गाभा:
दोन राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान किंवा तत्सम अत्युच्च पदस्थ लोकं जेव्हा अधिकृत कामासाठी भेटतात तेव्हा ते जी चर्चा वाटाघाटी करतात त्याचा गोषवारा / औटकम आपल्याला नंतर कळतो..आपण नेहेमी ऐकतो वाचतो कि अमुक नेत्याने अतिशय मुत्सद्दीपणे अमुक एक परिस्थिती हाताळली / आपलं मुद्दा गळी उतरवला वगैरे वगैरे..
परंतु हे लोकं प्रत्यक्ष बैठकीत / बोलण्यांमध्ये ते काय /कसे बोलत असावेत ? विशेषतः बंद दाराआड चर्चेत जेव्हा प्रत्येक शब्द, हालचाल, मौन सगळे सगळे महत्वाचे असेल त्यावेळी आपलं मुद्दा मांडतांना, रेटतांना, सोडतांना शिष्टचारांचा डोलारा सांभाळत .. ते एक्झाकटली 'बोलत' काय/कसे असावेत?
काही उदाहरणे/संदर्भ उपलब्ध आहेत काय?
प्रतिक्रिया
11 Mar 2014 - 8:24 am | सुनील
संदीप वासलेकरांना विचारा. त्यांना ठाऊक आहे ते!
;)
11 Mar 2014 - 8:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कै नै...च्या बिस्कुट हान्त्यात...पाऊस पाण्याच्या गप्पा हानत्यात. ज्याला च्या-भिस्कुटाचं बिलं द्यावं लागत नाही त्याच्या देशात छापत्यात, अमुक अमुक नी अमुक अमुक ला मुत्सद्दीपणे हाताळला :)...!!
विनोदाचा भाग सोडुन द्या. आपला मुद्दा सोडायचा नाही.
आपले पंतप्रधान "चर्चा" करतात ही अफवा असेल का?
11 Mar 2014 - 1:26 pm | बाबा पाटील
ही अफवा सोडुन दुसरे काय असु शकते.
11 Mar 2014 - 10:15 am | मनो
इथे इराण बरोबर झालेल्या वाटाघाटीमध्ये तुम्हाला हे राजकारण कसे चालते ते दिसेल. एका भेटीमागे कित्येक वर्षांचे प्रयत्न असतात, भेट म्हणजे बर्याचदा या प्रयत्नाची शेवटची पायरी असते, त्यामुळे काय बोलायचे ते खालच्या पातळीवर आधीच ठरलेले असते.
http://www.youtube.com/watch?v=Cf3fcoXx0pI
अशोक जैन यांच्या "राजधानीतून" मध्ये एक किस्सा आहे. बाबासाहेब भोसले (महाराष्ट्राचे त्या वेळचे मुख्यमंत्री) इंदिरा गांधीना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या वेळी भेटीनंतर ते पत्रकारांना म्हणाले "इंदिराजींबरोबर चांगली तासभर गहन चर्चा झाली असं लिहा". खरी गोष्ट अशी होती की या तासापैकी ५५ मिनिटे प्रतीक्षालयात (waiting room ) गेली होती. बाकीची पाच मिनिटे बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे तर "इंदिराजी बोलत होत्या आणि आम्ही फक्त हो म्हणायचं". तर खरी चर्चा अशी होते. बातम्यात छापून येतो तो अधिकृत वृतान्त, त्याचा सत्याशी काही संबंध असतोच असं नाही.
11 Mar 2014 - 11:19 am | ज्ञानव
आमचे एक आय ए एस झालेले साहेब होते त्यांना नेमका हाच प्रश्न आम्ही विचारला होता की दोन उच्च पदस्थ जेव्हा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने भेटी ठरवतात तेव्हा सुरवात कशी होते म्हणजे "नमस्कार, कसे आहात?" "सध्या काय चाललंय ? " इतक्या हलक्या फुलक्या गप्पांनी सुरवात होते का ? त्यावर ते म्हणाले कि आम्ही कमी बोलतो आणि आमच्या बरोबर असलेले ऑफिसर्स, सचिव इत्यादी लोक विषय ओपन करतात तसेच मिटींगच्या आधी बरीच पत्रा - पत्री झालेली असते. अजेंडा दोन्हीकडच्या स्टाफकडे असतो ते मुद्दे वाचतात आणि "आम्ही" त्यावर बोलतो.
साहेबांनी सांगितले आम्ही ऐकले ह्या पलीकडे ह्याला प्रत्यक्ष उपस्थित कुणाकडून काही पुष्टी कधी मिळाली नाही.
11 Mar 2014 - 1:59 pm | भाते
जपानचे प्रधानमंत्री मोर्री हे अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यातली चर्चा मिपावरच या धाग्यात झाली आहे.