एक चविसंदर्भात प्रश्न

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
1 Sep 2013 - 8:43 am

तुम्हा सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी चवीला कशी असते हे माहिती असेलच. मला तुमची मतं हवी आहेत.

समजा तुम्हाला कोणि छान चमचमीत शेंगदाणा चटणी दिली तर तुम्ही कशी खाल?

परंपरागतपणे नाही तर तुमची कल्पनाशक्ती पणाला लाऊन सांगा. काही सजेशन खालीलप्रमाणे :

sandwich + चटणी
olive oil +चटणी
रोटी
लवाश /पिटा चिप्स
क्रिमी चीज - फ़ोण्टिना वगैरे

सगळयांना आगावू धन्यवाद.

पाकक्रियामतमदत

प्रतिक्रिया

अत्रन्गि पाउस's picture

1 Sep 2013 - 9:05 am | अत्रन्गि पाउस

असेल तर उत्तमपैकी दहीदूध भात साय घालून ...३ चमचे तूप आणि अर्धी मूठ चटणी ....
कशाला आठवण करून दिलीत....

निवेदिता-ताई's picture

1 Sep 2013 - 9:25 am | निवेदिता-ताई

मी तेल आणी चटणी गरमागरम भाकरीवर लावुन खाईन

स्पा's picture

1 Sep 2013 - 10:24 am | स्पा

जिलबि सोबत ;-)

नितिन थत्ते's picture

1 Sep 2013 - 10:30 am | नितिन थत्ते

सॅण्डविच, रोटी ऑलिव्ह ऑइल सोडून बाकीच्या पदार्थांची नावे प्रथमच ऐकली त्यामुळे पास.

शिल्पा ब's picture

1 Sep 2013 - 10:40 am | शिल्पा ब

हरकत नाही. तुम्ही एखादी चमचमीत चटणी कशी खाल? एक सर्वे म्हणुन प्रश्न विचारलाय.

तिमा's picture

1 Sep 2013 - 10:45 am | तिमा

पीनट बटर मधे कालवून शिंगाड्याच्या थालिपीठाशी खाईन म्हणतो.

आशु जोग's picture

1 Sep 2013 - 12:29 pm | आशु जोग

कांदापोह्याऐवजी शेंगदाण्याची चटणी. काळ कित्ती बदललाय नाही ! पूर्वीचं पुणं आता राहीलं नाही.

पाषाणभेद's picture

1 Sep 2013 - 1:01 pm | पाषाणभेद

हा धागा सिरेस आहे का मौजमजेसाठी?

विनटूविन's picture

4 Sep 2013 - 3:32 pm | विनटूविन

प्रतिसाद बघता.. मधुमेहींसाठी नक्कीच नाही... :), काय म्हणता?

-साबुदाणा खिचडीत कुटाऐवजी
-वरील सायीच्या दहीभाताशी अत्यंत सहमत
-दहीपोह्यांना फोडणी देऊन त्यासोबत दाण्याची चटणी.
-चिंचगुळाच्या चटणीसोबत पावाला लावून त्यात बटाटावडा घालून वडापाव.
-अत्यंत बारीक पूडस्वरुपाची असेल (तशी करणं तेल सुटल्याशिवाय कठीणच आहे.. पण पाहिली आहे तशीही.) तर तेलात मिसळून पेस्ट करुन कि़ंचित जाड डोश्यावर मैसूर मसाल्याचा मसाला लावतात तशी.

विजुभाऊ's picture

1 Sep 2013 - 1:15 pm | विजुभाऊ

तुम्ही कधी ज्वारीचे कणीस भाजून खाल्लय का?
दही , भाजलेला हुरडा त्यात झक्कास लसूण शेंगदाण्याची चटणी . हे एकत्र कालवलेले. सोबत चमचा म्हणून कणसातलाच एक तुरा. ........ सोबत थोडासा गूळ बाजूला........ आहाहाहाहाहाहाह.......

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Sep 2013 - 1:20 pm | भ ट क्या खे ड वा ला

एखाद्या डोंगर पठारावर , चुलीवर केलेल्या नाचणी च्या गरमागरम भाकरी वर थोडे तिळाचे तेल आणि "चटणी" सोबत, हातानेच नुकताच फोडलेला कांदा अशी खायला आवडेल.

त्रिवेणी's picture

1 Sep 2013 - 2:54 pm | त्रिवेणी

तेल + चटणी + बाजरीची शिळी भाकरी + फोडलेला कांदा +ज्वारीचा चुलीवर भाजलेला पापड किवा बिबड्या+ फोडलेला कांदा माझे खुप खुप आवडते.

परोठ्यामध्ये स्टफ करुन चटणी पराठा! तो पराठा मंद आचेवर शेकुन खुसखुशीत करायचा. फक्त चटणी बारीक करुन घ्यावी लागेल.

अग्निकोल्हा's picture

2 Sep 2013 - 12:59 am | अग्निकोल्हा

वरणभातामधे कालवुन खाइन.

तेल नैतर दह्यासोबत लैच जब्री लागते कुठलीही ड्राय चटणी. बाकी उल्लेखिलेल्यांपैकी सँडविच+चटणी हे काँबो लैच जबरी लागते असा स्वानुभव आहे.

दत्ता काळे's picture

4 Sep 2013 - 1:36 pm | दत्ता काळे

हि जर शेंगदाणा ठेचून केलेली सोलापुरी तिखट चटणी ( हिला आमच्या गावंच्या भाषेत 'आगलावू' चटणी म्हणतात ) असेल तर मला, ज्वारी-बाजरी मिक्स करून केलेली खुटखुटीत भाकरी, कढीगोळ्याची दाट कढी, सोबत बोंडाची भजी आणि हि आगलावू चटणी.. तेल घालून. असा बेत आवडेल.

इरसाल's picture

4 Sep 2013 - 1:40 pm | इरसाल

कळण्याची भाकर (पोपडा आलेली- टम्म फुगलेली) शेंगदाण्याच्या चटणीमधे वरुन शेंगदाणातेल(कोरडी असल्यास) ओली असल्यास डायरेक (म्हणजे जर तिळ आणी शेंगदाणे एकत्र वाटले असतील तर.)
कच्चा कांदा, मेथीची पाने खुडुन त्यात थोडे तिखट-तेल-मीठ (मेथीचा खुडा), खार्‍यातलं लोणचं हे बरोबर असणे मस्ट्चं बर कां !

अनिरुद्ध प's picture

4 Sep 2013 - 1:45 pm | अनिरुद्ध प

येथे सोमण यान्च्याकडील शेन्गदाण्याची चटणी,अप्रतिम्,नुसतिच भाकरी, पोळी,किवा भाताबरोबर किन्वा तेल/दही यासोबत उत्तम लागते.

कपिलमुनी's picture

4 Sep 2013 - 2:20 pm | कपिलमुनी

कोणत्याही मदीराक्षीसोबत चकणा म्हणून ट्राय करावी म्हणतो

पैसा's picture

4 Sep 2013 - 2:22 pm | पैसा

बाब्बौ!! मदिरेसोबत म्हटलं तर ठीके. मदिराक्षीसोबत? नेमका काय पिल्यान आहे??

मोदक's picture

4 Sep 2013 - 2:47 pm | मोदक

शेंगदाणा चटणी (शक्यतो सोलापूरवाल्या नसलेंची किंवा घरी केली असेल तर तिखटाचे प्रमाण वाढवून त्यात मूठभर काजू घालायचे)

आपापल्या मगदुराप्रंमाणे ही चटणी खाकर्‍यावर घ्यायची त्यावर दणदणीत प्रमाणात (गरम केलेले) तूप व ते खाकर्‍यावरच कालवून. (ही स्किलची गोष्ट असते - खाकरा न मोडता चटणी समान पसरली पाहिजे) सोबत गरमागरम कॉफी. चटणीच्या तिखटपणाने हायहुय करणारी जीभ गरम कॉफीने शेकून निघते व वेगळाच स्वाद तयार होतो.

गूळ, शेंगा, ओले खोबरे व शेंगदाण्याची चटणी.

शेंगदाण्याची चटणी मॅगीमध्ये, डोश्यावर घातली की पदार्थाचे टेक्शचर बदलते - मला असे पदार्थ आवडतात.

ब्रेड+तेल+चटणी तव्यावर भाजून टोस्ट करायचे.

पांथस्थ's picture

4 Sep 2013 - 3:05 pm | पांथस्थ

मी तिखटप्रिय इसम आहे. त्यामुळे पुर्वी वाटीत घेउन चमच्याने नुस्ती चटणी खायचो :)

सध्या -
१. डाळ् तांदळाची साधी खिचडी - चटणी
२. शिळी पोळी / भाकरी - कच्चं तेल - चटणी
ई.ई.

प्रणवजोशी's picture

19 Feb 2016 - 1:40 pm | प्रणवजोशी

शेंगदाणा चटणी (तिखट)+ साय + गरम तांदुळ भाकरी