भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)

यसवायजी's picture
यसवायजी in भटकंती
21 Dec 2013 - 2:10 am

--------------------------------------------------------------------------
भ्रमण जर्मनी.. ००
भ्रमण जर्मनी.. ०१ - म्युनिक
भ्रमण जर्मनी.. ०२ - साल्झबर्ग (ऑस्ट्रिया)
भ्रमण जर्मनी.. ०३ - नॉयश्वानस्टाईन कॅसल
भ्रमण जर्मनी.. ०४ - कलोन
--------------------------------------------------------------------------

आपल्याकडे ट्रॅक्टरचा उपयोग माल वाहुन न्यायला करतात. आणी जर्मनीत पण??
पुढे-
वेळ पाळण्याच्या बाबतीत सगळेच काटेकोर होते. एखाद्या वेळेस जर काही चुकलेच तर, 'आपणच चुकीचे असू' असे ठरवावे, इतकी परफेक्ट सिस्टीम. पण...
म्युनीक ते न्युरेम्बर्गची ट्रेन काही कारणाने आलीच नाही. मग स्टेशन मास्तराने सांगीतले की, ज्यांचे आरक्षण आहे त्यांनी एकतर तासभर वाट पाहावी किंवा दुसर्‍या एका ट्रेनमधुन म्युनीकला जावे. दुसरी ट्रेन १० मिनीटातच होती. त्यामुळे
२ ट्रेनचं पब्लीक एका ट्रेनमधे जायला फलाटावर गोळा झालं. इतकी गर्दी झाली की छ.शि.ट.वर असल्यासारखे वाटत होते. आमचे आरक्षण नसल्याने जागा 'पकडायची' होती. त्या दिवशी आमच्या सुप्त गुणांना जर्मनीत वाव मिळाला. दिवाळीत घरी जाताना KSRTC च्या बसमधे 'डायवर-शिट'कडुन जाणे किंवा अगदी खिडकीतुन प्रवेश मिळवण्याची कला अवगत असल्याने, जास्त त्रास झाला नाही.
जर्मन्स बाहेर फारसे कुणाशी बोलत नाहीत. ट्रेनमधे बाजुच्या सिटवर अगदी 'रासलीला' चालु दे किंवा एखादा 'कॅरेक्टर ढीला' बसुदे, काही सोयर सुतक नसते. आमच्या डब्ब्यात काही अपवाद वगळता सर्व शांतता होती. अपवाद एवढेच होते की, एका कोपर्‍यात एक तमीळ कुटुंब छिन्न्गुडगुडे नाडगुडगुडे ;) करत होतं, दुसरीकडे आमचा बेंगाली बाबु (गावाला ऐकु जाईल इतक्या आवाजात) हेडफोनवर 'चिकनी चमेली' ऐकत होता. मी भारतीय रेल-प्रवासाशी तुलना करत होतो इतक्यात , "बाबा, माझे पाय दुखताहेत" म्हणत एक मुलगी रडू लागली. गर्दीत काहीच दिसत नसताना मी ओरडलो, "ओ भाऊ,तीला इकडे पाठवून द्या". तीला माझ्याच सीटवर अ‍ॅडजस्ट करुन घेत त्या पुणेकर बाबाशी माझ्या गप्पा चालु झाल्या.

साल्झबर्ग- ऑस्ट्रीया
पॅरीस्,प्राग,व्हेनीस,का बर्लीन यावर भांडुन झाल्यावर अगदी जवळच्याच साल्झबर्गला जायचं ठरलं.
१. ट्रेनचा प्रवास:- आरामदायक पुश्-बॅक सीट, कमालीची स्वच्छता, मोठ्या काचांतुन दिसणारा हिरवागार निसर्ग, गाई, घोडे, पर्वत्, नद्या, आणी स्वप्नातली घरे.. और क्या चाहीए??

DSC06075

ऑस्ट्रियात असणारे साल्झबर्ग हे शहर जर्मनीच्या दक्षीण सीमेजवळ आहे. Salzach नदीच्या किनारी, आल्प्सच्या सानिद्ध्यात वसलेले हे गाव एक 'कल्चरल वर्ल्ड हेरीटेज साईट' आहे. Baroque architecture / स्थापत्यकलेसोबतच इथली महाविद्यालये प्रसिद्द आहेत.रोमन्/गॉथीक शैलीचे चर्च पाहावयास मिळतात. जगप्रसिद्द संगीतकार 'मोझार्ट' यांचे जन्मस्थान असलेल्या साल्झबर्गच्या नसानसात संगीत आहे. मीठ वाहुन नेणार्‍या जहाजांमुळे या शहराला Salzburg हे नाव पडले म्हणतात.
समर ओपेरा इवेंट, शंभर वर्षांपासुन जुलै-ऑगस्ट्मधे भरणारा Salzburg Festival सुद्धा प्रसिद्ध आहेत. ऑस्ट्रो-बवेरीयन हा जर्मन भाषेचाच एक डायलेक्ट इथे बोलला जातो.

२. म्युनीकप्रमाणे आम्ही इथेही हॉप्-ऑन्-हॉप्-ऑफ बस निवडली. असे सगळीकडे 'पेव्हड ब्लॉक' आहेत. च्यामारी फक्त तिथलेच उखडत कसे नाहीत कोणास ठाऊक?? आणी नाहीतर आपल्या इथे.. जाऊदे.

DSC05629

या बसवर जे चित्र दिसतेय, ते १९६५ सालच्या Sound of Music नामक सुप्रसिद्ध, ढीगभर पुरस्कार विजेत्या चित्रपटातील आहे. माझ्यासारखा बर्‍याच जणांनी अजुन हा पाह्यला नसेलच अशी खात्री आहे. :) यातील Julie Andrews नामक हिरवीणीचा जन्मही Salzburg येथेच झालाय. बसमधे गाईडच्या ऐवजी हेडफोन साथ देतात. शहराची माहिती घेत आणी या चित्रपटातील गाणी ऐकत जुन्या शहरातुन आपण फिरु शकतो. या शहरातील बर्‍याच जागांचे चित्रीकरण Sound of Music मध्ये झालंय.

३. जाता-जाता काढलेला तिथल्या जंगली महाराजांचा फटु-

DSC02032

४. युरोपातली आवडलेली अजुन एक गोष्ट म्हणजे इथल्या खिडक्या. सगळ्या खिडक्या फुलांनी सजवलेल्या पहावयास मिळतात.

DSC02028

५. आमचा पहिला थांबा होता 'मीराबेल गार्डन्स'. (Mirabell Palace and Gardens). या फोटोत मागे दिसणारे ते पॅलेस UNESCO हेरीटेज आहे.

P1010506

६. १६ व्या शतकात बांधलेलं हे मीराबेल पॅलेस १८ व्या शतकात आगीत जळालं होतं. सध्या इथली बाग भुमिती वापरुन बनवलेल्या फुलांच्या नक्षी, पुतळे, कारंजे यांनी पर्यटकांना आकर्षीत करते. या बागेत डो-रे-मी हे गाणं शूट झालंय असे समजले. या चित्रात जो डोंगरावर दिसतोय तो आहे Hohensalzburg फोर्ट.

P1010509

७. गेल्याच पावसाळ्यात येथे महापूर आला होता.. Salzach नदीत बोटीतुन फिरायची व्यवस्था आहे. या राईड मध्ये आल्प्सचेही दर्शन घडते. ट्रीप थोडी महाग असली तरी पैसे वसूल होतात.. असा बर्फ जिंदगानीत पयल्यांदाच बघितल्याने त्या जर्मन मुलीला (आणी ब्रिटीश कप्तानाला) 'जांदो..और आग्गे जांदो..' असे ओरडुन सांगावेसे वाटत होते..

DSC02006

जाताना सुंदर पुल दिसत होते.

DSC02000

कप्तानाचे विनोद चालले होते. बरेच अंतर गेल्यावर त्याने एकाजागी बोट थांबवली. कसलीतरी चक्रं बराच वेळ गोल्-गोल फिरवली.. इंजीनाचा जोरात आवाज येऊ लागला.. आणी बोटीने 'गर्रर्र'कन 'स्पॉट टर्न' मारला. मस्त 'हवाका झोका' आला, आणी त्या ३६० डिग्री टर्नने मजा़ आली.. अविस्मरणीय अनुभव.

DSC02003

८. नदीतुन जाताना किनार्‍यावरची हिरवळ पाहातच होतो.. ड जीवनसत्वाचा आभाव जरा जास्तच आहे तिकडे.. ;)
ते फोटो नाहीत, पण त्याऐवजी दिसलेली ही युन्वर्सीटी बघा.. साल्झबर्ग येथे पुण्याप्रमाणेच विद्यार्थी बरेच आहेत..

DSC01993

९. आम्हाला फक्त मद्रासचा मोझार्ट माहिती.. 'ए.आर' आणी 'आर.डी' इथेच आमचे संगीत घुटमळायचे.. लहानपणीच मोझार्टने किबोर्ड आणी व्हायोलीनवर प्राविण्य मिळविले होते. आम्हाला 'मोझार्ट मोन्युमेंट' पाहायला मिळाले. कुणीतरी मोझार्ट बद्द्ल म्हटले होते, "Posterity will not see such a talent again in 100 years". या गावात बरेच रस्ते, चौक, इमारती, पुल यांना मोझार्टचे नाव दिलंय. बहुतेक मार्केटींगचा भाग असावा. त्याच्या नावाने गोड्-धोड पदार्थसुद्धा आहेत जसे की, Mozartkugeln. हा एक चॉकलेट्चा बॉल असतो.
Wolfgang Amadeus Mozart. १७५६-१७९१.

DSC05648

असं म्हणतात की मोझार्टला साल्झबर्ग आवडत नव्हते. तो इथे फक्त एक बिशपचा सेवेकरी होत. पण त्याच्यामुळे इतकी प्रसिद्धी मिळाली या शहरास.

IMG_3955

१०. एका चौकात बुद्दीबळाचा डाव मांडलाय. मुफ्त..मुफ्त्..मुफ्त.. पण वाट पहावी लागते.
वातावरण एकदम मस्त होते. यालाच Mozartkugel monument म्हणतात. (चॉकलेटचा प्रकार)

DSC01974

११. वरच्या फोटोतल्या फोर्टला जायला ट्रेन सुद्धा आहे. या ट्रेनची सुरुवात १८९२ ला झालीय. पण आम्ही गिर्यारोहणाचा मार्ग स्विकारला.. गल्ली-बोळातुन साल्झबर्ग एक्स्प्लोर करायला मजा आली. पण उन्हाचं दमुन गेलो.

P1010527

हाच तो Hohensalzburg फोर्ट. १०७७ साली बांधण्यात आलेल्या या फोर्टवर झालेल्या गेल्या ९०० वर्षांच्या इतिहासात, आक्रमणात कोणालाही विजय मिळाला नाही. बर्‍याचदा याचे बांधकाम झाले, बदलले. आता इथे एक म्युझीयम आहे.

DSC01975

DSC05692

किल्ल्यावरुन दिसणारं साल्झबर्ग कॅथेड्रल.. एवढी मेहनत घेतली तरी, इथलं दृष्य थकवा घालवतं.

P1010590

१२. लिओपोल्ड्स्क्रोन. १७३६ ला बांधण्यात आलेला महाल. 'लिओपोल्ड'ने बांधला. पण पुढे बवेरीयाचा राजा 'लुयीस-I' याचे निवासस्थान होते. सध्या ही खाजगी मालमत्ता असल्याने फक्त बाहेरुन पाहता येते. पण येथील बागेत प्रवेश आहे.

DSC05668

DSC05669

१३. परतताना या दोघींचा फोटो काढायचा मोह आवरला नाही.. मागची एकदम कार्टुन कॅरेक्टर होती.

DSC05677

१४. लिव्ह लाईफ किंग साईझ..
अशा बाईक्स भाड्याने मिळतात. लक्षात असु द्या.. बायकोला खुश्श कराल.. काय तो थाट.. व्वा!!!

P1010519

मॉरल ऑफ द स्टोरी- 'प्रागला गेलो असतो तर बरे झाले असते का?' असे काहीदा वाटत होते.. पण एकदा भेट द्यायला काही हरकत नाही.. वेन्जॉय.

---------
|| SYG ||
---------

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

21 Dec 2013 - 2:24 am | अर्धवटराव

लईच भारी चाललीय सफर. तुमच्याच भाषेत.. और आन्दो.

अवांतर - कोण म्हणतं मराठी माणुस फक्त एकमेकांचे पाय ओढतात म्हणुन... तुम्ही अगदी साद घालुन त्या छोटुकलीला बसायला जागा दिली त्याबद्दल तुमचा अभिमान वाटला.

अतिअवांतर (पण महत्वाचं...) - ते "डी" जीवनसत्वाचे फोटो डकवायचे होते राव ;)

त्या गर्दीत कशी हाक मारायची याचा विचार मनात आला होता, पण जनाची न राखता मनाची राखली आणी ओरडलोच.
थोड्याच वेळात ती मुलगी मांडीवर डोके ठेउन झोपली. छोटे मोठे प्रसंग, पण अच्छा लगता है.. :)
---
ड जीवनसत्वाचे फोटु? :D

बॅटमॅन's picture

21 Dec 2013 - 6:21 am | बॅटमॅन

अतिशय उच्च!!! फटू अन वर्णन सगळेच एकदम जबरी. अर्धवट्राव म्हंटाहेत तसं ड गटातील उदाहरणांचं बघा जरा ;)

अन बाईक्सचं लक्षात ठेवेन, धन्यवाद!

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Dec 2013 - 7:29 am | लॉरी टांगटूंगकर

झक्कास!!!!!!!
अजून फोटो हवेत.

यसवायजी's picture

21 Dec 2013 - 12:04 pm | यसवायजी

धन्यवादगळू मित्रांनो..

बॅट्या, ते ड जीवनसत्वाचं नंतर बघु, आधी ते क्रिम्पातुल गिम्बातुल काय हाय सांग.

हात्तेरेकी. अबे ते लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये त्या रिंगवरती ल्हिलेला मजकूर हाये तो.

यसवायजी's picture

21 Dec 2013 - 12:34 pm | यसवायजी

.

जेपी's picture

21 Dec 2013 - 6:46 am | जेपी

आवडेश .

संजय क्षीरसागर's picture

21 Dec 2013 - 8:46 am | संजय क्षीरसागर

नाही तरी काय करायचं पैश्याच? होऊं दे खर्च!

चौकटराजा's picture

21 Dec 2013 - 8:54 am | चौकटराजा

मोसार्ट, टेकडीवरचा वाडा, चेसचा रस्त्यावरील पट, साउंड ऑफ म्युझिक चा साईट ही साल्झबर्गची वैशिष्टे आहेत. त्यातील
बहतांश तुम्हाला पहायला मिळाली .धन्य आहात राव !

वेल्लाभट's picture

21 Dec 2013 - 12:53 pm | वेल्लाभट

आ हा हा ! क्या बात

काय फोटो आहेत ! वाह.... बघूनच वेडा झालो..... तसा स्विसला जाऊन आलोय; जर्मनीची झाक तिथेही जाणवते. पण जर्मनीला जायला हवं हे नक्की !

प्यारे१'s picture

21 Dec 2013 - 1:29 pm | प्यारे१

कल्लाच केलासा की!

बाकी आम्ही आपलं नुस्तं इतरांना 'आणुमोदण' देतो!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Dec 2013 - 2:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटू आणि वर्णन भारीच. बाकी, बाईक लैच आवडली. आणि ते ड जीवनसत्वाचं काय चाललंय. व्यक्तिगत निरोपातून टाका पण संकोच करु नका. ;)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

21 Dec 2013 - 3:08 pm | अत्रुप्त आत्मा

सगळेच फोटू अवडले..पण जंगली' महाराज लै भारी. त्यांचं शरीर पहाता,ते त्यामागच्या वेलीतूउनच प्रगट झालेत असं वाटतं... मुद्रा छळू आहे... =)) आपल्या त्या.... दु... दु... =)) सारखी!

अमेय६३७७'s picture

21 Dec 2013 - 4:10 pm | अमेय६३७७

सुंदर सफर आणि चित्रे. शेवटची बाईक भारीच एकदम.

यसवायजी's picture

21 Dec 2013 - 10:01 pm | यसवायजी

अजुन १ इंटरेस्टींग फोटो - साल्झबर्गमधे विजेच्या तारांचं जाळं पसरलय गावभर. या तारांबरोबर फोटोत दिसतात अशा रेल्वेसारख्या बस फिरतात. (ड्रायव्हर असतो.) तार2तार स्विच्-ओव्हर करीत या बस जातात. नो पोल्युशन. आणी ट्रामसारखी रुळांची गरज नाही. याच मार्गावर इतर गाड्याही मागेपुढे जात्-येत असतात.

DSC02068
sommore

DSC01958

DSC02029

सुधीर कांदळकर's picture

22 Dec 2013 - 9:52 am | सुधीर कांदळकर

एकदम झकास. काही चित्रे छोटी आहेत. ती पूर्ण आकारात आल्यास मजा वाढेल.

पुभाप्र.
धन्यवाद

यसवायजी's picture

22 Dec 2013 - 1:53 pm | यसवायजी

धन्स.
आपल्या सूचनेप्रमाणे आकार वाढविला आहे.

पियुशा's picture

22 Dec 2013 - 11:05 am | पियुशा

लय भारी फोटु , मुली कसल्या गोड आहेत :)

विजुभाऊ's picture

22 Dec 2013 - 11:40 pm | विजुभाऊ

अरे व्वा. मस्त सफर घडवलीत

यसवायजी's picture

23 Dec 2013 - 10:05 pm | यसवायजी

पेश्शल ठ्यांक्स टू ईजूभाऊ.. :)
अशीच किर्पा असू द्या..

पैसा's picture

24 Dec 2013 - 6:01 pm | पैसा

मस्तच चाललंय!

चित्रगुप्त's picture

24 Dec 2013 - 6:22 pm | चित्रगुप्त

मोझार्टच्या गावी जाऊन आलात, म्हणून आधी आमचा साष्टांग दंडवत स्वीकारा. पुढे कधी एकादा मोझार्टचा संगीत कार्यक्रम पण अवश्य बघा.
फोटो आणि वर्णन सुरेख.