नायिका भेद

प्रचेतस's picture
प्रचेतस in भटकंती
5 Nov 2013 - 12:05 am

मध्ययुगीन यादवकालीन मंदिरांमध्ये आपणास सुरसुंदरी आणि नायिकापट्ट आढळतात. सुरसुंदरी म्हणजे नृत्यमुद्रेतील अथवा वाद्यमुद्रेतील स्त्री प्रतिमा. ह्या एकतर विविध वाद्ये तरी वाजवत असतात किंवा नर्तन तरी करत असतात. तर नायिका म्हणजे वाद्यविरहित स्त्री प्रतिमा. ह्या बहुतांशी नृत्यमुद्रेत दिसत नाहीत. नायिका ह्या विविध शृंगारमुद्रेत किंवा काही विशिष्ट क्रिया करताना आपणास आढळतात. उदा. वेणी घालणे, भांग पाडणे, पुत्र सांभाळणे इ. तत्कालीन जनजीवनातील एकूण चालीरितीच ह्या शिल्पांद्वारे प्रकट होतात असे मला वाटते.

खजुराहोची मंदिरे ह्या नायिकापट्टांबाबत परिपूर्ण आहेत असे मी मानतो. येथे जवळपास सर्वच प्रकारच्या नायिकांची शिल्पे शिल्पकारांनी मोठ्या विलक्षण नजाकतीने कोरलेली आहेत. अर्थात खजुराहो मी अजून पाहिलेले नाही. पण पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील काही प्राचीन मंदिरे धुंडाळतांना विविध प्रकारच्या नायिकामूर्ती पाहण्यात आल्या त्यापैकीच काही येथे मांडत आहे. यांतील बहुतेक सर्वच मूर्ती त्रिभंग प्रकारातल्या आहेत.

१. पुत्रवल्लभा.

ह्या नायिका म्हणजे वात्सल्याच्या मूर्तीच. ह्यांचा हातात अथवा कडेवर ह्यांचा पुत्र दाखवलेला असतो व ह्या ममतेने त्याचे लाड करत असतात.

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील पुत्रवल्लभा. हिने आपल्या तळहातावर पुत्राला तोलून धरले आहे.

a

सिन्नरच्याच गोंदेश्वर मंदिरातील ही अजून एक पुत्रवल्लभा. हीने आपल्या पुत्राला एका हातावर घेतले असून दुसरा हात आधारासाठी चौकटीवर ठेविला आहे.

a

ही रांजणगावजवळील पिंपरी दुमाला नावाच्या लहानशा गावातील सोमेश्वर मंदिराच्या भिंतीवर असलेली पुत्रवल्लभा. हीने दोन्ही हातांनी पुत्राला तोलून धरले असून त्याचे मस्तकाचे ती अवघ्राण करीत आहे.

a

२. पत्रलेखिका.
ह्या नायिका पत्र लेखन करताना दिसतात. ह्यांच्या अत्यंत सुडौल मूर्ती खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आहेत.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील हे सौष्ठवपूर्ण पत्रलेखिका. नीट निरखून पाहिल्यास हीने अंगंठा आणि तर्जनी यांमध्ये लेखणी हाती धरिली आहे तीही स्पष्टपणे दिसून यावी. हिने चेहरा मात्र पत्राकडेच वळवला असल्याने आपल्याला हिचा चेहरा मात्र दिसत नाही.

a

खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातीलच अजून ही एक पत्रलेखिका. ही मात्र आपल्याला हीचा चेहरा दाखवतेय.

a

कोपेश्वर मंदिरापासून अगदी जवळच असलेल्या खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही एक अजून पत्रलेखिका.

a

३. आलस्यसुंदरी.

ही नुकतीच झोपेतून उठलेली असल्याने दोन्ही हात डोक्यावर नेऊन आळोखेपिळोखे देऊन आलेला आळस दूर करायचा प्रयत्न करत असते.

पेडगावच्या लक्ष्मीनारायण मंदिरातील ही आलस्यसुंदरी पहा.

a

४. कर्पूरसुंदरी

ह्या नायिका आपला प्रचंड केशसंभार खांद्यावरून शरीराच्या पुढच्या भागावर घेऊन त्याची वेणी घालायचा प्रयत्न करीत असतात.

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही कर्पूरसुंदरी

a

खिद्रापूरच्याच जैन मंदिरातील ही अजून एक कर्पूरसुंदरी.

a

५. दर्पणसुंदरी अथवा दर्पणा.
मध्ययुगीन मंदिरात या नायिकांचे प्रकार बहुधा सर्वात जास्त दिसत असावेत. ह्यांच्या हातात बहिर्वक्र आरसा असतो. तत्कालिन कालखंडात काचेचे आरसे नसल्याने शिसे गुळगुळीत दगड घासून घासून गुळगुळीत केले जात आणि जास्तीत जास्त दृश्य दिसावे म्हणून हे आरसे बहिर्वक्र केले जात. ह्या नायिका आरशात बघून त्या भांग पाडणे, शृंगार करणे, कुंकूम रेखाटणे इत्यादी क्रिया करीत असतात.

पिंपरी दुमाला येथील सोमेश्वर मंदिरातील ही दर्पण सुंदरी
आरशात बघून आपल्या डोईवरचे केस ही नीट निरखून सजविते आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही एक दर्पणा.

a

गोंदेश्वरातीलच अजून ही एक दर्पणा.

a

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही अजून एक दर्पणसुंदरी.

a

भुलेश्वरातील ही एक दर्पणा

a

हे शिल्प माझ्या सर्वाधिक आवडीचे. किती निगुतीने ही आपले सौंदर्यप्रसाधन करीत आहे. हे ही शिल्प भुलेश्वर मंदिरातलेच.

a

६.
ह्या प्रकाराला नक्की काय म्हणतात ते मला माहित नाही. पण ही शिल्पे फार मजेशीर आहेत. आपला साजशृंगार आटोपून आपल्या प्रियकराची वाट बघणार्‍या अथवा त्याच्या भेटीसाठी निघालेल्या ह्या सुंदरी. ह्या नखशिखांत आवरून तयार असतानाच एखादे चावट मर्कट ह्यांचे वस्त्र अलगद वर उचलून अथवा ओढून ह्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि ह्या नायिका पणे सलज्जतेने त्यांना चापट मारतांना आढळतात. मनुष्याचा चावटपणाच ह्या मर्कटांच्या रूपाने येथे चित्रित केलाय की काय न कळे.

पिंपरी दुमाला येथील ही नायिका. एक मर्कट तिला त्रास देत असून ती एका हाताने माकडाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असून दुसरा हात चापट देण्याच्या आविर्भावात तिने वर उचलला आहे.

a

ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिरातील अत्यंत देखणी सुंदरी मर्कटला कसे हाकलीत आहे पहा.

a

ही खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. दोहींचेही वस्त्र मर्कटाने उचलले असून सुंदरी चपेटदान आविर्भावात आहेत.

a--a

ही सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील सुंदरी. हिला दोन्ही बाजूंनी दोन मर्कटे छळत आहेत.

a

७.
हा अजून एक वेगळा प्रकार.
हा स्त्रीचे सामर्थ्य दाखवणारा. हीने आपल्या एका हातात मुंगूस तर दुसर्‍या हातात साप धरीला असून त्या दोघांनाही ही झुंजवत आहे. जणू माझी तुमच्यावर पूर्ण हुकूमत आहे असेच ती दर्शवीत आहे.

खिद्रापूरच्या जैन मंदिरातील ही तशा प्रकारची प्रतिमा.

a

८.
हा सुद्धा एक वेगळाच प्रकार.
ह्या नायिकेच्या पायात रूतलेला काटा हीची बुटकी सखी दूर करीत आहे किंवा हीचे पैंजण ती नीट बांधत आहे.
पेडगावच्या मंदिरातील हे शिल्प

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील अशाच प्रकारची ही एक नायिका.

a

९. शुकसारिका.

हा शिल्पाचा प्रकार अतिशय दुर्मिळ. हा मला फक्त पेडगावच्या मंदिरात बघायला मिळाला. भुलेश्वर मंदिरात शुकसारिका नक्कीच असावी मात्र तिकडील शिल्पे मूर्तीभंजकांच्या तडाख्यात सापडून प्रचंड प्रमाणात भग्न झालेली असल्याने ओळखू येत नाहीत.
ह्या प्रकारच्या शिल्पात नायिकेने एका हातात आंबे असलेली डहाळी पकडली असते तर दुसर्‍या हातात पोपट असतो.

पेडगावच्या मंदिरातील ही शुकसारिका बघा.
हीने आपल्या डाव्या हातात आंब्याची डहाळी पकडलेली असून उजव्या हातात पोपट आहे. तो पोपट तिच्या भरीव उरोजालाच आंबे समजून त्यांना आपल्या चोचीने स्पर्श करू पाहात आहे. अर्थात मूर्तीभंजकांच्या हल्ल्यांमुळे हीचा उजवा हात त्यावरील शुकासह भग्न झालेला असून आपल्याला केवळ तिच्या हातातील आंब्याच्या डहाळीमुळे व उजव्या हाताच्या स्थितीवरून ही शुकसारिका असल्याची कल्पना येते.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातील ही शुकसारिका

a

१०. विषकन्या.

तत्कालीन कालखंडात शत्रूला संपवण्यासाठी विषकन्यांचा सर्रास वापर होईल. शत्रूला आपल्या सौंदर्याने भुलवून विषप्रयोगाद्वारे ह्या त्याचा मृत्यू घडवून आणत.

शिल्पांमधले ह्यांचे चित्रण सहजी ओळखता येते. अतिशय सुंदर, सुडौल, पूर्णतया नग्न, मस्तकी अथवा गुढघ्यावर सर्पांचा वेढा ही यांची प्रमुख लक्षणे. काही वेळा ह्यांच्या पायांत पादत्राणे सुद्धा आढळून येतात.

पिंपरी दुमाला मधील ही विषकन्या. हिने आपल्या मस्तकी काहीतरी धरीले असून पायांत सर्पांचा वेढा आहे.

a

भुलेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही विषकन्या पाहा. हीने आपल्या मस्तकी सर्प धारण केला आहे.

a

सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरातील ही विषकन्या. हीने आपल्या खांद्यावरून सर्प धारण केला असून ही आपले विभ्रम दाखवीत आहे. हिच्या पायांकडे पहा. चक्क चपला/ सॅन्डल्स दिसत आहेत.

a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातल्या बाह्य भिंतीवरची ही अत्यंत सौष्ठवपूर्ण विषकन्यका. हीने आपल्या कमरेवरून सर्प गुंडाळलेला असून ती आपले नानाविध विभ्रम दाखवीत आहे. हिने सुद्धा पादत्राणे परिधान केलेली आहेत.

a

प्रतिक्रिया

अतिशय अभ्यासपूर्ण नि संयमित लेख.
वल्ल्या जोन्स इतिहास संशोधक होच सगळं सोडून.
काही नाही किमान त्या शिल्पांचं 'नेमकं मनोगत' तरी पोचवशील आमच्यापर्यंत. :)

पाषाणभेद's picture

5 Nov 2013 - 5:20 am | पाषाणभेद

>>> अतिशय अभ्यासपूर्ण नि संयमित लेख.
+१००००००%
शिल्पकलेतले बारकावे कसे बघावेत हे या लेखामुळे चांगलेच समजले.

आपणे चांगले कलाकार जरी नसू पण वल्लीशेठच्या असल्या लेखांमुळे आपण कलेचे चांगले आस्वादक तरी होवू.

जेपी's picture

12 Nov 2013 - 4:45 pm | जेपी

आवडल वल्ली जी .

भावी संपादक -तथास्तु

ह . घ्या

मोदक's picture

5 Nov 2013 - 12:36 am | मोदक

मस्त रे..

असेच अप्रतीम लेख पोतडीतून येवूदेत!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2013 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ अप्रतिम.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

5 Nov 2013 - 12:44 am | विजुभाऊ

सुंदर. खूपच छान. मूर्तीभंजकांना यातील सौंदर्य दिसले नाही हे एक आश्चर्यच.

यशोधरा's picture

7 Nov 2013 - 11:51 am | यशोधरा

आणि नशीब!

पिशी अबोली's picture

5 Nov 2013 - 1:06 am | पिशी अबोली

मस्त ओळख... कशा ओळखायच्या त्याचं सहज-सोपं वर्णन आवडलं..

तुमचे लेख अभ्यासपूर्ण असतात.

प्यारे१'s picture

8 Nov 2013 - 7:36 pm | प्यारे१

पिशी अबोलीचे लेख का?

अत्रुप्त आत्मा's picture

5 Nov 2013 - 1:35 am | अत्रुप्त आत्मा

भेदक नायिका (चित्र) पट! :)

रामपुरी's picture

5 Nov 2013 - 2:10 am | रामपुरी

शिल्पे आणि छायाचित्रे दोन्ही आवडलं.
(अवांतरः "सुरसुंदरी" हा शब्द "सूरसुंदरी" असा लिहायला पाहीजे असं वाटतं)

मन१'s picture

5 Nov 2013 - 2:39 am | मन१

दगडाच्या शिल्पा भभक्कम नर्जिव, व काळ्या दगडाशिवाय काय पहायचं ते तुम्हा मंडळीकडून शिकावं.
आम्हाला दगड दिसतो, तुम्हला शिल्प!
ंओ

अर्धवटराव's picture

5 Nov 2013 - 2:59 am | अर्धवटराव

मी अम्मळ लेट जन्म घेतला म्हणायचा... ह्म्म्म्म.. फक्त शिल्प प्रचीवर समाधान मानतो आता :(

मदनबाण's picture

5 Nov 2013 - 7:42 am | मदनबाण

बहुमोल माहिती ! :)
खिद्रापुरच्या मंदिरातील सोंड तोडलेले सर्व हत्ती पाहुन फार दुख: झाल होत...
बाकी अर्धवटरावांशी पूर्णपणे सहमत ! फारच लेट जन्म
घेतला...

जाता जाता:- दर्पण हस्तीका आठवली... ;)
D

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 11:31 am | चित्रगुप्त

मदनबाण यांनी दिलेला फोटो बघून भारतीय शिल्पकलेच्या थोरवीची जास्तच जाणीव झाली. म्हणजे असे, की इथे प्रत्यक्ष एक स्त्री 'दर्पण हस्तिका' या भाव-भंगिमेत उभी आहे. या प्रत्यक्षापेक्षा शिल्पकारांनी घडवलेल्या शिल्पातील स्त्रिया कितितरी पटीने जास्त आकर्षक, मोहक, कमनीय, सुंदर आहेत. प्रत्यक्षाला कल्पनेने, प्रतिभेने वेगळे रूप देण्याचा हा परिणाम आहे.

प्यारे१'s picture

5 Nov 2013 - 8:49 pm | प्यारे१

ही सो कु (ज्यु) आहे ना?
जल्ला काली कशी जालीन येवरी? करपलीन का काय? ;)

विनायक प्रभू's picture

5 Nov 2013 - 8:12 am | विनायक प्रभू

सुं द र विवेचन.

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 9:15 am | चित्रगुप्त

अत्यंत सुंदर मूर्ती व त्यांचे फोटो. 'त्रिभंग' म्हणजे नेमके काय? 'तीन ठिकाणातून वळवलेले शरीर' (उदा. कंबर, खांदे व मान) असा त्याचा अर्थ आहे का? तसेच 'नायिका' ची व्याख्या काय आहे?

'नायिकाभेद' शीर्षक वाचून भरतमुनींच्या 'अष्टनायिका' अर्थात 'वासकसज्जा' 'विरहोत्कंठिता' 'स्वाधीनभर्तृका' 'कलहांतरिता' 'खंडिता' 'विप्रलब्धा' 'प्रोषितभर्तृका' आणि 'अभिसारिका' नायिकांबद्दल हा लेख असेल, असे वाटले होते.
अन्य ग्रंथात बारा, सोळा, नायिका असल्याचेही वाचनात आले त्यापैकी एक 'प्रवत्स्यत्वल्लभा' आहे. अन्य नावे अजून सापडली नाहीत.
तुम्ही इथे दिलेली नावे कोणत्या ग्रंथात नोंदलेली आहेत? ही पण अगदी वेगळी, आणि खास शिल्पांसाठी योजलेली वाटतात.
भरतमुनिंच्या 'अष्टनायिकां'च्या मूर्ती आहेत का? (चित्रे बरीच आढळतात). पूर्वी चित्रकार दीनानाथ दलाल यांनी या अष्टनायिकांची सुंदर चित्रे काढली होती.
या विषयावर अत्यंत सुंदर धागा काढलात, हे थोरच.

प्रचेतस's picture

5 Nov 2013 - 3:05 pm | प्रचेतस

धन्यवाद.

त्रिभंग म्हणजे तीन कोनांतून वळवलेले शरीर. शरीराला उठाव देण्यासाठी त्रिभंग मुद्रा शक्यतो वापरली जाते. शीर, धड आणि कंबर किंवा गुढघा.

ह्याच मुद्रांचे अबंग, समभंग, अतिभंग असेही प्रकार आहेत.

चित्र आंतरजालावरून.
a

भरतमुनींच्या अष्टनायिका पाहिल्या नाहीत कधी. पण हे सर्वच प्रकार खजुराहोतल्या मंदिरांवर मोठ्या नजाकतीने कोरलेले दिसतील.
बाकी मी लिहिलेल्या लेखांतील नावे ही मूर्तीशास्त्रातील तज्ज्ञांकदून माहित झालेली आहेत. पुस्तकांत बहुधा मी तरी वाचली नाहीत कुठे.

चित्रगुप्त's picture

6 Nov 2013 - 10:11 pm | चित्रगुप्त

वरील त्रिभंगाच्या इथे दिलेल्या चित्रातील सर्व आकृतींचे चेहरे, छाती आणि कंबर समोरच्या बाजूनेच दिसते आहे (Front view) माझ्या माहितीप्रमाणे सबंध शरीर उभा पीळ दिल्यासारखे तीन ठिकाणातून वळलेले असते, त्याला 'त्रिभंग' म्हणतात. उदाहरणार्थ क्रमांक १० विषकन्या, आणि खिद्रापूरच्या जैन मंदिरातील दोन नायिका. शिल्पकलेच्या दृष्टीने अशी शिल्पे जास्त प्रगत होत. ही जास्त सुंदर, रमणीय, कमनीय वाटतात.
उदाहरणार्थ खालील शिल्पे: डावीकडील इजिप्शियन शिल्प ठोकळेबाज वाटते, तर उजवीकडील ग्रीक शिल्प (आणि त्याखालील फ्रेंच शिल्प) त्यामानाने खूपच खर्‍यासारखे, जिवंत वाटते.

m...

.....
Odalisque - Sculpture by French Artist James Pradier 1841

मी दिलेल्या चित्रातील शेवटची आकृती फक्त त्रिभंगाची. डावीकडून अभंग, समभंग, अतिभंग आणि शेवटी त्रिभंग असे प्रकार आहेत.
इजिप्शियन शिल्पे बरीचशी अभंग आणि समभंग यामध्ये मोडली जातात.

पैसा's picture

6 Nov 2013 - 10:21 pm | पैसा

अष्टनायिकांची जुनी चित्रे असतील तर प्लीज द्या इथे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2013 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर धागा. लेणी किंवा त्याचे फोटो पाहताना त्यांचे सौंदर्य मन मोहून घेते पण अशी माहिती मिळाली तर तो आनंद द्विगुनित नाही तर शतगुणितच होतो !

असेच आमचे मनोरंजन करता करता शिक्षण केल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद ! तुमच्या खजिन्यातून असेच सचित्र लेख वारवार बाहेर येवू द्यात.

'त्रिभंग' म्हणजे काय?

साती's picture

12 Nov 2013 - 2:52 pm | साती

फारच सुंदर धागा. लेणी किंवा त्याचे फोटो पाहताना त्यांचे सौंदर्य मन मोहून घेते पण अशी माहिती मिळाली तर तो आनंद द्विगुणित नाही तर शतगुणितच होतो !

पैसा's picture

5 Nov 2013 - 11:35 am | पैसा

मस्त फोटो आणि माहिती.

यातल्या माकडे ज्याना सतावत आहेत त्या अभिसारिका आहेत. प्रियकराला भेटायला जाताना कोणतेही संकट आले तरी न भिणार्‍या. साजशृंगार करणार्‍या वासकसज्जा. तर पायात पैंजण घालणार्‍या/आळिता लावणार्‍या स्वाधीनभर्तृका. (त्यांच्या पायाशी बसलेल्या आकृत्या सखीच्या नाही तर प्रियकराच्या असाव्यात.)

शुकाबरोबर असलेल्या नायिका प्रोषितभर्तृका, म्हणजे त्यांचे नायक दूरदेशी गेले आहेत आणि त्याला ही नायिका संदेश पाठवत आहे.

या नायिकांशी संबंधित राग रागिण्याही सांगितलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल चौरा आणि चित्रगुप्त यानी विस्ताराने लिहावे ही विनंती.

प्रचेतस's picture

5 Nov 2013 - 3:08 pm | प्रचेतस

धन्यवाद.

अभिसारिका म्हणजे मर्कटरहित नायिकामूर्ती असेच वाटत होते.

सुंदर विवेचन, अभ्यासपूर्ण लेख आवडला.

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 12:18 pm | चित्रगुप्त

भरतमुनिंच्या अष्टनायिकांखेरीज अन्य ग्रंथातील नायिकांची ही जंत्री:

स्वकीया, परकीया, पुनर्भू, सामान्या, मुग्धा, मध्या, प्रगल्भा, धीरा, धीराधीरा, अधीरा, ज्येष्ठा, कनिष्ठा, ऊढा, अनूढा, अन्य-संभोगदु:खिता, वक्रोक्तिगर्विता, प्रेमगर्विता, सौंदर्यगर्विता, मानवती, ज्ञातयौवना, अज्ञातयौवना, नवोढा, विश्रब्धनवोढा, गुप्ता, विदग्धा, वाग्विदग्धा, क्रियाविदग्धा, लक्षिता, कुलटा, अनुशयना, मुदिता, प्रोष्यत्पतिका, प्रवत्स्यत्पतिका, ज्योत्स्नाभिसारिका, शुक्लाभिसारिका, तमिस्त्राभिसारिका, कृष्णाभिसारिका, दिवसाभिसारिका, रक्ता, विरक्ता, निजतानुरागिनी, व्यंग्याविदग्धा, मर्मपीड़िता, अद्भुता, उद्भूदिता, आसाध्या, सुखसाध्या, कामवती, अनुरागिनी, प्रेमअशक्ता ...
(........ या सर्वांचा अर्थ सांगण्यासाठी बॅटमनास पाचारण..........)

याशिवाय वयाच्या दृष्टीने केलेले नायिकांचे वर्गिकरणः
देवी (वयवर्षे ७ पर्यंत)
देवगंधर्वी (वयवर्षे ७ - १४)
गंधर्वी (वयवर्षे १४ - २१)
गंधर्वमानुषी (वयवर्षे २१ - २८)
मानुषी (वयवर्षे २८ - ३५)

:) (आमच्या मागील एका धाग्यात डु. स्त्रीआयडींच्या त्सुनामीची आठवण झाली) :)

प्रचेतस's picture

5 Nov 2013 - 3:09 pm | प्रचेतस

अबबबबब. किती हे प्रकार. :)

हे सर्वच खजुराहोमधल्या मंदिरांवर आहेतच. कधी तिकडे जायचा योग आहे कुणास ठाऊक.

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 8:10 pm | चित्रगुप्त

हे सर्व प्रकार खजुराहोत आहेत म्हणता तर, तूर्तास या नायिकांच्या तेथील मूर्ती जालावरून हुडकून देऊ शकता का? निदान प्राथमिक अभ्यास घडेल यातून.

प्रचेतस's picture

5 Nov 2013 - 8:34 pm | प्रचेतस

गूगल शोध घेतला असता येथे बरीच शिल्पे मिळतात. खजुराहो मैथुनशिल्पांमुळे उगा बदनाम झालेले आहे. वास्तविक पाहता अशी शिल्पे १० ते १५% च्या वर नाहीत. तरीही शोधात हीच शिल्पे समोर येतात. यातूनच चाळणी लावून नायिकांची काही शिल्पे मिळतीलच.

बॅटमॅन's picture

5 Nov 2013 - 3:22 pm | बॅटमॅन

अर्थ तर स्वयंस्पष्ट आहे चित्रगुप्तजी :)

प्यारे१'s picture

5 Nov 2013 - 3:34 pm | प्यारे१

तुला समजेल रे सगळं. ;)
आम्हाला मात्र काही विशिष्ट अर्थच समजले.
इतर अर्थांचं काय?

एक काम कर की भावा!
सगळ्याचे अर्थ दे की जरा! :)

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 8:01 pm | चित्रगुप्त

सगळ्याचे अर्थ दे की जरा!

असेच म्हणतो. आमचे संस्कृताचे ज्ञान ते काय, आणि नायिकांची ही अर्थगर्भ नावे कुठे. साधा 'नवोढा' चा अर्थही नीट लावता येईना. (नव-ओढा, म्हणजे जिला प्रणयाचा ओढा नवा-नवाच लागला आहे, अशी, असा अर्थ फारतर आम्ही लाऊ शकतो)

लैच जब्री लेख-टिपिकल वल्ली स्टाईल. आम्हाला त्या पत्रलेखिका आणि ती टीजर माकडे सर्वांत आवडली. अन ओळखायचे पॉइंटर्स असल्याने अजून मजा आली.

(नायिकाप्रेमी) बॅटमॅन.

पैसा's picture

5 Nov 2013 - 3:30 pm | पैसा

पत्रलेखिकासुद्धा प्रोषितभर्तृका आहेत.

तरी ती नवोढा का काय म्हणतात ती सर्वांत उत्तम ;)

पैसा's picture

5 Nov 2013 - 4:38 pm | पैसा

थिअर्‍या बास झाल्या. प्रत्यक्षातल्या बघा.

बॅटमॅन's picture

5 Nov 2013 - 4:44 pm | बॅटमॅन

आम्ही पाहतो काय ते. चिंता नसावी.

प्यारे१'s picture

5 Nov 2013 - 5:10 pm | प्यारे१

पैसातै, खिक्क्क!

___/\___

मार्जारबै पंजात लेखणी धरून वाल्गुदेयाला पत्र लिहितीय आणि एक मर्कट तिचा पाय ओढून तिला उगा छळत आहे असे चित्र डोळ्यांसमोर आले.

पैसा's picture

5 Nov 2013 - 7:21 pm | पैसा

मेले! अभ्याऽऽऽ वेळ मिळाला की काढच असलं चित्र!

बॅटमॅन's picture

5 Nov 2013 - 8:26 pm | बॅटमॅन

अय हय........काय शीन बे तो. आमच्या मार्जारबैंना कुणी मर्कट छळत असेल तर रेस्क्यू ऑपरेशन करावयास लै मज्जा ;) "ड्याम्शेल इन डिष्ट्रेस" ला रेस्क्यू करणारा "डार्क नाईट" ;)

पंखांची फडफड ऐकू यायला लागली ना बे.a

पैसा's picture

5 Nov 2013 - 11:03 pm | पैसा

ही बघा. पत्रलेखिका नाही. पण वासकसज्जा आहे.

cat

धन्यवाद. पण आम्हाला ही जास्त प्रिय आहे.

पहिली आहे ती युद्धसज्जा.

anne

आणि ही सौंदर्यगर्विता.

anne

प्यारे१'s picture

6 Nov 2013 - 12:13 am | प्यारे१

भक्त भाविकांना सूचना...

कृपया रांगेत या. आपापल्या भावना आवरा.
धागा निर्जीव असणार्‍या मात्र सजीव वाटणार्‍या 'पाषाणशिल्पां'चा (हे महत्त्वाचं) आहे.
थोडी फार चर्चा त्याबद्दल पण व्हावी ही णम्र विणंती.
धन्यवाद!

पिशी अबोली's picture

6 Nov 2013 - 12:21 am | पिशी अबोली

शिल्प-नायिकेचे भाव पाहून आपापल्या प्रियेची आठवण होत असेल, तर ते उलट धाग्याचं यश मानलं पाहिजे ना? ;)

कृपया सल्ले आवरा आणि अंमळ मजा घ्यायला शिका ही णम्र विणंती.

धन्यवाद!

प्यारे१'s picture

6 Nov 2013 - 12:30 am | प्यारे१

भक्त भाविकांना सूचना...

कृपया रांगेत या. आपापल्या भावना आवरा.
धागा निर्जीव असणार्‍या मात्र सजीव वाटणार्‍या 'पाषाणशिल्पां'चा (हे महत्त्वाचं) आहे.
थोडी फार चर्चा त्याबद्दल पण व्हावी ही णम्र विणंती.
धन्यवाद!

बॅटमॅन's picture

6 Nov 2013 - 4:07 pm | बॅटमॅन

प्यारे काका, जुन्या नायिकांमुळे नव्या नायिकांची आठवण होणे हे अपरिहार्यच. तुम्ही त्या तुझे आहे तुजपाशी मधल्या आचार्यांसारखे वाटू राहिला आहात. सल्ले देणे थांबवा अशी णम्र विणंती.

-आपला बॅटूभैय्या काकाजी देवासकर.

प्यारे१'s picture

6 Nov 2013 - 4:17 pm | प्यारे१

अरे वो क्या हय ना, की वो चुकून गलती से डब्बल प्रतिसाद पड्या.

बाकी 'देवासकर नि तुज आहे तुजपाशी' तलं वाक्य वाचून जुन्या मालकांची नव्यानं आठवण आली.

तात्या तुम्ही कुठे आहात?
असाल तसे तब्बेत सांभाळून असा हीच प्रार्थना. :)

पैसा's picture

6 Nov 2013 - 4:24 pm | पैसा

भाविकान्ना णम्र इणंती. रांगेत या आणि नायिकांबद्दल लिवा.

प्यारे१'s picture

6 Nov 2013 - 4:25 pm | प्यारे१

नायिका कुठल्या?
जुन्यातल्या जुन्या, जुन्यातल्या नव्या, नव्यातल्या जुन्या का नव्यातल्या नव्या? ;)

बॅटमॅन's picture

6 Nov 2013 - 4:25 pm | बॅटमॅन

नायिकांबद्दल लिहा प्यारेकाका, नुस्ते नायक होऊ नका ;) =))

(पळून गेलेला) बॅटमॅन.

पैसा's picture

6 Nov 2013 - 4:42 pm | पैसा

अशा!

lekhika

सुहास..'s picture

10 Nov 2013 - 3:05 pm | सुहास..

मिपावरचा अमिट खजिना !!!!

सार्‍या शिल्पा छान आहेत.
आलस्य सुंदरी, चपेटदान शब्द आवडले.

यशोधरा's picture

5 Nov 2013 - 4:10 pm | यशोधरा

वल्ली, सुरेख धागा. फार छान लिहिलेस आणि प्रतिसादांमध्येही उत्तम माहिती.
सुरेख प्रकाशचित्रे. धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

5 Nov 2013 - 5:31 pm | चित्रगुप्त

नायिका कश्याला म्हणायचे? हे राहूनच गेले.
बालिका, किशोरी, प्रौढा, स्त्री, नारी, अबला, यापेक्षा वेगळा खास शब्द 'नायिका' असल्याने त्याचा विशिष्ट अर्थ असणार. ('नायकीण' म्हटले, की आणखी वेगळी अर्थछटा प्राप्त होते).
नायिकांप्रमाणेच भरतमुनिंनी 'नायक' चार प्रकारचे सांगितले आहेतः
धीरललित, धीरप्रशान्त, धीरोदात्त, आणि धीरोद्धत.
अग्निपुराणात नायकांचे आणखी चार प्रकार सांगितलेतः अनुकूल, दर्क्षिण, शठ, आणि धृष्ठ.
(हे सर्व गूगलबाबाने सांगितले, पण यामुळे अग्निपुराण वगैरे वाचले पाहिजे, असे वाटते)

नायिका म्हणजे शब्दशः हिरोईन. जी आपले विभ्रम आपल्या अंगप्रत्यांगासह दाखवत आहे अशी स्त्री. :)

प्यारे१'s picture

5 Nov 2013 - 8:48 pm | प्यारे१

>>>जी आपले विभ्रम आपल्या अंगप्रत्यांगासह दाखवत आहे अशी स्त्री.

परवाच कुणीतरी सांस्कृतिक धक्क्याबद्दल बोलत होतं ब्वा!

-वल्लीबरोबर शतकासाठी स्ट्राईक रोटेट करणारा ;) प्यारे

चौकटराजा's picture

5 Nov 2013 - 6:35 pm | चौकटराजा

तो वेडा कुंभार तसा तू वेडा संशोधक !
सध्या बांधला गेलोय रे नाहीतर .......खुजुराहो काय अथेन्स लाही गेलो असतो.

ब्रिज's picture

5 Nov 2013 - 6:53 pm | ब्रिज

वल्ली साहेब,
तुमच्या लेखांमधून नेहेमीच छान माहिती आणि नजर पण मिळते. तुमच्या लेखांमुळे कधी पाहिलेल्या आणि कधी "आता हे पहायला हवं" अशा ठिकाणांची ओळख होते. धन्यवाद.

चिगो's picture

5 Nov 2013 - 9:04 pm | चिगो

'देखण्या नायिका और वल्लीजी की पारखी नजर..' सुंदर शिल्पपरीचय, वल्ली..

ह भ प's picture

5 Nov 2013 - 10:06 pm | ह भ प

माझ्या खजुराहोच्या ट्रीपला वल्लीदा सोबत असायला हवे होते असं आता वाटू राहिलं आहे.. वल्लीदा प्रेमळ आग्रह- तुम्ही जाच आता खजुराहोला.. अन तिथली नायिकांची चित्रे टाका राव.. परवाच भुलेश्वरला गेलो पण त्या शिल्पांचा अर्थ असा असू शकतो हे लेख वाचल्यानंतर कळलं..

एस's picture

5 Nov 2013 - 10:08 pm | एस

भारतीय सौंदर्यवादी शिल्पकला आणि ग्रीक वास्तवदर्शी शिल्पकला या दोन्ही शैलींमधील फरक जाणून घ्यायला आवडेल. तसेच तिकडे वास्तववाद तर इकडे काहीसे अतिरंजन असे का झाले असावे हा प्रश्न नेहमीच पडतो. नग्नता किंवा समाजव्यवहारांमधील खुलेपणा दोन्हींकडे जवळजवळ सारखाच आढळतो. या दोन्ही शैलींचा एकमेकींवर प्रभाव पडला असावा का?

प्रचेतस's picture

5 Nov 2013 - 10:21 pm | प्रचेतस

धन्यवाद स्वॅप्स.

याबाबतीत तरी मला काहीच सांगता येणार नाही. ग्रीक शिल्पकलेबाबतीत माझे ज्ञान अतिशय तोकडे आहे किंबहुना भारतातील बौद्ध लेण्यांमध्ये दिसणार्‍या स्फिन्क्स, ग्रिफिन, सेन्टॉर आदी ग्रीक मिथकांतील प्राण्यांइतकेच मर्यादित आहे. कदाचित याबाबतीत चित्रगुप्तकाका अधिक काही सांगू शकतील.

भारतीय आणि पाश्चात्त्य चित्रकलेतील भेद यावर सचित्र लेख लिहून जवळ जवळ तयार आहे, तो लवकरच टाकेन. मात्र त्यात शिल्पांचा विचार केलेला नाही.
आधी जगभर (भारत, इजिप्त, चीन, जपान, पर्शिया इ.) 'सपाट' चित्रकलाच प्रचलित होती. पुढे युरोपात तेवढे त्रिमित वास्तवदर्शी चित्रण का सुरु झाले असावे, हा प्रश्न मलाही नेहमी पडतो. कोणीतरी यावर लिहिले असेलच, पण अजून वाचनात आले नाही.
मी बर्‍याच इजिप्शियन ममीज बघितल्या आहेत. त्यावर (त्यात कुणाचे शरीर आहे, हे ओळखता यावे म्हणून बहुधा) अगदी हुबेहुब चेहरेपट्टी रंगवलेली असते. कदाचित हीच वास्तवदर्शी कलेची सुरुवात असावी. आपल्याइकडील पुराणात अमूक राजकन्येचे चित्र तमूक राजपुत्राने बघितले वगैरे वर्णने असतात, पण तशी चित्रे उपलब्ध नाहीत.

एस's picture

6 Nov 2013 - 11:50 pm | एस

लेखाची वाट पहात आहे. भारतीय कलावशेषांची वाट का लागली असावी, त्यांच्या विविध टप्प्यांमधील दुवे सापडत का नाहीत असे बरेच प्रश्न मनात आहेत. तुम्हांला मी मागेही एकूणच चित्रकलेच्या इतिहासावर लेखमाला लिहा असा आग्रह केला होता. जरूर लिहा.

बॅटमॅन's picture

7 Nov 2013 - 12:02 am | बॅटमॅन

लेखाची वाट पाहत आहे. बरेच प्रश्न आहेत त्यांची उत्तरे मिळतील असा विश्वास वाटतो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

येउद्या लेख लवकर ! जरा जमलं तर चित्रं गुगलबाबावर टाकावी. इतर ठिकाणची (फ्लिकर,इ) चित्रं सगळ्याना दिसत नाहीत... त्यातले आम्ही एक :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 12:36 am | डॉ सुहास म्हात्रे

येउद्या लेख लवकर ! जरा जमलं तर चित्रं गुगलबाबावर टाकावी. इतर ठिकाणची (फ्लिकर,इ) चित्रं सगळ्याना दिसत नाहीत... त्यातले आम्ही एक :(

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे

येउद्या लेख लवकर ! जरा जमलं तर चित्रं गुगलबाबावर टाकावी. इतर ठिकाणची (फ्लिकर,इ) चित्रं सगळ्याना दिसत नाहीत... त्यातले आम्ही एक :(

प्यारे१'s picture

7 Nov 2013 - 12:54 am | प्यारे१

>>>आम्ही एक
१. एक नाही तीन!
२. एवढी उत्सुकता की तीन वेळा एकच प्रतिसाद.
३. मन में तीन तीन लड्डू फुटे.

सरजी, हलकं घ्या! ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 10:19 am | डॉ सुहास म्हात्रे

हे कसं झालं? मी तर एकदाच प्रतिसाद टाकला होता ! :)

प्रचेतस's picture

7 Nov 2013 - 10:22 am | प्रचेतस

अहो धाग्याचीच इच्छा दिसतेय माझे कधीतरी शतक व्हावे म्हणून. =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2013 - 10:25 am | डॉ सुहास म्हात्रे

तसे असेल तर मग घ्या हा अजून एक बोनस ! +D

लॉरी टांगटूंगकर's picture

7 Nov 2013 - 12:03 pm | लॉरी टांगटूंगकर

शतकाला हात भार...! अजुन ३ बाकी

करा रंगांची फेक, येऊद्या लौकर लेख!!!
मिपा आहे घरचं, होऊ दे खर्च!!!

चौकटराजा's picture

7 Nov 2013 - 9:00 am | चौकटराजा

@स्वॅप माझ्या मते भारतीय शिल्पकलेत व चित्रकलेतही रिअल अनॉटमीचा अभ्यास कमी आहे. आपण या साठी एक करा .
पुणे विद्यापीठाच्या कॉनव्होकेशन हॉल मधे एक पुरूष व एक स्त्री ( दोघेही नग्न ) असे संगमरवरी पुतळे आहेत. त्यातील
त्या पुरूषाच्या मनगट ते कोपर या भागावरून हळूवार हात फिरवा. तिथे तुम्हाला त्यांची शिल्पकला व आपली यातील फरक कळेल.

चित्रगुप्त's picture

7 Nov 2013 - 10:10 am | चित्रगुप्त

मुळात एकाद्या संस्कृतीत (ग्रीकोद्भव संस्कृती) 'रियल अ‍ॅनाटॉमी' चा अभ्यास का करावासा वाटला, तसेच 'पर्स्पेक्टिव्ह' चे काटेकोर नियम दीर्घ प्रयत्नाने शोधून काढून त्याप्रमाणे चित्रण का केले जाऊ लागले, तर अन्य संस्कॄतींना तशी गरज का वाटली नाही, हा कळीचा मुद्दा आहे. याची कारणे ही 'कलाबाह्य' परिस्थितीत असावीत. उदाहरणार्थ:
१. इजिप्त मधे मृतदेह शेकडो थरांच्या आवरणात लपेटून वर सोन्याचे, चांदीचे , दगडाचे इ. आवरण घालून ठेवल्यावर तो देह नेमका कुणाचा आहे, हे कळावे म्हणून त्या व्यक्तीची हुबेहुब चेहरेपट्टी त्यावर चित्रित करणे (कुणास कळावे? नातेवाईक इ. ना, की आत्म्याचा पुढील प्रवास करवणार्‍या, ज्या पुन्हा भविष्यकाळी तो तो आत्मा पुन्हा त्या त्या शरीरात घालणार होत्या, त्या दैवी शक्तींना ?)
२. चौदावा लुई सारख्या प्रभावशाली राजाने जे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले, (उदा. व्हर्साय प्रासाद, लूव्रची दर्शनी बाजू इ.) त्या इमारती पूर्ण झाल्यावर कश्या दिसतील? हे त्याला दाखवण्यासाठी, किंवा चर्च मधे जाणार्‍या सर्वसामान्य माणसाला येशूचे चरित्र वा 'जुना करार' इ. तील प्रसंग 'अगदी खर्‍याखुर्‍या वाटणार्‍या' चित्रातून दाखवणे, वगैरे साठी 'पर्स्पेक्टिव्ह' चा शोध.

पुणे विद्यापिठातील पुतळ्यांचे फोटो देता येतील का? तुम्हाला काय म्हणायचे आहे, ते पुतळे बघितल्याशिवाय कळणार नाही. हातातल्या शिरा, स्नायु इ. हुबेहुब घडवले आहेत का?

चौकटराजा's picture

7 Nov 2013 - 1:56 pm | चौकटराजा

हातातल्या शिरा, स्नायु इ. हुबेहुब घडवले आहेत का?
असेच !
खरे सांगायचे तर अशा कलाकृतीना हाताळायला परवानगी नसते बहुतेक ठिकाणी. मी यक आपला चानस घेतला. पण माझ्या अंदाजाने चित्रगुप्त काका आपण या पेक्षा ही अलैकिक अनाटामी शिल्पात पाहिली असेलच !

एस's picture

9 Nov 2013 - 12:23 am | एस

मला काय म्हणायचे होते हे चित्रगुप्त यांनी चांगले मांडले आहे. दोन शैलीतील डावेउजवे करण्याचा हेतू नाहीये. त्रिमितीय वास्तववादी शरीररचनाशास्त्र तसेच इतरही कलाप्रकारांमध्ये वास्तववाद आपल्याकडे का नाही आणि तो फक्त ग्रीक सभ्यतेतील कलेतच का उगमास आला हा प्रश्न मला पडला आहे. भारतीय पहाडी चित्रशैली म्हणा किंवा प्राचीन धर्मग्रंथांना असलेल्या चित्रपट्टातील जैन लघुचित्रशैली म्हणा, सर्व द्वीमितीय आणि थोडे इग्झाजरेटेड असे दिसते. सुंदर सर्वच शैली आहेत. त्यांचा विकास कसा झाला आणि त्यांचा एकमेकींवर किती आणि कसा प्रभाव पडला हा माझा मुद्दा आहे.

किसन शिंदे's picture

6 Nov 2013 - 12:06 am | किसन शिंदे

नायिका भेद तर झाला, आता पुढे काय याची उत्सूकता लागली आहे. :)

धन्या's picture

6 Nov 2013 - 12:16 am | धन्या

मस्त लेख आहे !!!

यातले बर्‍याचशा नायिका विविध मंदीरांमधून तुमच्या सोबत पाहील्या आहेत. :)

एक खिद्रापूर सोडले तर नायिका पाहिल्या नैत किंवा दिसल्या नैत. यापुढे वल्ली जोन्सबरोबर निच्छितच पाहिल्या जातील. डोळे ट्रेन करणारे लेख लिहितो वल्ली.

लॉरी टांगटूंगकर's picture

6 Nov 2013 - 12:22 pm | लॉरी टांगटूंगकर

मस्त लेख आहे !!! पुर्वज लोकं रसिक होते, काय काय सुदंर सुंदर गोश्टी बनवल्या आहेत..

डोळे ट्रेन करणारे लेख लिहितो वल्ली. +११११११

नायिकादर्शनोत्सुक
मन्द्या

प्रशांत's picture

7 Nov 2013 - 11:31 am | प्रशांत

पेडगावच्या मंदिराचा धागा येवु द्यात लवकर