पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म
लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258
वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-.
हे पुस्तक पुर्वीविविध नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले? असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधनाच्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीनऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीतअसूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष रीतीने काहोईना) होते, म्हणून भौतिक जगाचा वैज्ञानिक अभ्यास (भौतिक संशोधन) हा अध्यात्मिकसत्याच्या अनुभवासाठी आवश्यक आहे असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांचे या पुस्तकातूनप्रतिपादन आहे. त्यांचे सर्व लेख अशा संगतवारीने आहेत की ते पुस्तकाच्या शीर्षकालान्याय देतात.
या सुसंगत संकलनातलेखकाचा अप्रतिहत सर्वांगिण व्यासंग व भाषेवरील प्रभूत्व, सुक्ष्म व सखोल चिंतनथक्क करणारे आहे. विशिष्ट हेतू मनांत ठेऊन लेखन करणाऱ्या पुरोगामी विचारवंतांनागीतेसारख्या ग्रंथांचे विकृतीकरण केल्याशिवाय ‘स्ववैशिष्ठ्यवादी’म्हणून सन्मान मिळत नाही. अशांचाखरपुस समाचार लेखकाने घेतला आहे.
चार्वाकवादावर लेखनकरताना ते म्हणतात, चार्वाकांच्या प्रत्यक्ष प्रामाणवादचे तत्व (जेथे धूर आहे तेथेअग्नी आहे हे अनुमानाने सिद्ध होत नाही. अग्नीचे अस्तित्व केवळ प्रत्यक्षाने सिद्धहोते.) स्वीकारणे विज्ञानाला अशक्य आहे. कारण विज्ञानाचा जन्मच अनुमानातून झालाआहे. तर चार्वाक त्या अनुमानालाच ठोकरून देतात.
चार्वाकांचादेहात्मवाद (आत्मा किंवा जीव म्हणून देहाव्यतिरिक्त काही नाही ) हा आधुनिक भाषेतीलयंत्रवाद होय. तो कसा भ्रामक व चुकीचा आहे ते प्रथम प्रकरणात त्यांनी अनेकउदाहरणांनी दाखवून देतात. त्यामुळे चार्वाकांचा सुखवाद (देहाचे सुख तेच खरे सुख) व्यावहारिकतेच्याकसोटीवरही टिकू शकत नाही. माणूस केवळ घृत (अन्न) आणि अंगनालिंगन (मैथुन) एवढ्याचसाठीजगतो हे खरे नाही. कारण तेवढे सुख मिळाल्यावर तो सुखी होताना दिसत नाही. बुद्धी,विवेकशक्ती, भाषा यांचे मानवी जीवनात कार्य काय? शरीरसुखासाठी त्यांची गरज आहे काय? असा प्रश्न करून निसर्गाला ही चार्वाकवाद मान्य आहे काय? असे ते विचारतात.
प्रकरण 2 मधे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीप्रामाण्यवादाच्या पुरस्कर्त्यांना इशारा दिला आहे. सत्य जाणण्याचे अंतिम प्रमाण भौतिकनसून आत्मिक (अनुभाविक) आहे. त्यासाठी भौतिक प्रमाणवाद टाकून अनुभवप्रमाणवादी बनणेआवश्यक आहे. नेमके तेच कथन क्वांटम सिद्धांतात ‘परस्पर विरोध’(पॅरॉडॉक्सिकल) रुपाने, तर अध्यात्मशास्त्रात ‘सदसद्विलक्षण’रुपाने सांगितला जातो असे ते म्हणतात.
प्रकरण 3 मधे ‘जीवोत्पत्ती हे रुढ जीवशास्त्राला नसुटलेले कोडे’ यात ते म्हणतात, ‘जीव हा तुकड्यांनी बनलेला नाही तरमाहितीने बनला आहे. योगायोगाने नव्हे तर नियमानुसार निर्माण झाला आहे. अपघाताने नव्हेतर स्वाभाविकपणे बनला आहे असे संगणकयंत्राने गणितीय नियमांनी दाखवून दिले आहे.मात्र अडचणीची समस्या सोडवण्यासाठी काही शास्त्रज्ञ ती समस्या टाळण्याचा किंवा नसल्याचाप्रयत्न करताना दिसतात.’तो कसा खोटा आहे हे लेखकाने सप्रमाण दाखवून दिले आहे.
प्रकरण 4 ‘प्लँचेट’ या रंगतदार विषयाला वाहिलेले आहे. त्याचे नियम, विलक्षण अनुभव, पाश्चात्यांनीत्यावर केलेले प्रयोग सर्व माहिती नवी आहे. प्लँचेट करून मिळणारी उत्तरे कोण देतो? यावर त्यांचे मत मोलाचे आहे. ते म्हणतातकी मानवी मनाच्या अतींद्रिय शक्तीचे ते रुप आहे.
प्रकरण 5ज्योतिषशास्त्रातील ग्रह मानवावर प्रभाव पाडतात काय? यावर प्रश्नावर आधारित आहे. त्यांना तो प्रभाव हा एका व्यवस्थेचा भागम्हणून मान्य आहे. त्यात नाडी ग्रंथांवर भाष्य करताना ते म्हणतात. ‘फलज्योतिष हे कुंडलीवरून वर्तवलेले भविष्यअसते. याच्या उलट नाडीग्रंथ भविष्य हे कुंडलीचेच भविष्य असते. म्हणजेच एखाद्याव्यक्तिचे भविष्य वर्तवण्य़ासाठी तिच्या कुंडलीची आवश्यकता नाडीग्रंथाला मुळीच नाही,कारण तिच्या कुंडलीचे भविष्यच नाडीग्रंथ वर्तवतात. त्यांनी यावरून असा निश्कर्षकाढला आहे की कुंडली किंवा ग्रह व त्या ग्रहस्थितीप्रमाणे जन्म घेणारी व्यक्तीम्हणजेच मानवी जीवन व ग्रहांची भ्रमणे ही दोन्ही एकाच व्यवस्थेने निश्चित होत असतात.म्हणजेच ती एकाच व्यवस्थेचे अंग असतात व मानवावर ग्रहा-नक्षत्रांचा परिणाम होतो काय? ही जटिल समस्या जटिल तर नाहीच पणसमस्याही राहात नाही.
प्रकरण 6 संतसाहित्यातूनअंधश्रद्धा निर्मूलन कसे केले आहे?यावर प्रकाश पाडणारे आहे. मात्र संतांचे अंधश्रद्धा निर्मूलन व्यावहारिक पातळीवरीलअसून ते बेगडी, तोंडदेखले व निरीश्वरवादी लोकांनी ठरवलेल्या साच्याचे नाही. असेत्यांनी विविध संतवचनांची वचने देऊन ठासून सांगितले आहे. या प्रकरणात डॉ. नी.र. वऱ्हाडपांडेनिर्मित संताच्या ‘चमत्कारवादातील’ भ्रामक कथनातून त्यांनीवाचकांची दुहेरी वैचारिक फसवणूक कशी केली आहे याची चिरफाड केली आहे. ‘संतांची इच्छा असेल तेंव्हा संतांनाचमत्कार करता येतात’हे डॉ. वऱ्हाडपांड्यांचे कथन खोटे आहे. हे प्राचार्य अद्वयानंद गळतगे त्यांनी, ‘संतांच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. ते त्यांच्या इच्छेवर अवलंबूननाहीत. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, रेड्यामुखी वेद बोलविले ते संत म्हणून नाही तरयोगी म्हणून आणि योग हे भौतिक शास्त्राप्रमाणेच एक काटेकोर शास्त्र आहे’, असे प्रतिपादन केले आहे.
प्रकरणे 7 ते 10 मधूनप्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनीं काही विवेकवादी लेखकांनी भगवद्गीतेतील कथनांना ‘समस्या’ ठरवून वाद उकरण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावर आधारित आहेत. त्यातील प्रकरण 7 मधे ज्ञानेश्वरीतील ‘विश्वोपत्तीच्या’ निरुपणावर प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांनी वैज्ञानिक दृष्ट्या प्रकाशटाकला आहे. तर प्रकरण 8 मधे गीतेतील नवव्या अध्यायासंदर्भात ज्ञानेश्वरांनी (काहीही)‘न करता भजन जाहले’ म्हटले आहे, त्याचा मतितार्थ कसा लावावाकिंवा कसा लावू नये?याचा वस्तुपाठ आहे. ते म्हणतात, ‘प्रत्येककर्म परमेश्वराप्रित्यर्थच आहे हे जो ‘जाणतो’ किंवा असे जाणून प्रत्येक कर्म करतो तो परमेश्वराचे भजनच करतो. कारणत्याच्या त्या ‘जाणण्यामुळे’ ते कर्म परमेश्वरालाच पोहोचते. पण हे जोजाणत नाही त्या अज्ञानी मुर्खाच्या हातून हे परमेश्वराचे सहज (न करता) होणारे भजनघडत नाही’.
प्रकरण 9 मधे ‘गीतेत निष्काम कर्मयोग नाही?, गीता नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे काय?, आत्मा हा डब्यातील लाडवा प्रमाणे आहे कीढगातील वाफेप्रमाणे असावा?,गीता कथनाला युद्धभूमि योग्य किंवा अयोग्य?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा? आदि प्रश्नांची उकल करून त्यातील वैचारिकफोलपणा उकलून दाखवला आहे. प्रकरण 10 मधे ‘गीतेचे अधिकारी कोण?असा नेहमी विचारला जाणारा प्रश्न उत्पन्न केला आहे. त्यावर समर्पक उत्तर देतानाप्राचार्य अद्वयानंद गळतगे ज्ञानेश्वरांच्या ओवीचा दृष्टांत देताना म्हणतात, ‘तैसे अध्यात्मशास्त्री इये। एक अंतरंगचि अधिकारिये। येर वाक् चातुर्ये। होईलसुखिया।। म्हणजे एक अंतरंगी व्यक्तीच गीतेची अधिकारीआहे. बाकीचे (येर) बहिरंग गोष्टींमुळे सुखी होतात. ते कसे? तर- वधूची आई वरात श्रीमंतीपहाते, बाप वरात शिक्षण पहातो, भाऊबंद वरात जात पहातात, इतर लोक वराचे मिष्टान्नपाहून खुष होततात. असा रीतीने इतर लोक अवांतर गोष्टीं पसंत करतात. एकटी वधूच वराला‘वर’ म्हणून निवडते, पसंत करते. म्हणजेच ‘जन्माचासोबती’ म्हणून निवडते.म्हणून तिचा एकटीचाच वरावर ‘अधिकारचालतो’. इतर कुणाचाच नाही. गीतेच्या अधिकारीव्यक्तिबद्दलही तसेच आहे. कारण त्याला गीता ही जन्माची सोबती (जीवनाचार) म्हणूननिवडाची असते.
प्रकरण 11 हे या पुस्तकाचा मुकुटमणी आहे. ‘अष्टावक्र गीता अर्थात कैवल अदैत वेदांत - म्हणजे काय?’ राजा जनकाला आठ ठिकाणी वाकलेल्या योग्याने केलेला उपदेश व श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश यातील तुलना, केवल वेदांतातील ‘दृष्टीसृष्टीवाद’ तो काय? मुक्त पुरुष जगात कसा वावरतो? दृष्य़ जग व देह हे खोटे कसे ? यावरील त्यांचे वैज्ञानिकदृष्टिकोनातून केलेले विवेचन रंजक आहे. अनेक उपनिषदांचे, संतांचे व पाश्चात्यविचारकांचे संदर्भ देण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या लेखनातून प्राचार्यअद्वयानंद गळतगे हे ज्ञानी व्यक्तिमत्व ‘स्वानुभवविश्वाचे माणिक-मौत्तिकांचे आगर’ आहेत असे जाणवते.
पुस्तक बुकगंगा.कॉम वर उपलब्ध
संकलक - शशिकांत ओक.
प्रतिक्रिया
15 Jul 2014 - 10:40 pm | प्यारे१
पुस्तक रोचक वाटतंय.
16 Jul 2014 - 1:08 am | भृशुंडी
भिश्क्याव वाट्तय पुस्तक एकदम. एकदा वाचाय्ला पाहिजे.
लेखकाचं नाव खास आहे.
16 Jul 2014 - 2:15 am | चित्रगुप्त
हे आणि असे अन्य प्रश्न मी माझ्या 'परामर्श' पत्रिकेतील 'गीता तत्वज्ञानः काही प्रश्न' लेखात उपस्थित केले होते, त्यांची उत्तरे या पुस्तकात दिली असल्याचे दिसते.
16 Jul 2014 - 9:43 am | शशिकांत ओक
भिशक्यांव जी,
अद्वयानंद असे पटकन तोंडात यायला जड जाते. या नावाचा धसका घेतलेले अंनिसचे शिलेदार ही त्यांचे नाव नीट उच्चारू शकले नाहीत.
16 Jul 2014 - 9:50 am | प्रचेतस
त्यामानाने नुसतं 'गळतगे' बोलायला लै सोप्पं वाटतं ना काका?
16 Jul 2014 - 10:32 am | धन्या
त्यांनी लेखकाचं नाव "खास" आहे असं म्हटलंय, "उच्चारायला अवघड" नाही.
नावाच्या उच्चाराचा अंनिसशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न केविलवाणा आहे.
16 Jul 2014 - 10:03 am | अत्रुप्त आत्मा
=====================
16 Jul 2014 - 11:01 am | आशिष दा
ओक काका,
कृपया राहिलेला एक डीजीट देता का ?
16 Jul 2014 - 12:05 pm | शशिकांत ओक
5 शेवटी जोडावे.
09902992585
16 Jul 2014 - 1:02 pm | योगविवेक
ओक सर,
गळतगे याच्या मो . क्र बद्दल धन्यवाद. काही ना काही कारणांनी प्लँचेट हा विषय सध्या चर्चेत आहे.
गळतगे सरांनी या विषयावर काय लेखन केले आहे. हे जाणून घ्यायला आवडेल.
16 Jul 2014 - 2:54 pm | प्रसाद गोडबोले
चार्वाक ह्या शब्दाची व्युत्पत्ती " चारु वाक " अशी झाली असावी काय ?
16 Jul 2014 - 2:57 pm | बॅटमॅन
नाही, संस्कृत व्याक्रणाप्रमाणे तसे वाटत नाही.
16 Jul 2014 - 3:15 pm | प्रसाद गोडबोले
व्याकरण नाही ...फिलॉसॉफी प्रमाणे रे ...चार्वाक म्हणतो काम हाच एकमेव पुरुषार्थ ! )अर्थ ही त्याला केवळ सहायक म्हणुन बस्स .)
तेव्हा ह्या चार्वाकाची चारुलता नावाची कोणीतरी दासी / मुलगीमित्र(पक्षी:गर्लफ्रेन्ड ) असावी , अन तो तिला कायम एकच आज्ञा देत असावा ... !
त्यावरुन चार्वाक असे नाव पडले असावे काय असा एक विचार मनात आला *biggrin*
16 Jul 2014 - 3:33 pm | बॅटमॅन
आईच्या गावात =))
मज्जा अशी की चारुवाक् म्ह. उत्तम वाणी असलेला असा संस्कृत अर्थ होत असल्याने माझ्या मनात तो अर्थ आला. पण पाहतो तर साला प्राकृत अर्थ दिसतो आहे =))
16 Jul 2014 - 5:39 pm | शशिकांत ओक
योग विवेक, त्या प्रकरणातील माहिती सादर करता येईल. पण अन्य लोकांकडून तशी विचारणा होऊ दे ना.
16 Jul 2014 - 5:45 pm | धन्या
साधारण किती लोकांनी विचारणा केली म्हणजे तुम्ही त्या प्रकरणातील माहिती सादर करणार आहात?
यावरुन आमच्या एका मित्रवर्यांनी सांगितलेला किस्सा आठवला. त्यांनी मिपावरील एका प्रथितयश लेखक महाशयांस एका विशिष्ट विषयावर लिहावे असे सुचवले. लेखक महाशयांनी "मी लोकांना आवडेल असेच लिहितो" असे म्हणून मित्रवर्यांस त्या विषयाचा विकीवरील दुवा देऊन बोळवण केली.
16 Jul 2014 - 5:56 pm | बॅटमॅन
अगदी अगदी. सदर किस्सा आमच्याही मित्रवर्यांनी आम्हांस सांगितला होता. जेन्युइन शंकेची अशी बोळवण करणे पाहून मजा वाटली खरी.
16 Jul 2014 - 5:54 pm | चित्रगुप्त
प्लॅन्चेट या विषयावरील गळतग्यांचे विचार जाणून घेण्याबद्दल आमचेही अनुमोदन,
तसेच ....आत्मा हा डब्यातील लाडवाप्रमाणे आहे की ढगातील वाफेप्रमाणे असावा?, विश्वरुपदर्शन हा काय प्रकार असावा?..... याबद्दल त्यांनी काय सांगितले आहे, तेही सांगावे.
(कृपया पुस्तक विकत घेऊन स्वतः वाचा, असे म्हणू नये, कारण तसे करणे काही जणांना शक्य नसेल, किंवा तेवढी निकड वाटत नसेल).
16 Jul 2014 - 8:31 pm | शशिकांत ओक
मित्रांनो,
प्लँचेट हे प्रकरण सध्या विचारणेत आहे.
विज्ञानाच्या दृष्टीकोनातून ... पुस्तकातील या विषयावर प्रकरण 4 मधे 19 पानातून विशेष चर्चा प्रा. अद्वयानंद गळतगे यांनी केली आहे. त्यातील काही मुद्दे सादर करत आहे.
१. प्लँचेटचा एक विलक्षण अनुभव
२. परदेशातील एक दाखला
३. प्लँचेटवर 'मृतात्मे' येतात या कल्पनेची पार्श्वभूमी
4. मृतात्मा प्रत्यक्ष दिसला!
5. प्लँचेटवर कादंबरीताल पात्राचा 'मृतात्मा' आला!
6. भारतीयांचे अनुभव
7. प्लँचेट हा एक भानामतीचा प्रकार
8. भानामतीतील मनःशक्तीचा नियंत्रित प्रयोग
9. प्लँचेटवर खरोखर कोण येते?
10. काल्पनिक भूत देहधारी बनले!
11. *बॅचेल्डार व ब्रुकीस-स्मिथ यांचे प्लँचेट विषयीचे शास्त्रीय प्रयोग
12. कृत्रिम भूत निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग
13 ** या शास्त्रीय सशोधनाचा निष्कर्ष
या प्रकरणाच्या शेवट करताना प्राचार्य अद्वयानंद गळतगे एक सावधगिरीचा इशारा देतात. ते म्हणतात, "शास्त्रीय संशोधन व प्रयोग एकाद्या गोष्टीतील सत्य शोधण्यासाठी केले जातात. या संशोधनातून व प्रयोगातून पूर्ण सत्य कळले असे समजण्याची चूक मात्र कधीच करू नये. भौतिक वा जड वस्तूंविषयीचे सत्य सुद्धा शास्त्रज्ञांना त्याविषयी असंख्य प्रयोग व संशोधन करूनही अजून कळालेले नाही. तर मानवी मना विषयीचे व अतींद्रिय घटनांविषयींचे सत्य अशा प्रयत्नातून कळेल ही आशा दूरच. या प्रत्येक घटनेला अनेक कारणे असतात अनेक बाजू असतात. त्याविषयी कोणताही एकच निष्कर्ष काढणे धोक्याचे असते.
प्लँचेटवर नेहमी मृतात्माच येतो या समजुतीतील एकांगीपणा असा संशोधनातून उपयोगी पडतो. पण म्हणून दुसऱ्या टोकाला जाऊन प्लँचेट वा सीयन्स मध्ये घडणाऱ्या घटनांचे कारकत्व मानवी मनाला देणे ही चुकीचे आहे. हा सुद्धा शास्त्रीय संशोधनाचा एकांगीपणाच आहे. मृतात्मे प्लँचेटवर येतात कि नाही, केंव्हा येतात या विषयीचा सर्व सामान्य निकर्ष कधीच काढता येत नाही. हे ज्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. अनाहूतपणे येणारे संदेश खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात (त्यांना drop-on म्हणतात) जीवंत व्यक्तींना त्यांच्या जीवनात सहाय्यभूत ठरणारे संदेश हे खऱ्या मृतात्म्यांकडूनच येतात. अपुऱ्या राहिलेल्या इच्छा तृप्त करण्यासाठी काही मृतात्मे येतात. वासनेमुळे पिशाच झालेले मृतात्मे जिवंत व्यक्तींना निष्कारण छळतात हे ही खरे आहे. मोठे सत्पुरूष, महात्मे, इतकेच नव्हे तर कोणताही मृतात्मा आपण बोलवू तेंव्हा येतो असे समजणे म्हणजे ते मृतात्मे आपल्या इच्छेच्या आधीन असलेले नोकर आहेत असे समजणे होय. कर्मसिद्धांताला छेद देणारी ही समजूत आहे. प्रत्येक आत्मा स्वतःच्या कर्माने बांधला गेला आहे. इतरांच्या कर्माने वा इच्छेने नाही. त्याच वेळी नोकरा प्रमाणे वागणारी वासनेमुळे पृथ्वीवर भटकणारी (earth bound) पिशाचे, व नैसर्गिक (सुष्ट वा दुष्ट) शक्ती (elementals) या जगात आहेत. हे ही सत्य आहे (त्यांना क्षूद्र देवता म्हणतात) पण म्हणून कोणतीही अतींद्रिय घटना घडली की ती मृतात्म्यामुळेच वा अशा शक्तींमुळेच घडली असे मानणे चुकीचे आहे.शेवटी मनुष्य हा ही पिशाचच (आत्माच) आहे. तो मृत नसून जीवंत आहे इतकेच. जे मृतात्मे (मृतात्म्यांची मने) करतात ते जीवंत आत्मे- (त्यांची मने) - का करू नयेत? आणि हेच सत्य शास्त्रीय संशोधनातून उघड झाले असून फिलीप हा त्याचा साक्षी आहे.
* Ref. Journal of the society for Psychical research 1966, 43
** The laws of he spirit world by Bhavnagaris part 3
21 Jul 2014 - 11:40 am | शशिकांत ओक
*ok*
धन्यवाद चित्रगुप्त,
आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात. असो.
(आत्मा म्हणजे) डब्यातला लाडू कि ढगातील वाफ या मखलाशीला पुस्तक खरेदीच्या खर्चात न पडता उत्तर वाचायची आपण अपेक्षा करता ... एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...
21 Jul 2014 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा
@एखाद्या गावाला जायचे तर आहे मग नुसते टाईमटेबल पाहून ते समाधान कसे मिळणार त्यासाठी प्रवासाचा खर्च करायला हवा...>>> कुणाला जायचे आहे???(नक्की!)???
इथे कोणिही स्वतःहून असला आग्रह तुमच्याकडे धरलेला नाही.आपणच - हे वाचा...ते वाचा चे बोर्ड घेऊन फिरता.आणि तरी उलटा उपदेश द्यायला काहिच कसं वाटत नाही हो!?
अहो, ही तुमची इच्छा आहे ..की आंम्ही हे असलं सगळं वाचून मत बनवावं..मग खर्च तुंम्ही करा!
.
.
.
.
समांतरः- मागे एका M.L.M वाल्यानी त्यांच्या-मिटींगला मला पायघड्या घालत बोलावणं केलं,आणि त्याचं तिकिट फक्त १४० रुपये आहे.असं दबक्या आवाजात म्हणाला. त्याची अठवण झाली! मी ही मग त्याच्या पैशानी चहा उकळला,आणि मला दुसरी मिटींग असल्याचे सांगून..त्याला पुढच्या दारी हकलला.
21 Jul 2014 - 9:17 pm | चित्रगुप्त
यावरून हा धागा म्हणजे त्या पुस्तकाची जाहिरात आहे, आणि ते पुस्तक विकत घ्यावे म्हणून ती केलेली आहे, असे समजायचे काय? 'आत्मा म्हणजे डब्यातला लाडू कि ढगातील वाफ' ही मुळात माझीच पृच्छा असल्याने त्याचे गळतगे काय उत्तर देतात, हे जाणून घ्यायलाही खर्च करायचा?
21 Jul 2014 - 10:47 pm | शशिकांत ओक
हा या धाग्याचा उद्देश आहे. त्यात काय म्हटलय गेले आहे ते वाचायला प्रेरित विचार करावेत. आपल्या मुद्यांचे तेवढे सांगा बाकीचे गेले वाऱ्यावर ... असे सुचवणे कितपत योग्य आहे?
21 Jul 2014 - 9:42 pm | धन्या
>> आपल्या सारख्यांना गळतगे याच्या लेखावर प्रतिसाद वाचून काही बाबतीत विचार वाचायला आवडेल म्हटल्या बद्दल.काही वाकडे लावण्यात धन्य मानतात.
आपण विचार मांडले की ते सगळ्यांना मान्य करावेत ही अपेक्षा चुकीची आहे काका. कुणी विरोधी मत मांडले तर त्याची "वाकडे" लावण्यात "धन्य" मानणारा अशी संभावना करणे कीतपत योग्य आहे?
- धनाजीराव वाकडे
21 Jul 2014 - 12:11 pm | एस
अच्छा? इतरांवर टीका करताना थोडी आपल्या वाट्याला आली तर असे चिडू नये.
ज्यांना मूळ श्लोक
यावज्जीवं सुखं जीवेन् नास्ति मृत्योर् अगोचरः ।
भस्मी-भूतस्य देहस्य पुनर् आगमनं कुतः ॥
असा आहे हेही माहीत नाही आणि त्यातलं 'यावज् जीवेत् सुखं जीवेद् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।' हे त्याचं चार्वाकांच्या टीकाकारांनी केलेलं विडंबन आहे ह्या बाबीकडे जे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात आणि उगीच दुसर्यांवर चिखलफेक करत बसतात आणि कर्ज काढून तूप पिण्याइतपतच चार्वाकवाद मर्यादित आहे आणि म्हणून तो अपूर्ण आहे वा नीतीअनीतीची चाड न बाळगणारा शुद्ध भोगवाद आहे असा हिणकस अपप्रचार करत फिरतात ते आमच्या मते
इति पुस्तकस्य कर्तारो भण्ड-धूर्त-निशाचराः ।
जर्भरी-तुर्फरीत्यादि पण्डितानां वचः स्मृतम् ॥
आहेत.
चार्वाकांना झोडपल्याशिवाय एकाही तत्वज्ञानाची मांडणी पूर्ण होत नाही हेच चार्वाकविचाराच्या जनसामान्यांच्या व्यवहारातील जाणत्या-अजाणत्या आचरणाचे यश आहे. (संदर्भासाठी - हेही चार्वाकांच्या एका कट्टर टीकाकारानेच म्हटले आहे.)
बाकी चालू द्या.
21 Jul 2014 - 1:20 pm | प्रसाद गोडबोले
हे विधान अप्रतिम आहे ! कसे आहे की ही सगळी तत्त्वज्ञाने चढती भाजणी आहेत ... चार्वाक ,आजीवक, जैन ,बौध्द, वैदीक ( नैयाय्यिक /मीमांसक वगैरे) आणि मग सरते शेवटी वेदान्ती !
आधी एक सिध्दांत उभा करायचा ... त्याचा पुर्ण अभ्यास करायचा मग स्वतःच त्यातील कच्चे दुवे शोधुन त्याला झोपडुन काढायचे आणि फायनली लीप ऑफ फेथ घेवुन वरच्या पायरीवर जायचे
हीच खरी आध्यात्मिक साधना ! एखाद्या पायरीवर घसरलात किंवा रेंगाळलात आणि अभिनिवेशी झालात तर मग तुम्ही तिथले ! कोठेही न रेंगाळता , अभिनिवेषी न होता प्रवास करत राहिलात तर "शिवोSहं शिवोSहं" ह्या गंतव्याप्रत पोहचणार हे ही निश्चीत !!
चरैवति चरैवति ! :)
21 Jul 2014 - 3:22 pm | एस
पायर्यापायर्यांच्या प्रवासाचा संदर्भ लक्षात आला आणि फुटलो! :-)
21 Jul 2014 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले
कुठल्या पायरीवर फुटलात ते महत्वाचे :)
21 Jul 2014 - 7:33 pm | एस
ज्या पायरीवर फुटलोय असं वाटतंय ती पायरी तीच असणं महत्त्वाचं...!