने निवांत मुंबईला जाणारे पुणे...पहिला सुपर कॉम्प्युटर बनवणारे पुणे,
आणि "आम्हाला कशाला लागतोय mobile ?" असे पण म्हणणारे पुणे,अक्ख्या भारताला हमारा बजाज पुरवणारे पुणे,
जगभरातल्या रस्त्यांवर धावण्यासाठी Merc,Volks Wagon आणि Jaguar बनवणारे पुणे,
सकाळ संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या थकलेल्या पायांचे पुणे,
Weekend ला सह्याद्री आणि वर्षातून एकदा तरी हिमालय तुडवणाऱ्यांचे पुणे,
पर्वती वर practise करून Everest ला गवसणी घालणारे पण पुणे !!
पावसातल्या सिंहगडावरच्या चहा आणि खेकडा भज्यांचे पुणे,उन्हाळ्यातल्या रसवंती गृहातल्या जम्बो ग्लास चे पुणे,
Saturday Night ला झिंग आणणाऱ्या pubs चे पुणे,Sunday ला सकाळी प्याटीस,पोहे आणि दुपारची निवांत झोप काढणाऱ्यांचे पुणे,
कसबा आणि गुरवारातल्या भावड्यांचे पुणे। सदाशिव, नारायण, शानिवारातल्या भाऊंचे पुणे। घोटाळे बाज खासदारांचे पुणे ,
नगर सेवक नावाच्या समाज कंटक जमातीचे पुणे ,
नवीन दादांचे पुणे,जुन्या भाईंचे पुणे,
बारा महिने २४ तास online असणारे , पण दुकाने मात्र दुपारी दोन चार तास बंद ठेवणारे , असे आमची कुठेही शाखा नसलेले एकमेव्द्वितीय पुणे !!

आता सांगा पुणं आवडायला हि कारणं सुद्धा खूपच कमी आहेत, आणि काही अजाण बालके एक फालतू प्रश्न विचारतात कि तुम्हाला पुणे का आवडते?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 11:58 am | अत्रुप्त आत्मा

कचाकुन्न मोठ्ठा कॉपी पेस्ट
वाचता वाचता आला फेस! :-D

चितळेंच्या समोरील रसवन्तीतील जम्बो ग्लास मधील रसाएवढा नितांत सुंदर प्रतिसाद देणाऱ्या अकुन्चे सुद्धा पुणे.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 1:12 pm | सतिश गावडे

लाल रंग छान उठून दिसतो आहे. एशियन पेंट्स का? किती डबे लागले?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

@लाल रंग छान उठून दिसतो आहे. एशियन पेंट्स का? किती डबे लागले?>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif__/\__http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-044.gif
@धन्या >>> तुला (तुझ्या :p ) जवळ रहाणार्‍या त्याचा गूण लागला.. http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-043.gif
हे वरील परतीसादातूण कचकूण जाणवत हाए! http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 3:24 pm | सतिश गावडे

नका हो बुवा बोलू असं.
तो नदीकाठाला राहणारा (नव)पुणेकर आहे.

दिसतोयन छान रंग, आवडला असेल तर त्याचा मुका घ्या, पण अगदी हिंगणे,वडगाव, धायरी, नर्हे, आंबेगाव, वारजे आणि उत्तमनगर- शिवणे सह पुण्यावर जळू नका.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 4:05 pm | सतिश गावडे

तुमच्यात रंग आवडला तर त्याचा मुका घेतात म्हणून इतरांनीही तेच केलं पाहीजे असं नाही. :)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2014 - 5:24 pm | अत्रुप्त आत्मा

@म्हणून इतरांनीही तेच केलं पाहीजे असं नाही.
http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif मेलो.... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif मेलो.... http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif
=====================================
आता तर माझी खात्रीच पटली... नक्कीच गुण लागला =)) केव्हढं स्फोटक वाक्य हे(ही!) =))

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 5:29 pm | सतिश गावडे

नक्कीच गुण लागला

ते माहिती नाही. मात्र त्यांच्या नदीच्या अल्ल्याड काठाला असलेल्या घरी कॉफी घेऊन आलो दुपारी. :)

जेपी's picture

18 Oct 2014 - 11:51 am | जेपी

आरारा ,
काका ऐवढा मोठा प्रतिसाद. दोन लेख पडले असते यामध्ये.

नुसतं जळणं नव्हे तर होळीत टाकलेला नारळ(श्रीफळ नाही म्हणत)जसा फास् फुऽऽस होत राहतो ---वेळीच बाहेर काढला नाहीतर --कोळसा.

अविनाशकुलकर्णी's picture

18 Oct 2014 - 4:58 pm | अविनाशकुलकर्णी

नदि च्या अल्ल्याडला रहाणारे ते खरे पुणेकर...

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 5:10 pm | सतिश गावडे

आम्ही नदीच्या अल्ल्याडच राहतो. ते ही नदीकाठालाच मात्र जरा खालच्या अंगाला. खडकवासला धरणाच्या बाजूला. :D

अवो गावडे-देशमुख , तुमी बी पुन-मावळातलचं हआत, पक्क पुनेकर, मग कशापायी 'आमी अल्ल्याड्च / पल्याडच' बोलून राहिले.

इथं देशमुख हे आडनाव नसून मान समजावा.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 5:34 pm | सतिश गावडे

नाय दादानो. आमी कोक्नातलं गावडं. :D

आनी तो आल्याड पल्याडआसाच टायीमपास म्हनुन चाललाय. आपला म्हन्ना येग्दम सपेष्ट हाय, "जितं र्‍हायाचा, जितला खायाचा, तितलाच व्हयाचा".

पगला गजोधर's picture

18 Oct 2014 - 5:37 pm | पगला गजोधर

एमेन टू ड्याट

विवेकपटाईत's picture

18 Oct 2014 - 7:57 pm | विवेकपटाईत

एक जुनी कथा आठवली चार विद्वान ब्राम्हणांनी (मी पण ब्राह्मण आहे) एका मेलेल्या वाघाच्या सांगाड्याला पाहिले. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या आधाराने वाघाला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न केला.....
चारी ब्राम्हण विद्वान निश्चित पुणेकर असतील.....sorry2* *SORRY* :sorry:

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2014 - 1:01 am | अत्रुप्त आत्मा

@चारी ब्राम्हण विद्वान निश्चित पुणेकर असतील. >>> आणि मेलेला वाघाचा सांगाडा पुणेकरेतर! =))

ऋषिकेश's picture

27 Oct 2014 - 12:03 pm | ऋषिकेश

हे पुण्यावर म्हणजे पुणे शहरावर नव्हे पाप पुण्ण्यातल्या पुण्यावर म्हणजे पुण्ण्यावर जळु नका असे म्हणायचे आहे काय?

आदिजोशी's picture

27 Oct 2014 - 5:30 pm | आदिजोशी

उगाच ढोल पिटायचा आणि वाघ आला वाघ आला म्हणून ओरडायचं.

बॅटमॅन's picture

29 Oct 2014 - 11:36 am | बॅटमॅन

=))

सहमत.

"जितं र्‍हायाचा, जितला खायाचा, तितलाच व्हयाचा".....१००% सहमत.

प्यारे१'s picture

29 Oct 2014 - 3:26 pm | प्यारे१

वाघ? की उंदीर?