मर्डर ऑनलाईन

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
9 Oct 2014 - 12:42 pm
गाभा: 

यु यु (युरोपीय युनियन) ची सायबर गुन्हे अन्वेषक संस्था (EC3), ने असे भाकीत वर्तवलं आहे की २०१४ च्या अंता पर्यंत ,
पहिला 'मर्डर ऑनलाईन' कदाचित झाला असेल. जगात आज सायबर तंत्राद्यान प्रचंड वेगाने मानवी जीवनाचा अविभाज्य अंग बनत आहे.
आज पेसमेकर ला ब्लू टूथ वैगरे तत्सम कनेक्टीविटी देण्यात आलेली आहे, हेतू हा की ह्रिदयाची कार्यक्षमता व पेसमेकरची क्षमता, शिल्लक ब्याटरी वैगरे तपासून पाहता येतील. (ह्रिदयाला जोडलेले पेसमेकर व बाहेरील डेटा रिडर यांच्यात संदेशाची देवाण घेवाण होऊन). सायबर-ह्याकर अश्या पेसमेकरच्या उत्पादकाच्या वा प्रोग्रमारच्या हातून सुटलेल्या त्रुटी शोधून काढून, एखाद्याच्या पेसमेकरवर नियंत्रण मिळवून, व्यक्तीच्या जीवाशी खेळू शकतात.
अशी ही शक्यता एखाद्या बॉंडपटातील नसून ती प्रत्यक्ष होऊ घातली आहे, असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही अगदी
असे वाटल्यामुळेच, त्यांनी आपल्या पेसमेकरची वायरलेस संदेश क्षमता व वायरलेस डीफिब्रीलेशन क्षमता, निष्क्रिय करून घेतली आहे.

प्रतिक्रिया

विलासराव's picture

9 Oct 2014 - 1:02 pm | विलासराव

मी पयला!!!

लिहत रहा, कदाचित पहिला ऑनलाईन मर्डर पुढच्या ८ दिवसात पण होईल.. :)
ह. घ्या.

_मनश्री_'s picture

9 Oct 2014 - 2:06 pm | _मनश्री_

laugh

तुम्हाला ह. घ्या म्हणजे हसून घ्या असे नाही ना वाटलेले? :)

अहो मामा, तुम्ही विनोदाने म्हणता, पण दुर्दैवाने तसं सुद्धा खरंच होणार आहे हं, त्या युरोपीय संस्थेच्या मते,
धाग्यात लिहिले आहे तो ऐक डायरेक्ट मर्डरचा प्रकार आहे, इनडायरेक्ट मर्डर सुद्धा होणार आहेत. उदा. ओन्लाइन सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे वा ब्लाकमेल करणे इ.

पगला गजोधर यांनी मला मामा बनवल्याबद्दल मी आता त्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न करणार आहे.

काउबॉय's picture

10 Oct 2014 - 10:55 am | काउबॉय

सोशल इंजिनीरिंगचे स्किल वापरून, एखाद्याची बाद्नामी करून
त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे

मनस्ताप देता येतो हे मला मान्य आहे. याच सन्स्थळावर माझ्या संपूर्ण अपरोक्ष माझी निर्भ्त्सना बदनामी करणारे गैरसमज पसरवणारे लिखाण प्रकाशित अजूनही आहे. मला दया होती ज्याने त छापले त्याच्या परिस्थितीशी म्हणून माझ्या निदर्शनास येउनही मी त्यावर प्रतिवाद कटाक्षाने टाळला. संपूर्ण एकतर्फी बदनामी कारक माहिती क्लेशदायक ठरू शकते हे वास्तव आहे. फक्त मला राहून इतकेच आश्चर्य वाटते की अशी बदनामी मी एखाद्याची केलि तर माझे लिखाण टिकेल काय ?

थोडक्यात जसे आपण म्हणता तसे एखाद्याला टारगेट केले जाऊ शकते तसेच त्याचे प्रिवेशन सुधा करता येउ शकते असे माझे स्वानुभवाचे मत आहे.

विजुभाऊ's picture

9 Oct 2014 - 1:29 pm | विजुभाऊ

बरं मग ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Oct 2014 - 2:09 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते.

प्रोग्रॅमरच्या हातून ज्या त्रुटी सुटल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी काहीतरी उपाय सुचवावास असे म्हणते

.
अय्या हो की मै.....हा खरा उपाय. कित्ती चान आणि सोप्पा उपाय सुचवला नै मैसाहेबानी........

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Oct 2014 - 4:47 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

विजू, अरे मी उपाय सुचव्लेलाच नाहीय. मी तुला उपाय सुचवायला सांगत आहे. असो.
ह्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांचे काय करायचे कळत नाही. "एक प्रश्न विचारला तर त्याचे भलतेच उत्तर देतात' असे ह्यांचे म्हणणे.

पगला गजोधर's picture

9 Oct 2014 - 2:15 pm | पगला गजोधर

डीक उवाच ...'अरे कुठे नेउन ठेवलाय हा पेसमेकर माझा . . !'

पगला गजोधर's picture

9 Oct 2014 - 2:30 pm | पगला गजोधर

We can prove the presence of defects, but nobody can prove absence of defects.
--Edsger W. Dijkstra

Terrific. We tested this implanted defibrillator. Well, we tested it until we ran out of things to test. Here, let's stick it in your chest...

_मनश्री_'s picture

9 Oct 2014 - 2:31 pm | _मनश्री_

जर भविष्यात खरच अस घडणार असेल तर मग यावर उपाय काय ?

माम्लेदारचा पन्खा's picture

9 Oct 2014 - 3:26 pm | माम्लेदारचा पन्खा

त्यावरचा विलाज पण सांगा विदा देऊन......

१. या संभाव्य धोक्याविषयी समाज प्रबोधन /जागृती करणे.
२. लोकप्रतिनिधीना या विषयी निवेदन देवून, कठोर कायदे व आंतरराष्ट्रीय स्तरावर सामंजस्य, जसे की गुन्हेविषयक माहितीचे आदानप्रदान,
गुन्हेगार हस्तांतरण वै विषयी सुशिक्षित मतदारांचा दबावगट तयार करणे.
३. या तंत्रज्ञानाविषयी लेटेस्ट माहिती शिकून, सुरक्षित वाईफाय नेट, फायरवाल वै स्वसंरक्षण भक्कम ठेवणे. गाफील न राहणे .

प्रथमदर्शनी या ३ गोष्ठी सुचताहेत मला, तुम्हीही काही उपाय सुचवा.

आणि हो आणखी काही काल्पनिक संभाव्य गुन्हे सांगा.
जसे कि भविष्यात स्मार्ट कार, स्मार्ट होम, यांची ई सुरक्षा मोडून, ह्याकर तुम्हाला तुमच्याच घरात वां कारमध्ये कोंडून ठेवतील, जोपर्यंत तुम्ही त्यांनी सांगितलेली खंडणी त्यांच्या अकौंटवर ट्रान्स्फर करत नाही.

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Oct 2014 - 9:08 am | माम्लेदारचा पन्खा

तीर्थ घेतल्यावर मिपा आठवलं की होतं असं.....

पगला गजोधर's picture

9 Oct 2014 - 5:33 pm | पगला गजोधर

1 मधे , सुचवल्या गेलेल्या समाज जागृती अंतर्गतच हा काकूचा ऐक धागा.

अत्रुप्त आत्मा's picture

9 Oct 2014 - 3:31 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/computer/dead-computer-geek-smiley-emoticon.gif

श्रीरंग_जोशी's picture

9 Oct 2014 - 10:43 pm | श्रीरंग_जोशी

असे खुद्द अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष डिक चेनी यांनाही

डिक चेनी माजी उपराष्ट्राध्यक्ष आहेत. सध्याचे उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आहेत.

म्हणजे आता जारण-मारण-मूठ मारणे वगैरे अघोरी विद्येचे प्रयोग सायंटिफिकली करणे शक्य होणार म्हणायचे, इकडे नुस्ती मोबाईल वर टिचकी मारली की तिकडे ढॅणSSS व्वा. त्यासाठी स्पेशल अ‍ॅप्स निघतील लवकरच. आगे बढो.

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2014 - 7:57 am | टवाळ कार्टा

=))

पगला गजोधर's picture

10 Oct 2014 - 9:50 am | पगला गजोधर

असं नसतं बोल्लाचः चित्रगुप्ततात्या, खुपच सनातनविरोधी ब्वॉ तुम्ही.
विमान, अणुतंत्रद्यान, इंटरनेट वै सर्व विज्ञान/तंत्रद्यान विषयी, सग्ळ-सग्ळ पुराण पोथ्यात आधीच लिहून ठेवलं हॊ,
पाश्च्यात्यांनी पुराण पोथ्यातुन सग्ळ विज्ञान/तंत्रद्यान कॉपी केलेलं आहे, आहात कुठे ? आता पहाना, काय तो वायरलेस
रौटर वै तुम्ही कौतुकाने वापरता, अहो 'नारदाची शेंडी' म्हणजे वैश्विक रौटरच, A३८० विमान मोठ्ठ म्हणून डोळे भरून बघता,
पण ते रामायणातील पुष्पक विमानासमोर कैच्च नाही. १२ ज्योतिर्लिंगे म्हणजे त्याकाळच्या अणुभट्ट्याच होत, बघा आकारात कित्ती कित्ती साम्यं, अणुभट्ट्याचं डीजाइन शिवलिंगाच्या आकारावरूनच चोरलं हॊ सायबांने, चीज नाही हो या भारतातील काही लोकांना सनातनच्या महानतेचे म्हणुन असले प्रतिसाद देता.

एकाला टपकावयाचे आहे.सुपारी घेणार का गजोधर भाउ ??????????????

पगला गजोधर's picture

10 Oct 2014 - 11:10 am | पगला गजोधर

शू ....सुपारी घेणार का ? अस्स नाय बोलयच, नवनिर्माण करणार काय ? अस विचारायचं ! जेपीराव .

बॅटमॅन's picture

10 Oct 2014 - 2:46 pm | बॅटमॅन

नवनिर्माण? त्याला किमान २ माणसे आणि ३/४ वर्ष कालावधी लागतो असे ऐकून आहे.

बॅटमॅनगुर्जी बहुतेक तुम्हाला आपेक्षित किमान 2 व्यक्तीनी केलेले नवनिर्माण, तर 9 महिने कालावधीचे असते नां ? 3-4 वर्षात तर 3-4 नावनिर्माणे होतील कि ! काय बोल्ताय्सा गुर्जी, काय कळले नाही.

नीट वाचा पगला गजोधरसाहेब. ३/४ = ०.७५ वर्ष म्हणजे ९ महिनेच की. :)

टवाळ कार्टा's picture

10 Oct 2014 - 10:41 pm | टवाळ कार्टा

लईच अपेक्शा बुआ गजोधरकडून ;)

पगला गजोधर's picture

11 Oct 2014 - 7:25 am | पगला गजोधर

अच्छा अच्छा, 3/4 वर्ष म्हंतायसा व्हय. मं बरुबर हायसा.