दुसरा मुक्काम असतो ३५०कि.मि. वरील धारचुला.कौसानी ते धारचुला हा प्रवासही नितांत सुंदर आहे.वाटेत प्रथम येते बागेश्वर.८०० वर्शापुर्वीचे मंदिर आहे वैजनाथाचे.मंदिरासमोर गोमती नदी आहे.स्वच्छ नितळ पाणी खळखळ वाहत असते,मासेही खुप आहेत.मंदिरातील पार्वतीमातेची अप्रतिम सुंदर मुर्ती शिल्पकलेचा उत्क्रुष्ट नमुना आहे.मुर्तिच्या प्रभावळीवर शिव-पार्वती विवाह सोहळा शिल्पांकित केलेला आहे.मन्दिरा समोर एक मोठा गोल गुळगुळीत दगड आहे,तो एका माणसाला साधा हलवताही येत नाही पण नऊ माणसानी फक्त एक बोट दगडाला लावुन नऊ नऊ नऊ असे म्हटले की तो डोक्या पर्यंत वरती उचलला जातॉ.आठ किंवा दहा माणसानी असे केले तरी तो उचलता येत नाही.
नंतर चिकोडी येथे निगमच्या रेस्टहाउस मध्ये भोजनासाठी थांबतो.चिकोडी येथे सुंदर बागबगिचा आहे,हिमालयाची शिखर शोभा पहाण्या साठी एक निरीक्षण मनोरा आहे,दुर्बिणीची सोय केलेली आहे.भोजन उत्क्रुष्ट असते.भोजनानंतर पुढे येते दीदीहाट.निसर्ग सौंदर्याची लयलुट आहे इथे.रस्त्याच्या एका बाजुला डोंगर दाट व्रुक्षराजीने भरलेला जमिनीवर रंगीबिरंगी फुलाचे गालिचे हिरव्या मखमालीचे.मध्ये रस्ता दुसर्या बाजुला खोल दरी.दरीत खळखळ वाहणारी नदी तिच्या दोन्ही तिरांवरही हिरवळीचा गालिचा पसरलेला.येथ नारायणस्वामी यानी स्थापन केलेले कॉलेज आहे.
पुढे निघालो,ड्रायव्हरने एकदम करकचुन ब्रेक लावला निसर्गदर्शनात रमलेले आम्ही पुढे आदळले गेलो.काय झाले? क्या हुआ? च्या गोंधळात कळले गाडीच्या पुढे एक मोठी घोरपड आली होती,भराभर सगळे खाली उतरलो पाठमोरी दिसली ती लगबगीने डोंगर उतारावरुन गायब झाली,आम्हाला फक्त शेपटीचा फोटो काढता आला.बस निघाली थोड्याच वेळात मेंढ्यांचा मोठा कळप आडवा आला सगळे खाली उतरुन त्यांच्या मऊ केसावरुन हात फिरवण्या साठी धडपडू लागले,यांनी माझ्या खांद्यावर एक पिलू दिले,खुप छान मऊमऊ गोंडस होते.
धारचुला पर्यंत सारा प्रवास घाटाचा आहे,निसर्गाने आपले सौंदर्य इथे नुसते उधळले आहे. रस्ता बरा आहे कारण डोंगर ढासळून रस्ता खचण्याचे प्रकार नेहेमीच होत असतात. धारचुला येई पर्यंत सन्ध्याकाळ झाली.धार म्हणजे पर्वतमाथा आणि चुला म्हणजे चुल.तीन प्रचंड डोंगरांच्या माथ्याचा शिव-पार्वतीचा चुला;धारचुला.
धारचुला येथे निगमचे सुंदर प्रशस्त रेस्टहाउस आहे काली नदीच्या तीरावर.काली नावाप्रमाणे रौद्रभीषण प्रवाह अत्यंत वेगाने रोंरावत धावत असतो.नदीच्या अल्याड भारतचा धारचुला पल्याड नेपाळचा धारचुला आहे.दोन्ही देशात येण्याजाण्या साठी रेस्टहाउस जवळच कालीच्या दोन्ही तीराना जोडणारा झुलता पूल आहे.सकाळी १० ते सन्ध्याकाळी ६ पर्यंत मोकळे व्यवहार होतात,पासपोर्ट व्हिसा वगैरे कटकटी नाहीत.नेपाळ!भारताचा सच्चा आणि एकमेव हिंदू राष्ट्रमित्र.
धारचुलाचा मुक्काम सुखकारक असतो.येथे आपल्या सामानाचे वजन केले जाते,प्रत्येकी फक्त २५किलो वजन बरोबर नेता येते. यात्रेच्या यादीत हे सांगितलेले होते तरिही काही लोकानी अवजड सुटकेस आणल्या होत्या सामानही जास्त होते मग रेस्टहाउसच्या गोडाउन मध्ये ते ठेवले.सर्वांची मेडिकल केली.रेस्टहाउसचे काली सन्मुखचे कॉरिडॉर प्रशस्त आहे,तिथे खुर्च्या टाकुन बसलो गप्पाटप्पा करत.थोडी फोटोग्राफी केली.उद्यापासुन खरी यात्रा सुरु.क्रमशः
प्रतिक्रिया
30 Aug 2014 - 3:13 pm | संजय क्षीरसागर
तेवढा तरी टाका.
30 Aug 2014 - 6:04 pm | खुशि
अहो तो अल्बम मध्ये आहे तो इथे कसा देता येइल.
30 Aug 2014 - 10:11 pm | टवाळ कार्टा
नक्की का?
31 Aug 2014 - 1:20 pm | खुशि
हो नक्की आम्ही उचलला होता.शंका असेल तर आपण तिथे जा तुमच्या बरोबर आठ लोकाना घेऊन आणि खात्री करुन घ्या.
31 Aug 2014 - 3:17 pm | टवाळ कार्टा
नक्की म्हणजे ९ ऐवजी १० किंवा जास्त माणसांनी उचलला जातो की नाही ते बघितलेले का?? आणि त्या सगळ्यांमधे एकसुध्धा स्थानीक नसताना... काहीवेळेस एखाद्या ठिकाणाचे एखदे वैशिश्ठ्य तसेच रहावे यासाठी स्थानिक लोकसुध्धा चिटींग करतात
30 Aug 2014 - 10:50 pm | कवितानागेश
हिमालयातले फोटो टाकाच खुशिताई. अल्बममधल्या फोटोचे डिजिटल फोटो काढा किंवा स्कॅनरवर स्कॅन करा. मग अपलोड करा. क्वालिटी थोडी उतरते पण तरिही फोटो बघायला आवडतीलच.
हा एक देतेय तो साध्या फिल्मच्या कॅमेरानी काढ्लेला आणि साध्या स्केनरवर स्कॅन केलेला फोटो आहे. तशी क्वालिटी नक्की येइल.
शिवाय हल्ली संक्षी आजोबा तुमचे धागे आवडीनी वाचतायत. निदान त्यांच्यासाठीतरी तेवढा एक घोरपडीच्या शेपटीचा फोटो टाकाच. (ह.घ्या.) ;)