लालूंची मुक्ताफळे : महाराष्ट्रातील रेल्वे बंद करु

सागर's picture
सागर in काथ्याकूट
29 Oct 2008 - 7:45 pm
गाभा: 

माहितीचा स्त्रोतः http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3652392.cms

आत्ताच लालूने उधळलेली मुक्ताफळे म.टा. वर वाचली.
"महाराष्ट्रातील रेल्वे बंद करु" अशी गर्जना लालूंनी केली आहे ....

यावरुन लालुप्रसाद फक्त उत्तर भारतीय (युपी, बिहारचेच फक्त) जनतेवरच्या (ते ही तथाकथित) अन्यायाविरोधात आपले राजकारण करतात हे सिद्ध झाले.
गोध्राला काय झाले होते? हा वादाचा मुद्दा असेनही कदाचित , पण गोध्रा मधे २ बोगी हिंदू प्रवासी जाळले गेले होते हे ही सत्य आहे.

या हत्याकांडाबद्दल थोडीशी माहिती इथे मिळेल

या लालूने महाराष्ट्रातील रेल्वे बंद करुनच दाखवावी.... बघा काय होते ते....
युपी, बिहारच्या लोकांना मुंबईत घुसवणारे हेच
रेल्वेत ८०-९०% युपी, बिहारी घुसवणारे हेच
प्रांतवादाला खतपाणी घालणारे हेच आणि वर परत धमक्या आम्हालाच?
चोर तो चोर वर शिरजोर अशी म्हण आहे आपल्या मराठीत.... ती लालूच्या बाबतित सार्थ ठरते

मि.पा.संपादकांना विनंती: 'विलासरावांना पत्र' सारखा हा ही लेख काढून टाकायचा विचार करत असाल तर आक्षेपार्ह मजकूर एडीट केला तरी माझी हरकत नाही.

पण या मुद्द्यावर येथे विचारवंतांचा काथ्याकूट अपेक्षित आहे....
लालुंची धमकी हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अपमान आहे.

लालूंचा जाहीर निषेध .....

धन्यवाद,
सागर

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

29 Oct 2008 - 7:51 pm | प्रमोद देव

महाराष्ट्रातली रेल्वे बंद केली तर इथे अजून नवे भय्ये येणार नाहीत. चला हे बाकी मस्त झाले. :)

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Oct 2008 - 7:53 pm | ब्रिटिश टिंग्या

त्रिवार सहमत!

पण अशाने इथे ठाण मांडलेले भैय्ये कसे परत जाणार :?

प्रमोद देव's picture

29 Oct 2008 - 8:00 pm | प्रमोद देव

;)

सागर's picture

30 Oct 2008 - 2:03 pm | सागर

लई भारी काका ... :)

एकच ओळ पण भन्नाट.... तुम्ही रंगात आल्याचा पुरावाच आहे हा... येऊ द्या अजुन :)

बाकी राज ने या लोकांना सळो की पळो करुन सोडले आहे यात शंका नाही ... :D

जय महाराष्ट्र
- सागर

शितल's picture

29 Oct 2008 - 7:56 pm | शितल

देव काकांचा प्रतिसाद मस्तच
=))
पण हे भय्ये लोक इतके पोहचलेले आहेत की चालत/पळत का होईना येतील पण महाराष्ट्रात येतील.

सागर's picture

30 Oct 2008 - 2:06 pm | सागर

शितल जी,
आता अवघड आहे

पण हे भय्ये लोक इतके पोहचलेले आहेत की चालत/पळत का होईना येतील पण महाराष्ट्रात येतील.

आधीची गोष्ट वेगळी होती. आता "राज" नी या भैय्यांना सळो की पळो करुन सोडले आहे. आहे त्यांचेच परत जायचे वांधे झाले आहेत.
आता तरी नवीन भय्या मुंबईत यायचे धाडस करेल असे वाटत नाही... :)

जय महाराष्ट्र
सागर

अभिजीत's picture

29 Oct 2008 - 9:12 pm | अभिजीत

हे वक्तव्य धक्कादायक आहे.
लालुंसाठी हिंदी भाषिक पट्यात आपणच एक नेते आहोत हे दाखवण्याचे राजकारण असावे असे वाटते.

भाषावादावरून जे रण पेटलं आहे त्याला खतपाणी घालण्याचा हा उद्योग आहे.

अवांतर - 'वर्षा' वर आपण कुठल्या राज्यासाठी काम केले पाहिजे याची जाणिव आता तरी निर्माण होइल का?

- अभिजीत

अभिजीतराव,

अवांतर - 'वर्षा' वर आपण कुठल्या राज्यासाठी काम केले पाहिजे याची जाणिव आता तरी निर्माण होइल का?

"वर्षा" वर कामे होत नाहीत म्हणुन तर "राज"वर्षाव सुरु झालाय नव्हं. त्या मुख्यमंत्र्यांच्या निवासाला युपी-बिहारी भूताने झपाटलेलं दिसतय.
साला जो तिथे येतो तो XXX होऊन जातो...

असो, हा टोला आवडला, विलासरावांनी आवर्जून वाचला पाहिजे हा.... :)

जय महाराष्ट्र
सागर

जनोबा रेगे's picture

29 Oct 2008 - 9:36 pm | जनोबा रेगे

उत्पन्न बुडेल त्याच॑ काय? आमच्या मु॑बईची लोकल केव्हढ॑ रेव्हेन्यू देते? बाकी महाराष्ट्रात रेल्वे ब॑द केली तर उपासमारीने भय्येच मरतील.

१.५ शहाणा's picture

29 Oct 2008 - 10:18 pm | १.५ शहाणा

किमान १ दिवस तरी दाखवावी................

mina's picture

29 Oct 2008 - 10:25 pm | mina

लालूंचा जाहीर निषेध .....

लालुंची धमकी हा सरळ सरळ महाराष्ट्राचा अपमान आहे.

एकदम सहमत.!!

आम्ही असेचं हाव भाऊ...(मनीम्याऊ)

...(मनीम्याऊ) - हे आवडले

नाव इंग्रजीत का दिसते बरे तुमचे?
माझे खाते मधे जावा तिथे संपादन टॅब दिसेल त्यात तुम्हाला हवे ते नाव टईप करा...
मनिम्याऊ हे पण छान वाटतंया :) ... ते ठेवले तरी चालेल, तरी तुम्ही ठरवा ...

जय महाराष्ट्र
सागर

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2008 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर

लालूंचे हे एक, उत्तर प्रदेशी मूर्ख जनतेला खुष करणारे, उथळ वक्तव्य आहे. आपण ते उगीचच गांभीर्याने घेऊ नये.
'बरे! कर म्हणावे महाराष्ट्राची रेल्वे बंद.' असे म्हणून दुर्लक्ष्य करावे.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

बहुगुणी's picture

29 Oct 2008 - 10:48 pm | बहुगुणी

असल्या बिनडोक, अदूरदर्शी वक्तव्यांची आपण चर्चा करून त्यांना विनाकारण महत्व देणं म्हणजे लालूच्या मूर्खपणाचं एक प्रकारे समर्थनच (validation) होईल, असल्या विधानांची चर्चा आपण करणं हा आपल्या वेळेचा दुरूपयोगच ठरेल, त्यांना अनुल्लेखाने मारणं हीच खरी योग्य प्रतिक्रिया आहे.

सागर's picture

30 Oct 2008 - 2:41 pm | सागर

त्यांना अनुल्लेखाने मारणं हीच खरी योग्य प्रतिक्रिया आहे.

बहुगुणी सहमत,
पण इथे एक अडचण आहे. हा प्रकार फक्त बुद्धीवाद्यांनाच समजतो.... आणि " भैंस का चारा खानेवाले को" ही गोष्ट समजेल अशी अपेक्षा करणे म्हणजे तो आपल्याच बुद्धीसौंदर्याचा अपमान ठरेल.... :)

त्यांना फक्त ठोकाठोकीची भाषा समजते... आणि आपला "राज" तेच करतोय... :)
मराठी तरवारीचे पाणी यापूर्वीही अनेक वेळा उत्तर भारतीयांनी पूर्वी पाहिले आहे.
आता "राज"नावाच्या धारदार तरवारीनिमित्ताने मराठी मनगटाचे पाणी परत एकदा त्यांना दिसत आहे. एवढेच.....

- सागर

सुक्या's picture

30 Oct 2008 - 12:13 am | सुक्या

मुर्ख लोकांच्या बडबडीकडे लक्ष देउ नये हेच उत्तम.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 12:26 am | विसोबा खेचर

आम्ही लालूचं हे वक्तव्य फाट्यावर मारतो..!

और कुछ? पुढे बोला..!

तात्या.

--

आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..! :)

आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!

=)) =))
... १००% स ह म त..

चन्द्रशेखर गोखले's picture

30 Oct 2008 - 7:20 am | चन्द्रशेखर गोखले

रघु कुल रीत सदा चली आइ, प्रान जाइ पर लौट ना जाइ!

विजुभाऊ's picture

30 Oct 2008 - 9:58 am | विजुभाऊ

रघु कुल रीत सदा चली आइ, प्रान जाइ पर लौटा ना जाइ! =)) =)) =))

झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम

सागर's picture

30 Oct 2008 - 3:07 pm | सागर

वा तात्या... काय फेकून मारले आहे ..... लई भारी
आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!

=)) =)) =)) =))

विकास's picture

30 Oct 2008 - 7:03 am | विकास

आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!

बरोबर आहे, पण त्याने तेथे अतिक्रमण केले नाही... किंबहूना रावणाला मारल्यावर, तो परत अयोध्येचाच राजा झाला...

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 9:31 am | विसोबा खेचर

बरोबर आहे, पण त्याने तेथे अतिक्रमण केले नाही... किंबहूना रावणाला मारल्यावर, तो परत अयोध्येचाच राजा झाला...

अगदी करेक्ट..! :)

अनिल हटेला's picture

30 Oct 2008 - 7:59 am | अनिल हटेला

>> हे भय्ये लोक इतके पोहचलेले आहेत की चालत/पळत का होईना येतील पण महाराष्ट्रात येतील.

त्रिवार सत्य !!!

>>आपल्या पत्नी आणि भावासह महाराष्ट्रात आलेला राम हा पहिला भैय्या होता..!

खरच की!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

सर्वसाक्षी's picture

30 Oct 2008 - 9:26 am | सर्वसाक्षी

रेल्वे प्रवसी व मालमत्ता यांचे नुकसान होणार असेल तर महाराष्ट्रात रेल्वे बंद करु असे लालू म्हणतात.
या न्यायाने आम्ही गेल्या आठवड्यात बिहारमध्ये जे घडताना अनेक वाहिन्यांवर पाहिले त्या रेल्वे तोडफोड व जाळपोळ प्रकरणांमुळे एव्हाना बिहारातली रेल्वे बंद व्हायला हवी होती. यावर लालू महाशय यांची काय प्रतिक्रिया असेल?

प्रभाकर पेठकर's picture

30 Oct 2008 - 9:29 am | प्रभाकर पेठकर

ती तोडफोड महाराष्ट्रातील 'भय्यां'नी, तिथे रजेवर आले असताना, केली आहे, असे म्हणेल 'हमार ललवा'.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

हेरंब's picture

30 Oct 2008 - 9:55 am | हेरंब

लालू या नेत्याला फार माज आला आहे. स्वतः केलेले सर्व घोटाळे पचवल्यामुळे आपल्याला कोणीच काही करु शकत नाही असा त्याचा समज आहे.
पण या जगात अशा अनेक मस्तवाल लोकांची परमेश्वराने जिरवली आहे. तसेच या अहंमन्य नेत्याचेही एक दिवस होणार आहे. १०० अपराध भरत आले आहेत.

अनिरुध्द's picture

30 Oct 2008 - 9:59 am | अनिरुध्द

लालू आता जास्त नको बोलू. थोडेच दिवस राहीलेत म्हणावं. जास्त बडबड करू नकोस. ह्यापेकक्षा कृती केली असतीस तर बिहारी तरी सुधारले असते आणि मुंबई वाचली असती. रेल्वे काय तुझ्या **ची आहे काय? मुंबईची रेल्वे बंद केलीस तर तु आणि तुच कसा सुधारणार रे?

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 12:30 pm | विनायक प्रभू

देवांचे देव आद्य काडीकर श्रीक्रुष्ण यादवांचे काय. ह्यानी पण शेवटी हात टेकले की यादवी समोर.