१) आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ?
२) आपण ट्रेन पकडायला जिथे उभे असतो त्यापेक्षा समोरच्याच फलाटावर गाड्या जास्त येतात?
३) आपण एखाद्या गोष्टीसाठी जीव काढून ठेवतो तरी ती होत नाही पण तीच कोणी दुसऱ्याने केली की सहज होते?
४) आपण एखाद्या कल्पनेला जितके घाबरतो आणि लांब ठेवायचा प्रयत्न करतो तेवढीच ती कल्पना आपल्या बोकांडी बसते ?
५) जगातल्या प्रत्येक माणसाला जरी लॉटरी लागली तरी त्यातही आपला नंबर शेवटचा का असतो ?
६) एखादी संकल्पना आपल्यापुढे कोणीतरी मांड्ल्यावर आणि ती आपल्याला बेहद्द आवडल्यावर ही आपल्याला सुद्धा सुचली असती असं का वाटतं ?
७) आपण मरमरून दूध आटवतो आणि मलई कोणीतरी दुसराच सोम्या गोम्या खाउन जातो?
८) आपण कॉलेजच्या दिवसात ज्या कुणा मुलाच्या/मुलीच्या एका नजरेसाठी तडफडायचो तीच /तोच पुढे कधीतरी अत्यंत सुमार दिसणाऱ्या माणसाशी लग्न झाल्या नंतर आपल्याला का दिसतो/दिसते ?
९) आपण अति विचार करणे आपल्या मनाला घातक आहे हे माहित असूनही पुन्हा पुन्हा आपण विचार का करतो?
१०) हा प्रश्न खास मिपासाठी आणि मेम्ब्रांसाठी : इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
प्रतिक्रिया
31 Jul 2014 - 4:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
यालाच जीवन ऐसे नाव.
31 Jul 2014 - 4:25 pm | शिद
आपण ज्या रांगेत उभे असतो त्यापेक्षा बाजूची रांग पटापट पुढे सरकत असते. :)
31 Jul 2014 - 5:02 pm | नानासाहेब नेफळे
http://en.wikipedia.org/wiki/Murphy's_law
31 Jul 2014 - 4:32 pm | सूड
>>इतर धागे पाहून आणि वाचून आपण उत्साहाने धागा काढल्यावर त्याला चांगला प्रतिसाद मिळण्याऐवजी धागाकर्त्याची टोपी बऱ्याचदा का उडवली जाते?
ब्रह्माऽपि अंतं न गच्छति टाईप प्रश्न आहे हा!!
31 Jul 2014 - 4:56 pm | नानासाहेब नेफळे
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.'s_law
गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.
31 Jul 2014 - 4:59 pm | नानासाहेब नेफळे
(उपरोक्त लिंक मिसटाइप झाली.)
याला मर्फीज् लॉ असे म्हणतात.
गंमतीचा भाग म्हणजे लौकिक अर्थाने वैज्ञानिक नियम नसुनही 'नासा 'सारख्या संस्थाही त्यांच्या एक्स्पीडीशन्सच्या वेळी मर्फीचा आधार घेतात.
31 Jul 2014 - 4:58 pm | कवितानागेश
हे असमाधानी असल्याचं लक्षण आहे. :P
31 Jul 2014 - 5:19 pm | अत्रुप्त आत्मा
वाह! क्या बात! झटके पकडा.
31 Jul 2014 - 10:26 pm | चाणक्य
एक नंबर
31 Jul 2014 - 5:00 pm | तिमा
हे भोट असल्याचे लक्षण आहे.
1 Aug 2014 - 10:04 am | माम्लेदारचा पन्खा
अर्ध्यावरती डाव सोडला ……
नाडीपरीक्षण केलेत तर मात्र सुद्धा सुचवा की काहीतरी ह्यावर …
31 Jul 2014 - 7:03 pm | मितान
आपल्या विचारपद्धतीत काही गतिरोधक आहेत याचे हे लक्षण आहे.
माऊताईशी अंशतः सहमत.
1 Aug 2014 - 9:57 am | माम्लेदारचा पन्खा
विचारपद्धतीचा संबंध येतोच कुठे ?
31 Jul 2014 - 7:06 pm | रेवती
घाब्रू नका......तुम्हे एकटे नाही. ;)
31 Jul 2014 - 7:08 pm | मितान
बाकी तुमच्या कडे कुदळ आणि फावडे दोन्ही आहे आणि ते तुम्ही भरपूर वापरताय असं दिसतंय ;)
1 Aug 2014 - 3:31 pm | माम्लेदारचा पन्खा
कुदळ आणि फावडं नक्की कुठं ,कधी आणि कसं वापरायचं तेच पाहायला मिपावर येत असतो
31 Jul 2014 - 8:24 pm | चित्रगुप्त
दहा प्रश्नांना एकच उत्तर: अपेक्षा ठेवल्याने.
1 Aug 2014 - 9:55 am | माम्लेदारचा पन्खा
कसं क्काय ब्वा ??
31 Jul 2014 - 10:22 pm | प्यारे१
भोग असतात हो एकेकाचे! नो ऑप्शन. भोगायचे.
31 Jul 2014 - 10:23 pm | विश्वनाथ मेहेंदळे
You are not in the traffic, you are the traffic :-)
1 Aug 2014 - 10:01 am | मुक्त विहारि
+ १
1 Aug 2014 - 12:02 pm | योगी९००
आपण एखादे काम चांगल्या इच्छेने करायला जातो आणि ते फसल्यावर खापर आपल्या माथी मारण्यात येतं ?
हे बर्याचदा अनुभवलेय... आता कोणालाही मदत करत नाही.
1 Aug 2014 - 2:54 pm | एक स्पष्टवक्ता..
काय कर्णार...??
3 Aug 2014 - 1:33 am | रमेश आठवले
http://www.chemteam.info/Humor/Gumpersons-Law.html
आपण दिलेली उदाहरण बहुधा या भौतिक शास्त्रात मांडलेल्या सिद्धांतात मोडतात असे वाटते.
4 Aug 2014 - 12:08 am | असंका
2.चे उत्तर-
कारण आपल्या फलाटावर आलेली पहिली गाडी आपण पकडतो. मागून कितीही गाड्या आल्या तरी आपल्याला त्या मोजता येत नाहीत.
4 Aug 2014 - 7:09 am | भिंगरी
प्रश्न क्र १०..साठी.
नुसती टोपी नाही उडवत तर टोपीचाही एक नी एक धागा काढतात.
(स्वानुभव) *lol*
4 Aug 2014 - 7:15 am | यशोधरा
उसवतात म्हणायचे का तुम्हांला? :D
7 Aug 2014 - 1:36 am | अत्रुप्त आत्मा
*lol*
4 Aug 2014 - 7:55 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मर्फीचे नियम.