कबुतरांचा दहशतवाद

तिमा's picture
तिमा in काथ्याकूट
11 Oct 2012 - 4:39 pm
गाभा: 

मुंबईत आम्ही एका उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर रहातो. सोसायटीला आता तशी बरीच वर्षे झाली आहेत. पहिली अनेक वर्षे या वरच्या मजल्याचे आम्हाला आणि घरी येणार्‍या परिचितांना कोण कौतुक होते. भरपूर हवा, प्रकाश यामुळे पंख्याची आवश्यकताही कमी भासे. तसेच, वर गच्चीत जाणे हे सोपे असल्यामुळे, ते एक विशेष आकर्षण होते. संध्याकाळी नुसते गच्चीत जाऊन पाय मोकळे केले व चौफेर दिसणारे विहंगम दृश्य बघत बसले तरी एखादा तास सहज जात असे.
कालांतराने सोसायटीतले जुने सदस्य सोडून जायला लागले व त्यांच्या जागा, अव्वाच्यासव्वा किंमतीला विकत घेऊन, अमराठी सदस्य वाढायला लागले. कुणाचे धार्मिक असणे ही त्याची वैयक्तिक बाब आहे असे मी समजत होतो. पण या नवीन लोकांनी त्यांचे कल्चर बरोबर आणले. सोसायटीच्या दोन इमारती आहेत. या दोन्ही इमारतींच्या गच्चीवर आणि खिडक्यांच्या बाहेरच्या वेदरशेडवर, हे पुण्यात्मे धान्य टाकू लागले. रोजच हे अन्नछत्र सुरु झाल्याने प्रचंड प्रमाणात कबुतरे गोळा होऊ लागली. कावळे व मैनाही हजेरी लावू लागल्या. पण त्यांचा काही त्रास नव्हता, कारण ते हुशार पक्षी असल्यामुळे घरांत येत नाहीत. कबुतरे मात्र सर्रास घरांत येऊ लागली. खिडकीच्या जाळ्या मोठ्या असल्यामुळे ती सहजच आंत प्रवेश करत. सुरवातीला काठीने हांकलल्यावर ती दिवसभर परत येत नसत. पण नंतर त्यांची संख्या वाढल्यावर तो एक मोठाच त्रास झाला. सोसायटीच्या मिटिंग्समधे सांगून देखील हे पुण्य गोळा करायला बसलेले सदस्य ऐकेनात. कबुतरांच्या विष्ठेने इमारतीचे नुकसान होते आहे, कारण ती अ‍ॅसिडिक असते, हेही त्यांच्या डोक्यात शिरेना.
सध्या स्थिती इतकी वाईट आहे की,दिवसा घरी असलो तरी खिडक्यांच्या सरकत्या काचांमधे बारीक फट ठेवावी लागते. ती चुकून जरी मोठी झाली तरी लगेच एखादी जोडगोळी आंत येऊन उंच कपाटावर बसते आणि ते 'कुटुरघुम' चालू होते. त्यांना हाकलायला गेले तरी, उघडलेल्या खिडकीतून पटकन बाहेर न जाता, ती दुसर्‍या बंद खिडकीवर धडका मारत रहातात आणि बाहेर जाईपर्यंत शिटत रहातात. अशा तर्‍हेने आम्ही या कबुतरांच्या दहशतवादाचा रोज सामना करत आहोत. जोपर्यंत त्या, कबुतराएवढाच मेंदू असलेल्या,, सदस्यांच्या डोक्यात उजेड पडत नाही तोपर्यंत हे असेच चालणार!
कबुतरे हांकलायला पेस्ट कंट्रोलचे उपाय महागडे आहेत. एखादा साधा उपाय कुणी सुचवू शकेल काय ?

प्रतिक्रिया

गणपा's picture

11 Oct 2012 - 4:47 pm | गणपा

दिवाळी येतच आहे. लवंगी फटाक्यांच्या माळांचा वर्ष भराचा स्टॉक करुन ठेवा.
टेस्टेड अन प्रुव्हन. ;)
हाकाअनाका.

रच्याकने : तिरशिंगराव शाकाहारी आहात काय?

पैसा's picture

11 Oct 2012 - 7:00 pm | पैसा

घरात फटाके लावायला सांगतोस की काय रे! त्यापेक्षा केपा आणि रोल वाली दिवाळीतली पिस्तुले बरी!
बाकी कबूतर हा सर्वात त्रासदायक पक्षी आहे याबद्दल वादच नाही. या लेखाच्या निमित्ताने त्रास देणार्‍या बोक्यावरचा लेख आठवला!

सोत्रि's picture

12 Oct 2012 - 8:53 pm | सोत्रि

आमच्या गावाकडे कबुतरे न खाता पारवे खातात ब्वॉ!

- (पारवा खाल्लेला) सोकाजी

खी खी खी आमच्या कंपनीच्या शॉप फ्लोअरलापण बरीच पारवे अन कबुतरे वास्तव्य करुन असतात ,जॉब वर घाण करतात फ्लोअर घाण करतात अन कधी कधी एखाद्याच्या डोक्यावरही ;)
आमच्या स्वीपरने कापडाचा एक मोठा बॉल तयार केलाय तो त्याने हाकलतो ती कबुतर.
कधी कधी आम्हीदेखील मदत करतो तेव्ह्ढाच टाइंमपास,पण ते तात्पुरते जातात पुन्हा येतात गुटरगु करायला
पण दिवाळीच्या सुट्टीत ४ दिवस कंपनी बंद असते मग आम्ही कबुतरांना थोड धान्य अन पाणी ठॅवूण देतो :)

आमच्याइथेही सर्व परिस्थिती अश्शीच.. पुण्यात्मे धान्य फेकत राहतात आणि कबुतरांची संख्या चक्रवाढीने वाढत राहते. खिडकीखालच्या वळचणीला हमखास घरटी करतात, पिल्ले घालतात त्यातली काही मरतात. किंवा जगली तरी अनेक आठवड्यांची शी तिथेच एकाजागी जमा होत राहते. दुर्गंधी आणि पिसवा वळवळताना दिसतात.

विंडो एसीच्या वर बसून घाण केल्याने त्या विष्ठेचे थरच्या थर एसीवर बसतात आणि हवेवाटे दुर्गंधी आत येते. वाळलेली विष्ठा नंतर घासूनही निघत नाही.

हे सर्व गलिच्छ आहे. विष्ठेत पाणी मिसळलं की ती इमारतीलाही हानीकारक आहे.. पण ऐकण्याच्या मनःस्थितीत हे लोक नसतातच ना.. पुण्य मिळवण्याचा पगडा फार आहे. मला वाटतं कबुतरांना दाणे दिल्याने व्यवसायात भरभराट होते असं कोणीतरी सांगून ठेवलं आहे, म्हणून हे चालतं.

आमच्याइथे आणखी एक मोठा प्रॉब्लेम आहे, ज्यासाठी एमएसईबीने(वीजकंपनीने) नोटीस काढली आहे. कबुतरांच्या भरमसाठ पैदाशीमुळे हाय टेन्शन वीजतारांवर बसणारी कबुतरे ठराविक गॅपच्या मधे स्पर्श होताच धक्का लागून मरतात आणि विद्युत्प्रवाह शॉर्ट करतात. मग धम्म आवाज होऊन एरियातला ट्रान्सफॉर्मर ट्रिप होतो. तो पुन्हापुन्हा रिसेट करावा लागतो आणि तितका वेळ वीज खंडित होते.

तुमचा लेख वाचून समदु:खी मिळाल्याचा "आनंद झाला" असं तरी कसं म्हणू..

असो.

परवडत नाही म्हणताय ते खरं पण यावर जालीम उपाय बर्डनेट हाच आहे. प्रत्येक खिडकीला ३-४ हजार खर्च केले तर पीसीआयचं "अदृश्य" नेट येतं. अनेक वर्षांच्या त्रासानंतर आणि श्वसनविकारांनंतर मी ते बसवून घेतलं आहे. त्यामुळे माझ्या घराबाबत तरी हा त्रास पूर्ण थांबला आहे. या जाळीचा मेश साईझ मोठा आहे. वारा अजिबात अडत नाही. ती इतकी बारीक आहे की डोळ्यांना दिसतही नाही, त्यामुळे बाहेरच्या दृश्यात कणभरही कमतरता येत नाही.

इट इज वर्थ इट.

नाहीतर थोडेसे पैसे वाचवून लोखंडी जाळी लावून घेता येतेच.. पण दिसायला चांगली दिसत नाही..

जाई.'s picture

11 Oct 2012 - 9:15 pm | जाई.

गविशी सहमत

आमच्याकडेही हाच प्रॉब्लेम होता. नेट बसवणे हाच एक ऊपाय आहे.

रमताराम's picture

11 Oct 2012 - 4:54 pm | रमताराम

अरेच्या तुम्ही 'कबूतरघाणे' झालात की. (ह. घ्या)
रच्याकने एक उपाय आहे. करून बघावा. बिग बझार वा तत्सम मॉल्समधून एक हाय-फ्रेक्वेन्सी (अल्ट्रा-साउंड) वेव्ह मोस्किटो रेपेलेंट मिळते. या ध्वनिलहरी माणसाला त्रासदायक नसल्या तरी जनावरांना बर्‍याच ताप देतात नि पळवून लावतात असे ऐकून आहे. आमच्या घरचे डास त्या मशीनवरच बसून झोप काढत नि झोप झाली की निघून जात. कबूतरांची प्रतिक्रिया काय आहे ते तपासून पहा नि आम्हाला सांगा.
ता.क. घरात कुत्रा असेल तर हा प्रयोग करणे त्रासदायक होऊ शकते.

विसुनाना's picture

11 Oct 2012 - 5:03 pm | विसुनाना

लेखकाच्या भावनांशी पूर्णपणे सहमत आहे.
'कबुतरांचे आक्रमण' हा भारतातील प्रत्येक शहराचा मोठाच प्रश्न होऊन बसलेला आहे.
त्यातही ही शहरी कबुतरे फार लवकर माणसाळतात आणि मग माणसांना मुळीच घाबरत नाहीत.
त्यांची 'अर्बन स्किल्स'सुद्धा चांगलीच सुधारली आहेत आणि 'मीम्स'मुळे ती कबुतरांच्या नव्या पिढीत
लगेच आलेली दिसतात. घरात जाळीतून शिरणे, खाद्यपदार्थ/कागद पळवणे आणि घाण करणे ही कामे
कबुतरे लीलया करताना दिसतात. कितीही हाकलले तरी त्यांचा परिसर सोडून ती कधीच जात नाहीत.
शिवाय त्यांची संख्याही सातत्याने वाढत जाते.
(भारतातील राजकारण्यांमध्ये आणि या कबुतरांमध्ये भलतेच साम्य आहे. ;))

भयंकर उपाय :
१. मांसाहारी असाल तर - अधूनमधून एखादे कबूतर पकडून 'मसाला कबूतर' ही डिश चाखून पहावी. मी हा उपाय करू शकत नाही.(ऑब्वियस रीझन्स)
२. एअर गनने एखादे कबूतर मारून ते खिडकीजवळ टांगून ठेवणे. कुजण्याचा वास आल्यास ते काढून दुसरे टांगणे.
जवळ एअरगन नसल्याने हा उपायही मी करू शकत नाही याचा खेद वाटतो.

सर्वसाधारण उपाय -
१. अंदाजे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च करून घराच्या सर्व खिडक्यांच्या गजांमधली फट नवे गज वेल्ड करून कमी करवून घ्यावी - जेणेकरून कबुतरे घरात शिरणार नाहीत. तसेच सर्व बाल्कन्यांना लोखंडी पिंजरे बसवावेत आणि आपण त्या पिंजर्‍यांत बंदिस्त व्हावे. (अंदाजे खर्च रु. १२०००/१ बाल्कनी - ६फूट * ९ फूट)
-हाच उपाय मी नाईलाजाने केलेला आहे.

आपली या कबुतरांच्या त्रासातून लवकर मुक्तता होवो ही शिबीराजाचरणी प्रार्थना.

sagarpdy's picture

11 Oct 2012 - 5:04 pm | sagarpdy

मण्यांची बंदूक विकत घ्या. घरात आलेल्या कबुतरांना मारण्यास तसेच एखादा धान्य टाकताना दिसला तर त्याच्या विशिष्ट भागावर मारण्यास उपयुक्त (या वाक्यात "एखादा" हा शब्द अत्यंत महत्त्वाचा!). बेचकी वापरण्याची सवय असल्यास अधिक उत्तम!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Oct 2012 - 5:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, असा त्रासाचा विषय असेल असं वाटलं नव्हतं. अनेक ठिकाणी पाहिलं आहे. कबुतरांना कबुतराचा मालक बोलवत आहे. हातात एक दोन कबुतरं धरुन विखुरलेल्या कबुतरांना बोलवत आहे. दुरुन बघायला बरं वाटतं पण असं काही असेल तर आहे अडचणीचं. मात्र कुबतराच्या वेगवेगळ्या डिश बनवणे हाच मला यावर जालीम उपाय वाटतो.

-दिलीप बिरुटे

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Nov 2013 - 6:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

मलाही हा विषय इतका गंभीर वाटला नव्हता कालपरवापर्यंत..पण आमच्याशेजारी खेटुन एक नवी बिल्डिंग झाली
आणि रोज सकाळ संध्याकाळ तिच्या गच्चीवर कबुतरप्रेमी जमुन ऑ ऑ ऑ कुइंइइइ असे आवाज काढत त्या कबुतरांना उडवु आणि बोलावु लागले. एक तो त्रास आणि दुसरा गॅलरीत शिटणार्‍या कबुतरांचा

बरे, मला वाटते कबुतरे पाळणे आणि विकणे त्यांचा धंदा आहे त्यामुळे कबुतरे मारणे म्हणजे त्यांचे आर्थिक नुकसान आणि पर्यायाने भांडणे

ऐला कावळे लाखमोलाने परवडले...कधी घरात घुसणार नाहीत

सर्वसाक्षी's picture

11 Oct 2012 - 5:15 pm | सर्वसाक्षी

दानशूरांनी कबुतरांना छज्जावर टाकलेले दाणे खाली सांडतात व तळमजल्यावर पडलेले दाणे खायला उंदीर व घुशींचा वावर सुरू होतो. हे उंदीर/ घुशी तळमजल्यावर उभ्या असलेल्या गाडीत प्रवेश करतात व वायरी, नळ्या कुरतडतात. हा आणखी एक ताप. मग नित्यनियमाने गाडीच्या बोनेट्मध्ये तंबाखुच्या पुड्या बांधाव्या लागतात व नियमितपणे त्या बदलाव्याही लागतात.

माताय माझा इथला प्रतिसाद उडाला?

त्यापेक्षा प्रतिसादाचा कबुतर तर झाला म्हण की ;)

गवि's picture

11 Oct 2012 - 5:28 pm | गवि

शिवाय साठून राहिलेल्या विष्ठेच्या ढिगांमुळे cryptococcus (उच्चार कृपया एखाद्या डॉक्टरमहोदयांनी सांगावा) ही बुरशी तयार होऊन श्वसनमार्गाचे किंवा अन्य रोग पसरवते. आमच्या परिसरातली हॉस्पिटल्स ही टेस्ट वारंवार ताप येणार्‍या किंवा डिटेक्ट न होणार्‍या इन्फेक्शन्सच्या केसेसमधे बाय डिफॉल्ट करतात असं दिसलं आहे.

माझीही गतवर्षी झाली. बर्डनेटच्या कृपेने निगेटिव्ह आली.. :)

बाकी कबुतरांना डिश म्हणून खाण्याविषयी मत मांडणार्‍या लोक्सनी अजून कबुतर जवळून पाहिलेलं नसावं. खाणंच काय, नुसत्या वासाने आणि पिसवांच्या वळवळीने उलटी होईल..

लहानपणी, म्हणजे शिकार सर्रास चालायची त्या काळात कवडे होले खाल्ले आहेत..रानातले..पण नंतर निसर्गप्रेमी झाल्याने पुन्हा तसं घडलं नाही. आता पोल्ट्री फूडच फक्त.

त्या निमित्ताने कबुतरांविषयीची एक माहिती उगीच सांगावीशी वाटते.. कबुतर हा माझ्या माहितीनुसार एकच पक्षी (किंवा पक्षीजात) आहे जी खाली मान घालून चोचीने (स्ट्रॉ सारखे) शोषून पाणी पिते. बाकी पक्षी पाणी चोचीत भरुन डोके वर उचलून गळ्यात घरंगळवतात.

विसुनाना's picture

11 Oct 2012 - 6:01 pm | विसुनाना

बाकी कबुतरांना डिश म्हणून खाण्याविषयी मत मांडणार्‍या लोक्सनी अजून कबुतर जवळून पाहिलेलं नसावं. खाणंच काय, नुसत्या वासाने आणि पिसवांच्या वळवळीने उलटी होईल..आता पोल्ट्री फूडच फक्त.

-अवो, त्या कबुतरांचा वास आनि जाळीच्या ट्रकमंदी कोंबलेल्या कोंबड्यांचा वास योकच असतुया! बगिटलं का न्हाई कधी त्ये टरक? तवा कबुतर काय आनि पोल्ट्री काय? पकं काडल्यावर सम्दं हूंच! ;)
polTrI Traka

विसुनाना's picture

11 Oct 2012 - 6:28 pm | विसुनाना

ही घ्या रेशिपी! गणपा भाऊ, बरोबर हाय का? न्हाई, तुमच्याकडं येकांदी ब्येस असंल तर होऊन जाऊ द्या.

विसुनाना's picture

11 Oct 2012 - 6:31 pm | विसुनाना
गवि's picture

11 Oct 2012 - 6:51 pm | गवि

होय हो.. तेच की.. कबुतर सोलून साफ करुन कोण देणार?

आणि आपणच मारलं की ते गलिच्छ आपल्यालाच हाताळावं लागणार नं?

कुंदन's picture

12 Oct 2012 - 11:36 am | कुंदन

उद्या उंदरांनी तंबाखु खाउन मग पिचकारी मारली तर काय कराल?

मी पण वैतागलो आहे या कबुतर त्रासाला.. आमची एक बाल्कनी बळकावली आहे .. सगळीकडे शिटून ठेवले आहे आणि कोनाड्यात घरटी केली आहेत.
आमच्या बाल्कनीत पाय टाकण्याची आमचीच हिम्म्त होत नाही ! ग्रीस लावल्याने कबुतरांचा त्रास कमी होतो म्हणे म्हणून अर्धा किलो ग्रीस चोपडले आहे सज्जावर आणि कोनाड्यात्त.. पण फरक नाही. ग्रीस मुले त्याच्या गुटुर गुम्म लाच लुब्रिकेशन झाले बहुधा ! ग्रीस बाबत कोणाला माहीती आहे का ? माझे स्पेसिफिकेशन चुकले असावे बहुधा !

कवितानागेश's picture

11 Oct 2012 - 5:29 pm | कवितानागेश

कावळे पाळा. कबूतरांना कावळे दिसले की राग येतो आणि ते निघून जातात. :P

गणपा's picture

11 Oct 2012 - 5:32 pm | गणपा
सुहास..'s picture

11 Oct 2012 - 5:32 pm | सुहास..

बाल्कनीत आहेत खर , पण कधी घरात घुसत नाहीत ब्वा !! घरात सहसा खुप चहल-पहल असते.

गवि's picture

11 Oct 2012 - 5:39 pm | गवि

आमच्याकडे घरात एरवी चहलपहल नसते. पण कबुतरं शिरली की मात्र घरात बरीच चहलपहल सुरु होते..

सुहास..'s picture

11 Oct 2012 - 6:16 pm | सुहास..

हा हा हा !

मुळात घरात कबुतरांमुळे गमती-जमती झालेल्या आहेत , घरात एकुण माणसे ईतकी आहेत की एखाद कबु-जोडप गुटरगु कराया धजावत नसाव, त्यात प्रत्येकाच्या त्यांना ( बाल्कनीतून ) हाकलण्याच्या विविध तर्‍हा आहेत ;)

एक म्हणतो ढाबळ ऊघडु तोवर दुसरा काठी घेवुन मागे, तिसरा तोंडाने छूर्र-छुर्र म्हणत त्यांच्या अंगावर ...पण सगळ्यात भयंकर म्हणजे डॅड....दिसली रे दिसली की ( बंधुराजाने उसगावातुन आणलेली ) प्रखर टॉर्च घेवुन फ्लॅश-लाईट्स मारतात, अर्थात आम्ही हे सगळं आम्हाला एन्जॉयमेंट म्हणुन च घेतो ...कुट त्या कबुतराच्या जीवावर उठायच ;)

असो ...यावरून आम्हाला देवदत्त आणि सिध्दार्थ गौतमाची बोधकथा आठवली :)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Oct 2012 - 5:54 pm | प्रकाश घाटपांडे

कबूतर जा जा जा! या गाण्याचे सतत रेकॉर्डिंग कबूतरांना ऐकवावे!
कावळ्यांना पाचारण करण्यासाठी तुम्ही दाणे टाकलेत तर कबूतर येऊनच ते फस्त करतात. त्यामुळे तो उपाय करु नये.
आमच्या इमारतीत कबुतरांना सोयीच्या अशा खोबणी प्रत्येक टेरेसवर आहेत. त्या बिल्डर ने बहुतेक फ्लॉवर बेड साठी दिल्या असाव्यात पण त्या कामासाठी त्या सोयीच्या नाहीत. त्यामुळे आमची इमारत कबूतर फ्रेंडली झाली आहे.
अभक्ष भक्षण करणार्‍या लोकांनी जर कोंबडी ऐवजी कबूतराचा वापर केला तर वेगाने संख्या कमी होईल.
चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे ही बाब आता पक्षीतज्ञांना गंभीर वाटू लागली आहे

कबुतर व पारवे ह्याचे मटण खेड्यात सर्रास खातात. विहरीत किंवा माळरानावर बरेच जण कबुरत/पारव्याची शिकार करतात. त्यात पारव्याचे मटण सांधेदुखीवर उपयुक्त आहे असे देखिल मला बर्‍याच जणानी सांगितले.मुळात शहरात जर त्याची संख्या इतकी वाढली असेल तर लोकाना त्याचा वापर करण्यास हरकत नाही.

विसुनाना's picture

11 Oct 2012 - 6:16 pm | विसुनाना

सोसायटीत एखादा बहिरी ससाणा पाळता येईल का? जीएंची 'चंद्रावळ' जरी मनात रुतून बसली असली तरी या कण्हत बसणार्‍या पारवळांवर असाच एखादा जालिम उपाय करायला हवा.

चौकटराजा's picture

11 Oct 2012 - 6:21 pm | चौकटराजा

१. कबुतर हा महा त्रासदायक प्राणी असून त्याचा आदर्श अरविंद केजरीवाल यानी घेतलेला दिसतो.
२. त्याची " शी" आम्लधर्मी असेल तर चांगलेच आहे तिचा उपयोग संडासाची टाईल साफ करण्यासाठी होईलच की !
३. कबुतरावर गाणी आहेत हे आज कलके लडके बेपरके उडते है..... कबूतर कबूतर, कबूतर जा जा जा ई.
४. एकंदरीत कबूतरांची " लागण" झालेल्या बर्‍याच सोसायट्या आहेत. माकडांची "लागण" ही जयपूर , बदामी इथे दिसते
तर कबूतरांची मुंबई पुणे , चिचवड ( यात आमची सोसायटी आय सी यू मधे )
क्रमश:

अशाच कबुतरीय प्रश्नाचा सामना पैसाताईला करावा लागला होता असे आठवते. सगळे प्रतिसाद मजेदार आहेत. दर भारतभेटीत आमच्या बिल्डींगितले फ्ल्याट कोणीतरी विकून गेलेले असतात आणि तो बदल जाणवतो. आमच्या वर राहणारे त्यांचे दोन्ही जोड फ्ल्याट भाड्याने देऊन गेले ते बरेच झाले. त्यांच्या सत्राशेसाठ कुंड्या आणि त्यातून अहोरात्र गळणारे पाणी. लिव्हिंगरूमच्या बॅल्कनीला काय काय लावून घेतले तरी ही त्सुनामी थांबली नव्हती. सोसाटीमध्ये (कामवाल्या बाईंचा शब्द)कबुतरे आहेत आणि आमचे घर हे महिनोन् महिने बंद असते. दुसर्‍या बॅल्कनीत तर घरटी, अंडी, पिलावळ अश्या अनेक पिढ्या जलमल्या आहेत. ;) सटीसहामासी जाऊन ते दार उघडले की या पक्षांना आनंद होतो आणि धीटपणे घरात येतात. एकदा तर एक कबूतर माळ्यावर चढून गप्प बसले. मी सगळे घर बंद करून निघाले. उगीच काहीतरी आठवले म्हणून पुन्हा घर तपासले तर हे महाराज बाहेर पडण्याच्या धडपडीत होते. बरं, मला तो पक्षी दरवाज्यापर्यंत जाऊन तो उघडू देत नव्हता. त्याच्या वासाने सटासट शिंका मात्र सुरु झाल्या. पुढच्या वर्ष दोन वर्षात त्याचे काय झाले असते? कसाबसा बाहेर काढला त्याला. जाळीने बाल्कन्या बंद करताना सोसायटीत कबूतरे नव्हती म्हणून त्या कबूतरप्रूफ नाहियेत. आमच्या कामवाल्या बाई तर सफाईच्यावेळी इतक्या वैतागतात त्या कबूतरांची घाण काढून कि ज्याचं नाव ते!

अद्द्या's picture

11 Oct 2012 - 7:16 pm | अद्द्या

आयला .. इथे ही तोच त्रास हे

रूम वर "ग्यास " येउदे
एक दिवस kharach पकडून करेन mhanto त्यांचं कहीतरी :P

मानस्'s picture

11 Oct 2012 - 7:18 pm | मानस्

मी एकदा धान्याची कणसं आलेल्या एका शेतात, चमकणार्‍या स्पायरल पट्ट्या/स्ट्रीप्स ( ज्या आपण गणपतीत सजावटीसाठी वापरतो )बांधलेल्या पाहिल्या होत्या,त्या कणसातले दाणे खाणार्‍या पाखरांना घाबरवण्यासाठी आहेत असे कळाले.मी २-३ दिवसा पुर्वी अशी एक पट्टी खिडकी बाहेर बांधून ठेवली आणि आश्चर्य म्हणजे हा उपाय लागू पडला. ह्या पट्ट्या सारख्या फिरत असल्या प्रमाणे दिसतात त्त्याला ही कबुतरे घाबरत असावी...पण मला आता ही भिती आहे की एकदा की ही कबुतरं या पट्ट्यांना घाबरेनाशी झाली कि याच पट्ट्यांवर बसून झोके घेत 'कुटुरघुम' चालू करतील :).

आदिजोशी's picture

11 Oct 2012 - 8:22 pm | आदिजोशी

हे जैन आणि गुज्जु लोक ह्या बाबतीत काही समजावून सांगण्याच्या पलिकडचे आहेत.

तुमच्या घरात येणारी कबुतरे पकडून त्या पुण्य गोळा करणार्‍यांच्या घरात सोडावी. कबुतरांची विष्ठा आणि पडलेली पिसे गोळा करून त्यांच्या दारासमोर पसरावी. दणदणीत आणि झणझणीत चिकन / मटण बनवून त्याचा सुगंध परिमळ इमारतीत दरवळू द्यावा. असे काही आणि अजूनही काही जालीम उपाय आहेत.

अशाच कबुतरीय प्रश्नाचा सामना पैसाताईला करावा लागला होता असे आठवते.
व्हय... हीच ती वैताग आणणारी कबुतरे
पण संध्या मिपा गंडल्याने पैसा ताईच्या प्रतिसादला "पंख" फुटलेले दिसत आहेत ! ;)

अगदी आमच्या रुममधल्या अडगळीत हे पक्षी कधी जाऊन बसले होते कळलंच नाही, हाकलून लावलं खरं. पण त्यादिवसापासून ही ब्याद जरा सामसूम दिसलं की घरात शिरायचा प्रयत्न सुरु. वेळोवेळी हाकलून लावल्यानंतर आता उच्छाद कमी आहे पण बंद झालेला नाही. कबूतर हा चिठ्ठ्या वैगरे पोचवत असावा ही समजूत साफ चूकीची आहे असं मला वाटतं. प्रेममय चर्चेत या प्राण्याच्या 'कुटुरघूम'चा वात नको म्हणून पायाला फक्त कागदाची सुरळी बांधून याला उडवून देत असावेत. म्हणजे कबूतराचा पोपट करत असावेत. असा आपला माझा समज. ;)

५० फक्त's picture

12 Oct 2012 - 7:48 am | ५० फक्त

समज की अनुभव

अत्रुप्त आत्मा's picture

12 Oct 2012 - 8:23 am | अत्रुप्त आत्मा

@समज की अनुभव>>> http://www.sherv.net/cm/emoticons/birds/feeding-pigeon-smiley-emoticon.gif

+++++१११११ जाहिर आणी जोरदार अनुमोदन...! ;-)

सुधीर's picture

11 Oct 2012 - 9:38 pm | सुधीर

मी पण वरच्या मजल्यावर रहातो. मंध्यंतरी चिमण्यांची रोडावणारी संख्या यावर एक लेख वाचला. त्यापासून का कोणास ठावूक मी खिडकीच्या ग्रील मध्ये मी तांदुळ ठेवू लागलो. चिमण्या येऊ लागल्या. कावळे दररोजचेच होते (खिडकीत खाताना पाहून हातातून चपातीचा तुकडा घेऊन जात). पण आश्चर्य म्हणजे तांदुळ ठेवायला लागल्यावर चिमण्यांसोबत, खारुताई, बुलबुल येऊ लागले. टिटवी येऊ लागली. गेल्याच आठवड्यात छोट्या शिंजिरनेही हजेरी लावली. (ह्या पक्षाचं नाव मागे मिपा मुळेच कळलं) असो, कावळे, टिटवी (यांना इतर पक्षी घाबरतात), कबुतरांमुळे (हावरट, यांना मला सारखं हाकलवावं लागतं ) इतर पंक्षांच येण कमी होत जातयं. यांचे मोबाइल वरून काढलेले फोटो मी इथे टाकलेत.

तुम्ही वरच्या मजल्यावर म्हणजे तिरशिंगरावांच्या वरच्या मजल्यावर राहता का ? लेखात वर्णीलेली परिस्थिती जुळतेय म्हणून विचारलं.

सुधीर's picture

12 Oct 2012 - 10:57 am | सुधीर

मी तांदुळाचे काही दाणे फक्त चिमणीसाठी (वा छोटे पक्षी) ठेवतो ते ही ग्रील मध्ये. कबुतरं आली तर मला हाकलवावं लागतं.

सचिन भालेकर's picture

12 Oct 2012 - 8:02 am | सचिन भालेकर

पोस्ट्मनला बोलवा..... पत्र टाकायला पकडुन नेईल..... :)

१) कबूतरांचा त्रास टाळायला. भारतात दूर राज्यातल्या लोकांच्या प्रेमात पडा, भाग्यश्री-सलमानचे मैने प्यार किया मधील गाणे लावा व मग आपापल्या खिडकीतल्या कबूतरांवर चिठ्ठी पोहचवायचे काम सोपवा, अगदी कायमस्वरुपी प्रश्न मिटला नाही तरी काही दिवस तरी शांतता असेल.

२) कबूतराने नकार दिल्यास मिथुनदा-आयेशाझुल्काचे चढ गया उपर रे गाणे जोरात लावा. उगाच आपल्यावर आळ नको म्हणून कबूतर उडून जाईल.

३) तेही नाही झाले तर खिडकी उघडून ठेवा व कबूतर घरात येताच त्यांना दाणे टाकून समोर टिव्ही/ संगणकावर कबूतर रेसीपीचे व्हिडीओ लावा.

गणपा's picture

12 Oct 2012 - 1:04 pm | गणपा

काहीस असच दृष्य दिसेल मग ;)

स्वतः चीनमधे स्थलांतरीत व्हावे. तिथे, माणसांच्या धास्तीमुळे, पक्षी जवळजवळ नाहीतच, सरपटणारे, आकाशाकडे पाठ करून चालणारेही काहीही टिकू शकत नाही.

स्मिता.'s picture

12 Oct 2012 - 1:40 pm | स्मिता.

कबूतर हा अतिशय घाणेरडा आणि तापदायक पक्षी आहे याला माझी कायमच सहमती असते. कबुतरांनी बसू नये या करता एक अतिशय नामी पण जरा खार्चिक युरोपियन उपाय आहे. इमारतीच्या भिंतींना किंवा कोपर्‍यावरच्या जागांवर बारीक तारा उभ्या (खिळ्यासारख्या) बसवाव्या. एकंदरीत ते खालच्या चित्राप्रमाणे दिसेल. हे खिळे लोखंडाचेच असावेत असंही नाही. टिकाऊ प्लास्टिकचे मिळाल्यासही हरकत नाही.

अरे वा... कबुतर खाण्याने दमा नाहीसा होतो असे कुठेसे ऐकलेले वाटते... नक्की सांगता येत नाही.

३) तेही नाही झाले तर खिडकी उघडून ठेवा व कबूतर घरात येताच त्यांना दाणे टाकून समोर टिव्ही/ संगणकावर कबूतर रेसीपीचे व्हिडीओ लावा.
खी.खी.खी सहजरावांनी खत्रुड कल्पना सुचवली आहे ! ;)
मला इथे एक चावट रेसेपी देण्याचा मोह टाळता येत नाहीये...

साहित्यः- गुबगुबीत,लुसलुशीत टच्च पाखरु, स्वतः मधील प्रयोगशिलता. ;)
कॄती:- पाखराला "मंद आचेवर" ठेवावे,त्याच्या फडफडी प्रमाणे आच कमी-जास्त करावी.पाखराचा राग-रंग पाहुन त्याला इथुन-तिथुन "व्यवस्थितपणे" परतवुन घ्यावे.चुंबनाची खमंग फोडणी द्यावी.साहित्य अत्यंत नाजुक असल्याने त्याची हाताळणी "हळुवारपणे" करावी.पाखरु व्यवस्थित "तयार" झाले आहे याचा अंदाज येताच,नजाकतीने त्याचा आस्वाद घ्यावा ! ;)

(प्रेमळ ससाणा)

तुमची पाकृ वाचुन जुन्या मराठी चित्रपटात शेतात झाडामागं आपल्या अस्टिटंट बरोबर उभे राहुन समोरुन येणा-या हिरवीणीला / तिच्या मैत्रिणिला / हिरोच्या बहिणीला , निळु फुले किंवा राजशेखर म्हणायचे ना ' गण्या हे रे कोण पाकरु, नविन आलंया गावात जणू' - या दृश्याची आठवण झाली.

बॅटमॅन's picture

12 Oct 2012 - 6:23 pm | बॅटमॅन

नावाप्रमाणेच प्रतिसाद ;)

सहज's picture

12 Oct 2012 - 6:43 pm | सहज

अश्या रेसीपीने पाखरे वाढणार की कमी होणार रे बहिर्‍या (ससाण्या)?

मदनबाण's picture

12 Oct 2012 - 7:53 pm | मदनबाण

हॅहॅहॅ... ते पाखरांच्या फडफडण्यावर आणि ससाण्याच्या "प्रेमावर" अवलंबुन आहे ! ;)

डॉ.प्रसाद दाढे's picture

25 Oct 2012 - 7:59 pm | डॉ.प्रसाद दाढे

जर लेखक दुसरे कोणी असते तर माझाही गैरसमज झाला असता..बाकी उडणार्‍या कबूतरांपेक्षा (लपून)बसलेल्या कबूतरांचा छळ अधिक असतो ;)

इरसाल's picture

12 Oct 2012 - 4:55 pm | इरसाल

कच्च प्यायल्याने दमा बरा होतो असे म्हणतात.

रेवती's picture

12 Oct 2012 - 6:51 pm | रेवती

तिमा, कबुतरांवर आलेला जयंतकाकांचा लोख वाचून एक कल्पना सुचली आहे. ती अमलात आणल्यास मराठी माणूस व्यवसायात मागे का? असे धागे येणं बंद होईल. तुम्ही तुमच्या आत्ताच्या घराजवळ दुसरे घर घ्या. आताचे घर कबूतरखाना (हा एकच शब्द आहे)म्हणून वापरा. त्यातून तयार होणार्‍या खताचा व्यवसाय सुरु करा. आजूबाजूच्या पुण्यवान मंडळींना 'कबूतरोंको दाना डालो, पुण्य कमाओ' अशी पाटी लावून तेथे धान्य घालण्यास संधी दिल्यास सर्वांचाच फायदा होईल.

प्रदीप's picture

12 Oct 2012 - 7:42 pm | प्रदीप

इथे सुचवलेले आहेत. मला वाटते त्यातील १,२,३ व ५ आपणास सहज करून पहाता येण्यासारखे आहेत.

राहता कुठे.?? आमच्या घरची मनीमाउ देते पाठऊन.. तसही पुढचे आठ - दहा दिवस तीची सामिष अन्नाची उपासमार होणार आहे..बर बाकी तीचा काहीही त्रास होणार नाही.. तुमच ही काम होईल.. आणी तीची पण ऊपासमार टळेल.जरा पुण्य कमवा.

शिशिर's picture

25 Oct 2012 - 5:27 pm | शिशिर

मी केलेले काही उपाय.....

(१) खिडकीला Box Grills बसवा, जेणेकरून कबूतर खिडकी पासून जरा लांबच बसणार.

(२) ग्रिल चे डिझाइन उभे किंवा Wavy स्वरुपाचे असल्यास कबूतर बसत नाही. सरळ आडव्या Bar वर कबूतर आरमात बसू शकतात.

(३) खिडक्यांचा ग्रिल ला बारीक जाळी (Mosquito Net/ Chicken Mesh)साध्या तारेने बांधुन घेता येते.

(४) ग्रिल ला एखादे सादे छोटे फडके बांधा. हवेने हालचाल (कापाडाची) झाल्यास कबूतर जवळ येत नाही.

(५) ग्रिलच्या वर छज्जा म्हणून नळी चा पत्रा वापरा. Flat Sheet (सपाट) पत्र्यावर कबूतर सहज बसतात. प्लेन पत्राच वापरायचा असल्यास पत्र्यावर काटेरी तार (Compound Wire) बांधून घ्यावी.

येवढे होउनही कबूतरांनी दाद न दिल्यास वर दिलेले जालिम उपाय आहेतच.

रमेश आठवले's picture

28 Jan 2013 - 2:42 pm | रमेश आठवले

माझा प्रतिसाद, तिरशिंगराव माणूसघाणे यांचा लेख नजरेतून सुटल्यामुळे जरा उशिरा देत आहे. परंतु स्वत: पाहिलेला उपाय असल्यामुळे सर्वांना सांगण्यास हरकत नाही असे वाटते.
काही वर्षापूर्वी मला कामा निमित्त दिल्लीतील राष्ट्रपति भवनाच्या विस्तीर्ण गच्चीवर जाण्याचा योग आला होता. तेथे पाहिलेला हा उपाय आहे.
गच्चीवर रोषणाई साठी जागो जागी खांब आहेत. त्यांना किंवा इतर सोयीच्या ठिकाणी एक लांबलचक साखळी बांधतात व तिचे दुसरे टोक एका मोठ्या हुप्प्याच्या गळ्यात अडकवतात.हा ट्रेंड हुप्प्या त्याच्या साखळीच्या परिघात किंवा जवळपास उतरू पहाणार्या पक्ष्यांवर अथवा माकडा वर चाल करून जातो आणि त्यांना हुसकून लावतो.असे रखवालदार छतावर बऱ्याच ठिकाणी दिसले
मला वाटते कि त्यांचा मदारी त्यांना रोज सकाळी घेऊन येत असावा आणि त्यांची हजेरी लाऊन त्यांना गच्चीवर वेगवेगळ्या ठिकाणी बांधून, संध्याकाळी duty सम्पल्यावर सोडवून घरी नेत असावा.

कबुतरांसाठी नामी उपाय म्हणजे सर्व खिडक्यांच्या लोखंडी ग्रिलांवर २x२ ची प्लास्टिक किवा धातूची जाळी बसवून घ्या.....अगदी स्वस्तात मस्त काम होतंय.Net

मन१'s picture

20 Nov 2013 - 9:00 am | मन१

अल्ट्रासोनिक लहरीम्चा वापर करणार्‍या मशीनचा इथे उल्लेख आहे.
त्या मशीनचे तपशील कुठे मिळतील का?

बाल्कनीच्या खालच्या भागात, जिथे कबुतर बसतात तिथे उंदीर पकडायच्या चिकटपट्या(माऊस ट्रॅप) लावाव्यात. कबुतर त्यावर बसलं की चिकटलंच समजा.
मग ते एखाद्या बोक्यासमोर टाकावे, तोच संपवेल त्याला नाहीतर सरळ कचरापेटीत टाकून द्यावे.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2013 - 5:43 pm | टवाळ कार्टा

आपण माणुस आहोत :(

त्रास देणार्‍या उंदरांना हाच उपाय करतात ना? ह्या हून जालीम उपाय असतात जसे विषारी केक, रॅट किल वगैरे