भारताचं नावडतं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". मुस्लिमांचा 'प्रश्न' सोडवायचा आहे ना? मग मुस्लिमांना हिंदू वस्त्यांमध्ये घरं घेऊ देऊ नका. तसं नाही केलं तर सुरुवातीला एखादी मुस्लिम व्यक्ती जास्त किमतीने घर घेईल आणि आजूबाजूच्या परिसरात इतर मुस्लिम कमी किमतीची घरे घेऊन स्थायिक होतील. अशी धमकी प्रवीण तोगडिया यांनी दिल्याचं वृत्त आज 'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलं. बिहारी भाजपा नेते गिरीराज यांचा मोदीविरोधकांचे स्थान पाकिस्तानात आहे हा "विनोद" ताजा असतानाच तोगडियांच्या नवीन वाचाळतेमुळे भाजपा आणि संघाची पुन्हा एकदा दातखीळ बसली आहे.
'४८ तासांत याने घर खाली ने केल्यास घरावर दगड, टायर आणि टोमॅटोचा मारा करा. 'हे सगळं करण्यात काहीच गैर नाही. अजून राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनाही फाशी झालेली नाही. तुमच्यावरचे खटलेही वर्षानुवर्षे चालतील. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी याआधी असे अनेक खटले लढलो आणि जिंकलोही आहे' असं हे महाशय म्हणाले.
'टाईम्स ऑफ इंडिया' च्या वृत्तानुसार 'गुजरातच्या भावनगर शहरातील मेघानी सर्कलजवळ एका मुस्लिम उद्योजकाने घर खरेदी केले आहे. परिसरातील हिंदूंनी त्यास विरोध केला आहे. याचे निमित्त करून तोगडियांनी यांनी शनिवारी विहिंप व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह या मुस्लिम उद्योजकाच्या घरावर धडक दिली. तिथे निदर्शने करण्यात आली व रामजप करण्यात आला.'.
ही धमकी पहाता माध्यमे याचा सक्रीय पाठपुरावा करणार हे निश्चित. संघ आणि भाजपाने मात्र ही बातमी 'फॅब्रिकेटेड न्यूज' असल्याचे म्हटले आहे.
प्रतिक्रिया
21 Apr 2014 - 7:43 pm | प्रसाद गोडबोले
विडंबन म्हणुन हसण्यावारी नेत आहे ...एरव्ही आपल्याकडुन हे लेखन विडंबन सदरात टाकले जाण्याची शक्यता नाही =))))
21 Apr 2014 - 7:55 pm | आजानुकर्ण
सक्रीय हा विडंबनातील अशुद्ध शब्द मूळ लेखातून जसाच्या तसा घेतला आहे. अन्यथा मी तो 'सक्रिय' असा लिहिला असता.
असो.
21 Apr 2014 - 7:56 pm | आजानुकर्ण
आणि व्यक्तीमत्व सुद्धा...
21 Apr 2014 - 9:36 pm | राजेश घासकडवी
आजानुकर्ण,
या लेखावरून हे सिद्धच होतं की तुम्ही संघद्वेषी, भाजपाद्वेषी आणि मोदीद्वेषी विचारजंत आहात. आणि पर्यायाने भारतद्वेषी आणि प्रगतीद्वेषी आहात. मला एक सांगा, की मोदींचा इथे काय संबंध? त्या बिचाऱ्या तोगडियांनी आपल्या हिंदू बांधवांच्या उद्धारासाठी काही काम केल्याबरोबर तुमच्या पोटात का दुखतं? ऑ ऑ? तुमचा हे लेखन म्हणजेच हेटस्पीच आहे. कारण हिंदू धर्म हा आक्रमक नाही, समजूतदार आहे, मवाळ आहे. सर्वांना आपल्यात सामावून घेणारा आहे. अशा पवित्र धर्माच्या वैश्विक परिषदेचे मुख्य असं काही बोलू शकतील असं म्हणणंदेखील हेटस्पीच आहे.
हेटस्पीचचा निषेध असो!
21 Apr 2014 - 9:53 pm | आयुर्हित
हेटस्पीचचा निषेध असो!
22 Apr 2014 - 1:30 am | खटपट्या
कुठे चाललोय आपण ?
22 Apr 2014 - 11:41 am | प्रसाद गोडबोले
मी तरी आज कुठेच जाणार नाहीये , घरीच बसणार आहे , परवा पुण्याला किंव्वा मुंबईला चाललोय :)
22 Apr 2014 - 12:03 pm | थॉर माणूस
बहुतेक मधल्या आळीतनं... ;)
23 Apr 2014 - 11:47 pm | खटपट्या
जोक चांगला होता
22 Apr 2014 - 11:30 am | आयुर्हित
Narendra Modi ✔ @narendramodi
Follow Petty statements by those claiming to be BJP's well wishers are deviating the campaign from the issues of development & good governance.
9:27 AM - 22 Apr 2014
2,167 Retweets 949 favorites Reply
Narendra Modi ✔ @narendramodi
Follow I disapprove any such irresponsible statement & appeal to those making them to kindly refrain from doing so.
9:28 AM - 22 Apr 2014
1,901 Retweets 906 favorites Reply
22 Apr 2014 - 11:41 am | प्रसाद१९७१
आजानुकर्ण - एक तर तुम्ही मूर्ख आहात किंवा तुम्हाला असले काहीतरी लिहीण्यासाठी पैसे मिळत आहेत. खरच पैसे मिळत असेल तर मला पण सांगा, मी पण लिहीत जाइन असले निरर्थक.
तुम्ही कधी सर्वे केलात की हे व्यक्तीमत्व भारताचे नावडते आहे म्हणुन? मला तर फार आवडते.
22 Apr 2014 - 12:00 pm | थॉर माणूस
आँ... मागे एकदा तुम्हीच म्हणाला होतात ना तुम्ही भारताबाहेर पळून गेलात म्हणून? बरं तुमचं नावही भारत नाही, मग कुठल्या अँगलने तुम्हाला आवडते ते व्यक्तिमत्व "भारताचे नावडते" नाही असे म्हणावे हो? :)
निदान लेखनविषय तरी बघायचात. विनोद, विडंबन सुद्धा झोंबायला लागलं की काय इतक्यात?
22 Apr 2014 - 12:16 pm | सुनील
निवडणूकीच्या काळात असले वक्तव्य करायला तोगडियाला काँग्रेसनेच "पटवले" असावे. ;)
22 Apr 2014 - 12:22 pm | धन्या
हीच शक्यता जास्त वाटते. ;)
22 Apr 2014 - 12:28 pm | थॉर माणूस
काही अंशी शक्यता आहे, पण...
मोदींच्या लाटेमुळे बाकीच्यांचा अंतर्गत जळफळाट बाहेर निघत असल्याची शक्यता सुद्धा आहे. त्या गिरीराज सिंगांनी सुद्धा हळूच एक पिंक टाकली होतीच की. सगळे जळकू टपून बसलेत, कधी संधी मिळतेय भडास काढायची ते पहात. आणि मग असे कुठेतरी पचकतात.
तिकडे ताईंसाठी मतं मागताना दादांनी केलेला किस्सापण थोडासा याच टाईपाचा वाटतोय मला.
22 Apr 2014 - 1:13 pm | सुनील
हेच म्हणतो!
तोगडियाच्या जळफळाटाला काँग्रेसनी फक्त काडी लावली!! ;)
बोलून-चालून काँग्रेस राजकारणात मुरलेली पण तोगडियाला समज नाही?
22 Apr 2014 - 1:27 pm | अत्रुप्त आत्मा
@पण तोगडियाला समज नाही? >>> ती असण्याची त्याच्याकडून अपेक्षाही नाही. दिग्(मूढ)विजय-सिंग नावाचं माकड नाय का, काँग्रेसनी असच-आत पाळलय! हुश्शार आणि रक्तपिपासू राजवटींना अस्सच तय्यार असावं लागत!
22 Apr 2014 - 12:45 pm | गब्रिएल
ह्ये मंजे जर्रा ज्यास्त झालं हां सुनील भौ. सत्यवान, भारत्विकासोच्चूक म्हाम्याडम आणि देश्याचे त्रूण नेत्रूत्व म्हनून खुद्द तुमच्या शुबहास्ते गौरवलेल्या न्येत्यांबद्दल आनि त्येंच्या देशउद्दारक पार्टीबद्दल आशी कामेंट आनि तिबि तुमच्या सार्क्या कान्गरेस पाटिराक्यांकडना ? काय पार्टी च्येंज क्येकी कि काय ?
@ पुतणेसय्बांचा ईनोद : आवो, आताआताच नायका काकासाय्बांनी वाटन्या करून एण्शीपिचि वाट्णी क्येली? त्येच्यात पुत्णेसाय्बांना म्हाराष्ट आणि त्येंच्या भैनाबय्ना दिल्ली दिली नायका? त्येवा पुतनेसाय्बांना भ्या वाट्नारच की, भैनाबाई दिल्लीला न्हाय ग्येल्या तर मंग म्हाराष्टाच्या शिएमच्या गादिला नाय्का पर्तिस्पदी व्होनार ? काय म्हंताव ?
22 Apr 2014 - 1:32 pm | सुनील
तोगडियाच्या पाठोपाठ रामदास कदमही!!
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Ramdas-Kadam-M...
22 Apr 2014 - 4:12 pm | प्रसाद गोडबोले
तोगडियांचे माहीत नाही पण रामदास कदम बोलले त्यात काही चुक वाटत नाहीये ...
आझाद मैदान दंगा प्रकारात जो घोळ झाला , ज्याप्रकारे शहीदस्मारकाची विटंबना करण्यात आली, ज्या प्रकारे महिलापोलिसांचा विनयभंग करण्यात आला आणि त्यावर ज्याप्रकारे पोलिसखाते राज्यसरकारच्या दबावामुळे मुग गिळुन गप्प बसले ते निंदास्पदच होते .
त्यावर पोलिसांनी आजपर्यंत काय कारवाई केलीये ? किती रुपये नुकसान भरपाई वसुल करण्यात आली त्यांच्या कडुन ? केवळ राज्यसरकारच्या बोटचेपी धोरणामुळे आणि मतांसाठीच्या लांगलुंचनामुळे हे घोंगडे भिजत पडले आहे ! (आणि ह्यातला सगळ्यात हास्यास्पद प्रकार हा की हे लोक कोणत्या तरी दुसर्याच देषातील घटनांचा निशेध करायचा म्हणुन जमले होते म्हणे ... "म्हणे" )
जर सक्षम सरकार आले आणि त्यांनी ह्या असल्या दंगलखोरांवर कारवाई केली तर ते देश हिताचेच होईल आणि पुढे होणार्या दंगलींना आळा बसेल !
रामदास कदमांना तोगडियांच्या पंगतीत बसवु नका .... तोगडिया सठीया गया है पण रामदास कदम बोलले ते योग्यच आहे ... कोणत्याही विशिष्ठ संप्रदायाची माणसे (मग ते हिंदु असोत की बौध्द की जैन की शीख की अन्य कोणी) जर झुंडशाहीने देषाला वेठीस धरणार असतील तर त्यांना सक्षम सरकार आणुन आणि पोलीसांना योग्य ती ताकत देवुन वेळेतच चेपायला हवे !!
22 Apr 2014 - 5:28 pm | राजेश घासकडवी
रामदास कदमांचं माहित नाही, पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे भाजपाद्वेष्ट्या, संघद्वेष्ट्या आणि मोदिद्वेष्ट्या लोकांमध्ये त्यांच्यावर चिखलफेक करण्याची अहमहमिकाच लागलेली आहे हे धादांत सत्य आहे. उदाहरणार्थ लोकसत्तामध्ये दडपून छापून आलेलं आहे की भाजपा समर्थकांनी बीडमधलं मतदान केंद्र बळकावलं. आता काय म्हणावं असल्या अपप्रचाराला?
23 Apr 2014 - 12:35 pm | प्रसाद गोडबोले
#PaidMediaSucks
23 Apr 2014 - 1:21 pm | सुनील
नै तर काय!
वर म्हणे त्या मतदान केंद्रावर फेरमतदानाचा आदेश दिलाय निवडणूक आयोगाने!
काय पण पेडन्यूज!!
23 Apr 2014 - 1:58 pm | संजय क्षीरसागर
फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करुन मग (डायरेक्ट) सुप्रीम कोर्टातच निवाडा झाला पाहिजे! कारण मोदींना विकासाची कामं पडलीयेत नां!
23 Apr 2014 - 10:44 pm | प्रसाद गोडबोले
आणि पुण्यात तब्बल सव्वालाख उमेदवार मतदान करु शकत नाहीत , आणि सर्वच माध्यमातुन हे राष्ट्रवादीचे कारस्थान असु शकते असे मत वर्तवण्यात येत आहे त्याबद्दल निवडणुक आयोग जबाबदारी सुध्दा घ्यायला तयार नाही ...अशी बातमी नाही छापत हे लोक ...
सीरीयसली असल्या पेड न्युज वाल्यांमुळे लय नुसकान होणारय देशाचे .
24 Apr 2014 - 10:03 am | हुप्प्या
आपल्या लाडक्या म्हाराणीसायेब इमामचाचाची दाढी कुर्वाळत समदी शेक्युलर मते आम्हालाच द्या बरं का असे लाडेलाडे बोलत होत्या तर त्यांनाही जातीय जातीय म्हणून पावटे पत्रकार कोकलू लागले. इमामचाचांनी आपल्या सम्द्या शेक्युलर चेल्याना काँग्रेसला निवडून द्या इतकेच आव्हान केले त्याचा इक्ता बोभाटा! काय म्हणावं ह्या कर्मदळिद्र्यांना!
शेक्युलर आणि धर्मांध ह्यातला फरक ह्या लोकांना कळेना. इमाम शेक्युलर आणि हिंदू फाशिस्ट. हेही समजावून सांगावे लागावे ह्यांना? बुरसट प्रतिगामी कुठले!
24 Apr 2014 - 10:28 am | मनीषा
करणारे करतात, ... त्यांना कुण्णी काही करत नाही. (ते सरकारचे लाडके ना !)
बोलणारे बोलतात, ... त्याची न्यूज होते.
आणि बघणारे, ऐकणारे आपण... आपल्याला मात्रं त्यावर चर्चा करण्याची शिक्षा.
याला काय अर्थ आहे ?