हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक.
असो..
आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी :
१. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही.
बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही. तुम्ही जर आजवर एकही हिंदी चित्रपट अजिबात पाहिला नसेल तरच तुम्हाला यात काही नाविन्य जाणवेल. इथे प्रचंड पराक्रमी नायक आहे (हजारो गोळ्यांचा सामना करूनही ज्याला त्यातली एकही स्पर्शून जात नाही, तो). साधी सरळ, गर्ल नेक्स्ट डोअर नायिका आहे (आई वडिलांच्या अपघाती निधनानंतर आजीने वाढवलेली). विमानापासून रणगाड्यापर्यंत फौजफाटा बाळगणारा, चुटकीसरशी हव्या त्या देशात मारेकरी पाठवू शकणारा खलनायक आहे(सुरुवातीलाच नायकाच्या भावाचा खून,.. ते जागतिक दहशतवाद इत्यादि). मॉडर्नपणाच्या नावाखाली अत्यंत आचरट वागणारी, भयंकर डोक्यात जाणारी नायिकेची आजी आहे (हे एक पात्र हल्ली उगाचच सर्व चित्रपटात "मस्ट हॅव" झालंय). नायक - नायिकेची अपघाती पहिली भेट आहे. तिचं पहिल्याच भेटीत त्याच्या प्रेमात पडणं आहे. विनकारण घुसवलेली विसंगत गाणी आहेत. हृतिक चांगला नाचतो म्हणून घुसवलेले नृत्याचे प्रसंग आहेत, मिशनच्या नावाखाली विविध देशातील निसर्गरम्य ठिकाणी नाचगाणी + पाठलाग, गोळीबार इत्यादि आहे. खलनायकाला संपवण्यामागे भावाच्या खुनाचा बदला + अंतरराष्ट्रीय दहसह्तवादाचे उच्चाटन असा दुहेरी उदात्त हेतू आहे. गेल्या पन्नास वर्षात वापरून बोथट झालेले सर्व क्लिशे इथे वापरलेत.
थोडक्यात कथानक याप्रमाणे.. जफर हा एक अंतर्राष्ट्रीय दहशतवादी लंडनच्या कैदेतून फरार होतो. भारत व इंग्लंडदर्म्यान गुन्हेगार हस्तांतरणाचा एक ऐतिहासिक करार होऊ घातलेला असतो. या करारात अडथळा आणण्यासाठी जफरसाहेब थेट कोहिनूर हिरा चोरण्याचा प्लॅन बनवतात. (त्याचा कराराशी काय संबंध? त्या कराराचा उल्लेख पुढे संपूर्ण चित्रपटात का नाही? वगैरे बावळट प्रश्न विचारायचे नाहीत). इतर कोणीही तो चोरू नये म्हणून हृतिक स्वतःच तो चोरतो. आता एकीकडे पोलिस (अत्यंत हास्यास्पद भूमिकेत पवन मल्होत्रा आणि विक्रम गोखले) आणी दुसरिकडे जफरचे गुड, विविध देशात त्याचा पाथलाग चालू करतात. चोर पोलिस खेळता खेळता सिमल्यात त्याला कतरीना भेटते व अपघातानेच या प्रकरणात ओढली जाते. मग हृतिक - कतरीना जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशात, सुंदर निर्जन बेटांवर वगरे त्यांच्याबरोबर चोर - पोलिस, पकडा पकडी वगैरे खेळतात. ३ तासांनंतर कथा अपेक्षित वळणावर येते, आणी हृतिक एकदाचा एकट्यानेच जफर गँगचा खातमा करतो, आणी जगाला वाचवतो. आणी भावाच्या खुनाचा बदला पण उरकतो.
अभिनय वगैरेसाठी फारसा कोणालाच वाव नसलेल्या या चित्रपतात हृतिकने नेहमीपेक्षा कमी ओव्हरअॅक्टिंग केली आहे. कतरीना यापुर्वीच्या कुठल्याही भूमिकेत किंवा "माझा", "पँटीन" वगैरे जाहिरातीत दिसते व वावरते, तशीच दिसली व वावरली आहे. लगानमध्ये इंग्रजांच्या भूमिका केलेल्यांपेक्षा आंग्लाळलेले हिंदी उच्चार करून तिने कमाल केली आहे.
सुनील शेट्टीने देखील नाकारावी इतकी दुय्यम भूमिका विक्रम गोखलेंनी का केली असावी, हे तेच जाणोत.
बाकी या चित्रपतात उल्लेखनीय काहीच नाही. नाविन्यही नाही. आज पहिल्याच दिवशी पुण्यातल्या मुल्टिप्लेक्समध्ये अर्ध्याहून कमी भरलेल्या हॉलमध्ये बँग बँग बघितला. तरीही आठवड्याभरात चित्रपटाने २००-४०० कोटी कमावल्याच्या बातम्या लवकरच छापून येणार, यात शंका नाही. (खरे - खोटे देवास ठावूक)
प्रतिक्रिया
3 Oct 2014 - 2:33 am | अर्धवटराव
=))
3 Oct 2014 - 5:53 am | जेपी
2007 नंतर हिंदी चित्रपट पाहणे सोडुन दिले.
तसाही बँग बँग हा नाईट & डे चा रिमेक आहे.
3 Oct 2014 - 6:02 am | रेवती
वाटलच होतं! शिनेमा अज्याबात बघणार नाही. कळवल्याबद्दल धन्यवाद.
3 Oct 2014 - 8:01 am | खटपट्या
बरे झाले सांगितलेत.
तुम्ही पुण्यात आहात ?
3 Oct 2014 - 9:13 am | खटपट्या
अरेरे, श्रीरंग आणि श्रीरंग जोशी मध्ये गोंधळ झाला
3 Oct 2014 - 8:43 am | श्रीरंग_जोशी
सदर लेखन परिक्षण म्हणून आवडले.
तुमच्या लेखणीतून उतरलेलं एखाद्या दर्जेदार चित्रपटाचं परिक्षण वाचायला आवडेल. चित्रपट जुना असला तरी चालेल.
3 Oct 2014 - 11:48 am | सर्वसाक्षी
संबंध आहे ना भाऊ! काय प्रचंड बुद्धिमत्ता वापरल्ये तो प्ल्यान बनवायला. भारत-ईंग्लंड यांत त्वरित गुन्हेगार हस्तांतरणाचा करार होऊ नये म्हणुन कोहिनूर एका भारतियाकरवी चोरुन घ्यायचा, भारतात आणायचा. अर्थातच इंग्लंड तो परत मागणार. मग भारतातले लोक 'कोहिनूर आमचाच होता, तुम्ही एकेकाळी आमच्याकडुन ढापला होतात आज तो दुसर्या कुणीतरी ढापुन इथे आणला' असे म्हणत कोहिनूर परत करायला भारत सरकारला विरोध करणार मग त्या मुद्द्यावरुन नवा करार फिसकटणार. आता तो हिरा चोराकडुन अतिरेकी पैशाच्या बदल्यात मिळवणार मग भारत सरकार तो परत करणार कसा आणि कुठुन? - हे असे प्रश्न मनात आणु नयेत.
आणि भाउ, तुम्ही लोकांना अफलातुन गमती जमती सांगितल्याच नाहीत! उदाहरणार्थ - समुद्रमंथनातुन वर येणार्या रत्नागत अचानक समुद्रातुन प्रकट होणारा हृतिक, आंतरराष्ट्रियभ्रमणसेवा कार्यान्वित केल्याविना आणि बेटावर कसलीही यंत्रणा नसता कतरिनाने दादीला केलेला कॉल, वगैरे वगैरे
एक चांगली गोष्ट सांगायची विसरलात - 'एकात्मका'. अतिरेकी टोळीत मुसलमान, ख्रिस्ती, काळे, गोरे सगळे एकदिलाने काम करतात. जय जगत!
3 Oct 2014 - 12:22 pm | मुक्त विहारि
टी.व्ही., क्रिकेट आणि हिंदी सिनेमे पाहणारे सगळीच मंडळी फार थोर.
3 Oct 2014 - 12:33 pm | काउबॉय
मायला सुपर हीरो च्या वर... नायकाला चायलेंज म्हणून काहीच नाही पण डियाज सोबतचि ठीक ठाक केमिस्ट्री म्हणून चित्रपट सुसह्य वाटला होता अर्थात त्यात बालिशपण होतेच आता तर त्याचा बोलीवुड अवतार बांग बांग बापरे...! ह्रितिक मधील नाविन्य संपले आहे ही इज स्टक एट इनोवेटर डायलेम्मा :(
4 Oct 2014 - 1:20 am | काउबॉय
रिव्हु जेवडे वाईट आहेत तितका खराब अजिबात नाही. धूम 3 व किक पेक्षा 90 पटीने चांगला आहे. कटरीना तर जबरा. लिप लॉक अपेक्षेइतका लांबलचक नसला तरी पुरेसा रोचक. आणि महत्वाचे म्हणजे हां हिरे चोरीवर अजिबात नाही. किंम्भुना कसल्याच चोरिवर हा चित्रपट नाही. 1 टाईम वोच.
बाकी ह्रितिक मधील नाविन्य संपले आह. तोच तोच पणा जानवतों
3 Oct 2014 - 1:31 pm | उदयन
रीमेक पेक्षा क्नाईट अॅण्ड डे हिंदीत भाषांतर करुन रिलीज केला असता तरी चालले असते
3 Oct 2014 - 4:36 pm | प्यारे१
आम्हाला प्रोमोज आवडलेले की.
चकाचक प्रोमो आहेत. पैसा ओतलाय भरपूर.
3 Oct 2014 - 4:42 pm | रेवती
जैसा दिखताय वैसा नही होताय ना प्यारेअंकल! लैच चकाचक काही समोर आलं की आपण सावध होतो त्यातला प्रकार! वाईट फक्त याचं वाटतं की कोट्यावधी रुपये कशावर उधळायचे याचे तारतम्य नाही, देशापरदेशात हा चित्रपट पाहणार्यांची संख्या इतकी आहे की वसूली होण्याची शक्यताच अधिक!
3 Oct 2014 - 4:52 pm | प्यारे१
पैसे देऊन चित्रपट बघायचे असतात ऐसा कौन बोला जी तुमे?
टोरेन्ट किस काम का फिर????
अनेक वर्षात चित्रपटगृहात चित्रपट पाहिला असे मज स्मरत नाही.
3 Oct 2014 - 4:55 pm | मुक्त विहारि
ये हुई ना बात...
चलो इस बात पे एक-एक बियर हो जाय....
3 Oct 2014 - 5:00 pm | प्यारे१
तुम्ही करा चालू. आम्हाला ३-४ दिवस आहेत.
(कशाचा कशाला संबंध असला तर ते मुवि कसे ;) )
3 Oct 2014 - 5:57 pm | रेवती
मग ठीक आहे.
3 Oct 2014 - 6:30 pm | एस
हैदर मात्र कमाल चित्रपट आहे असे आत्तापर्यंतच्या परीक्षणांवरून वाटत आहे. कुणी पाहिला असल्यास जरूर धागा काढावा अशी विनंती.
3 Oct 2014 - 7:26 pm | अत्रुप्त आत्मा
@सुनील शेट्टीने देखील नाकारावी इतकी दुय्यम भूमिका विक्रम गोखलेंनी का केली असावी, हे तेच जाणोत.>>> :-D
4 Oct 2014 - 10:20 am | कपिलमुनी
बोत डालरा मिले होईंगे रे उस्कू !
3 Oct 2014 - 7:53 pm | अंतु बर्वा
टिपः मी चित्रपट पाहिलेला नाही, बघेनच याची ग्यारंटी नाही.. (आणी मि ह्रुतिकचा मोठ्ठा फ्यानही नाही :-))
मला एका गोष्टीचं राहुन राहुन आश्चर्य वाटतं, मिशन ईम्पॉसिबल किंवा कुठलाही बाँडपट घ्या. नायकाला हार्डली एखादी गोळी लागते.. तीही दंडात वगैरे. या चित्रपटात सुद्धा अशाच प्रकारची अचाट साहसी द्रुष्ये पहावयास मिळतात. तरीही यांचा स्वताचा असा चाहता ग्रुप आहेच. मुळात चित्रपट पहायला माणुस का जातो? फिक्शन साहित्य का वाचतो? मनोरंजन म्हणुनच ना? मग सर्व काही कॉमन माणसा सारख असाव असा अट्टहास का? त्यासाठी बाकी वेगळ्या जॉनरचे चित्रपट आहेत की...
एकीकडे आपल्याकडे हॉलीवुडच्या तोडीचे चित्रपट बनत नाहीत असं म्हणुन दुसरीकडे असं कसं कुणी चालत्या गाडीतुन ट्रेन मधे उडी मारु शकेल? असं म्हणायचं. अॅक्शन फिल्म जॉनरचा चित्रपट असेल आणी हिरोला दोन चार व्हीलनला झोपवता येत नसेल तर काय फायदा?
मला एवढचं म्हणायचय की एकदा का मसाला अॅक्शन चित्रपट आहे, हे अॅक्सेप्ट करुन मग जर चित्रपट पाहीला (स्पेशली जर खिशाला चाट लावुन पहात असाल तर!) तर तो जास्त एन्जॉय करता येउ शकेल.
3 Oct 2014 - 10:13 pm | पैसा
खतरनाक परीक्षण! हृतिक रोशनला बघायला लोक पैशे देऊन का जातात हे आजपर्यंत कळलेलं नाही!
4 Oct 2014 - 10:22 am | कपिलमुनी
३ गोळ्यांपैकी एक गोळी लागून नायक १० मिनिटात मेला तर कोन बघणार ?
चित्रपट हे वास्तवापासून दूर जाउन मनोरंजनाचे साधन आहे. त्याच दृष्टीकोनातून बघायचे.
4 Oct 2014 - 11:09 am | नाव आडनाव
:)
माझ्या लहानपणी एक चित्रपट बघत असतांना नायकाला गोळी लागल्याचं एक दॄश्य होतं. मी वडीलांना विचारलं - आता? हा भाउ तर मेला? त्यांनी सांगितलं नायक मरत नसतो, नाही तर चित्रपट पुढे कोण बघणार? आणी खरंचच हा भाउ पुढच्या दॄश्यात उठून उभा :) तेंव्हा पासून माझा कन्सेप्ट पक्का झाला - चित्रपटाच्या सुरवातीला तरी नायक मरत नसतो :) (आराधना टाइप चित्रपट सोडले तर).
नायकाच्या बापाचं मात्र एव्हढं नशीब नसतं. नायकाचा बाप बरेचदा भिंती वरच टांगलेला असतो :)
नायकाच्या गाडी ला कधी अपघात झाला तर जंगलातले आदिवासी बांधव याला वाचवायची जवाबदारी घेतात, घरीच असेल तर नायकाची आई / नायीका देवाला उपकार केल्यासारखं गाणं म्हणून ब्लॅकमेल करायला तयार, नायक दवाखण्यात असेल तर रक्त द्यायला एक तरूण येतो आणी कळतं तो तरूण म्हणजे नायकाचा भाऊ आहे - आता एव्हढं सगळं असेल तर त्या बिचार्या नायकाची काय हिम्मत मरायची :)
4 Oct 2014 - 12:27 pm | तुषार काळभोर
कारण बहुतेक चित्रपटकर्त्यांची (दिग्दर्शक/निर्माते/संकलक्/पटकथालेखक्/सिनेमॅटोग्राफर) बौद्धिक.मानसिक.वैचारिक पातळी तेव्ह्ढी नसावी.
उदा. धूम२: सुरुवातीचा रेल्वेचा सेक्वेन्स. हृतिक रेल्वेच्या मागे घसरत जात असतो (रेल्वेला दोरी बांधून). रेल्वेवर एक माणूस उभा आहे जो शॉटगनने त्याला गोळ्या घालतोय. गोळ्या चुकवण्यासाठी हृतिक रुळांच्या डावी-उजवीकडे उड्या मारतोय. आणि तो वरचा माणूस हृतिक दुसर्या बाजूला जाऊन सेटल झाल्यानंतर ( अरेच्चा!! हा आता तर उजवीकडे होता, डावीकडे कधी गेला?!?!) असा विचार करत मग त्याची शॉटगन दुसर्याबाजूला वळवतो.
4 Oct 2014 - 10:06 pm | चिगो
पाहीला.. "नाईट अँड डे"चा रिमेक असल्याने आणि तो मारधाडपट असल्याचे माहीत असल्याने फार अपेक्षा नव्हत्याच. पण इंग्रजी अवताराच्या तुलनेत लैच ढिला वाटला चित्रपट.. आणि मुख्य म्हणजे, ह्या लोकांनी कधी देहरादून कधी पाहीलं की नाही? बर्फ आणि तो ही ए ऽ ऽ वढा देहरादूनमध्ये? च्यामारी, काय बी येडं बनवता का राव..
5 Oct 2014 - 10:39 pm | दशानन
>>>ह्या लोकांनी कधी देहरादून कधी पाहीलं की नाही? बर्फ आणि तो ही ए ऽ ऽ वढा देहरादूनमध्ये?
=)) मेल्ल्लो!!!
5 Oct 2014 - 4:53 pm | निनाद मुक्काम प...
जो पर्यंत आपल्याकडे कुठलाही मोठ्या बजेट चा सिनेमा त्याचे परीक्षण किंवा ज्यांनी तो पहिला आहे त्यांच्याकडून माहिती न घेता
नित्यानियामानाने पहिल्या विक एंड मधेच सिनेमा पहिलाच पाहिजे ह्या न्यायाने आपला खिसा खाली करतात व त्यातील काही
जण तो सिनेमा किती भंगार आहे हे सांगतांना पुढच्या खेपेस असा शिनेमा आला तर पुढच्यास ठेस मागचा दीड शहाणा ह्या उक्ती नुसार परत पहिला जातात. मग अश्या सिनेमांनी कोट्यावधी गल्ला भरवला तर त्यात नवल ते काय.
मुळात सिनेमा पाहणे हे लोकांच्या आजकाल जीवनशैलीचा अविभाज्य झाले आहे. तो कसाही असो , आणि म्हणूनच दिवसाला ५ ते ७ शो लागत असल्याने प्रत्येक शो हाउस फुल झाला नाही तरी पैसा कमावला जातो.
त्यापेक्ष्या हैदर पहा , तो तुम्हाला आवडेल किंवा आवडणार नाही ,
त्यांतील आशयाशी विषयाची तुम्ही सहमत व्हाल किंवा नाही पण
थेटर मधून एक अस्वस्थ करणारा अनुभव घेऊन बाहेर याल , काहीतरी वेगळे पाहिल्याचे समाधान मिळाले असते,
लेखकाने हैदर पेक्ष्या सदर सिनेमा पाहण्यास प्राधान्य दिले ह्यातून असे सिनेमे सातत्याने का बनवले जाते ह्याचे उत्तर मिळते,
आता हेपी न्यू इयर च्या परीक्षणाची वाट पाहत आहे.
6 Oct 2014 - 10:23 am | विश्वनाथ मेहेंदळे
चोख !!!
6 Oct 2014 - 11:48 am | समीरसूर
छान परीक्षण! :-)
बघायला जाणारच नव्हतो आता तर अॅफेडेवीट करून सांगीन की बघणार नाही.
'हैदर' पाहिला का कुणी? विशाल भारद्वाजचे चित्रपट मला अजिबात आवडत नाहीत. 'मटरू की बिजली का मंडोला' सारखी नावे जो चित्रपटांना देतो त्याला चित्रपटाच्या मार्केटिंगमधलं ओ की ठो कळत नसावं अशी माझी खात्री आहे. 'ओमकारा'चं कौतुक झालं होतं पण मला १० मिनिटेदेखील बघवला गेला नाही 'ओमकारा'. शाहिद कपूर आवडत नसल्याने आणि विशाल भारद्वाजचा असल्याने 'हैदर'देखील पाहणार नाहीये.
6 Oct 2014 - 12:34 pm | पिलीयन रायडर
समीरसुर तुम्ही इतक्या वेळा विचारताय म्हणुन सांगते.. "हो हो..मी पाहिला हैदर!!"
मला तरी ठिक वाटला.. सगळ्यांचा अभिनय खरंच छान झाला आहे.. अगदी शाहीदचा सुद्धा... गाणी सुंदर आहेत (श्रद्धा कपुर आणि शाहिदचं एक गाणं घुसडलं आहे ज्यानी अगदीच रसभंग होतो..) हॅम्लेटचा प्लॉट काश्मिरच्या पार्श्वभुमीवर जमला आहे.. पण पण पण... अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं..
मध्यंतर होताना एकदम कलाटणी मिळाल्या सारखं वाटतं.. आपण एकदम सरसावुन बसतो की आता काहीतरी लय भारी होणारे.. पण तसं काही होत नाही.. अत्यंत रटाळपणे पिक्चर पुढे जातो.. खुप उलगडुन दाखवायचं असेल कदाचित दिग्दर्शकाला..
गाणी आवडली मला.. ठेका धरायला लावणारी आहेत.. शाहिदचा डान्सही सुंदरच.. संवादही उत्तम जमलेत.. शाहिद त्याच्या प्रेयसीला मनातला गोंधळ बोलुन दाखवताना "To be or not to be.." सारखी जी कविता हिंदीत म्हणतो तो प्रसंग शाहिदला जमेल असं मला वाटलं नव्हतं.. पण जमलाय..
चौकात उभं राहुन तो वेड्या सारखं बोलत असतो ते ही त्याला जमलय...
एकंदरीत खुप लांबल्याने शेवट परिणामकारक होत नाही.. आणि नंतर चित्रपट फारसा लक्षातही रहात नाही...
चित्रपटात अजुन काही फिलोसोफिकल अँगल असल्यास मज अल्पबुद्धी प्राण्याला समजावुन सांगावा...
6 Oct 2014 - 1:53 pm | प्यारे१
+१११
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
>>> अत्यंत लांबलचक (पावणे तीन तास) आणि संथ सिनेमा आहे.. माझं शेवटी शेवटी डोकं दुखायला लागलं.. आता संपवा असंही झालं..
+१११
शेक्सपिअर नि इतरदेखील लेखकांच्या लिखाणांचं भारतीयकरण छान जमवतो विशाल भारद्वाज.
ओमकारा बोअर झाला म्हणून आवडला नाही म्हणणारे समीरसूर पहिलेच दिसले.
6 Oct 2014 - 3:32 pm | समीरसूर
हो, खरं आहे. 'ओमकारा' बहुतेक सगळ्यांना आवडला होता. मग बॉक्स ऑफिसवर का फ्लॉप झाला होता हे मला पडलेलं कोडं आहे. मेरे को नही झेप्या...कारणं तिच, संथपणा, रटाळपणा, मंदगती...
6 Oct 2014 - 3:49 pm | प्यारे१
ओमकारा संथ नव्हता. ओमकाराची भाषा 'वंगाळ' होती. सहकुटुंब बघायला जाण्यासारखी नव्हती.
बाकी चित्रपट फ्लॉप आणि हीट ही सगळी बकवास आहे.
सांडांच्या भंकस ला ३५० च्या वर कोटीची कमाई आणि खरंच चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक नसणं हे आपल्याकडं सर्रास चालतं.
आपल्याकडं हिरोचं शेवटाला जिवंत राहणं हे चित्रपट यशस्वी होण्यासाठी आवश्यक घटक म्हणून गणलं जावं. शेक्सपिअरचे नायक मरतात त्यामुळं त्याच्या अडॅप्टेशनमधले विशाल भारद्वाजचे नायक पण मरतात. चित्रपट कसा 'यशस्वी' व्हावा बरं?
6 Oct 2014 - 4:42 pm | समीरसूर
पण काही ऑफबीट चित्रपट बर्यापैकी चालतातदेखील...'ब्लॅक' चालला होता ('ब्लॅक' मला स्वतःला आवडला नव्हता). 'प्रतिघात', 'अंकुश' थोडे वेगळे होते पण चालले होते. सादरीकरण चांगले असेल तर चित्रपट चालण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात असे वाटते. 'अर्थ' चालला होता. चित्रपटाच्या प्रसंगांमध्ये ठासून भरलेली उत्सुकता हे एक मुख्य कारण होते. कथा-पटकथा निश्चितच चांगली होती. वेग, घटनांची संख्या टिपिकल मसाला चित्रपटाच्या तुलनेत खूपच कमी होती. पण बघतांना कंटाळा येत नाही.
चित्रपट चालला म्हणजे चांगलाच असतो असं नाही पण जास्तीत जास्त लोकांना तो आवडलेला असतो हे लक्षात घेतले पाहिजे. चित्रपट चालला नाही म्हणजे तो चांगला असतो असंही नाही. पुरस्कार मिळाले म्हणजे चित्रपट चांगला असतो असंही नाही. ठरवून पुरस्कारांसाठी बनवलेल्या चित्रपटांची उदाहरणे (सिंधुताई सपकाळ, जोगवा) कमी नाहीत.
6 Oct 2014 - 4:52 pm | प्रसाद१९७१
तुमचा गैर समज आहे, ओंकारा हा हीट सिनेमा समजला जातो, म्हणजे निर्मात्याला दुप्पट पैसे मिळवुन देणारा. आणि त्याला चॅनेल्स वर पण चांगली मागणी होती.
7 Oct 2014 - 10:30 am | समीरसूर
माझी माहिती चुकीची असू शकेल. जालावर काही ठिकाणी तो फ्लॉप तर काही ठिकाणी कमिशन अर्नर (बहुधा खर्च जेमतेम वसूल करणारा) तर काही ठिकाणी बर्यापैकी यशस्वी अशी माहिती मिळाली. अगदी ठोस 'यशस्वी' किंवा 'हिट' असं कुठेच दिसलं नाही. विकीपीडियावर 'ओमकारा' परदेशात यशस्वी आणि भारतात बर्यापैकी यशस्वी असं दिलेलं आहे. म्हणजे निर्भेळ आणि नि:संशय यश (जसं 'धूम ३' किंवा 'दबंग' किंवा 'रावडी राठोड' यांना मिळालं) तसं फारसं दिसलं नाही. असो.
6 Oct 2014 - 3:30 pm | समीरसूर
म्हणजे माझं विशालच्या चित्रपटांचं निरीक्षण खरं आहे तर. पकाऊ पिक्चर्स बनवतो तो. ;-) 'हैदर' यादीतून बाद! फालतू रटाळ पिक्चर बघून डोक्याला शॉट कोण लावून घेईल? आधीच 'फॅनी'चा कंटाळा अजून उतरलेला नाहीये. पिक्चर असा पाहिजे की स्टार्ट टू एंड प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाला पाहिजे. प्रेक्षक पूर्णपणे त्या चित्रपटाच्या कथेत रमला पाहिजे, रंगला पाहिजे. आता काय होणार असा प्रश्न त्याला पडला पाहिजे किंवा काय होणार हे माहिती असूनही ते कसं होणार हा प्रश्न पडला पाहिजे. बघतांना मजा आला पाहिजे...गेल्या काही वर्षात 'जॉनी गद्दार' आणि 'तलाश' हे चित्रपट मला तसे वाटले. बाकी 'चेन्नई एक्स्प्रेस' (धमाल कॉमेडी जॉनर) पण मला मजेदार वाटला होता.
6 Oct 2014 - 3:37 pm | पिलीयन रायडर
मलाही आता काय होणार अशी उत्सुकता लावणारे पिक्चर आवडतात.. इथे तर खरंच खुप वाट बघावी लागते काही घडायची...
6 Oct 2014 - 4:55 pm | काउबॉय
पूर्वी सारखी ती आता इंडी राहिलेली नाही. अगदी फुल्फ्लेज व्यावसायिक झाली आहे बँका कर्ज देतात, सुरेख मार्केटिंग आहे दर्जेदार तांत्रिक बाजू आहेत ताकतवान अभिनेतेही आहेत मग इतक सगळ जुळुन आल्यावर प्रत्येक चित्रपट निव्वळ स्टार पावर वर का विसंबुन आहे त्यापेक्षा दिक्शिणेत जास्त चांगले चित्रपट बनतात. आणि तो शंकर डायरेक्टर तर जबराच.
7 Oct 2014 - 11:16 am | पिलीयन रायडर
एक महत्वाचं सांगायचं राहिलं...
भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे... किंवा तसे असले तरी सॉफ्ट कॉर्नर दहशतवाद्यांना मिळावा म्हणुन असे चित्रण केले आहे की काय असे वाटुन गेले.. मुळात एवढं दाखवत बसण्याची गरज होती का हा एक प्रश्न आहेच..
8 Oct 2014 - 5:52 am | निनाद मुक्काम प...
@भारतीय अधिकारी संशयितांची उलटतपासणी ज्या पद्धतीने घेतात ते जरा अतिरंजित पद्धतीने दाखव्ले आहे..
हे तुम्हाला अतिरंजित वाटले असेल पण असे होत नाही असे आपण कसे म्हणू शकतो.
आपणास उलटतपासणी कशी घेतात ह्याची ठोस माहिती आहे का
दहशतवाद जेव्हा जगात सुरु झाला तेव्हा त्याच्याशी कसे लढ्याचे ह्याबाबत अनेक मते जगभरातील राष्ट्रात सैन्यात होता , हे छुपे युद्ध स्थानिक लोकांच्या सहानभूती व त्यांना भीती व अन्य मार्गाने हे दहशतवादी लढतात , त्यांच्यालेखी मानवाधिकार वैगैरे प्रकार अस्तित्वात नसतात त्यामुळे जगभरातील प्रत्येक सैन्य जे दहशतवादाची युद्ध लढले तेथे मानवाधिकाराचे हनन झाल्याचे प्रकार घडले ,
मुल मुद्दा असा कि दहशत वाद्यांना हे अधिकार लागू होतात का
आणि महत्वाचे म्हणजे हि लोक स्थानिक माणसात एवढे बेमालून मिसळतात आणि स्लीपर सेल बनवतात की त्यांना शोधणे कठीण होते त्यामुळे खूपदा सुक्या सोबत ओले जळते.
भारताशी लोकशाही प्रगल्भ आहे म्हणूनच एखाद्या मुद्द्यांवर दोन्ही अंगाने विचार केला जातो ,
ह्या आधी दिल से मध्ये मनी ने आपले सैनिक नायिकेवर तिच्या गावातील अनेक मुलींवर बलात्कार करतांना दाखवले होते , तेन्गो चार्ली मध्ये बॉबी देवेल आपल्या सैनिक मित्राला बलात्कार करतांना पाहून गोळ्या घालतो , असे सिनेमे आपल्या कडे चालत नाहीत कारण नेते भ्रष्ट असले तरी जवान मात्र तसे नाही अशी आपल्याकडे सगळ्याची कल्पना आहे , पण शेवटी ती सुद्धा मनसे आहेत , सतत ताणतणाव व इतर अनेक कारणांनी ते खुपदा मानसिक रोगी होतात ,, डॉ खरे ह्या बाबत अधिक सांगतील.
8 Oct 2014 - 10:22 am | पिलीयन रायडर
हे राहिलं वाटतं वाचायचं..
आपले सैन्य दहशतवाद्यांना "या..या..बसा... कसं काय बरंय ना.." अशा गप्पा मारत त्यांची उलटतपासणी करत असेल अशा माझ्याही काही भाबड्या कल्पना नाहीत.. त्यामुळे तुम्ही जे जे काही वर लिहीलय ते मलाही माहिती आहे..
माझा मुद्दा असा होता की, मला हे चित्रण एकतर्फी वाटलं.. ज्यात भारतीय आर्मी विनाकारण निरपराध लोकांचा छळ करते.. संशयाच्या नावावर वाट्टेल त्याला पकडुन नेते.. काही अंशी हे सत्य असलं तरी त्या मागची कारणं चित्रपटात स्पष्ट होत नाहीत.. त्यामुळे आर्मीच एका क्षणी व्हिलन वाटु लागते.. शिवाय एवढ्या डीटेलिंगची गरज खरच होती का हा ही प्रश्न मला पडला...
अर्थात परत.. ही माझी मतं आहेत.. माझ्या अकलेच्या आवाक्याप्रमाणे बनवलेली... हेच्च सत्यच आहेच असा माझा काहिही अट्टाहास नाही...
8 Oct 2014 - 10:36 am | पैसा
भारतीय सिनेमासृष्टीचे अंडरवर्ल्डशी संबंध आणि तिथे येणारा मुबलक पैसा याबद्दलच्या बातम्या आणि कथा वाचल्या तर याबद्दल आश्चर्य वाटणार नाही.
8 Oct 2014 - 10:42 am | पिलीयन रायडर
हं... शक्य आहे...
8 Oct 2014 - 2:09 pm | काउबॉय
इथे गायब का केले जात नाहित ? का फक्त म्हवडयाचे(हां कोण?) धागे भिंग लाउन तपासले जातात ?
असो कश्मीर मधील प्रत्येक कृतिला 90 च्या दशकातील विस्थापितांची व ज्या प्रकारे विस्थापन लादले याचीकाळी किनार असावी अर्थातच यावर कोणत्याही मानवहक्क संबंधितानी आवाजही उठवला नसेल.असो हैदर बघितला नाही आणि बघायची इच्छाही नाही. ओम्कारात बरिच शिविगाळ आहे ऐकले होते म्हणून बघायला गेलो.
यापेक्षा कहोना प्यार है समाजातिल ज्वलंत प्रश्नाची योग्य हाताळणी करतो असे राहून र्राहून मनापासून वाटते.
6 Oct 2014 - 3:34 pm | रेवती
मी हैदर बघणार नाही पण खूबसुरत बघून मोठी चूक केलीये. सोनम कापूर तशीही आवडत नाही पण रेखाच्या पूर्वीच्या खूबसुरतशी काही साधर्म्य असेल म्हणून बघितला अन शिनेमाच्या मध्येच झोप लागली.
6 Oct 2014 - 5:35 pm | वेल्लाभट
पिक्चर कसेही असोत; इथली परीक्षणं वाचून लईच्च मजा येते मला ! हाहहाहाअहाहाअहा
6 Oct 2014 - 6:46 pm | रेवती
मलाही ओमकारा अजूनही समजला नाहीये (मी शेवटचा अर्धा बघितलाय). त्यातील एक गाणे आवडते, कुठले ते लगेच आठवत नाही आता पण श्रवणीय आहे. ओ पिहू रे.....असं काहीतरी आहे त्यात.
7 Oct 2014 - 1:14 am | प्यारे१
http://www.youtube.com/watch?v=xthAVytCTPI
ओ साथी रे दिन डूबे ना!
7 Oct 2014 - 9:42 am | समीरसूर
मला पण जड गेला. म्हणून सोडून दिला. ;-)
7 Oct 2014 - 5:28 pm | रेवती
हां, तेच ते, ओ साथी रे, गाणं चांगलय. शिनेमा जौ दे!
8 Oct 2014 - 1:50 pm | प्यारे१
सोप्पा आहे हो!
शेक्सपिअरच्या ओथेल्लोचं भारतीयकरण विशाल भारद्वाज नं केलंय. उत्तरप्रदेशच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर.
एक गुंड राजकारणाच्या वाटेवर जात असताना त्याची जागा 'बाहुबली' म्हणून घेताना एका जुन्या निष्ठावंताला (सैफ अलि) डावललं जातं नि तो सूड घेण्यासाठी नायकाच्या मनात नायिका (करीना) आणि नवीन बाहुबली (विवेक ओबेरॉय) ह्यांच्या संबंधाबद्दल संशय पेरतो.
ओथेल्लो मधला नायिकेचा रुमाल इथं कंबरेचा हार की काय म्हणतात तो बनला आहे.
'जो अपने बाप की सगी ना हो सकी वो तेरी क्या होगी' असा नायिकेच्या वडलांचा डायलॉग हे ह्या संशयाचं मूळ.
थोडक्यात साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रूण.