मोदींच्या विजयाचे परीक्षण

आनन्दा's picture
आनन्दा in काथ्याकूट
19 May 2014 - 12:56 pm
गाभा: 

२०१४च्या निवडणूकीत नमोंचा न भूतो असा विजय झाला आणि सगळी समीकरणेच बदलली. मोदींचा विजयाने आनंद होत असला, तरी त्या आनंदापेक्षा अश्या एकहाती विजयाबद्दल वाटणारे आश्चर्य हेच जास्त आहे. आणि त्याला पुष्टी देणारे घटक आहेत ते असे -

१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.
२. काँग्रेस ने नमोंविरुद्ध प्रचाराची प्रचंड राळ उठवून्ब दिल्ली होती. त्यलाही मतदारांनी भीक घातली नाही.
३. बहुतांश मतदार सर्वसामान्यपणे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या बाजूने मतदान करतो. सर्व विचारवंत नेहमी भाजपाविरुद्धच बोलत असतात. त्यामुळे वातावरण नेहमी धर्मनिरपेक्ष आघाडीच्या बाजूनेच असते.
४. महाराष्ट्रासारख्या ठिकाणी जेथे जवळ जवळ १५ वर्ष कॉम्ग्रेसचा बालेकिल्ला होता, तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे.

या सगळ्याचा विचार करता, केवळ आमच्यासारखे राजकारणाचे सामान्य अभ्यासकच नव्हे, तर भले भले राजकीय पक्ष देखील दि़ग्मूढ झाले आहेत. म्हणून त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.

आता माझा अभ्यास मांडतो -
१. सर्वप्रथम या सार्‍याबद्दल मोदींचे कौतुक केलेच पाहिजे. गेली ३-४ वर्षे त्यांनी ज्याप्रकारे कॅम्पेन चालवली, ते पाहता त्यांच्याइतका दूरदृष्टीचा नेता भारतीय राजकारणात सध्या तरी नाही असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात उपलब्ध असलेली गॅप हेरणे, त्याबद्दल नियोजन करून यंत्रणा चालवणे, आणि दूरदृष्टीने पावले टाकून देशातील सर्वोच्च सत्तस्थान काबीज करणे हे तेव्हढे सोपे नाही. तेदेखील बहुतांश गोष्टी प्रतिकूल असताना.
२. काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली. आपल्या जातीच्या समीकरणांवर विसंबून राहून मोठीच चूक त्यांनी केली असे वाटते.
३. अ‍ॅण्टी इन्कंबसी या वेळेस जोरात होती, त्याची धार कमी करण्यात ते कमी पडले. केजरीवालांना त्यांनी याच हिशोबाने मैदानात उतरवले, पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार? केजरीवालांनी भाजपाचा विजय सोपा केला, इतका, की आता केजरीवाल ही भाजपाचीच बी टीम होती की काय असा संशय यावा.
४. सत्तेबरोबर आलेला माज ही आणखीन महत्वाची गोष्ट - ज्याप्रकारे कपिल सिब्बल नी रामदेवबाबांचे आंदोलन हाताळले, त्यामध्ये आंदोलन हाताळण्यापेक्षा मी कसा वरचढ राजकारणी आहे हे दाखवण्यचाच भाग जास्त होता. अधिक अजित पवार (मुतू का :) ) त्यामुळे बरीच जनता त्यांच्या विरोधात गेली.
५. मोदींनी विकलेले गुजरातचे स्वप्न. गुजरातच्या शेजारी असलेल्या राज्यांनी उदा - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान. या राज्यांमध्ये भाजपाने क्लीन स्वीप दिला आहे. लेव्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही.
६. नवमतदारांवर पडलेली मोदींची मोहिनी- मी इथेच एका धाग्यावर म्हटल्याप्रमाणे, वाढलेली १०% मते किमान १०० जागांचा निकाल फिरवण्यास पुरेशी होती. हे १०% नसते, तर रालोआ २३० - २५० मध्येच रोखली गेली असती.

मोदींकडून असलेल्या माझ्या अपेक्षा, आणि मोदींची ५ वर्षांची स्ट्रॅटेजी काय असेल याबद्दलच्या माझ्या अंदाजाचा धागा लवकरच.

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 1:28 pm | प्रसाद१९७१

तिथे देखील मतदारांनी भाजपाला॑ कौल दिला आहे. >>>>>>मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला. मोदी नसते तर भाजपला १५० जागा पण मिळाल्या नसत्या. पुण्यात काँग्रेस पडुन शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस निवडुन येउ शकला ते फक्त मोदीं मुळेच.

मतदारांनी भाजपला कौल दिला नाही तर मोदींना दिला

सहमत. सध्या मोदी म्हणजेच भाजपा. हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत.

पण

शिरोळे सारखा कोणाला माहीती नसलेला माणुस

या वाक्याशी असहमत. कलमाडी असताना देखील शिरोळे फक्त २४००० मतांनी हरले होते. पुण्याची सीट यावेळेस भाजपाचीह होती. मोदी लाटेमुळे फक्त ते सुकर झाले इतकेच.

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 1:29 pm | प्रसाद१९७१

. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. >>>>>>>>>
हे अशक्य आहे. मुस्लिमांची मते भाजप ला ( त्यात सुद्धा मोदींना ) मिळणे अशक्य आहे.
ही बडबड सुद्धा तथाकथित सेक्युलर लोकांनी चालू केली आहे.

चित्रगुप्त's picture

20 May 2014 - 9:46 am | चित्रगुप्त

मी रहातो, तिथे आठदहा मुस्लिम कुटुंबे असून त्यांची तरूण पिढीतील मुले माझ्या मुलांबरोबर लहानपणापासून खेळलेली आहेत. त्यांनी सांगितले, की त्यांच्या घरातील वृद्धांनी काँग्रेसला मते दिली, तर संख्येने जास्त असलेल्या सुशिक्षित तरूण पिढीने भाजपाला.

प्रसाद१९७१'s picture

20 May 2014 - 10:37 am | प्रसाद१९७१

ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे

चित्रगुप्त's picture

20 May 2014 - 12:41 pm | चित्रगुप्त

ह्या तुम्हाला फसवायच्या खेळी आहेत. काहीतरी सांगुन तुम्हाला गंडवायचे

समजा, तुम्ही म्हणता तसे असले, तर हे तुम्हाला खात्रीपूर्वक कसे समजले, हे जाणून घेऊ इच्छितो.

क्रमांक ३ चे लॉजिक कळेल काय? आआपने भाजपाला कशी मदत केली? कोणत्या व किती जागांवर?

आआपने भाजपाला कशी मदत केली?

आपने ठरवून भाजपाला मदत केली असे माझे म्हणणे नाही. मी असे म्हटले आहे की "पण कोंग्रेस्ची बी टीम असलेले केजरीवाल नकळतपणे भाजपाला कशी मदत करू लागले ते जिथे खुद्द केजरीवालांना कळले नाही, तर ते इतरांना काय कळणार"
असे मी का म्हणतो याची कारणे अशी -
१. आप ने कारणाशिवाय दिल्ली मधली सत्त सोडली. ती सत्ता ठेवून जर त्यांनी लोकसभा लढवल्या असत्या, तर ही निवडणूक भाजपाला थोडी जड गेली असती.
२. केजरीवालांनी निवडणूकीला भाजपा विरुद्ध केजरवाल असे स्वरूप आणले. परंतु केजरीवालांकडे त्यांच्या शुद्ध (?) हेतूंच्या पलीकडे दाखवण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे आपकडे वळलेला मतदार पुन्हा भाजपाकडे वळला.
३. स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या नादात केजरीवालांनी आपल्या धर्मनिरपेक्षतेचा अतिरेक केला, परिणाम भाजपाचा हिंदुत्ववादी समर्थक वर्ग, जो केजरीवलांच्या मागे जाण्याची शक्यता होती, तो परत फिरला. कारण त्यांना केजरीवालांना मत देणे म्हणजे काँग्रेसला मत देण्यासारखेच वाटू लागले.
इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली. आणि मुख्य म्हणजे, नव्याने मतदान करणार्‍या १०% मतदारांसमोर मोदींशिवाय समर्थ पर्यायच राहिला नाही. त्याच १०%ची परिणिती या जास्तीच्या १०० जागांमध्ये झालेली आहे.

इन अ नटशेल, केजरीवालांच्या माकडचेष्टांमुळे भाजपाची मते फुटण्याऐवजी भाजपाविरोधी मतेच फुटली.

यालाच आधार मागतो आहे. मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे. अशावेळी त्यांनी विरोधी मते कशी-कितपत फोडली? हे समजावून घ्यायचे आहे.

आनन्दा's picture

19 May 2014 - 2:39 pm | आनन्दा

मुळात ९९% ठिकाणी आआपचे डिपॉझिट जप्त झाले आहे

हे तर खरेच आहे. लेट मी रेफ्रेझ इट - केजरीवालांना काँग्रेसविरोधी मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले. आणि त्याचे कारण त्यांच्या माकडचेष्टा. दिल्ली नीट सांभाळली असती, आणि देशात निवडक ठिकाणी जर निवडणूका लढवल्या असत्या, तर आप नक्कीच भाजपाला जड गेले असते. परंतु केजरीवालांकडून झालेल्या भ्रमनिरासामुळे भाजपाकडे मतांचे अधिक ध्रुवीकरण झाले. अर्थात याला आधार देण्यास विदा नाही, पण मी मिपावरच असे लोक दाखवू शकतो की जे प्रथम आपचे समर्थक होते, पण आपच्या कारन्यांमुळे ते नंतर विरोधक झाले. दिल्लीमध्ये ३०+% जागा मिळवल्यानंतर आप देशभर भाजपाच्या मार्गात पुरेसे काटे पसरेल असे वाटले होते, त्यावरच "हे काँग्रेसची बी टीम" वगौरे गृहीतके होती. पण आपच्या अनार्किस्ट भूमिकांमुळे आपचे बरेचसे समर्थक आपापल्या घरी परतले.

म्हणून मला असे म्हणायचे आहे की आप ने ही निवडणूक भाजपाला अधिक सोपी केली.

अनुप ढेरे's picture

19 May 2014 - 1:53 pm | अनुप ढेरे

१. परंपरागत मुस्लिम मतदार हा नेहमीच काँग्रेसचा समर्थक राहिला आहे. या मतदारानेदेखील काही प्रमाणात मोदींच्या बाजूने मतदान केले. सर्व "धर्मनिरपेक्ष" पक्षांनी केलेला प्रचार या मतदारांनी फाट्यावर मारला याचे मला जरा आश्चर्यच वाटत आलेले आहे.

हा निष्कर्ष कसा काढलात?

http://www.thehindu.com/opinion/op-ed/not-how-many-but-who-voted-made-th...
इथे बरोब्बर उल्ट म्ह्टलं आहे.

आनन्दा's picture

19 May 2014 - 3:20 pm | आनन्दा

मी माझे शब्द मागे घेतो. तो माझा अंदाज होता, पटत नसला तरी. गुजरात मध्ये २६ पैकी २६ जागा, आणि उप्र मध्ये ८० पैकी ७०+ या विदावर आधारलेले होते. पण हेही तितकेच खरे की उप्र मध्ये देखील बिगर मुस्लिम मतांवर निवडणूक जिंकता येते.

इरसाल's picture

19 May 2014 - 2:15 pm | इरसाल

आपल्या सचीन ची आटव येवु र्‍हायली !

धन्या's picture

19 May 2014 - 2:25 pm | धन्या

ते गायबलेत. :)

आम्हीही आप समर्थकांची मते वाचण्यास उत्सुक आहोत.

आनन्दा's picture

20 May 2014 - 11:04 am | आनन्दा

बाकी काही दिवसांपूर्वी मोदींच्या नावाने खडे फोडणारे लोक आता मोदींच्या विजयाची हवा स्वतःच्या शिडात भरून घ्यायला लागलेत हे पाहून अंमळ मौज वाटली :)

नानासाहेब नेफळे's picture

19 May 2014 - 2:30 pm | नानासाहेब नेफळे

ब्राह्मण ,ओबिसी बर्याच प्रमाणात दलित यांच्या एकसंध मतांच्या साथीने मोदी/ भाजपा सत्तेत आला आहे.बसपाला शून्य जागा याचेच द्योतक आहे.
मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे.
आपल्या मुलभूत अधिकारांच्या बाबतीत जागृत असलेले मतदार हे ब्राह्मण ,ओबिसी, दलित वा तत्सम समाजातून येतात, यांच्याही जातीय धार्मिक अस्मिता आहेत परंतु त्या तितक्याशा धारदार नाहीत.
आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता. कोण इफ्तार पार्ट्यांना येतो? कोण बाबा ,दादा ,बापू, साहेब यांच्या जवळचा आहे?आपल्या जातीचाच आहे काय? हे बघूनच मतदान केले जाते/ मतदान होते.
राज्यात युतीला सत्तेत यायचे असेल तर ब्राह्मण ओबिसी दलित समाज जैन वगैरे व्यापारी समूहांना लोकसभेप्रमाणे एकसंध बांधावे लागेल. धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 May 2014 - 3:06 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

अगदी बरोबर बोललास नाना. येत्या विधान्सभा निवडणूकीत सेना-भाजपाला यश संपादन करायचे असेल तर जातिय धार बोथट कशी करता येईल हा विचार त्यांनी करणे गरजेचे आहे.जातीचे राजकारण करून अलिप्त राहण्यात पवार वाकब्गार आहेत.

नाव आडनाव's picture

19 May 2014 - 6:06 pm | नाव आडनाव

काय सरकार, आले का जातीवर? एक गोष्ट न कळण्या सारखी आहे - जवळपास ३ कोटी लोकसंख्या (३०% गृहीत धरून ) असलेल्या मराठा समाजाने कुणाला मत दिलंय हे तुम्हाला एकदम कसं कळतं हो नेफळे साहेब? तुम्ही एखादी एजेन्सी कडे दिला होता का सर्वे करायला?

नानासाहेब नेफळे's picture

20 May 2014 - 11:24 am | नानासाहेब नेफळे

यांचा एखादा बाबा दादा उभा राहीला की आख्ख्या वाड्या वस्त्या त्याला झाडून मतं देतात ,"ते आमचे पाहुणे लागतात" हा यांचा ठरलेला डायलॉग असतो. कशाला अशा लोकांचा सर्वे करायचीही गरज नाही.
मी जात बघुन मत देत नाही, जात बघुन मत देणार्यांनी हे लक्षात ठेवावं की ते खासदार निवडणार आहेत 'जावई' नाही.

नाव आडनाव's picture

20 May 2014 - 11:42 am | नाव आडनाव

सरकार तुम्ही एखाद्या घटनेतून ३ कोटी लोकांबद्दल मत बनवता? कि मत बनवूनच घटनां कडे बघता?:) तुमच्या साठी माझ्या एका मित्राची एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो - मित्र नगरचा आहे, त्याचा भाचा ज्याचं आडनाव पवार आहे आणि नाव शरद आहे आणि तो मराठा पण आहे त्याने देखील भाजप ला मतदान केलंय :) मत कुणी कुणाला दिलंय याची जाहीर चर्चा करू नये, पण तुम्हाला आवडेल म्हणून हा किस्सा सांगितला. आता कशावर शंका घायची - त्या मित्राची जात मराठा असण्यावर, त्याच्या भाच्याने मतदान केलंय कि नाही यावर कि अजून काही? कारण "मराठा" "विकासाच्या मुद्द्यावर" राज कारण करत नाही म्हणता तुम्ही :) गेट वेल सून सरकार.

नाव आडनाव's picture

20 May 2014 - 11:53 am | नाव आडनाव

मागच्या प्रतिसादात "राज कारण" एवजी "मत दान" वाचा.

नानासाहेब नेफळे's picture

20 May 2014 - 12:14 pm | नानासाहेब नेफळे

नाव शरद पवार... भाजपाला वोट ....इथेच फसलात राव तूम्ही ! :-P
घेतला त्याने घोळात तूम्हाला ,वाणं नाय पण गुण या प्रत्येकात आहे.

श्रीगुरुजी's picture

19 May 2014 - 8:55 pm | श्रीगुरुजी

काय गंमत आहे! नाना नेफळे आपला दुसरा डु आय (माई फुसकुलीकर) स्वतःचेच कौतुक करतोय.

माई, नानाच्या नावाने आता एखादा झकास उखाणा घ्या!

वाडीचे सावंत's picture

20 May 2014 - 11:34 pm | वाडीचे सावंत

@ श्रीगुरुजी *lol*

>>आपल्या राज्यापुरते बोलायचे तर मुस्लिम, मराठा हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर मत देत नाहीत ,तसे असते तर राकाँ उभाच राहीला नसता.

सहमत !!

बारक्या_पहीलवान's picture

21 May 2014 - 6:20 pm | बारक्या_पहीलवान

>>>>मुस्लिम क्षत्रीय(राज्यात मराठा ) व तत्सम जाती यांनी काँग्रेस व युपीएलाच मत दिले आहे ,राज्यातही मराठ्यांनी राकाँ काँच्याच बाजूने मत दिले आहे. / धार्मिक व जातीय अस्मितेला कमालीची धार चढवलेले अनुक्रमे मुस्लिम व मराठा पुन्हा काँ व राकाँलाच मत देणार.
चुकीचे विधान आहेत. बराच मराठा समाज शिवसेनेच्या तसेच भाजपाच्या बाजुने आहे.

दुश्यन्त's picture

19 May 2014 - 4:03 pm | दुश्यन्त

व्हल २ म्हणजे कर्नाटक, छत्तीसगड, हरियाणा या ठिकाणी ५०- ६०% जागा भाजपाला मिळाल्या आहेत. त्याच्या पलिकडे त्रिपुराचा अपवाद वगळता भाजपाची डाळ फारशी शिजली नाही.

भाजपला छत्तिसगढमध्ये मध्ये ५०-६०% पेक्षा भरपुर जास्त (११ पैकी ९) खासदार मिळाले आहेत.हरियानात १० पैकी ७. शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे.
त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

शिवाय आसाम मध्ये पण चांगले यश (१४ पैकी ८ खासदार) मिळाले आहे.
त्रिपुरामध्ये भाजपचा एकही खासदार आला नाही.तिथे सीपीएम आहे.

माफ करा, मला आसाम म्हणायचे होते.

चौकटराजा's picture

19 May 2014 - 4:57 pm | चौकटराजा

१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळचे नको इतके श्रेय श्री जयप्रकाश नारायण याना देण्यात आले तेच आता होते आहे. ही लाट आहे पण ती मोदींची नव्हे तर अनेक शत्रू कॉंग्रेसने एकाच वेळी केले. त्यांचे यावेळी निवडणूक पूर्व समझोते फारसे झालेच नाहीत. मनमोहन सिंगामधील नेतृत्व गुणाचा पूर्ण अभाव. भिंतीआडून राजकारण करण्याची सोनियांची सवय,राहुल गांधी सारखा पोरकट निवडणूकनेता,हाय कमांड संस्कृति, लोकाना पद्धतशीर पणे रोजगार निर्माण करण्याऐवजी काहीतरी सारख्या योजना उकरीत बसणे,निरनिराळी पॅर्‍केज जाहीर करणे, इनकम टॅक्स ची मर्यादा न वाढविणे, करबुडवेगिरीचा नीट शोध न घेणे,फोमिली पेशन मधे केविलवाणी रक्कम देणे, नाईलाज म्हणून १२ सिलिंडर
सबसिडाईज करणे,योजनांचे बजेट प्रमाणे अंमलबजावणी न होणे, अण्णा हजारेंच्या आंदोलनातून सरकारची नियत बाहेर येणे.,दागी मंत्त्र्याना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणे, कलमाडीच्या विरोद्धात कारवाई उशीरा होणे, रामदेव बाबांच्या आंदोलनात त्याना घृणास्पद वागणूक देणे, रेलेवे दरांवरून ममतांशी आलेले वितुष्ट, कांगीचे मित्र लालूप्रसाद यांचा पाडाव,
अत्यंत संथ अशा पृथवीराज चव्हाण यांना मुख्यमत्री करणे, आदर्श घोटाला, काँमनवेल्य गेम घोटाळा, कोळसा घोटाळा,
लवासा प्रकरण,भुजबळ प्रकरण, सिंचन प्रकरण ई ई मुळे कॉग्रेसचा पराभव झाला. खरे रे तर तो १९८९ पासून होतच होता.
आता व्हेंटीलेटर तरी किती दिवस काम करणार???
अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.स्थिर सरकार असल्याने मोदीना आता ब्लॅकमेल करायला कोणी नाही. पण मी सुडाचे राजकारण करणार नाही असे म्हणत त्यानी मुलायम मायावती ई बाबतचे काही गैरप्रकार आता सी बी आय ने बाहेर काढायचे ठरवले वा येडींचे आणखी काही प्रकार बाहेर आले तर त्यात अडथळा आणू नये.

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना. कारण आता १९७७ मध्ये इन्दिराजींनी जे केले ते आता करणे शक्य नाही. लोकांनी भाजपाला मते दिलेली नसून त्यांनी ती मोदींना दिली आहेत, त्यामुळे आता मोदींच्या विरोधात जाणे कोणालाही कठीण आहे.

चौकटराजा's picture

20 May 2014 - 9:33 am | चौकटराजा

पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना
मोदींची शक्तीस्थळे
१.मोदीनी आपल्या कुटुंबकबिल्यापासून स्वतःला अलग केलेले आहे. ( भुजबळ पवार ,शिंदे ठाकरे मुंडे)
२.मोदी कोणत्याही प्रकरणात स्वत: अडकलेले आढललेले नाहीत..(अशोक चव्हाण,राजीव गांधी, सुखराम येडीयुरप्पा )
३.मोदी भाषणात ज्याप्रंमाणे प्रबोधक आहेत त्याप्रमाणे ते एक उत्तम नट असून करंमणूक करणारे नेतेही आहेत. ( मनमोहन सिंग, सोनिया, राजनाथ सिंग, पवार )
४.मोदीना इंग्रजी येते तरीही ते हिंदीत बोलण्याचा आग्रह धरतात. व संस्कृतोदभव तसेच उर्र्दू मिश्रित हिंदी ( राजनाथ , बाजपेयी यांच्या पेक्षा निराळी ) बोलू शकतात. ( चिदम्बरम )
५.ते सतत शिकणारे नेते आहेत त्यामुळे अधुनिक युगाशी त्यांचे नाते चांगले आहे. पुढे मागे ते तमिळांशी तमिळमधून बोलू लागल्यास नवल नाही.
६.सामान्य लोकांमधून आल्याने त्यांची उदाहरणे फार जवळची वाटतात.
७.आता त्यांच्याकडे ५ वर्षे सत्ता व स्थिरता असल्याने त्यांच्या कल्पकतेला पारावर रहाणार नाही .
कुणी सांगावे कदाचित ते बाजपेयी, राजीव, इंदिरा गांधी, नेहरू याना मागे टाकतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 May 2014 - 10:18 am | डॉ सुहास म्हात्रे

कोंग्रेसच्या विरोधात हवा होती हे तर खरेच आहे, पण ती हवा आपल्या शिडात भरायला बुद्धीबळ हवे ना.

गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये ! =))

(तो विकास म्हणजे आकड्यांची बनवाबनवी होती असे म्हणायचे मनात येणार्‍यांनी प्रथम गुजरात सरकारच्या विकास योजनांना केंद्र सरकारने, त्याच्याशी संबंद्धीत संस्थांनी आणि गैरसरकारी संस्थांनी शेकड्यांनी दिलेल्या मानांकनाची / बहुमानांची यादी चाळावी... म्हणजे नंतर लाजून खाटेखाली लपावे लागणार नाही.

*: या याद्या जालावर अनेक सरकारी / गैरसरकारी संस्थळांवर आणि इतरत्रही उपलब्ध आहेत. थोडेसे परिश्रम करून त्या स्वतः पाहाव्या. अश्या कृतीने आणि माहितीने बुद्धीबळात नक्की वाढ होते.)

गुजरातचा गेल्या १२ वर्षांचा विकासाचा इतिहास पाहता माश्यांनी शिंकायला इतकी घाई करू नये

मी कुठे शिंकतोय, उलट भाजपा स्वबळावर सत्तेत येईल असे म्हणणारा मिपावर मी पहिला होतो.

विकास's picture

19 May 2014 - 6:53 pm | विकास

सहमत.

अर्थात सरकार मधील निम्न स्तरावर चालणारा भष्टाचार, महागाई असे काही प्रश मोदीनाही सोडविता येणार नाहीत याची खात्री आहे.

मोदींना आव्हाने खूप आहेत. पण असे वाटते आहे की त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. जनतेची अपेक्षा देखील एकदम सगळे बदलेल अशी नसावी. पण जर पुढच्या ३-६-१२ महीन्यात टप्याटप्याने पॉझिटीव्ह ट्रेंड दिसला तर जनतेल आपण घेतलेला निर्णय चुकीचा वाटणार नाही.

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 6:55 pm | प्रसाद१९७१

१९७७ मधे इंदिराजींसह कॉग्रेसचा दारूण पराभव झाला.>>>>>>>>>>> १९७७ मधे दारुण पराभव नव्हता झाला काँग्रेसचा. ३५ ट्क्क्यापेक्षा जास्त मते मिळाली होती. टक्केवारी २-३ % च घटली होती. सगळे विरोधक एकत्र आले होते म्हणुन जागा कमी मिळाल्या.

आजानुकर्ण's picture

19 May 2014 - 7:05 pm | आजानुकर्ण

आताही काँग्रेसची मतांची टक्केवारी फारशी घटलेली नाही.

प्रसाद१९७१'s picture

19 May 2014 - 7:13 pm | प्रसाद१९७१

आताही काँग्रेसची मतांची टक्केवारी फारशी घटलेली नाही

२०% पेक्षा खाली गेली. २००९ मधे २८ % च्या आसपास होती.

आणि मुख्य म्हणजे १९७७ मध्ये जनता पझ म्हणजे कडबोळे होते, यावेळेस तो एकखांबी तंबू आहे. तो खांब आहे तोपर्यंत तंबू कोसळत नाही हे नक्की.

विकास's picture

19 May 2014 - 8:47 pm | विकास

ही घ्या..

ही आकड्यात. फक्त २०१४ मधे काँग्रेसने नक्की किती जागा लढवल्या ते माहीत नाही. त्यामुळे २००९ चाच नंबर (४४०) गृहीत धरला आहे. कुणाला माहीत असल्यास सांगावा ही विनंती.

इथल्या माहितीनुसार तो आकडा ४६२ आहे.

नानासाहेब नेफळे's picture

19 May 2014 - 5:44 pm | नानासाहेब नेफळे

लोकपाल सीबीआयला आदेश देऊ शकते म्हणे, मोदींनी सरळ लोकपालकडे प्रकरणे वर्ग करावीत व हात वर करावेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 May 2014 - 11:31 am | llपुण्याचे पेशवेll

मोदींचे सल्लागार म्हणून जा अ‍ॅडव्हायझरी कॉन्सिल वर.
:-)

विकास's picture

20 May 2014 - 4:12 pm | विकास

भारतात राहणार्‍या भारतीयांसाठी हा फॉर्म...

http://www.narendramodi.in/form/

कसला आहे म्हणे हा फॉर्म ?

विकास's picture

20 May 2014 - 8:43 pm | विकास

There is no bigger joy than working for Bharat Mata! India has given us so much; now is the right time to give back to our nation through our positive contribution.

Narendra Modi firmly believes that India has unparalleled talent. The people of India can take this nation to greater heights and make India the leading nation of the world. He also believes that the people, particularly the youth of India should devote their time, skills and energy towards the nation.

Join this grand movement to create a strong, glorious and inclusive India. You are requested to fill this form. Remember- your contribution will be a gigantic step in creating a better India

भृशुंडी's picture

21 May 2014 - 1:27 am | भृशुंडी

आता काय?
फोन बिन येणारे का?

विकास's picture

21 May 2014 - 2:56 am | विकास

अनुभव घेऊन बघा आणि सांगा.

जी+ च्या आयडी ने लॉगिन करुन पाहिले... पण 404 ! चा एरर येतो आहे. :( याचा अर्थ क्लायंट सर्व्हरशी कम्युनिकेट करु शकत नाही. बहुदा फॉर्म भरणार्‍यांची संख्या जास्त असणार ! त्यामुळे लोड वाढले असेल असे वाटते.
छ्या... आता फॉर्म कसा भरणार ?

लंबूटांग's picture

21 May 2014 - 5:38 pm | लंबूटांग

म्हणजे ते पान सापडत नाहीये असा होतो. उदा. http://www.google.com/asdasdasd टाइपल्यावर येते ते.

त्यांच्या वेब-मास्टरला सांगा युआरएल ठीक करायला (किंवा गूगलला).

लोडशी काहीही संबंध नाहीये.

क्लायंट-सर्वरशी कम्युनिकेट करू शकत नसल्यास ४०८ एरर येतो.

विकास's picture

21 May 2014 - 6:19 pm | विकास

सब्मिट करताना होत आहे का फॉर्मला अ‍ॅक्सेसच मिळत नाही? कारण मी आत्ता त्या पानावर गेलो तर फॉर्म दिसतोय, पण मी भारतात रहात नसल्याने तो भरण्याच्या भानगडीत पडलो नाही. कारण तो मला वाटते भारतनिवासी भारतीयांसाठीच आहे.

ओक्के, पाहतो आता. दोघांनाही धन्स ! :)

पिलीयन रायडर's picture

22 May 2014 - 1:35 pm | पिलीयन रायडर

हे संस्थळ नक्की कोण चालवते? ही माहिती कशासाठी वापरली जाईल? तिचा गैरवापर होणार नाही हे कशावरुन?

विकास's picture

22 May 2014 - 4:26 pm | विकास

हे नरेंद्र मोदींचे अधिकृत प्रचार संस्थळ आहे. आता जरी प्रचार नसला तरी त्याचा वापर अशा पध्दतीने करणे आताच्या काळात कॉमन आहे. (उदा. बराकओबामा.कॉम). तरी देखील तुमच्या मुद्द्याशी सहमत.

पिलीयन रायडर's picture

22 May 2014 - 4:37 pm | पिलीयन रायडर

मला वाटलंच की ते प्रचारासाठिचे अधिकृत संस्थळ असेल. पण अशी माहिती उद्या पंतप्रधान कार्यालयानी सरकारी चॅनल्स कडुन मागवली तर एकवेळ ठिके.. पण ह्या संस्थळाची तशी खात्री वाटत नाही. लोक जनगणना करताना नीट माहिती देत नव्हते.. इथे तर खुप काही विचारलं आहे..

विकास's picture

19 May 2014 - 6:48 pm | विकास

काँग्रेस ने मोदींना अंडरएस्टिमेट केले, ही त्यांची चूक झाली.

काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. किंबहूना मौत का सौदागर म्हणले तेंव्हापासून किंवा त्याही आधीपासून काँग्रेसला (आणि डाव्यांना देखील) मोदीं राष्ट्रीय नेतृत्व आणि म्हणून आव्हान ठरतील ही भिती होती.

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले. आता काळ बदलला आहे आणि तेच ते बोलून काही उपयोग होणार नाही तर जनतेला काम करणारे नेतृत्व हवे आहे. भ्रष्टाचारी आणि मक्ख नको आहे किंवा नुसतेच स्वतः स्वच्छ, भ्रष्टाचार विरुद्ध असे म्हणणारे आक्रस्ताळी नाकर्ते नेतृत्व नको आहे. पण हे यांच्या लक्षातच आले नाही. त्यांना वाटले, "दूर गाँव मे जब बच्चा रात को रोता है तो मॉ केहती है..." च्या चालीवर मोदींची भिती घातली की झाले. त्याला कुठल्याच धर्माधारीत जनतेने कमीअधिक प्रमाणात विश्वास ठेवला नाही.

काँग्रेस मोदींना अंडरएस्टीमेट करत नव्हती. काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.

करेक्ट, बूल्झाय

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 May 2014 - 8:29 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

काँग्रेसने आणि डाव्या विचारवंतांनी / राजकारण्यांनी जनतेला अंडरएस्टीमेट केले.

बरोब्बर. कुमार केतकरांसारखे तर साहित्य सम्मेलनातूनही संधी सोडत नव्हते."मोदी विद्वेषाचे राजकारण करत आहेत',देश फोडत आहेत वगैरे .अशी भिती घातली की मग काम झाले असा त्यांचा समज होता.तिथे केजरीवालही तोच प्रकार. भ्रष्टाचाराविरुद्ध चीड आहे तर ज्या नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्याविरुद्ध तरी निवडणूक लढवायची-राणे,भुजबळ्,सिब्बल किंवा कॉन्ग्रेसची राज्ये.पण अरविंद फक्त गुजरातबद्दलच बोलायचा.त्यामुळे आपची मते फिरली.

अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? ;)

बाकी मोदींची घौड-दौड सुरु होण्याची चिन्हे आता पासुनच दिसु लागली आहेत असे वाटु लागले आहे...कारण,
Narendra Modi keen to deepen ties with Israel: Benjamin Netanyahu

जाता जाता :- इस्त्राइलचा उल्लेख आलाच आहे,तर मोदकाची Munich Massacre... ही लेखमाला जरुर वाचा.

>>अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ? >>

हे मात्र खरं !! ;)

अरे... अरनब गोस्वामीचे सुद्धा मोठे उपकार आहेत... पप्पुचा पोपट अख्या जगाला त्यानेच करुन दाखवला ना ?

+१००
बाकी मोदींच्या सत्तारोहणाचे / प्रतिमेचे जागतिक राजकारणावर होणारे संभाव्य परिणाम या गोष्टीवर कोणीतरी लेख लिहावा अश्या प्रतीक्षेत आहे. नाहीतर मग आहेच आतासारखी एक जिलबी आणि चर्चा. पण माझा या विषयांवर फारसा अभ्यास नसल्यामुळे बरीच चुकीची माहिती लेखात मांडली जातेय असे दिसतय.

मला राजकारणात विशेष कांही (किंवा कदाचित कांहीच) कळत नाही. तरीपण मला वाटतं काँग्रेसच्या राजवटीतील प्रचंड घोटाळे, मोदींची मुखदुर्बलता, राहूलची बालीश बडबड ह्यांना कंटाळलेल्या मतदारांना, मोदींच्या तडफदार व्यक्तिमत्वात एक आश्वासक नेता सापडला, संसर्गजन्य साथी प्रमाणे पसरलेली 'अब की बार मोदी सरकार' घोषणा, गुजराथ पॅटर्नचे आकर्षण, नवतरूणांमधील राजकारणातला वाढता रस आदी मुद्दे बिजेपीच्या फायद्यात गेले. काँग्रेससाठी काळ आणि वेळ दोन्ही आले होते.

वरचा चौकटराजा ह्यांचा हा प्रतिसाद मला जास्त पटला.

सुनील's picture

21 May 2014 - 10:13 am | सुनील

मोदींची मुखदुर्बलता

चिरोटा's picture

21 May 2014 - 12:00 pm | चिरोटा

पेठकर काकांनी त्यांना राजकारणातले विशेष कळत नाही असे म्हंटले आहे.!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 May 2014 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना (गतपंतप्रधान) "मनमोहन सिंग" असे म्हणावयाचे असावे... गलतिसे मिष्टेक होगया ऐसाईच लगताय ;)

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2014 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

मनमोहनसिंगच म्हणायचे होते. घाईघाईत मोदी लाटेत गटांगळ्या खाल्ल्या.

प्रभाकर पेठकर's picture

21 May 2014 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर

@ सुनिल,

मुद्राराक्षसाचा विनोद. मला 'मनमोहनसिंग' म्हणायचे आहे. चुकी बद्दल दिलगिर आहे.

चित्रगुप्त's picture

21 May 2014 - 5:00 pm | चित्रगुप्त

मन्दमोहन म्हणायचे होते वाटते.

विवेकपटाईत's picture

21 May 2014 - 7:37 pm | विवेकपटाईत

मोदीच प्रधान मंत्री बनणार होते कारण

म नमो हन

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2014 - 8:04 pm | प्रकाश घाटपांडे

आनंदा, पण भाई वैद्य तर म्हणतात कि हा विजय खोट्या स्वरूपाचा प्रचार करून लोकांना फसवून तो मिळविलेला आहे,
पहा सकाळ १९ मे

मदनबाण's picture

21 May 2014 - 8:15 pm | मदनबाण

पकाका धन्स ! :)
धन्स अशासाठी कारण त्या लेखाच्या खाली ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत, त्यातली एक वाचुन मी शॉलिट्ट हसलो बघा !
ती प्रतिक्रिया मणोरंजनासाठी इथे चोप्य पेस्त करतो...
Ravi - सोमवार, 19 मे 2014 - 08:20 PM IST
अगदी बरोबर बोललात. शिवाय आंतरराष्ट्रीय मानवतावादाला मानणारे आणि झिम्बाब्वेचे माजी गोलंदाज पमेलेलो बांग्वा ह्यांनीही हा जातीयवादाचा विजय मानले आहे. एल्टन चिगुम्बरा आणि मौरीस ओडुम्बे यांनीही त्याला अनुमोदन दिले.ओडुम्बे हे मूळचे मराठी असल्याचे म्हटले जाते. पण हे भाई वैद्य कोण आहेत?
*LOL*

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2014 - 8:24 pm | प्रकाश घाटपांडे

:-))

आनन्दा's picture

22 May 2014 - 10:24 am | आनन्दा

खिक्क!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 May 2014 - 2:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

दुव्यासाठी धन्यु घाटपांडे साहेब !

असली माणसे तर आपले नेहमीचे अळणी जीवन मजेशीर बनवाणारे मीठ आहेत ! =))

ती जेवढी जास्त अगतिक बनतात तेवढी जास्त विनोदी होतात. पण सत्याचा सामना करणे त्यांना जरा कठीणच जाते, याची खंत वाटते :(

व्युत्क्रम काेन's picture

22 May 2014 - 4:25 am | व्युत्क्रम काेन

जनमानसाचा ठाव घेणारे हजरजबाबी वक्तृत्व , लाेकांना आश्वस्त करणारा आत्मविश्वास आणि गुजरातमधील कामगिरीचे वेळाेवेळी केलेले "उदाहरणासहीत स्पष्टीकरण" या गाेष्टींचा उल्लेख करावासा वाटताे.
एका निर्नायकी अवस्थेतल्या देशाला अशा व्यक्तीमत्वाची भुरळ पडणे सहाजिकच !