लोकसभा २०१४ बीजेपी सरकार

वेताळ's picture
वेताळ in काथ्याकूट
12 May 2014 - 8:04 pm
गाभा: 

आजच आपली लोकसभा २०१४च्या निवडणुकीचे मतदान संपले. खुपच प्रदिर्घ चाललेले जवळजवळ ९ टप्प्या पर्यत चाललेले मतदान असलेली ही पहिलीच निवडणुक होती. सर्वसाधारण सत्ताधारी विरुध्द सर्व विरोधक असे स्वरुप हवे असताना प्रथमच ह्या निवडणुकीत सत्ताधारी व सर्व विरोधक एकत्र येवुन एका प्रमुख विरोधी पक्षात ही निवडणुक पार पडली.

कॉग्रेस पक्षाने सर्वात चांगली रणनिती आखली असे वाटत असतानाच भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्रमोदी नी कॉग्रेसची जी वाताहात प्रत्यक्ष मैदानावर केली त्याला तोड नाही.सर्व हल्ला स्वःताच्या अंगावर घेवुन एकाद्या कसलेल्या योध्याप्रमाणे शेवटी कॉग्रेसला शेपुट घालुन मैदानावरुन पळावे लागले.

जगातील सर्वश्रेष्ट धर्मनिरपेक्ष नेते नितीशकुमार ह्यांना त्याच्या सेकुलरनिती मुळे आपले अस्तित्व टिकवणे मुश्किल झाले आहे. माणुस स्वःताच्या पायावर धोंडा कसा मारुन घेतो ह्याचे इतिहासप्रसिध्द उदाहरण त्यानी भारतिय जनतेला घालुन दिले आहे.बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसे लालुना बिहार मध्ये आधार नितीशकुमारांनी मिळवुन दिल्यामुळे लालु नितीशकुमारांचे जन्मभर ऋणी राहतील.

ममतादीदी व जयाअम्मा आपले खरे विरोधक कोण आहेत हे विसरुन नरेंद्रमोदींवर टिका करताना लक्षात येत होते कि प्रथमच बंगालव तामिळनाडुमध्ये कमळ खुलणार आहे. जिथे भाजपाला एकही जागा मिळणार नाही असे छातीठोक पणे राजकिय पंडीत सांगत होते त्या भुमीवर ह्यावेळी कमळ नक्की खुलणार असे दिसते आहे

आंध्र मध्ये आजच मुन्सिपल रिझल्ट लागले त्यात टीडीपी+बीजेपी युतीने सीमांध्र मध्ये जबरदस्त यश मिळवले आहे.त्यामुळे लोकसभेत काय होणार हे सांगायला ज्योतीष्याची गरज नाही.

दिल्लीत आपची हालात अगदीच वाईट झाली आहे.दिल्लीमध्ये बीजेपी सर्व लोकसभा जागा जिंकेल.

सर्व वाहीन्याचे एक्जिटपोल रिझल्ट येत आहेत.माझ्या मतानुसार मिळणार्‍या जागा कशा असतील त्याचा चार्ट खाली देत आहे.

बीजेपी+ = २७० ते २९०
कॉग्रेस+ = ११० ते १२०
इतर+ = १२५ ते १४०

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

12 May 2014 - 8:34 pm | प्यारे१

शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत नाही.... असो!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 May 2014 - 11:18 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

नरेंद्रच पंतप्रधान होईल असे ह्यांचे व माझे मत. पण आपल्या निवडणूका व लोकही असे की निकाल कधीकधी बुचकळ्यात टाकणारे.७७ साली निवडणूका जाहिर झाल्या.आणीबाणीत सगळी कामे वेळच्या वेळी झाली म्हणून मध्यमवर्ग खूष्.बाईंचाही तसाच समज असावा.पण झाले भलतेच्.बाई व पक्ष दोघांचाही दारूण पराभव.पुन्हा तीन वर्षांनी जोरदार विजय.
ह्यावेळी त्याएवढा नाही पण बर्‍यापैकी कॉन्ग्रेसविरोधी मूड दिसतोय सगळीकडे.

राही's picture

13 May 2014 - 6:09 pm | राही

आणीबाणीनंतरच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दक्षिण भारतामध्ये कॉन्ग्रेसचे बहुमत होते. पराभव झाला तो उत्तरप्रदेश आणि बिहार या गो-पट्ट्यात. कारण अर्थातच सक्तीची नसबंदी जिला हिंदू आणि मुस्लिम या दोघांचाही प्रखर विरोध होता. कधी नव्हे ते इथले हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर एकत्र आले. आणि हातमिळवणी करून त्यांनी काँग्रेसचा पराभव केला.
महाराष्ट्रामध्ये थोडी वेगळी परिस्थिती होती. इथे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा, जो समाजवाद्यांनी जोरदारपणे उचलून धरला, प्रभावी ठरला. तेव्हा महाराष्ट्रात या लोकांत बेचाळीसच्या चळवळीसारखा उत्साह संचारला होता. कितीतरी वर्षांनी त्यांना भूमिगत होता आले होते. गुप्त पत्रके, मसलतींसाठी संधी चालून आली होती. नायक बनण्याचे मागे-मागे पडत गेलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरू पहात होते. त्यांनी कॉमन कॉज़ करून जनसंघाला बरोबर घेतले. जनसंघानेही काँग्रेसविरोधाच्या मुद्द्यावर हिंदुत्वाची आय्डिऑलॉजी बाजूला सारली. जनसंघाचे कार्यकर्ते आणि समाजवाद्यांचे तत्त्वविचार असा न-भूतो-न-भविष्यति मेळ जमून आला.
सुरुवातीला तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते. बाळासाहेब ठाकरे यांनी तर 'सपशेल' पाठिंबा जाहीर केला. पुरुषांची नसबंदी ही संकल्पना इंदिराबाईची. संततीनियमनाचे इलाज बाईला त्रासदायक असतात. कधीकधी इस्पितळात दाखल होऊनच ते इलाज करावे लागतात. हे अर्थात इंदिराबाईंनाच समजू शकले. नसबंदी त्या मानाने सोपी. पण गो-पट्ट्यातले पुरुष यासाठी अजिबात तयार नव्हते. मग संजय गांधींची सरधोपट हडेलहप्पी चालू झाली. मग लोक बिथरले. प्रचंड बिथरले. इतके की पुढील जनता सरकारने कुटुंबनियोजन हे नावच टाकले. कुटुंबकल्याण हा नवीन शब्द जन्मास घातला. आजही दक्षिण भारतात लोकसंख्यावाढीचा वेग (लोकसंख्यावाढ नव्हे) कमी होतोय पण उत्तरेकडे मात्र आनंद आहे.
असो. आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे. पण नेहेमीच अवांतर होते. म्हणून पुरे.

प्यारे१'s picture

13 May 2014 - 6:55 pm | प्यारे१

जनसंघ की रा स्व संघ?

राही's picture

13 May 2014 - 9:59 pm | राही

रा.स्व.संघाची राजकीय आघाडी म्हणून भारतीय जनसंघाची (लघुरूप जनसंघ) स्थापना १९५१ साली झाली. आणीबाणीनंतर जेव्हा निवडणुकांची वेळ आली तेव्हा एकत्र लढण्यासाठी म्हणून बहुतेक सगळ्या विरोधी पक्षांचा मिळून जनता पार्टी हा एक पक्ष बनवण्यात आला. त्यात जनसंघ सामील झाला. पुढे दुहेरी निष्ठेच्या प्रश्नावर जनता पार्टी फुटली आणि पूर्वीचा जनसंघ हा भारतीय जनता पार्टी या नव्या नावाने आणि रूपात अवतरला.

आणीबाणीवर खूप लिहिण्यासारखे आहे.

एखादा लेख या विषयावर लिहावा हि नम्र विनंती.

विवेकपटाईत's picture

13 May 2014 - 7:33 pm | विवेकपटाईत

तुर्कमान गेटजवळील (बहुतांशी मुस्लिमांची) अतिक्रमणे उडवली म्हणून संघीय खुश होते

मी आयुष्याचे सुरवातीचे २० वर्ष (जन्मापासून अर्थात १९६१ ते १९८०) जुन्या दिल्लीत हिंदू-मुस्लीम बहुल भागात काढले आहेत. माझ्या वडिलांचे कार्यालय तुर्कमान गेट जवळ होते. तिथे आणि जुन्या दिल्लीत काय घडले याची कल्पना तुम्हाला येऊ शकत नाही. तुमचे विधान भाकड कथांवर आधारित आहेत. लिहिण्या आधी तथ्य तपासून बघितले पाहिजे. राग मानू नका.

राही's picture

13 May 2014 - 9:49 pm | राही

आपण आपली वेगळी आणि चक्षुर्वैसत्यम् माहिती जरूर मांडावी. पटली तर चूक कबूल करण्यास काहीच हरकत अथवा त्यात ईगो नाही. राग तर मुळीच नाही. उलट कोणी सत्य माहिती देतंय याचा आनंदच आहे. खुल्या व्यासपीठावर वावरताना मतभेद हे होणारच. आणि एकाच घटनेची वेगवेगळी इंटरप्रिटेशन्स सुद्धा होणारच.

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2014 - 12:33 am | प्रसाद गोडबोले

बीजेपी+ = २७० ते २९०
कॉग्रेस+ = ११० ते १२०
इतर+ = १२५ ते १४०

हा अंदाज जरा अतीच ओव्हर कॉन्फिडन्ट वाटतोय ... भाजपा २२०-२३० च्या पुढे जाणे जरा अवघडच आहे ...

ते काही का असेना .... आमचे लक्ष फक्त ईशान्य मुंबैकडे आहे ... देवा , अगदी देशात काँग्रेसचे सरकार आले अन मनमोहन परत पंतप्रधान झाले अन राहुलबाबा ला राष्ट्रपति केले तरी चालेल पण आमच्या ईशान्य मुंबैत मेधा पाटकर दणकुन पाड :D
#AAP_sucks

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2014 - 4:06 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. मेधाबाई पडल्याच पाहीजेत.

मैडम निसटता पराभव स्विकारतिल असच वाटते. सोमैय्या पडला तर मात्र कहर असेल.

विकास's picture

13 May 2014 - 1:08 am | विकास

जो पर्यंत मतमोजणी होत नाही तो पर्यंत काही खरे नाही. तेंव्हा तुर्तास सर्व पक्षांच्या समर्थकांनो keep your fingeres crossed! :)

Exit polls: More misses than hits
!function(a){var b="embedly-platform",c="script";if(!a.getElementById(b)){var d=a.createElement(c);d.id=b,d.src=("https:"===document.location.protocol?"https":"http")+"://cdn.embedly.com/widgets/platform.js";var e=document.getElementsByTagName(c)[0];e.parentNode.insertBefore(d,e)}}(document);

विकास's picture

13 May 2014 - 1:31 am | विकास

खालील निकाल सर्वत्रच आलेले आहेत. इंडीया टूडेमधून फक्त चित्र घेतले आहे... १६ तारखेनंतर किती बरोबर आले आहेत ते बघूयात. :)

Exit Poll

मृत्युन्जय's picture

13 May 2014 - 10:49 am | मृत्युन्जय

चाणाक्यचा ३२६ (-१४ धरुन) हा आकडा आजवर वाचलेला सर्वात अव्यवहार्य आकडा आहे. यातुन १०० तरी वजा करा. आजवर एक्झिट पोल बर्‍याच वेळा चुकले आहेत. कितीही काँग्रेसविरोधी वातावरण असले तरीही शेवटी विजय त्यांचाच होतो हे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. एक विशिष्ट व्हॉट बॅंक काँग्रेसचीच आहे. ती केवळ त्यांचीच आहे. बाकी पांढरपेशी जनता सोशल मिडीयावर कितीही बोंबलली तरी त्यांच्यामुळे काँग्रेसला शष्प फरक पडत नाही. त्यांच्या छाताडावर पाय देउन परत काँग्रेसच येते. यावेळेस फारतर तिसरी आघाडी येइल किंवा राष्ट्रपती राजवट. पणा मोदी येतील असे अजुनही वाटत नाही. देव करो आणि माझी निराशा चुकीची निघो :)

आनन्दा's picture

13 May 2014 - 11:34 am | आनन्दा

राजे - ६८% मतदान झालेय, यापूर्वी एव्हढे मतदान फक्त १९८४ मध्ये झाले होते. यावरून काय ते समजून जा. मला भीती वेगळीच आहे. राजीव गंधींसाऱखे पाशवी बहुमत यावेळी मोदींना न मिळो. वस्तुतः मला मोदी सरकार यावे असेच वाटते. पण पाशवी बहुमतावर नको.

मृत्युन्जय's picture

13 May 2014 - 11:41 am | मृत्युन्जय

यायचेच असेल तर मग ते स्पष्ट बहुमतावरच येउ देत. नाहितर नंतर सांगत फिरतील की स्पष्ट बहुमत नव्हते म्हणुन योग्य त्या योजना राबवता आल्या नाहित. एकदा त्यांना १० वर्षे द्याच (पुढची निवडणुक जमेस धरली आहे). प्रगती केली तर काँग्रेसने इतकी वर्षे माती खाल्ली आणि देश गाळात घातला हे सिद्ध होइल. नाहि जमले तर सगळ्या फुकाच्या गप्पा होत्या हे सिद्ध होइल. पर्याय नाही त्यामुळे सुशासन नाही आणि सुशासन नाही त्यामुळे सबळ पर्याय नाही हे दुष्टचक्र अजुन किती दिवस चालणार? आणि किती दिवस आपण देशाची अधोगती केवळ काँग्रेसच्या माथी मारत राहणार? त्यापेक्षा एकदा त्यांना सलग १० वर्षे स्पष्ट बहुमताचे सबळ सरकार देउन तर बघा.

स्पष्ट बहुमत मिळो, पण पाशवी न मिळो. मी पण मोदींचा समर्थकच आहे, हे तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या सर्वत्रच्या लिखाणावरून दिसून येइल, पण पाशवी बहुमत न मिळो हे पण तेव्हढेच खरे आहे. मला त्याची पन तेव्हढीच भीती आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 May 2014 - 1:40 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

स्पष्ट बहुमत मिळाले तर काय हरकत आहे आनंदा? निदान ज्या काही योजना राबवायच्या असतील त्या राबवता
येतील. अनेक पक्ष आले की मग पक्षांचे पुढारी एक्मेकांची धोतरे,लेंगे ओढण्याचे,काड्या घालण्याचे उद्योग करतात.

परत सांगतो, स्पष्ट बहुमत मला पण हवे आहे. पण ज्या बहुमताच्या जोरावर शहाबानो झाले, तसे नको. मग ते मोदी असले म्हणून काय झाले?

प्यारे१'s picture

13 May 2014 - 2:42 pm | प्यारे१

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2014 - 2:58 pm | प्रसाद गोडबोले

बहुमताच्या जोरावर काय काय होईल असं वाटतंय?????

>>> आवले काका , गुजरात सारखी दारु बंदी देशभर झाली तर आमच्या सारख्यांचं काय होईल *shok* , थोडा विचार करा आमचा *biggrin* *drinks*

प्यारे१'s picture

13 May 2014 - 3:21 pm | प्यारे१

ऐसा कुच्च नही होगा वत्स!

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2014 - 4:43 pm | llपुण्याचे पेशवेll

कदाचित गुजरातेतली दारुबंदी उठायची.

प्रसाद गोडबोले's picture

13 May 2014 - 4:58 pm | प्रसाद गोडबोले

तुमच्या तोंडात बीयर पडो ... :)

प्यारे१'s picture

13 May 2014 - 6:56 pm | प्यारे१

अरे ते पुपे बीअर पित नाय, आण इकडे ;)

आनन्दा's picture

17 May 2014 - 1:41 pm | आनन्दा

नशीब ३३६ वर थांबले.

चौकटराजा's picture

13 May 2014 - 7:21 am | चौकटराजा

अ मॅन वुईथ हिज फूट इन द फायर इज अ हॅपी मॅन इन स्टटिस्टिक्स असे सॅम्पल सर्वे ची खिल्ली उडवणारे एक वाक्य आहे.एकच अंदाज बाळगता येईल की मोदी जरी प्रधानमंत्री झाले नाहीत तरी त्यांच्या परवानगी शिवाय नवा पंतप्रधान होणे नाही.

भाजपाला ही मिळणारी मोठी संधी आहे,तर मोंदींसाठी असे सिंहासन तयार झाले आहे ज्यावर टिकुन राहण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागतील असे वाटते. देशाला आता स्थीर सरकार आणि कणखर नेत्याची गरज आहे, जो आपल्या कोसळत आलेल्या परिस्थीला सांभाळेल आणि आधार देइल. बीजेपी कशी वाटचाल करते... आणि त्यांचे नेते मंडळी कसे वर्तन आणि विधाने करतील याकडे आता जास्त लक्ष दिले जाइल.
एक हिंदूस्थानी नागरिक म्हणुन मोंदी प्रतंप्रधान व्हावेत अशी इच्छा नक्कीच आहे,ते सिंहासनावर विराजमान होउ शकतील का हे लवकरच आपणा सर्वांना कळेलच.

जाता जाता :- तुम्हाला दरवर्षी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणार्‍या भेंडवळच्या ३५० वर्षाची परंपरा असलेल्या भविष्यवाणी {घटमांडणी} वर्तवण्या बद्धल माहिती आहे का ?

llपुण्याचे पेशवेll's picture

13 May 2014 - 4:44 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. त्यांनी इतकी वर्षे खाल्लं आम्ही ५ वर्षे खाल्ले तर काय चूक असे म्हणून घालवू नका.

भेंडवळच्या घडमांडणी बद्दल वाचुन आहे. पण त्यांचे भविष्य कितपत खरे होते याबद्दल आशंकीत.

राही's picture

13 May 2014 - 11:42 am | राही

यंदा राजा बदलणार आणि त्याच्यावर संकटे येणार; पाऊस कमी असणार असे भविष्य निघाल्याचे वाचले आहे.

कवितानागेश's picture

13 May 2014 - 3:21 pm | कवितानागेश

मोदी आले तर नक्कीच संकटं येणार त्यांच्यावर. कॉन्ग्रेसी काही स्वस्थ बसणार नाहीत. काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....

काय काय करतील सांगता येत नाही. ते लोक सत्तेवाचून तडफडतात.....
दुधाच्या किंमती वाढल्या पासुन माउ संतप्त आहे ! सरळ सरळ पोटावर पाय देतात हे नतद्रष्ट लोक ! ;)

{मवा प्रेमी बोका} ;)

वेताळ's picture

16 May 2014 - 1:02 pm | वेताळ

हेच ते बीजेपी सरकार २०१४

अभिजित - १'s picture

16 May 2014 - 6:56 pm | अभिजित - १

सगळे मिपा पंडित चुकले !!

विकास's picture

17 May 2014 - 12:08 am | विकास

मिपा पंडीत माझ्या माहितीप्रमाणे जरा सावध होते... ;) पण बाकीच्यांचे काय? मला वाटते फक्त चाणक्य एक्झिट पोलच बरोबर आला आहे. कोण आहेत हे म्हणे? आधी कधीच ऐकेले नव्हते...

६७%+ मतदान झाल्यामुळे मला असे वाटत होते की एकतर भाजप २५० च्या आत राहील, पण २७० पार केले तर मग मात्र मोठी मजल मारेल. ते सर्वे ही वाढीव मतदान आप ला जाते की भाजपाला जाते यावर अवलंबुन होते.

पैसा's picture

17 May 2014 - 5:56 pm | पैसा