आनंद - कार्लसन - डाव ४

आनन्दा's picture
आनन्दा in जनातलं, मनातलं
13 Nov 2013 - 3:13 pm

चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.

Play Online Chess[Event "Anand-Carlsen World Championship"][Site "Chennai, India"][Date "2013.11.13"][Round "4"][White "Viswanathan Anand"][Black "Magnus Carlsen"][Result "1/2-1/2"][WhiteELO "2775"][BlackELO "2780"]%Created by Caissa's Web PGN Editor1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf58. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb745. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re657. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka663. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2document.getElementById("cwvpd_1384415694").value=document.getElementById("cwvpg_1384415694").innerHTML;document.getElementById("cwvfm_1384415694").submit();

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

मालोजीराव's picture

13 Nov 2013 - 7:33 pm | मालोजीराव

सध्यातरी सगळा गेम इ ६ च्या अवतीभवती आहे वाटतंय

निखिल देशपांडे's picture

13 Nov 2013 - 7:29 pm | निखिल देशपांडे

सी १ चा हत्ती सी ७ ला नेला तर?

स्वलेकर's picture

13 Nov 2013 - 7:30 pm | स्वलेकर

राजा एकटा पडेल.

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 7:38 pm | चतुरंग

राजा हलला उंट आणि घोडा गेले. आता दोन दोन हत्ती आणि मॅग्नुसकडे ३ तर आनंदकडे २ प्यादी!
अजूनही डाव डायनामिक आहे. मॅग्नुस जिंकण्यासाठीच खेळतोय! तो ड्रॉसाठी जाणार नाही असे दिसते.

आतिवास's picture

13 Nov 2013 - 7:43 pm | आतिवास

आनंदची पोझिशन थोडी कठीण वाटतेय. दोन्ही हत्ती अडकून बसलेत का?

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 7:41 pm | चतुरंग

आता लै कळीची पोझीशन आहे. मॅग्नुसने चेक दिला तरी राजा ए३ मधे द्डी मारुन बसेल आणि हत्ती मोकळे राहू शकतात!

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 7:46 pm | चतुरंग

ई स्तंभातून हलू शकत नाही! कारण तो हलला रे हलला की आनंदचा हत्ती ई८ मधून बाहेर पडतो आणि वजीर होणे अटळ! त्यामुळे मॅग्नुसला प्रॅक्टिकली एकाच हत्तीने खेळायला लागणार आहे. तसेच आनंदचे आहे त्याचा हत्ती ई८ मधून निघू शकत नाही. पण आता मॅग्नुसला त्याच जी ६ वरचे प्यादे वाचवायला लागेल. कारण पुढची खेळी आनंदची हत्ती जी १ अशी प्याद्यावर हल्ला करणारी असेल.

सुजा's picture

13 Nov 2013 - 7:52 pm | सुजा

कथिन आहे

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2013 - 7:54 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगा / ररा .... काय होईल असे वाटते?

रमताराम's picture

13 Nov 2013 - 7:59 pm | रमताराम

जिंकण्याची संधी कमी इतके नक्की. ड्रॉची शक्यताच अधिक.

आनंद अ‍ॅड्व्हांटेज आहे असे वाटते

शैलेन्द्र's picture

13 Nov 2013 - 7:56 pm | शैलेन्द्र

मस्त मुव्ह

एक्स्चेंज करणार का हत्ती? मॅग्नुस करेल असे वाटत नाही. कारण त्याला प्यादे पुढे न्यायचे आहे.

सी ४? मला सी २ मध्ये दिसतोय. बोर्ड मागे दिसतोय माझा!

कपिलमुनी's picture

13 Nov 2013 - 8:00 pm | कपिलमुनी

कार्लसन ने मारामारी केली तर त्याला फायदाच आहे ! त्याचे २ पॉन्स दो बाजूला आहे ..एका राजाने ते डीफेंड करणे जमणार नाही.

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:05 pm | चतुरंग

तिसर्‍या पट्टीत आलेत. आणि राजा ए२ मधे गेलाय. आता बी३ चे प्यादे घेतले तर हत्तीने बी८ मधे चेक देईल आनंद आणि राजाने हत्ती घेतला प्याद्याचा वजीर होईल!

डोक्यांची टेंपरेचरं काय असतील त्या दोघांच्या?

आतिवास's picture

13 Nov 2013 - 8:10 pm | आतिवास

हो ना! आपल्या सगळ्यांच्या टेंपरेचरच्या बेरजेपेक्षा कैक पट अधिक :-)

पण कार्ल मात्र लढत सोडायला तयार नाही!

आनंद सारखा अनुभवी सामना टाय चे प्रेडिक्शन चुकेल असे नसताना कार्लचा अट्टहास गाढ्वापणा समजायचा की आत्मविश्वास ?

कपिलमुनी's picture

13 Nov 2013 - 8:10 pm | कपिलमुनी

काल सरळ सरळ ड्रॉ दिसत असून सुद्धा आनंदने ऑफर केलेला ड्रॉ नाकारला ...आणि २ स्टेप नंतर ड्रॉ केला ...

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:13 pm | चतुरंग

दोन दोन हत्ती आणि पुढे सरकलेली प्यादी आहेत तोपर्यंत खेळ सुरु राहणार. असे एंडगेम्स फार इंटरेस्टिंग असतात.

आतिवास's picture

13 Nov 2013 - 8:13 pm | आतिवास

हत्ती इ५ मध्ये आला - काय विचार आहे मॅग्नुसबाबाचा?

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:14 pm | रमताराम

एक लाईन चेक करायला हवा. हत्ती बी-५ मधे आणला मॅग्नसने तर तो जी प्याद्याला आधार देईल नि त्याच वेळी जी पट्ट्यातल्या दुसर्‍या हत्तीला बी-३ प्यादे मटकावून आनंदच्या राजाशी सलगी करण्याची संधी देईल. अ‍ॅडवांटेज मॅग्नस.

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:16 pm | रमताराम

आनंदला त्याचे सातव्या फळीतले प्यादे पुश करण्याची संधी न देता... इंट्रेस्टिंग.

तिरकीट's picture

13 Nov 2013 - 8:14 pm | तिरकीट

मोबाईल मधे बघितलं तर...... ५० चाली झालेल्या दाखवतायत...
काही ठरावीक चाली झाल्यानंतर प्रत्येक चालीला वेळेची मर्यादा होती ना?

अमेय६३७७'s picture

13 Nov 2013 - 8:15 pm | अमेय६३७७

हत्ती ई - ५ जबरदस्त मूव्ह आहे

अमेय६३७७'s picture

13 Nov 2013 - 8:17 pm | अमेय६३७७

आनन्द वेळेच्या दबावाखाली. १५ मिनिटात १० मूव्ह्ज करायच्या आहेत. मॅग्नसकडे ३० मिनिटे आहेत

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:19 pm | चतुरंग

होतोय असे वाटतंय! हत्ती ई५ ही मॅग्नुसची चांगली खेळी आहे.

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:23 pm | रमताराम

बाबाजी चांगलेच अडकलेत.

राघवेंद्र's picture

13 Nov 2013 - 8:23 pm | राघवेंद्र

के सि ६ ही मॅग्नुसची खेळी आहे.

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:24 pm | चतुरंग

राजा सी ६ मधे हलला. आणि आनंदने हत्ती डि स्तंभात दुहेरी केले. इंटरेस्टिंग. इतक्या ताणाखाली हे लोक इतके रिसोर्सफुल राहू शकतात. मी थक्क झालो आहे!

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:31 pm | रमताराम

मै कौन हूँ, मै कहाँ हूँ? ये क्या हो रहा है? साडेपाच तास चालू आहे राव. नुसतं पाहताना माझ्या डोक्याची मंडई झाली. त्यांचं काय होत असेल.

मला आता असं वाटतंय आनंद लेकाचा पेशन्स तपासणार मॅग्नसचा. तरुण, व्हायब्रंट मंडळींचा पेशन्स कमी असतो असं म्हणतात. म्हणूनच त्या वयात एकदम झटपट क्रांती बिंती व्हावी वाटतं, लग्गेच प्रॉब्लेम सॉल्व्ड. :) दीर्घकालीन, चिकाटीची योजना त्या वयात फारशी आवडत नसते.. तेव्हा आनंद बहुधा असे घामटं काढणारे दीर्घ सामने खेळण्याचा प्रयत्न करणार असं दिसतंय.

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:35 pm | चतुरंग

इतर कोणी असता तर ते ही कदाचित शक्य झालं असतं पण मॅग्नुस स्वतःच लांबलचक चालणारे गेम्स आवडीने खेळतो. त्याची स्टाईल थोडी कार्पोवसारखी आहे. दबाव टाकत खेळत रहायचं कुठेतरी प्रतिस्पर्धी चुकतोच! इंटरेस्टिंग होणार पण प्रत्येक लढत कारण दोघेही चिवट आहेत!!

धमकी आहे! आता फक्त जी स्तंभातला हत्ती ई३ मधे येऊन ते रोखू शकतो

राघवेंद्र's picture

13 Nov 2013 - 8:30 pm | राघवेंद्र

आनन्दची आर डि ८ आणि त्याला उत्तर मॅग्नुसची आर जि ३
परत आनन्द आर डि ६

अमेय६३७७'s picture

13 Nov 2013 - 8:30 pm | अमेय६३७७

आनंदने डी मध्ये हत्ती दुहेरी केले हे भारीच. ड्रॉ होणार. आनंदने वाचवला डाव.

मॅग्नुसकडे २३ मिनिटे आहेत!

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:34 pm | रमताराम

चार पेक्षाही कमी. :(

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 8:44 pm | चतुरंग

३ खेळ्या करायच्यात!

राघवेंद्र's picture

13 Nov 2013 - 8:37 pm | राघवेंद्र

मस्त चाल आहे.
मॅग्नुसने मस्त डोक्याला हात लावुन बसला आहे.

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:44 pm | रमताराम

खतरा मूव घेतली बे मॅग्नुसने. साले हे स्टँडर्ड लाईन तपासणारे एकदम मुंडक्यावर पडले.

तिरकीट's picture

13 Nov 2013 - 8:45 pm | तिरकीट

मॅग्नुस ते उचलु शकतो...

राघवेंद्र's picture

13 Nov 2013 - 8:54 pm | राघवेंद्र

:(

सागर's picture

13 Nov 2013 - 8:54 pm | सागर

झाला ड्रॉ

मालोजीराव's picture

13 Nov 2013 - 8:55 pm | मालोजीराव

परत ड्रॉ

रमताराम's picture

13 Nov 2013 - 8:55 pm | रमताराम

आज आपल्या पायावर उभा असतो तर साला जौन मयखान्यात बसलो असतो. आजची झोप गंडली खंप्लिट.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2013 - 8:56 pm | बिपिन कार्यकर्ते

अंमळ हळवं केलंत मालक!

तुमच्यासाटी कायपन! ;)

रमताराम's picture

13 Nov 2013 - 9:00 pm | रमताराम

तुम्ही 'आमच्यातले' नसल्याने काही तुमच्या सदिच्छेचा काय उपयोग नाय. नायतर म्हटलं असतं या गाडी घेऊन.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2013 - 9:53 pm | बिपिन कार्यकर्ते

सायेब, तुमच्यासाटी कायपन म्हन्ल्यावं त्ये पन क्येलं आस्तं ना! आता तुमी होऊ दे खर्चं म्हन्ल्यावं खर्च करून घेतलाच आस्ता ना! ;)

रमताराम's picture

13 Nov 2013 - 9:12 pm | रमताराम

त्ये बी खरंच, पण म्हन्ल अस्तं होऊ दे खरचं.

तिरकीट's picture

13 Nov 2013 - 8:55 pm | तिरकीट

ड्रॉ

चतुरंग's picture

13 Nov 2013 - 9:02 pm | चतुरंग

प्रत्येक खेळीला किती प्रकारच्या थ्रेट्स ते जनरेट करत होते आणि उधळून लावत होते. बापरे, मी थक्क झालोय!
प्रत्येक पुढचा डाव अधिकाधिक थरारक होत चालला आहे. आधी कोण जिंकेल हे बघणे काळजाचा ठोका चुकवणारे असणार.
उद्या विश्रांतीचा दिवस आहे. पाचवा डाव शुक्रवारी होणार!

जेपी's picture

13 Nov 2013 - 9:44 pm | जेपी

मस्त समालोचन केल तुम्ही लोकांनी .
जबरदस्त .

प्रचेतस's picture

13 Nov 2013 - 10:14 pm | प्रचेतस

अगदी.

पूर्णपणे सहमत.

अनुप ढेरे's picture

13 Nov 2013 - 11:10 pm | अनुप ढेरे

हे वेळेचं काय गणित असतं? किती मिंटात किती मूव करायच्या अस्तात?

चतुरंग's picture

14 Nov 2013 - 12:09 pm | चतुरंग

मी बुद्धीबळाच्या नियमावलीच्या भाषांतराचा दुवा दिलेला आहे तो बघा.
http://www.misalpav.com/node/26100
या धाग्यावर शेवटी शेवटी माझ्या प्रतिक्रियेत दुवा आहे. त्या पुस्तिकेमधे सगळे नियम आहेत.

तरीही थोडक्यात - प्रत्येकी २ तासात प्रत्येकी ४० खेळ्या झाल्याच पाहिजेत (डावाचा निकाल आधीच लागला नसेल तर),त्यानंतर पुढे १ -१ तास वाढवून मिळतो त्यात २०-२० खेळ्या झाल्याच पाहिजेत, त्यानंतर्ही डाव चालू राहिल्यास १५ - १५ मिनिटे मिळतात आणि त्यात प्रत्येक खेळी बरोबर ३० सेकंदाचा वाढीव वेळ दिला जातो.
टाईमट्रबल मधे येऊन वेळ संपली तर फ्लॅग पडतो आणि तो खेळाडू डाव गमावतो - मग पटावरची स्थिती काय आहे याला महत्त्व नाही!

अनुप ढेरे's picture

14 Nov 2013 - 12:34 pm | अनुप ढेरे

धन्यवाद!

मोहन's picture

14 Nov 2013 - 10:21 am | मोहन

सुपर बुद्धिबळ , सुपर समालोचन !

आनन्दा's picture

14 Nov 2013 - 12:01 pm | आनन्दा

माझी शतकी धाग्याची इच्छा अश्या प्रकारे सुफळ संपूर्ण झाली :)

मृत्युन्जय's picture

14 Nov 2013 - 12:12 pm | मृत्युन्जय

हे बरे आहे राव. आम्ही असे सामन्यांचे धागे काढलेच तर आनंद नेमका त्या दिवशी १७ व्या चालीला कार्ल्सनला झोपवेल की आमचा धागा पण मग अभिनंदनाच्या (आनंदच्या. आमचे कोण करतय अभिनंदन मरायला) ४०-५० प्रतिसादात गार पडेल.

रमताराम's picture

14 Nov 2013 - 12:39 pm | रमताराम

घडणार असेल तर तुम्ही काढाच धागा. सतरा चालीत आनंद जिंकला तरीही आम्ही तुमच्या धाग्याचे त्रिशतक होईल याची ग्यारंटी घेऊ.

प्यारे१'s picture

14 Nov 2013 - 12:50 pm | प्यारे१

+१११.
आम्हीही बुद्धीत बळ नसताना जातीनं हजर राहू.

बाकी ररा,
मृत्युंजयचा धागा त्रिशतकी करायचं काम फुकटात करायचं का काय ?

रमताराम's picture

14 Nov 2013 - 12:57 pm | रमताराम

फुकटात करायचं. त्या आनंदात ते नंतर आपल्याला प्यार्टी देतीलच की.

प्यारे१'s picture

14 Nov 2013 - 1:26 pm | प्यारे१

गुरुजी म्हणतात तसं!

मृत्युंजय, आम्हाला फार 'होप्स' आहेत तुझ्याकडून. ;)
उद्या आहे ना डाव? अनायासे सुट्टी आहेच.
होऊ दे खरच खर्च (मृत्युंजयचा)!

चतुरंग's picture

14 Nov 2013 - 12:51 pm | चतुरंग

कायपन! ;)

रमताराम's picture

14 Nov 2013 - 12:58 pm | रमताराम

होउ दे खरचं (ब्याण्डविड्थ).

आतिवास's picture

14 Nov 2013 - 1:30 pm | आतिवास

संपादकांना विनंती.
या खेळाशी संबंधित प्रकाशित धागे "दखल"मध्ये एके ठिकाणी देता येतील का? जसे (अनुवादित) नियमपुस्तिका, मागच्या स्पर्धेच्या वेळचे धागे इत्यादी. त्याचा उपयोग होईल माझ्यासारख्या अज्ञ वाचकाला!

चतुरंग's picture

14 Nov 2013 - 2:15 pm | चतुरंग

अशी सोय केली आहे.

कालचा डाव अफलातून होता. जादूगाराने हातातून एकामागोमाग एक वस्तू काढत राहव्यात तसे दोघे खेळ्या शोधून काढत होते. एकाहून सरस दुसरी. कार्लसनने आनंदचे ए२ प्यादे मारले आणि ए, बी अशा स्तंभातून सरकून बी१-एफ५ असा सपाटा मारुन उंट बरोब्बर बाहेर काढला! एक प्याद्याने कमी असलेला आनंद नंतर काही काळ अडकल्यासारखा झाला होता. आनंदची ३५ वी खेळी Ne4 ही मास्टरपीस होती त्याखेळीमुळे आनंद परत डावात राहिला इतकी ती खेळी सुंदर होती! मॅग्नुसची ५६ वी खेळी Re6 तशीच सुंदर. शिवाय संपूर्ण डावभर अनेक करामती आणि मेटिंग थ्रेट्स सुरुच होत्या.

आजच्या डावावरुन एक नक्की झाले की खेळाच्या कौशल्याचा भाग हा दोघांचा तोडीसतोड आहे. आता सायकॉलॉजिकल बॅटल आणि शारीरिक व मानसिक स्टामिना यांच्या लढतीत कोण सरस ठरेल तो डावात सरस ठरणार. कारण उत्तम खेळ्या हुडकून काढायची शक्ती हळूहळू कमी पडत गेली की कोणत्यातरी क्षणी पेचात अडकणार हे नक्की.
सर्वसाधारणपणे बरोबरी झालेले डाव कंटाळवाणे असतात परंतु हा डाव नि:संशय अपवाद! शेवटच्या काही खेळ्यांपर्यंत अंदाज येत नव्हता की काय होणार आहे. अगदी क्रिकेट वन्डेची आठवण व्हावी असे. शेवटच्या बॉलला एक रन हवी आहे आणि एकच फलंदाज उरलाय आणि धाव न काढता फलंदाज बाद मॅच ड्रॉ- तशी अवस्था झाली.

आता डोळे परवाच्या डावाकडे लागलेत. पहिल्यांदा जो जिंकेल त्याचा मानसिक दबाव दुसर्‍यावर जबर येणार त्यामुळे पाचवी लढत अत्यंत निकराची होणार, मॅग्नुस पांढरी मोहोरी घेऊन येतोय त्या डावात.
पण तोवर वाट बघणे आले.

खेळ 'वाचायचा' कसा यावर तुम्ही आधी काही लिहिलं आहे का?
असल्यास कृपया दुवा द्या; नसल्यास कृपया लिहा. :-)