लोकमान्य टिळक आणि अनुवाद

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 Jan 2014 - 11:21 am
गाभा: 

नमस्कार

ह्या धाग्याची दोन उद्दीष्टे आहेत.पहिला लोकमान्य टिळकांची स्वतःची अनुवाद पद्धती (शैली) होती जी मुख्यत्वे गीतारहस्यामधील गीता अनुवादा करिता वापरली त्याची नोंद घेणे.स्वतःला हवा तसा अर्थ लावता येणारा स्वैर अनुवादा ऐवजी लेखकास अभिप्रेत तत्कालीन संदर्भ काय असले पाहीजेत हे लक्षात घेत जसाच्या तसा अनुवाद करण्यावर लोकमान्यांचा भर असावा. या बद्दल गीतारहस्याच्या युनिकोडीकरणा नंतर माहिती देणे अधीक सोपे असेल.

लोकमान्य टिळकांनी बरचस लेखन इंग्रजी भाषेतूनही केल.मराठी विकिस्रोत प्रकल्पाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने त्यांच्या इंग्रजी लेखनाचा मराठी अनुवाद उपलब्ध करण्याच्या दृर्ष्टीने लोकमान्य टिळकांनी वापरलेल्या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सुचवणे हा ह्या धाग्याचा दुसरा उद्देश आहे.

सध्या अनुवादास घेतलेल्या अग्रलेखात टिळक शिवाजी महाराज राष्ट्रीय आदर्श कसे आहेत या बद्दलचा उहापोह आहे. त्यातील खालील शब्दांना मराठी पर्यायी शब्द हवे आहेत.काही शब्द सोपे असले तरी मूळ काँटेक्स्ट संदर्भांनुसार अनुवाद करणे सोपे जावे म्हणून घेतले आहेत.पर्यायी शब्द सुचवण्यापुर्वी हा मूळ इंग्रजी अग्रलेख दुवा मराठी विकिस्रोतवर आवर्जून वाचून घ्यावा. (मराठी विकिस्रोत शिवाय इंटरनेटवर इतरत्र आढळल्यास इंग्रजी लेख मूळाबर हुकूम असेलच असे सांगता येत नसल्यामुळे शक्यतोवर मराठी विकिस्रोतावरून बेतूनच अनुवाद करावा)

national hero
Hero worship
deeply implanted
human nature
forsaken by providence
shorn of the power
tyranny of his time.
actuated
shutting this view
amicable relations
unmindful
acquainted with
gospel truth.
the real question at issue ;
serpentine wisdom
peculiar value
actuated
vitality
able leaders
great Maratha Chief
to emphasise
sheer misrepresentation
invocation to fight
only in conformity worth the political circumstances of the country

This aspect of the question has been clearly perceived and exclaimed by the leading Indian papers in Bangal such as Patrika and Bengalee

अर्काईव्हज डॉट ऑर्गवरील ग्रंथात exclaimed असाच शब्द असला तरी तिथे लेखकास explained शब्द अभिप्रेत असण्याची शक्यता वाटते.दि.२४ जुन १९०६ रोजी दैनिक मराठात प्रकाशित अग्रलेखात हा शब्द exclaimed असाच होता याचीही जमल्यास खात्री करून हवी आहे.

विकिवर दुरुस्त्या पुन्हा पुन्हा करता येतात म्हणून अनुवादाची पहिल्या दोन फेर्‍या मराठी विकिस्रोतवर करून शेवटच्या त्रुटी काढण्या करता या धाग्यावर द्यावा असा मानस आहे.

पहिल्या फेरीत केला गेलेला कच्चा अनुवाद या विकिस्रोत चर्चापान दुव्यावर उपलब्ध आहे.आपणास पूर्ण अनुवाद करावयाचा असल्यास त्या चर्चापान दुव्यावर परस्पर केल्यासही हरकत नाही. आपणा सर्व मिपाकरांच नेहमी प्रमाणे सहकार्य लाभल्यास येत्या शिवजयंती पुर्वी या लेखाचा अनुवाद तडीस नेता येईल अशी आशा आहे.

चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

प्रतिक्रिया

माहितगार's picture

29 Jan 2014 - 12:57 pm | माहितगार

He was born at a time when the whole nation required relief from misrule

या वाक्याचा सध्याचा अनुवाद "त्यांचा जन्म अशा काळात झाला जेंव्हा संपूर्ण राष्ट्रास अराजकापासून सुटका हवी होती:" असा केला आहे यात अराजक एवजी कुशासन अधीक योग्य होईल की misrule करता अजून काही वेगळा मराठी शब्द सुचवता येईल ?

कंजूस's picture

29 Jan 2014 - 6:01 pm | कंजूस

अराजक =absence of law and order .

आपण दिलेल्या माहितीने खात्री होण्यास मदत झाली. या खाली आलेल्या प्रतिसादातील वाक्यांशाच्या साहाय्याने अनुवादात सुधारणा केली. आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादा बद्दल धन्यवाद आणि उर्वरीत अनुवाद कालावधीतही असेच प्रतिसाद मिळत रहावेत हि नम्र विनंती आणि आशा

जयंत कुलकर्णी's picture

29 Jan 2014 - 6:44 pm | जयंत कुलकर्णी

ब्रिटिशांच्या अनागोंदी कारभारापासून जनतेला सुटका पाहिजे होती अशा काळात त्यांचा जन्म झाला.

माहितगार's picture

29 Jan 2014 - 9:03 pm | माहितगार

वाक्य शिवाजी महाराजांबद्दल आणि मोगल काळाबाबत होते तरीही अनुवादातील आपल्या साहाय्यामुळे सुयोग्य वाक्यांश वापरून सुधारणा करणे सोपे गेले. त्या बद्दल खूप खूप धन्यवाद. पण एकदा साहाय्य मिळाल्यावर मन अजून आशा निर्माण होते त्या प्रमाणे खालील वाक्याचा अथवा he proved to the world that India was not a country forsaken by providence. या वाक्यांशाच्या अनुवादात साहाय्य हवे आहे.

and by his self sacrifice and courage he proved to the world that India was not a country forsaken by providence.

कंजूस's picture

30 Jan 2014 - 10:01 am | कंजूस

स्वत:च्या त्यागाने आणि धैर्याने जगाला दाखवून दिले की भारत असा एक देशा आहे की ज्याला दैवगती कधी साथ देत नाही हे खोटे आहे .

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2014 - 1:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि स्वार्थत्याग आणि धैर्याने त्यांनी 'भारताला दैवगतीने वार्‍यावर सोडून दिलेले नाही' हे जगाला दाखवून दिले.

हे भाषांतर कसं वाटतेय?

नरेंद्र गोळे's picture

1 Feb 2014 - 2:38 pm | नरेंद्र गोळे

हे असेच तर असायला हवे आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2014 - 2:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक छोटीशी सुधारणा...

आणि स्वार्थत्याग व धैर्याने त्यांनी 'दैवगतीने भारताला वार्‍यावर सोडून दिलेले नाही' हे जगाला दाखवून दिले.

जयंत कुलकर्णी's picture

2 Feb 2014 - 9:07 am | जयंत कुलकर्णी

त्याग आणि शौर्याने भारत दैवाच्या हवाल्यावर सोडलेला नाही हे दखवून दिले.....

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Feb 2014 - 12:51 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे भाषांतर खालच्या वाक्याचे होईल, वर दिलेल्या वाक्याचे नाही...
by his self sacrifice and courage he proved to the world that India was not a country left to providence.

सुनील's picture

30 Jan 2014 - 8:21 am | सुनील

कुशासन ह्या (घडवलेल्या) शब्दापेक्षाही अनागोंदी हा मराठमोळा शब्द अधिक योग्य वाटतो.

माहितगार's picture

29 Jan 2014 - 9:29 pm | माहितगार

खालील वाक्यांशातील scruples शब्दाचा उपयोग बहुधा क्लासिकल इंग्लिश मधून येतो

..........respected religious scruples of........

या वाक्यांशाचा सुद्धा अनुवाद हवा आहे.

धर्माचरणात क्षुल्लक गोष्टींना जे {अवास्तव /अनुचित} महत्व दिले जात होते --

सर्वात पहिल्या परिच्छेदासाठी:
राष्ट्रिय नेत्याचा उदो उदो करणे -
{जन}मनामध्ये खोलवर रुजलेले -
दैवगतीने /दैवाने साथ सोडून दिलेले -
सत्ता हिरावून गेलेले-
त्याकाळातील मनमानी राज्यकारभारास-
उद्युक्त केले -
या मतांचे खंडन करून-
मित्रत्वाचे नाते प्रस्थापित-
पर्वा न करता-
उपदेशातील सत्य-
समस्येतील त्रासदायक गोष्ट-
मिळमिळीत शहाणपणा /मुत्सुद्दीपणा-
तेज जागृत केले-
महान मराठा सेनापती-
जनतेचा अप्रस्तुत पुढाकार-
देशाच्या राजकीय परिस्थितीला साजेसा
तोडीसतोड प्रतिकार/लढा
देण्याचे आवाहन -

समस्येचा सर्वांगीण विचार करून बंगालच्या पत्रकारांनी असे मत मांडले/व्यक्त केले .exclaim चूक नाही .

या प्रतिशब्दांचा काही उपयोग होतो का पाहा .

नरेंद्र गोळे's picture

1 Feb 2014 - 9:48 am | नरेंद्र गोळे

by his self sacrifice and courage he proved to the world that India was not a country forsaken by providence
त्यांनी स्वार्थत्यागाने आणि धैर्याने जगाला असे दाखवून दिले की भारत हा दैवकृपेच्या विस्मृतीत जाणारा देश नाही

He was born at a time when the whole nation required relief from misrule
ते अशा काळात जन्मले होते, ज्यावेळी संपूर्ण राष्ट्रास परवश झालेल्या शासनासून मुक्तता हवी होती

misrule
कुशासन, भ्रष्ट शासन, स्वार्थी हेतुने केलेले कुशासन

national hero
राष्ट्रनेता

Hero worship
नेत्याचा जयजयकार, नेत्याचा उदो उदो करणे

deeply implanted
खोलवर रुजलेले

human nature
मानवी स्वभाव

forsaken by providence
दैवाच्या विस्मृतीत गेलेले

shorn of the power
सत्ताविहीन

tyranny of his time
त्या काळातील जुलूम

actuated
कार्यान्वित केले गेलेले

shutting this view
हा दृष्टीकोन सोडून

amicable relations
मित्रत्वाचे संबंध

unmindful
पर्वा न करता

माहितगार's picture

1 Feb 2014 - 9:20 pm | माहितगार

कंजूस आणि नरेंद्र गोळे आपल्या अत्यंत उपयूक्त साहाय्यामूळे अनुवादात चपखल शब्द वापरणे सोपे जाते आहे.

आंतरजालावरून घेतलेल्या टंकीत आवृत्तीत मूळ लेखातील काही शब्द सुटल्याचे अजूनही एक एक करून नजरेस येत असल्यामुळे तसेच टिळकांची लांब लांब पल्लेदार वाक्य यामुळे माझ्याकडून अनुवादात काही गफलत होऊ नये म्हणुन काळजी घेत आहे म्हणून काम रोज थोडे थोडे आणि सावकाश करत आहे.

आपल्या प्रतिसादांकरीता पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

टिळकांच्या ओरायन या ग्रंथाची आठवण झाली .

माहितगार's picture

2 Feb 2014 - 6:52 pm | माहितगार

टिळकांच्या ओरायन या ग्रंथाची आठवण झाली.

होय ’ओरायन’(Orion) शिवाय ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) हि दोन्ही पुस्तके सुद्धा बहुधा आंतरजालावर उपलब्ध आहेत आणि त्यांनाही मराठी विकिस्रोतावर आणून अनुवादीत स्वरूपात उपलब्ध करता येईल.पण हा अगदीच लाँग टर्म प्रकल्प होईल आणि खंदे अनुवादकही लागतील. आपण या धाग्याची सुरवात केली काळाच्या ओघात जे जे होईल ते पाहता येईल.

नमस्कार मराठी विकिपीडिया सदस्य आणि मिपा सदस्य मिळून एखाद्या लेखाचा सामूहीक अनुवाद प्रयत्न करणे असे पहील्यांदाच करून पहात आहोत. मराठी विकिस्रोतात मूळ उतार्‍यास जवळचा अनुवाद केलातरी पर्यायी शब्द वापरून आपण अनुवादाचे एक पेक्षा अधिक पर्याय संभवतात आणि आपण तसे उपलब्ध करून देऊ शकतो. आणि आपण या वेळी तसा प्रयत्न केला आहे. म्हणजे जुन्या मराठीतले शब्द घेऊन सध्याप्रचलीत शब्द देऊन प्रमाण मराठी अथवा स्थानीय शैलीची मराठी किंवा मिंग्लीश असे विवीध अनुवाद पर्याय देणे शक्य होऊ शकते.

अनुवादाचा पहीला पर्यायातही या धाग्यावरील चर्चेतील शब्दयोजना वापरली आहे पण पहिल्या पर्यायाय मी आणि आणखी एक मराठी विकिपीडिया सदस्य नरसिकरजी आम्हा दोघांचे शब्द भांडार अधिक आहे. या पहिल्या पर्यायाचा अनुवाद पूर्ण होऊन मनोगत शुद्धलेखनचिकीत्सकाच्या साहाय्याने चिकित्सा केली असून कुणी शुद्धलेखन जाणकार व्यक्तीची प्रतिक्षा आहे. सोबतच तो अनुवाद अजून एकदा कुणी तपासून घेऊन सुयोग्य असल्याची खात्री करून हवी आहे. माझ्या अंदाजा नुसार हा अनुवाद आपण शिवजयंती पर्यंत म्हणजे १९ फेब्रुवारीला मिपावर वेगळ्या धाग्याच्या रूपाने उपलब्ध करून देऊ(शकू)यात असा मानस आहे. त्या नंतरही काही सुधारणा सुचवल्या गेल्यास विकिस्रोतावर विकि असल्यामुळे सुधारणा आणि अद्ययावत करत राहू शकतो.

अनुवाद पर्याय २ मध्येही आमचे शब्द असले तरी या धाग्यावर सुचवलेल्या शब्दांचा अधिक उपयोग केला आहे. अर्थात पर्याय २ अनुवाद उपलब्ध असला तरी त्याच वेगळेपण जाणवण्याच्या दृष्टीने अधिक काम होऊन हवे आहे असे वाटते.

अनुवादाचा प्रयत्न काळजी न करता सहज कुणासही करून पाहता यावा म्हणून संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर सर्वात वर संपूर्ण मूळ इंग्रजी लेख दाखवा लपवा साचात लावून दिला आहे त्या खाली लेखाची ३१ वाक्य गटांमध्ये विभागणी करून पहिल्या अनुवादाचा पर्याय दाखवला आहे त्या खाली वाक्यगट पुन्हा एकत्रित स्वरूपात दाखवला आहे. त्या खाली अनुवाद पर्याय २ उपलब्ध केला आहे. चर्चा पानावर असल्यामुळे काही चुका झाल्यासही खुप काळजी करावी लागणार नाही बदल कुणासही मोकळे पणाने करून पाहता येतील असे वाटते. आणि त्या करता आपणा सर्वांच्या मराठी विकिस्रोतवरील सुधारणा आणि लेखन योगदानाची आणि सूचनांची विनम्र प्रतीक्षा आहे.

धन्यवाद