बस झाली निवडणुक....

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
23 May 2014 - 7:55 pm
गाभा: 

च्यामारी मागचे ४-५ महिने या इलेक्शनने नुसता वात आणलाय राव.चला जरा टाइमपास करु प्रत्येकाने लहानपणापासुनची स्वतःची टोपन नावे सांगा म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही कसे होता ते कळेल्,कारण टोपण नाव माणसाच्या बर्‍यापैकी व्यक्तीमत्वाची ओळख करु देत.(अस कोणत्या महाराजांनी नाही सांगितल हे माझे वैयक्तिक मत आहे.)कारण मागचे काही महिने आपण मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.
तरी माझी स्वतःची बरिच टोपण नावे होती ती पुढील प्रमाणे.-
१)पिनु- जन्मापासुन जवळपासचे सगळे
२)मम्हंबळ्या- आज्जी म्हणायची.
३)दादा- भावकीतले सगळे
४)पाटील- गावकरी मंडळी
५)पश्याभाउ/भाई/भाउ- मित्रमंडळी
६)सोन्या/पिल्ल्या/बाबु- गर्लफ्रेंड नं १
७)बाबा - गर्लफ्रेंड नं २
८)पप्पा - एकुलती एक बायको म्हणते
९)पपल्या - माझ्या दोन्ही लेकी
१०)नेतृत्व/बागाइतदार्/पाटील बाबा - कॉलेजचे प्राचार्य
११)गुंडा पाटील्/बाबा पाटील - आत्ताची मित्रमंडळी

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

23 May 2014 - 8:00 pm | तुषार काळभोर

तुमची ओळख चांगली झाली ;)

स्पा, स्पाउ, स्पाडु, स्पांडु,स्पाड्या, स्पावड्या, स्पावडी, स्पाउडुटली एन सो आँन...

समर्पक's picture

23 May 2014 - 8:18 pm | समर्पक

मैत्रिण म्हणते का? *mosking*

हाडक्या's picture

23 May 2014 - 10:17 pm | हाडक्या

नाई हो.. कुरसुंदीच्या माई म्हणत असतील.. *lol*

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2014 - 10:33 pm | अत्रुप्त आत्मा

@स्पाउडुटली एन सो आँन>>>:-/ दुष्ष्ष्ष्ट........ :-/ मी ठेवलेलं घेत्लच नै! :-/ पां डुब्बा! =))

जेपी's picture

23 May 2014 - 8:53 pm | जेपी

टिल्लु

शिद's picture

23 May 2014 - 9:00 pm | शिद

लहानपणी: शिरू
मित्र-मैत्रिणी: शिर्‍या
जवळच्या मैत्रिणी: श्री

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2014 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

पल्ल्या... - आईची हाक *ok*
भावड्या - बाबांची हाक *yes3*
पर्‍या/दिव्या/बुटक्या- शाळेतील मित्रांच्या हाका *biggrin*
देडफुट्या - एका खौट :-/ वर्गमित्राची हाक :-/

पैसा's picture

24 May 2014 - 12:22 am | पैसा

मि.पा.वर मोदी,गांधी आणी केजरु यांचे इतके विश्लेषण केले आहे की बिचार्‍यांना खरच कधी कळल तर आत्महत्या करतील.

हे भारी आहे!

मला खर्‍या आयुष्यात कधी टोपणनावे नाही मिळाली. इथे मिपावर आल्यावर बडवे वगैरे काय काय मिळालीत बरीच! *ROFL*

अनुप ढेरे's picture

24 May 2014 - 5:34 pm | अनुप ढेरे

पाध्ये नाही का?

किसन शिंदे's picture

24 May 2014 - 12:46 am | किसन शिंदे

किस्ना हे सर्वात जास्त वेळा मिळालेलं टोपणनाव आहे. घरातले नेहमी काळ्या म्हणायचे. :)

प्रभाकर पेठकर's picture

24 May 2014 - 2:32 pm | प्रभाकर पेठकर

कधी फारशी (धागाकर्त्याच्या तुलनेत) टोपणनांवं मिळाली नाहीत.

आई ची हाक 'प्राकSSSSSSर' अशीच ऐकू यायची.
मित्रमंडळी 'पेठकर' आडनांवावरून 'पेठ्या' म्हणायचे.
मिपाकर 'काका' म्हणतात.
वर्गमैत्रीणी त्यांच्या मुलांना ओळख करुन देताना 'मामा' म्हणून करून देतात. *sad*

मला माझि बहिन सुधा म्हनुन हाक मारयचि
एक मामि तर सुधिर ऐवजि बुद्रुक म्हनुन हाक मारायचि
मित्र मला फक्त सु म्हनुन जोरात माझ्या घरासमोर ओरडत असे *fool*

तिमा's picture

24 May 2014 - 5:08 pm | तिमा

आईने ठेवलेली:
चमनगो
बंडुनाना खंडुकडे
खंडेराव
केसुनाना

बहिणींनी ठेवलेली:
लेवाडा स्मिथ
शेपूट
लाडोबा

मित्रांनी ठेवलेली:
लॉर्ड फॉकलंड
बाकु
डब्बु