PLATONIC व्याभिचार- तोल सांभाळुन घसरण्यातला आनंद !

मारवा's picture
मारवा in काथ्याकूट
22 Sep 2014 - 1:11 am
गाभा: 

माझा एक चरीत्रहीन मित्र आहे. त्याचा स्त्री विषयक अनुभव अतिशय सखोल असा आहे. परवाच्या आमच्या चर्चेतुन त्याने स्त्री स्वभावाचा एक वेगळाच पैलु उलगडुन दाखविला. तर झाले असे की त्याने नेहमीप्रमाणे एका स्त्री शी रीतसर सुत जुळवले......सर्व टप्पे ओलांडत तो आत्मविश्वासाने पुढे सरकु लागला. स्पर्श पायरीही गाठली.... आणि अचानक त्या स्त्री ने पुर्णपणे माघार घेतली आणि दहा मिनीटांचा सुचक स्पर्श सहन केल्यावर म्हणाली की तुम्ही जो स्पर्श केला ना खर तर तो मला अजिबात आवडला नाही. चरीत्रहीन मित्र अनुभवी असल्याने त्याने तात्काळ विषय संपवला. तर हे मला फ़ारच आश्चर्यजनक वाटले मी सात्विक संतापाने मित्राला विचारले की अरे जर तीला नव्हताच इंटरेस्ट तर विषय मुळात इतका वाढवलाच का आणि इतक्या वेळ स्पर्श तरी का चालवुन घेतला ? तर चरीत्रहीन मित्राने सांगितले ते असे की काही स्त्रीयांचा हा छंद असतो. अशा स्त्रीया अगोदर स्वत:हुन पुढाकार घेतात, समोरच्याला पुर्ण पागल करतात काही पाउले ही त्याला पुढे टाकु देतात. आणि मग अचानक त्याला नकार देतात माघार घेतात, व स्वत:च्या वैवाहीक नैतिकतेची समोरच्या पुरुषाला जाणीव करुन देतात. आणि तो कस चुकीच करत आहे इ. इ. त्याला पटवुन देण्याचा प्रयत्न करतात. पुरुष नवखा असेल तर तो गोंधळुन जातो त्याला काहीच कळत नाही की अरे आता तर मला छान प्रतिसाद मिळत होता अचानक असे कसे झाले ? तर या मागे एक फ़ार विशीष्ट अशी मानसिकता असते. तर या विषयी आमच्या चर्चेतुन जे काही मला उमगले ते मांडण्याचा प्रयत्न करतो.
एक सुंदर इंग्रजी शब्द आहे प्लॆटॉनिक लव्ह हा शब्द थोर तत्वज्ञ प्लेटो याच्या नावावरुन बनलेला आहे. याचा अर्थ होतो अशरीरी कृतिहीन प्रेम उदात्त प्रेम अथवा देवदासी निस्सीम वासनाहीन प्रेम. आणखी एक शब्द आहे प्लेटॉनिक टॉक म्हणजे कृतिहीन बोलणे याचा अर्थ नकारात्मक आहे जस कृतिहीन चर्चा (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे) यावरील दोन शब्दावरुन मी एक नविन शब्द बनवला प्लेटॉनिक व्याभिचार तर याचा अर्थ असा की व्याभिचार हा नेहमीच कृती त व्यक्त होत नाही निव्वळ मानसिक पातळीवर ही अनेकदा व्याभिचार केला जात असतो. तर अशा स्त्रीया मानसिक पातळी वर च केवळ व्याभिचार करत असतात. मात्र कृती करणं त्या कटाक्षाने टाळतात म्हणजे कल्पनेच्या घोड्याला त्या बेलगाम उधळु देतात मात्र कृतीचा लगाम घट्ट हाती धरुनच. या स्त्रीयांना आपल्या मागे पुरुष पागल होतात ( वा आपण केव्हाही कुठल्याही वयात कुणालाही पागल करु शकतो) ही कल्पनाच प्रचंड एक्सायटींग असते. मात्र अर्थातच पुढची पायरी गाठण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. असे का होते ? त्या अस का करतात ?
यामागे अनेक घटक कार्यरत आहेत, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे नेणीवेवरील नैतिकतेचा प्रचंड दबाव. धर्म समाज कायदा सर्व बाजुंनी व्याभिचार हा कीती वाइट आहे पाप आहे याच सतत केल जाणार हॆमरींग ! त्यामुळे आज फ़िर जीने की तम्मना है आज फ़िर मरनेका इरादा है किंवा मी कात टाकली पर्यंतचा बेभान हिंमतीचा टप्पा त्यांना व्याभिचारात गाठता येत नाही. म्हणजे अनेकदा मनाचा कोंडमारा असह्य होतो, सर्व काही तोडुन मोकळं व्हावस ही वाटतं पण मग तो आवेग ओसरल्यानंतर मन स्वत:च्या नैसर्गीक उर्मींना कुरतडु लागत. मग नेणीवेवरील दबाव कार्यरत होतो. आता या घुसमटीतुनच एक विलक्षण दांभिकता जन्म घेते एक आत्मवंचनेचा नविन प्रवास सुरु होतो.
तो असा की या स्त्रीया एक नविन मार्ग चोखाळतात. त्या अगोदर आवडलेल्या पुरुषाला आव्हान देतात त्याला इनव्हाइट करतात एक्साइट करतात. यामध्ये तो पुरुष जसजसा पागल होत जातो जसा त्या स्त्रीला प्रेज करु लागतो तशा त्या याच गोष्टीचा आनंद घेतात. एक मानसिक पातळीवर सर्व काही अनुभवुन घेतात आणि द मोमेंट तो पुरुष पुढे सरकला की त्याला ब्रेक मारतात. कारण त्यांना मुळात पुढे जायचच नसत. त्यांना तोच तितकाच चरीत्र वाचवुन आनंद ही देणारा मर्यादीत व्याभिचार च हवा असतो. त्यात काय नाहि मिळत ?
अनेक स्त्रीयांना एका जुन्या झालेल्या विवाहात सर्वात मोठी उणीव असते ती सौंदर्याच्या स्तुतीची (पुरुषा कडुन) कमतरता. वय वाढल्यानंतर हव्याहव्याश्या वाटणारय़ा रीअशुअर करणारया स्तुतीची गरज ही तहाने इतकी मुलभुत असते. त्याहुन मोठी गरज असते श्रोत्याची ( अथर्वशीर्षातील एक सुंदर ओळ म्हणते अव श्रोतारम ) ही गरज अनेक बहीरे झालेले जुनाट नवरे पुर्ण करुच शकत नाहीत. नंतर जो एक रोमॆंटीसीझम जो स्त्रीयांमध्ये अंगभुत असतो त्याला जुनाट नवरा अजिबात उपयोगी पडत नाही. या शिवाय जी एक मैत्रीची फ़्रेंडशिप ची आदिम गरज जितकी स्त्रीयांना असते ती ही जुन्या लग्नात पुर्ण होत नाही. शिवाय स्त्रीयांच्या पाचवीला पुजलेला सनातन एकटेपणा इ.इ. तर वरील सर्व गरजांची पुर्ती ही विवाहपश्चात व्याभिचारात होत असते.म्हणुन स्त्रीया मुळ वासनेपेक्षा ही अधिक फ़ोर्स असलेल्या वरील गरजांसाठी हा मार्ग चोखाळतात.
यामध्ये मग गरजु पुरुष मात्र एकमेव हेतुने वरील सर्व गरजांची प्रामाणिक पुर्तता करुन वसुली साठी पुढे जसा सरकतो तशा मग मात्र पुर्ण सावध असलेल्या चरीत्राची काच जपणारया स्त्रीया मग माघार घेतात. प्रियकर लहान असेल तर मग अशा स्त्रीया लगेच पेरेंटल मोड मध्ये जातात, व पालकाच्या भुमिकेतुन शिकवणी घेउ लागतात. यात मजा अशी असते की स्त्रीयांचे चरीत्र ही अबाधित राहते व स्खलनातला आनंद ही पुर्ण उपभोगता येतो. शिवाय अशा अनुभवाच्या रीफ़्रेशमेंट नंतर मुळ विवाहातही परतल्यावर दिर्घ बदलीच्या सुटीनंतर रहाटगाडग्याला जोडुन घेतानाचा आनंद उपभोगता येतो. या खेळा तला पुरुष मात्र मुर्ख च असतो त्याला तोंडी आलेला घास गमावण्यातला चडफ़डाट केवळ भोगावा लागतो.
पण मग यातुन स्त्री ला एक अमर वेदना ही प्रत्ययास कधी कधी येत असावी की आपण झोकुन देउ शकत नाही प्रेम प्रवाहात आपण वाहु शकलो नाही याची देखील बोच तर असेल ? माहीत नाही स्त्री हा तसा गहन विषय आहे. तुम्ही त्याची उकल पुर्णपणे कधी कधी करु शकत नाही.
सध्या चरीत्रहीन मित्रा शी चर्चे च्या माध्यमातुन अजुन बरेच काही समजुन घ्यायचे आहे..

प्रतिक्रिया

हे बघ वरील दोन प्रतिसाद पैसा आणि राणी हे नेणीवेतुन उमटलेले आहेत. त्यात अगोदर राणी बघ एक आव आणत आहे की बघा ह मारवा मला तुझ्याबद्दल काळजी वाटली म्हणुन बाइ मी आपल सांगतेय की तुमच्या मित्राला घरी नका आणु ह. आता यातील गृहीतके बघ तिने अस ठरवुन टाकलय की मी विवाहीत आहे. मग माझ्या पत्नीला अशा मित्रापासुन दुर च ठेव रे बाबा अतिशय केअरींग टोन आहे बघ नंतर उपहास तो असा की मॅन इज नोन बाय हीज कंपनी म्हणजे हा मारवा ही असाच असणार याच्या मित्रासारखा. मग समजा असणार तर काळजीयुक्त सल्याचे काय औचित्य ? मग असे विचारले तर ती म्हणणार अहो तुमची नाही तुमच्या पत्नीची काळजी वाटली म्हणुन म्हणाले बर का . अजुन बारकाइने बघ स्वप्न कुठली पडताहेत ? म्हणजे बघ चर्चा खर म्हणजे जनरल व तात्विक चालु आहे पण राणी फॅन्टसी त वेगाने शिरली स्वप्नात रमतेय इमॅजिन करतेय मात्र बाहेरील आव सगळा पेरेंटल मोड मध्ये जाउन.... तुला लक्षात येतय का विश्वनाथ ?
आणि पैसा त्या तर डेस्परेट झालेल्या दिसताय करुन टाका खुलासा एकदाचा असे म्हणुन एक आव्हान देताय जाणीवपुर्वक डीवचु पाहताय बघु या मग हा आणखी काही उघड करुन मांडेल का या अपेक्षेने शिवाय चॅरीटी बिगीन्स अ‍ॅट होम मध्ये तीव्रतेने डीवचण्याचा उद्देश आहे की अरे मोठ्या गप्पा मारतोस तुझ्या बायकोची का नाही गाठ घालुन देत तुझ्या मित्राशी मग कळेल तुला काय बरळतोय ते अगेन एक अत्यंत महत्वाची नाजुक बाब आहे यात नीट विचार कर
मुळ विषय कुठला आहे चर्चा कुठली आहे आणि या दोघींची फँटसी कुठे चाललीय
सी डीअर फ्रेंड विश्वनाथ दे आर लायकींग इट अँड हायडींग इट सो कनिंगली सो हीपोक्रीटीकली इव्हन वुइथ देमसेल्व्हस
हेच तर मी म्हणत होतो एका साध्या चर्चेत जर इतका जबरदस्त दांभिकपणा असु शकतो तर
वरील प्रसंगात कीती होत असेल
विश्वनाथा विचार कर विकाराला बळी पडु नकोस रागावु नकोस विश्लेषण कर विश्व नव्या विलक्षण सत्यांना तुझ्यापुढे उघड करेल

पैसा's picture

2 Oct 2014 - 10:23 pm | पैसा

तुम्हाला विश्लेषणांची फार्रच हौस ब्वा! तुम्ही सोडून बाकी सगळे काय विचार करताहेत याचा इतका विचार करायला कसं काय जमतं? बरं तुम्ही कोण आहात, भाऊ आहात का ताई हे सुद्धा मला माहितीच नाही हे मी आधीच बोलले आहे मग

अरे मोठ्या गप्पा मारतोस तुझ्या बायकोची का नाही गाठ घालुन देत तुझ्या मित्राशी

हे लैच्च पुढचं झालं!

बाकी असोच्च, पण मी डेस्परेट हे वाचून बरेच दिवसांनी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलेय! त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद!

एकदा गौतम बुद्ध जंगलात एका झाडाखाली बसुन ध्यान करत होते. त्यांच्या समोरुन एक विवस्त्र स्त्री धावत गेली काही वेळाने तिचा पाठलाग करत काही गुंड तेथे आले. त्यांनी गौतमाला विचारले की तुम्ही एक विवस्त्र स्त्री येथुन पळत असतांना पाहीली का ? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले मला माहीत नाही कोण पळाले ती स्त्री होती की पुरुष हे ही माहीत नाही कारण माझ्या मनातच आता लिंगभाव राहीलेला नाही. माझ्यासाठी दोन्ही सारखे च दोन्ही मनुष्य. एक गुंड म्हणाला अहो ती सुंदर होती विवस्त्र होती बुद्ध म्हणाले माझ्या मनात कामनेचा एक ही तरंग च उठत नाही. मला ती विवस्त्र की वस्त्र घातलेली काही फरक पडत नाही.
अशी अवस्था गाठल्यावर विश्वनाथा नाही कळत रे आयडी पुरुषाचा आहे की स्त्री चा आणि डेस्परेट अरे अरे पाप्या ब्रह्मकुमारी आहोत रे आम्ही माउंट अबु वरील. का ओढतोस आम्हाला असल्या चर्चेत. कुठ फेडशील ही पापं. हसाव की रडाव कळत नाही रे मला
चल हसुनच घेते पोट भरुन यावर एकदाचं

स्वप्नांची राणी's picture

3 Oct 2014 - 3:45 am | स्वप्नांची राणी

कामवासनेचा तरंगच का उठायला हवा बुद्धाच्या मनात? कोणीही 'लिंगविरहीत' प्राणी जिवाच्या आकांताने धावतोय ईतकी साधी गोष्ट बुद्धाला कळू नये का? तिला/त्याला संरक्षण द्यायला हवे की ' मला नाही ब्वॉ ठाऊक" असली पळवाट काढायला हवी होती. तुम्ही एक भाकड कथा (आणि भेकड सुद्धा) सांगताय आणि तश्याच वाटेल त्या भाकडकथा बुद्धांच्या नावानी खपवताय की काय..?

आता तर मला संशय यायला लागलाय की हा मित्र बीत्र कोणी अस्तित्वात तरी असावा का की ही तुमची पण फॅन्टसीच आहे? नाही म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढता ओढता असाच आपला टाईमपास! कळलं नसेल तर प्लीज बॅटमॅनला विचारा, तो सॉल्लिड हुश्श्यार आहे. (अय्या, पैसा, पुढच्या प्रतिसादात बघ मी फॅन्टसी क्विन + डेस्पो + स्किझोफफ्रेनिक होईन हां!!)

बॅटमॅन's picture

7 Oct 2014 - 12:35 pm | बॅटमॅन

रथ ओढणे असो वा कालवा सिंचित करणे, प्रत्येकाने ते काम आपापलेच केले पाहिजे हे दोन शब्द बोलून मी खाली बसतो.

(यद्यपि त्याचे औटसोर्सिंग जास्त फायदेशीर आहे असेही ऐकून आहे.)

पुढे चालूद्या.

मारवा's picture

7 Oct 2014 - 4:49 pm | मारवा
पैसा's picture

3 Oct 2014 - 10:30 am | पैसा

फार्रच ब्वा विनोदी तुम्ही! मी कधी म्हटलं आम्ही सगळ्याच्या पलिकडे गेलोय म्हणून! बरं तुम्ही कोण आहात ते मला माहित नाही एवढंच म्हटलं मी. त्यावरून पुन्हा मी सगळ्या जगाबद्दल तसं म्हणतेय असा अर्थ लावलात की हो! च्चः च्चः च्चः!

स्वप्नांची राणी's picture

3 Oct 2014 - 4:12 am | स्वप्नांची राणी

म्हणजे तुम्ही विवाहीत नाहि आहात का? मग तर मला खात्रीच आहे लग्नानंतर तुम्ही या प्रिन्सीपल्ड मित्राला घराची पायरी चढू देणार नाही. नाही, म्हणजे, बाहेर एकच प्याला घेत घेत नक्कीच मजे-मजेत गप्पा माराल.

आणि विवाहीत पुरुषच घरात राहतात आणि फक्त त्यांच्या पत्नी सोबतच राहतात हे कुठले विचित्र गृहितक आहे यार..? घरात ईतर बायका नसतात की काय? आता प्रिन्सिपल्ड मित्राच्या अनुभवावरून निदान तुम्ही तरी तुमच्या बायकोला 'घुसमटू' वगैरे देणार नाही याची खात्री आहे हो मला. पण ईतर बायकांचे काय?

आता पुढच्या प्रतिसादात नक्की सांगाल की तुमच्या घरावर डोळा ना ठेवण्याचे पण 'त्या' मित्राचे प्रिन्सीपल आहे ई.ई.

चांगल समजावतेय तर कळत नाहिये, उगिच शाब्दिक कोलांट्या मारताय. मित्र कसला, अस्तनीतला निखारा आहे तो. आणि परत एक वैधानिक ईशारा देते की धूर येतांना दिसतो ना, आग त्याच्या आधीच लागून गेलेली असते.

कवितानागेश's picture

3 Oct 2014 - 10:58 am | कवितानागेश

@ मारवा,
मला हेच विचार्याचं होतं... घरात ईतर बायका नसतात की काय?
शिवय अजून मह्त्त्वाचं....
बाई ही फक्त आणि फक्त बाईच (पक्षी:मादी) असते का?
फक्त 'जीव'- एक अस्तित्वाचा आनंन्द मानणारा, भावना आणि बुद्धी यांनी पुरेपुर भरलेला जीव, म्हणून माणसाचा विचार केला तर त्याचं 'नर' असणं किंवा 'मादी' असणं हा त्याच्या एकंदरीत अस्तित्त्वाचा आणि आयुष्याचा फार छोटा भाग झाला. तो मह्त्त्वाचा असेलही. पण केवळ नर-मादी सेन्सेशन्स इतकी मह्त्त्वाची नसतात. आयुष्य अजून खूप खूप RICH आहे. :)
त्या भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत बाबतीत काही कारणानी अडसर आल्यानी त्या काहीजणांमध्ये बळावतात, हेही खरे आहे. पण प्रत्येकालाच आणि विशेषतः स्त्रियांना त्यात टॅबू आहे, असं समजायची आवश्यकता नाही.
शिवाय, 'लिंगनिरपेक्ष' रहाण्यासाठी प्रत्येकाला बुद्धत्त्वालाच पोचायची गरज नसते.
निदान माझ्या तरी बघण्यात लिंगनिरपेक्ष निखळ मैत्रीची अनेक उदाहरणे आहेत.
एक शक्यता अशीही आहे, की वर उल्लेखलेल्या स्त्रीचीही तशीच धारणा असावी.
( डिसक्लेमरः केवळ एकाच स्त्रीच्या उदाहरणावरुन जो सर्व स्त्रीजातीबद्दल विनाकारण गैरसमज करुन घेण्याचा आणि पसरवण्याचा प्रयत्न दिसतोय, त्यासाठी हे प्रतिसाद लिहित आहे)
अवांतरः
वर दिलेल्या एका प्रतिसादात, बिचकण्याबद्दल ही लिहिले आहे. तेच पुन्हा लिहिते,
एखादा पूर्वीचा TRAUMA असेल, तर स्त्री/ पुरुष कुठल्याही प्रकारच्या स्पर्शानी बिचकणारच. तिथे cunningness नसतो, confusion असतं.
एक टिप्पणी:
कदाचित वैयक्तिक वाटेल, तरीही लिहितेय, तुम्ही मणासाच्या भावनांच्या मूळाशी जायचा प्रयत्न करताय, हे उत्तमच आहे. पण प्रयत्न फारच कमी पडतोय! एकच काहितरी ढोबळ अनुमान काढून तिथेच थांबणं योग्य नाही.
एखादी व्यक्ती लबाड असेल, दुष्ट असेल, भित्री असेल, किंवा मूर्खही असेल, या प्रत्येक नकारात्मक भावनेमागे प्रत्येकाच्याच मनात काहितरी दु:ख, कुठलीतरी असुरक्षितता, किंवा काहीसे अज्ञान असते. घाईघाईनी अनुमान न काढता, तिथपर्यंत पोचलात तर तुमचा भावनांचा शोध अर्थपूर्ण होईल.
All the best!

या गोष्टीच की बघा जेव्हा आपण एका विशिष्ट बाबतीत बोलत आहोत समजा एक उद्यान आहे ज्यात अनेक प्रकारची फुल झाड पक्षी आहेत आता आपण त्यातील एका विशिष्ट पक्ष्याच्या विशेष पद्धतीने घरटे बनविण्याच्या स्कील विषयी बोलत आहोत. की त्याची शैली अशी आहे तशी आहे असे तर त्याचा संबंध तात्काळ सर्व पक्षी जमातीशी कसा लावला जाउ शकतो हा एक भाग दुसर अस की तो एक पक्षी वेगळ्या शैली ने घरट बांधतो हा एक लहान का होइना सत्याचा भागच आहे की नाही. त्या मुद्द्याला त्याच संदर्भात का पाहीले जात नाही.? दुसर अस शक्यच नाही असे मन का म्हणते? डीनायल इतक तीव् का आहे ? मी काल्पनिकच बोलतोय अशा स्त्रीया अस्तित्वातच नसतात इतकं डीनायल कस ? ठीक आहे माझी लिहीतांना शैली थोडी सैल होते तो माझ्या स्वभावाचा भाग आहे उपहास ही कधी असतो माझ्या लेखनात पण ती गौण बाजु आहे एक ते बाजुला ठेवा पण द वे इट इज डीनाइड व्हेंन्चमेंंटली आरग्युड इरॅशनली ते इंटरेस्टींग आहे. कॉमेंटरीज ऑन लिव्हींग च्या दुसरया भागात एका प्रकरणाची सुरुवात जे कृष्णमुर्ति एका अप्रतिम मार्मिक प्रश्नाने करतात की DOES THINKING BEGIN WITH CONCLUSIONS ?
ओशो रजनीश म्हणतात भारतातील अध्यात्मिक चर्चा शास्त्र चर्चा ही शास्त्र वेदांत मुळात बरोबरच आहे या मुळ गृहीतका पासुन सुरु होते. आता एखाद्या मुद्द्याच्या बाबतीत फक्त इतक निश्चीत करायच असत की संदर्भ कुठल्या स्म्रुती चा कुठल्या श्रुती चा घ्यावा इतकेच बाकी असते. पण मुळात शास्त्रे चुकीची असु शकतात अप्रगत मागास मानवांनी लिहीलेली अपुरी चुकीची असर शकतात असा विचार दुर दुर पर्यंत नसतण्य त्याच्या बेस ला चॅलेंज करण्याची हिंमत नसते.
एक मानवी मन मुळात इतक गुढ आहे त्याला अनेक पदर कंगोरे असु शकतात एखादी स्त्री असे बागते यामागे तिच्यावर असलेला अनेक वर्षांच्या परंपरेचा दबाव असु शकतो हे मला माहीत आहे, माझा मुळ हेतु त्या विवीध कंगोरयांवर विचार मंथन व्हावे हा होता. वेगळ्या पार्श्वभुमी मधील स्त्री वेगळ्या रीतीने व्यक्त होउ शकते स्व चा वेगळा अविष्कार करु शकते. हे निश्चीत शक्य आहे. आपण समाज म्हणुन कशी परीस्थीती निर्माण करतो कसा दबाव निर्माण करतो की ज्याने माणसांची वागणुक अगदी आंतरीक व्यक्तीगत निर्णयातील वागणुक ही प्रभावित होते.
आपल्या नैतिकतेचा पट कसा असतो वीण कशी असते अनेक बाबतीत आपण हा मुद्दा घेउन खोलात जाउ शकलो असतो.
पण असे होत नाही.

पैसा's picture

30 Sep 2014 - 10:14 pm | पैसा

महिला हा विषय असलेल्या या धाग्यावर महिला सदस्यांच्या प्रतिक्रिया अगदी तुरळक आहेत ही गोष्ट कोणाच्या लक्षात आली का माहित नाही. पण पण हाच धागा फक्त स्त्रियांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या न करता "व्यभिचारी स्त्रिया आणि पुरुष" असा असता तर कदाचित महिला सदस्यांच्या जास्त प्रतिक्रिया आल्या असत्या. या विषयावर सुहासने संवेदनाशीलतेने लिहिलेलं शब्दचित्र http://misalpav.com/node/13781 सहज आठवलं.

माहितगार यांना धन्यवाद! या धाग्यावरचे त्यांचे बहुतेक प्रतिसाद आवडले आहेत.

अनेक कारणांनी या धाग्यावर काहीही लिहायची इच्छा झाली नाही.त्यातले एक म्हणजे व्याभिचार ही गोष्ट फक्त स्त्री संदर्भात उल्लेख करणे.
व्याभिचाराचे कळत नकळत समर्थन/उदात्तिकरण करणे.
घसरण्यालाच आनंद मानणे.
एखादी व्यक्ति मग ती स्त्री असो वा पुरुष,तिला कुठल्यातरी क्षणी का होईना सद्यस्थितीचे भान येऊन ती तोल सावरायला बघत असेल तर ती दांभिक व्यक्ति होते?
बरं यांना हे सर्व सांगणारी व्यक्ति खुलेआम स्वतः चरित्रहीन असल्याचा अभिमान बाळगते आहे किंबहुना लेखकाला तो हे सर्व खुलेआम सांगतो म्हणून कौतुक वाटते आहे असे वाटते.
एखाद्या व्यक्तिला जर कोणत्याही क्षणी अशा चोरट्या संबंधातुन माघारी घ्याविशी वाटणे हा नैैतिकतेचा दबाव कशावरुन? हे सरसकटीकरण करणार्या तुमच्या मित्राचे ,हे चान्स मारायला न मिळाल्याने झालेले फ्रस्ट्रेटीकरण जास्त वाटते आहे!!

पिलीयन रायडर's picture

1 Oct 2014 - 2:36 pm | पिलीयन रायडर

+१

मित्राला "चरित्रहीन" ही दिलेली उपाधी आणि पुढे जाऊन "तो एक प्रिन्सिपल्ड माणुस आहे" वगैरे वाचुन मजाच वाटली..
आणि घटनेतली स्त्री काही कारणाने मागे फिरली असेल तर "स्त्रियांना असंच एन्जॉय करायला आवडतं" हा सिद्धांत मांडलेला पाहुन तर अजुनच.. बरोबर आहे..ह्याशिवाय अजुन काही कारण असुच शकत नाही तिच्या वागण्याचं....

चान्स मारायला न मिळाल्याने झालेले फ्रस्ट्रेटीकरण जास्त वाटते आहे!!

अगदी अगदी!!!!

कानडाऊ योगेशु's picture

4 Oct 2014 - 9:15 pm | कानडाऊ योगेशु

पुढे जाऊन "तो एक प्रिन्सिपल्ड माणुस आहे"
चोरोंके भी अपने कुछ उसुल होते है ह्या अर्थाने बहुदा मारवासाहेबांना त्यांच्या मित्राला प्रिन्सिपल्ड म्हणायचे असावे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Oct 2014 - 4:14 am | निनाद मुक्काम प...

ह्या संदर्भात भारतीय स्त्रिया व परदेशी स्त्रिया ह्यांच्या तफावत असेल का , असे प्रकार परदेशात झालेले माझ्या ऐकिवात नाही ,
जाणकारांनी आपले मत द्यावे
भारतीय स्त्रियांच्या विषयी मला वैयक्तिक अनुभव नाही , मात्र परदेशात असे प्रकार होत नाहीत , लेखाच्या शेवटी दिलेल्या काही कारणापैकी एखादे सबळ कारण असेल तर परदेशात
स्त्रिया स्वतःचा आनंद स्वतः शोधतात , त्याला मी व्यभिचार मनात नाही , स्त्रियांचे लैंगिक शोषण झालेले वाचत भारतात मोठे झालो असल्याने , परदेशात व आजकाल भारतात महिलांना आपले लैंगिक आयुष्य आपल्या मर्जीने जगतांना पाहून समाधान वाटते , नर असो किंवा मादी, विरुद्ध किंवा सम लिंगी व्यक्तीशी सहमतीने लैंगिक संबंध साकारणे ह्यात माझ्या मते गैर काहीही नाही , नैतिकता हा प्रत्येकाचा अत्यंत खाजगी मामला आहे.
अवांतर
ह्या प्रकारामुळे चेपुवर एकमेकांना दिवसरात्र सतत पोकून असा आनंद मिळवणारे आठवले.

जेनी...'s picture

2 Oct 2014 - 10:26 am | जेनी...

ते ' पोकुन ' वाचायला जाम मज्जा वाटली :D

वारकरि रशियात's picture

2 Oct 2014 - 2:12 pm | वारकरि रशियात

धागा वाचला. सर्व प्रतिसादही वाचले.
अवांतरः बहुतांश माण्णीय सदश्यांनी ही ष्टुरी वाचली नाही का काय असे वाटले. http://heteanisagale.blogspot.in/2012_04_01_archive.html सुमारे अडीच वर्षांपूर्वी एका अन्य संस्थळावरही ती प्रकाशित झाली होती असे आठवते. (अभ्यास वाढवा असे म्हणावे काय?) मारवा यांच्या कथेपेक्षा यात थोडी वेगळी कारणमिमांसा आहे, दृष्य परिणाम काहीसा वेगळा आहे, तसेच काही साम्येही आहेत.
अर्थात, खरेच असे घडत असावे का, कितपत, स्टीरिओटाईप करावे का, समाजाने काय विचार करावा वगैरेंची उत्तरे देण्यास मी असमर्थ आहे.

चला या निमित्ताने समजले की कितिही Absurd धागा आणि त्याच्या कर्त्याचे illogical प्रतिसाद आले तरी सूज्ञ मिपाकर त्याला तर्कपूर्ण आणि वास्तवदर्शी जवाब देऊ शकतात.
तर्कविचक्षणतेसाठी माहितगार यान्चे विशेष अभिनंदन !

धागा लेखकाच्या दृष्टीने कायदेशीर बाजू हा ह्या धाग्याचा मुख्य उद्देश नाही; पण हवे तर अनुषंगिक अवांतर समजा पण या धाग्याच्या स्त्री आणि पुरुष दोन्ही वाचकांनी हे स्पष्ट लक्षात घेणे हितावह असेल की एखाद्द्या स्पर्षास विरोध होण्यात उशीर झाला म्हणजे तो आपोआप स्वयमेव वैध होईल असे नाही.

दहा मिंटाच्या तर्कातील काही उणीवा मी आधीच्या प्रतिसादातून नोंदवल्याच आहेत. इथेच वर "वारकरि रशियात" या आयडीने चर्चेस उपयूक्त एक कथा दिली आहे. या कथेच्या पुर्वार्धात, एक विवाहीत स्त्री एका सर्वसाधारण चर्चेत आपल्या जुन्या महाविद्यालयीन मित्राला औपचारीकतेचा भाग म्हणून आलास आमेरीकेला तर आमच्याकडेही येऊन जा असे आमंत्रण देते, आणि हा पठ्ठ्या मित्र त्या स्त्रीच्या घरी भेटावयास जातो. कुटूंबातील सर्वांशी व्यवस्थीत परिचय वगैरे होतो. पण अद्यापतरी त्या स्त्री साठी हे एक मित्रत्वाच अत्यंत औपचारीक नातं आहे तिच्या मनात तरी अद्याप "तसं" काही आलेल नाही आणि तो केवळ एक औपचारीक पाहूणा मात्र आहे. आणि कथेतील वर्णनानुसार वर्गमित्राचा छुपाहेतू "तसलाचं" काहीतरी आहे. कुटूंबातील इतर लोक बाहेर गेलेले आहेत आणि स्त्री टिव्हीवरील सर्व साधारण कार्यक्रम पहाण्यात मग्न होऊन गेली आहे. तिचा मीत्र मागून येतो तिच्या नकळत तिच्या खांद्यावर हात ठेवतो, (आपण या चर्चेसाठी तुर्तास खांद्यावर हात ठेवणे एवढ्याच बाबीचे विश्लेषण करू) या विशीष्ट कथे मध्ये ती लगेच बाजूला होते कारण त्या मित्राचा स्पर्ष त्या स्त्रिला अभिप्रेत नाही. समजा त्या मित्राने मागून येऊन खांद्यावर हात ठेवला आहे हे दहा मिनीटांनी जरी स्त्री च्या लक्षात आले असते तरीही तो स्पर्ष वैधही होत नाही त्यांनंतर पुढेही तिला स्पर्ष हवा असणार आहे असाही त्याचा अर्थ होत नाही आणि या धागा लेखात ज्या प्लॅटॉनीकतेची काल्पनिक सुखाची कल्पना केली आहे तसे काल्पनिक सुख त्या दहा मिनीटात ती स्त्री घेते आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. टिव्ही पहाण्यात स्त्री एवढी मग्न आहे की तिच्या खांद्यावर कुणी हात ठेवला आहे हे तिला बराच वेळ लक्षातच येणार नाही असेही होऊ शकते. अशीही शक्यता असू शकतेच की आपल्या घरी कुणी पाहूणा आहे नवरा मुलगा भाऊ बाहेर गेलेले आहेत याचेही तिला टिव्हीवरील कार्यक्रम पहाताना अगदीच विस्मरण झाले आहे तिच्या नवर्‍यालाही हि स्त्री टिव्ही पाहताना मागून येऊन खांद्यावर हात ठेवण्याची नेहमीची सवय आहे. खांद्यावरचा एक स्पर्ष स्त्रीच्या लक्षात आला आहे पण तिच तिकडे लक्षच नाहीए तो हात मित्राचा आहे हे लक्षातच आल नाहीए ती तो हात तिच्या नवर्‍याचाच समजतीए म्हणून ती लगेच विरोध करत नाही पण दहा मिनीटांनी तिच्या लक्षात येत पण तो स्पर्ष अभिप्रेत नसलेलाच आणि अवैध स्पर्षच राहतो.

इथे काही जणांच्या मनात शंका येईल की काही संस्कृतीक नात्यांमध्ये परस्परांच्या खांद्यांवर हात ठेवणे एक स्वाभाविक गोष्ट असू शकते परंतु या विशीष्ट कथेत हा मित्र विशीष्ट हेतूनेच खांद्यावर हात ठेवतो आहे. खांद्यावरून त्याचा हात दूर करताना तिने तो किती मवाळ वागली यालाही अर्थ असणार नाही. कारण सुरवातीस जाणता अजाणता झालेला किरकोळ प्रमाद म्हणून ती दुर्लक्षही करू शकते. पण त्याचा हेतू "तसां" वेगळा आहे हे लक्षात आल्या नंतर ती त्याच्यावर केस टाकू शकते.

या कथेच्या उत्तरार्धात ती त्याच्या वागण्यावर रागावते तरीही तो तिचा पिच्छा सोडत नाही. फक्त तिच्या रागावण्या मुळे तिचा मित्र तिला सगळ्या गोष्टी विचारून विचारून करावयास लागतो तिच मन जरास बदलतही. उत्तरार्धात आता तिच मन बदलल्या नंतरचे स्पष्ट पुर्वानुमतीने केलेले स्पर्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार वैध राहातील, भले त्यांच नात उत्तरार्धात वेगळ्या पातळीवर गेलेल असेल पण नंतर रिलेशनशीप आणि अर्थ बदललेले तरीही पुर्वार्धातला स्पर्ष कायदेशीर दृष्ट्या वैध म्हणवला जाऊ शकत नाही. एखाद्या मालमत्तेत तुम्ही अभिप्रेत नसलेला अनुमती शिवाय प्रवेश केला तो 'अवैध प्रवेश' नंतर भले तुम्ही लाख वेळा अनुमती सहीत प्रवेश करा अथवा भले त्या मालमत्तेचे मालक बना कायद्या नुसार तुमचा आधीचा पुर्वानुमती शिवायचा अभिप्रेत नसलेला प्रवेश अवैधच राहतो. विनयभंग करणार्‍या व्यक्तीशी भले ती स्त्री नंतर प्रेम करू द्यात अथवा विवाहही करू द्यात जिथ पर्यंत कायद्याचा संबंध असेल आधीची अवैध कृती अवैधच राहते. या प्रतिसादात मी केवळ माझ्या दृष्टीकोणातून (अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या देशातील) कायदेशीर बाजूचा माझ्या परीने उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे (न्यायिक आणि प्रत्यक्ष कायदेशीर भूमिकांमध्ये अंशत: तफावत असू शकते त्यासाठी तिथले तिथले कायदे संबंधीत वकीलांकडून समजून घेतले पाहीजेत) . या प्रतिसादात नैतिकतेचे माप लावून उहापोह केलेला नाही कारण वेळेची कमतरताही आणि शेवटी नैतीकतेची मुल्य व्यक्ती समाज देश काळ परत्वे बदलत जातात.

माझ्या या धाग्यावरी प्रतिसादांसाठी काही धन्यवाद येताहेत त्यांचा आदरपुर्वक स्विकार करतो.

सर्वांना दसर्‍याच्या शुभेच्छा

फिर खुला है दर-ए-अदालत-ए-नाज
गर्म बाजार-ए-फौजदारी है
फिर दिया पारा-ए-जिगर ने सवाल
एक फरियाद-ओ-आह्-ओ-जारी है
फिर हुए है गवाह-ए-इश्क, तलब
अश्कबारी का हुक्म जारी है
दिल-ओ-मिशगॉ का जो मुकदमा था
आज फिर उसकी रुबकारी है
बेखुदी बेसबब नही गालिब
कुछ तो है जिसकी पर्दा दारी है

मारवासाहेबां शिवाय इतर कुणी (प्रत्येक शब्दाच्या अनुवादा सहीत) अनुवाद उपलब्ध करू शकेल काय ? आणि अनुवाद करतच असाल तर कृपया शक्यतोवर प्रताधिकारमुक्त करून (अनुवाद विकिस्रोत प्रकल्पात वापरण्यासाठी).

माहीतगार जी आपण जनता की अदालत मे मुझ पर मुकदमा चला रहे है महीलाओ की और से पैरवी कर रहे है. शिवाय एक जाहीरात पाहीली होती का तुम्ही माहेरच्या साडी ची त्यात असे म्हणत की महीलांच्या अलोट गर्दीत ( त्या चालीवर म्हणायचे तर महीलांच्या अलोट प्रतिसादात तुम्ही पुढे सरकत आहात ) मग हा अनुवाद मी सोडुन असे का म्हणालात हो ? ओ ओ ओ अछा मी कदाचित अनुवाद मॅनिप्युलेट करेल अशी शंका वाटली की काय तुम्हाला ? आणि प्रताधिकार अहो गालिब चा शेर आहे हो आपल्या हो तोच तो असद त्याला कशाला लागतोय प्रताधिकार दीडएकशे वर्षा पुर्वीचा शेर आहे तो.

माहितगार's picture

3 Oct 2014 - 1:12 pm | माहितगार

अनुवादकाचा अनुवादावर प्रताधिकार तयार होतो.

अधिराज's picture

3 Oct 2014 - 3:59 pm | अधिराज

एक नंबरचा फडतूस आणि भंकस विकृत लेख. तरी स्वप्नांची राणी आणि पैसा यांनी चांगली लगावली आहे, प्रतिसादातून.

बोका-ए-आझम's picture

8 Oct 2014 - 8:46 pm | बोका-ए-आझम

प्लेटाॅनिक प्रेमाची किंवा नात्याची एक मस्त व्याख्या आहे - प्ले फाॅर वन, टाॅनिक फाॅर अनदर!

या लेखाला नाकारून आपण पुन्हा पुरुषप्रधान संस्कृती नुसार "स्त्रीला सुद्धा पुरुषाच्या बरोबरीने कामेच्छा असते" हे नाकारतो आहे आणि तिला भारतीय चौकटीत बसवून ती असे करुच शकत नाही किंवा तिने असे करुच नये असे स्वत:ला बजावण्याचा आपण प्रयत्न करत आहे.
विशेषत: विवाहित स्त्री असे करुच शकत नाही अशी आपण आपल्या मनाची समजूत केली आहे आणि हा लेख वाचणाऱ्या स्त्रीला तशी समजूत करायला भाग पाडत आहोत.
पुरुष फ्लर्ट असतात तशा स्त्रिया सुद्धा असतात.
तुम्ही "ऐतराज" हा प्रियन्का अक्शय आणि करीना चा चित्रपट पाहिला नाही का?