गाभा:
नमस्कार,
रालोच्या या दिमाखदार विजयानंतर, सरलेल्या काही महिन्यात नमो लाटेचे साईड ईफेक्ट काय काय झालेत, हे पाहिले तर बर्याच रोचक गोष्टी ध्यानात येतात, उदा. महाराष्ट्रात,
१. शिवसेनेला जीवदान मिळाले
२. मनसेची धुळ्दाण झाली
३. गोपीनाथ मुंडेंसारख्यांच्या खुर्च्या वाचल्या
असे तुम्हाला जाणवलेले साईड ईफेक्ट कोणते ?
टिपः कृपया साईड ईफेक्ट सांगावेत. उदा. कॉग्रेसच्या घराणेशाहीला दट्ट्या बसला हा साईड ईफेक्ट नाही/नसावा.
प्रतिक्रिया
17 May 2014 - 4:02 am | हुप्प्या
मोदींना अमेरिकेचा व्हिसा मिळू शकेल. ;-)
(किंबहुना त्याकरताच हा नेत्रदीपक विजय त्यांनी मिळवला अशी कुजबूज आहे!)
17 May 2014 - 9:40 am | वॉल्टर व्हाईट
विनोदी असला तरी साईड ईफेक्ट आहे खरा. नोटेड.
17 May 2014 - 11:03 am | खबो जाप
मला वाटते मोदिनी विसा दिला तरी नाकारून, उलट अमेरिकेला भारतात चर्चेसाठी येण्यास आमंत्रण द्यावे.
22 May 2014 - 10:10 pm | आजानुकर्ण
नवाज शरीफांनी निमंत्रण स्वीकारल्यास नमो लाटेच्या साईड इफेक्टमुळे त्यांना बिर्याणी खायला मिळू शकते.
(नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे. १६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते. सुदैवाने तसे काही होत नाही अशी प्राथमिक चिन्हे दिसत आहेत.)
22 May 2014 - 10:26 pm | विकास
नवाज शरीफ ढोकळा खायला येत असतील आणि परत परत तीच बिर्याणी ती देखील गुज्जू स्टाईल मधली खायला लागल्यामुळे भारत-पाक संबंध परत बिघडायचे.
नमोंनी पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध ठेवण्याचे काँग्रेसचे धोरण पुढे चालू ठेवले याचा आनंद आहे.
=)) काँग्रेसचे धोरण? गेल्या दहा वर्षात धोरण म्हणून काँग्रेसने काही केले असे म्हणण्यासारखी दुर्दैवाने अवस्था नाही. सगळा आनंदच होता.
१६ मे नंतर पाकिस्तान नकाशातून गायब होणार होते असे काही ठिकाणी वाचले होते.
मोदींच्या अथवा भाजपाच्या संस्थळावर वाचले होते का? नसल्यास "अफवांवर विश्वास ठेवू नये माणसांनी" इतकेच म्हणेन. :)
22 May 2014 - 11:09 pm | आजानुकर्ण
दहा वर्षे काही केले नाही? शक्य आहे...त्यामुळेच २००९ च्या निवडणुकांमध्ये मूर्ख जनतेने काँग्रेसला तरीही निवडून दिले. मात्र २०१४ मध्ये जनता अचानक शहाणी झाली असावी. असो. येथील परंपरेनुसार अभ्यास वाढवा इतकेच म्हणेन.
मोदी आणि भाजपांनी काँग्रेसच्या बिर्याणी पॉलिटिक्सचा निषेध केला होता, मात्र आता कोलांटउडी मारून तेच धोरण पुढे चालू ठेवले आहे असे दिसते. (मुळात धोरण चांगले होते तर त्यावेळी टीकाच करायला नको होती असे वाटते. चांगले धोरण पुढे चालू ठेवल्याचा आनंद आहेच.)
23 May 2014 - 12:38 pm | श्रीगुरुजी
वरील चित्रांचा/आकडेवारीचा आणि काँग्रेसचा काहीच संबंध नाही.
India has progressed not because of Congress, but in spite of Congress.
23 May 2014 - 3:07 pm | सुबोध खरे
"If ‘con’ is the opposite of pro, then isn’t Congress the opposite of progress?
- Jon Stewart
23 May 2014 - 3:17 pm | बॅटमॅन
ते आणि हे काँग्रेस वायलं. तो कोट इथे ठेवून उगा लाईक मिळवण्यापलीकडे दुसरं कै होणार नाही.
23 May 2014 - 3:23 pm | थॉर माणूस
जॉन स्टीवार्ट एक उत्तम कॉमेडीअन आहे. पण त्याने केलेल्या अमेरीकन हाऊसेस वरच्या सटायरीकल कमेंटला इथे क्वोट करण्यामागचे कारण कळले नाही.
17 May 2014 - 7:28 am | जेपी
पासवान यांना बिहारमध्ये पुन्हा जिवदान मिळाले.
17 May 2014 - 9:50 am | वॉल्टर व्हाईट
बरोबर. नोटेड.
17 May 2014 - 9:46 am | विनायक प्रभू
दिल्ली चे तिकीट मिळाय्चे वांधे... ट्रेन चे ....
17 May 2014 - 9:55 am | पिवळा डांबिस
भाजपामधल्याच जुन्या खोडांचे (आडवानी, जसवंतसिंग, मुमजोशी वगैरे) राजकीय विसर्जन झाले!!!!
दे हॅव बिकम इररिलेव्हंट!!
17 May 2014 - 9:57 am | वॉल्टर व्हाईट
नोटेड.
17 May 2014 - 10:22 am | संपत
आडवाणी कायमचे अडगळीत गेले हे सर्वात उत्तम झाले.
17 May 2014 - 2:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
त्या अडवाणींच्याच खांद्यावर उभे राहून मोदींनी स्वत:चा राजकिय फायदा करून घेतलाय हे विसरता कामा नये.
17 May 2014 - 3:03 pm | संपत
मान्य.पण अडवाणी हे माझे व्यक्तिगत सर्वात नावडते राजकारणी आहेत. त्यामुळे आनंद झाला. :)
19 May 2014 - 1:18 pm | प्रसाद१९७१
अडवाणींच्या खांद्यावर उभे राहुन कसला? आज जे मोदींना जमले ते बाजपाई आणि आडवाणींना २०-२५ वर्षा पूर्वी जमु शकले असते. पण ते अगदीच नालायक निघाले. बाजपाई तर काँग्रेस ची B Team असल्यासारखेच होते.
17 May 2014 - 4:32 pm | स्पंदना
होय!
नाही तर जावई रुसल्या सारखे हे ऐनवेळी मी पंतप्रधान होणार म्हणुन अडुन बसायचे.
17 May 2014 - 9:57 am | वेताळ
त्या गायबच आहेत.
17 May 2014 - 10:07 am | मदनबाण
मायावती कुठे आहेत हो?
हत्तीचे उभारलेले "पुतळे" मोजत बसल्या असतील ! आता वेळ घालवण्याचे तेच एक साधन उरले ना त्यांच्याकडे ! ;)
बाकी... मोठ-मोठे माजलेले टोणगे-वळू या वेळी तबेल्यात गेले ते पाहुन फार बरे वाटले ! सर्वात महत्वाचे म्हणजे कॉग्रेसचा सुपडा साफ झाला ! सत्तेची मस्ती चढल्यामुळे त्यांच्या मग्रुरीला कोणतीच सीमा उरली नव्हती ! त्यांना त्यांची "योग्य" जागा दाखवुन दिल्या बद्धल हिंदूस्थानी जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे !
जनतेला विकास हवा आहे, आणि त्यासाठी ते उत्साहाने मतदान करुन सत्ता परिवर्तन घडवुन आणु शकतात हे आज जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीने दाखवुन दिले.
17 May 2014 - 11:46 am | अर्धवटराव
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती. किंबहुना आपलं तारु खडकावर आपटायच्या दिशेने चाललय हे काँग्रेसमधे ज्यांना कळायला हवं त्यांना कळत होतं. पण त्या तारुला योग्य दिशा देण्याचा वकुब असणार्यांना काँग्रेसने वापरलच नाहि. कंट्रोल होता नंबर मॅनेजर्स आणि तीसरी आघाडीचे वगैरे प्रयोगांवर विश्वास ठेवणार्या खुरट्या व्यक्तींकडे. काँग्रेसचा डाव स्वतःच्या कुवतीवर नव्हता. त्यांना आशा होति ति विरोधकांच्या फुटीची. त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने डोळे मिटुन दुध पिणार्या बोक्याला मतदारांनी ओळखले व कचकचुन कमरेत लाथ घातली बोक्याच्या. परिणाम दिसतोच आहे.
19 May 2014 - 7:22 am | मदनबाण
काँग्रेसला सत्तेची मग्रुरी नव्हती.
हॅ.हॅ.हॅ... असं कसं म्हणता अर्धवटराव ? त्यांच्या सर्व प्रवक्त्यांची विधाने / भाषा कधी ऐकलीच नाहीत का तुम्ही ?
लोक बोफोर्स घोटाळा विसरले, कोलगेटही विसरतील ! हे "गॄहमंत्री" सुशील कुमार यांचे वक्तव्य लक्षात आहे का ?
मौत का सौदागर असा मोदींचा उल्लेख करुन सोनिया गांधींनी सगळ्यात खालच्या पातळीचा प्रचार करुन दाखवला.
शिवाय राज बब्बर यांचे १२ रुं पोटभर जेवण मिळते हे विधान देखील विसरलात की काय ? शिवाय तो वायझेड दिग्गीराज पिसाळलेल्या कुत्र्या सारखा सगळीकडे तोंडाला काही येइल ते बरळत सुटला होता, त्याला कॉंग्रेस मधल्या कुणालाच आवरावेसे का वाटले नाही ?{ ओसामा बिन लादेन ला ओसामाजी म्हणणारा वायझेडच म्हंटला पाहिजे} ही सगळी दिर्घकाळ सत्ता हातात असल्यामुळे आलेली मग्रुरीच होती.
कोणावरही कुठलेही आरोप करत सुटले होते, गडकरींवर देखील असे आरोप करणारे मनिष तिवारी यांना बिनशर्त माफी मागावी लागली होती. मनिष तिवारी आणि कपिल सिब्बल यांनी अण्णा हजारेंच्या बाबतीत बोलताना असभ्य आणि एकेरी उच्चारण केले होते, त्यावर बीजेपीच्या सुशमा स्वराज यांनी त्यांना २ शब्द व्यवस्थित सुनवले होते.
19 May 2014 - 10:32 am | अर्धवटराव
फुकटचं खाय त्याला स्वस्त महाग काय...
हि मग्रुरीची भाषा, बेताल वाचाळता काँग्रेसमधल्या फुकट्यांची होती. जे लोकं घाम गाळुन काँग्रेसकरता मतांची बेगमी करायचे त्यांना काँग्रेसच्या चुका कळत होत्या. पण राणि, राजपुत्र आणि प्रधान पक्षहितापेक्षा घराणेशाहिला महत्व देताहेत म्हटल्यावर निवडणुकांची रणनिती घराण्याचा करिश्मा आणि विरोधकांच्या चुका या दोनच घटकांवर मर्यादीत राहिली. असो.
19 May 2014 - 3:41 pm | मदनबाण
ह्म्म...
इथे फक्त फुकट्यां ऐवजी प्रामाणिक / वफादारपणे चाटुगिरी करणारे असे म्हणीन ! जे मन लावुन तळवे चाटतात ते पदास पात्र होतात असे साधे सोपे गणित आहे... मग मड्डम सॉरी सॉरी हाय कमांड ने सांगितले ते फॉलो करा !
सुशील कुमार शिंदे यांनी गॄहमंत्री होताच त्यांचे विधान होते :-
"The Gandhi family has always taken care of the welfare of backward castes. Dalits can also take bigger responsibility. The home ministry is a critical ministry. I have performed in the past and I will again prove through my work as the home minister,"
संदर्भ :- Shinde thanks Sonia, PM for giving a 'Dalit' home ministry
म्हणजे वफादारी और दलित कार्ड २ नो एकसाथ !
बरं आपल्या देश मातेचे इतके कौतुक केल्यावर राजपुत्र ? कसे स्वस्थ बसतील ? तेही लगेच शिंदे काकांना भेट देण्यास पोहचले. ;)
संदर्भ :- Rahul Gandhi visits Shindes for dal-chawal after Sushil Kumar Shinde proclaims his dalit heritage
बरं आपण देशाचे गॄहमंत्री या पदावर आहोत याचे भान न-ठेवता,आरएसएस आणि बीजेपी हे भगवा दहशदवाद पसरवत आहेत असा अजब शोध लावुन बसले.बरं इतक्यावर हे गॄहमंत्री थांबले नाहीत तर आमच्या विरुद्ध वार्तांकन करणार्या मिडियाला आम्ही चिरडुन टाकु अशी धमकी देउन मोकळे झाले.
होम मिनिस्ट्री इज क्रिटीकल मिनिस्ट्री असे मोठे विधान करणारे असं कसं वागु शकतात ?
संदर्भ :-
RSS, BJP camps promoting Hindu terror: Sushilkumar Shinde
Sushil Kumar Shinde’s threat: Will crush ‘elements’ in media plotting against Cong
ही तर काही ठराविक उदा. झाली पण दिग्गीरांजां सारख्या मर्कटालाही सुशील कुमार शिंदे यांनी मागे टाकले आहे याची कल्पना आपल्या असेल-नसेल म्हणुन सांगतो... मुंबई हल्ल्याच्या कटाचा मुख्य सुत्रधार असणार्या हाफिद सइदचा मिस्टर हाफिद सइद आणि श्री.हाफिद सइद अशी विशेषण लावुन त्यांना उपकॄत केले. देशाचा गॄहमंत्रीच जर तुमच्या देशावर हल्ला करणार्याला अश्या उपाधी लावत असेल तर त्यांच्या "धर्मनिरपेक्षतेची" खात्री सार्या जगालाच पटेल नाही ?
संदर्भ :-For home minister Shinde, Hafiz Saeed is 'Mr' and 'Shri'
आणि अधिक हवे असेल तर इकडे :- Sushilkumar Shinde's GOOF UPs!
When Sushilkumar Shinde was in news for wrong reasons
जाता जाता :- इतके बेताल वक्तव्य इतक्या महत्वाच्या पदावर बसलेली व्यक्ती कसा करु शकतो ? अर्थातच...कारण समजले असेलच तुम्हाला.बादवे :- पॄथ्वीबाबा पण मड्डम्म... सॉरी सॉरी हायकंमाडची वाट बघत आहेत म्हणे.
19 May 2014 - 7:05 pm | सुबोध खरे
अरे अरे मदन बाणा
तू तर त्यांच्या चडडीलाच हात घातलास.
इथल्या कांग्रेस वाल्यांचे कसे होणार?
19 May 2014 - 10:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
इतकं नाकारता न येणारं स्पष्ट खर्र खर्र बोलून का मेलेल्याला मारताय ? =))
17 May 2014 - 10:08 am | प्रसाद गोडबोले
मिपावरच्या सुडो सेक्युलर लोकांच्या मजेशीर कमेन्ट्स वाचायला मिलणार नाहीत आता :(
#मौत्_का_सौदागर
17 May 2014 - 10:36 am | अनन्न्या
गांधीशाहीपेक्षा महाभयंकर राणेशाही संपली! आता विधानसभेत ना. राणे आडवे झाले की काम तमाम!!
17 May 2014 - 10:45 am | संपत
+१
17 May 2014 - 10:47 am | संपत
अशोक चव्हाण ह्यांचे राजकीय पुनर्वसन झाले :)
17 May 2014 - 11:01 am | वेताळ
खटला चालु झाल्यावर ते पण राजीनामा देतील
17 May 2014 - 11:16 am | डॉ. भूषण काळुसकर
कपिल सिब्बल आणि सलमान खुर्शिद दिसणार नाहीत आता संसदेत!!!!
लालु चारा खायला मोकळा
विरोधी पक्ष म्हणून काम कराव इतके पण खासदार कोंग्रेस कडे नाहीत
अरविंद केजरीवाल आता कुठे धरण्यासाठी बसायच याचा विचार करत असतील.
17 May 2014 - 11:50 am | पैसा
पाकिस्तानची दातखीळ बसली.
17 May 2014 - 1:34 pm | मृणालिनी
करेक्ट!!! आणि आता बाकीचे देश आपल्या देशाला वचकुन राहतिल.
21 May 2014 - 1:33 am | भृशुंडी
अमेरिकादेखील माफी मागायला येतेच आहे.
चीन मोदींना भिऊन दडी मारून बसलाय..
पाकिस्तान तर लपाछुपीच खेळतोय.. नाही का?
21 May 2014 - 6:49 am | मदनबाण
21 May 2014 - 12:09 pm | पैसा
ते त्या निकालांच्या दिवशी पाकिस्तान हूं की चूं न करता गप्प बसले त्यासाठी होतं. शेवट ते पाकिस्तान आहे. गप्प थोडेच बसणार? आपले रंग दाखवायला सुरुवात केलीच आहे परत त्यांनी.
17 May 2014 - 11:54 am | डॉ सुहास म्हात्रे
आता मिपावर आंधळ्या पार्टीप्रेमाने आणि विनोदाने ओतप्रोत भरलेले लेख आणि प्रतिसाद वाचण्याला मुकणार की हो आम्ही :( :) ;)
ते लेखकु लोगा ड्युआयडी काढणे शक्य केल्याने मिपाचे शतशः आभार मानत असणार (मनातल्या मनात) =))
17 May 2014 - 11:58 am | अर्धवटराव
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल. आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात. हिंदु धर्मातल्या उच्चनीचतेच्या जातीबंधांवर सकारात्मक, सूप्त आणि लाँगटर्म परिणाम करेल मोदि इफेक्ट.
17 May 2014 - 4:37 pm | विकास
काँग्रेसला गरज आहे एखाद्या यशवंतराव चव्हाणाची. तसा शोध कदाचीत आता सुरु होइल. अन्यथा काँग्रेसने निर्माण केलेली राजकीय पोकळी भारतीय राजकारणाला धक्के देत राहिल व त्यात आर.एस.एस चा विशेष फायदा होइल.
सहमत. पण काँग्रेसला गांधी घराणे संपले आहे आणि एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते. (अर्थात डाव्या विचारवंतांच्या मदतीने). पण संघाचे उद्दीष्ट सामाजीक आणि राष्ट्रीय आहे, तर काँग्रेसचे उद्दीष्ट हे केवळ राजकीय आहे (तसे असण्यात कहीच चूक नाही, पण ते कसे वापरले जाते यावर सगळे ठरते.) . पण थोडक्यात दोन विभिन्न गोष्टी आहेत. संघाला किमान प्रत्यक्षपणे काँग्रेसचे काही पडलेले नाही असे मला वाटते.
आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात.
प्रचारक होयला पब्लीक येईल असे म्हणायचे आहे का? तेव्हढे सोपे नाही, अगदी कुणाची इच्छा असली तरी होणे हे नुसते रजिस्ट्रेशन करण्याइतके सोपे नाही. इतकेच तुर्तास म्हणतो. :)
17 May 2014 - 7:38 pm | संपत
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
कोंग्रेसने ते केले असे वाटत नाही. संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच. पण हा विचार जर व्यापक देशहितासाठी धोकादायक वाटत असेल तर संघाला विरोध राहणारच.
सहमत.
18 May 2014 - 1:49 am | निनाद मुक्काम प...
प्रियांका लावो ,पार्टी बचाव
प्रियांका इज इंडिया
तिचा राजकारणातील अनुभव
फक्त आईचा व भावाचा प्रचार करते व तेव्हाच जनतेपुढे येते ,मात्र ती राजघराण्यातील आहे व देश तिच्या घर्राण्याला दत्तक दिला आहे.
तिचा पक्ष भले गफलेबाज असेल , नाकर्ता असेल तरी तो सेक्युलर आहे
तेव्हा त्यांना मते द्या
तूर्तास अर्णव ने तिची मुलाखत आपल्या कायक्रमाच्या वेळी घेऊ नये अशी कपिल ने त्यास विनंती केली आहे.
एक म्यान मे दो तलवार ....
18 May 2014 - 6:04 am | विकास
राजकारणात एका पराभवाने कोणी कायमचे संपत नसते. इथे तर प्रियांका अजून शिल्लक आहे.
दोन्ही वाक्यांशी सहमत. माझ्या मूळ वाक्यात लिहीताना गडबड झालेली दिसते... कारण वाक्याच्या शेवटी मला जे म्हणायचे ते आहे स्पष्ट होते: "(काँग्रेसला)...एकूणच घराण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडावे लागेल. "
संघाचे विचार स्पष्ट आहेत. जर तुमच्या वैचारिक घडणीला 'हिंदुस्तान हिन्दुओ का' पटत असेल तर संघाच्या विचारसरणी पटणारच.
'हिंदुस्तान हिन्दुओ का' असे संघाच्या विचारात मी कधी ऐकलेले नाही. किंबहूना संघाच्या नावात देखील हिंदू हा शब्द नाही ... संघाच्या प्रार्थनेत जी प्रत्येक स्वयंसेवक शाखेच्या शेवटी प्रतिज्ञा घेतल्यासारखी म्हणतो त्यात देखील हे शब्द येत नाहीत. तुम्ही जे म्हणता ते तुमचे स्युडोसेक्यूलर अथवा डाव्या विचारवंतांनी गेली अनेक दशके लेखन आणि भाषणातून केलेल्या ब्रेनवॉशिंगमुळे म्हणत आहात. हे म्हणजे "संघाचा गांधीद्वेष जगजाहीर आहे", असे म्हणण्यासारखे झाले... :) त्याला काही बेसीस नाही. :(
18 May 2014 - 10:14 am | संपत
मी स्वतः संघाच्या शाखेत गेलो आहे. खेळताना, शाखा संपताना, बौधीकानंतर ही घोषणा दिली जात असे. गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.
18 May 2014 - 12:38 pm | पिशी अबोली
बौद्धिकानंतर घोषणा? कुठे होतं म्हणे हे?
18 May 2014 - 12:47 pm | llपुण्याचे पेशवेll
संघात हिंदुत्ववाद हा शब्द मी ऐकला आहे. पण आजपर्यंतच्या २९-३० वर्षात हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दलची घोषणा कधीही ऐकली नाही. किंबहुना महाराष्ट्रात जिथे जिथे शाखेत गेलो आहे तिथेही ऐकली नाही.
अर्थात हिंदूराष्ट्र होऊ नये अशी माझी इच्छा नाही असे नाही.
18 May 2014 - 1:01 pm | संपत
हिंदुराष्ट्राच्या जयाबद्दल नाही हो..'हिन्दुओ का हिंदुस्थान' अशी घोषणा होती ती.. दादर आणि लालबाग ह्या दोन भागातील शाखाना मी गेलो होतो.
18 May 2014 - 12:58 pm | संपत
आम्हाला बुवा सांगायचे घोषणा द्यायला.. दादर आणि लालबागच्या शाखांमध्ये.. राष्ट्रासेविकाना घोषणा द्यायला नाही सांगायचे वाटते?
18 May 2014 - 1:15 pm | संपत
तुम्ही दोघेही संघाशी संबधित आहात असे दिसतंय (पिशि मावशी अर्थात राष्ट्रीय सेविका समितीत असतील, कारण माझ्या आठवणीत संघ शाखात मुलीना प्रवेश नव्हता), मग विचारधनबद्दल मी म्हटले तेही खोटे आहे काय? जालावर त्याची प्रत सापडली असती तर दुवा दिला असता.
18 May 2014 - 1:31 pm | चौकटराजा
मी संघात चारेक वर्षे तरी गेलेलो आहे. संघात मुसलमानांविरूद्ध वा बौधाविरूद्ध व ख्रिश्चन विरोधी काही मला शिकवल्याचे आठवत नाही. हिंद्र्राष्ट्र ही कल्पना १९६२ चा सुमारास ऐकल्याचे आठवते पण आता इतक्या वर्षानी समावेशकता हा हिंदू संकृतीचा एक मोठा गुण आहे हे संघवाल्याना पटले असावे. संघाने अनेक उत्तम कामे केल्याचे भूतकाळात दिसले आहे तसे
समाजवादी वा कॉग्ग्रेस यानी केल्याचे दिसलेले नाही. जसे अमेरिकेला " पैसा" ही एकच संस्कृति दिसते तशी काहीही करून
सत्ता ही कोंग्रेस संस्कृति आहे. आजच विनय सहस्त्रबुद्धे यानी संघाची एक मुस्लीम सेल स्थापित झाल्याची माहिती दिली आहे .
18 May 2014 - 1:56 pm | संपत
सहमत. विशेषतः संघ स्वयंसेवकांनी चालवलेल्या अनेक संस्था उत्तम काम करतात ह्यावर माझा विश्वास आहे. मी स्वतः अनेक आदरणीय व्यक्तींना ओळखतो. संस्थाना मदत करताना त्या संघप्रणीत असतील तर मी विनियोगाब्द्दल अधिक निशंक असतो. पण माझा विरोध मूळ संघ तत्वांना आहे. ती केवळ मला पटणारी नाहीत म्हणून नसून ती देशाला विघातक आहेत अशी माझी बाबरी मस्जिद आणि त्यानंतर झालेल्या मुंबईमधील दंगली अतिशय जवळून पहिल्याने झालेली समजूत आहे.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहे. (हे मत फक्त संघाबद्दल असून भाजपमधले लोक हे पक्के राजकारणी आणि चालू असतात. संघातून आयात केलेल्यांचा थोडाफार अपवाद.)
आयला, म्हणजे मी ज्या शाखात गेलो फक्त तिथेच असे शिकवायचे काय? म्हणजे उघड संघ शाखेत मुसलमान विरोधी काही बोलले नाही तरी हिंदू राष्ट्राची भलावण चालायचीच.शाखा संपल्यानंतर मात्र दादा किंवा भैय्या स्पष्ट शब्दात आपल्या भावना मांडायचे. मला आलेला अनुभव स्थळसापेक्ष असेलही पण गोळवळकरांचा पुस्तकांचे काय?
अर्थात आता संघ बदलला असेल अशी शक्यता असली तरी माझा विश्वास बसणे कठीण आहे.
18 May 2014 - 2:07 pm | प्यारे१
हिंदूराष्ट्र म्हणत असावेत पण हिंदू कुणाला म्हणतात संघ वाले ते पण बघा.
अवांतरः इथे अल्जिरिया मध्ये लोक इन जनरलच इन्डियन म्हणजे 'हिन्दू' असंच बोलतात.
प्रश्न विचारताना 'हिन्दु?' असा अस्तो.
21 May 2014 - 1:36 pm | मिलिंद बोडस
मी मोरोक्कोमधे वर्षभर होतो. तिथेही Indian म्हणजे हिंद असंच म्हणतात. पण त्यांच्या दृष्टीने भारतीय जर मुसलमान नसतील तर ते बौद्ध असतात. भारतीय म्हणजे बौद्ध हे समीकरण आहे इथे. आणि मी बौद्ध नाही हिंदू आहे असं सांगितल्यावर " Hindoo?? What is that? Is it a religion? असा प्रश्न सर्वसामान्यपणे विचारला जायचा. त्या धक्क्यातून मी अजून सावरलो नाहीये.
21 May 2014 - 4:59 pm | चौकटराजा
हिंदू मुस्लीम द्वेष फक्त भारतात आहे. १८८५ साली कॉंगेस जन्माला आली अन १९२५ साली आर एस एस या काळात ( ४० वर्षात) असा कोण नेता कारणीभूत झाला यामुळे हा द्वेष पसरला ?
18 May 2014 - 2:36 pm | बाळकराम
देशाला विघातक आहेतअगदी बरोब्बर संपत जी.चुकीच्या तत्वांवर विश्वास ठेवणारी चांगली माणसे असे माझे संघाबद्दल मत आहेसहमत आहे, मी देखील अनेक निरलसपणे, नि:स्वार्थीपणे चांगली कामे करणारी लोक बघितली आहेत, माझे अनेक जवळचे मित्र संघवाले असून वैयक्तिक पातळीवर उत्तम प्रकारे समाजसेवा करतात. पण संघतत्त्वे ही घातक, दुभाजक आहेत याबद्दल शंका नाही.
19 May 2014 - 4:40 am | विकास
२००२ साली तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजींच्या सुचनेप्रमाणे मुस्लीम राष्ट्रीय मंच ची स्थापना केली गेली. त्याचे कां इंद्रेश कुमार यांच्याकडे देण्यात आले होते. त्याच्या आधी सुदर्शनजींच्या आणि संघाच्या इतर कार्यकर्त्यांच्या मुस्लीम नेतृत्वाबरोबर देखील बैठका झाल्या होत्या असे वाचल्याचे आठवते. मात्र नंतर गोध्रा घडले पाठोपाठ दंगली उसळल्या आणि जा मंच जरा मागे फेकला गेला. पण नंतर परत त्याचे स्थान तयार होऊ लागले. अशा वेळेस संघातून जी व्यक्ती मुस्लीम समुदायास जवळची वाटू लागली होती तिच्या म्हणजे इंद्रेशकुमारांच्या सभोवताल अजमेर बाँबचे संशयाचे वातावरण तयार केले गेले. आरोपपत्र कधीच ठेवले गेले नाही. पण त्यातून डाव्या विचारवंतांना अजून भेद करण्याची संधी दिली गेली.
अर्थात असे किती दिवस फसवता येणार... मग ते सगळे मागे पडले. नंतर तेच इंद्रेश कुमार मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत मुस्लीम राष्ट्रीय मंच आणि मुस्लीम महीला फाउंडेशन बरोबर काम करत होते. बाकी आता इतिहास आहे.
18 May 2014 - 1:33 pm | संपत
सापडला दुवा. पिशिमावशी, आता कृपया गोळवलकर? कोण असतात म्हणे हे असे विचारू नका.
18 May 2014 - 9:30 pm | पिशी अबोली
अहो संपतकाका, मी तुम्हाला काय विचारले ते बघता का ज़रा? बौद्धिकानंतर अशी घोषणा व्हायची का?
बाकी इथे आधीच कुणीतरी सांगितल्याप्रमाणे 'हिन्दू' ची व्याख्यासुद्धा बघावी आधी. आणि संघ आणि संघप्रणित संस्थांमधे काम करणारे मुस्लिम/ ख्रिश्चन कार्यकर्ते तुम्ही कधीच पाहिले नाहित का?
18 May 2014 - 10:26 pm | प्रीत-मोहर
अगदी!!!!
मीसुद्धा कधीच अशी घोषणा नाही दिली किंवा दुसर्याला देताना पाहिल.
18 May 2014 - 11:43 pm | संपत
तुम्ही दोघीं संघाच्या कुठल्या शाखेला गेल्या होत्या याचे कुतुहुल आहे. कारण माझ्या माहितीप्रमाणे अजूनही संघात स्त्रियांना प्रवेश नाही.(चू भू द्या घ्या)
19 May 2014 - 7:39 am | चौकटराजा
माझी आई १९२८ ला जन्मली व २०१३ ला निधन पावली. ती बालपणी संघाच्या महिला शाखेत जात असे त्याला समिती असे म्हणत असत.
19 May 2014 - 12:40 pm | संपत
माहित आहे. राष्ट्रीय सेविका समिती. तसे मी वर म्हटलेही आहे. पण माझ्या आठवणीत संघ शाखांशी त्यांचा संबंध नसायचा.
19 May 2014 - 1:04 pm | पिशी अबोली
राष्ट्र सेविका समिती
18 May 2014 - 11:45 pm | संपत
जरा मलाही समजावून सांगा कि संघाची हिंदूची व्याख्या. म्हणजे मला जर रामाबद्दल आदर नसेन तर संघ मला हिंदू मानेल का?
19 May 2014 - 12:33 am | पिशी अबोली
तुम्ही बौद्धिकांबद्दल बोलताय न? जाहीर बौद्धिक म्हणून एक प्रकार असतो. त्याला महिलांना प्रवेश असतो.
याव्यतिरिक्त मी समितीच्या मालवण, गोवा, पुणे अशा कमीत कमी तीन ठिकाणी शाखांना गेलेली आहे.
प्रश्न हिंदूच्या व्याख्येचा. मला तुमचा दुवा आत्ता पाहता येत नाहिये. पण त्यावर खरोखर श्रीगुरुजींचे विचार दिलेले असतील, तर तुम्हाला याचे उत्तर तिथेच मिळावे..
19 May 2014 - 1:11 am | संपत
जाहीर बौद्धिक नाही हो.. रविवारी सकाळी खास शाखा भरायची.तिथे कुणी महनीय आदरणीय वगैरे व्यक्ती (म्हणजे आसपासची किंवा बाजूच्या शाखेतील) बौद्धिक द्यायची :).
हे पुस्तक मी पूर्वी वाचले आहे. त्यावेळी राम जन्मभूमी, शहाबानो इत्यादी विषय गाजत असल्याने ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने चर्चाही ऐकल्या आहेत. मला माझे उत्तर मिळाले आहे.त्या पुस्तकात दिलेल्या व्याखेच्या अनुषंगानेच मी हा प्रश्न विचारला आहे.
बाकी तुम्ही हे पुस्तक वाचले नाही याचे आश्चर्य वाटते (खरच, उपरोध नाही). हे पुस्तक जवळपास कंपल्सरी रीडिंग होते. प्रचारक स्वताहून ह्याची प्रत फुकट वाटत असत.
अवांतर : विंदांची पिशी मावशीची पिलावळ अशी कविता आहे बहुतेक.म्हणून माझा तुमच्या नावाबाबतीत गोंधळ उडाला असावा.
19 May 2014 - 9:40 am | पैसा
अवांतरः पिशीमावशी पाही भुतावळ असे आहे ते.
19 May 2014 - 12:30 pm | संपत
बरोबर. माझा मुलगा लहान असताना ती पुस्तके आणली होती. पिशिमावशी तेवढे लक्षात राहिले होते.
18 May 2014 - 11:55 pm | संपत
मी चुकून तुमचा आयडी पिशि मावशी असा वाचला होता त्यामुळे तसे संबोधित होतो. चुकीबद्दल क्षमस्व.
19 May 2014 - 12:38 am | पिशी अबोली
ओके. माफ करा मला ते थट्टेने म्हटल्यासारखं वाटलं.
19 May 2014 - 12:39 am | पिशी अबोली
ओके. माफ करा मला ते थट्टेने म्हटल्यासारखं वाटलं म्हणून मीपण तसंच बोलले.
19 May 2014 - 1:13 am | संपत
हरकत नाही..तसेही आजकाल सर्वच काका म्हणतात :(
19 May 2014 - 12:31 am | विकास
मी ही घोषणा कधी ऐकलेली नाही. संघात बौद्धीकानंतर घोषणा देणे हा प्रकारच अस्तित्वात नाही. किंबहूना त्यांच्या शाखा पध्दतीत नाही. खेळताना घोषणा दिल्या जातात पण त्यात देखील ही मी ऐकलेली नाही.
गोळवलकरांचे विचारधन हे पुस्तक संघ विचारांचे सार समजले जाते. त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे.
तुम्ही ते पुस्तक वाचून सांगत आहात का त्यावर केलेली डाव्या विचारवंतांची पोकळ विधाने वाचून सांगत आहात? थोडक्यात त्यांनी नक्की काय म्हणले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे?
19 May 2014 - 1:25 am | संपत
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.पुस्तकात हिंदू राष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मंडळी आहे. हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना स्थान असेल पण त्यांनी आपला धर्म स्वतःपुरता ठेवावा. हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा. पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे.
गोळवलकरांचे संघातील स्थान लक्षात घेता ते त्यांचे वैयक्तिक विचार होते, संघाचे नव्हते अस काहीतरी कृपया बोलू नका.
19 May 2014 - 4:17 am | विकास
दुवा वर दिला आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता.
मी वाचला आहे पण तुम्ही नक्की काय वाचले हे समजत नाही... म्हणून बंच ऑफ थॉट्स मधले हिंदूराष्ट्र आणि अल्पसंख्य संदर्भातील वाक्य इथे चोप्य पस्ते करत आहे. त्यातून नक्की तुम्हाला काय अर्थ लागतो ते बघा...
So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil. As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths.
19 May 2014 - 7:17 am | पिशी अबोली
हेच म्हणायचे होते. मी जेवढं लिखाण वाचलंय, ऐकलंय, त्यात 'मुस्लिमांना हाकला, त्यांचे धर्मान्तर करा टायप कधीच ऐकल्याचं आठवत नाही.
19 May 2014 - 12:10 pm | संपत
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे तुमच्या वैचारिक घडणीप्रमाणे ते तुम्हाला योग्य वाटेल किंवा नाही. पण संघाचा आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, ते डाव्यांचे ब्रेन वाशिंग आहे हा तुमचा गैरसमज दूर झाला असेल अशी अशा.
19 May 2014 - 1:03 pm | पिशी अबोली
असं कुणी आणि कुठे म्हटलं? माझा मूळ प्रश्न अगदी साधा सरळ होता. बौद्धिकानंतर घोषणा दिली जात नाही हे मला माहीत आहे. ते कुठे होत असेल तर माझ्यासाठी मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे.
त्यातही 'हिंदुओं का हिंदुस्तान' ही घोषणा तर शाखेवरसुद्धा होत नाही (माझ्या घरात संघाची शाखा काही काळ तरी भरायची, त्याशिवाय मी समितीच्या शाखेत गेलेय/जाते हा भाग वेगळा)
राहता राहिलं हिंदुत्व. 'हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ' हे आता सांगायचापण कंटाळा आलाय. हिंदुत्व म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शिरकाण नव्हे, तर सर्वांना सामावून घेण्याची एक जीवनपद्धती हे तुम्ही ऐकलेल्या कुठल्याच बौद्धिकात सांगितले नसेल तर ती माझ्यासाठी अजून एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे, किंबहुना असे होणे फारच कठीण. तुम्ही दिलेला दुवा आत्ताच पाहिला. काल उघडता येत नव्हता म्हणून मला नक्की कळतच नव्हतं की तुम्हाला असं काय सापडलं त्यात की संघ बिगरहिंदूंना कसा घातक याबद्दल तुमची खात्री पटली. कारण श्रीगुरुजींचे विचार मी वाचले आहेत. आत्ता दुवा बघूनही कळत नाहीये की तुमचा आक्षेप नेमका कशाला आहे.
19 May 2014 - 2:44 pm | संपत
तसे विकास म्हणत होते,तुम्ही नाही.
मी तुम्हाला वर विचारल्याप्रमाणे जर का मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे. म्हणजे मी जरी भारताचा नागरिक असलो आणि कुठल्याही प्रकारे देशाला धोका नसलो तरीदेखील मी हिंदू संस्कृतीचा आदर करत नसल्याने हिंदू राष्ट्रात राहण्याच्या लायक नाही. थोडक्यात हिंदू राष्ट्रात इतर धर्मियांना उदार अंत:कारणाने राहू दिले जाईल, पण त्यांनी औकातमध्ये राहावे(जे बहुतांश मुस्लीम राष्ट्रांचे इतर धर्मियांबद्दल धोरण आहे.)
19 May 2014 - 4:04 pm | विकास
मला रामाबद्दल आदर नसेल तर मी हिंदुराष्ट्रात राहू शकीन का? उत्तर नकारार्थी आहे.
हे देखील तुम्हाला कोणी कानात सांगितले का? कारण मी कधी ऐकलेले नाही. रामावर कडक टिका करणारे आंबेडकर हे संघाच्या प्रातःस्मरणात आहेत हे कदाचीत आपल्याला माहीत नसेल.
19 May 2014 - 4:02 pm | विकास
संघाची हिंदुत्वाची आणि हिंदू राष्ट्राची भूमिका सर्वसमावेशक आहे कि नाही हा वेगळा चर्चेचा विषय आहे.
वेगळा कसा काय? "हिंदूस्तान हिंदूओंका" असली कधी शाखेत न ऐकलेली घोषणा तुम्ही सांगता ज्यातून संघ सर्वसमावेषक नाही आणि संघ धोकादायक आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्न करता. मग त्यावर प्रश्न विचारले की, आधी बौद्धीकानंतर, मग नेहमीची शाखा नाही, रविवारची शाखा (हा काय प्रकार आहे? भारतात असे काही नसतेच) म्हणणार... मग त्याच वाक्याचे समर्थन करताना गुरूजींच्या पुस्तकाला मधे आणून "त्यातही हिंदुराष्ट्र ही संकल्पना विस्ताराने मांडली आहे. " असे म्हणणार...
त्यावर उत्तर म्हणून गुरूजी काय म्हणाले आहेत हे पुस्तकातल्या उतार्यानेच दाखवल्यावर आणि याचा अर्थ काय लागतो असे विचारल्यावर म्हणणार की तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे.
हीच तर सगळ्या ब्रेनवॉश झालेल्या लोकांची गंमत आहे. त्यांना कळतच नाही की आपले ब्रेनवॉश केले आहे... जसे अंधश्रद्ध व्यक्तीचे अंधश्रद्धांच्या बाबतीत होते.
म्हणून परत एकदा विचारतो की तुम्हीच चर्चेत आणलेल्या मुद्यासंदर्भात आणि तुम्हीच चर्चेत दिलेल्या गुरूजींच्या पुस्तकातीलचा संदर्भ घेऊन त्यातून दिलेल्या उतार्यावरून तुमच नक्की काय मत होते? असे कुठे लिहीले आहे? की हिंदूस्तान हिंदूओंका म्हणून ?
19 May 2014 - 5:14 pm | संपत
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही.
संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
माझे हिंदुत्वावाद्याबद्दल हेच म्हणणे आहे म्हणून मी त्यावर वाद घालण्याचे टाळतो. तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले.
जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.
21 May 2014 - 12:15 am | विकास
आत्ता लक्षात आले माझा प्रतिसाद प्रकाशीतच झाला नव्हता... आता परतः
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले? मुळात national stream of this soil हा काय प्रकार आहे? थोडक्यात हिंदुराष्ट्रात हिंदू संकृती न स्वीकारनर्याना स्थान नाही.
"national stream of this soil" म्हणजे देशाला आपले म्हणणे. आपल्याला स्वतःला वेगळे न समजणे. भारतातील प्रत्येक व्यक्तीच भारतीय आहे. आणि जसे अनेक देशात आजही हिंदुस्तानातल्या कुणालाही म्हणले जाते तशा त्या हिंदूही आहेत. त्यात धर्म नसतो. पण त्यातील हिंदू म्हणायचे काही कारण नाही. जसे अमेरीकन नागरीकत्व घेताना नॅचरलायझेशन केले जाते असे म्हणतात तसे. त्यात कोणी ख्रिश्चन होत नाही तर अमेरीकन होतो. तसेच या भुमीस सर्व भुमीपुत्राने आपले तरी म्हणणे बरोबर आहे ना? का तसे न म्हणता त्याच भुमीचा दुस्वास करणे बरोबर आहे? बाकी हिंदु संस्कृती न स्विकारणार्यांना स्थान नाही असे तरी कुठे म्हणले आहे? पण एकमेकांच्या बाबतीत आदर ठेवावा हा संस्कृतीचा भाग आहे असे म्हणले आहे. आता तो खरं म्हणजे तुम्ही हिंदू संस्कृती पाळा अथवा नका पाळू सर्वत्रच असायला हवा का नाही?
त्या परीच्छेदात पुढे असे देखील म्हणले आहे ना? "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever. Ingrained in this soil is love and respect for all faiths and religious beliefs. He cannot be a son of this soil at all who is intolerant of other faiths."
संघाने हे सर्व विचार त्यांच्या पुरतेच मर्यादित ठेवले तर काहीच हरकत नाही. पण एक राष्ट्रीय पक्ष जेव्हा ते विचार पुढे लोटतो तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.
संघाने आणि भाजपाने काहीच वेडेवाकडे विचार केलेले नाहीत. त्यांचा विरोध आहे तो सदानंद धुमेंच्या शब्दात वाचलेल्या "स्कलकॅप सेक्यूलॅरिझमला" आहे. सर्वांना आदर देण्याबाबत विरोध नाही.
तुम्ही संघ हा हिंदुत्ववादी नाहीच असे म्हणालात तेवढे मी स्पष्टीकरण दिले.
मी कधी आणि कुठे म्हणले आहे? किंबहुना या चर्चेत तर हिंदुत्ववाद हा शब्द देखील मी (ऑन माय ओन) वापरलेला नाही! आणि हिंदुत्ववाद हा मला फुटीरता पाडणारा, अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारा वाटत नाही. त्याचा अर्थ डाव्यांनी चुकीचा लावत ठेवला. संघाने अथवा भाजपाने नाही.
जाता जाता: भाजप /संघ / शिवसेनेने आंबेडकरांच्या रामावर टीका केलेल्या (riddles of rama and krishna) ह्या पुस्तकावर बंदीची मागणी केली होती आणि त्यामुळे दंगलीदेखील झाल्या होत्या.
कुठल्याही पुस्तकावर बंदी घालायला माझा विरोध आहे. ती प्रथा चुकीची आहे आणि तसेच पुस्तके जाळण्याची प्रथा देखील... पण वैचारीक विरोध जर एखाद्या व्यक्ती-पुस्तकाबद्दल केला म्हणून काय बिघडले? का आंबेडकरांनी राम - कृष्ण यांच्यावर टिका केली की विचारस्वातंत्र्य आणि शिवसेना - भाजपाने आंबेडकरांवर टिका केली की मात्र ते fanatic?
21 May 2014 - 5:21 pm | संपत
21 May 2014 - 5:25 pm | संपत
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय? आणि इतर धर्मियनच ह्या अटी कशाला? हिंदू धर्मात जन्म झाला म्हणून हे सर्व गुण माझ्यात आपोआप येतात काय? जे वाक्य मला सरळ सरळ धार्मिक अहंकाराच उदाहरण वाटते ते तुम्ही संघाच्या सर्व समावेशकतेचे म्हणून देता ह्यातच आपल्या विचारातली दरी दिसते.
तुमच्या ह्या वाक्यांवरून मला तसे वाटले. तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक. (अर्थात तुमचेही ह्या दोन दिवसात डाव्यांनी ब्रेन वाशिंग केले नसेल तर:))
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.
21 May 2014 - 7:00 pm | विकास
इतर धर्मियनच ह्या अटी कशाला?
कुठल्या अटी? दाखवून द्या बरं! त्यांचे म्हणणे हे "religious minority" हा शब्दप्रयोग करण्यासंदर्भात होते. त्यांच्या दृष्टीने सगळेच भारतीय आहेत.
मग भारतीय आहेत ना लोक. हिंदू राष्ट्राची गरज काय?
हिंदू राष्ट्र आणि भारत हे त्यांच्या लेखी वेगळे नाहीत. डाव्यांच्या आणि समाजवादी लोकांच्या लेखी वेगळे आहेत. तरी देखील गंमत म्हणून कालचे मोदींचे संसदेच्या सेंट्रल हॉल मधील भाषण बघा अथवा वाचा... ह्या भाषणाचे शबाना आणि शशी थरूर यांनी देखील मर्यादीत का होईना पण कौतुकच केले आहे. शबानाच्या म्हणण्याप्रमाणे न वाचता केलेले भाषण, आणि आतून (मनापासून) आलेले विचार दिसत होते. त्यामुळे तिच्या म्हणण्याप्रमाणे मोदी स्टेट्समन म्हणून शोभत होते. तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही. पण गंमत म्हणजे त्यात कुठेही हिंदू हा शब्द देखील आलेला नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही अथवा दुर्लक्ष केले...
तुम्ही संघ हिंदुत्ववादी आहे हे मान्य केलेत हे ठीक.
जालीय अभ्यास कमी पडतोय वाटतं! ;) अहो संघच काय, मी देखील हिंदुत्ववादी आहे हे मान्य आहे आणि जालावर ज्यांना मी माहीत आहे त्या माझ्या वैचारीक विरोधकांना देखील ते माहीत आहे. त्यात नवीन काहीच नाही! पण तुमचा जर हिंदुत्ववादाला आक्षेप असला तर माझा कुणालाही अल्पसंख्य म्हणायला आक्षेप आहे. माझे सर्वधर्मिय मित्र आणि परीवार मित्र (म्हणजे संघपरीवार नाही ;) फॅमिलीफ्रेंड्स या अर्थाने) आहेत. पण माझ्या (संघाच्या) हिंदुत्ववादात कुठल्याही धर्माचा/धर्मियाचा अपमान होत नाही आणि कोण कसे पुजा/प्रार्थना करते अथवा अजिबात करत नाही, त्यावरून त्यांची किंमत केली जात नाही. मात्र जर हिंदूंच्या बाबतीत असे वागले गेले (ते बहुतांशी डावे-समाजवादी हिंदूच वागतात, इतर धर्मिय नाही) तर मात्र मला मान्य नाही!
हिंदू हा ह्या देशाच उदार, सहिष्णू राजा आहे ही विचारसरणी सोळाव्या शतकात कौतुकाचा विषय ठरू शकते, एकविसाव्या शतकात नाही.
वर मोदींचे उदाहरण दिले आहेच. गंमत म्हणून अथवा गांभिर्याने कोणी खरेच संशोधन केले तर आढळून येईल की हिंदू, हिंदूत्ववाद हे दोन्ही शब्द तसेच अल्पसंख्य हा शब्द राजकारणात आणि समाजकारणात संघ आणि भाजपा पेक्षा डावे आणि समाजवादीच जास्त वापरतात. तो त्यांनी तयार केलेला बागुलबुवा आहे.
तुमच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून ती आंबेडकरांची माहिती होती.
प्रतःस्मरण संघशाखांमध्ये चालते (ते देखील सकाळच्या अथवा शिबिराच्या वेळेस), भाजपा आणि शिवसेनेत नाही! :)
21 May 2014 - 8:01 pm | संपत
21 May 2014 - 8:22 pm | विकास
ते वाक्य पूर्ण का नाही दिलेत? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायची पद्धत पण डावी अधिक आणि काही अंशी समाजवादी आहे... परत एकदा देतो ते वाक्यः
So, all that is expected of our Muslim and Christan co-citizens is the shedding of the notions of their being 'religious minorities' as also their foreign mental complexion and merging themselves in the common national stream of this soil.
अर्थात स्वतःला या देशातले अल्पसंख्य न म्हणता या देशाचेच म्हणा असा याच अर्थ आहे. पुढे ते असे देखील म्हणाले आहेत ना की, "As far as the national tradition of this land is concerned, it never considers that with a change in the method of worship, an individual creases to be the son of the soil and should be treated as an alien. Here, in this land, there can be no objection to God being called by any name whatever." थोडक्यात तुम्ही कुणाची पुजा करता, कुणाला प्रेषित मानता हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण हिंदू धर्मात तरी कुठे एक समान पद्धत आहे? पण आमची पुजा पद्धत वेगळी, प्रेषित वेगळा म्हणून आम्ही वेगळे आणि त्यातून या देशाशी इमान राखण्याचा प्रश्नच नाही अशी वृत्ती तयार करणे योग्य आहे का?
21 May 2014 - 8:30 pm | संपत
पूर्ण वाक्य वर दिले आहे. पुन्हा पुन्हा काय पूर्ण वाक्य द्यायचे? आता मुद्याला धरून दिले..
21 May 2014 - 8:39 pm | विकास
मुद्याला धरून दिले नाही अथवा अर्थ समजलेला नाही...
त्यातले फक्त मुस्लीम आणि ख्रिश्चन इतकेच शब्द समजले. त्यात पुढे त्यांनी स्वतःला अल्पसंख्य म्हणत बसू नये हे म्हणलेले दिसले नाही.
21 May 2014 - 8:24 pm | संपत
म्हणजे फक्त नावे वायली वायली.. आतला माल सेम.. विचारधन म्हणजे संविधानाची झेरॉक्सच जणू. बर्रर.
मला खरच नव्हते माहित हे. नाही तर एव्हढे डोके खपवलेच नसते. माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात. जालीय अभ्यास वाढवला पाहिजे हे खरच :)
21 May 2014 - 8:48 pm | विकास
माझा समज होता कि तुम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर मोदींचे समर्थक आहात.
तेच बरोबर आहे. बाकीचे मुद्दे आहेत त्यात मला डाव्या विचारवंतांनी आणि समाजवाद्यांनी केलेल्या समाजभेदाबद्दल तिडीक आहे. त्यांच्यामुळे बरेचसे नुकसान झाले आहे. सतत अल्पसंख्य - गरीब गरीब म्हणून काही होत नसते. नाहीतर गेल्या दहा वर्षात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मधे आपले स्थान बरेच वर गेले असते.
फक्त भारतीय म्हणून सगळ्यांकडे बघणे हा कॉन्सेप्ट तमाम डाव्या-समाजवाद्यांसाठी अवघड आहे, चाकोरीच्या बाहेर आहे. पण त्यांना वाटत असलेल्या पध्दतीने आत्तापर्यंत आपण तळच गाठत आलो आहोत. आता थोडा वेळ देऊन नक्की या "सबका साथ सबका विकास" ने काय होते ते पाहूयात. त्यासाठी जरा वेळ द्या.
21 May 2014 - 10:15 pm | डॉ सुहास म्हात्रे
तरी देखील एक आक्षेप घेतला गेला की त्यांनी अल्पसंख्य असा उल्लेख केला नाही.अल्पसंख्य असल्याचा आणि तसे वागणूक द्यायचा नेहमी आग्रह धरायचा आणि मग आम्हाला वेगळे वागवतात असा आरोप करायचा ! मुख्य म्हणजे या सगळ्यात तथाकथित विचारवंतांना काही विरोधाभास (कांगावाखोरपणा ?) दिसत नाही !! जय हो !!!
असे "जाती-धर्मावर आधारीत भेदाभेद" करण्याचा आग्रह करण्याऐवजी "प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीवर आधारून मदत आणि समान संधी" याचा आग्रह धरण्याइतका या तथाकथित विचारवंतांचा मानसिक विकास कधी होईल ?
22 May 2014 - 5:14 pm | निनाद मुक्काम प...
एक भारतीय म्हणून नेहमी मला एक प्रश्न पडतो
अल्पसंख्यांक म्हटले की सर्वप्रथम नाव येते ते मुस्लिम समाजाचे ,
असे का
ह्या देशात पारसी , जैन , शीख , ख्रिस्ती , सिंधी आणि बरेच अल्पसंख्यांक आहेत. त्यांना कधी सरकार दरबारी एवढे आन्जारावे , गोंजारावे लागत नाही. ह्यांना स्वताच्या पायावर उभे राहण्यास काय संघाने व माजी सरकारने मदत किली होती का
भारतात अजून हिंदूंच्या मध्ये अनेक वर्ग मागासलेले आहे.
एका धर्मांच्या लोकांचे वेगळे लाड का ,त्यांचे चोचले का पुरवावे लागतात.
सच्चर आयोग माजी सरकारचा त्यात मुस्लिमांची हालात चांगली नसल्याचे म्हटले आहे, आता बह्तांशी काळ अपवाद वगळता ह्यांचेच सरकार सत्तेवर होते तरीही जर मुस्लिमांची हालत खराब असेल तर त्याला संघ व मोदी जबाबदार नाही ,
21 May 2014 - 4:34 pm | शिरपतराव्_टांगमारे
समजा असतील माझ्यावर foreign mental complexion आणि नाही झालो मी समरस national stream of this soil शी तर काय बिघडले >> काय राव, हे कुठल्याही राष्ट्राचं बेसिक तत्व नव्हे का आणि नको का?
21 May 2014 - 6:52 pm | संपत
अहो, नसेल आवडत मला देशातील काही गोष्टी आणि आवडत असतील परदेशातील गोष्टी म्हणून मला ह्या देशात स्थान नाही का? आणि ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.
21 May 2014 - 7:01 pm | विकास
ह्या अटी फक्त मुस्लीम, ख्रिश्चनांना.
असं कुठे म्हणले आहे?
19 May 2014 - 10:50 am | llपुण्याचे पेशवेll
बस मग उत्तर तर तुम्हीच दिले आहे.
हिंदुच्या संस्कृती आणि देवांचा आदर करावा.
आदर करावा म्हटलंय भजन करावा म्हटलेले नाही ना! यावर अजून अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक द्यावी वगैरे काही लिहीले आहे का त्यात? का त्यांच्या दैवतांना दुय्यम वागणूक द्यावी त्यांचा अपमान करावा म्हटले आहे.
पण हे मुस्लीम / ख्रिश्चनाना जमणार नाही असेही म्हटले आहे.
अगदी १०० % सत्यं आहे. आजच्या काळात १०० टक्के लागू होणारे.
म्हनूनच गोळवलकर गुरुजींचे विचार फार आवडायचे मला. कटुसत्य बोलण्याचे धाडस होते त्यांच्यात.
17 May 2014 - 7:53 pm | अर्धवटराव
संघाच्या वाटेत काँग्रेस डायरेक्ट येत नाहि हे खरय. पण काँग्रेस केवळ गांधी घराण्याच्या पुण्याइवर जगत नव्हता. स्वातंत्र्य चळवळ, सहकार चळ्वळ, सेवा दल वगैरे मुळे काँग्रेसकरता भारतभूमी काँग्रेसी अनुकुल झाली होती/आहे. काँग्रेस नेतृत्वाने हि मशागत पुढे सियीयसली घेतली नाही व आता त्यांच्या हाती सत्ता नाहि. संघाला आपलं कार्य अधिकाधीक व्यापक करायला योग्य संधी आहे.
कपील देव, तेंडुलकर, धोनी मुळे एकुणच स्पोर्ट्सला जे जीवदान मिळाले, अटेन्शन मिळाले, जनाधार मिळाला तेच आता संघाच्या बाबतीत होइल. राजकारणात , समाजकारणात इंटरेस्ट असणारा टॅलेण्ट्पूल संघाच्या मार्गाने जाण्याचं ऑप्शन सिरीयसली विचारात घेईल असं वाटतं.
18 May 2014 - 2:30 pm | बाळकराम
काँग्रेसने जनतेच्या मनात संघाचे राक्षसीकरण केले होते.संघाचे राक्षसीकरण करण्याची मुळात गरजच काँग्रेसला कधी नव्हती, संघ हा राजकीय आणि तात्त्विक लेव्ह्लवर काँग्रेसचा प्रतिस्पर्धीसुद्धा नव्हता. १९२५ साली संघाची स्थापना झाल्यापासून ते पुढची जवळपास ४०-४५ वर्षे गांधी-नेहरुंच्या आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांचा प्रभाव जनमानसावर खोल रुजलेला होता. हा प्रभाव निव्वळ राजकीय असा नव्हता तर तो तात्त्विक आणि नैतिक असा सुद्धा होता. विशेषतः गांधींजींचा आध्यात्मिक आणि नैतिक अधिकार जनतेवर मोठा होता- गांधीजींबरोबर कितीही मतभेद असले तरी कुणीही हे मान्य करेल असे वाटते. आणि त्याच बरोबर भगतसिन्घ इ. क्रांतिकारक, सावरकर, आंबेडकर प्रभृति काँग्रेसविरोधक यांचा सुद्धा मोठा प्रभाव जनमानसावर होता. या सगळ्या धामधुमीत संघ कुठेच नव्हता. ही झाली राजकीय क्षेत्रातली स्थिती. सामाजिक क्षेत्रात जेव्हा विनोबा भावे, पटवर्धन, महर्षी आणि र धो कर्वे- स्त्रीशिक्षण, सावरकर- हरिजनसुधार, गांधी- हरिजनसुधारणा, बाबा आमटे, आंबेडकर- दलितसुधारणा, मास्टर तारासिंग- पंजाबात ही आणि अशी अनेक उदाहरणे देशात सांगता येतील. तिथेही संघ कुठेच नव्हता. स्वातंत्र्यचळवळीत सुद्धा संघाचे काय योगदान होते हा संशोधनाचाच विषय आहे. एक हिंदुत्ववादी संघटना म्हणूनही संघाचा फारसा प्रभाव नव्हता (१९२५ पासून पुढच्या ३०-३५ वर्षापर्यंत तरी). एवढेच नव्हे तर पहिल्या १९५२ निवडणुकीत सावरकरांच्या हिंदू महासभेविरुद्ध जनसंघाने आपले उमेदवार उभे करुन हिंदूंची मते फोडण्याचा नतद्र्ष्टपणा केला होता. थोडक्यात, संघ ही कुणाच्या खिजगणतीतसुद्धा नसलेली, कर्तृत्त्वशून्य संघटना होती-कमीतकमी १९४८ पर्यंततरी. गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल. संघाचे "राक्षसीकरण" करुन उगाच त्याचे महत्त्व वाढविण्याचे काम काँग्रेस करेल असे वाटत नाही. त्यामुळे केलंच असेल तर संघाचे राक्षसीकरण तर ते गोडसेने नकळत का होईना पण केलय. त्यामुळे संघाचे उद्दिष्ट सामाजिक आणि राष्ट्रीय आहे असे जे म्हणतात त्या दोन्ही क्षेत्रात संघाने नक्की काय कर्तृत्त्व गाजवलय ते जाणून घ्यायला आवडेल. अर्थात, संघाने कुठल्या भूकंपात/ वा आपत्तीत कार्यकर्ते वगैरे पाठवले आणि त्यालाच सामाजिक कार्य म्हणावे अशी फुटकळ उत्तरे तुम्ही देणार नाहीत अशी अपेक्षा.
डिस्क्लेमर- मी स्वतः शाखेत ७-८ वर्षे गेलो आहे, कॉलेजात असताना अभाविप च्या वैद्यकीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो आणि माझी बायको देखील यूके मध्ये राष्ट्रसेविका समितीचे कार्य करते. त्यामुळे हे प्रश्न विचारण्यामागे पार्श्वभूमी आणि अभ्यास दोन्ही आहे. त्याच बरोबर, संघाच्या भूमिकेमुळे आलेले नैराश्य सुद्धा. त्यामुळे इथले टिपीकल संघीय जी उडवाउडवाची आणि उद्धट उत्तरे देतात ती माझ्यावर काम करणार नाहीत. :)
19 May 2014 - 12:36 am | विकास
गांधीहत्या हे संघाचे पहिले आणि कदाचित एकमेव "कर्तृत्त्व" म्हटले तरी चालेल.
हे विधान खोटारडेपणाचे लक्षण आहे आणि एका संघटनेची बदनामी करणारे विधान आहे. यासंदर्भात संघाने राहूल गांधींवर देखील खटला भरला आहे असे आठवते. तुमच्याकडे जर पुरावा असला (नुसता आरोप केला असा नाही तर सिद्ध करणारा) तर दाखवा. नाहीतर नाही म्हणून सांगून आणि आपले विधान संपादीत करायला सांगा.
19 May 2014 - 3:46 pm | बाळकराम
गांधीहत्येत संघाचा हात नाही याची जर संघाला एवढी खात्री आहे तर मग १९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही? की संघ तेव्हा काँग्रेसची बी-टीम वा "शिवसेना" होती, म्हणून तेरी भी चूप और मेरी भी चूप चा मार्ग अनुसरला गेला? आणि खटले भरायची संघाला एवढीच जर हौस आली आहे तर एखाद खटला तुमच्या शरद पोंक्षेवर भरा जो खुलेआम मी संघीय असून मला गांधीहत्येबद्दल संघाचा अभिमानच आहे असं म्हणतो. पुराव्यांच म्हणाल तर भरपूर पुरावे तुम्हाला १९४८ च्या खटल्याच्या संदर्भात दिसतीलच, त्याचा अभ्यास करावा. ह्या खटल्याच्या अनुषंगाने संसदेत झालेल्या चर्चेची इतिवृत्ते उपलब्ध आहे संसदेच्या ग्रंथालयात, त्याचा लाभ घ्यावा. संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का? संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल? मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का? ;)
19 May 2014 - 3:53 pm | आदूबाळ
बाकी चालू द्या, पण "द मेन हू किल्ड गांधी" हे मनोहर माळगांवकरांचं पुस्तक खूपच अभिनिवेशरहित आणि तटस्थ विश्लेषण करतं.
19 May 2014 - 4:54 pm | मृत्युन्जय
मग संघाचा गांधीहत्येत भाग नव्हता हे कबूल करणारे त्या काळचे काँग्रेसी नेते आणि न्यायालय मुर्ख होते असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?
19 May 2014 - 7:20 pm | विकास
हे विष सतत पसरवले गेले आहे. येथे देखील असेच होत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
१९४८ नंतर काँग्रेसने संघावर बंदी घालून हाच तर आरोप केला आणि त्यातही संघटनेची बदनामी झालीच की? मग संघाने काँग्रेसला कोर्टात खेचले का नाही?
कोर्टातच खटला चालू होता. त्यात संघावर अथवा संघातील काही व्यक्तींवर आरोपपत्र होते. पण नंतर कुठेही संघ सरकारचे मत असलेल्या कॉन्स्पिरसीमधे दिसला नाही म्हणून पक्षि: निर्दोष असल्याचे कोर्टाने मान्य केले. नंतर संघावरची बंदी उठली कारण ज्या आरोप चुकीचे ठरले होते.
संघाची नथुराम आणि गोपाळ गोडसे ही माणसे तुरुंगात गेली ती काही पुराव्याशिवाय का?
गिल्ट बाय असोसिएशन... सर्वप्रथम नथुरामने आधीच संघ सोडला होता. तरी वादापुरते गृहीत धरूयात की गोडसे संघात होते. मग त्याच धरतीवर शिखांच्या हत्याकांडात काँग्रेसचे नेते (जे नंतर देखील खासदार -मंत्री झाले) होते, मग काँग्रेस बद्दलचे काय म्हणणे आहे? तेच अनेक डावे आणि समाजवादी (त्यात मेधा पाटकरपण आल्या) ह्या हिंस्त्रक नक्षलवादास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठींबा देतात. मग त्यांना देखील हिंस्त्र म्हणणार आहात का?
संघकार्यकर्ता असलेल्या नथुरामचा गुन्हा शाबित होउन त्याला फाशी होणे यापेक्षा मोठा दर्शनी पुरावा संघाच्या सहभागाचा काय असू शकेल?
संघपध्दतीत कार्यकर्ता ह्या शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का? नसल्यास माहिती करून घ्या. आणि तरी देखील वादापुरते "संघकार्यकर्ता नथुराम" असे म्हणले तर त्याला झालेली शिक्षा ही तो काँग्रेसकार्यकर्ता असता तर कमी झाली असती का? म्हणजे शिक्षा ही गांधीहत्येबद्दल झाली का तुम्ही म्हणता तो वास्तवात नसलेला संघाशी संबंध आहे म्हणून झाली?
मी साध्या साध्या गोष्टींबद्दल- संघाचे सामजिक आणि राष्ट्रीय इ बाबतीतले योगदान याचा पुरावा मागतोय, तो मात्र काही अजून मला मिळाला नाही, ही गोष्ट रोचक म्हणावी का?
भरपूर आहेत. वेगळा धागा चालू करूयात का नवीन वर्गवारीच? पण त्याआधी खोटे आरोप मागे घेताका का सप्रमाण सिद्ध करता? (नुसते खटले वाचा वगैरे म्हणायचे नाही.)
21 May 2014 - 3:54 pm | निनाद मुक्काम प...
कडक प्रतिसाद
सावरकर ह्या खटल्यातून निर्दोष सुटले तरी सूडबुद्धीने मणिशंकर ने त्यांचा पुतळा अंडमान मधून घालवला.
17 May 2014 - 10:27 pm | वॉल्टर व्हाईट
>>आजीवन प्रचारकांच्या नोंदींची लाट उसळेल आता संघ कार्यालयात
नोटेड.
17 May 2014 - 12:04 pm | नानासाहेब नेफळे
अंबाणीच्या गोदावरी बेसिनचे भले होणार,गॅस प्राइज वाढणार.
17 May 2014 - 2:52 pm | संपत
कोंग्रेस आले तरी तेच होणार होते. अंबानीच्या डाव्या उजव्या खिशात भाजप कोंग्रेस आहेत.
18 May 2014 - 1:54 am | निनाद मुक्काम प...
जाऊ द्या संपत साहेब
ह्या लोकांना समजून न समजल्या सारखे करतात.
खुद आप पार्टी ही अंबानी विरुद्ध अग्रवाल
म्हणजे रिलायंस विरुद्ध वेदांत ह्यांच्या आद्योगिक लढाईचा परिपाक आहे.
आता ह्यांच्यापैकी कोणाच्याही हातात तेल आहे की पहिले ह्यांचे खिसे फुगणार
कशाला अंबानी वर जाळायचे मी तर दोन आठवड्यापूर्वी रिलायंस चे शेअर घेतले
मज्जाणु लाइफ
18 May 2014 - 10:19 am | संपत
आताच लोकसत्ता वाचलात वाटते :)
19 May 2014 - 5:30 am | निनाद मुक्काम प...
तुम्ही सुद्धा वाचला वाटत.
पण तुमचा ह्या सर्व गोष्टींवर कशाला विश्वास बसेल.
आणि तो बसला किंवा नाही बसला तरी पुढील ५ बाकडे बडवत राहा.
जयललिताने मोदींशी संवाद साधून केंद्र व राज्याची चांगले संबध ठेवण्यासाठी विनंती केली जी मोदी ह्यांनी मान्य केली.
त्यामुळे आता पहिले राज्य चालविण्यासाठी व आता विरोधी पक्ष बनण्यासाठी ह्यांना आघाड्या कराव्या लागतील .
आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,
19 May 2014 - 10:52 am | llपुण्याचे पेशवेll
आणि हो मी मटा सुद्धा वाचलाय,
LOL *blum3*
17 May 2014 - 12:31 pm | विजुभाऊ
१)लालुंचे विसर्जन झाले ,
२) जयललिता . ममता यांची राजकीय सौदेबाजी संपली.
३)सर्वात महत्वाचे म्हणजे शरदपवारांची चांगलीच गोची झाली. दोन डगरींवर पाय ठेवता ठेवता ते स्वतःचा तोंडघशी पडलेत.
४)छोट्या पक्षांचे राष्ट्रीय प्राबल्य कमी झाले.
५)मुलायम सिंगाना ज्या जागा मिळाल्या त्या बहुतेक त्यांच्या घरातल्या लोकानाच मिळाल्या आहेत. ( स्वतः दोन जागी , सून एका जागेवर , पुतणे दोन ठिकाणी ई.) मुलायमसिंगांचे उपद्रव मूल्य शून्यवत झाले.
६) अबू आझमी पुन्हा एकदा पडले.
स्वाक्षरी : यूएस व्हिसा मिळवण्यासाथी गुजराथी माणूस कोणत्या खटपटी करेल सांगता येत नाही.
19 May 2014 - 7:21 pm | विकास
याचा अर्थ मोदींमुळे बळीची प्रथा चालू झाली असा देखील उद्या काहीजण काढतील... ;)
17 May 2014 - 12:34 pm | चावटमेला
१. त्रिशंकू लोकसभा येवून नंबर गेम होईल तेव्हा आपल्या पारड्यांत काय काय पाडून घ्यायचे ह्यासाठी मनातल्या मनांत मांडे खात बसलेल्या जया अम्मा आणी ममता दीदी यांचा चांगलाच हीरमोड झाला
२. केजरीवाल आता झाडूने स्वतःचेच घर झाडू लागला, आणि उडणार्या धूळीने त्याचा सुप्रसिध्द खोकला अजूनच वाढला
बाकी, झालंच तर खोबरं तिकडं चांगभलं ह्या न्यायाने बर्याच इतर पक्षांतले संधिसाधू आता बेगडी मोदीप्रेम दाखवत भाजपाची वाट धरणार. असल्या मांजरांमुळं सच्च्या कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये हीच अपेक्षा.
17 May 2014 - 12:49 pm | विजुभाऊ
चावटमेला काकू.
त्रिशंकू लोकसभा आणि नम्बरगेम या वर आपल्या बारमातीच्या काकांची सगळी भिस्त होती. त्यांचे काय होणार आता?
17 May 2014 - 12:58 pm | चावटमेला
ते आता जास्तीत जास्त लक्ष आयपीएल वर केंद्रीत करतील
17 May 2014 - 1:00 pm | तुमचा अभिषेक
`ईस देश का कुछ नही हो सकता' म्हणत परदेशी पलायन करणार्या हुशार विद्यार्थ्यांचे प्रमाण कदाचित रोडावेल वा गेलेले परत येतील .. अर्थात त्या आधी मोदींनी दाखवलेले विकासाचे स्वप्न साकार होणे गरजेचे, यासाठी पाच वर्षे वाट बघूया.
19 May 2014 - 5:34 am | निनाद मुक्काम प...
कदाचित
परदेशात नोकरी करण्याच्या उद्देशाने जाणारे आता करलो दुनिया मुत्ठीमे मोड मध्ये परदेशात जातील.
मोदींच्या राज्यात अनेक तरुण व छोटे , मोठे उद्योजक तयार होतील असा माझा कयास आहे,
17 May 2014 - 1:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
गुजरातचे माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट वंझारा आता जेलमधून बाहेर पडतील व कदाचित दिल्लीत सी.बी.आय.मध्ये महत्वाच्या पदावर येतील. गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.
19 May 2014 - 6:27 am | निनाद मुक्काम प...
आणि साध्वी सुद्धा , साला पाकिस्तानात तो हाफिज सैद मोकळा फिरतो , भारतात शीख दंगलीचे आरोपी मोकाट फिरतात , मग पुरोहित आदी प्रभूती मंडळींनी काय असे मोठे पाप केले आहे की विना खटला तुरुंगात खितपत पडायचे.
20 May 2014 - 9:00 pm | श्रीगुरुजी
>>> गुजरातचे माजी गृहंमंत्री हरेन पंड्या ह्यांचा खून नक्की कोणी केला हे पुढील पाच वर्षे तरी गुपीतच राहील.
त्यात काहीच गुपित नाही. हरेन पंड्यांच्या खुनातील आरोपींवर आरोप न्यायालयात ५-६ वर्षांपूर्वीच सिद्ध होऊन त्यांना शिक्षा सुद्धा मिळाली.
21 May 2014 - 11:20 am | नानासाहेब नेफळे
किती खोटं बोलाल श्रीगुरुजी???
हरेन पंड्या केसमधील आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पंड्यांचा मर्डर कुणी केला हे अजून गुपीतच आहे. जाणकारांनी गुगलून बघावे माहिती मिळेल.
http://m.timesofindia.com/india/Haren-Pandya-murder-case-Gujarat-HC-acqu...
21 May 2014 - 8:39 pm | श्रीगुरुजी
या खटल्यातील १२ आरोपींवर २००७ मध्ये पोटा न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन त्यांना शिक्षा झाली होती.
17 May 2014 - 2:53 pm | संपत
मनसेचे इंजिन यार्डात गेले.
17 May 2014 - 3:00 pm | बाळकराम
सगळ्यात मोठा जो होइल, लगेच नाही पण काही दिवसानी, तो हा की मोदीप्रेमाचं आंधळं भगवं भरतं ओसरेल आणि लोक आपल्या कामधंद्याला लागतील ज्यातून अर्थव्यवस्थेला जरा चालना मिळेल. वातावरण जरा शुद्ध होइल. शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा. बाकी, राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.
17 May 2014 - 4:23 pm | विकास
शेवटी पोटाची आग मिटल्याशिवाय "अच्छे दिन" नही आनेवाले है हे लोकांना कळेलच बहुधा.
सहमत.
राममंदिराची बांधणी, आसाराम बापूंना सन्मानपूर्वक तुरुंगातून मोकळे करुन उदार अंतःकरणाने आणखीन रेप करायची मोकळीक दिली जाणे हे किरकोळ साईड इफेक्ट्स तर पुढच्या १-२ महिन्यांत दिसतीलच, त्याचे काही एवढे विशेष नाही.
यातून अजूनही जुन्याच पध्दतीने विचार करत मोदींच्या राज्यात काय होईल असे वाटत आहे. जिंकण्यासाठी त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार केला होता. आता तो विजय टिकवण्यासाठी देखील ते तसेच करतील असे वाटते. ज्या पध्दतीने गुजरातमधे ते लोकप्रिय झाले तसेच त्यांना भारतात होयचे असणार. आणि तशी महत्वाकांक्षा असणे चांगले कारण त्यानिमित्ताने काहीतरी घडेल. त्यांना ना धड कुटूंब, त्यामुळे फॅमिली डायनॅस्टी तयार करण्याचा प्रश्न नाही त्यामुळे मोदींच्या बाबतीत बाकी काही व्यक्तीगत स्वार्थ असण्याची शक्यता नाही.
18 May 2014 - 2:44 pm | बाळकराम
विकासजी, की मोदींना विकासच फक्त करायचा आहे हे घटकाभर खरं जरी धरलं तरी भाजपाभोवती असलेली संघ आणि विहिंप इ भुतावळ त्यांना तसे आणि तितक्या प्रमाणात करु देणार नाही हे ही तितकंच खरं. मोदींनी पहिली विजयसभा वाराणसीत आणि ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.
18 May 2014 - 7:43 pm | आजानुकर्ण
संघाबाबतच्या तुमच्या मताशी सपशेल सहमत असलो तरी सध्या या पूजेपुरते मोदींना डिस्काऊंट द्यायला मी तयार आहे. विज्ञानाची कास धरणाऱ्या नेहरुंनीही त्यांच्या स्वतंत्र भारतातल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ काशीविश्वनाथ पूजा करुन केला होता. (आंबेडकरांसह अनेकांनी त्यावर प्रखर टीका केली होती.) मात्र त्या पूजेमुळे नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला काही बाधा आल्याचे पुढे दिसले नाही. नव्या भारताचा पाया नेहरुंनी चांगल्या रीतीने घातला.
मोदींपेक्षा मोदी मिनियन्स व इतर भुतावळीला आवरणे हे जास्त जिकीरीचे काम आहे असे सध्या तरी दिसते आहे. हे बहुमत कोणत्या मुद्द्यावर मिळाले याची स्वतः मोदींना चांगली जाणीव असावी आणि ते इमोशनल इश्यूजऐवजी विकासाचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे.
18 May 2014 - 11:06 pm | बॅटमॅन
पूजा केली काय किंवा नै काय, लोकांना बोलायचा हक्क नाही. हेच जर कुणा मौलानाचे आशीर्वाद घेतले असते तर सेक्युलरांनी भलामण केली असती. इस्रोचा अध्यक्षही देवळात गेला तरी कपाळशूळ उठणार्या लोकांची कीव येते. नाकर्ते अच्रत मेले!
19 May 2014 - 6:55 pm | आजानुकर्ण
इस्रोच्या अध्यक्षाने देवळात गेल्याची जाहिरात करणे चुकीचे आहे.
19 May 2014 - 3:57 pm | बाळकराम
ती पूजा कुठल्या उद्देशाने केली होती त्याबद्दल आहे. मोदींनी त्यापूजेतून पॉलिटिकल मायलेज मिळवण्याचाच उद्देशाने ती केली होती. देशाच्या इतर भागात विकासावर भर देणारा भाजपचा प्रचार यूपी आणि बिहारमध्ये राममंदिर, रामजन्मभूमी अशा गोष्टींवर केंद्रित झाला होता, त्या पार्श्वभूमीवर वाराणसीत पूजा करुन त्यांना काय साधायचे होते ते स्पष्टच आहे. आमच्या सारख्या असंख्य हिंदूंप्रमाणेच मोदींनाही त्यांचा धर्मपालन करण्याचा, पूजाविधी करण्याचा हक्क आहे. मग आमच्यासारखाच त्यांनीही घरात बसून साग्रसंगीत पूजा करावी, कोण काय म्हणतंय? उगा त्याचे प्रदर्शन कशाला?
19 May 2014 - 3:58 pm | बॅटमॅन
चारचौघात पूजा करणे बेकायदेशीर नसेल तर या प्रतिसादाला आकांडतांडवाखेरीज अर्थ नाही.
19 May 2014 - 4:46 pm | arunjoshi123
बाळकरामजींची प्रवृत्ती असंतुष्ट घरलक्ष्मीसारखी आहे. म्हणे ८-९ वर्षे संघात काम केले, म्हणे बायको आजही करते. नि वर संघाच्या, भाजपच्या, मोदीच्या एकाही वागण्याचा चूकूनही एकही चांगला अर्थ काढायचा नाही.
काय प्रकार आहे काही लक्षात आलं नाही.
19 May 2014 - 5:06 pm | बाळकराम
नीट वाचलेत तर लक्षात येइल की, माझा संघावरचा आक्षेप व्यक्तिगत स्वरुपाचा नाही. किंबहुना, माझे अनेक जवळचे मित्र आहेत जे संघात आहेत आणि वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले काम करतात. त्यामुळे संघीय सगळे वाईटच असं म्हणत नाहीच. संघाचे जे काही मर्यादित का होईना पण सामाजिक काम आहे त्याबद्दल त्यांचा आदरच आहे. दुसरे म्हणजे, भाजपा वा मोदी यांच्याबद्दलही मला व्यक्तिशः आकस नाही, किंबहुना मोदींसारखा अतिशय गरीब परिस्थितीतून आज पंतप्रधानपदी पोचलेल्या माणसाचे, त्यांच्या कष्टांचे मला कौतुकच आहे. त्यांचे सगळे विचार मला भलेही पटत नसतील, पण ते ठामपणे मांडण्यची, पद्धत, आत्मविश्वास या गोष्टींचे मला कौतुक आणि आदर आहे. याचप्रमाणे, भाजप अॅज अ पॉलिटिकल पार्टी, ते इतर राजकीय पार्ट्यांइतकेच चांगले वा वाईट आहेत. पण माझा मुख्य आक्षेप आहे तो संघाच्या राजकीय आणि सामाजिक विचारधारेबद्दल आणि त्यांच्या नैतिक श्रेष्ठत्त्वाच्या गंडाबद्दल. त्यांची व्हाईटर दॅन व्हाईट अशी जी प्रतिमा तयार केली जाते त्याला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे- संघाची अलोकशाहीक, एकचालकानुवर्तित्ववादी, सामाजिकदृष्ट्या असहिष्णू अशी वैचारिक बैठक भारतीय संविधानाच्या आणि भारतीय समाजाच्या मूळ बैठकीला छेद देउन जाते असे माझे संघात अनेक वर्षे काढून अनुभवांति झालेले मत आहे. आणि संघ त्याच्या मूळ सामाजिक ब्रीफच्या पुढे जाऊन जनमानसावर अतिक्रमण करायचा प्रयत्न करतो त्याची तुलना मी नित्शेच्या हिटलरवरील प्रभावाशी करीन. हा मूळ सैद्धांतिक दावा आहे.
19 May 2014 - 6:55 pm | आजानुकर्ण
परफेक्ट
19 May 2014 - 9:58 pm | निनाद मुक्काम प...
मग केजुने गंगा स्नान प्रसार माध्यमांच्या साक्षीने कोणत्या उद्देशाने केले.
हम करे तो साला केरेक्टेर ढिला हे
मोदी प्रशासनात सुराज्य महत्वाचे , म्हणून त्यांच्या प्रशासनाचे हिंदू संघटनांची वाजले .
18 May 2014 - 11:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
ज्यातर्हेने गंगापूजन आणि आरती इ लाईव्ह पद्धतीने करुन घेतली त्यावरुन पुढचे अंदाज बांधणे कठीण नसावे.एखाद्याने जर आपल्या धार्मिक विश्वासाप्रमाणे काही कृती केली आणि तो हिंदू असला तर भुवया वर चढवणे आणि अहिंदू असला तर त्याची सेक्युलर म्हणून वाखाणणी करण्याची कांगावाखोर वृत्ती भारतात नवीन नाही. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भारतातल्या सर्वसामान्य जनतेने अशी हायपोक्रसी फाट्यावर मारली आहेच. मात्र नेहमीप्रमाणे (अ)विचारवंतांना आपला इगो बाजूला ठेवून चूक सधारायला कठीणच जाणार आहे म्हणा ! =)) तेव्हा अनेक शुभेच्छा !"धर्म / जात ही प्रत्येकाची खाजगी गोष्ट आहे" आणि "लोकशाहीत प्रत्येकाला (तो हिंदू असला तरीसुद्धा) आपापला धर्म पाळायची परवानगी आहे" ही सत्ये तथाकथित विचारवंतांनी स्विकारल्यास (कमीत कमी त्याची स्वतःची मानसिक) सुधारणा होईल हे ते कधी समजून घेणार ?
मी स्वतः गंगापूजनाकडे, इफ्तार पार्टीकडे अथवा ख्रिस्मस सेलेब्रेशनकडे एका प्रवासी नजरेपेक्षा जास्त भक्तीभावाने पाहीन असे नाही. पण दुसर्या कोणी तसे केले तर मला त्याचा अधिकार मान्य असायला पाहिजे. हे खरा सेक्युलर असण्यासाठीच नव्हे तर चांगला प्रामाणिक माणूस असण्यासाठी आवश्यक आहे.
19 May 2014 - 4:52 pm | arunjoshi123
बाळकरामजी, मोदीचा धर्म त्याची व्यक्तिगत बाब आहे पण टीवी चॅनेल नाही. मोदी बिचारा काय करू शकतो?
आता मोदी मधे न आणता 'गांधीजींनी मी कट्टर हिंदू आहे' म्हणून आपल्या धर्माचा राजकीय लाभ घेतला नाही हे सिद्ध करा.
17 May 2014 - 4:19 pm | एम.जी.
नारायणदादांचा मानसिक दृष्ट्या थकलेला चेहरा पहिल्यांदाच दूरदर्शनवर बघायची संधी मिळाली.
कुमार केतकर प्रभृतींचे अडचण झाल्याचे दाखवणारे चेहरे बघण्याचाही लाभ मिळाला.
17 May 2014 - 11:04 pm | चावटमेला
हम्म, तसेही सुमार घेतकर कायम 'अडचण' असल्यासारखेच दिसतात :)
17 May 2014 - 4:23 pm | पिशी अबोली
मिपावरुन एक खंदे आपसमर्थक अचानक गायब झाले... ;-)
17 May 2014 - 4:25 pm | विकास
*cray2*
17 May 2014 - 5:23 pm | वेताळ
जप्त झाल्यामुळे आप्चे समर्थक आता बाराच काळ गप्प बसतील.परदेशी पैसा शेवटी भारताच्या कामी आला म्हणायचे.
17 May 2014 - 9:23 pm | संपत
आम्ही गप्प कशाला बसू? आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट :) दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.
17 May 2014 - 10:38 pm | सुहासदवन
आपच्या चार जागा आल्या, म्हणजे भाजपच्या पहिल्या निवडणुकीच्या दुप्पट Smile दिल्लीत देखील सातही जागांवर प्रत्येकी ३ लाखांहून जास्त मते घेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. दिल्ली विधानसभेत बहुदा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून बसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असली तरी राजधानी मुंबईत शिवसेनेने आपली सत्ता रा़खली पाहिजे हे जसं शिवसेनेला वाटतं ना तसच आप'ला देखील वाटायला हवं होतं, दिल्लीत मिळालेली सत्ता राखून.
आता तर संपूर्ण देशात आणि दिल्लीत पण भाजपाची सत्ता आहे.
अहो भारताच्या राजधानी दिल्लीत जिथे स्वबळावर ताठ मानेने बसावे लागले तिथे आता मान खाली घालून बसावे लागणार.
स्वतःचं असलेलं जिथे सावरता आलं नाही तिथे आता दुसर्याला सावरा म्हणून कसं सांगणार?
17 May 2014 - 10:59 pm | संपत
शिवसेनेने मुंबईत सत्ता आता राखली. २००९ मध्ये काय झाले होते?आणि आप विधानसभेत दुसऱ्या नंबरवर होते आणि लोकसभेत देखील :)