यदाकदाचित ह्यालेखाचे नाव व लेखकाचे नाव वाचुन लोकांना(कु)शंका वाटेल की माझा सध्या वेळ जात नसावा.
तसे काही नाही फक्त मिपावर सध्या काही प्रतिसादांतुन जुन्याच असलेल्या सदस्यांनी काही नवे रुप घेवुन मिपावर पुनरावतार धारण केलेला असे जाणवते.
त्यात तसे करण्याचा हा त्यांचा हेतु काय असावा,
१. खोडसाळपणा
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे.
३. उगाच दंगा करणे
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे.
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे.
६. संपादकांना त्रास देणे.
असो. तर आता मातृभाषेतुन सुरु करतो.
तर लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
प्रतिक्रिया
5 Apr 2014 - 4:42 pm | आत्मशून्य
नेमक्या कारणावर कधीच एकमत होणार नाही
१. खोडसाळपणा = १००%
२. कोणाबरोबरची मागची बाकी चुकती करणे = ५०% - ५०%
३. उगाच दंगा करणे = ५०% - ५०%
४. लोकांना किंवा लोकांच्या भावना भडकावुन मजा पाहणे. = ५०% - ५०%
५. उगा आगीत तेल टाकुन आपली करंजी तळुन घेणे. = ५०% - ५०%
६. संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%
5 Apr 2014 - 5:10 pm | मदनबाण
हेच म्हणतो की वो मी. ;)
6 Apr 2014 - 4:04 pm | तुमचा अभिषेक
संपादकांना त्रास देणे. = नक्किच नसावे. ०.००००१%
मी स्वता एकेकाळी ऑर्कुटवर केलेय. युवा जोशमध्ये असताना. काय कुठे अन कसे ते पुन्हा कधीतरी. पण मुद्दा हा की एखाद्याला वाटले की त्याच्याशी काहीतरी अन्याय वा पक्षपात झाला आहे तर बंडखोरी घडू शकते. संचालकांकडे अधिकार असतो की एखाद्याच्या पोस्ट उडवा वा बॅन करा तर मग याला उत्तर म्हणून फेक प्रोफाईल वा ड्यू आयडीचे हत्यार वापरले जाऊ शकते.
6 Apr 2014 - 5:04 pm | आत्मशून्य
मिपावर बहुतांश सध्याचे संपादक हे तसे एकतर सदस्यांच्या उपद्व्यापाने वैतागलेले अथवा पद प्रिय असल्याने विवादात जाणीवपुर्वक तठस्थ भुमीका राखणारे असतात. त्यामुळे ते उघड अन्याय करायच्या फंदात पडत नाहीत व प्रथम जमाव तुमच्या विरोधात जाण्याची वाट पहायचा मार्ग पत्करतात व मग (पडद्यामागुनच) कृती करणे पसंत करतात.
सामान्य सदस्य तंत्रज्ञानाने इतका प्रगत नाही की तो कोणी काटा काढला याचे इनवेस्टीगेशन स्वबळावर करु शकेल. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे खापर संपादकांवर फोडने एव्हडे सोडले तर कोणीही सामान्य सदस्य संपादकांना त्रास देण्याचा द्रवीडी प्राणायाम करायला समर्थ नाहीच.
त्यात ज्या गोश्टींचा निर्णय संपादकांना घेता येत नसेल असे वाटते, तेथे डायरेक्ट थर्ड अंपायर उर्र्फ साक्षात मालकच निवाडा करतात. एक घाव दोन तुकडे, नो अपील. म्हणून वरील सर्वकरणांमुळे संपादकांना त्रास देणे हा हेतु मनात धरुन डु आयडी काढणे ही अतिशय दुर्मीळातील दुर्मीळ घटना ठरते, असे करायची कोणाची किती तिव्र इछ्चा असते-नसते हा वेगळा विषय आहे पण सध्या आपण फक्त प्रत्य्क्ष किती लोक हे करु जातील याचा विचार केला तर संपादकांना त्रास देण्याच्या हेतुने डू-आयडी काढत राहणे ही दुर्मीळातील दुर्मीळ घटनाच मानावी लागेल... नॉट टु मेंन्शन त्यासाठी पॉलीटीकली करेक्ट राहण्याचे गट्स किती मोठे लागतील :)
7 Apr 2014 - 12:03 pm | तुमचा अभिषेक
कारण माझे अनुभव ऑर्कुट समूहांवरचे आहेत. माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते. आणि ते विविध हेतूने बनवले होते. तसेच इतर लोक्स सुद्धा ज्या हेतूंनी फेक प्रोफाईल बनवायचे त्यांचे हेतूही लक्षात घेतले तर त्याची हेतूनुसार टक्केवारी वेगळी निघेल. असो, मराठी संकेतस्थळांचा फारसा अनुभव नसल्याने किंवा इथे अजून खोलवर रुळलो नसल्याने सध्या आपण बोलत आहात तेच प्रमाण मानून चालतो. :)
7 Apr 2014 - 12:09 pm | मदनबाण
माझे स्वताचे तिथे तब्बल ८०+ प्रोफाईल्स होते.
नारायण ! नारायण ! इथे नक्कीच एकच आयडी आहे ना ? ;)
@पैसाताय
तू ज्यांच्या बद्धल म्हणतेस ना... ते म्हणजे कंपु नंबर १ बरं का. ;)
7 Apr 2014 - 12:46 pm | तुमचा अभिषेक
तो फक्त लिखाण करायला. थोडे वेगळ्या शैलीत लिहिले की त्या आयडीतून टाकतो एवढेच. बाकी तो काही लपवलाय असेही नाही. पुढे मागे येथील सक्रियता वाढली की कदाचित आणखी एखाद्याची गरज भासेलही आणि विश्वास ठेवा तो मी काढेलही. मुळात ड्यू आय डी हे प्रकरण सर्रसकट वाईट नसते हो, जर तुम्ही अभिमानाने वा किमान संकोच न बाळगता आपल्या एखाद्या आयडीची जबाबदारी घेऊ शकत असाल तर त्या आयडी बनवण्यामागचा तुमचा हेतू काहीही वाईट नव्हता हे माझे लॉजिक झाले.
7 Apr 2014 - 12:44 pm | बॅटमॅन
८० प्रोफाईल्स :O अगायायो _/\_
एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै?
7 Apr 2014 - 12:49 pm | तुमचा अभिषेक
एक्सेल शीटच बनवून ठेवली असेल नै?
>>>>>>
मान गये उस्ताद.. ग्रेट मॅन थिंक्स अलाईक असे काहीसे बोलतात ना, तसे झाले हे.. खरेच एक्सेल शीटच बनवली होती, पैकी जे प्रोफाईल करंट वापरात असायचे त्यांच्यासाठी एक सामाईक मास्टर पासवर्ड होता, म्हणजे इथून तिथे उडी मारताना पासवर्ड आठवायचा त्रास नाही डोक्याला ;)
7 Apr 2014 - 12:52 pm | बॅटमॅन
हा हा हा, जबरीच ;)
5 Apr 2014 - 5:06 pm | पैसा
तुम्ही लिहिलीत ती सगळी कारणं कमी अधिक प्रमाणात असणारच. ज्या कारणांसाठी हे मिपावर येत नाहीत ती म्हणजे
१. चांगले काही लिहिणे-वाचणे
२. लोकांबरोबर विचाराचे आदान-प्रदान
३. आपली ओळख देणे
किंबहुना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत हे त्यांना चांगलंच माहित असतं आणि ते करत असताना आपल्याला कोणी पकडू नये, म्हणजे आपला संभावितपणाचा मुखवटा कायम रहावा अशी त्यांची इच्छा असते. थोडक्यात म्हणजे शिवराळ भाषा तर वापरायची आहे पण त्याचे परिणाम नकोत अशी काहीतरी मानसिकता असते. याउलट काही लोक चांगल्या हेतूने पण असे डु आयडी वापरताना दिसतात. म्हणजे या दंगेखोरांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी.
कोणाचा डु आयडी कोण आहे हे नीलकांत आणि प्रशांत आयपी अॅड्रेस आणि लॉग इन करण्याची वेळ यावरून सहज शोधू शकतात. आणि आम्हा संपादकांना शंका आली की आम्ही त्यांना विचारून घेतो पण प्रॉब्लेम असा की एका ऑफिसातून/घरातून लॉग इन करणार्या दोन तीन लोकांचे आयपी अॅड्रेस कधी कधी एकच येतात. त्यामुळे डु आयडी कोण आहे हे साधारण कळलं तरी थेट अॅक्शन घेता येत नाही.
फक्त ज्या अवतारात खोडसाळपणा केला असेल तो बॅन करणे हा एकच उपाय रहातो. पण यात एखादा माणूस चांगला अवतार जिवंत ठेवून इतर अनेक खोडसाळ अवतार घेत रहातो. याला काही औषध नाही. सगळेच लोक चांगल्या कारणाने मिपावर येतात असंही नाही. काहीजण मिपावर फक्त गोंधळ घालण्यापुरते येतात आणि दुसर्या संस्थळांवर चांगलं काम करतात हेही पाहिलं आहे. पण असे लोक माहित असले तरी ते नियमांच्या चौकटीत राहून गोंधळ घालत असल्याने तावडीत सापडत नाहीत.
तुम्ही खान्देशी बोलीत लिहिलं आहे ना? बर्यापैकी कळलं. अधून मधून लिहीत जा. नव्या बोलीशी ओळख होईल.
5 Apr 2014 - 6:35 pm | आत्मशून्य
नाही. आयपी हा विश्वसनीय प्रकार ठरत नाही. एक तर आयपी लपवायची इछ्चा राखणारा हे चुकवु शकतो. आणी दुसरे म्हणजे एकाच (अगदी स्टॅटीक असला तरी) आयपी वरुन दोन वेगवेगळे आयडी (अगदी एकाच वेळी) कार्यरत राहणे हीसुधा संपुर्ण निकोप गोष्ट आहे, व ते डू आयडी असण्याची शाश्वतीही नाही.
आपल्या हेतुबद्दल शंका नाही परंतु असे सरसकटीकरण करणे टाळावेच. विशेषतः त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला चक्क डु-आयडी काढणारे विषेश दुट्प्पी आणी विषेश हरामखोर समजावेत. आपण पातळी सोडू शकतो हे जगापासुण लपवणे हा तर खरा नालायकपणा होय, न्हवे अशां महाभागाचे मुळ आयडीच डू आयडी ठरवले पाहिजेत.. पण असो, ही तात्वीक बाब आहे, व फक्त माहिती पुरेशी आहे. जालीय आचरणाच्या पातळीवर ही लागु केलीच पाहिजे असे नाही.
आणी हो, राहता राहीले माझे वैयक्तीक मत. म्हणजे व्यक्ती तशा प्रवृत्ती, पण उद्या समजा मला डु आयडी काढावा वाटला तर माझ्यापुरते त्याचे नेमके काय कारण असेल.... १) खोडसाळपणा (अर्थात हा मुळ आयडीचाही भाग आहेच) २) माताय, सगळी दुनीया डुआयडी काढुन दंगा करुन गेली राव आणी आपलं मात्र हे कधीच करायचं राहीले ही चुटपुट नको. बघुया तरी डु-आयडी प्रकरणातुन किती धमाल उडवता येते ते.... :)
5 Apr 2014 - 11:04 pm | पैसा
डु.आयडी प्रकाराबद्दल बद्दल तुम्हाला इतकी माहिती आणि कळकळ आहे हे पाहून छान वाटले! यापुढे एखादा डु. आयडी असल्याची शंका आली तर ओळखण्यासाठी तुमची मदत नक्कीच मागेन!
5 Apr 2014 - 10:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे
असे का होत असावे बरे? तुमचा काय अंदाज आहे ?
5 Apr 2014 - 10:58 pm | पैसा
त्या वाक्यातच याचं उत्तर आहे! हा प्रश्नच पडू नये!
5 Apr 2014 - 11:28 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आयच्यान सांगतो तुम्हाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही. कुठल्या वाक्यात नक्की?
आणि हो, एकदम खरे उत्तर हवे आहे. उत्तर म्हणजे, तुमचे मत.
5 Apr 2014 - 11:33 pm | पैसा
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण.
आता मला गोंधळात सापडायची इच्छा नाही. त्यामुळे इति लेखनसीमा.
7 Apr 2014 - 12:01 pm | मदनबाण
मिपावर गोंधळ घालायला येतात. दुसरीकडे गोंधळ घालत नाहीत. तेच कारण आहे आणि परिणाम पण.
हॅ.हॅ.हॅ... ;)
6 Apr 2014 - 9:39 am | श्रीरंग_जोशी
या विषयावर चिंतन बैठकीमध्ये चर्चा करणे उपयुक्त ठरू शकते.
अन अशा बैठकींसाठी गोवा हे गाजलेले स्थळ आहे ;-).
6 Apr 2014 - 10:14 am | जेम्स बॉन्ड ००७
असेच म्हणतो..
5 Apr 2014 - 5:43 pm | कवितानागेश
डु आयडी शिवायही या सर्व गोष्टी करता येतातच की.
6 Apr 2014 - 10:19 am | जेम्स बॉन्ड ००७
असं म्हणणार्यांचाच डु आयडी असण्याची शक्यता जास्त असते *biggrin*
5 Apr 2014 - 5:55 pm | कंजूस
भऊ मना अहिराणी लिवलस ते म्हून आवडलं .
मला अजून बावनकशींची ओळख झाली नाही खरी पेढीवर पण मी त्यांना लेखनातून ओळखतो .डुआइडीने (?)चांगलं लिखाण केलं तरी मी वाचतो .ठिगळ सुरेख लावलं तरी बघतो .
आता काही जणांकडे वेळ भरपूर आहे .
"काई करु काई करु नवीन लुगडं धांडे करु ".
"होळीतला नारळ पेटून ठूसफुसायचाच ,वेळीच काढला तर खोबरं गोड नाहीतर कोळसा ".
या भाषेत काहीपण लिहून राहा .
6 Apr 2014 - 9:41 pm | इरसाल
कंजुसभौ, आवडनं बरं आपले हाइ.
अहिराणीमा गैर्ह्या चांगल्या गोट भरेल शेतस.
एक म्हण मनी भी.
काम नही काय करु लुगडं फाडी दांडे करु.
5 Apr 2014 - 5:55 pm | जेपी
विश्रांती मोड ऑफ- मी मिपावरचे किमान 14 डुआयडी सांगु शकतो , यातील एक संपादकाचा आहे . नुकताच आं ची या मागील खरा आयडी कोण आहे हे सांगु शकतो . आशु च्या 4थ्या मुद्याशी सहमत-विश्रांती मोड ऑन
7 Apr 2014 - 3:16 pm | शिद
फ्लेक्स बनवा आणि लावा मिपावर... हाकानाका.
5 Apr 2014 - 6:10 pm | बॅटमॅन
काकूच्या विषयाशी सहमत आहे. बाकी खाली जे लिहिलंय ते कळालं आणि आवडलंही. अहिराणीत शे काय???
6 Apr 2014 - 9:38 pm | इरसाल
र लोकेसोन,
मिपावर काहीबाही लोके मनमा कथाकथानी घाण भरी लयतस आणी आठे ज्या काही हातवर मोजा जोगता चांगला लोके शेतस तेस्ले तर्रास देवाना काममा लागी जातस.
मले एक समजत नयी अस करी ह्या भडवास्ले काय भेटी र्हायन्ण हुईन ? येस्नापायरे मिपानं नाव खराब होवाले लागी जायेल शे.
जव्हय देखो तव्हय नवा आयडी लीसन आठेच्च! ह्या बाप्याले तरास देवु त्या बाईले तरास देवु.
पण हाउ डु आयडी काढाले काय करनं पडस ? म्हंजे असं देखा मी सम्जा दोन तीन इमेल बनाडात आनी त्यावरतुन आठे लोगिन करं,पन मी हरसावां मन्हा कंपुटर ते बदलु शकत नही. मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?
तर हाइ मालुंग कराले मी असा काथ्याकुट टाकी र्हायनु, जमीन तसा उत्तरे देवानी कोशिस करज्यात बरं !
ते असे आहे,
तर लोकहो,
मिपावर काही लोकं मनात कुठली कुठली घाण भरुन येतात आणी इथे जी काही हातावर मोजण्याइतकी चांगली लोकं आहेत त्यांना त्रास द्यायचं सुरु करतात.
मला एक समजत नाही असं करुन ह्या भ*** काय भेटत असेल आणी अश्यांमुळेच मिपाच नाव खराब होत आहे.
जेव्हा बघावे तेव्हा नवा डु आयडी घेवुन इथ्थेच्च. ह्या माणसाला त्रास देवु त्या बाइला त्रास देवु.
पण हा डु आयडी काढायला काय करावं लागतं ?म्हणजे समजा अस बघा मी दोन तीन इमेल आयडी काढले आणी ते वापरुन इथे लॉगीन केले पण दरवेळेस मी माझा कॉम्पुटरतर नाही ना बदलु शकत.मग असे लोक पकडले कसे जात नाहीत ?आणी ज्या लोकांना हे माहित पडते की हा डु आयडी आहे तर मग ते बोंब ठोकत नाहीत.(हे लाक्षणिक अर्थाने बर कां !)अस न करण्या त मिपावरील लोकांचा काय फायदा आहे ?
तर हे माहित करण्यासाठी मी हा काथ्याकुट टाकत आहे, जसं जमेल तशी उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा.
6 Apr 2014 - 10:55 pm | बॅटमॅन
हम्म. :) ओके.
6 Apr 2014 - 9:38 pm | आनंदी गोपाळ
अहिरानीमाच शे.
6 Apr 2014 - 10:54 pm | बॅटमॅन
धन्यवाद भौ.
मले अहिरानी म्हंजे मराठी विश्वकोशमा दिलेला लहानसा प्यारेग्राफच आठवतो शे.
"यक व्हता सल्डया. तो फिरे वडांगे वडांगे. त्याच्या शेपले मुडना काटा. नाइभौ, नाइभौ, काड तं खरी काटा, म्हने. नाइ म्हने, याना काटा काडु दे." इ.इ.इ. पूर्ण आठवत नै, पण लै मजा आली होती हे वाचून. :)
5 Apr 2014 - 6:39 pm | जेनी...
वा वा इरसाल काका ...
पण मला तर कायम तुम्हिपण डुयाडीच वाटत आलेले आहात
5 Apr 2014 - 6:43 pm | बॅटमॅन
जेनीकाकूंबद्दलही हेच मत कैकांचे आहे असे ऐकून आहे.
5 Apr 2014 - 6:51 pm | जेनी...
असेनाका ... आपलं काय जातय !
लोकांची काय ...काय काय मतं असतात , एवढा विचार कराय्ला कस्काय वेळ मिळतो बॉ कोण जाणे !!!
5 Apr 2014 - 10:55 pm | बॅटमॅन
http://www.misalpav.com/comment/569495#comment-569495
हे पाहता तुमच्याशी सहमत होण्यावाचून पर्यायच दिसत नाही.
6 Apr 2014 - 9:56 pm | इरसाल
वा वा इरसाल काका ...
आता कोणाचा हे पण सांगुन टाका.
5 Apr 2014 - 8:54 pm | भाते
आंचीला तुम्ही डु आयडी आहात असे खडसावल्यावर त्यानेच उलट माझ्या नावाने बोंब मारली होती. आंचीच्या __चा घो.
5 Apr 2014 - 10:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आंची कोण ?
5 Apr 2014 - 9:31 pm | अत्रुप्त आत्मा
DO आयडी !
6 Apr 2014 - 12:50 am | एकुलता एक डॉन
नशिब माझे तरि नाव खरे आहे
6 Apr 2014 - 7:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपाला जी-मेल सारखं "पिन अॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. (सगळ्यांना थोडा त्रास होईल मान्य पण मिपाच्या प्रेमासाठी तेवढं नक्कीच सहन करता येइल). जेणे करुन काय होईल की मिपा वर खातं नोंदविताना एक क्रमांक दुसर्यांदा संपादकांच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही. नुसतं मिपावर डु-आयडी काढायचा म्हणुन जास्तीचे नंबर घेणारे लोकं नक्कीच कमी असतील. (जे तेवढ्यासाठी नवा नंबर घेतील त्यांच्या चिकाटीच कौतुक आणि उद्देशाचा णिशेध) डु-आयडींचे प्रमाण नक्कीच कमी करता येईल. अर्थात त्याआधी खालच्या गोष्टींचा विचार करायला लागेल.
१. वन टाईम पिन अॅक्सेस मुळे मिपाच्या सर्व्हर वर किती अतिरिक्त ताण पडेल?
२. जो संदेश पाठवला जाईल त्यासाठी काही खर्च येईल का?
३. आय-पी आणि भ्रमणध्वनीच्या क्रमांकाची सांगड घालता येईल का? म्हणजे घरच्या किंवा ऑफिसच्या दुसर्या नंबरवरुन डु-आयडी मिळवता येणार नाही. (ऑफिसातुन एकाच आय.पी. वरुन २-४ मिपाकर वाचन किंवा लेखन करत असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल?)
४. पिन क्रमांक प्रवेश केल्यापासुन जास्तीत जास्त ३० सेकंदाच्या आत मिळेल का?
बाकी असं करता येईल का ह्याबद्द्ल आपले आयटी तज्ञ लोक्स सल्ला देतीलचं.
--
(हाऊ मेनी नंबर्स डज अ मॅन नीड?) जिओ मिपास्टॉय.
6 Apr 2014 - 8:07 am | एकुलता एक डॉन
शादी डोट कोम सारख आधार कार्ड उप्लोड केल्यावरच मान्यद्ता द्यावि
6 Apr 2014 - 8:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आधार कार्डाएवढी निराधार योजना आजपर्यंत पाहाण्यात आलेली नाही.
6 Apr 2014 - 8:32 am | पैसा
व्यक्तिशः मला (एक सदस्य म्हणून) असा एखादा फोन नंबर घेतला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे सर्व्हरवर ताण वगैरे काही येऊ नये कारण तो खाते उघडताना एकदाच वापरला जाईल. पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे. म्हणजे काही असे सदस्यही आहेत की ज्यांना आपली कोणतीही खाजगी माहिती इथे द्यायला नको आहे पण ते दंगेखोर नाहीत. गंभीर सदस्य आहेत.
6 Apr 2014 - 3:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> पण त्यामुळे सदस्यांच्या प्रायव्हसीचा भंग होतो असं काहीजणांचं म्हणणं आहे.
सध्या आपण मेल आयडी देतो. मेल आयडीचा वापर संकेतस्थळ वापरकर्त्याने केवळ खाते उघडण्यासाठी त्याचा वापर केलेला असतो. असेच भ्रमनध्वनीच्या बाबतीत आपण कितीतरी ठिकाणी फोन रजिष्टर केलेला असतो. कामाच्या ठिकाणी, ब्यांक, अमुक-धमुक, तिथे तुमची प्रायव्हसी भंग होत नाही ? सुरक्षित असेल तिथे आपण अशी रिस्क घेतोच की मग मराठी संकेतस्थळांनी असं केलं तर काय बिघडेल ? ज्याला खाज असेल तो लिहिल नै तर राहीलं ? अशी अनेक माणसं आहेत जी उत्तम लिहितात मराठी संकेतस्थळे वाचतात पण ती मराठी संकेतस्थळावर लिहित नाही म्हणून काय संकेतस्थळं बंद पडली नाहीत. काही कच्च-बच्च लेखन येतच असतं. आज लेखनाचा दर्जा खुप उच्च नसेल पण लेखन येतच आहे की नै... तेव्हा पै भविष्यात अनेक मराठी संकेतस्थळ असं करतील. किंवा सरकार असा काही कायदा करेल की लिहिणा-या सदस्याची माहिती आवश्यक आहे, संकेतस्थळ मालक-चालक यांची माहिती हवी आहे. एक दस्तऐवज तुम्हाला दरवर्षी सरकारला द्यावा लागेल तेव्हा हा पर्याय तुम्हाला वापरावाच लागणार आहे, आज आपल्याला हे पटत नसलं तरी भविष्यात होऊ शकते असे वाटते.... लावता का शर्यत पाच-पाचशे रुपयाची ? :)
-दिलीप बिरुटे
6 Apr 2014 - 3:54 pm | पैसा
पैज अजिबात लावणार नै! भविष्यात असं होणं अगदी सहज शक्य आहे. आपले सायबर क्राईमचे कायदे आणि पोलीस अजून प्राथमिक अवस्थेत आहेत. पण पुढे कधीतरी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाची जबाबदारी घ्यायला लागेल. कॉपीराईट पाहिजे तर जबाबदारीही घ्यायला पाहिजे.
तुमच्या बाकी बहुतेक मुद्द्यांशी सहमत आहेच.
6 Apr 2014 - 4:12 pm | बॅटमॅन
कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यांत काहीच फरक नाही काय? इथे लोक टाईमपास करायला येतात. फुकट बिग ब्रदरगिरी करण्याला तुमचे समर्थन असेल असे वाटले नव्हते.
6 Apr 2014 - 5:30 pm | कवितानागेश
एखाद्याचा करमणूकीसाठी केला गेलेला 'टाईमपास' इतर ५०(/५००/५०००...इ.) जणांसाठी कधीतरी त्रासदायकही होउ शकतो. त्यासाठी 'फुकट बिग ब्रदरगिरी' काहीवेळेस करावी लागते.
शिवाय कामाची ठिकाणे अन मराठी संकेतस्थळे यात फक्त 'फरक'च आहे का? 'साम्य' बिलकुल नाही का? 'सोशल एटिकेट्स' सगळीकडे सारखेच पाळायला हवेत, असं मला वाटतं.
6 Apr 2014 - 5:34 pm | आत्मशून्य
मग सगळीकडे फिरा. इथे याच अशी सक्ती आहे काय ? का जे सगळीकडे तुम्ही करता तेच इथेही करायला भेटले पाहिजे हा अट्टहास त्यामागे आहे ?
6 Apr 2014 - 5:43 pm | आत्मशून्य
वि़कृत स्त्रिमुक्तीच्या कल्पना तिच्या डोक्यात आहेत सोशली त्या ती नेटाने फॉलो करते तिने इथे तेच करावे काय ?
माझा एक मित्र आहे बायकोच्या ताटाखालचं मांजर. विवाहीत स्त्रियांचा जबर धसका त्याने घेतला आहे हे त्याचे सोशल एटीकेट्स पुन्हा पुन्हा हेच सिध्द करतात, त्याने इथेही तसेच वागावे काय ?
6 Apr 2014 - 5:41 pm | बॅटमॅन
बर्राच फरक आहे.
सोशल एटिकेट पाळायचे तर एकतर्फी नकोत-त्याचं एक किळसवाणं उदा. मिपावर अलीकडंच पाहिलंय, ते एक असोच.
बाकी साम्य काय आहे? इथे लोक कशाला येतात, काय करतात, याची मुख्य पर्पज काय, इ.इ. पाहिले तर सहज लक्षात यावे. कुणीतरी सटीसहामाशी केलेले ट्रोलिंग कंट्रोल करण्यासाठी अन्य वेळेस इतकी बंधने घालण्याचे समर्थन अतिशय हास्यास्पद आहे. बाकी काही नाही झालं तरी लोकांचा ओढाच कमी होईल.
तसंही एका संस्थळात दुसर्यापेक्षा लै युनिक काही नसतं. अनाहितासारख्या ग्रूपची गोष्ट वेगळी पडते. तिथे व्हेरिफिकेशन गरजेचे आहे हे एकवेळ मान्य करू शकतो - कारण पर्पज वेगळी आहे. अर्थात तिथेही मतभेद आहेत, पण अनाहितावर एक पुरुष मत व्यक्त करणारा कोण नै का? म्हणून गप्प बसतो झालं. पण तोच न्याय सर्वत्र लावणे हे बालिश आहे.
मॉनिटरिंगचा अतिरेक केला की लोकांचं ट्रॅफिक नि:संशय कमी होईल. मग बसा एटिकेट्स-एटिकेट खेळत. लोक आंजावर येतात ते प्रत्यक्ष आयुष्यापासून ब्रेक म्हणून. तिथेही असले नियम लावत बसला तर कोण येईल कशाला तुमच्याकडे? (किंवा अजून कुणीकडे) ही साधी गोष्ट लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. मिपावर असलं काही सुरू झालं तर मी तरी इथे थांबणार नाही. मी किंवा अजून कोणी गेल्याने मिपाला शष्प फरक तसाही पडणार नाही, पण मत व्यक्त केलं इतकंच. आता मत व्यक्त करणारा मी कोण टिकोजीराव? तर ज्या अॅथॉरिटीने राजकारण ते बालसंगोपनादि विषयांवर लोक बोलतात त्याच अॅथॉरिटीने मी बोलतोय. असो.
6 Apr 2014 - 5:56 pm | आत्मशून्य
मला ह्या विभागाची संकल्पना अतिशय आवडली. त्या विभागाबाबत/ अनेक सदस्यांबाबत मला अतिशय आदर व ममत्वही आहे, व उत्तरोत्तर वाढतच जाइल. पण नुकतेच या विभागाच्या नावाचा अतिशय घाणेरडा अब्युज केला गेला.(कोणीत्याही त्रयस्थ व्यक्तीने ज्याचा मिपासोबत चुकुनही व दुरान्वयेही संबंध नाही त्याने ते अद्रुश्य केलेले संभाषण जरुर वाचावे आणी त्याचे मत घ्यावे) आणी हे सुधा त्यांच्या व्हेरीफाइड सदस्यांकडुन घडले. म्हणजे व्हेरीफिकेशन ही मुळात कसलीच एटीकेट्सची गॅरंटी देत नाही, उलट हुच्चभ्रुपणाचा पांघरलेल्या बुरख्या खाली जोपसलेल्या उबदार चाळीतल्या नळावरच्या भांडणाच्या एटीकेट्स मात्र सुरेख उघड्या पडल्या. आता बोला.
खरे तर कारभाराची पारदर्शकता पुरेशी असते जसे
१) कोणता प्रतिसाद का संपादीत/ अद्रुष्य केला गेला याची कारणमिमांसा. (ति चुकली असल्यास चुक दामटायचा हेकेखोरपणा टाळुन, खुल्या मनाने चुक सुधरायची इच्छा शक्ती).
२) मिपा खुल्या विभागाच्या सदस्यांना ते स्त्रीलिंगी आहेत की पुल्लींगी हे नमुद करणे सपशेल रद्द( अनाहीतासाठी स्वतंत्र आयडीची व्यवस्था).
३) आपण संस्थळावर आहोत पिताश्रींच्या प्रॉपर्टीवर न्हवे याचे सदस्यांनी राखावयाचे भान.
४) वादविवाद असेल तर दंगा होणार हे मान्य करावे. अगदी संसदही त्यास अपवाद नसते. (आशा आहे संसद हे इथे सोशल ठिकाणच गणले जातेय)
6 Apr 2014 - 10:56 pm | बॅटमॅन
तो तर नेहमीच सुरू असतो. पण त्याबद्दल काही बोलणे म्ह. पाप आहे.
बाकी सहमत आहेच!
7 Apr 2014 - 8:12 am | आनंदी गोपाळ
नेमक्या शब्दांत "मनोगत" लिहिले आहे.
6 Apr 2014 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>मिपाला जी-मेल सारखं "पिन अॅक्सेस" देता येणार नाही का? मि.पा. ला लॉगिन केलं की की नोंदविलेल्या भ्रमणध्वनीवर ४ ते ८ आकडी पिन क्रमांक जाईल. तो पिन इथे परवलीच्या पर्यायासारखा वापरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
मिपाचं भविष्यातली वाटचाल माहिती नाही पण मराठी संकेतस्थळावर लिहिणा-या-वाचणा-यांचा वावर जेव्हा खुप वाढेल आणि जी काही मोजकी मराठी संकेतस्थळं असतील की जिथे लिहिण्या-वाचण्याचं वेड लागेल अशा ठिकाणी तुम्हाला 'व्यवस्थित' वावरायचं आहे तिथे भ्रमनध्वनी व्हेरीफिकेशनचा पर्याय उत्तम ठरणारच आहे.
आज इनमिन साडेतीन मराठी संकेतस्थळावर तीच माणसं इकडे आणि तीच माणसं तिकडे. आपण खूप हुशार आहोत असे समजणारे शे-पाचशे लोक एकाच ठिकाणी रमू शकत नाही. संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणून लिहितो की जसे मिपावर काही कोणाशी पटलं नाही की, ती 'हुशार माणसं' कशाला लिहायचं मिपावर. फेसबूकवर लिहू. फेसबूकवर लिहून लाईक्स कमी पडायला लागले की मग ब्लॉगवर लिहायचं. तिकडे झाले की पुन्हा मनोगतावर सॉरी नमोगतावर लिहायचं. तिथे नै पटलं की पुन्हा मिपावर डु आयडीने लिहायला यायचं किंवा असलेल्या आयडीने नुसती मस्ती करायला यायचं. सतत उंटासारखे तिरपे तिरपे लिहायचं. काढलं की पुन्हा बोंबलत बसायचं असं होत असतं. मुळात लिहिण्याचा-वाचण्याचा आनंद सोडून व्यक्तीचे स्वतःचे अहंकार बोचायला लागले की अनेक प्रॉब्लेम्स होतात.
जालावर मराठी संकेतस्थळाच्या बाबतीत असा व्हेरीफिकेशनचा प्रयोग वेगळ्या पद्धतीने राबवलेला अनाहिताच्या निमित्ताने दिसला यश अपयश येता काळ ठरवेल पण मला व्यक्तिगत ती एक मराठी संकेतस्थळासाठी एक उत्तम सुरुवात वाटली. भविष्यात अजून काय दडलेले असेल आज तरी मला माहिती नाही.
-दिलीप बिरुटे
6 Apr 2014 - 3:27 pm | धन्या
यू सेड ईट सर :)
6 Apr 2014 - 4:02 pm | पैसा
याच्याशीही भयानक सहमत आहे. एखाद्याने मेहनत घेऊन कितीही चांगलं लिहिलेलं असो, तो आमच्या कंपूत नाही ना, मग पाडा त्याचं लिखाण, प्रतिक्रिया देऊ नका असा विचार करणारी खेकड्याची मनोवृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हे असंच चालायचं. संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल. मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्याला त्रास देणारी असू नये.
काही जण तर फक्त एखाद्याला टार्गेट करायला डु. आयडी घेऊन येतात अशीही उदाहरणं पाहिली आहेत. ही विकृती झाली. या नगांना आपली ओळख लपवायची असते कारण आपण करतोय ते बरोबर नाही हे कुठेतरी कळत असतंच ना! मग घ्या डु. आयडी!
6 Apr 2014 - 7:02 pm | सुहास..
संख्या, लिहिणा-याची क्वॉलिटी जेव्हा प्रचंड वाढेल तेव्हा असे काही प्रयोग मराठी संकेतस्थळावर नक्कीच होतील असे वाटते. >>>
लय आशावादी व्बा तुम्ही ;)
फरक व्हेरियेशन चा आहे च ...पण मग म्हणुनच हल्ली प्रत्येकाला इतिहासरंजणाचा वा स्मरणरंजणाचा संसर्ग होत असावा :)
6 Apr 2014 - 8:40 pm | प्रकाश घाटपांडे
+१
6 Apr 2014 - 8:32 am | श्री गावसेना प्रमुख
इरसाल भाउ तुम्ही कोना डुप्लिकेट आय डी सेतस,
6 Apr 2014 - 9:58 pm | इरसाल
आत्ते काय करो ?
6 Apr 2014 - 9:14 am | विवेकपटाईत
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही. (पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य) आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात. (कुणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नाही आहे. फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही)
२. दुसरे हेतू - वर उल्लेख झालेलाच आहे.
7 Apr 2014 - 3:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरं म्हणाल तर मला मुखवटे घातलेले माणसे आवडत नाही... ...आपल्या लिखाणामुळे आपले नुकसान होऊ शकते असे त्यांना सतत वाटत असते. या अनामिक भीतीने ग्रसित लोक आपली ओळख लपविण्यासाठी मुखवटा चेहऱ्यावर चढवितात.
असा विचारच कधी केला नव्हता ! *unknw* आता ते खरं आहे का ते अंतर्मनात खोल्खोल / खोल्वर (यापैकी एका किंवा दोन्ही पद्धतीने) डोकावून पाहिले पाहिजे. ;) :)(...फक्त पण मला असे वाटते, सत्य असणे आवश्यक नाही)
हे पटलं. हे खरं असण्याची जास्त शक्यता वाटते. :)...(पण अधिकांश मुखवटे चढविलेले लेखक मिसळपाव वर चांगले लिहितात हे ही सत्य)
यात माझापण नंबर असावा अशी कल्पना करून उगाचच गार्गार वाटवून घेतलं... ही ही ही... ;)आता माझं म्हणणं किंवा शंका (ज्याला जे वाटेल ते, आम्ही लान्हपनापासून लोक्शाहीवादी हौत हो !)...
"जालावरच्या सर्वच आयड्या ह्या, अनलेस प्रूव्ह्ड अदरवाईज, डू आयड्या असतात." असा आमचा सिद्धांत आहे.
कारण
१. "इस्पीकचा एक्का" हा मुखवटा कारण ते शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीचे नाव म्हणून वापरण्याची सामान्यपणे प्रथा नाही. ठीक आहे.
२. पण जर मी "अरविंद देशमाने" या (खर्या वाटणार्या पण कल्पीत नावाने) नावाने लिहायला सुरुवात केली तर ते माझेच खरे नाव आहे हे सिद्ध होते का ??? नाही !
३. आयडी हे खरं नाव आहे हे सिद्ध करायला प्रत्येक सभासदाला "फोटो आयडीचा" दाखला देवून मगच नाव नोंदवावे लागेल. हे होत नाही तोपर्यंत, सर्व आयडीज व्हर्चुअलच असणार. मग ते त्या आयडीच्या धारकाचे खरे नाव असो वा नसो.
एवढेच नाही तर...
{लै खत्री 'बाल की खाल' मोड} अगदी कट्ट्याला प्रत्यक्ष भेट झालेल्या सभासदांचे सो कॉल्ड खरे नावही आपण फोटो आयडीचा पुरावा मागून खात्री करून घेत नाही. त्यामुळे तेथे ऐकलेले माझे वरचे "अरविंद देशमाने" हे नावही खोटे असू शकते, नाही का? खी...खी...खी... ;) {/लै खत्री 'बाल की खाल' मोड}
एकंदरीत,
"ब्रम्ह सत्यं, (जाल)जगत् मिथ्या" असे आपले पूर्वसूरी सांगून गेले ते काय उगाचच ! ;)
आता आमचे ब्रम्हज्ञान (बरेच लोक मिपावर डोस देत असतात, आम्हीच काय घोडं मारलय? हमाराभी हक बनता हय भाया)...
आयडीचा (लेखनाचा गुण)धर्म* पहा, शेवटी नावात काय आहे???
* धर्म : एखाद्या जीवाची/वस्तूची वागण्याची पद्धती (यात लेखनही आलेच). याला मराठीत कॅरॅक्टरिस्टिक्स असे म्हटले जाते.
*** विवेकपटाईत साहेब (आता आम्हाला तुमची आय्डीच म्हाय्ती हाय म्हणून आय्डी कडेच गार्हाणं कर्तोय) ह घ्या.
हा तुमच्या प्रतिसादावर कमी आणि जालावरच्या सर्वसाधारण समजूतींवर जास्त असा प्रतिप्रतिसाद आहे.
विनोदी अंगानं लिहायचा क्शीण प्रयत्न असला तरी लॉजीकमध्ये कमी राहू नये याची खबरदारी घेतली आहे.***
6 Apr 2014 - 11:32 am | प्रकाश घाटपांडे
आता जे डुआयडी आहेत त्यांना तसे का करावेसे वाटते? हे जाणुन घ्यायला आवडेल.मला तर हा प्रकार स्किझोफ्रेनिक वाटतो.डुआयडी घेउन त्रास देणे ही मानसिक विकृती आहे का? मला त्या मृगरुप घेउन कामेच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करणार्या किंदम ऋषी त्यांची आठवण येते. ऋषी या प्रतिमेमुळे त्यांना त्यांच्या नैसर्गिक उर्मी व्यक्त करता येत नसाव्यात म्हणुन त्यांना असे मृगरुप घ्यावे लागले.काही डूआयडींचे बाबतीत तसेच काहीसे असावे.
7 Apr 2014 - 7:14 pm | आनंदी गोपाळ
घाटपांडेजी,
तुम्हाला कुणी मृगनयनी भेटली नसावी अजून. त्यामुळे मृगरूप घेण्याची इच्छा झाली नसावी ;)
6 Apr 2014 - 12:23 pm | मनीषा
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे.
6 Apr 2014 - 7:04 pm | सुहास..
आपले रसातळाला गेलेले धागे वर काढण्यासाठी काही डु आय डी घेतले जातात असे नम्रपणे निदर्शनास आणू इच्छिते. म्हणजे "आपुलाचि संवादु आपणासी .." असे काहीसे. >>
+१००००
काही लोक्स हे करतात आणि काही स्वताच्या कंपुतलेच वापरतात .........
6 Apr 2014 - 2:04 pm | बॅटमॅन
फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. अँटी डुआयडी लोकांचे डेस्परेशन पाहून मजा वाटते खरीच. एखादा डु आयडी ट्रोलिंग करत असेल तर सरळ उडवण्याचा पर्याय आहेच की. पण नियमात बसण्याइतपत ट्रोलिंग असेल तर इतका कपाळशूळ का उठावा कै कळ्ळं नाही. अंमळ बालिश प्रकार आहे हा सगळा.
6 Apr 2014 - 4:52 pm | स्वप्नांची राणी
>>>> फोन नं. इ घेणे कैच्याकै आहे. एका साध्या फोरमवर लिहिण्यासाठी इतकी मगजमारी करावी लागत असेल तर कोण कशाला येईल तिथे? जिथे व्हेरिफिकेशन इ. सक्तीचे / गरजेचे आहे ते सोडा पण अन्यत्र इतकी कै वेळ आलेली नाही. >>> पुर्ण सहमत..!!
>>> अगदी सहमत. शिवाय एखाद्या शब्दाचा भलता अर्थ स्वतःवरच ओढवून घेऊन कंपूने तुटून पडणारे अन वर स्वतःच्या नैतिकतेची/बुद्धीची टिमकी वाजवणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही... >>>> असहमत..!!
आपण चुकिचं बोललो/वागलो आहोत हे पुर्णपणे जाणून सुद्धा, कोणी त्याला काउंटर केलं आणि प्रकरण अंगावर शेकल कि 'कंपुबाजी/ स्त्रिवाद / डूआयडी ' ई.ई. केविलवाणे कोकलत, स्वतः च स्वतः चे हास्यास्पद समर्थन करणारे लोकही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
तसेच वरिल नमुन्यांना अविचाराने समर्थन देणारे आणि 'आमची ती बुद्धीमता/ लॉजिक/ नैतिकता आणि तुमचा तो कंपु' अशी संभावित भुमिका घेणारेही जोवर आहेत तोवर संस्थळांवर योग्य वातावरण राहणार नाही.
अर्थात योग्य वातावरण हा परत सापेक्ष शब्द आहे. प्रत्येक जिवाचे योग्य वातावरणाचे निकष वेगळे असतात. त्यामुळे फोन नंबर घेणे, आधारकार्ड घेणे, ओटिपी ई.ई. त्यावरचे उपाय नाहियेत. वातावरण कसेही असले तरी योग्य वेळी थोडिफार झाडझूड करुन बहुतेक वेळा काम भागतेच. नाही भागले की व्हॅक्युम क्लिनर असतोच राखिव.!!
6 Apr 2014 - 4:58 pm | धर्मराजमुटके
डुआयडी वगैरे काय नसतयं. हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत. जैसा मनी भाव तैसा दिसे देव !
हा मातरं येका माणसाचे येकापेक्षा ज्यादा आयडी असू शकतात. त्याला डुआयडी का बरं म्हणता ?
6 Apr 2014 - 5:33 pm | मनीषा
बरोबर पण सर्वांचं मन इतकं निर्मळ नस्तं ना
6 Apr 2014 - 5:21 pm | बॅटमॅन
पर्सनल उल्लेख केलेला नसतानाही एखाद्याची आई काढणारे सदस्य पाहिले आहेत. एरवी मारे संभावित असल्याच्या थाटात जगाला उपदेश करत फिरतात - पण पातळी सोडून बोलूनही वर स्वतः ढोंगीपणे उच्च नैतिक भूमिका घेणारे सदस्य. यांना तर काहीच बोलायचा हक्क नाही. यांचे खरे रंग स्वतःच दाखवून दिल्याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानले पाहिजेत. असो.
(स्वप्नांची राणी यांना हा प्रतिसाद वैयक्तिकरीत्या उद्देशून नाही. ज्याला आहे त्याला कळालं तर ठीक- यद्यपि अपेक्षा नाहीच. रडीचा डाव खेळणारी पोरं माझी स्टंप आहे म्हणून मला दोनदा खेळू द्या नैतर मी स्टंपा घेऊन जातो इ.इ. थयथयाट करतात त्याप्रमाणेच एखादी गोष्ट नै पटली की झाडू घेणार्यांची वागणूक आहे. अन याबद्दल मी ठाम आहे. खरं बोलण्याबद्दल कुणाच्या नाकदुर्या काढायची गरज नाही- वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच.)
6 Apr 2014 - 5:50 pm | स्वप्नांची राणी
>>>> वाटल्यास प्रतिसाद उडवण्यास अथवा संपादित करण्यास लोक समर्थ आहेतच >>>>
ईतक मिपाफोबिक व्हायची काय गरज आहे म्हणते मी..? झालं यार, होउन गेलं... होता है!! मूव ऑन... मिपा मस्ट गो ऑन!!
6 Apr 2014 - 5:56 pm | बॅटमॅन
मिपाफोबिक नै ओ. मिपा विल गो ऑन नो म्याटर व्हॉट. असो.
6 Apr 2014 - 6:06 pm | आत्मशून्य
अन बॅट्म्यान ? डबल ब्यारलचा ठोठो....! फोबिदायक बॉडीलँग्वेज प्रत्यक्ष कोणाची झालीय हे पण दुर्लक्षीत झालेले दिसतयं.
7 Apr 2014 - 5:51 am | स्पंदना
उत्तर द्यावं लागतय म्हणुन देते आहे.
आई काढणे वेगळे अन आई सुद्धा एक स्त्री आहे हे जाणवुन देणे वेगळे.
कोणाचीही तुलना कुत्र्याशी करणे वेगळे, अन जाणिवपुर्वक लिहुन घरात दारात अन समाजात दोन्ही प्रकारच्या व्यक्ती असतात हे सांगणे वेगळे.
नुसता वितंडवाद घालणार्या लोकांना मग ती स्त्री असो वा पुरुष कोणताच पायबंद नसतो, कारण तोंड उघडल की आपलीच जीत झाली पाहिजे असा एक समज त्यांच्या मनात भरौन गेलेला असतो. माझी मुलगी, माझा मुलगा, माझे आई वडिल हे सार्यांना असतात. त्यांच्याकडे जस आपण एक स्त्री वा पुरुष म्हणुन न पाहता एक नातेवाईक म्हणुन पाहतो तसच बाहेरच्या जगात वावरताना एक स्त्री वं पुरुष म्हणुन न पाहतां एक पुर्ण व्यक्ती म्हणुन पहायला शिकाल तो सुदिन!!
आणि हो उगा फालतु शब्दाला शब्द वाढवायची तसदी घेउ नये. काही विचार करुन बोलावस वाटल तर बोलावे. नुसता समोरच्याचा अपमान करुन स्वतःची मान उंचावते हा गैरसमज हटेल तर बरं.
इति लेखन सीमा.
7 Apr 2014 - 11:44 am | पिशी अबोली
प्रचंड सहमत.
7 Apr 2014 - 12:46 pm | बॅटमॅन
हेच स्वतः पाळलं असतं तर काय पाहिजे होतं? पण नियम एका साईडनेच पाळायचे असतात ना, त्याला इलाज नाही. चालूद्या!
7 Apr 2014 - 1:23 pm | सुनील
... आणि त्या उंचावलेल्या मानेची उंची ही अपमान केला गेलेल्या वाक्यातील शब्दांच्या व्यस्त प्रमाणात असते, हादेखिल गैरसमज हटेल तर बरं!! ;)
6 Apr 2014 - 5:28 pm | मनीषा
संस्थळावर आपला अहं कुरवाळण्यासाठी येणारे किती आणि खरोखर विरंगुळा म्हणून, काही चांगलं वाचायला/लिहायला, अगदी निव्वळ मजा करायला येणारे किती याच शोधच घ्यावा लागेल.
हा शोध लागणे अवघड नाही थोडेफार लेखन आणि प्रतिसाद वाचले कि बर्यापैकी कळते .
मजा करायलाही हरकत नाही पण ती दुसर्याला त्रास देणारी असू नये.
प्रचंड सहमत
6 Apr 2014 - 7:17 pm | सुहास..
चला आता मॅच सुरू झाली ...
इर्या तुला लैच प्रश्न पडायला लागलेत हल्ली , ...असो एक अनुभव सांगतो ...मिपावर पाच वर्षे झालीत आता ...
एक असाच आयडी आला होता तात्याच्या काळात, लय चालल होते, रामायण महाभारत, उठ-सुट तेच सकाळी दुपारी तेच ...तेव्हा खरं नाव घेवुन आला होता ....मी एका वेगळ्या कंपुत होतो तेव्हा, त्यातले बरेच जण मिपावर नाहीत आता ...असा झोडला होता त्याला की त्याने आयडी बंद केला ..मग तात्याला मेल पाठवुन घेतला दुसरा आयडी ... बरेच दिवस गप्प पडुन होता ..मग हळुहळू जसा कंपु पांगत गेला..तसतसा तो लिहायला लागला ...सध्या संपादकाच्या गुडबुकात असुन सगळीकडे वावरतो ....आता बोल ....सुधारित डु आयडी की सर्वसामान्य आयडी ...........
दुसर उदाहरण आहे एका माजोरी आयडी च ....हे जेव्हा आलंत तेव्हा पार ईग्रंजीमध्ये च मराठी टायपाला सुरुवात केली , कविता तर त्याच्या कवितापेक्षा ऑर्कुट च्या जरा बर्या वाटतील अश्या ...तेव्हा त्यान ते ईग्रंजीमधलं मराठीत टाईपकरून देण्यापर्यंत मदत केली मी, आज जिथे तिथे दात दाखवत असतो आणि तोंड तर अस करतो कट्ट्याला की तो लिहुन मिपावरच काय अख्ख्या मराठी आंजावर उपकारच करतो आहे ...
अशी उदाहरणे बरीच आहे , पण तु कसा यात पडला आज ...
आपल्याकडं काय म्हणतात माहीत आहे ना ! ज्यांच्यामुळे अडत नाही त्याच्या फंदात पडत नाही ;)
6 Apr 2014 - 10:06 pm | इरसाल
सुहासभौ,
सध्या काही धाग्यावर काही प्रतिसादामधे कोणी कोणी डु आयडीचे सरळ सरळ वाभाडे काढलेले दिसले तसेच काही खोडसाळ धागे काढणारे अचानक मिपा सोडुन गायबलेत आणी नवे अवतरलेत. बर्याच दिवसापासुन मला विचारायचे होते काही लोक हे कस शोधतात की अमुक अमुक डुआयडी आहे.
म्हटले गरमागरमीचा माहोल आहे घ्या काथ्या कुटुन.
बरेच दिवस पडावसं वाटल नाही पण उगाच कुठले संदर्भ कुठे लावले जातात म्हणुन रहावले गेले नाही. असो.
तुम्हनाकडे गैर्हा किस्सा व्हतीन तेन्हामासला दोन तर वरथे मालुंग पडी ग्यात. कोन त्या कोन त्या सोंगे ? वरला उदाहरण मासला ?
6 Apr 2014 - 8:11 pm | चिन्मय खंडागळे
चालायचेच. अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?
6 Apr 2014 - 8:20 pm | प्यारे१
यदा यदा हि... च्या चालीवर बॅटमॅन किंवा इतर कुणी दोन श्लोक लिहू शकेल. ल्ह्या रे कुणीतरी!
6 Apr 2014 - 8:34 pm | शुचि
ठ्ठो!!! =))
6 Apr 2014 - 8:51 pm | डॉ सुहास म्हात्रे
अहो साक्षात परमेश्वरासही नऊ डुप्लिकेट आयडी काढून पृथ्वीवर उतरावे लागले आणि तो आता दहावी आयडी काढण्याच्या तयारीत आहे, तेथे आपल्यासारख्या पामरांची काय कथा?
लै भारी... आवडलं.
पण दहाव्या डुप्लिकेट आयडीचं नाव अगोदरच डिक्लेअर करून सगळा सस्पेन्स फुस्स करून टाकला राव ;) :)
6 Apr 2014 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले Good one....!!!! :)
-दिलीप बिरुटे
6 Apr 2014 - 9:32 pm | तुमचा अभिषेक
एकच नंबर डायलॉग !
6 Apr 2014 - 10:57 pm | बॅटमॅन
अगागागागागागागा =)) =)) =))
धन्य =)) _/\_
7 Apr 2014 - 12:09 am | सुहास..
बॅड जोक !!
( हे म्हणजे 'डिफाईन फाईन' सारखे झाले, आणि त्यावर त्याला गुड वन ई. म्हणणारे संपादक आहेत याची नोंद घेतली, उगा ड्यु आयडी गोंधळ घालतात म्हणायचे आणि स्वतः मात्र , जिथे जरा गोंधळ दिसला तिथे हॅ हॅ हॅ करायला मोकळे, माझे स्पष्ट मत असे आहे की किमान तुम्हाला कारवाई/कंट्रोल करता येत नसेल तर टाळ्या तरी वाजवु नयेत आणि ते ही नसेल येत तर सर्वसामान्य सदस्य असल्याची टिमकी वाजवु नये )
7 Apr 2014 - 12:25 pm | पैसा
ते आयडी विधायक कार्यासाठी काढलेले होते. विध्वंसक नव्हे!
6 Apr 2014 - 11:05 pm | यशोधरा
इरसालभौ, मला अहिराणी वाचायला मजा येते आहे. सगळीच नाही समजत पण ऐकायला गोड वाटेल बहुतेक.
मिपावर अहिराणी शिकवायचा धागा काढा बघू आणि शिकवा :)
7 Apr 2014 - 11:20 am | इरसाल
मागे एक अहिराणीवर धागा काढला होता.पण तो मीमराठीवर होता की मिपावर हे आटवत नाय पघा !
दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो.
7 Apr 2014 - 1:43 pm | सूड
>>दुसरा धागा काढण्याचा प्रयत्न करतो.
काढा काढा. कोकणीच्या लेखांसाठी आम्ही आग्रह करुन करुन गप्प बसलो. तुम्ही निदान अहिराणीवरचे तरी लेख टाका.
7 Apr 2014 - 1:01 pm | पिशी अबोली
+१
खरंच गोड वाटतेय.
7 Apr 2014 - 4:43 am | दिनेश सायगल
नुकतेच एका धाग्यावर अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद देणारे आणि दुसऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणारे एक सदस्य येथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळे काढताना बघून गंमत वाटली.
7 Apr 2014 - 11:40 am | प्रसाद गोडबोले
हेच म्हणायला आलो होतो ...
7 Apr 2014 - 11:49 am | सुहास..
हायकोर्टाची भाषा करणारे सभ्य आणि बाकी सगळे असभ्य ?? आणि भाषा सभ्य असली तरी अंतरंग मात्र नादावलेला !! ....तसे असते तर झाडामागं गुलुगुलु बोलणारं जोडप सर्वात सभ्य म्हणावे लागेल.. ....
फालतुच्या संकल्पनांना जबरदस्तीने संस्थळावर थोपणवार्याना तिच भाषा समजते अस अनुभव आहे ..... आणि दरवेळी असे करणार्यांची मस्ती उतरविण्यात येईल याची नोंद घ्यावी
..
भाषेबाबत कुणाच्या बापाला भीक न घालणारा
7 Apr 2014 - 1:58 pm | प्रसाद गोडबोले
भगवान श्री गौतम बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गात सर्वप्रथम येते ती "अहिंसा" !
वरील प्रतिसादात आपण केलेली वाचिक हिंसा आणि कायिक हिंसा करण्याची दिलेली धमकी पाहुन आपल्या आध्यात्मिक अधःपतना बद्दल खेद वाटला !
भगवान बुध्द आपल्याला सत्यधर्माचा मार्ग दाखवोत ही ईश्वरचरणी प्रार्थना :)
7 Apr 2014 - 6:45 pm | सुहास..
बाळ प्रसाद, कुठे अष्टांग मार्ग आणि कुठे अहिंसा .?? .गल्लत झाली की काय ." अहिंसो परमोधर्म " हे जैन धर्मात ....
१.सम्यक दृष्टी :
आर्य अष्टांगिक मार्गात सम्यक दृष्टीचे स्थान सर्वप्रथम आहे. तसे तिचे महत्त्व प्रथम क्रमांकाचे आहे. सम्यक दृष्टीचा लाभ झाल्याशिवाय कोणालाही बुद्धाप्रणित धम्ममार्ग समजायचा नाही. किंबहुना गृहस्थी जीवनातील दुःखाचे अस्तित्व आणि ते निवारण करणारा आर्य अष्टांगिक मार्ग यांना परम सत्य मानुन त्यावर श्रद्धा ठेवणे यालाच सम्यक दृष्टी म्हणतात. सम्यक दृष्टी म्हणजे या विश्वातील अनंत प्रश्नांकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन. वैचारिक अधिष्ठान, अविद्येचा नाश करणे, व्रत वैफल्य यातील फोलपणा समजणे. ईश्वर व आत्मा न मानणे, कोणत्याही चमत्कारांवर विश्वास न ठेवणे, ग्रंथ प्रामाण्य न मानता व्यक्तीचे मन व विचार याचे स्वातंत्र्य राखणे इत्यादी सम्यकदृष्टीची उदाहरणे सांगता येतील...
सम्यक दृष्टीचे महत्व सांगताना भगवान बुद्ध म्हणतात कि, हे विश्व एक अंधारकोठडी आहे व मनुष्य हा तिच्यातील कैदी आहे, ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे, अंधार इतका आहे जी, कैद्याला क्वचीतच काही दिसु शकते. कैद्याला आपण कैदी आहे हेही कळत नाही.
खुप काळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तु अस्तित्वात असु शकते याबद्दल शंका वाटते.
मन हे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळु शकतो, तथापि या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही कि, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. परंतु मानवात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतु निर्माण होतात तेव्हा इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही मनुष्याला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल व शेवटी तो बंधमुक्त होईल.
मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्वाला बंधमुक्त करु शकते. सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय.
सम्यक दृष्टीचा उद्देश काय आहे..?
अविद्या व मिथ्या दृष्टीचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे.
मनुष्याने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्रांच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकुन देणे.
अद्भुत कल्पनांचा त्याग करणे, निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये.
ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत ते सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी ताज्य आहेत.
स्वतंत्र मन व स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत.
२.सम्यक संकल्प :
कोणतीही कृती करण्यापुर्वी आपले मन स्वच्छ व स्पष्ट असावे, ते शुद्ध असावे, ते वाईट विचारांपासुन मुक्त असावे. प्रश्नांची, समस्यांची उकल करताना मन मुक्त असावे. उच्चस्तरांवरुन विचार केल्यास आपले मन संवेदनापासुन, विकृत इच्छा, क्रोध, द्वेष, संशय, चिंता आळस या सर्वांपासुन मुक्त असावे. हे केवळ ध्यान व एकाग्रचित्तने साध्य होईल. त्याचबरोबर आपण मानसिक, प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या बाबीवर मात कर शकतो. प्रत्येक माणवाला काही ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येये, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी, हा सम्यक संकल्पाचा आशय आहे.
व्यक्तीने आपली इच्छा, महत्वकांक्षा व ध्येय नेहमी उदात्त आणि चांगले ठेवावे. ज्यामुळे आपले तसेच इतरांचेच कल्याण होईल. तसेच शुद्ध ध्येय असावे. आपली महत्वकांक्षा कोणाच्याही अहितावर आधारित नसावी. शिवाय आपली शक्ती आणि योग्यता आजमावुनच महत्वकांक्षा बाळगावी यालाच सम्यक संकल्प असे म्हणतात. सम्यक संकल्पामुळे कर्त्याच्या पदरी निराशा येत नाही. त्याची जाणीव झाल्यावर कर्त्याला समाधान वाटते. त्यामुळे कर्त्याचे आणि मानवी समाजाचे कल्याण होते. स्वार्थी किंवा दुष्ट संकल्पामुळे शत्रुत्व वाढते. मुर्ख संकल्पामुळे अपयश येऊन जगात हास्य किंवा फजिती होते, जगातील कितीतरी व्यक्तींना स्वःताच्या किंवा इतरांच्या क्रुर महत्वकांक्षेला बळी पडल्यामुळे दुःखाच्या यातना भोगाव्या लागतात.
३.सम्यक वाचा :
सत्य व सभ्यतेने बोलणे, कोणाची निंदा न करणे तसेच कोणाच्या ह्रदयाला इजा होईल असे कठोर न बोलणे म्हणजेच सम्यक वाचा होय. मानवास लाभलेली वाचा ही एक परिमाणकारक शक्ती आहे. तिचा योग्य तोच उपयोग केला पाहिजे. मधुर व शांत वाणीने शत्रुचे मित्र होता. उलट गर्विष्ट उपर्दकारक, वात्रट, ढोंगी आणि इतरांच्या भावना पायदळी तुडविणाऱ्या वाणीने मित्रही शत्रु होतात. (तुमच्या सारखे सुधरत नाहीत प्रेमाने बोलुन)म्हणुन प्रत्येक व्यक्तीने वाणीचे शील पाळले पाहिजे. प्रत्येक व्यक्ती आपली मर्यादा व अधिकार ओळखुनच बोलावे, खोटे बोलु नये. चांगले, गोड शब्द आपल्या मुखात ठेवावे. . मित्तभाषा असावी. अश्लील बोलु नये. वाईट बोलण्याने अनेक उत्पाद व कटुता निर्माण होते. वाचेने पवित्र व विश्वास सदोदित रक्षण करावे, योग्यवेळी योग्य शब्द उच्चारावे, अर्थपुर्ण बोलावे. यालाच सम्यक वाचा म्हणतात.
सम्यक वाचा आपल्याला शिकवते कि,
१. माणसाने सत्य तेच बोलावे.
२. असत्य बोलु नये
३. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलु नये.
४. माणसाने दुसऱ्याची निंदानालस्ती करण्यापासुन परावृत्त व्हावे.
५. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरु नये.
६. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे.
७. माणसाने अर्थहीन व मुर्खासारखी बडबड करु नये., त्याचे बोलणे संमजसपणे व मुद्देसुद असावेत..
४.सम्यक कर्मांत :
सम्यक कर्मांत म्हणजे योग्य कृती मनुष्याने आपले कर्तव्य योग्य दिशेने, योग्य वेगाने व जाणीव ठेवुन पुर्ण करावे हा 'सम्यक कर्मांत' होय. आपली वागणुक सदाचारी असावी. लोभाला बळी पडुन बळजबरी, चोरी किंवा व्यभिचार करु नये. सतत कार्य करावे. कार्य चिकाटीने पुर्णत्वास न्यावे. निरुपयोगी किंवा आळशी नसावे. सम्यक संकल्पाला सम्यक कृतीची जोड असल्याशिवाय तो पुर्ण होणार नाही. कोणत्याही चांगल्या ध्येयासाठी वाईट कर्म करु नये. आळस किंवा घाई गडबड टाळुन आपल्या प्रत्येक पाऊल ध्येयसिद्धीकडे टाकल्यास निराशा किंवा अपयश येणार नाही, हि सम्यक कर्मांताची लक्षणे आहेत. कामवासनेच्या बाबतीत योग्य वर्तन असणे हा सम्यक कर्मांतामधील महत्त्वाचा भाग आहे. त्याने कामांध होऊ नये किंवा व्यभिचार करु नये. आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावे.
५ सम्यक आजीविका/आहार :
प्रत्येक व्यक्तीला उपजीविकेसाठी साधन असते, हे साधन योग्य असावे हा सम्यक आजीविका चा अर्थ आहे. व्यक्तीने आपली उपजीविका चांगल्या उद्योगधंद्याने करावी. सचोटीने व प्रामाणिकपणाने काम धंदा करुन त्यावर जगावे. आपला उद्योगधंदा समाजाला उपयुक्त असावा. आपल्या धंद्यामुळे कोणाला दुःख होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. वाईट मार्गाने जसे चोऱ्या करुन, युद्ध करुन, दारु किंवा अपायकारक पदार्थाचे उत्पादन करुन अनीतीला पोषक होतील अशी साधने बनवुन असा एखादा वाईट धंदा करुन त्यावर उपजीविका करु नये. तसेच आळशी राहु नये, परक्याच्या कष्टावर जगु नये. एकुण सम्यक आजीवीका म्हणजे समान उपयुक्त नीतिमान उद्योग करणे व त्याद्वारा आपले जीवन जगणे होय.
६.सम्यक व्यायाम :
सम्यक व्यायाम म्हणजे आपल्या मनाला प्रशिक्षण देण्यासाठी करावयाचे योग्य प्रयत्न होय. व्यक्तीने आपल्या चंचल व ओढाळ मनावर नियंत्रण ठेवुन त्याला शिस्त लावावी. मन भलतीकडे जाणार नाही, मनात अनीतीने कामवासनेचे किंवा वाईट विचार उद्भवणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. आपल्या मनात असलेल्या सद्गुणाची वाढ करणे व नसलेले दुर्गुण जवळ येणार नाहीत याची काळजी घेणे या प्रयत्नांनाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. सतत योग्य प्रयत केल्यास दृढ मनोनिग्रहाने लागट दुर्गुण किंवा व्यसनांचा त्याग करणे शक्य आहे. सद्धर्माबद्दल श्रद्धा निर्माण होण्यासाठी सम्यक व्यायामाची आवश्यकता आहे.
७.सम्यक स्मृती :
सम्यक स्मृती म्हणजे मनाची जागरुकता. व्यक्तीने आपले मन नेहमी स्मृतीमान ठेवावे. नेहमी विवेक जागा ठेवुन मनाच्या छोट्या मोठ्या हालचालींवर नेहमी ताबा ठेवावा. हीच सम्यक स्मृती होय. मनाची शक्ती फार मोठी आहे, आपण थोडे जरी गैरसावध राहिलो तर ते आपणास कुविचाराकडे घेऊ न जाते म्हणुन आपल्या मनात राग, लोभ, द्व्ष, तृष्णा, मत्सर, इ. विकारांचा उद्रेक न होण्यासाठी व्यक्तीने सतर्क आणि स्मृतिमान राहिले पाहिजे.
८.सम्यक समाधी :
सम्यक समाधी म्हणजे योग्य चिंतन. आर्य अष्टांगिक मार्गातील वरील सात गोष्टींचे आपण अचुक पालन करतो कि नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सम्यक समाधी सांगितली आहे. दुःक, दुःखाचे कारण, दुःखातुन मुक्तता आणि त्यातील आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करण्याची आपल्या मनाला नित्य सवय होण्यासाठी सम्यक समाधी उपयुक्त आहे. अशा एकात्म विचाराने अनेक गुंतागुंतीच्या समस्यांच्या उलगडा होतो. जीवनातील अनेक रहस्य व गहन प्रश्न सुटल्यामुळे आपल्या मनाला अद्वितीय आनंद होतो. एकाग्र मनाने केलेले चिंतन म्हणजे सम्यक समाधी होय.
(संपादित)
7 Apr 2014 - 7:07 pm | प्यारे१
थॅन्क यु रे वाश्या!
आणि वाश्याला उचकवल्याबद्दल थॅन्क यु रे पश्या! ;)
गाभा (किमान वाच्यार्थानं) समजावून घेतल्यावर नंतर काहीतरी बोलायला हरकत नसावी.
7 Apr 2014 - 8:13 pm | प्रकाश घाटपांडे
हे सगळ आपल्याला* करता आल तर किती बरं होईल ना! असो प्रयत्न करायला काय हरकत आहे?
* आपण म्हणजे तुम्ही आम्ही आपण सगळेच
7 Apr 2014 - 8:26 pm | प्रसाद गोडबोले
आमच्या चुकीच्या , अज्ञानानाच्या, माहीतीने का होईना , तुम्ही धर्माचा परत एकदा विचार केलात ,आम्ही वर ईश्वरचरणी केलेली प्रार्थना सार्थक ठरली :) आम्हाला काय बौध्द जैन शैव वेदान्ती सारे सारखेच ...मग कधी कधी होतं इकडचं तिकडं ...पण " आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्व देव नमस्कारं केशवं प्रति गच्छति" सो काही टेन्शन नाही :)
आता तुम्हीच लिहिलेल्या खालील पॅरावर चिंतन करा ...
मस्ती उतरवण्यात येईल किंव्वा अल्-त्रिरत्नसंघाकडे तक्रार करु ही वाक्ये नक्कीच "सम्यक" नाहीत .
लवकरच तुम्हाला हे पटेल :)
मग तुमची बुध्दत्वाकडे खरी वाटचाल सुरु होईल !!
तुमच्या धार्मिक उन्नतीला हातभार लावल्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला आहे :)
7 Apr 2014 - 12:46 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!
7 Apr 2014 - 11:04 am | ऋषिकेश
मराठी आंजावर डु आयडीला व टोपणनावांना बंदी नसावी, मात्र प्रत्येक आयडीमागचे खरे नाव फक्त मालकांना (संपादकांना वा इतर तंत्रज्ञांना नाही) सांगणे बंधनकारक असावे अशी माझी खूप जुनी भुमिका आहे. अजूनही ती तशीच आहे.
7 Apr 2014 - 12:48 pm | बॅटमॅन
खरे नाव सांगणे बंधनकारक का असावे हे अजूनही कळाले नाही. तसे केले नाही तर काय होईल?
7 Apr 2014 - 1:18 pm | मारकुटे
हा मुद्दा २००६ पासुन चर्चेत आहे. मराठी संकेतस्थळावरच विशेष करुन तुमचे नाव सांगा, कुठे रहाता ते सांगा इत्यादी इनंत्या येत असतात. इतर विशेषतः इंग्रजी भाषिक स्थळांवर (माझा वावर साधारणतः केवळ तंत्रज्ञान देवाणघेवाण फोरमवर असतो) अशा प्रकारचा आग्रह दिसत नाही. कुणीही काहीही नाव घेतो, ओळख दिली जात नाही. तरीही त्यांच्यावर मालकवर्ग अथवा मॉडरेटर तुम्ही ड्यु आयडी आहात वगैरे कुचेष्टा करत नाहीत.* हा प्रकार केवळ मराठी स्थळांवरच जास्त दिसतो आणि चर्चिला जातो.
* याला अपवाद असतील ही शक्यता मान्य अहे,
7 Apr 2014 - 2:24 pm | बॅटमॅन
मराठी संस्थळवाल्यांना नक्की कसली इन्सिक्युरिटी असते जेणेकरून हे सगळे डीटेल्स मागवावे वाटतात? वर आणि विचारतीलच, तुम्हांला डीटेल्स द्यायला काय झालं म्हणून. हा सगळा प्रकारच अत्यंत बालिश आणि तितकाच हास्यास्पद आहे. हे इंटरनेट आहे, शाळा नव्हे. टेक्नोसॅव्ही झाल्याने मनोवृत्ती बदलत नाही याचे एक उत्तम उदा. म्हणून हे नक्की सांगता येईल.
7 Apr 2014 - 5:10 pm | ऋषिकेश
यामागचे कारण हे कायदेशीर दृष्ट्या आवश्यकता असे आहे.
उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले तर पोलिसांनी विचारणा केल्यावर त्या व्यक्तीची माहिती मालकांकडे असली पाहिजे - किमान विदागारातून ती काढता आली पाहिजे. बाकी त्याची खरी माहिती इतरत्र कुठेही घोषित होता कामा नये! अगदी संपादकांकडेही!
7 Apr 2014 - 5:24 pm | बॅटमॅन
बेकायदेशीर काम करणे हे त्या संस्थळाच्या माध्यमातून केले तर आणि तरच त्याची गरज आहे. मात्र अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा, की अन्य इंग्रजी फोरम्स इ. ठिकाणी मात्र इतकी टाईट सुपरव्हिजन नसते. तेव्हा प्रॉब्लेम कसा काय येत नै आणि इथेच कसा काय येतो?
7 Apr 2014 - 7:27 pm | मारकुटे
>>>>उद्या एखाद्या आयडीने काही बेकायदेशीर काम केले
हा हा हा बेकयदेशीर काम? , म्हणजे नक्की काय? मिपावरुन वा मराठी संकेतस्थळावरुन इमेल पाठवता येत नाहीत. व्यनी खरड येते. आयपी अॅड्रेस वरुन व्यक्ती ट्रेस करायची असल्यास करता येते.
बहुतांशी संकेतस्थळे द्रुपल वापरतात. त्यामधे आयडी चा सगळा लॉग असतो. त्या लॉगवरुन कोणा आयडीने काय केले हे डिट्टेल काढता येते. मध्यंतरी रच्याकन कुणी आयडीने अनेक जणांचे व्यनी वाचण्याचा उद्योग एका संकेतस्थळावर केला होता. ते सर्व लॉगच्या माध्यामातुन ह्ळूच शोधले गेले होते. आता व्यानी चोरुन वाचणे बेकायदेशीर असतांना त्यावर काही कारवाई केली गेली नाही. मग जर खरी माहिती असती तर केली गेली असती का? सांग सांग भोलानाथ
अनेक संकेत स्थलावार मालकांशिवाय इतर दोन चार मदतनीस असतात अनुपस्थितीत काम करायला, हा विदा त्यांना मिलून ते वापरणार नाहीत कशाअवरुन? ऑऑऑऑ कान्ट से
अनेक संकेतस्थाळाच्या मालकांनीच लोकांना टोप्या घातल्या आहेत... माणुस आहे हो शेवटी मालक सुद्धा ! होतात चुका !!
मुद्दा हा की मराठी संकेतस्थळे जी बहुतांशी केवळ चर्चा वाचन आणि लेखन याच सेवा देतात तिथे खरी माहिती दिलीच पाहीजे हे बंधन निरर्थक आहे.
7 Apr 2014 - 8:13 pm | पिंपातला उंदीर
+१११११११११ बट्मन याना
7 Apr 2014 - 12:54 pm | मारकुटे
संघटनेत लवकरच फेरबदल अपेक्षित आहेत.
7 Apr 2014 - 12:56 pm | बॅटमॅन
प्रतिसादाची गल्ली चुकली काय? नै म्हटलं राजकारणाचे धागे आहेत बाकी ;)
7 Apr 2014 - 1:13 pm | मारकुटे
अजिबात नाही. एकदम पर्फेक्ट गल्ली.
7 Apr 2014 - 1:28 pm | प्यारे१
चेहरे नवे का पोर्ट्फोलिओ बदलणार फक्त? ;)
7 Apr 2014 - 1:41 pm | सूड
>>मंग ह्या लोके पकडमा कसा येतत नयथीन.
आनी ज्या लोकेस्ले मालुंग हुयी जास की हाउ डुआयडी शे मंग त्या लोके बोम काब्र नही ठोकतसं.येनामा मिपावरला लोकेस्ले काय फायदा शे ?>>
आहो, बोंब ठोकली होती एक आयडि समजला तेंव्हा!! सगळ्यांना कळलं होतं कोणाचा आहे तो. हात वर केलंन. मग काय करु शकता अशा वेळी?? आपलेच दात आणि आपलेच ओठ. सोडून द्यायचं. आता वर्षभर त्या आयडीनं तोंड लपवलंयन्. असो.
7 Apr 2014 - 3:21 pm | इरसाल
तुम्ही नक्कीच चांगले काम केले होते पण काही झाल नाही म्हणता मग अशी बोंब करुनही काय उपयोग म्हणा !
7 Apr 2014 - 4:01 pm | धन्या
देवरुखकर तुम्हीपण ना. आता वाटलं कुणाला माशाचा डोळा व्हावं तर त्याचा काय एव्हढा बाऊ करायचा.
7 Apr 2014 - 4:39 pm | आत्मशून्य
मिपावर लोक लिहायला वाचायला प्रामुख्याने येतात, हे प्रामूख्याने लेखक आणी वाचकांचे खुले व्यासपीठ आहे, मिटप डॉट कॉम न्हवे.
बाकी चर्चा रोचक.