मराठी संकेतस्थळांची सद्यस्थिती (चर्चा भाग १: मराठी संकेतस्थळांवरील अनुपस्थित मराठी); मराठी भाषादीन २७ फेब्रुवारी २०१४ च्या निमीत्ताने चर्चा

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Feb 2014 - 12:18 pm
गाभा: 

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले.त्यांचा जन्म दिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

मराठी विकिपीडिया प्रकल्पातील मराठी संकेतस्थळे हा लेख अद्यापी पुरेसा अद्ययावत नाही काही माहिती शिळी सुद्धा झाली आहे आणि काही माहिती कमतरता (इन्फर्मेशन गॅप) पण आहेत.

सायबर विश्वात मराठीचे पहिले पाऊल रोवण्याचा मान ‘मायबोली‘ या संकेतस्थळाला जातो. १९९६ मध्ये (www.maayboli.com) हे संकेत स्थळ सुरू झाले[३]

सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसांना इंटरनेटने एकत्र आणले आहे. आधुनिक जगाचे संवाद माध्यम असणाऱ्या सायबर विश्वात अगदी आत्मविश्वासाने संचार करून मराठीनेही ‘अमृताशी पैजा जिंकणारी भाषा‘ हा ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरविला आहे. तुकारामाची गाथा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिरी काव्य ते थेट गदिमा, पुलंपर्यंतची मराठी मनात घर करून बसलेली अनेक श्रद्धास्थाने इंटरनेटवर दिमाखाने झळकत आहेत.

बर्‍या पैकी मराठी संस्थळे युनिकोडात आली असली तरी काही महत्वाची संस्थळे अद्यापही युनिकोडात आलेली नाहीत उदाहरणार्थ पुढारी केसरी तरूण भारत इत्यादी ऑनलाईन वृत्तपत्रातील माहिती अद्यापही शोधणे अवघड जाते. ९९.९९ टक्के जुने मराठी अर्काईव्हज वृत्तपत्रांचे मासिकांचे जुन्या पुस्तकांचे मॅन्यूस्क्रिप्ट्सचे अद्यापही मराठी आंतरजालावर आणि तेही युनिकोडात उपलब्ध नाही. शेतकी विभागाकरताच शासनाच वेबसाईट अजूनही युनिकोडात नसल्या मुळे सर्चेबल नाही. हि सर्व एका अर्थाने आंतरजालावर मराठीची अनुपस्थिती म्हणावी काय ? यामुळे मराठी वाचन कमी होत म्हणून मराठी संस्थळांची (पोटेंशिअल)जाहीरात एवं उत्पन्नक्षमताही कमी होते अस तुम्हाला वाटत का?

दुसर्‍या बाजूला प्रदेशानुसार सर्व महाराष्ट्रातील घटक मराठी आंतरजालावर हजेरी लावतात का ? का कोण जाणे माझी व्यक्तीगत ऑब्झर्वेशन्स म्हणजे काही प्रदेशात अगदी खेडे गावातील मराठी सुद्धा हजेरी लावताना दिसतात पण बर्‍याच शहर आणि तालूंक्यांतील लोकांची लक्षणिय अनुपस्थिती असावी असे वाटते जसे की कोल्हापूर गडचिरोली तर असे आहे का यात मला कोल्हापूर ठळकपणे नोंदवावेसे वाटते ?असे असेल तर मराठी संकेतस्थळांवर कमी रिप्रेझेंट होणारे प्रदेश कोणते कारण काय असावे ? यांना मराठी संकेतस्थळावरील अनुपस्थित मराठी म्हणावे का ?

सामाजिक घटकांनूसार सुद्धा अनुपस्थिती जाणवते त्या बद्दल तर चर्चा करून हवीच आहे त्या शिवाय वर्षाला १४ लाख विद्यार्थी मॅट्रीक पास करून आंतरजालावर धडकतात त्या प्रमाणात मराठी संकेत स्थळांना शेअर मिळतो का ? इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या वर्षाकाठी जवळपास ३ लाख मराट्।ई मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांची सुद्धा मराठी आंतरजालावर अनुपस्थिती आहे का ? सद्य परिस्थिती काय आहे ती कशी सुधारता येईल.

धागा विकिपीडियाकरता असल्यामुळे नित्या प्रमाणे आपले या धाग्यावरील लेखन प्रताधिकार मुक्त होत आहे. विषयांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागा साठी आपणा सर्वांना धन्यवाद आणि मराठी दिनाच्या शुभेच्छा

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Feb 2014 - 12:46 pm | यशोधरा

पण, मराठी भाषा अजून इतकी 'दीन' झाली आहे असे वाटत नाही... :)
दुसरे एक सुचवावेसे वाटते की मराठीच्या प्रसारासाठी काम करताना भाषेचे सौंदर्य, र्‍हस्व, दीर्घ इत्यादि सांभाळायला हवे. आणि मराठीकरणाचे काय?

ऑब्झर्वेशन्स - निरी़क्षण
अर्काईव्हज - दस्तावेज (दस्तावेजीकरण -चालेल का?)
मॅन्युस्क्रिप्ट - हस्तलिखित?
सर्चेबल - शोधण्याजोगी (तुमच्या वाक्याच्या अनुषंगाने )
शासनाच वेबसाईट - शासनाचे संस्थळ
रिप्रेझेंट - सातत्याने न दिसणारे/ अनुपस्थित असणारे (तुमच्या वाक्याच्या अनुषंगाने ) वगैरे...

तुमचा हेतू फार उत्तम आहे पण, मराठी आणि देवनागरीचा प्रचार करताना निदान भाषेबद्दल थोडी काळजी घेणे अपेक्षित नाही का?

माहितगार's picture

26 Feb 2014 - 1:00 pm | माहितगार

आपल्या मतांचा आदर आहे. मला वाटते हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे. सध्या केवळ पोच देऊन मुख्य विषयावर प्रतिसादांची अपेक्षा ठेवतो.

प्रतिसादाकरीता धन्यवाद

प्रतिसाद नाही दिलात तरी चालेल, पण निदान इंग्लिशाळलेले तरी न लिहिण्याचा प्रयत्न करा, खास करुन मराठीबाबत लिहिताना. :)

माहितगार's picture

26 Feb 2014 - 1:12 pm | माहितगार

धागा लिहिण्या पुर्वी आसमीज लोकांशी इंग्रजीत संवाद साधत होतो त्याचा परिणाम. एवढ्या वेगाने स्विच ऑन स्विच ऑफ होता येत नाही भाषा प्रवाही असते. अशुद्धलेखन का होते या विषयी विकिपीडियावर लेखन केले आहे. यावर वेगळी चर्चा नंतर करूच पण अशा अती आग्रहाने आपण मराठी समाजातील मोठ्या घटकांना सामावून घेण्यात कमी पडतो का मराठी लोकांच्या मराठी संस्थळावरील अनुपस्थीत असे काही कारण नाही ना ? हे मात्र या चर्चा धाग्याच्या कक्षेत येते.

यशोधरा's picture

26 Feb 2014 - 1:18 pm | यशोधरा

आसमीज नव्हे, आसामी. :)
एवढ्या वेगाने स्विच ऑन स्विच ऑफ होता येत नाही भाषा प्रवाही असते. - काहीही! असो.

शुभेच्छा.

माहितगार's picture

26 Feb 2014 - 1:29 pm | माहितगार

काहीही!>> यशोधराजी कमी कालावधीत व्यक्ती आणि त्यांचे विचार लेखन ओळखण्याची गल्लत तर करत नाही आहोत ना? मी इथे केवळ माझे व्यक्तीगत तात्कालीक कारण आणि लेखक म्हणून माझे मतांतराचे अधिकार थोडक्यात स्पष्ट केलेत. योग आला तर वेगळ्या धाग्यावर केव्हा तरी चर्चा करूयात. आपल्या माहिती करीता आसमीज आणि आसामी दोन्हीही चुकीचेच असमीया र्‍हस्वदीर्गा सहीत असेच हवे. :) याचा माझा किमान अभ्यास असतानाही लिहिले कारण मी काही सकाळ पासन बराच वेळ वेगळ्या भाषेतून चर्चेत होतोच.

या एकुन विषयावर माझ्याकडे महाविद्यालयात घेतलेली सर्वेक्षणे निष्कर्ष बरेच काही चर्चे करीता माझ्याकडे आहे. केवळ शुद्धलेखनाले की मी भाषाशास्त्री होत नाही याची मला जाणीव आहे. (ह. घ्या)

मारकुटे's picture

26 Feb 2014 - 1:40 pm | मारकुटे

मराठी भाषा मरत आहे हा टाहो राजवाड्यांनी फोडला त्यानंतर शंभर वर्षे झाली तरी मराठी जिवंत आहे.

काळाच्या ओघात बोली भाषेत जानवे, यज्ञोपवित हे शब्द लोक विसरतील पण लंगोटी शब्द शिल्लक राहिल असं भाकित एका कवीने केलं होतं पण तसं काही झालेलं दिसत नाही.

आपल्याच आजुबाजुच्या लोकांच्या वागण्यावरुन अख्खा महाराष्ट्र तसा वागत असेल असं प्रतिपादन करायला आणि आपल्यालाच केवळ मराठीची चिंता आहे आणि बाकीचे साले चु* आहेत ही भुमिका स्वतःला विचारवंत समजणारे का घेतात हे कळत नाही. का अशी भुमिका घेतली म्हणजे विचारवंत होता येते की काय कळत नाही.

यमाईमाता खाणावळ हे yamaimata khanaval असे लिहिले की मराठी पाट्या हव्या म्हणून बोंब मारली जाते पण तेच न्यु इंडीया जनरल स्टोअर्स अशा पाटीला वा वा म्हणून टाळ्या पिटल्या जातात.

लेखनात गेली सात आठ शतके मोडी लिपी होती. बरं होतं. र्‍ह्स्व दिर्घचा बाऊ नव्हता. संस्कृतचे नियम आणि देवनागरी लिपी लादून बहुजनांची घुसमट करण्याचा कावा एक दिवस मराठीची लिपी रोमन करुन सोडू शकतो इतकं भान पेठेतील म्हातारचळी विद्वानांना नाही. त्यांचे बरोबर आहे त्यांची मुले बाहेर आहेत. मरायला टेकली की ही प्लिज कम सुन म्हणून स्टेट्स टाकतील फेसबुकावर अन मराठीसाठी किती केलं म्हणून यांची पोरं अमेरीक्न मंडळात दुधभात खात सांगतील.

मराठीसाठी काही केलं पाहिजे वगैरे कोल्हेकूई खुप झाली. तुमच्या पुरती तुम्ही मराठी वापरा. पुष्कळ आहे. तुमच्यात असलं काही असायला हवं की ते हवं म्हणून लोक तुमच्याकडे येतील अन तुम्हाला हव्या त्या भाषेत तुमच्यापाशी विनवणी करतील. अन जर असं काही नसेल तर तुम्हाला त्यांची भाषा शिकून किंवा त्यांच्या भागात जाऊन ते म्हणतील तसं राबुन पोट भरायला हवं.

निर्णय तुमचा...

निर्णय तुमचा... तुमच्यात किती दम आहे ! *

*सभ्य भाषेतील शब्द मुळ प्रतिसादात वापरला होता... खरं तर तुकारामांच्या नाठाळाचे माथा हाणू काठी या अभंगातील एक चपखल शब्द वापरणार होतो. तो चालणार नाही असं वाटलंच होत म्हणून सभ्य शब्द वापरला होता. तो सुद्धा उडाला... यावरुन राणी व्हिक्टोरीयन सभ्यतेचा प्रभाव किती भयानक रितीने आजही अभिजनांवर आहे याचे केविलवाणे चित्र उभे राहिले आहे. कालिदासाने तर हायच खाल्ली असती.

आणि हेच अभिजन खर्‍या अर्थाने मराठीचे मारेकरी आहेत. मराठी अभिजनांच्या ताब्यातुन मुक्त होईल तो दिवस खरा मराठी राजभाषा दिन.

कुटेजी कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? हे पहावे. मुख्य म्हणजे उद्देशा कडे फोकस हवा (शुद्ध मराठीत: लक्ष केंद्रीत हवे). श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती म्हणजेच यू अ‍ॅटीट्यूड बाळगण्यात समोरचे विसरले तरीही आपण बाळगायचा; हो कुटे साहेब. आपल्याला काय हव या बद्दल लक्ष केंद्रीत असलं; श्रोताभिमुख अथवा वाचकाभिमुख अभिवृत्ती असली की व्यासपिठीय मराठीला आम्ही प्रमाण मराठी म्हणून स्विकारतो पण आजच्या बदलत्या परिस्थितीत व्यासपिठे बदलली आणि त्यांचे परिघ व्यापक झालेले आहेत आणि त्या व्यापक परिघातील प्रमाण मराठी नेमकी कोणती असावयास हवी या बद्दल अधिक चर्चेस वाव आहे किंवा कसे अशी काही चर्चेची दिशा ठेवता येऊ शकते का ते पहावे असे वाटते.

ह्या धाग्याच्या दृष्टीने मुख्य म्हणजे मराठी तितूका मिळवावा/वी हे मराठी संस्थळांच्या बाबतीत होते आहे का ? किती होते आहे क्षमते पेक्षा कमी होत असेल तर समस्या निदान आणि उपाय कसे करावेत. ( समस्या निदान सारखे शुद्ध शब्द वापरले की कोलांट उडी मारल्या सारखी वाटायला लागली :) माझ्या प्रिय मिंग्लिश मध्ये कोणती सोल्यूशन्स उपयूक्त पडू शकतील

मारकुटे's picture

26 Feb 2014 - 3:10 pm | मारकुटे

श्री रा रा माहितगार

आपण सुचवलेल्या धाग्यांचा मी व्यापक अभ्यास केलेला असून मजसारख्या अल्पमती वाचकाला त्या धाग्यांमधील ज्ञानाचे अमृतकण वेचता आले नाहीत हे माझे दुर्भाग्य आहे हे मी नमुद करतो. व्यासपीठीय आणि वाचकप्रिय लेखकांच्या लेखनाचे अनुशीलन करतांना आणि त्यानुसार भाषेमधे योग्य त्या सुधारणा करतांना माझ्यामधे असलेल्या बुद्धीच्या अभावामुळे सदर अभ्यासाचा हवा तसा परिणाम झालेला नाही हे मी अतिशय खेदाने नमुद करत आहे. अशा अनेक प्रसंगातुन जात असतांना अनेक अभिजनांनी नाकारलेले पण बहुजनांनी स्विकारलेले लेखक मला गुरु म्हणून लाभले आणि त्यांच्या मार्गदर्शनातुन माझ्या लक्षात आले ते हे की अभिजनांना केवळ मराठीविषयी गप्पा मारण्यास स्वारस्य असते मराठीत गप्पा मारतीलच असे नाही. आणि त्याचबरोबर ज्या व्यापक परिघाचा आपण उल्लेख केला आहे तो मराठीत बोलत असतो, मराठीविषयी नाही.

आम्हाला काही समजत नाही हे आम्हाला समजले आहे आणि ते आम्हाला मान्य आहे. राग नसावा.

माहितगार's picture

26 Feb 2014 - 3:34 pm | माहितगार

बेसिकली (मुलतः) माझी मातृभाषा असलेली मराठी इन्क्लुजीव सर्वसमावेशक आहे. माझ व्यासपिठ तंजावरी ते हरयाणवी मराठी मालवणी खान्देशी कोकणी मराठवडी झाडीपट्टी ते गडचिरोलीची आदिवासी; पेठेतल्या पासून आडवाच्या वाटेतल्या कान्व्हेंटात शिकणार्‍या मराठी या सर्वांचा सहभाग नोंदवणार आहे. ते कुणाही एका गटाच्या वतनदारीच जहागिरीच मालकीच नाही आणि नसेल या बाबत तुमचे विचार बर्‍यापैकी आमच्याशी मिळतात जुळतात.

मराठीविषयी गप्पा मारण्यास स्वारस्य असते मराठीत गप्पा मारतीलच असे नाही. आणि त्याचबरोबर ज्या व्यापक परिघाचा आपण उल्लेख केला आहे तो मराठीत बोलत असतो, मराठीविषयी नाही.

आपल्या भावनांशी सहमत आहे मला वाटते मी व्यापक परीघातील सर्व मराठींविषयी बोलतो आहे.

आपणास काही समजत नाही असा आमच्या म्हणण्याचा दुरान्वयेही अर्थ काढू नये. माझी मते प्रांजळपणे मांडण्याचा आधी पासून प्रयत्न असल्यामुळे माझ्या आग्रही मते असलेल्या धाग्यांकडे निर्देश केला. मी कठोर टिकेचा बलदंड समर्थक आहे आणि तशात आपण योग्यवेळी माझ्या मुद्द्यांचे समर्थन केलेत (खरेही माझी जी मराठी आहे ती मी किती बदलू शकेन त्या बद्दल साशंक असल्याने आपल्या सारखे लोक जरासे पाठीशी असेल तरच आमचाही मराठी प्रवास चालू राहतो नाहीतर कुठेतरी विरामचिन्ह घालावे लागले असते) या बद्दल मी आपले मनःपुर्वक धन्यवाद व्यक्त करतो.

आदूबाळ's picture

26 Feb 2014 - 3:05 pm | आदूबाळ

शिवाय वर्षाला १४ लाख विद्यार्थी मॅट्रीक पास करून आंतरजालावर धडकतात

बाकीचं राहूद्या भौ - हे काय प्रकर्ण आहे? मॅट्रिकचा आणि आंतरजालाचा काय संबंध?

माहितगार's picture

26 Feb 2014 - 3:14 pm | माहितगार

आंतरजालावर जाण्याचे पोटेंशियल असलेला किमान जाणता मराठी आकडा म्हणून मांडला; शालेय विद्द्यार्थी धरले तर जास्तच होतो. मराठी लोकांकडे उपलब्ध आंतरजालाच्या जोडणीच्या संख्या ( हि आकडे वारी माझ्या कडे आहे पण काढावयास वेळ लागेल इतर कुणी दिल्यास स्वागत असेल) जरी पाहील्या आणि सर्वाधिक हिट्स मिळणारी मराठी संस्थळे पाहिली तरी माझ्या मतानुसार निरीक्षणानुसार मराठी लोकांची उपस्थिती अत्यात्यल्प अशी आहे. तुम्हाला हे पटते का पटत असेल तर शक्य कारणे आणि समस्या निवारण कसे करावे किंवा (सध्याच्या अथवा भावी/वुडबी) मराठी संस्थळ मालकांना सुचवण्यासारखे काही आहे का ?

या धाग्यावर मी काहीतरी चांगली माहिती मिळेल म्हणून आलो होतो, लेख छानच आहे, पण प्रतिसादांमध्ये अवांतर जास्त होत आहे असे वाटते..

अवांतर टाळण्याचा प्रयत्न करूनही टाळले जात नाही आहे. आपण धाग्यावर असाल तर उलट विषयांतराची संधी कमी होईल. महत्वपूर्ण विषयावर एक चांगली चर्चा होऊ शकेल. आपले प्रोत्साह आहे तर अजून आकडेवारी उपलब्ध करेन पण आपल्या प्रमाणेच विषयास अनुसरून प्रतिसादांची प्रतिक्षा आहे.

आपल्या भावना सर्बजण लक्षात घेतील असे वाटते.

मदनबाण's picture

27 Feb 2014 - 11:35 am | मदनबाण

माहितगार आणि मारकुटे आपणा दोघांचेही प्रतिसाद काल वाचले होते,आज लोकसत्ते मधे २ लेख पाहिले आणि तुमच्या प्रतिसादांची आठवण झाली.
मराठी भाषा दिवस आणि भाषाभ्रम
राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत

जाता जाता :- मराठी अभिमान गीत देउन जातो.

माहितगार's picture

27 Feb 2014 - 11:55 am | माहितगार

भाषाभ्रम लेखाबद्दल वेगळा धागा काढला आहे. राजवाडे यांच्या संशोधन मंडळाचे संकेतस्थळ इंग्रजीत हा या धाग्याचा विषयास अनुसरून आहेच. पण इतरही बर्‍याच मराठी साहित्यिकांचीही संस्थळे सुद्धा इंग्रजी भाषेतून आहेत.

फार कशाला मराठी भाषा हा लेख मराठी विकिपीडियावर पुर्ण झाला नव्हता तेव्हा इंग्रजी विकिपीडियातील लेख मराठीत अनुवादीत करून देण्याची विनंती आली होती. मराठी व्याकरण लेख खरेच इंग्रजी विकिपीडियावरून अनुवादासाठी घेतला गेला स्वयंसेवी लेखक संपादका अभावी तेवढा लेखही होऊ शकला नाही. :)

ऋषिकेश's picture

27 Feb 2014 - 4:00 pm | ऋषिकेश

कुठाय लेख? दुवा द्या

भाषाभ्रम विषयक मिपा धाग्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने डॉ.प्रकाश परबांच म्हणण आम्ही मनावर घेतल आणि मिपा संपादक मंडळाला विनंती करून तो धागा वगळवला आणि मतांतराचा प्रवास अशा भावी धाग्याकरता विषय मीळावा म्हणून मोरारजींच्या वाढदिवसा निमीत्त धागा काढला :)

ऋषिकेश's picture

27 Feb 2014 - 3:59 pm | ऋषिकेश

धागाविषय आवडला.

मात्र प्रतिसादात नमनालाच विचारांपेक्षा तथाकथित शुद्धतेचा इतका बाऊ - तो ही मिसळपाववर - केलेला बघुन लिहायची इच्छाच गेली.

मात्र प्रतिसादात नमनालाच विचारांपेक्षा तथाकथित शुद्धतेचा इतका बाऊ - तो ही मिसळपाववर - केलेला बघुन लिहायची इच्छाच गेली.

हा कोतेपणाच सगळीकडे भोवतो :(

सुहास..'s picture

27 Feb 2014 - 9:27 pm | सुहास..

सहमत रे ऋष्या ( आले का चांगले दिवस ;) )

सुनील's picture

28 Feb 2014 - 9:04 am | सुनील

चांगला धागा.

sandeep_2310's picture

11 Mar 2014 - 1:24 am | sandeep_2310

krupaya marathit type kase karave yabaddal margdarshan milel ka.