मित्रानो,
या वर्षी जाने.२०१४ ला मी वैष्णोदेवी काश्मीर, वाघा बोर्डर, ताज महल इकडे जायचे ठरवत करीत आहे. वेग वेगळ्याtours कंपनी मध्ये चौकशी करत आहे पण tours च्या किमतीमध्ये बरीच तफावत आढळली. मी इथेउन फोनेवरून काश्मिरच्याच एका Aalaa Tours Travels शी व्यव्याहार करीत आहे.
या आधी कोणी अशा tours ला जावून आलेले असतील तर त्यांना विनंती कि मला योग्य माहिती द्यावी.
दुसरे असे के इतक्या लांब आपण जातो आणि आजूबाजूची काही ठिकाणे/ स्थळे माहित नसल्यामुळे बघायची राहून जातात. जसे कि कटराला गेल्यावर वैशानोदेवी बरोबरच काही tours वाले जवळच्या शिवखोरीला या गुहेला नेत नाहीत, लोकांना ते माहित नसते आणि tours वाले पण व्यवस्थित सांगत नाहीत.
असे होवू नाय म्हणून मी खाली काही स्थळांची माहिती देतोय जर तिथे आजूबाजूला पाहण्याचे काही अजून प्रेक्षणीय स्थळे असतील तर सुचववि.
Day १ (Jammu – Katra:- वैश्णोदेवी- शिवखोरी गुहा)
Day 2 (Katra – Srinagar) निशांतबाग,शालीमारबाग, चष्मशाहीबाग,हुझरत बाल सुफी स्थान, वस्ती हाउस बोट मध्ये
Day 3 श्रीनगर :- दाल लेक मध्ये शिकारा Ride, नेहरू पार्क,Open Lake,Kubatar Khana, The floating garden and old city Visit .
Day 4 (Srinagar– Sonmarg),
Day 5 (Srinagar – Gulmarg),
Day 6 (Srinagar – Pahalgam),
Day 7 (Pahalgam to Amritsar) sight seeing
Day 8 (Amritsar – Agra)Golden Temple Wagha Border, जालियान वाला बाग
Day 9: Agra:- Taj Mahal,
Day 10: Delhi :- लोटस temple , india gate , red fort
आता या package करिता २६००० प्रत्येकी असा एक tour वाला सागतोय तर एक जण without आग्रा ताज महाल १५००० प्रत्येकी सांगतोय मी प्रथम जात असल्याने मला समजत नाही मी काय करावे इथे मुंबईत बसून मी booking केली तर ते ३०% online payment करायला सांगतात पण त्यांच्या वर जास्त करून दिल्लीवाल्यांवर कसा विश्वास ठेवायचा. कोणी जाणकार मार्गदर्शन करतील काय?
प्रतिक्रिया
10 Oct 2013 - 11:43 am | चित्रगुप्त
दिल्ली वा काश्मीर वाल्या एजंटांपासून सावध रहा, सध्या एवढेच सांगू शकतो.
(कुठे त्या शेरावालीच्या आणि काश्मीरच्या फंदात पडताय, असे पण सांगू इच्छितो, पण ते पटणार नाही)
10 Oct 2013 - 11:57 am | सुनील
Day 2 मध्ये शंकराचार्य हिलचाही समावेश करा.
ट्रिपचा एकंदरीत आवाका पाहता १० दिवस खूपच कमी वाटत आहेत. धावपळ फार होईल.
मी २००४ साली केसरीतर्फे काश्मिरला गेलो होतो. ते जम्मूहून अमृतसरच्या सहलीची सोय करून देतात.
10 Oct 2013 - 1:20 pm | इरसाल
एका दिवसात जम्मु-कटरा-शिवखोरी गुहा.......शक्य नाही जम्मु ते वैश्णोदेवी व्हाया कटरा ह्यालाच २ दिवस धरुन चाला कारण कटरा ते वैश्णोदेवी ह्याच दरम्यान जी ठिकाणे आहेत त्यातच १ दिवस पुर्ण लागतो.
10 Oct 2013 - 3:28 pm | चौकटराजा
आपल्याला जानेवारी महिन्यात जाउन काय मिळणार ? सगळीकडे बर्फच बर्फ . अशावेळी केवळ बर्फासाठीच जायचे असेल तर हरकत नाही. एरवी काश्मीर म्हणजे एप्रिल मे च ! जानेवारीत बर्फाने झालकेली निशात ? माय गॉड ! त्या बागांची मजा
मे मधेच ! बाकी यात्रा कंपन्या वा माझा ३६ चा आकडा आहे. त्यांच्या सोयीनुसार ते ठिकाणे दाखवितात. उदा. युरोपच्या
टूर मधे मिलान चे चर्च कुणी दाखवते का हो? कलोन चे चर्च दाखवितात ते देखील कलोन स्वीस ला जाण्याच्या वाटेवर येते
म्हणून .
10 Oct 2013 - 3:50 pm | विजुभाऊ
वैष्णो देवी करायलाच दोन दिवस जातील.
तेथे हेलीकॉप्टर द्वारे वर जाता येते. तरीही एक पूर्ण दिवस जातोच.
कटर्याहून श्रीनगर जाण्यासाठी एक दिवस खर्ची पडेल.
तेच अम्रुतसर बाबत्.आणि आग्र्या बाबत.
तुम्ही बहुतेक ठीकाणी येण्याजाण्याचा वेळ विचारात घेतलेला नाहिय्ये.
आग्रा टूर करायची असेल तर ती जम्मू काश्मीर सोबत क्लब करण्या ऐवजी जयपूर्-आग्रा-कैसलमेर अशी क्लब करा.
टूर ला जाताय तर जरा निवान्त वेळ काढा. उगाच पहायचे म्हणून ठीकाणांची भरताड करू नका.नुसतेच पाट्या टाकल्यासारखी ठीकाणे उरकत गेलात तर ट्रीपची मजा येणार नाही. काही पाहिल्याचे समाधान मिळणार नाही.
प्रत्येक ठीकाणची मजा वेगळी आहे.
आग्र्याला गेलात तर तेथे फतेपूर सीक्री, ताजमहाल, अकबरचा मकबरा , मथुरा इत्यादी स्थळे आहेत. ती एका दिवसात उरकण्यासारखी नाहीत. ताजमहाल तर चवीने बघण्यासारखा आहे.
तेच दिल्ली बाबत दिल्लीत पहाण्यासारखी अनेक ठीकाणे आहेत. लाल किल्ला आणि पुराना किल्ला येथील साउम्ड अँड लाईट शो. हुमायूनचा मकबरा ( ही खूपच सुंदर इमारत आहे) दिल्लीत सफदरजंग येथे भारतीय रेल्वेचे एक सुंदर म्युझीयम आहे. लोधी गार्डन ( लोधीज टॉम्ब)निझामुद्दीन औलीयाचा दर्गा ( येथे जवळच मिर्झा गालीब ची कबर आहे)
दिल्लीला चाललाच आहात तर चांदनी चौकातील पराठेवाली गल्ली ला भेट द्या. जवळच जामा मस्जीद ची सुंदर इमारत आहे. तेथून जवळ करीम्स ला भेट द्या खास मुघलाई पदार्थांची रेलचेल अनुभवा.
ट्रीप ला चाललाय मस्त मजेत एन्जॉय करा. भेटीची ठीकाणे कमी करा, त्यामुळे प्रवास कमी होईल. त्यात जाणारा वेळ वाचेल. पैसेही कदाचित वाचतील पण स्थानीक स्थळाना भेटी देवून होतील.
दिल्लीला "हेरीटेज वॉक" अनुभवा. स्वतःला इतिहासाचे साक्षीदार म्हणून अनुभवा. हे हेरीटेज वॉक कश्मीरी गेट , लोधी गार्डन किंवा कुतूब मिनार च्या आसपास होतात. कश्मिरी गेटच्या हेरीटेज वॉक मध्ये मी १८५७ चे युद्ध अक्षरशः प्रत्यक्ष अनुभवले.
हे मी सर्व अनुभवान्ती सांगतोय.
10 Oct 2013 - 4:43 pm | प्रमोद देर्देकर
खरच विजुभाऊ तुम्ही चांगलेच डोळ्यात अंजन घातलेत मला अशी माहिती पण हवी होती.उगाच पहायचे म्हणोन फिरण्यात काही अर्थ नाहीये आणि ट्रीपची मजा पण येणार नाही आता नवीन tourचा आराखडा मागवतो फक्त काश्मीर करिता. पण वरती चौकटराजा यांनी सांगितल्या प्रमाणे जानेवारीत जावू कि नको कारण ऑफ season असतो आणि माझ्या मुलाला बर्फात खेळायचे असते म्हणून हा खटाटोप.थोडे स्वस्त असते आणि गर्दी पण नसते.
10 Oct 2013 - 5:39 pm | विजुभाऊ
बिन्धास्त जा. मात्र मुलगा लहान असेल / कुटुंबातील लोकाना थंडी बाधत असेल तर योग्य ती खबरदारी घ्या. उबदार कपडे बाबत वगैरे नीट विचारून घ्या
10 Oct 2013 - 5:56 pm | चित्रगुप्त
जानेवारीत बरेचदा गडद धुक्यामुळे उत्तर भारतातील आगीनगाड्या, बशी, विमाने रद्द होतात किंवा कधीकधी १२-१५ तास सुद्धा उशिराने चालतात. दिवस अगदी छोटा असतो, त्यामुळे फिरायला वेळ कमी मिळतो, त्यामुळे विजुभाऊंनी म्हटल्याप्रमाणे एकाच प्रवासात फार जागा घाईघाईने बघण्याऐवजी कमी ठिकाणी जास्त दिवस रहा.
काश्मिरात फसवणूक बरेचदा होते. हॉटेलात जेवता-खाताना जर किंमतीचा बोर्ड लागलेला नसेल, तर न लाजता ऑर्डर देण्यापूर्वी प्रत्येक पदार्थाची किंमत विचारून त्याच्यासमोरच लिहून घ्या. आम्ही असे न केल्याने चौपट किंमत द्यावी लागली होती. (छापील मेनुकार्ड असले, तरी खुशाल "अब रेट बढ गये है" असे सांगतात) तसेच बिल देण्यापूर्वी नीट तपासून मगच पैसे द्या. ( हे तर मुंबईत सुद्धा करावे लागते)
प्रवासी कंपनीतर्फे जायचे, तर मुंबई-पुण्याकडील महाराष्ट्रीयन कंपनीतर्फे जाणे बरे, असे वाटते. स्वतःच जायचे असल्यास आणखी एकादे स्नेही कुटुंब बरोबर असणे बरे.
मी दिल्लीजवळच असतो, येणार असाल त्याआधी कळवा.
10 Oct 2013 - 6:36 pm | कंजूस
योग्य आणि उपयुक्त प्रतिसाद .
10 Oct 2013 - 6:40 pm | दिपक.कुवेत
तुम्हाला माझ्या मित्राचा नं खाली देत आहे. तो आपल्या ईच्छित स्थळांप्रमाणे कस्टमाईझ टूर्स आखुन देतो. सगळि व्यवस्था उत्तम असते (स्वानुभव आहे). वर जाणकारांनी म्हटल्याप्रमाणे एकच डेस्टिनेशन ठेवुन त्याचा पुरेपुर आनंद उपभोगा. त्याला लोकल साईट्सीईंग, ऑल ट्रान्सर्फर्स, पिकअप्/ड्रॉप, ब्रेकफास्ट्/लंच/डिनर पण टुर कॉस्ट मधे अॅड करायला सांगा म्हणजे टोटल टुर कॉस्ट चा अंदाज येईल आणि तिथे जाउन परत तुम्हाला ह्यावर वेगळे पैसे खर्च करायला नको. शिवाय लोकल साईट्सीईंग मॅनेज करताना एक तर वेळ जातो आणि तीथे किती खर्च होईल ह्याचा अंदाज येत नाहि. हे जर आधीच खर्चात समाविष्ट असेल तर तुम्हाला फक्त शॉपींग आणि तुमचे स्वःताचे ईतर खर्च ह्यावर पैसे खर्च होतील. तो जी डिटेल आयटनरी देईल ती जरा ईतर टुर कंपन्याबरोबर/गुगलबाबा मधे तपासुन पहा म्हणजे जर एखाद/दोन ठिकाणं सुटली तरि तुम्हि त्याला ती अॅड करायला सांगु शकता.
शुभेच्छा आणि आपला प्रवास सुखाचा होवो.
Vilas Dabre
The Globe Travel & Tours
Richmond Town , Phase 2 , Office 7
Vasai ( W) , Thane - 401202
India
Tel - +91 9765801200 /+91 9762265216
10 Oct 2013 - 8:43 pm | कंजूस
सर्व ठिकाणांची नावे ऐकून असे वाटते की तुम्ही पर्यटनाला सुरुवात करणार आहात आणि काश्मीरला पहिली पसंती साहजिक आहे .तुम्हाला ठरवावे लागेल की आपण किती दिवसाची सहल करू शकतो ?मुलाला सुट्टी कधी असेल ?स्वत: जाणार का पैकेजच बरे इत्यादी .रेल्वेनेच जाणार असाल तर नैनिताल ट्रिपच्यावेळी दिल्ली करा कारण तिकडे मुंबईहून थेट गाडी नाही .हिमाचलसाठी चंडिगडला थेट गाडी (एक रात्रीत १२४७१)आहे .
10 Oct 2013 - 9:24 pm | कंजूस
नवी दिल्ली ,पहाडगंज ,महाराषट्र भवन इमारतीत श्री गिजरे यांचे महाराषट्र ट्रावल्स आहे (०११ २३५३४०९९ , ०११२३५३२३२२ ,९८१००४३४२१) gijare@rediffmail.com ,हॉटेलसह सर्व टुअरचे आयोजन करतात .त्यांच्यासाठी पुण्याच्या मिनाक्षी लिमये (०२०२५४६६१७६ ,२५४४६३५७ ,९८५०८३१०४८)बुकिंग येथूनच करून देतात .
10 Oct 2013 - 11:28 pm | पक्या
जानेवारी मध्ये थंडी खूप असेल. बागांमध्ये बघायला बहुधा काही नसेल.आधी खात्री करून घ्यावी. पानगळती झाल्यावर वसंतात नवीन पाने येतात. त्यामुळे एप्रिल मे हा सिझन चांगला आहे.(थंडी मात्र असणारच पण किंचित कमी असेल जानेवारी पेक्षा) त्यावेळी सर्वत्र बर्फ नसले तरी काही ठिकाणी किंवा बर्याच ठिकाणी असू शकते. टुरवाले सांगू शकतील ह्या बाबतीत. जिथे बर्फाचे खेळ खेळायला नेतात ती ठिकाणे जरा उंचावरच असतात. माझा मामा यावर्षी जून च्या शेवटी केसरी टूर्स तर्फे काश्मिरला गेला होता . तेव्हा त्यांनी सोन्मर्ग की पहलगाम ला बर्फात sledding केले होते.
11 Oct 2013 - 10:09 am | प्रमोद देर्देकर
वा तुम्हा सर्वांचे खूप, खूप आभार,
लग्नाआधी मी एकटा २००१ साली फक्त वैष्णोदेवी ला जावून आलो होतो पण ती package tour होती. रू . २००० /- त वैष्णोदेवी व शिवखोरी सगळे पाहून झाले. आता कुटूम्बा समवेत जायचे असल्याने काही सुचतच नव्हते काय करवे. पण आपल्या सगळ्यांच्या मदतीने आता ते शक्य होईल असे वाटते. मिसवापावमुळे मला किती तरी चांगले स्नेही लाभले , ज्यांना मी पहिले नाही ज्यांच्या बद्दल काही माहित नाही अशी थोर लोक मदत करायला पुढे येतात हे पाहून मन भरून आले.
मिसळपावलाहि अशा स्नेह्यांची गाठ घालून दिल्याबद्दल धन्यवाद !
11 Oct 2013 - 4:12 pm | चौकटराजा
मी २००३ साली दिवाळीच्या सुटीत हिमाचल बघायला चाललो होतो. सर्व जगाचा प्रवास केलेल्या वासंती घैसास यानी मला
वेड्यात काढले व माझी ट्रीप नैनिताल कडे वळविली .मी दिवाळी नैनितालात साजरी केली पण दिवाळीचे दिवशी टूरिझम मधले सर्व काही बंद होते. कशी बशी एक सुमो मिळली व कौसानी राणीखेत पाहून आलो. पण हिमालयातील वातावरण
हवे इतके क्लीअर नव्हते. मग मला घैसास यांनी हिमालय भागात थडीत का जायचे नाही हे बजावले त्याचा उलगडा झाला. उन्हाळयात सर्वच नद्यांना तिकडे पाणी येते कारण बर्फ वितळू लागलेले असते, मी हा धडा घेऊन एकदा १० मे च्या सुमारास हिमाचलाची सफर केली व ती उत्तम झाली.
खास करून बर्फातील खेळ वगैर म्हणजेच विंटर टूरिझम असा आपला उद्देश असेल तरच डिसेंबर जानेवारीत काश्मीर तथा
हिमालयीन पर्वत रांगात जाण्यात अर्थ आहे. खास करून गुलमर्ग व सोनमर्ग येथे एप्रिल महिन्यात बर्फ व उन्ह यांचे
मिश्रण उत्तम असते. माझी बहीण आताच काश्मीरला जाउन आली . आता सप्टेंबर मधे गुलमर्ग येथे फारच कमी बर्फ आढळले. एकूण काय मे महिना च बेस्ट! जर तांबड पानांची झड पहायची असेल तर भाग वेगळा. तो ही काळ फक्त वर्षातील एक विशिष्ट पंधरवडाच असतो.