पंक, पाकळी, पाखी, पाखरु, आणि ऋग्वेदातील पाकः

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Oct 2014 - 1:34 pm
गाभा: 

अवयावांना अंग असा उल्लेख येतो. बसलेल्या व्यक्तीच्या मांडीचा वरचा भागास अंक म्हणतात संदर्भ. पंखड़ी असा शब्द हिंदीत फुलाच्या पाकळी साठी वापरला जातो पंकज हा शब्द विशीष्ट फुलासाठी वापरला जातो. पंकज हे फुल चिखलात/दलदलीत उगवत म्हणून पंक म्हणजे चिखल अथवा दलदल अशास्वरूपाची व्युत्पत्ती वाचण्यात येते पण पंख, पंखा आणि पंखडी हे शब्द पाहीले कि पंक म्हणजे चिख्खल हे स्विकारणे मला व्यक्तीशः जरा जड जाते.

नदीत गाळ इत्यादी साचून जमीनीचा भाग टोक पुढे जाते (नदी मागे सरकते) यास हिंदीत पाँग असा शब्द आहे (संदर्भ). पाक हा शब्द अन्न शिजवणे (पिक,पक्व असा उत्पत्ती क्रम असल्यास कल्पना नाही) आणि इतर भाषेत पवित्र या अर्थानेही येतो. पण पाकीट या रोजच्या शब्दाकडे पहा पाकीट याच शब्दात कुणाला अन्न साठीचे लागणारे पैसे आणि पावित्र्य असा संबंध दिसला तर मुळीच हरकत नाही; पण व्यक्तीशः मला पाकळी प्रमाणे बाहेर येणारा पण झाकणारा भाग हि अर्थ छटा यातन व्यक्त होते असे वाटते. एवढेच नाही मराठी व हिंदीत पाख आणि पाखी हे शब्द आहेत जे पंख अथवा पाकळी सदृश्य गोष्टींना सुद्धा वापरले जाताना दिसतात. मराठीत धान्य पाखडणे या शब्दाचीही आठवणे येते. मराठीत एकपाखी घर म्हणजे एक उतरते छत असलेले घर, दुपाखी म्हणजे दोनबाजूनी उतरती छते असलेली घरे चौपाखी म्हणजे चार बाजूनी उतरते छत असलेली घरे. (संदर्भ मोल्सवर्थ). मराठीतला 'पाकोळी' हा शब्द आठवतो का ? पुर्वी मला या शब्दाचा कोळी (कातीण) या शब्दाशी संबंध असेल असे का कोण जाणे वाटायचे पण पंखेरू/पाखरू हा शब्द आणि पाख पाखी या मराठी/हिंदी शब्दांकडे बघीतले की पाकोळी शब्दातील 'पाक' हा त्याच्या पंखांबद्दल आहे असे वाटते. मग पक्षी>पंछी या शब्दांच्या उत्पत्तीचा स्रोत नजरे समोर येतो. पण पाक/पाख हा शब्द नुसता वापरला जात असेल तेव्हा कदाचीत त्याचा अर्थ दोन भागांपैकी एक भाग असाही होत असेल कारण; ऋग्वेदात पाक हा शब्द दिसतो तो कोणत्या अर्थाने येतो ते माहीत नाही (ऋग्वेदात वर्ष आणि युग या संकल्पनांचा उल्लेख येत असलातरी महिन्यांच्या नावांचे उल्लेख कमी आहेत असे वाचून आहे) पण भारतीय कालगणनेत महिन्याच्या (मास) पंधरवड्यांना पक्ष असा शब्द येतो जसे कृष्णपक्ष शुक्लपक्ष इत्यादी पण हा पक्ष शब्द प्रथमदर्शनी तरी ऋग्वेदात नसावा (किंवा मला दिसला नसावा, पण ऋग्वेदात चंद्र=सोम आणि त्याचे लहान होत जाणे याची कदाचीत नोंद असावी अत्री ऋषी कदाचीत सुर्यग्रहणांची वगैरे त्या काळात निरीक्षणे करत असावेत) पण नंतरच्या एतरीय ब्राह्मणात पक्ष हा शब्द पाहवयास मिळतो व रामायणातही आढळतो असे दिसते. मराठीत पक्ष आणि हिंदीत पाख हे शब्द पंधरवडा म्हणजे महिन्याचा एक भाग या अर्थाने रूळल्याचे दिसते.

*पाकः पृच्छामि मनसाविजानन्देवानामेना निहिता पदानि ।
वत्से बष्कयेऽधि सप्त तन्तून्वि तत्निरे कवय ओतवा उ ॥५॥ - ऋग्वेद: सूक्तं १.१६४

*स्वयं यजस्व दिवि देव देवान्किं ते पाकः कृणवदप्रचेताः ।
यथायज ऋतुभिर्देव देवानेवा यजस्व तन्वं सुजात ॥६॥ -ऋग्वेद: सूक्तं १०.७

असे पाकः या शब्दाचे दोन उल्लेख मला ऋग्वेदाबद्दलच्या आंतरजालीय शोधात आढळले. संस्कृत जाणकारांकडून पाकः हा शब्द ऋग्वेदात कोणत्या अर्थाने येतो आहे हे माहिती करून हवा आहे. अर्थात हि माहिती सर्व साधारण उत्सुकता म्हणून हवी आहे.

धागा लेख काढण्या मागचा मुख्य उद्देश मात्र जरासा वेगळा होता इतर काही शोध घेताना मी योगा योगाने मराठीतील पाख आणि पाखी या शब्दांपर्यंत पोहोचलो. मला जुन्या/प्राचीन मराठी साहित्यातीलतील पाक / पाख आणि पाखी या शब्दांचा अंतर्भाव असलेले लेखन अंश हवे आहेत (सहज कल्पना असल्यास ते कोणत्या अर्थाने येतात या सहीत). सध्या खाप्रे डॉट ऑर्ग हे संकेतस्थळ बंद असल्यामुळे एकतर आपणास ठाऊक असलेल्या शब्द वापरावर अधारीत अथवा संत साहित्य इत्यादी जुन्या साहित्यावर आधारीत माहिती देण्यातील सहकार्यासाठी जाणकारांचा मी आभारी असेन.

* संस्कृत अथवा ऋग्वेदीय उल्लेखांत त्रुटी (मी विषयाचा संस्कृतचा अभ्यासक नसल्यानुळे त्या तशा असू शकतात) असल्यास चु.भू.दे.घे.
* शुद्धलेखन विषयक अवांतर चर्चा या धाग्यात टाळून, मी विनंती करेन तशा विकी प्रकल्पात शुद्धलेखन विषयक लेखन आणि साहाय्य पुरवणे अधिक ऊपयूक्त ठरू शकेल. अनुषंगिक अवांतरा व्यतरीक्त इतर अवांतर चर्चा टाळण्यासाठी धन्यवाद.
* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

प्रतिक्रिया

माहितगार's picture

13 Oct 2014 - 1:47 pm | माहितगार

पाक / पाख आणि पाखी या शब्दांचे बोली भाषेतील अथवा कन्नड , तेलुगू , तमील साहित्यातील उल्लेख/ वापरही (असल्यास) जाणकारांकडून मिळाल्यास हवा आहे.

राही's picture

13 Oct 2014 - 3:18 pm | राही

कृ. पां. कुलकरणीलिखित आणि श्रीपद जोशी यांजकडून सुधारित मराठी व्युत्पत्तीकोशात बहुतेक सर्व मराठी शब्दांच्या व्युत्पत्ती आढळतात. पक्ष म्हणजे पंख, त्यावरून पक्षिन् म्हणजे पंख असलेला; पक्ष म्हणजे बाजू, त्यावरून हा पक्ष, तो पक्ष, (महिन्याचा) काळा पक्ष-शुक्ल पक्ष, वगैरे. किंवा पूर्वपक्ष-उत्तरपक्ष; छपराच्या दोन बाजू म्हणजे दोन पक्ष,पाख इ.
पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही.
स्वयंपाक मधला पाक हा पच् धातूवरून आलेला आहे. त्याचे कर्मणि भू.धा.वि. पक्व असे होते. मूळ अर्थ शिजवणे,हिंदीत पकाना. अनुषंगाने आलेला म्हणजे जठराग्नीने शिजवणे, मऊ करणे, पचवणे. त्यावरून पुढे दु:ख पचवणे, विष पचवणे वगैरे.

माम्लेदारचा पन्खा's picture

13 Oct 2014 - 3:30 pm | माम्लेदारचा पन्खा

संपूर्ण संस्कृत घेऊन ही मला कधीही विभक्ती प्रत्यय ही काय चीज आहे ते नाही कळलं...

धन्य हो !

माहितगार's picture

13 Oct 2014 - 3:36 pm | माहितगार

पॉकेट हा उघड उघड परकीय शब्द आहे. त्याचे मूळ 'पक्ष'पर्यंत पोचेल असे वाटत नाही.

हम्म.. :) धागा पोस्ट केल्या नंतर पाकीटाची आपली व्युत्पत्ती गंडलीय हे माझ मलाही लक्षात आल होत. मग स्वत:ची चूक सावरण्यासाठी इंग्रजी शोध घेत होतो बराच वेळचा, सावरलं जाणार असं काय सापडल नै तरीपण बुडत्याला काडीचा आधार :) शोधण्याचा प्रयत्नात जे सापडलं ते खालील प्रमाणे :

Meaning "small bag worn on the person, especially one sewn into a garment" is from early 15c. Sense in billiards is from 1754. Mining sense is attested from 1850; military sense of "area held by troops surrounded by the enemy" is from 1918; the general sense of "small area different than its surroundings" (1926) apparently was extended from the military use. Figuratively, "one's money" (conceived as being kept in a pocket) is from 1717. Pope Pokett (late 15c.) was figurative of the greedy and corrupt Church

आणि अर्थातच आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद.

अवांतरः
कृ. पां. कुलकर्णींच पुस्तकं पुण्या मुंबईत मार्केटात शोधत काही वर्षांपुर्वी फिरलो होतो तेव्हा ते मिळाल नव्हतं श्रीपद जोशी यांजकडून सुधारित आवृत्ती कोणत्या वर्षीची आहे काही कल्पना असल्यास कळावे.

माहितगार's picture

13 Oct 2014 - 3:38 pm | माहितगार

हा संदर्भ जोडावयाचा राहीला होता.

राही's picture

13 Oct 2014 - 5:51 pm | राही

ते श्रीपाद जोशी आहेत, श्रीपद नव्हेत. टंकनात माझी चूक झाली. यांना जाऊनही अनेक वर्षे झाली. म्हणजे कोशसुधारणा ३५-४० वर्षांपूर्वीची असावी. मला ही जुनी प्रतच उपलब्ध असते. त्यामुळे या बाबतीत नव्याने कुणी काही केले आहे की काय याविषयी माहिती नाही. हा ग्रंथ प्रत्येक चांगल्या वाचनालयात असतोच असतो. याशिवाय यादवकालीन मराठीवर शं. गो. तुळपुळे आणि अ‍ॅन् फेल्ड्हाउस यांचा कोश अतिउत्तम आहे.
या व्यतिरिक्तही ज्ञानेश्वरीची भाषा वगैरे अनेक कोश आहेत. सुदैवाने मराठीला अतिशय समृद्ध असे कोशवाङ्मय लाभलेले आहे. (ही सर्व माहिती धागाकर्त्यासाठी नाही. त्यांना हे माहीत असणारच.)
जाता जाता : मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.

माहितगार's picture

13 Oct 2014 - 8:02 pm | माहितगार

मराठी विकिपीडियावर कोशकारांच्या पुढील प्रमाणे नोंदी आढळल्या
*कृ.पां. ऊर्फ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी (जन्म : इस्लामपूर-सांगली जिल्हा, जानेवारी ५, १८९२ - मृत्यू : मुंबई, जून १२, १९६४)
*श्रीपाद रघुनाथ जोशी (जन्मदिनांक अज्ञात - सप्टेंबर २४ इ.स. २००२) यांचा जन्म दिनांक कुणास ठाऊक असल्यास हवा आहे.

बुकगंगा डॉट कॉमच्या या दुव्यावर ग्रंथाची आवृत्ती विक्रीस उपलब्ध दिसते आहे. प्रत्यक्ष प्रती आहेत का ते त्यांना प्रत्यक्षच विचारावे लागेल असे वाटते.

* पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष १९४६ दुसरी १९६३, आणि तिसरी त्यानंतर केव्हातरी ( त्यावर प्रकाशन वर्ष मुद्रीत नाही १९७८?) प्रकाशित झाली असावी. या नंतरही विवीध विद्यापीठातून संशोधन झाले असणार त्यानुसार अद्ययावत माहिती आंतरजालावर यावयास हवी. असो.

मोल्स्वर्थ प्रमाणे व्युत्पत्तीकोशही विकीवर यावा असे मनोमन वाटते.

+१ सहमत, हे खरयं खास करून ज्ञानकोशांवर काम करणार्‍यांना हे साहाय्यभूत होऊ शकत. दोन्ही लेखन करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची ऐतिहासीक पार्श्वभूमीची दखल घेण्यासाठी, दुसरे चपखल पारिभाषिक शब्द योजनेसाठीही मला शब्द व्युत्पत्ती समानार्थी शब्दांएवढ्याच उपयूक्त वाटतात. आणि भाषा अभ्यासकांना संशोधनासाठी खर म्हणजे विक्शनरीवरील वर्गीकरणांच्या सोईसारखी सोय नाही अर्थात हे सर्व पाझर तलाव बांधण्यास कुणी पुढे आलेतर चे आहे.

कंजूस's picture

13 Oct 2014 - 3:49 pm | कंजूस

एका गृहिणिच्या पाककौशल्याबद्दल विनोद आठवला "अहो अन्नपुर्णाबाई पाक किती तुमचा बरवा ,आतुनी तो कसा हिरवा ."

माहितगार's picture

13 Oct 2014 - 4:40 pm | माहितगार

http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/ या वेबसाईटवर पर्छामि असं रुप दिलय

पाकः पर्छामि मनसाविजानन देवानामेना निहिता पदानि

पाकः चा अर्थ त्यांनी Unripe असा केलेला दिसतो आहे Unripe in mind, in spirit undiscerning, I ask of these the Gods established places; - See more at: http://www.ancientvedas.com/chapter/1/book/164/#sthash.ahpti1dy.dpuf

सवयं यजस्व दिवि देव देवान किं ते पाकः कर्णवदप्रचेताः |

Worship, thyself, O God, the Gods in heaven: what, void of knowledge, shall the fool avail thee?
- संदर्भ: http://www.ancientvedas.com/chapter/10/book/7/#sthash.oPKPMJeu.dpuf

:येथे पाकः शब्दाचा अर्थ मला स्पष्ट होत नाहीए !

-अनभिज्ञ माहितगार

माहितगार's picture

17 Oct 2014 - 4:01 pm | माहितगार

युजानो हरिता रथे भूरि त्वष्टेह राजति ।
को विश्वाहा द्विषतः पक्ष आसत उतासीनेषु सूरिषु ॥१९॥
- ऋग्वेद: सूक्तं ६.४७

http://www.aryabharati.org/rugved/englrugved.asp?ln=en&bk=06&pt=a&pg=047 या अनुवादात पक्षचा अर्थ 'बाजू' side असा घेतला असे दिसते. यात महिन्यातील एक पक्ष असा अर्थ नसावा तरीही एकुण महत्वाचे म्हणजे 'पक्ष' शब्द ऋग्वेदात नाही असे धरून चाललो होतो ते चुकीचे होते असे दिसते.