Abandoned

स्पा's picture
स्पा in भटकंती
23 Jul 2014 - 2:30 pm

कलादालन विभाग सुरु नसल्याने येथेच फटू टाकत आहे
फोटोग्राफीचा वेगळा प्रयत्न केला आहे
स्थळ : एक बंद पडलेलं पॉवर स्टेशन
कॅमेरा आणी लेन्स : निकॉन डि ३१०० , ३५ मिमि लेन्स

हि जागा पडीक आहे , पर्यटन स्थळ नसल्याने विशेष माहिती देण्यासारखे काही नाही
आता रेल्वेच्या अखत्यारीत आहे, ओळख असल्याने आम्हाला जाऊ दिले, अन्यथा कोणालाही आत सोडत नाहीत
बॉयलर चे स्फोट झाल्याने हे ब्रिटीश कालीन पॉवर स्टेशन बंद पडलं. आता जवळ जवळ नामशेष झालेले आहे
काही वर्षात हे पूर्ण तोडून ह्या जागेत कल्याण ला असलेले लोकल चे कारशेड शिफ्ट करणार आहेत
सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते :)

१.fgf
.
२.fgf
.
३.fgf
.

४.fgf
.

५.fgf
.

६.fgf
.

७.fgf
.

८.fgf
.

९.fgf
.

१०.fgf
.

११.fgf
.

१२.fgf
.

१३.fgf
.

१४.fgf
.

१५.fgf
.

१६.fgf
.

१७.fgf

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

23 Jul 2014 - 2:32 pm | सौंदाळा

सहीच, एक लंबर आलेत फोटो

मुक्त विहारि's picture

23 Jul 2014 - 2:39 pm | मुक्त विहारि

आवडले...

प्यारे१'s picture

23 Jul 2014 - 2:43 pm | प्यारे१

भन्नाटच.
(ज्युरासिक पार्क आठवला)

आतिवास's picture

23 Jul 2014 - 2:45 pm | आतिवास

आवडले.
पण अशा जागा उदास करून जातात!

आतिवास's picture

23 Jul 2014 - 2:45 pm | आतिवास

आवडले.
पण अशा जागा उदास करून जातात!

फोटो लयच आवडले त्याची कारणे २.

१. फोटो जबरी आलेत.

२. Dawn of the planet of the apes या नुकत्याच आलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार्‍या पिच्चरमध्ये हुबेहूब असलेच सीन्स आहेत कित्तीतर्री. पिच्चर बघितला नश्शील तं आत्ताच्या आत्ता बघ!

स्पा's picture

23 Jul 2014 - 3:00 pm | स्पा

डंका आहे रे नुसता , माझे काही मित्र ह्या प्रोजेक्ट वर होते, सो बघावाच लागला :)

स्पा's picture

23 Jul 2014 - 3:00 pm | स्पा

दणका*

आयला जबरीच की बे. मोठी लोकं!

(स्पावड्याचे काँटॅक पाहून छाती दडपलेला) बॅटमॅन.

ह्यातील बरेच काम भारतातील स्तुदिओत झालेले आहे रे

हाडक्या's picture

23 Jul 2014 - 3:39 pm | हाडक्या

काय सांगताय !! भारीच.. चित्रपटातील तांत्रिक सतील, दृश्ये खूपच आवडली होती, आपल्याकडे काम झालेले ऐकून भारी वाटलं.. :)

बॅटमॅन's picture

23 Jul 2014 - 3:46 pm | बॅटमॅन

अस्सं? मग तर जबरीच की. साला आपल्याकडं असले जबराट शिन्मे कधी निघतील काय की बे.

हाडक्या's picture

23 Jul 2014 - 4:03 pm | हाडक्या

+१

उदास फीलिंग आलं फोटो पाहून!! त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन आलो तर हे फीलिंग आणखी जाणवेलसं वाटतं.

मृगनयनी's picture

23 Jul 2014 - 7:04 pm | मृगनयनी

स्पा.... मस्त!!!!!! यांतले काही फोटो चेपु'वर पाहिलेत... पावसाळी वातावरणामुळे या पडझड झालेल्या वास्तूला एक गूढ वलय प्राप्त झालंय.... :) ... ९ नम्बरचा फोटो.. सगळ्यांत जास्त आवडला.... त्या लोखंडाचा आकार आणि नॅच्युरली त्यात असलेली रंगसंगती, स्पेशली "लोखंडी" रंग -- उजव्या गोलातील काळसर किरमिजी रंग.. आणि डाव्या गोलातील हिरवट रंग... सुपर्ब कॉम्बिनेशन!!!.... रॉयल अ‍ॅन्टीक फील करून देतो!!...... :)

पावसाळ्यातले एखाद्या जुन्या युनिवर्सीटी'चे फोटो येऊ देत.... यु मे गेट मोअर स्कोप देअर..... :)

ऋतुराज चित्रे's picture

23 Jul 2014 - 3:10 pm | ऋतुराज चित्रे

बंद पडलेल्या गिरण्या व गिरणीकामगार डोळ्यासमोर आले, मन उदास झाले. फोटो छानच काढलेत. क्रमांक दोनच्या फोटोत भिंतीवर शेवाळ निळसर का दिसते? झाडाची पानेही थोडी निळसर दिसतात.

धन्या's picture

23 Jul 2014 - 3:13 pm | धन्या

Abandoned हे नांव एकदम परफेक्ट... वार्‍यावर सोडलेली जागा...

मस्त आले आहेत सगळेच फोटो.

क्रमांक दोनच्या फोटोत भिंतीवर शेवाळ निळसर का दिसते? झाडाची पानेही थोडी निळसर दिसतात.

हेच विचारणार होतो.

स्पा's picture

23 Jul 2014 - 3:18 pm | स्पा

ते शेवाळ नाहीये :)

विटांवर नीळा रंग असेल पूर्वी,आता थोडासा उरलेला आहे

शिद's picture

23 Jul 2014 - 3:24 pm | शिद

अच्छा...असं आहे होय.

धन्यवाद खुलासा केल्याबद्दल.

किसन शिंदे's picture

23 Jul 2014 - 3:15 pm | किसन शिंदे

सगळेच्या सगळे फोटो झक्कास आले आहेत. :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jul 2014 - 3:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

फोटो मस्तच आले आहेत.
शेवटचा फोटो सर्वात जास्त आवडला.

पैजारबुवा,

यशोधरा's picture

23 Jul 2014 - 3:45 pm | यशोधरा

फोटो आवडले.

मस्तच एवढंच म्हणतो .हा विषय हाताळणारे कमीच लोक सापडतात .चोळा थर्मल पॉवर हाऊस ठाकुर्ली वाटतंय.

गंगा ,राजस्थान आणि बंद पडलेल्या गिरण्यांचे फोटो हझलब्लाडने काढणारा कोण होऊन गेला (रघु राय ?)त्याची आठवण झाली .

बरं झालं काही प्रस्तावना नाही लिहिलीस, फोटोच फार बोलके आहेत.

एस's picture

23 Jul 2014 - 4:23 pm | एस

मधले मधले बरेच फोटो दिसत नाहीयेत. (क्र. २, ३, ४, ६, ८, १०, १२, १४.)

तुम्ही तुमच्या लेन्सच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून घेतलाय. अफलातून रंगअचूकता, वर्णविक्षेप आणि विपर्यासभ्रंश यांच्यावरील चांगले नियंत्रण आणि ३५मिमी चा क्रॉप्ड सेन्सरवर मिळणारा 'नॉर्मल व्ह्यू' अ‍ॅन्गल. हे सगळंच छान वापरलंय. मला दिसणार्‍या प्रतिमांपैकी ७, १३ आणि १७ ह्या खूपच आवडल्या. ७ मधील ते थांबलेले घड्याळ या वास्तूचे थिजलेले आयुष्यच जणू सूचित करत आहे. १२ व्या प्रतिमेतील पर्स्पेक्टिव मस्त आलाय आणि उजवीकडील इनअ‍ॅक्सिसिबल होत जाणार्‍या काळपट कॉरिडॉरच्या भीतीदायकतेला डावीकडील पिवळ्या स्तंभांनी छान तोलून धरलेय. १७ व्या प्रतिमेत टोकिना ११-१६ सारखी अल्ट्रावाइड लेन्स जर असती तर एक वेगळाच अंगावर येणारा पर्स्पेक्टिव मिळाला असता असे वाटले.

एकूणच अतिशय छान प्रतिमा! तुमच्या प्रतिभेला सलाम!

सुहास झेले's picture

23 Jul 2014 - 4:23 pm | सुहास झेले

क्लासिक... बंद पडलेले व्होल्ट मीटर अतिशय बोलके आहेत. स्पासर रॉक्स. Keep it up :)

कवितानागेश's picture

23 Jul 2014 - 5:20 pm | कवितानागेश

वेगळी भयकथा!! :)

अत्रुप्त आत्मा's picture

23 Jul 2014 - 9:11 pm | अत्रुप्त आत्मा

@वेगळी भयकथा!! >>> +++१११ ह्येच म्हण्टो!
आता आमाले पां डुब्बा कडून योक भय्कता पायजेच!
इषेशतः फोटू णंबर १० आनी १७ वरुण इण् स्पा यर होऊण !!! *biggrin*

प्रचेतस's picture

23 Jul 2014 - 5:57 pm | प्रचेतस

वेगळीच फटूग्राफी.
अर्थातच आवडली.

सरनौबत's picture

23 Jul 2014 - 6:15 pm | सरनौबत

छान हॉररपट बनू शकेल. राम गोपाल वर्मा ला लोकेशन दाखवा.

प्रसाद गोडबोले's picture

23 Jul 2014 - 7:06 pm | प्रसाद गोडबोले

सुंदर

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Jul 2014 - 8:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

चाकोरीबाहेरचा विषय, पण सॉलिड हाताळलाय ! सर्वच फोटो खूप आवडले !! भन्नाट !!!

यसवायजी's picture

23 Jul 2014 - 8:18 pm | यसवायजी

भारी!!

मयुरा गुप्ते's picture

23 Jul 2014 - 8:37 pm | मयुरा गुप्ते

पूर्वी कधीतरी मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या सर्वात पडिक आणि दुर्लक्षित डॉक मध्ये फिरल्याचा भास होत राहातो...गंजलेली लोखंडी जड अवजारं, रया गेलेल्या भिंती,त्यावर पडलेले उन्हाचे कवडसे..त्यातुन फक्त जाणवणारा इतिहास. कधीकाळी इथे ही मशिन्स धडधडत होती त्याच्या केवळ पाऊलखुणा...
परफेक्ट कॅपचर्स.

-मयुरा.

अधिराज's picture

23 Jul 2014 - 9:04 pm | अधिराज

खत्री फोटो आहेत. आवडले.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Jul 2014 - 9:21 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भंगार झालेले पावर स्टेशन आणि इतकी भकास जागादेखिल इतक्या सुंदर पद्धतिने सादर करता येऊ शकते, हे बघून खुप आश्चर्य वाटले.
फोटो अतिशय बोलके आले आहेत. जियो स्पावड्या...

सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते.
हे फोटोत अगदी उतरलयं, सगळेच फोटो आवडले, रंगसंगती खासच.

स्वाती दिनेश's picture

2 Aug 2014 - 4:53 pm | स्वाती दिनेश

सदर जागेत गेलं कि एक विचित्र फिलिंग येतं,अशी शांतता फक्त त्याच परिसरात जाणवते.
हे फोटोत अगदी उतरलयं, सगळेच फोटो आवडले, रंगसंगती खासच.

सखीसारखेच म्हणते,
स्वाती

पैसा's picture

23 Jul 2014 - 9:53 pm | पैसा

मस्त! हे पाहताना एखादी भयकथा सुचली नाही का?

स्पा's picture

23 Jul 2014 - 10:05 pm | स्पा

प्लाॅट आलाय डोक्यात, बघुया लिहिन पुढे कधितरी. :-)

त्या रिकाम्या स्टेशन मधुन गुपचुप फिरताना , आजुबाजुला वाढलेल्या गचपणातुन अनेक डोळे तुमच्यावर रोखलेत,असं सतत वाटत राहतं हे नक्की.पटकन मान वळवायची हिम्मत नाही होत.. न जाणो काय बघायला मिळेल

पैसा's picture

23 Jul 2014 - 10:08 pm | पैसा

नारायण धारपांच्या बखळी आणि त्यात वाढलेलं अस्ताव्यस्त गवत आठवलं!

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 10:23 am | सरनौबत

नारायण धारपांच्या कथेतील स्थळासारखे आहे.

ahm2

ahm1

ahm

राही's picture

24 Jul 2014 - 12:26 pm | राही

फोटो आवडले. अशा ठिकाणी हमखास एखादा पांढरा चाफा ऊतउतून फुललेला असतो. त्याचा तो फुलण्याचा उत्साह आणि सभोवतालची भयाण मरगळ. एक विचित्र जक्स्टॅपोज़िशन बनून जाते.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2014 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा

सरनौबत *i-m_so_happy*

.
.
.
.
.
पांडू.................. :-/ आता लिवायाच पायजेस तू....!!! *biggrin*

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 3:22 pm | सरनौबत

कोण हा पांडू ? *smile*

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 3:26 pm | बॅटमॅन

बुवा, टाकू का यमक ;)

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 3:38 pm | सरनौबत

कोड्यात बोलता बुवा

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 3:39 pm | प्रसाद गोडबोले

बुवा, टाकू का यमक
>>>
तेवढी आहे का धमक ? *crazy*

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 4:29 pm | बॅटमॅन

हेच आहे यशाचे गमक ;)

शिद's picture

24 Jul 2014 - 4:37 pm | शिद

मग दाखवा तुमची चमक ;)

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 4:41 pm | बॅटमॅन

दाखवली असती चमक,
पण जास्ती होईल नमक,
त्यामुळे आवरती घेतो धमक,
योग्य ठिकाणी कंडुशमन हेच यशाचे गमक!

तुमच्या इंटरनेट ची तोडावी लागेल कुमक

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 4:52 pm | बॅटमॅन

नका ओ तोडू कुमक
तेवढी नाय धमक
पांडू=स्पांडू=स्पा हे खरे गमक
व्हा थंड आणि पाडा यमक

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 4:56 pm | सरनौबत

बोलवा यमक-शामक.
इथे आग लागली आहे भ्रामक.

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 4:59 pm | सरनौबत

उडाली आहे छोटी चकमक
तोडा रसद आणि कुमक

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 5:00 pm | बॅटमॅन

आग लागलिं म्हणे, सरनौबत |
वाजवा नच इथे बघु, नौबत |

सरनौबत's picture

24 Jul 2014 - 5:05 pm | सरनौबत

बंद करा हे खलबत …
गर्दन उडवू अलबत
आम्ही साधे शिपाई नाही ….
सर्व सैन्याचे …….
……सरनौबत !!!!!!!!

गप रांव मरे, वश्शांड मेलो!!

बॅटमॅन's picture

24 Jul 2014 - 7:23 pm | बॅटमॅन

छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे..

ढिशक्यांव्! ढिशक्यांव्!! ढिशक्यांव्!!!

शिद's picture

24 Jul 2014 - 4:50 pm | शिद

*lol*

खटपट्या's picture

25 Jul 2014 - 1:34 am | खटपट्या

हायला !!!! स्पाराव तुम्ही जो काही व्यवसाय करताय तो सोडून, पूर्णवेळ फोटोग्राफी करा राव !! जबरी नजर हाय तूमची...

फोटो कैच्याकै म्हणजे कैच्याकै जबरदस्त आलेत !!
वरील सर्व प्रतीसादान्शी सहमत !!!

सारेच फोटो आवडले. 'भिंत खचली, कलथून खांब गेला'मधल्या मूडची आठवण करून देणारे. विशेषतः दुसरा फोटो सेपिया किंवा कृष्णधवल छटेत कसा दिसला असता, याची कल्पना करून पाहतो आहे.

पाषाणभेद's picture

24 Jul 2014 - 3:55 am | पाषाणभेद

Abandoned न वापरती जागा/ वस्तू, त्याज्य, सोडून दिलेले आदी बाबत उत्कृष्ट छायाचित्रे बघायची झाल्यास ही लिंक पहा.

या साईटवरती अजून दुसर्‍या विषयांवरील देखील छायाचित्रे आहेत.

स्पा's picture

24 Jul 2014 - 10:34 am | स्पा

चेर्नोबिल डायरिस नावाने एक हॉररपटपण आलेला

http://www.imdb.com/title/tt1991245/

पहाटवारा's picture

24 Jul 2014 - 5:20 am | पहाटवारा

हू इज जॉन गाल्ट ?

प्रभाकर पेठकर's picture

24 Jul 2014 - 10:44 am | प्रभाकर पेठकर

अतिशय सुरेख छायाचित्र. ब्रिटिशकालीन पॉवरहाऊसचे भग्नावशेष, पावसाळी वातावरण आणि छायाचित्रणातील अचूकता सर्वच अप्रतिम आहे.

प्रसाद गोडबोले's picture

24 Jul 2014 - 12:37 pm | प्रसाद गोडबोले

http://www.fakingnews.firstpost.com/2014/07/man-with-dslr-turns-out-to-b...

>>> हा फोटोग्राफर तुच आहेस की काय स्पावड्या *biggrin*

स्पा's picture

24 Jul 2014 - 12:47 pm | स्पा

=))

म्या आय टी वाला नाही पण

राही's picture

24 Jul 2014 - 12:46 pm | राही

फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्‍या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे.
जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते.
सुंदर.

राही's picture

24 Jul 2014 - 12:49 pm | राही

अरे, हे काय! अक्खा प्रतिसाद गायबच झाला. आता हे चोप्यपस्ते.
फारच सुंदर. ३,१०,१३,१७ अधिक आवडले. तिसर्‍या फोटोतला अगदीच अस्थानी वाटणारा, शाईसारखा सांडलेला निळा रंग सर्रीअल इफेक्ट देऊन जातो. १७ क्रमांक तर एक पेंटिंग आहे.
जा.जा. वर मयूरी गुप्ते यांनी म्हटल्याप्रमाणे मुम्बई बंदरातले विशेषतः रे रोड नजीकचे वापरीत नसलेले माल फलाट, अनंत काळपासून एखाद्या रेलगाडीची वाट पहात असलेले धुरकटलेले सिग्नल, अस्ताव्यस्त आणि व्यर्थ पसरलेले सुस्त रूळ- एक अजगर ऊन खात पडलेला असावा तसे दिसणारे-, चैतन्यहीन, प्रयोजनहीन. अस्तित्वहीन मात्र नव्हेत. उलट हे सुस्त, निद्रिस्त जगत् एखाद्या परीकथेतल्या शापित सृष्टीप्रमाणे कधीही जिवंतजागृत होऊन आपल्यासमोर धडधडू लागेल असे वाटते.
सुंदर.

चौकटराजा's picture

24 Jul 2014 - 3:04 pm | चौकटराजा

आता खूप चांगले क्यामेरे सामान्य लोकांच्या हातात आल्याने पूर्वी सारखी " ३६ मधले १६ च आले" ही सिचवेशन संपतीय.त्यात फटू शॉप व तत्सम एडीटर मधे बरेच काही सुधारता येते. ( मिपावरच्या बर्याच लोकांचे फटू शाप शी वाकडे आहे असे दिसते मात्र) .आताच्या या स्थितीत सन्सेट,फुलपाखरे, फुले ई विषयाचा वीट यावा इतके काही पहायला मिळते. त्या मुळेबुवांचे फटू सहित पत्रकारिता धागे, इस्पिक एक्क्कांचे संस्कृति दर्शन धागे असे थीमॅटिक फोटो प्रत्यय देणारे वाटतात. त्या सारखाच हा प्रयत्न आहे. हे स्थळ माझ्या अंदाजाने ठाकुरली जवळ असावे. प्रयत्न उत्तम आहे.

चौकटराजा's picture

24 Jul 2014 - 3:06 pm | चौकटराजा

हे मुळेबुवा कोण बुवा ? असा प्रश्न पडू नये म्हणून 'त्यामुळे बुवांचे ' असे वाचावे.

धमाल मुलगा's picture

24 Jul 2014 - 8:27 pm | धमाल मुलगा

फोटो आणि शिर्षक....ज ह ब ह र्‍या!

जियो स्पावड्या..जियो!

अंतु बर्वा's picture

24 Jul 2014 - 9:09 pm | अंतु बर्वा

सुं द र... !!! अप्रतिम फोटोज..

सस्नेह's picture

24 Jul 2014 - 10:33 pm | सस्नेह

फोटो विलक्षण आहेत. मधे मधे जरा म्याटर टाका की राव .

तुमचा अभिषेक's picture

24 Jul 2014 - 10:59 pm | तुमचा अभिषेक

फ्रेशनेस आणि रस्टीनेस..

डेडली कॉम्बिनेशन !

शैलेन्द्र's picture

25 Jul 2014 - 12:52 am | शैलेन्द्र

मस्त फोटो.. परत एकदा उन्हाळ्यात तिथेच जावुन बघ.. फार वेगळा प्रकाश मिळेल..

मस्तच!
अगदी वेगळं काहीतरी.

कविता१९७८'s picture

25 Jul 2014 - 5:24 pm | कविता१९७८

मस्तं

मदनबाण's picture

26 Jul 2014 - 10:23 am | मदनबाण

मस्त ! रस्टी आणि ग्रीन चे काँबिनेशन मस्त जुळुन आले आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Lasya :- Anoushka Shankar

खबो जाप's picture

1 Aug 2014 - 11:17 pm | खबो जाप

एक नम्बर फाटू रे भावा …। जिकलस …।

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Aug 2014 - 6:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कल्पना आणि बहुतेकसे फोटो आवडले. काही चित्रांमधला खरखरीत पोत, उदा घड्याळ, गियर, यंत्रांचं मोडकं मेट्रीक्स फारच आवडलं.

पण उदा क्र १ आणि ३ या चित्रांमधला हिरवा रंग फार भडक वाटला. कदाचित तो थोडा फिकट करून किंवा चित्रं काळीपांढरी करून बहुतेक अधिक भावतील.

कुंदन's picture

3 Aug 2014 - 7:23 pm | कुंदन

पुढच्या वेळेला चक्कर मारावी लागेल.

फोटुग्राफीत बाप माणुस आहेस दोस्ता !!

चिगो's picture

10 Aug 2014 - 9:57 pm | चिगो

लै म्हणजे लै म्हणजे लैच जबरदस्त फोटो़ज आहेत, दोस्ता.. साला, लेन्सा आमच्याकडंबी आहे, पन अशी नजर पाहीजे ना राव.. नजरेत आणि कॅमेरॅत मज्जा आहे राव तुमच्या..