त्रासदायक बॉस आणि ऑफीस मधील राजकारण कसे सांभाळावे ?

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in काथ्याकूट
24 Oct 2013 - 11:16 am
गाभा: 

आपण् आपल्या दिवसातले बरेचसे तास ऑफीसमधे असतो(काही सुदैवी जीव स्वताचा व्यवसाय करतात !! ). मन लावून काम करावे आणि त्या काळात डोके शांत आणि नीट रहावे अशी इच्छा सगळ्यांचीच असते. पण ह्या सगळ्याला सुरूंग लावण्याचे सामर्थ्य असलेला बॉस नामक खत्रूड प्राणी जगणे हैराण करून सोडतो. 'भीक नको पण कुत्रे आवर' अशी परिस्थिती निर्माण करण्याची ताकद प्रत्येक बॉसकडे असतेच . काही वर्षांपूर्वीची 'हरी साडु' ची जाहिरात अजूनही कित्येक जणांना आठवत असेल. आपल्या शाब्दिक बाणांनी समोरच्या व्यक्तीला तो नोकरीचयाच काय पण जगण्याच्याही लायकीचा नाही असे सतत दाखवून देणे हे प्रत्येक बॉस आपले परम कर्तव्य मानतो,अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद असततच. भरीस भर म्हणून ऑफीस मधले सहकारी सुद्धा केसाने गळा कापायला कधीही तयार असतातच. दोन माणसे ऑफीस मधे एकत्र आल्यावर तिसऱयाविषयी चांगले जाउदे पण निदान बरे बोलत आहेत अशी परिस्थिती कुठेच दिसत नाही. ह्या सगळ्या परिस्थितीचा परिणाम कामावर होऊ न देणे फार गरजेचे आहे. व्यवहार्य सूचना स्वागतार्ह आहेत.

(टीप: सदर विचारमंथन जनहितार्थ आहे.)

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

24 Oct 2013 - 11:29 am | संजय क्षीरसागर

प्रश्न तुमचाये का दुनियेचा? प्रामाणिकपणा प्रश्न सोडवण्यातली पहिली पायरी आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Oct 2013 - 12:40 pm | माम्लेदारचा पन्खा

आता सुपात आहे पण कधीही जात्यात (आणि गोत्यात) येऊ शकतो..आधीच तयार रहावे म्हणून हा प्रयत्न ...

कपिलमुनी's picture

24 Oct 2013 - 11:34 am | कपिलमुनी

हा धागा सर्व ऑफिस पॉलिटिक्सवर अक्सीर इलाज आहे

मी-सौरभ's picture

24 Oct 2013 - 11:54 am | मी-सौरभ

सहमत

अद्द्या's picture

24 Oct 2013 - 12:32 pm | अद्द्या

अग्गदी हेच लिवायला आलो होतो .

अन समजा हे नाही करता आलं . तर दुसरी नोकरी शोधा

अग्निकोल्हा's picture

24 Oct 2013 - 2:11 pm | अग्निकोल्हा

.

सदासुखि's picture

24 Oct 2013 - 2:09 pm | सदासुखि

आणखी काहि उपाय आहेत का? सगळ्याना हे जमत नाहि. आणि दुसरी नोकरी पण लगेच मिळत नाहि? मग काय करावे?

सुनील's picture

24 Oct 2013 - 2:22 pm | सुनील

काय राव, अप्रायजल जवळ आलय का?

(मामलेदाराच्या पंख्याने) बॉसला वारा घालून बघा, काय फरक पडतोय का!!

;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2013 - 2:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१] मला वाटतं बॉसच्या लफ-या-बिफ-यात काही मदत करा किंवा त्यांच्या गोष्टीचे साक्षीदार व्हा. ;)

२] साहेबांनी केबीनमधे बोलावून कितीही रागावलं तरी केबीनमधून पडतांना हसत हसत बाहेर पडा.
सहका-यांनी काय झालं विचारलं की सांगा साहेब, माझ्या कामावर खूश आहेत असं सांगा.
सतत हसमुख राहा.

३] काही दिवस ऑफीसमधे वेळेच्या आत येण्याचा आणि सर्वात शेवटी जाण्याचा प्रयत्न करा. काम नसलं तरी खूप आव आणा. होईल काही दिवस आपल्याला त्रास पण सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे.

४] ऑफीसमधे महिलांच्या टेबलवर जाऊन गप्पा नका मारु. आपल्याला हे आवडत नाही, असे कृतीतून जाणवू द्या.

५] आपल्यावर जळणारा सहकारी साहेबांकडे काड्या करतोय तेव्हा त्याच्याशी मैत्री करा. बैठक बिठक करा. हजार पाचशे जाऊ द्या.

बाकी, सवडीने सांगतोच.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

24 Oct 2013 - 3:04 pm | संजय क्षीरसागर

आणि नवं लफडं झालं म्हणजे?

त्यांच्या गोष्टीचे साक्षीदार व्हा

लफड्याचे साक्षिदार होणं म्हणजे रेनकोट घालून अंघोळ करायला सांगणं आहे!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2013 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

’गोष्टीचे साक्षीदार’ होणे म्हण्जे तुम्ही फार ’खोलात’ गेला आहात असे वाटते. ’साक्षीदार’ म्हणजे काही गोष्टी पाहिल्या आहेत, माहिती आहेत. काही डावं उजवं आहे, पण, आम्हाला त्याचं कै नै बॉ....! असं या अर्थाने.

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

27 Oct 2013 - 9:32 pm | धमाल मुलगा

=)) =)) =)) =))
गुर्जी सुस्साट!

अग्निकोल्हा's picture

24 Oct 2013 - 2:44 pm | अग्निकोल्हा

.

विनायक प्रभू's picture

27 Oct 2013 - 6:38 pm | विनायक प्रभू

पार्श्वभाग कायमची गिफ्ट दिल्या गेल्या असताना आण खिन .......?

मृत्युन्जय's picture

24 Oct 2013 - 3:38 pm | मृत्युन्जय

"No one can make you feel inferior without your consent" - Eleanor Roosvelt

बॉस लायकी काढतो तेव्हा ९९% वेळा तो स्वतःची इतरत्र कुठेतरी झालेली जळजळ ओकत असतो. नीटपणे विचार केल्यास स्वतः बॉस असलेले आणि स्वतःला बॉस असलेले असे जे लोक असतात त्यांना य गोष्टीत तथ्य वाटेल. अर्थात आपण आपल्या हाताखालच्या लोकांना फैलावर घेतो तेव्हा ते कामचुकार, ऐदी आणि मट्ठ असतात आणी आपला बॉस मारतो तेव्हा तो खडूस, दुराग्रही आणि चिडखोर असतो असे सगळ्यांनाच वाटत असते.

काम करणारा प्रत्येक माणूस चुका करतो. जसे जसे आपण वरती चढत जातो तसे तसे चुकांचे स्वरुप बदलत जाते आणी मग आपल्याला आपण सुरुवातीच्या काळात केलेल्या चुका आठवतच नाहित त्यामुळे त्याच चुका जेव्हा कनिष्ठांच्या हातुन होतात तेव्हा आप्ण चक्क त्यांच्यावर डाफरतो. हे सग्ळेच बॉसेस करतात. हे पहिल्याप्रथम लक्षात ठेवावे त्यामुळे चुकीसाठी बॉसने झापले की लक्षात ठेवावे की त्यानेही कधीतरी हिच चुक केलेली असेल आणि कदाचित अश्याच शिव्याही खाल्ल्या असतील. त्यामुळे सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो आपला अपमान वाटुन घेउ नये (आणी तसे वाटत नाही हे बॉसला दाखवु ही नये). त्याने शिव्या घालण्याचे त्याचे कर्तव्य पार पाडले की आपण मान खाली घालुन त्याच्यासमोरुन जावे आणि बॉस नजरेआड झाल्याझाल्या कॉलर टाइट करावी आणि एखादे गाणे गुणगुणावे. त्यामुळे सहकर्‍यांचा असा समज होइल की तुम्ही बॉसबरोबर बसुन नुकताच फक्कड चहा मारुन आला आहात (आयटी मध्ये असाल तर त्यांना वाटेल की नुकतेच तुमचे ऑफसाइट अल्मोस्ट फायनल झाले आहे). कोणी काही विचारले की मात्र काही नाही रे असेच सहज इकडच्या तिकडच्या गोष्टी असे सांगा. म्हणजे लोकांचा समज अजुन बळावेल.

दुसर्‍या एखाद्या सहकार्‍याला जर बॉसने झापले तर मग अति उत्तम (बॉस असल्याने तो सगळ्यांनाच झापणार हे तर उघडच आहे. पोरींना सोडुन त्यांना फारसे कोणी झापत नाही). अश्यावेळेस सहकार्‍यांना सहानुभूती दाखवु नये. तिर्‍हाइतपणे तर अजिबात वागु नये. खोदुन खोदुन त्याच्याकडुन सगळा प्रकार माहिती करुन घ्यावा. कदाचित तुमच्याएवढाच मार त्यालाही पडला असेल. तुम्ही किमान मान खाली घालून ऐकुन घेतल्याने थोडक्यात बचावला असाल. तुमच्या अहकार्‍याचा बाणेदारपणा अथवा स्वाभिमान अडवा आला असेल आणी त्याने वाद घातला असेल तर तो असाही मेलाच असेल. त्याला फक्त "असे म्हणाले सर? आज काय खुपच चिडले आहेत काय? एरवी बोलत नाहित असे." असे म्हणावे. सहकारी अजुनच विचित्र नजरेने बघायला लागेल कारण इतरांना हे तसे काही नविन नसणार. मग त्याने काही तद्नुषंगाने खुलासा केला की लगेच तुमच्या साहेबाबरोबरच्या मागच्या चर्चेत (तुमची ती चर्चा दुसर्‍यांचा तो वाद) तुम्ही कसे शांतपणे आणि मुद्देसुद पण बॉसचे दात त्याच्याच घशात घालुन सुटला होता हे सांगावे.

आपण बॉसला कसे प्रत्युत्तर दिले याच्या कहाण्या मात्र रंगवुन रंगवुन सांगु नयेत. कारण चुकुन कधी बॉसने जाहीर पूजा मांडली तर "आज कसा गप्प बसलास रे" या प्रश्नाला उत्तर नसेल. हे नक्की लक्षात ठेवा की "बॉस इज ऑल्वेज राइट.". हेच इतरांना पण सांगा.

बॉस जेव्हा खुषीत असेल तेव्हा लक्षात घ्यावे की एकतर त्याच्या साहेबाने पाठ थोपटली आहे किंवा बायकोने..... जाउ द्यात. तर अश्या वेळेस बॉसला मस्का मारावा की 'तुच रे. तुच कसा लै भारी' वगैरे. अशीही फोडणी जोडावी की "तुम्हाला म्हणुन जमते हो. आमच्याच्याने होतच नाहित असले पराक्रम. आता परवाच बघा ना तुम्ही ते हे काम दिले होते. मी असा असा घोटाळा घलुन ठेवला" अशी प्रस्तावना करुन आपण जिथे माती खाल्ली असेल अश्या २-३ गोष्टी कानावर घालुन ठेवाव्यात. बॉस मुडात असल्याने आणि नुकतीच तुम्ही त्याच लाल केलेली असल्याने "अर्रे जाउ दे रे. काम करणार्‍याच्या हातुन चुका होणारच. असे असे करुन टाक" असे म्हणुन तुम्हाला सोडुन देइल. २-३ दिवसांनी जेव्हा हेच म्याटर ऐरणीवर येइल तेव्हा तुम्ही आधीच सागितलेले असल्याने आणि त्यावेळेस त्यानेच ते सिरियसली घेतलेले नसल्याने तुम्ही स्वस्तात सुटाल किंवा बॉस स्वतःवरच जळफळत बसेल.

तुम्ही बॉसचे जावई नसल्यामुळे तुमच्यावर उपकार करण्यासाठी तो तुम्हाला सहन करतच नसतो. तुम्ही काम करत असता म्हणून तुम्ही कंपनीत असता. त्यामुळे एक दिवस अचानक उठुन तो तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवेल असे नाही (दाखवणारच नाही असेही नाही). त्यामुळे फक्त त्याच्या शेपटीवर पाय देउ नका. एरवी तो मण्यार, फुरसे, किंग कोब्रा, ब्लॅक मंबा सगळे काही होउन तुम्हाला तडफडवेल (जे डी ला विचारा वाटल्यास सापावर उतारा आहे चिडलेल्या बॉसवर नाही)

सगळ्यात महत्वाचे म्हणजे ब्रश करणे, रोज सकाळी पावशेर वजन कमी करणे, २-३ वेळा उदरभरण करणे, श्वास घेणे इतकेच बॉसचे ओरडणे देखील शाश्वत आणि अपरिहार्य आहे हे लक्षात ठेवावे. त्याला उपाय नाही. त्यामुळे उपाय बॉसच्या केबिनच्या बाहेर शोधावा. म्हणजे बॉसने तुमची मारली हे इतरांना समजु देउ नका. बंद कमरे मे चाहत नक्की किती बुलंद आहे कोणाल कळतय? थोडक्यात म्हणजे तुम्ही बॉसचा बाब्या आहात हे एकदा लोकांना कळाले की तुमची इज्जत तरी वाचुन राहिल. एवीतेवी सहकारी पाय ओढायलाच बसलेले असले (सग्ळेच असतात असे नाही) तर किमान तुम्ही बाब्या आहात हे ओळखुन ते दुसर्‍या एखाद्या कार्ट्याला घोळात घेतील (आणी घालतील).

असो. याहुन जास्त टिपा पाहिजे असल्यास पैसे मोजावे लागतील. इच्छुकांनी संपर्क साधावा ;)

सूड's picture

24 Oct 2013 - 3:44 pm | सूड

मस्त !!

धमाल मुलगा's picture

27 Oct 2013 - 9:49 pm | धमाल मुलगा

रंगाप्पांनी तर नोकरीतील 'आयुष्योन्नतीचे सात सोपान'च शिकवून टाकले. :) जियो रंगा जियो! :)

आता आमचे दोन पैसे -
(टीपः सदर सल्ला आयटीतल्या नोकरदारांसाठी लागू आहे. जसं आयटीमधे नक्की काय चालतं ह्याचा इतरांना गंध नसतो तसाच आम्हालाही इतर नोकर्‍यांच्या ठिकाणी कसं आणि काय चालतं ह्याचा गंध नसतो. कृपया ह्याची नोंद घेऊन पुढे वाचावे.)
नव्या प्रोजेक्टावर रुजू झालं की, भरपूर खपून आपली जागा भक्कम करुन घ्यायची. क्लायंटसोबत नेहमीचे संवाद असतील तर उत्तमच. एकदा हे झालं की मग माज सुरु करायचा. 'हाऽऽड तिच्यायला! आपल्याला नाय गरज! छप्पन नोकर्‍या पडल्यात आपल्यासाठी' असा आविर्भाव ठेवायचा. कामात आपल्याकडून कसूर ठेवायची नाही, पण फुकटची धावती गाढवं स्विकारायची नाहीत. अर्थातच मग बॉस भडकतो. तो वलवल करायला लागला की आपणही ऐकवायचं, ' जमत नाय भो! जेव्हा गरज होती तेव्हा लै काम उपसलंय. होत असंल तर बघा नायतर रिलीज द्या.' बॉसची होते पंचाईत. कारण रोजचं क्लायंटसोबतचं आपलं कामकाज चालू असतं. बॉसपेक्षा क्लायंटचा आपल्यावर जास्त भरवसा आलेला असतो. आपण 'क्रिटिकल रिसोर्स' होऊन बसलेलो असतो. मग येता जाता बॉसच्या पित्त्यांसमोर 'अमुक कंपनीत ह्या पोझिशनला, ह्या टेक्नॉलॉजीवर इतका पगार मिळतो, इतके पर्क्स असतात, कामही निवांत आहे..माझा एक मित्रच आहे तिथं तोच सांगत होता. पुढच्या दोन महिन्यात तिकडं पोझिशन्स ओपन होताहेत' वगैरे गप्पा टाकायला सुरु करायचं. कामाचा माणूस हातातून गेला तर वरच्या दट्ट्याला अन क्लायंटला काय उत्तर द्यायचं ह्या प्रश्नानं बॉसची परस्पर ठासली जाते. मधूनमधून बॉसला म्हणायचं, 'मला काय बरोबर ट्रीटमेंट मिळतेय असं वाटत नाय राव.' (हा उपाय आमच्या एका मित्राचा आहे. ते नवी कंपनी जॉइन केली की पैल्या सहा महिन्यातच त्याच्या मॅनेजरला असलं ऐकवून झीट आणतंय).
हां, ह्या सगळ्या भानगडी करायच्या तर काही 'प्रिरिक्विझिट्स' आहेत म्हणा.
१.तुम्ही तुमचं काम वेळेवर, व्यवस्थीत करत असला पाहिजे.
२.रिस्क घेण्याची तयारी पाहिजे. वेळेला बेंचवर जायची तयारी, लागलंच तर नवी नोकरी पकडायची तयारी हवी.
३.सोफेस्टिकेटेड मुजोरी जमली पाहिजे.

:)

बॉस हंटींगसाठी शुभेच्छा!

प्यारे१'s picture

27 Oct 2013 - 10:07 pm | प्यारे१

>>>रंगाप्पांनी

आँ? मृत्यूंजय हा श्रीरंगाचा ड्यु आयडी असल्याचं रेवतीतैनी चतुरंग दाजींच्या कानात सांगताना धम्यानं ऐकलं का काय? ;)
(सग्गळ्यांनी हलकं घ्या बरं ;) )

धमाल मुलगा's picture

28 Oct 2013 - 12:59 am | धमाल मुलगा

मल्टीटास्किंगची हौस नडली जी. दोन वायल्या विंडोमध्ये वायल्या गोष्टी टायपताना माती खाल्लो गा.

बहुगुणी's picture

24 Oct 2013 - 6:04 pm | बहुगुणी

बरेच सल्ले उपयुक्त आहेत.

भडकमकरांसारखे करियर गायडन्स क्लासेस काढा :-)

शैलेन्द्र's picture

24 Oct 2013 - 8:53 pm | शैलेन्द्र

कोन? बॉस का? बरं

कपिलमुनी's picture

25 Oct 2013 - 12:46 pm | कपिलमुनी

तुमच्या बॉस ला अक्षय कुमार चा बॉस दाखवा , झीट येउन पडलं .. ८ दिवस माणूस उठत नाही ..लै पावरबाज पिक्चर आहे

आदूबाळ's picture

27 Oct 2013 - 6:28 pm | आदूबाळ

दोन उपाय आहेत. १. बॉसशी मैत्री करा २. बॉसला फाट्यावर मारा.

शक्य झाल्यास दोन्ही उपाय एकदम करा. म्हणजे मनःशांतीही मिळते.

आमचा बॉस गुणी वैग्रे असल्याने तूर्त हा प्रश्न आम्हांस पडलेला नाही, पण भविष्यकालीन घटनांसाठी वाचनखूण साठवल्या गेली आहे!

प्यारे१'s picture

28 Oct 2013 - 1:24 am | प्यारे१

अरे वा!
मग बॉसला इन्क्रिमेण्ट नाही तर ह्यावर्षी. बॉसचं 'गुणी' म्हणून अप्रैझल झालं की! ;)

अहो प्यारेकाका, गुणी म्हणालो कारण आम्ही गुडबुकातले ;)

मी नुकतीच नवीन नोकरी धरली आहे आणि तिथे मला अठरा बॉसेस आहेत असे समजते :)) (आयशप्पत थट्टा / अतिशयोक्ती करत नाहीये)

मल्टीटास्किंग सारखं मल्टीबॉसिंग कसं करायचं याचंही मार्गदर्शन करा...

प्रत्येक बॉसच्या रिसोर्सकडून अपेक्षा अस्तात (वास्तव/ अवास्तव..) तुमच्या प्रत्येक बॉसबरोबर सुरुवातिलाच स्वतंत्र मिटींग ठेवून त्याच्या अपेक्षा समजून घ्या, तुम्हाला काय समजलय ते त्याला इ-मेल मध्ये कळवून ठेवा (नोंद असलेली बरी, पुढे मागे उपयोगी!) आणि ज्या बॉसबरोबर जितके काम असेल तशी पिरिऑडीकली (विकली, मंथली..) रिव्ह्यू मिटींग ठेवा.
नविन जॉबवर कुठल्याही बॉसला पहिल्यांदा भेटाल तर सगळ्यत आधी विचाराय, 'तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम काय आहे जो मी लग्गेच अटेंड करु शकतो, प्रायोरीटीवर ते सांगा" साहेब खूषच!
शुभेच्छा!

सुबोध खरे's picture

28 Oct 2013 - 9:08 am | सुबोध खरे

बॉसला फाट्यावर मारणे हे जर दुसरी नोकरी सहज उपलब्ध असेल तर करता येते किंवा सरकारी नोकरीत असाल तरीही करता येते. ( मी दोन्ही करून स्वानुभव घेतलेला आहे)
अन्यथा लश्करातील तीन नियम पाळावे
नियम १- साहेब नेहेमीच बरोबर असतो.
नियम २- जर आपल्याला काही शंका असेल तर नियम क्रमांक १ पहा
नियम ३- साहेब चूक असेल तरी तोच साहेब आहे(असतो).

सुबोध खरे's picture

28 Oct 2013 - 9:09 am | सुबोध खरे

बॉसला फाट्यावर मारणे हे जर दुसरी नोकरी सहज उपलब्ध असेल तर करता येते किंवा सरकारी नोकरीत असाल तरीही करता येते. ( मी दोन्ही करून स्वानुभव घेतलेला आहे)
अन्यथा लश्करातील तीन नियम पाळावे
नियम १- साहेब नेहेमीच बरोबर असतो.
नियम २- जर आपल्याला काही शंका असेल तर नियम क्रमांक १ पहा
नियम ३- साहेब चूक असेल तरी तोच साहेब आहे(असतो).

उन्मेष दिक्षीत's picture

28 Oct 2013 - 1:15 pm | उन्मेष दिक्षीत

आपलं काम व्यवस्थीत करायचा प्रयत्न करणे.

२) 'बॉस' ही संज्ञाच चुकीची आहे. कोणिही कुणाचा बॉस नसतो ऑफीस मध्ये. सगळे ऑफीसचेच काम करत असतात. फक्त जबाबदार्‍या वेगवेगळ्या असतात. तर आपल्याला काम नेमुन देणे आणि त्याचे स्टेटस घेणे हे काम एका माणसाचे असते ज्याला त्याच्या "हाताखालचे" लोक बॉस समजतात आणि तो स्वतःसुद्धा स्वतःला तेच समजतो.
३) जर सो कॉल्ड "बॉस" या माणसाने उगीचच बॉसगीरी दाखवली नाही आणि बाकिच्या त्याच्या टिममेट्स नी स्वतः जबाबदारी ओळखुन कामे व्यवस्थीत पुर्ण केली , तर निम्मे प्रॉब्लेम कमी होतील. माणसं जर अशी असतील, तर आधी फालतू पॉलिटीक्स करणारच नाहीत.
४) आता जर असे कोण करतच असेल, तर जोपर्यंत आपल्याला डायरेक्ट इंपॅक्ट होत नाही , तोपर्यंत दुर्लक्ष केलेलं बर.
आपण स्वतःहुन तर उगीचच गॉसीप, उखाळ्यापा़खाळ्या न काढलेल्या बर्‍या. आपण त्रास देउ नये आणि त्रास करु देउ नये.
५) जर आपल्याला लक्षात आलं कि, आपला फायदा घेतला जातोय, आपण नीट काम करुनही आपल्याला नीट वागवलं जात नाही आहे, आपल्या कामाचं क्रेडीट मर्जीतल्या भलत्यालाच दिलं जातंय तर स्पष्टपणानं बोलावं. दाखवून द्यावं, की डोन्ट मेस वीथ मी ! आता या कृतीचे परिणाम हे वेगवेगळ्या जॉब फिल्ड्स मध्ये वेगवेगळे असु शकतात.
मी आयटी मधे काम करतो आणि वर लिहिल्याप्रमाणं वागलोही आहे.

६) ऑफिसचा दिवस संपला,आजच्या दिवसाचं काम संपलं, कि दुसर्‍या दिवसापर्यंत ऑफीसला सरळ विसरुन जावं.