3d visualisation : गणपती

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
12 Sep 2013 - 7:58 pm

गणपती उत्सवात यावेळी गणपती बाप्पाचे visualisation करायचे ठरवले . आम्हाला काही खरी खुरी मूर्ती बनवता येत नाही, पण म्हटल खरं जमत नाही हरकत नाही ,3D मध्ये प्रयत्न करूयात. एक बेसिक मॉडेल नेट वर मिळाले, पण ते अगदीच raw होते , त्यात बरेच बदल करण्याची आवश्यकता होती. ते बदल केले . 3D फुलं आणि निरंजन वेगळी मॉडेल केली.

निरांजनासाठी पितळ , आणि मूर्ती साठी तांबे . ह्या मटेरीअल साठी जरा डोके लावावे लागले

मटेरीअल देण्याआधीचा बाप्पा लाईट सेट अप सकट :)

d

हे फायनल रेंडर, तांब्याची मूर्ती दाखव्लीये . ज्योतींचा इफेक्ट आफ्टर इफेक्टस मध्ये दिलाय

व

एकूण लागलेला वेळ : एक दिवस
सोफ्टवेर्स : 3d max ,Photoshop,, vray, आफ्टर इफेक्टस

कलाविरंगुळा

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

12 Sep 2013 - 8:08 pm | चौकटराजा

अशी फुले मी करून पाहिली होती. पण ती फक्त फुले वाटत होती. ही स्पेसिफिकली गुलाबाची फुले वाटत आहेत ! निरांजनातील तळात स्मूथनिंग किंवा सेगमेंट्स कमी पडले काय ? कोन दिसताहेत. बाकी मटीरिअल मधे तांबा पितळ झकास जमलेय !
स्पा व ३ डी मॅक्स दोन्हीस धन्यवाद !

पैसा's picture

12 Sep 2013 - 8:09 pm | पैसा

काय बोलू? अप्रतिम सुंदर झालंय! तुला किती वेळ लागला करायला देवजाणे, पण इफेक्ट, एकदम सॉलिड!

जॅक डनियल्स's picture

12 Sep 2013 - 8:21 pm | जॅक डनियल्स

एकदम सुंदर दिसते आहे. फुलांवरती पाण्याचे थेंब असते तर अजून मस्त दिसले असते.

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 8:27 pm | प्रचेतस

एकदम झक्कास.

मूर्ती आणि फूलं विशेष आवडली.

स्वगतः देवा माझं पाप पदरात घे. आज मी चक्क स्पाच्या कलाकृतीचं कौतुक केलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2013 - 8:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसलं भन्नाट केलाय यार.. ग्रेट.

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

12 Sep 2013 - 9:05 pm | प्यारे१

सुंदरच.
गणपती कलांचा अधिपती.
प्रसन्न नामक कलाकारावर प्रसन्न झाला असणार यात शंकाच नाही. :)

अत्रुप्त आत्मा's picture

12 Sep 2013 - 9:30 pm | अत्रुप्त आत्मा

+१ http://www.pic4ever.com/images/clap.gif

मालोजीराव's picture

12 Sep 2013 - 9:46 pm | मालोजीराव

फ़ुल्ल धुव्वा !

किसन शिंदे's picture

12 Sep 2013 - 9:48 pm | किसन शिंदे

एकदम सॉल्लीड रे स्पावड्या. लैच भारी दिसताहेत दोन्ही फोटो, विशेषतः दुसरा!

जोशी 'ले''s picture

12 Sep 2013 - 11:34 pm | जोशी 'ले'

मस्त जमलयं.... आवडेश
निरांजनातील ज्योत व वात जर काॅपि पेस्ट न करता सेपरेट बनवली असती तर जास्त वास्तवदर्शी झाले असते अस वाटतय, पण बाकि क्रिएटीव्हिटि साठी सलाम !!!
क्या बात ,क्या बात, क्याबात

संजय क्षीरसागर's picture

13 Sep 2013 - 12:57 am | संजय क्षीरसागर

चेहरा ब्राईट हवा म्हणजे मुर्तीला उठाव येईल. आणि बॅक्ग्राऊंडची सर्कल्स काढ.

स्पंदना's picture

13 Sep 2013 - 6:13 am | स्पंदना

तांब्याचा इफेक्ट देताना मुर्ती झळाळीने दिसत नाही आहे. मुर्तीच्या रेखीवपणासाठी थोड शेडींग कर ना स्पा. बाकी मस्तच. फुल छान. निरांजनही मस्तच.

तांबं आहे हो ते, सोन्यासारखं चमकत नस्तंय.
नि लाईट नाहीयेत घरात. लोड शेडींग आहे.
गणपती शेजारी दोन बाजूला दोन दिवे आहेत नि गणपती आहे.
बसा त्याच्यासमोर मांडी घालून. बघा दिसतोय की नाही.... गणपती, फक्त गणपती!
उगा कालवा नुस्ता. ;)

अभ्या..'s picture

13 Sep 2013 - 8:20 pm | अभ्या..

मस्त रे आपट्या.
तुझ्या सही मुळे चित्र अजून खुलून दिसतेय ;)

चिगो's picture

13 Sep 2013 - 9:59 pm | चिगो

जबरा कलाकारी, स्पावड्या.. गज-आननावर उजेड असल्यास मुर्ती ब्राईट दिसेल, हे मान्य.. पण मला वाटतं, की निरांजनांच्या प्रकाशाचा अँगल बघितल्यास सोंडेच्या उंचवट्यामुळे चेहर्यावर अंधार येणे स्वाभाविक आहे.. :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2013 - 10:02 pm | बिपिन कार्यकर्ते

जम्या

चौकटराजा's picture

14 Sep 2013 - 10:02 am | चौकटराजा

आणखी एखादा फटू वेगळ्या कोनातून दिला असता तर लाईट ,कॅमेरा यांचा समन्वय थ्री डी मॅक्स आपोआप कसा घालते याच डेमो मिपावल्याना मिळाला असता.

नंदन's picture

14 Sep 2013 - 10:11 am | नंदन

जमलंय

नानबा's picture

14 Sep 2013 - 11:47 am | नानबा

एकदम भन्नाट काम केलं राव. आमचा मुजरा कबूल करा हो.....