नमस्कार,
सद्ध्या मोदी चा काळ आहे. पंतप्रधानपदाच्या दिशेने त्याची चालू असलेली वाटचाल जबरदस्त आहे. शिवाय त्या माणसाने गुजरात मधे केलेल्या कार्याच्या जोरावर त्याला लोकांचं पाठबळही भक्कम मिळतंय. त्याच्याच या कार्यक्षेत्री जाण्याचा योग गेल्या वर्षी आला होता. तेंव्हा तिथे काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतोय. खरं तर वर्णनही लिहायचं होतं, परंतु 'वेळ' मिळत नाही ... नेहमीचं रडगाणं. असो. अमदावाद नी फोटोज जुओ !
अडालज विशालविहिरीचं वास्तुवैभव
अडालज चं आणखी एक रूप
जागोजागी, रस्तोरस्ती मोर बघायला मिळतात
अंबाजीच्या वाटेवर दिसलेला हा एक चुनखडकाचा डोंगर.
गब्बर वरून दिसणारा लँड्स्केप
कच्छी बियर भाया. छास पिवाना?
सूर्यमंदिर
सूर्यमंदिर
आ छे कांकरिया लेक
तिथे असलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तूंपैकी ही एक लक्षवेधी वास्तू
हॉटेल विशाला च्या मालकाने जमवलेली ही भांडीसंपदा... अप्रतिमच
तर असं हे सुंदर राष्ट्र गुजरात. नाही नाही; या म्हणण्यास कुठलाही राजकीय संदर्भ नाही :)
प्रतिक्रिया
15 Oct 2013 - 7:55 am | यशोधरा
मस्त प्रकाशचित्रे!
15 Oct 2013 - 9:00 am | सुहासदवन
राजकीय संदर्भ नाही असं म्हणायचं आणि लेखाची सुरुवातच नेत्याच्या नावाने आणि त्याने केलेल्या कर्तुत्वाने करायची.
निदान लेखाची सुरुवात अशी केली म्हटल्यावर आम्हाला वाटले की काही चित्रे ही त्यांनी केलेल्या कामाची तरी असतील.
पण अर्थात तुम्ही म्हटल्याप्रमाणे हि चित्रे आणि मोदी ह्यांचा काहीच संबंध नाही.
रा. न. क्ष.
15 Oct 2013 - 9:07 am | उद्दाम
असू द्या हो.
15 Oct 2013 - 10:15 am | वेल्लाभट
तुम्ही राजकारणात जावं राव.. खरंच ! :)
15 Oct 2013 - 9:11 am | मदनबाण
छास पिवानु अने गरबो रमवानु... मज्जा नी लाईफ ! ;)
(मदन पटेल) ;)
15 Oct 2013 - 9:21 am | पैसा
ते सूर्यमंदिर कुठे आहे?
15 Oct 2013 - 10:16 am | वेल्लाभट
ते सूर्यमंदिर मोढेरा/मोटेरा येथे आहे.
15 Oct 2013 - 7:18 pm | संतोषएकांडे
मोटेरा नसून मोढेरा आहे. 'मोटेरा' म्हणजे अहमदाबाद च्या अगदी जवळ, कुशीत असून सध्या आसाराम (बापु...?) च्या आश्रमामूळे फारच प्रसिध्धीस आले आहे....
मोढेरा अहमदाबादहून जवळ जवळ ३०० की.मी.च्या अंतरावर आहे. गुजराथची राज्यधानी अणहिलवाड पाटण (सध्या सिध्धपुर पाटण,मातृगया)च्या राजा भीमसिंह सोलंकीने ते इस्वी.१०२६ च्या दरम्यानात बांधले.सोलंकी सूर्यवंशी होते. त्या मूळे त्यांनी सूर्यपूजे साठी ह्या मंदिराचे निर्माण केले. महंमद गझनीने तीन वेळा मंदिरावर हल्ला करून त्याला ध्वस्त केले.आणि सोलंक्यांनी तीन वेळा त्याचे पुनःनिर्माण केले.
18 Oct 2013 - 8:46 am | पैसा
मी तोच विचार करत होते की मोटेरा म्हणजे क्रिकेट स्टेडियम आहे तेच ना?
18 Oct 2013 - 6:44 pm | संतोषएकांडे
अगदी बरोबर...अहमदाबाद-गांधीनगर रोड वर अहमदाबादहून अर्ध्या कि.मी.च्या अंतरावर आहे.
15 Oct 2013 - 11:28 am | अजयिन्गले
सुहासदवन हे बरोबर बोले आहे.
15 Oct 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर फोटो... सुर्यमंदीराचे जवळून काढलेले फोटो असले तर टाकू शकाल काय? उत्तम कोरीवकाम असेल असे वाटते.
15 Oct 2013 - 12:18 pm | पिलीयन रायडर
मी ही सगळी ठिकाणे पाहिली आहेत..तुम्ही फोटो सुंदर काढले आहेत.
सुर्यमंदिर तर अप्रतिम आहे.. अडालजची "राणीनु बाव" पण अप्रतिम. तसेच अक्षरधामही पहाण्या सारखे आहे.
15 Oct 2013 - 2:04 pm | कंजूस
ફોટા ગમયા .વેલલાભટભાઈ .फोटा गम्या वेल्लाभटभाई . तमारा जेवा फोटा कोक खिचता नथी .अमे गुजरातना लोको देशने "गरवि गुजरात "कहे छे एटले की तमारा "संपन्न संमृध्द महाराष्ट्र .होय .कलमकारी थोडी करी नाखो बहू मजा आवशे .तमारा हिताभिलाषि कंजूषभाई .
15 Oct 2013 - 2:55 pm | अनिरुद्ध प
एकदम सारु (चोक्कस्),पण आ वेल्लाभट भाई छे ने एकदम आळसु माणस,एने कलमकारि आवडती होय पण आ करवानु कष्ट लेवानु जबाबदारी नथी आवडती,पण आना पाडेला फोटा घणु सारु हता.
18 Oct 2013 - 3:19 pm | वेल्लाभट
कंजूस साहेब, अनिरुद्ध, तुमचं म्हणणं मान्य. खबरदारी घेतली जाईल. बाकी कोंप्लिमेंट्स बद्दल थेंक्स !
18 Oct 2013 - 3:57 pm | अनिरुद्ध प
असे नाराज होउ नका,आम्ही (कन्जुस आणि मी) फक्त आपल्याला फोटो बरोबर वर्णन (कलमकारी) लिहिलेत तर चान्गले झाले असते असे म्हटले होते,पु ले शु.
18 Oct 2013 - 4:49 pm | वेल्लाभट
अहो नाराज कोण झालंय :) ! मी जो तुम्हाला अभिप्रेत होता तोच अर्थ घेतलाय ! म्हणूनच म्हणतोय की वर्णन (कलमकारी) नक्की केली जाईल, आणि फोटो च्या कौतुकाबद्द्ल थेंक्स :) मने गुजराती थोडु थोडु आवडे छे ने भाय!
18 Oct 2013 - 6:51 pm | बॅटमॅन
पण अनिरुधभाय, गुजरातीमां "आवडते" एटले मराठी "आवडते" नथी ना? गुजराती "आवडे छे" एटले मराठी "समजणे" असे ऐकले आहे.
18 Oct 2013 - 7:02 pm | अनिरुद्ध प
आवडे= येतं/येते,सामळो= समजणे; केम बट्ट्मण्ण आ एवी रिते छे अवे सामळो के नथी?
18 Oct 2013 - 7:07 pm | बॅटमॅन
थोडा थोडा सामळे छे. आ एवी रिते छे माने "इकडे जे लिहिलेय" ने अजून काही?
बाकी गुजराती मने आजिबातच आवडतो नथी. पण शिकण्याची घणी इच्छा छे.
18 Oct 2013 - 7:40 pm | विजुभाऊ
आवडे= येतं/येते,सामळो= समजणे; केम बट्ट्मण्ण आ एवी रिते छे अवे सामळो के नथी?
=)) कैच्या कै........ कस्लि ब्याटिंग करताय अनिरुद्ध भई
आवडे छे = येते. उदा : बोलता आवडे छे = बोलता येते.
"सामळो " हा शब्द खरे तर "सांभळो" म्हणजे "ऐका" असा आहे.
तुम्हाला म्हणायचे आहे तो शब्द "समझो" असा आहे
ते वाक्य तुम्हाला अभिप्रेत आहे त्या अर्थाने
केम बेटमन आ एवी रीते छे सम्झ्या के नथी सम्झ्या? असे होईल
18 Oct 2013 - 7:46 pm | बॅटमॅन
धन्यवाद विजुभौ!
18 Oct 2013 - 7:51 pm | अनिरुद्ध प
विजुभाऊ,
मने पण गुजराथी थोडु थोडु आवडे,हे लिहायला विसरलो होतो.(वासरात लन्गडी गाय शहाणी)
18 Oct 2013 - 9:12 pm | संतोषएकांडे
हा काय प्रकार आहे भौ..? अस काही वाक्य ना गुजराथीत किंवा न मराठीत आहे.
सामळो शब्द गुजराथीत नाही. हो, 'शामळो' म्हणजे गुजराथीत कृष्णाचे एक नाव आहे.
साहेब,पक्का क्लास घ्यावा लागणार गुजराथी शिक्षकाला तुमचा...
स्माइली...
15 Oct 2013 - 2:09 pm | विटेकर
चोक्कस ! ( मला एवढा एकच गुजराती शब्द येतो !)
15 Oct 2013 - 2:16 pm | विटेकर
तुम्ही लै चिंगुसपना करता राव.. काय जे हाय ते बदा बदा वतायचं सोडून उगा चंची ढिल्ली केल्यागत करता, आन पुन्यांदा गाट मारून गप्चिप बस्ता, अस्लं बरं हाय का ?
थे सुर्य मंदिरावर लिवा की वाईच ! ते कोनार्कवाल आनि हे वायलं वायलं हाय ना ? की दोनीची जात्कुळी येकच हाय?
तुमास्नी कारकून लागतो का ? म्या तैयार अस्तुया बगा.
18 Oct 2013 - 3:29 pm | वेल्लाभट
नगं नगं. तुमी प्रतिसाद द्येवा. लिवायचं कष्ट आमी घेऊ.
15 Oct 2013 - 2:37 pm | कपिलमुनी
कांकरिया लेक च्या फोटो मधे ती पाण्याची धार टाळता आली असती तर अधिक सुंदर दिसला असता
18 Oct 2013 - 3:30 pm | वेल्लाभट
कपिलमुनी, ती हवीच होती. फोरग्राउंड हवा होता तो फोटो चा.
15 Oct 2013 - 2:42 pm | प्यारे१
मस्त आलेत फोटोज.
15 Oct 2013 - 5:52 pm | रेवती
छान फोटू आलेत.
16 Oct 2013 - 7:34 am | अत्रुप्त आत्मा
सुंदर सुंदर फोटु!
सुंदर सुंदर गुजरात! :)
17 Oct 2013 - 11:38 pm | विजुभाऊ
अहमदाबादचे आणखी एक वैषिष्ठ्य http://misalpav.com/node/16453
17 Oct 2013 - 11:42 pm | विजुभाऊ
तुम्ही दाखवलीय ती ऐतिहासीक वास्तू ( चित्र १० वे) म्हणजे एक जैन मंदीर आहे. त्याचे नाव हठीसिंग नी वाडी. त्याचा इतिहासाशी सम्बन्ध नाहिय्ये. बहुतेक चाळीस /पनास वर्षाची असेल ती वास्तू.
18 Oct 2013 - 3:31 pm | वेल्लाभट
प्यारे रेवती आत्मा, विजुभाउ, सगळ्यांचे आभार.
18 Oct 2013 - 9:34 pm | संतोषएकांडे
जब कुत्ते पर सस्सा आया अहमदशाहने शहर बसाया
घाट घाटके पानी पीता शहर वो अहमदाबाद कहलाया
सारुं अहमदाबाद मारुं अहमदाबाद
20 Oct 2013 - 4:19 pm | सुहास झेले
सुपर्ब !!!