भरतपूरचा मस्त सीझन!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in भटकंती
11 Mar 2014 - 8:17 pm

केवलादेव अभयारण्य, भरतपूर म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग. यावर्षी आम्हाला ऐन जानेवारीमध्ये भरतपूर सहल करण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक सेशन सायंकाळी आणि एक सकाळी करता आले. सीझनदेखील या वर्षी उत्तम होता. पत्नीची भरतपूरला जाण्याची ही पहिलीच खेप होती. शिवाय नवा महागडा कॅमेरा होता (हे वाक्य आवर्जून लिहिण्याची प्रेरणा 'मुक्तपीठ'पासून घेतलेली आहे!). त्यामुळे तिने दे धमाल फोटो घेतले. त्यातल्या काहींचा कोलाज इथे टाकत आहे.

Bharatpur 1

पूर्वी हे अभयारण्य नव्हते. राजेमहाराजे आणि इतर उच्चपदस्थ इथे येऊन शिकार करीत. त्यांपैकी काही "विक्रमवीर":

Bharatpur 3

इतर काही इकडम तिकडम फोटो:

Bharatpur 2

Bharatpur 3

Bharatpur 5

Bharatpur 6

कसे जावे, काय करावे:

१. जयपूर - भरतपूर सुमारे २०० किमी.
२. आग्रा - भरतपूर सुमारे ७० किमी.
३. रस्त्याने तसेच रेल्वेने सुलभरीत्या पोचता येते. चारमार्गी टोल रस्ता.
४. राहण्यासाठी सर्व अर्थगटांतील पर्याय उपलब्ध.
५. अभयारण्यात जाण्यासाठी सायकल (बाहेर भाड्याने मिळतात) आणि सायकल रिक्षा यांचा वापर करता येतो. किंवा मग पायीपायी. यांत्रिक वाहने नेता येत नाहीत. बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीने प्रशिक्षित केलेले गाइड उपलब्ध आहेत.
६. भेट देण्यासाठी योग्य काळ - नोव्हेंबर ते मार्च. या काळात बेसुमार थंडी असते हे ध्यानात ठेवणे. फार धुके असल्यास मात्र पक्षी दिसत नाहीत आणि अभयारण्यात जाणे विफल ठरते. काही दिवस असेही येतात की धुके चांगले मध्यान्हपर्यंत उठत नाही.
७. जवळ इतर पाहण्याजोगे: आग्रा, फतेहपूर सिक्री, अलवर, सरिस्का व्याघ्र प्रकल्प, भानगड आणि अजबगड किल्ले, आभानेरी विहीर इ.
८. सीरियस पक्षीनिरीक्षण करायचे असेल, तर किमान दोन दिवस राहणे आवश्यक. चांगल्या प्रतीचे दुर्बीण, कॅमेरा इ. असल्यास उत्तम. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाणथळ जागा आणि घरटी असल्यामुळे पक्षी सहजपणे दिसतात.
९. जाताना पाणी आणि च्याऊम्याऊ बरोबर नेणे योग्य. प्लास्टिकच्या पिशव्या नेऊ नयेत. नेल्यास इतरत्र टाकू नयेत, आपल्याबरोबर परत घेऊन याव्यात.

प्रतिक्रिया

त्रिवेणी's picture

11 Mar 2014 - 9:15 pm | त्रिवेणी

अजुन फोटो असतील तर द्या. ते २ बगळे? मस्त आहेत.(नक्की २ आहेत ना की फोटोग्राफीची कमाल आहे.)
वॉटर मा़र्क छोटा करता येईल का?

चलत मुसाफिर's picture

11 Mar 2014 - 9:59 pm | चलत मुसाफिर

तो फोटो तसाच घेतलेला आहे.

इतर फोटो ऑनलाईन संग्रहात टाकले आहेत. या दुव्यावर दिसतील. दिसत नसतील तर सांगा. सेटिंग्ज बदलतो.

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 11:50 am | चलत मुसाफिर

फोटो दिसत नव्हते. माझ्या ब्लॉगचा दुवा टाकत आहे. इथे सर्व फोटो दिसतील.

त्रिवेणी's picture

11 Mar 2014 - 9:16 pm | त्रिवेणी

काळे बगळे असे वाचावे.

फारच छान !कैमरा खरोखरच भारी आहे हे आवर्जुन सांगतो .तुम्ही भरतपूर शिवाय आणखी काय पाहिले ? मला लोहगडाबद्दल उत्सुकता आहे .

चलत मुसाफिर's picture

11 Mar 2014 - 10:01 pm | चलत मुसाफिर

हा किल्ला कुठून आला इथे?

एस's picture

11 Mar 2014 - 10:11 pm | एस

टकाचोर (Indian Treepie), पिंगळ्याची पिल्ले (Spotted Owlet) आणि रानकोहका (Purple Swamphen) यांचे फोटोतर खास आवडले... मोठ्या आकारातील प्रतिमा डकवाल का इथे?

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 6:59 am | चलत मुसाफिर

ऑनलाईन संग्रहाचा दुवा दिलेला आहे. इतर फोटो तिथे पहावेत ही विनंती.

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 11:51 am | चलत मुसाफिर

माझ्या ब्लॉगवर इथे पहा. फोटो टाकलेले आहेत.

कंजूस's picture

11 Mar 2014 - 10:38 pm | कंजूस

इथल्या
लोहगड किल्याचे खंदक फार जबरी आहेत . तटबंदीला या खंदकातली चिखलमाती
लिंपल्याने तोफेचा गोळा मारला की फक्त चिखल ढासळतो ,तटाला भगदाड पडत नाही
आणि शत्रुचा बराच दारूगोळा वाया जातो /जात असे .हा किल्ला पाहायची इच्छा
आहे .

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 6:57 am | चलत मुसाफिर

पहिल्याने पुण्याचा लोहगडच आठवला. *pardon*

भरतपूरचा किल्ला लोहगड नसून 'लोहागड' आहे. दुर्दैवाने पाहता आला नाही.

कवितानागेश's picture

11 Mar 2014 - 10:59 pm | कवितानागेश

फोटो दिसत का नाहीयेत?

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 6:54 am | चलत मुसाफिर

फोटो दिसले पाहिजेत. मी साईन आऊट करून आणि दोन वेगळ्या संगणकांवरूनही पाहू शकतो आहे.

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 11:48 am | चलत मुसाफिर

फोटो खरोखरच दिसत नव्हते. आता मी ते माझ्या ब्लॉगवरच चिकटवले आहेत. इथे पाहिल्यास दिसतील. धन्यवाद.

धागा आणि भलेमोट्ठे वॉटरमार्क पाहून निराशा झाली.

चलत मुसाफिर's picture

12 Mar 2014 - 6:52 am | चलत मुसाफिर

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपला मुद्दा पुढील वेळी लक्षात ठेवीन. इतर छायाचित्रे ऑनलाईन संग्रहात आहेत. ती पहावीत ही विनंती.

स्पा's picture

12 Mar 2014 - 12:07 pm | स्पा

असहमत

वॉटरमार्क बरेच लहान वाटले , अजून मोठे करता आले असते ,
प्रकाशचित्र बाकी फारच अप्रतिम, अद्वितीय आहेत. बरेच अंतराष्ट्रीय चोर ती वापरू शकतात , लवकर सुरक्षित करा .

अनुप ढेरे's picture

12 Mar 2014 - 1:32 pm | अनुप ढेरे

सहमत आहे. वॉटरमार्क मोठे करा अजून.

चलत मुसाफिर's picture

13 Mar 2014 - 10:42 am | चलत मुसाफिर

संभ्रमित झालो! मोठा वॉटरमार्क टाकणे योग्य की अयोग्य?
मिपावर नवशिका आहे. जास्त टांग खेचू नये ही विनंती *pardon*

सुबोध खरे's picture

13 Mar 2014 - 2:41 pm | सुबोध खरे

उत्तम पैकी पुलावात खडा लागल्यासारखे भलेमोट्ठे वॉटरमार्क मध्ये आले. त्यामुळे चित्रांची मजा गेली असे माझे वैयक्तिक मत आहे.
आपला ब्लोग वाचला आहे आणि उत्तम आहेच पण माझे वैयक्तिक मत म्हणून सांगतो. फोटो मध्ये वॉटरमार्क नसावा असे मला वाटते( असलाच तर अगदी कोपर्यात दिसेल न दिसेल असा असावा. जर कोणी तो फोटो ढापला किंवा आपला म्हणून वापरला याचाच अर्थ हा कि आपली फोटोग्राफी उत्तम आहे. मग आणखी त्याचे श्रेय मिळवण्याची गरजच नाही.मुळात असे फोटो जालावर मोठ्या प्रमाणात आहेतच.
(माझ्या नावावर एकही संशोधनाचा ( रिसर्च पेपर) नाही पण माझे संशोधन भरपूर लोकांनी सांगून आणि न सांगता वापरले आहे याचाच अर्थ ते काही किमान दर्जाचे होते आणि यात मी आनंदी आहे)

आंबट चिंच's picture

12 Mar 2014 - 12:56 pm | आंबट चिंच

मस्त खुप आवडले.
तुमचा ब्लॉगवरुन तुम्ही नेहमी भटकतच असता असे दिसते.

चलत मुसाफिर's picture

13 Mar 2014 - 10:45 am | चलत मुसाफिर

भटकायला आवडते. नेहमी जमते असे नाही. पण संधी मिळाल्यास सोडत नाही. बहुतांश फिरती कार्यानुषंगाने होते.

कंजूस's picture

12 Mar 2014 - 8:55 pm | कंजूस

वडप्रेसवरची टिपणे एक एक वाचायला घेतो आहे .ती फारच आवडली .

चलत मुसाफिर's picture

13 Mar 2014 - 10:44 am | चलत मुसाफिर

धन्यवाद. ब्लॉग आपल्याला आवडला हे वाचून आनंद वाटला. प्रतिसाद नेहमीच स्वागतार्ह असेल.

पैसा's picture

21 Mar 2014 - 8:37 pm | पैसा

फोटो चांगले आहेत. पण वॉटरमार्क्स जरा मोठे वाटत आहेत.

देव मासा's picture

22 Mar 2014 - 12:29 am | देव मासा

ब्लॉग आवडला , हे माहिती सांगणारे गाईड लोक किती पैसे घेतात हो ?