भिगवण....

किल्लेदार's picture
किल्लेदार in भटकंती
14 Jan 2014 - 12:19 pm

भिगवण ला पक्षी येऊ घातले आहेत....तरी हौशी पर्यटकांनी जाऊन यावे .

Spoon copy

Moorhen1 copy

IMG_9298 copy

IMG_9265 copy

IMG_9095 copy

Ibis copy

Flock copy

Flemingos copy

Flem copy

Duck copy

Duck1 copy

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

14 Jan 2014 - 12:22 pm | खटपट्या

ज ब र द स्त !!!

विटेकर's picture

14 Jan 2014 - 12:23 pm | विटेकर

क्लास !!!

वात्रट मेले's picture

14 Jan 2014 - 12:24 pm | वात्रट मेले

अहो किल्लेदार कस जायचे ते पन सांगा ना

पेस्तन काका's picture

15 Jan 2014 - 12:31 pm | पेस्तन काका

वा.मे. भिगवण हे पुणे - सोलापुर रोड ला आहे. साधारण ११० किमी.
पुण्याहुन सोलापुरला जाताना डाव्या हाताला भिगवण गाव लागते त्यापुढे साधारण १ किमी अन्तरावर कुम्भारगावासाठी रस्ता डावीकडे वळतो. कुम्भारगावात पोहोचल्यावर तिथे नितीन म्हणुन गाईड आहे (हवा असल्यास मो.क्र. मिळेल) त्यास भेटा. तिथे उत्तम चहा, नाश्ता व प्युअर मास्यान्चे जेवण व पक्षी निरिक्षणासाठी बोट ची व्यवस्था आगदी वाजवी दरात होयिल.

स्पा's picture

14 Jan 2014 - 12:26 pm | स्पा

अप्रतिम

फोटू तेवढे मोठे टाकले असते तर अजून मजा आली असती

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jan 2014 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू पांडूब्बा!

नांदेडीअन's picture

14 Jan 2014 - 1:00 pm | नांदेडीअन

पहिला चमच्यांचा फोटो सोडून बाकी सगळ्या फोटो Overexposed आल्या आहेत. (का मलाच तशा दिसत आहेत ?)

प्यारे१'s picture

14 Jan 2014 - 1:45 pm | प्यारे१

>>>चमच्यांचा फोटो

पक्ष्यांचं नाव चमचे? का गल्ली का शहर सगळंच चुकलंय?

यसवायजी's picture

14 Jan 2014 - 5:12 pm | यसवायजी

चोचीचेचम्चे..

नांदेडीअन's picture

15 Jan 2014 - 1:29 am | नांदेडीअन

हो, त्या फोटोतले ते Eurasian Spoonbills आहेत.
त्यांना मराठीत चमचा म्हणतात.

लॉरी's picture

14 Jan 2014 - 1:04 pm | लॉरी

मस्तच

प्यारे१'s picture

14 Jan 2014 - 1:45 pm | प्यारे१

फोटो आवडले.

प्रचेतस's picture

14 Jan 2014 - 1:49 pm | प्रचेतस

फोटो छान. पण निदान इतर काही लिहिले नाही तरी पक्ष्यांची नावे तरी येऊ देत.

हे सगळं कधीपर्यंत चालेल, कै अंदाज? नै म्हणजे पक्षी उडून जायच्या आत तिकडे भेट देईन म्हंटो.

आनंदराव's picture

14 Jan 2014 - 4:32 pm | आनंदराव

मिपा करांनो, भिगवण ला जाण्याचा एकत्र कार्यक्रम ठरवूयात का?

आनंदराव's picture

14 Jan 2014 - 4:33 pm | आनंदराव

एकत्र जाण्याचा...

सौंदाळा's picture

14 Jan 2014 - 4:39 pm | सौंदाळा

छान फोटो.
थोडी माहीती असती तर मजा आली असती.

कधीपासुन विचारेन विचारेन म्हणतोय आता हा धागा सोयीस्कर आहे विचारायला.
चांगली दुर्बिण घ्यायची आहे (बजेट अंदाजे ५०००), कोणती घ्यावी? काय पॅरामीटर्स बघुन घ्यावी
उपयोगः पक्षीनिरीक्षण, ट्रेक वगैरे. (कॅमेर्‍याला जोडता येइल अशी वगैरे गरज नाही, ग्रह्-तारे पण बघायचा विचार नाही)
एखादी लिंक (माहीतीसाठी, खरेदीसाठी) दिली तर उत्तम.

कंजूस's picture

14 Jan 2014 - 6:26 pm | कंजूस

#सौंदळा ,
दुर्बिण A) 7X50 ,
(B) 8X36 ,अथवा8X40
(C)10X50 पैरामिटरच्या पक्षी बघण्यासाठी घ्या .(C)टाईप मध्ये हात स्थिर राहात नाही पण दृष्य मोठे छान दिसते
(B)टाइप आटोपशिर असतात न्यायला सोप्या .

कंपनी Olympus ,Nikon ,Minolta

मिळण्याचे ठिकाण
सेंट्रल कैमरा ,सिएसटी .
हिरापन्ना शॉपिंग सेंटर हाजीअली ,मुंबई .
2)फोटो आवडले आणि तुम्हाला ब्राह्मणी बदक छान मिळाले आहे .

पुणे दौंड मार्गावर जे भिगवण स्टे येते तिथून हा तलाव कसा गाठायचा ?

नांदूर माध्यमेश्वर पण असेच झकास आहे .

घरी ओव्हर एक्सपोड वाटले नाहीत पण ऑफिस च्या संगणकावर थोडे वाटत आहेत.

बाकी नावे विचारू नका कोणी पक्षिमित्र असेल तर प्लिज सांगा.

फेब्रुवारी महिना पक्षी बघायला बेस्ट आहे

सुहास..'s picture

14 Jan 2014 - 9:20 pm | सुहास..

व्वा !!

च्यामायला इतक्या वेळा भिगवण ला गेलो पण इथे जायचा काय मुहुर्त लागेना :)

नांदेडीअन's picture

15 Jan 2014 - 1:56 am | नांदेडीअन

1) Eurasian Spoonbills - चमच्या
2) Purple Swamphen/Purple Moorhen - जांभळी पाणकोंबडी
3) Black Winged Stilt - शेकाट्या
4) Open bill stork - मुग्धबलाक
5) Greater flamingo - रोहित/अग्निपंख
6) Black headed Ibis - पांढरा शराटी
8) उडणारे पक्षी नेमके कोणते Gulls आहेत हे सांगणं अवघड आहे.
10) Bar headed goose - पट्टकादंब
11) Ruddy Shelduck - ब्राम्हणी बदक/चक्रवाक

चुकल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

पहाटवारा's picture

15 Jan 2014 - 6:56 am | पहाटवारा

छान फोटोंसाठी धागाकर्त्याला अन नावांसाठी तुम्हाला !
काहि अजून खासीयत असेल या पक्श्यांची तर तीहि लिहा.
-पहाटवारा

नांदेडीअन यांची यादी बरोबर आहे .

यातले १० आणि ११ सोडून सर्व उरण जेएनपिटी परिसरात ऑक्टोबरमध्ये असतात .

पेस्तन काका's picture

15 Jan 2014 - 12:20 pm | पेस्तन काका

किल्लेदार साहेबा कधी गेला होतात... आम्ही मागच्याच आठवड्यात चक्कर टाकली पण काय गावले नाय फ्लेमीन्गो..
पाणी आजुन बी लयी हाय त्यामु़ळ पक्षी नाय आलय अजुन..

किल्लेदार's picture

15 Jan 2014 - 4:29 pm | किल्लेदार

मी डिसेंबर एन्ड ला गेलो होतो.

कंजूस's picture

15 Jan 2014 - 4:43 pm | कंजूस

फ्लेमिंगोंचे पंधराएक वर्षांपूर्वी फारच अप्रुप होतं .
फक्त माळशेजच्या खुबी परिसरांत दिसायचे .
आता शिवडी जेट्टी आणि तुर्भे किनाऱ्याकडे भरपूर दिसतात .

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jan 2014 - 8:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

..आजच सकाळ मध्ये बातमी वाचली न आता हा धागा

चला आता एका वीकेंडला भिगवण..

भ ट क्या खे ड वा ला's picture

15 Jan 2014 - 9:57 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान फोटो , आणि प्रतिसाद सुद्धा , हल्ली खुबी ला पक्षी येत नाहीत असे समजले, शिवडीत भरपूर असतात

जाताजाता , TurTur नाटकातील एक पद्य आठवले भिगवण वरून
गावामागून गाव गेली आल भिगवण
कोणास ठाऊक कसे असेल तिथले जेवण

आता पक्ष्यांचा विषय निघाला म्हणून लिहितो .
या पाणपक्ष्यांपैकी समुद्र अथवा खाडीपाशी येणारे पाहायचा नंतर कंटाळा येतो .सैंडपायपर चा थवा आकाशात घिरट्या घालतो ते फार सुरेख दिसते .

तलावाकडे येणाऱ्यांत निरनिराळी बदके ,फेजंट टेल ,पाणकोंबड्या फारच छान असतात परंतु ते फारच सावध असतात .

खरी पाखरं ,गाणारी पाखरं मात्र रानपक्षी .फारच नशीब लागते ते दिसायला .
आगोट्याला( कोकणातला शब्द =एप्रिल मे चा काळ) फार बोलतात (यांना कंठ फुटतो .)

सौरभ उप्स's picture

16 Jan 2014 - 2:11 pm | सौरभ उप्स

मस्त फ्रेश आहेत फोटो

किल्लेदार's picture

16 Jan 2014 - 4:25 pm | किल्लेदार

धन्यवाद

किल्लेदार's picture

16 Jan 2014 - 4:25 pm | किल्लेदार

धन्यवाद

सुदर्शन काळे's picture

16 Jan 2014 - 4:29 pm | सुदर्शन काळे

अप्रतिम फोटो आहेत. मुंबईच्या आसपास शिवडी / उरण परिसरातदेखील फ्लॅमिंगोस दिसतात. पण, तिथे नक्की कुठल्या ठिकाणी जावं लागतं याबद्दल कोणी सांगू शकेल का? (शिवडीजवळ)

गूगलमॅप्सचा संदर्भ दिल्यास फार छान

कंजूस's picture

16 Jan 2014 - 7:41 pm | कंजूस

#सुदर्शन काळे ,
शिवडीसाठी गुगल मैप्स कशाला हवेत ?
नाहितर दादर माहित असेल तर वाहनाने पुढचे सोपे आहे .शिवडी स्टेशनला सिएसटीला आलात तरी चालत वीस मिनीटावर आहे .
चेंबूर तुर्भेकडून कोळीलोकांची बोट करावी लागते .
जाण्याची वेळ :चंद्राची तिथी पाहावी