सु शी ची दुनियादारी

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in जनातलं, मनातलं
24 Aug 2013 - 10:17 pm

दुनियादारी
सुहास शिरवळकर यांच्या "साहित्यकृती" वर आधारित मराठी चित्रपट

हि हेड लाईन वाचली आणि मनात १ शेर रुंजी घालू लागला.

हजारो साल "नर्गिस अपनी बेनुरी पे रोती है
बडी मुश्किल से होता है चमन में दीदावर पैदा ||

इथे "दुनियादारी " हि साहित्यकृती हि नर्गिस
आणि झी सिनेमा आणि संजय जाधव हे दीदावर

मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही
सुशींचे हे दुख: कधी कधी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असे.

काल जेव्हा "दुनियादारी " पाहत होतो तेव्हा सारखी त्यांची आठवण होत होती.(पहिला दिवस ,दुसरा खेळ)
जेव्हा चित्रपट गृहाच्या बाहेर पडलो तेव्हा कान देऊन प्रतिक्रिया ऐकत होतो
एक मिसरूड नुकतेच फुटलेला तरुण जेव्हा म्हणाला " शिरीन चे आडनाव बदलले तेव्हाच मी समजलो कि झी वाल्यांनी स्टोरी बदलली "
सु शी नी जेव्हा दुनियादारी लिहिली त्या नंतर १२/१५ वर्षांनी जन्मलेला एक तरुण हे बोलत होता.
सु शी तुम्ही जिंकलात , मराठी वाचणारा आजचा युवक हि सु शी वाचून मग पुढे आपला वाचनाचा प्रवास करतो यातच सारे काही आले.
त्याला सांगावेसे वाटले अरे आज सु शी असते तर त्यांनी हि हा बदल मान्य केला असता.

हा चित्रपट यशस्वी होईलच पण सु शी ची कोणतीही साहित्य कृती एखाद्या समर्थ हातात पडेल तर त्या वरून बनवलेला चित्रपट नक्की हिट होईल

समांतर , जाई , कल्पांत , निदान , प्राक्तन अश्या बर्याच "नर्गिस" "दीदावर" ची वाट पहात आहेत.

झी मराठी आणि संजय जाधव यांना धन्यवाद आणि सर्व कलाकारांचे , आणि या चित्रपटासाठी ज्यांनी कार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार .
(सध्या सहावा आठवडा सुरु आहे आणि चार वेळा जाऊन तिकिटे मिळाली नाहीत अशी तक्रार एका मित्राने केली आहे )

कलामत

प्रतिक्रिया

चिगो's picture

27 Aug 2013 - 11:45 pm | चिगो

"सुशि" हो.. सु शी नाही.

तुमचा अभिषेक's picture

28 Aug 2013 - 12:08 am | तुमचा अभिषेक

(सध्या सहावा आठवडा सुरु आहे आणि चार वेळा जाऊन तिकिटे मिळाली नाहीत अशी तक्रार एका मित्राने केली आहे )

कशी मिळणार.. मी दोनदा बघून आलो आणि जेव्हा मी दुसर्‍यांदा गेलो होतो तेव्हा आमच्यातल्या एकाची चौथी वेळ होती. :)

बाकी मला चित्रपट आवडला.. अर्थातच म्हणूनच दुसर्‍यांदा गेलो.. मी पुस्तक वाचलेले नाही, मात्र ज्यांनी वाचलेले आहे तसेच जे सुशि प्रेमी आहेत त्यांचा बराच नाराजीचा सूर उमटतोय..

मराठी साहित्यिकांनी "सु शी" ना कधीच साहित्यिक मानले नाही
हे मात्र मला माहीत नव्हते.. हि खरेच वस्तुस्थिती होती का? कारण वर जो मी नाराजीचा सूर उल्लेखला आहे त्याला हे किंचित विरोधाभास दर्शवते. जर ते होते तर मग हे कसे?

आदूबाळ's picture

28 Aug 2013 - 12:49 am | आदूबाळ

हे असं:

जेव्हा सुशि ऐन बहरात होते, तेव्हा त्यांचा वाचकवर्ग अफाट मोठा होता. त्याच जॉनरमध्ये लिहिणारे चंद्रकांत काकोडकर, बाबा कदम, श्रीकांत सिनकर वगैरे सुद्धा लोकप्रिय होते. त्यामुळे असं साहित्य न लिहिणार्‍या लेखकांच्या पोटात सहाजिकच दुखत असे.

असूयेचं प्रकट लक्षण बहुदा उपहास असतं. त्यामुळे "हा कसला साहित्यिक? लोकं वाचतायत म्हणून लेखक म्हणायचं. काही शाश्वत मूल्य (?) आहे का या गल्लाभरू लेखनात?" असा एलिटिस्ट सूर धरून सुशिंना साहित्यिकाच्या कळपातून दूर ढकललं गेलं. (असं गदिमांच्या बाबतीतही होत असे - त्यांना कवी न म्हणता 'गीतकार' म्हणलं जाई. सत्यकथेसारख्या मासिकात गदिमांची एकही कविता छापून आली नसेल असा माझा अंदाज आहे.)

सुशिंनी आणि त्यांच्या वाचकांनी असल्या 'पहिल्या बाकावरच्या मुलां'ना फाट्यावर मारलं. आज जे सुशिंचे वाचक आहेत ते त्यांची पुस्तकं वाचणारे / वाचलेले आहेत. उगा समीक्षा किंवा परीक्षण वाचून मत बनवलेले नाहीत. किंवा चार लोक भारी भारी म्हणतात म्हणून त्यात आपलाही भंडारा उधळणारे नाहीत.

.
मी सातवी आठवीत असतानाचा एक प्रसंग. स्थळः पुणे-३० मधली एक लायब्ररी. पात्रं: मी, वडील (व), लायब्ररीवाल्या काकू (लाकू)

लाकू: अहो, तुमचा मुलगा ती तसली पुस्तकं फार वाचतो...(तसल्या पुस्तकांच्या सेक्षनकडे बोट दाखवत)
वः (प्रश्नार्थक मुद्रा)
लाकू: ती तसली हो, शिरवळकर फिरवळकर कदम बिदम
वः बरं मग?
लाकू: अहो ती का पुस्तकं आहेत? मी त्याला दोनदा भाव्यांची पुस्तकं आणि 'इनामदारांचा बाळू" काढून दिलं तर चक्क नको म्हणाला. उन्हाळ्याच्या सुट्टीत जरा चांगली पुस्तकं...
वः अहो मीच त्याला यादी दिलीय शिरवळकरांच्या पुस्तकांची. माझीही वाचून होतात म्हंजे...
लाकू: (बापलेक होपलेस आहेत असा चेहेरा)

धमाल मुलगा's picture

28 Aug 2013 - 1:35 am | धमाल मुलगा

:D
एव्हढ्या एका धाग्यावरुन तुमच्याबद्दल आपुलकी वाटायला लागली देवा. :) मिलाव हाथ!

"हा कसला साहित्यिक? लोकं वाचतायत म्हणून लेखक म्हणायचं. काही शाश्वत मूल्य (?) आहे का या गल्लाभरू लेखनात?" असा एलिटिस्ट सूर धरून

हे तेव्हढ्यापुरतं राहिलं असतं तर ठीक होतं...पण आजही बध्दकोष्ठी मंडळी सु.शि.ला तितक्याच मनोभावे कमी लेखताना पाहून त्यांच्या कर्मदारिद्र्याची कीव वाटल्यावाचून अगदीच रहावत नाही. एखाददिवस वाटतं, जावं, अशा लोकांचा कान धरावा अन सांगावं, "ऊठ भडव्या..हे घे,वाच आणि हास जरा. सदानकदा मर्तिकाला आल्यासारखं तोंड पाडून बसायचा मूड बदल कधीतरी. जग जरा हसत-खेळत". पण मग सोडून देतो...दुसर्‍यांची दु:खं कुरवाळण्यात सुखं मानणार्‍यांना सांगून तरी काय कळावं दिलखुलासपणा म्हणजे काय ते?

तुमचा अभिषेक's picture

28 Aug 2013 - 2:02 pm | तुमचा अभिषेक

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. अन तो पटलाही .. याउपर मीच माझे सुशि वाचून ठरवेन :)

चिगो's picture

29 Aug 2013 - 2:33 pm | चिगो

सुशिंनी आणि त्यांच्या वाचकांनी असल्या 'पहिल्या बाकावरच्या मुलां'ना फाट्यावर मारलं. आज जे सुशिंचे वाचक आहेत ते त्यांची पुस्तकं वाचणारे / वाचलेले आहेत. उगा समीक्षा किंवा परीक्षण वाचून मत बनवलेले नाहीत. किंवा चार लोक भारी भारी म्हणतात म्हणून त्यात आपलाही भंडारा उधळणारे नाहीत.

शंभर टक्के, दोस्ता.. मीपण 'पहिल्या बाकाचा' माज नसलेला एक सुशिप्रेमी.. (त्या बाकावरही अधुनमधून बसतो म्हणा :-) ) बाकी, धम्याभौचा प्रतिसाद आवड्याच नेहमीप्रमाणे..
इच्छा असल्यास हे वाचा..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

30 Aug 2013 - 3:13 am | निनाद मुक्काम प...

तसल्या पुस्तकांच्या यादीत गुरुनाथ नाईक , शैलजा राजे ह्यांचा समावेश न केल्याबद्दल निषेध
सुशी फारसे वाचले गेले नाहीत
परदेशी अनुवादित साहित्य ह्यात रहस्य ,भय, राजकीय थ्रिलर , व धारप ,मतकरी ह्यांचे नित्य नियमाने वाचन होत ,
बाकी आत्मचरित्रे आणि अजून बरेच काही हाती लागतील तशी वाचायचो.
सिनेमा तू नळीवर आल्याआल्या कळवा,
हि विनंती
अनिवासी दुसरे काय करू शकतो.
ता. क
गुरुनाथ नाईकांची ४ पुस्तके दिवाळीच्या सुट्टीत एकाच आठवड्यात वाचल्यावर चौथ्यांदा जेव्हा मी वाचनालयात
गेलो. तेव्हा तेथील पांढरपेशा काकांनी माझ्याकडे हिणकस नजरेने पाहिलेले आठवते.
लंडन असो नाहीतर म्युनिक
येथे रेल्वे प्रवासात प्रत्येकाला बसायला सीट उपलब्ध असते ,
दहापैकी ७ जण काहीतरी वाचत बसलेले असतात व त्या सात जणात किमान ३ माणसांकडे तसली पुस्तके असतात , तर
दोन जणांच्या कडे बेस्ट सेलर हा शिक्का लागली म्हणून वाचयला असणारी पुस्तके असतात. तर उरलेल्या दोघांकडे
भारतीय विंग्रजी लेखकांची भारताबद्दलचं किंवा एशियन किंवा आफ्रिकन सामाजिक जीवनाची दास्तान सांगणारी पुस्तके असतात.
येथे रहस्य , थ्रिलर कथांना जनसामान्यात जी लोकप्रियता व लोकमान्यता लाभली आहे ,त्यांचा हेवा वाटतो ,
जाताजाता मताची पिंक टाकावी म्हणून लिहितो
हेरी पोटर पेक्षा वीरधवल कैकपटीने उत्तम वाटला आहे.

प्रसाद गोडबोले's picture

28 Aug 2013 - 1:26 am | प्रसाद गोडबोले

चित्रपटात इतक्या सुंदर कथेची माती केलीये :(

सुशिंची दुनियादारी काही औरच आहे ... आजही क्त्ट्यावर बसावेसे वाटते... तशी लोणावळ्याची ट्रीप करावीशी वाटते .. आजही एम.के. लक्षात आहे ... आणि आजही शिरीन परत आली तर आकाशानं कोणाच्या घराचं छप्पर होवु नये हाच डायलॉग मनात येईल ...

आह

जियो सुशि !!

दुनियादारी हा एक स्वतंत्र चित्रपट म्हणून बरा आहे. पण त्या मध्ये 'दुनियादारी' कुठेच नाहिये. जे काही आहे तो केवळ फिल्मी मेलोड्रामा आहे. अर्थात तसे असण्यामध्येही काही वाईट नाही कारण एक उत्तम करमणुकप्रधान चित्रपट काढणेदेखील कौतुकास्पदच आहे. पण मग ते फसवे शिर्षक तरी बदला!!!
एखाद्या लोकप्रिय कादंबरीवर आधारीत असे सांगून लोकांना आकर्षित करायचं आणि प्रत्यक्षात त्या कादंबरीचा प्राण च काढून टाकायचा ही निव्वळ फसवणूक आहे..

स्वलेकर's picture

5 Sep 2013 - 11:30 am | स्वलेकर

गुलाम.. एकदम सहमत! मि हेच सांगत आहे, कि सिनेमा छानच आहे. पण दुनियादारि कांदबरी वेगळी आहे.

आदिजोशी's picture

28 Aug 2013 - 12:18 pm | आदिजोशी

आमची दुनियादारी आमच्यापाशी. एक मराठी चित्रपट हिंदी सिनेमांना टक्कर देत इतके आठवडे हाऊसफुल्ल जात असेल तर सुशि सुद्धा वर अत्यानंदाने हसत असतील.
ज्यांना पुस्तक भावले त्यांनी पुस्तक वाचावे आणि ज्यांना सिनेमा आवडला त्यांनी सिनेमा बघावा. जसं राज ठाकरे झेंडा सिनेमाच्याबाबतीत म्हणाले 'माझ्यावर टिका करून एखादा मराठी सिनेमा तिकीट खिडकीवर चांगला चालत असेल तर मला आनंदच होईल' तसंच आम्ही म्हणतो.
अशा प्रकारे खणखणीत व्यवसायीक यश मिळवणारे सिनेमे मराठीत अजून बनू दे ही इच्छा. असं झालं तरच पैसा येईल आणि अजून उत्तम सिनेमे बनतील. मराठीत टॅलेंटची कमी नाही. आता पैशाची साथ मिळाली की दुधात साखर.

महत्वाचे - सिनेमा बघून अनेक तरूणांच्या नशिबी दुनियादारी वाचायचे भाग्य आले हे सुद्धा सिनेमाचे यशच आहे. साला काही करून मराठी माणूस पुढे जायला हवा.

बॅटमॅन's picture

28 Aug 2013 - 12:22 pm | बॅटमॅन

एक मराठी चित्रपट हिंदी सिनेमांना टक्कर देत इतके आठवडे हाऊसफुल्ल जात असेल

यातच आमच्या मते या पिच्चरचे बरेवाईट जसे असेल तसे यश सामावलेले आहे असे आम्ही मानतो.

अशा प्रकारे खणखणीत व्यवसायीक यश मिळवणारे सिनेमे मराठीत अजून बनू दे ही इच्छा. असं झालं तरच पैसा येईल आणि अजून उत्तम सिनेमे बनतील. मराठीत टॅलेंटची कमी नाही. आता पैशाची साथ मिळाली की दुधात साखर.

इन्शाल्लाह!

मृत्युन्जय's picture

28 Aug 2013 - 1:07 pm | मृत्युन्जय

दुनियादारी ७-८ आठवडे लोटुन सुद्धा तुफान चालला आहे आणि इतके धागे येउनही दर आठवड्याला मेंबरं नव्याने दुनियादारी वर धागे टाकत आहेत यातच दुनियादारीचे यश आले, चित्रपटाचेही आणि पुस्तकाचेही. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सुशि म्हणतात की चित्रपट अथवा मालिकेच्या यशाचा फायदा पुस्तकाला होणार नाही तर पुस्तकाच्या पुण्याईवर चित्रपट चालेल. हे एका अर्थाने खरे असले तरीही चित्रपटाच्या यशामुळे दुनियादारीचा खप वाढला हे नाकारता येत नाही. काही दिवसांपुर्वी एका पुस्तक प्रदर्शनात गेलो होतो तेव्हा कळाले की दुनियादारीच्या पन्नास प्रती हातोहात खपल्या आणि नविन साठा मागवला गेला आहे. दुसर्‍यांदा गेल्यावर मी स्वतः सुद्धा दुनियादारी विकत घेतले. चित्रपटामुळे दुनियादारी खपली हे नाकारता येणार नाही आणि एका दमदार पुस्तकामुळेच झी ला चित्रपट बनवण्याचा मोह आवरला नाही त्या अर्थी चित्रपट पुस्तकामुळे चालला हे ही नाकारता येणार नाही.

आता पुस्तकाबद्दल. दुनियादारी हे संग्रही असण्यास योग्य असे एक चांगले पुस्तक आहे. पण त्याला महान कलाकृती म्हणता येणे अवघड आहे. पुस्तक वाचकांत प्रिय आहे हे नाकारता येतच नाही. पण दमदार कथा, सुरेख मांडणी, प्रत्ययदर्शी व्यक्तिरेखा आणि बोली भाषेचा वापर या व्यतिरिक्त पुस्तकातुन फारसे काही हाती लागतही नाही. साधारणपणे वाचकांना याहुन जास्त नकोही असते. खुप मालमसाला भरला की बर्‍याचदा त्या पुस्तकांचा वपु होतो हे ही खरेच.

आता चित्रपटाबद्दल. उत्तम पात्रपरिचय, वेगवान सादरीकरण, श्रवणीय संगीत आणि काही कलाकारांचा उत्तम अभिनय ही कथेची जमेची बाजू. कॉलेजवयीन न वाटणारी पात्रे ही लंगडी बाजू. याव्यतिरिक्त मूळ कादंबरीपासुन घेतलेली फारकत ही देखील काही लोकांच्या दृष्टीने लंगडी बाजू असु शकते. पण एक लक्षात घेतलेच पाहिजे की सिनेमा हे वेगळे माध्यम असल्याने काही फरक अनिवार्य होते. उदा.: साईनाथ पुर्ण खलनायकी नसेल तर चित्रपट प्रभावी होउ शकणार नाही, प्रेमकहाणी असफल झाली (पुर्णच) तर चित्रपटाचे पब्लिक ते मान्य करु शकणार नाही. कादंबरीत खपुन गेले असले तरी काहीही नाट्य न घडता एक मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडणे पब्लिकला पचत नाही. मूळ कादंबरीतल्या दिग्याची शोककथा चित्रपटात खुप लाऊड भासली असती. त्यामुळे काही फरक अनिवार्य होते. ते केले गेले. काही ग्गरजेचे नसुनही केले गेले असतील तर वेगळ्या माध्यमासाठी थोडे फरक अगदीच अमान्य नसावेत.

सौंदाळा's picture

28 Aug 2013 - 1:56 pm | सौंदाळा

दुनियादारी पुस्तक तर मस्त आहेच. सुशिंच्या बर्‍याच पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे कथेमधे खरी स्थळे वापरणे (पुण्यातील कॉलेजेस, बार, हॉटेल, कलकत्त्यामधील वर्णन सुद्धा एका पुस्तकात वाचल्यासारखे वाटतय)
अपवाद कोकणी लेखकांनी कोकणच्या पार्श्वभुमीवर बर्‍याच कादंबर्‍या लिहील्या.
पण बरेच पाश्चात्य लेखक ..सिडने शेल्डन, ऱोबिन कुक, आर्थर कानॅन दायल (शेरलॉक होम्स) सारखी एकाच / भिन्न देशात वेगवेगळ्या पण खरोखरीच अस्तित्वात असलेल्या ठीकाणी घडणारी काल्पनिक कादंबरी आणि त्याबरोबर त्या स्थळांचे थोडे वर्णन असे मराठीत कोणी लिहीले आहे का? भारतात / महाराष्ट्रात घडणारी काल्पनिक कहाणी (प्रेम, भय, खुनाखुनी काय बी चालल)

अतुलनियगायत्रि's picture

28 Aug 2013 - 3:16 pm | अतुलनियगायत्रि

सुशिं ना आज हि साहित्यीक मानायला बरेच लोक तयार नाहीत याचा जाम दुख्ख होतं. आमच्या ओळखीतल्या एक नामवंत एकपात्री कलाकार सुशिं चे खास मित्र होते.ह्या नातेवाईका चा मुलगा जाहिरात क्षेत्रात खुप नाव कमवुन आहे आणि हा सुशिं ना साहित्यीक मानायला बिलकुल तयार नसतो.
मी स्वता: सुशिं चि पुस्तके खुप मनापासुन वाचली. त्यांचे अमर विश्वास, मंदार हे हिरो खुप आवडायचे. त्यांची पुस्तके एका ठाराविक वयात जास्त आवडतात एवढे नक्की. पण म्हणुन त्यांना साहित्यीकात अजिबातच न गणने म्हणजे जरा जास्तच होते.

भ ट क्या खे ड वा ला's picture

29 Aug 2013 - 11:24 am | भ ट क्या खे ड वा ला

सु शिं चा एक वाचक चाहता म्हणून ९० च्या दशकात केव्हातरी त्यांच्याशी ओळख झाली, कोकणात आले असता २/३ वेळा घरी सुद्धा आले होते. खेड मधील सु शी चे चाहते आणि सु शी असे १ दा "बसलो" होतो. तेव्हा सु शी नि सांगितलेल्या काही गोष्टी आज हि आठवतात. १९७९ नंतर सु शी नि रहस्य कथा लिहिली नव्हती, असे त्यांनी सांगितले होते. परंतु रहस्य कथांची पुनर्मुद्रणे निघत असल्याने आणि त्यांना महाराष्ट्रातील बहुतेक सर्व वाचनालयात मागणी असल्याने मी रहस्यकथा लेखक म्हणून ओळखला जातो. लेखन हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असल्याने मला त्यात काही गैर वाटत नाही, पण त्यांच्या "दुनियादारी, कल्पांत, जाई,निदान,समांतर, प्राक्तन या व अशा कादंबर्यांवर बोलताना ते विशेष खुलत असत. त्याकाळी खेड ला फोन वगैरे नसल्याने जास्त भेटी होऊ शकल्या नाहीत, पत्र लेखनाचा हे कंटाळा असल्याने पुढे फार संपर्क राहिला नाही.
२००८ साली सुगंधा शिरवळकर यांचे एक पत्र आले (सु शी गेल्यावर ४/५ वर्षांनी ) सु शी च्या डायरीत माझा पत्ता आणि त्या समोर त्यांनी लिहिलेल्या काही वाक्यांमुळे त्यांनी हे पत्र पाठवले होते. "सु शी असे आणि तसे" या नावाचे एक पुस्तक त्या काढणार होत्या. त्या पुस्तकात एखादा लेख लिहावा अशा आशयाचे ते पत्र होते. त्यावेळी मी मुंबईत थोडा व्यग्र असल्याने लेख काहि लिहिला नाही परंतु खेड ला गेल्यावर ते पत्र खेड मधील सु शी प्रेमीना दाखवले त्यातील काही जणांनी लेख पाठवला. पुस्तक प्रकाशीत झाल्यावर वाचले.( काही वेळा पुनुरुक्ती आहे परंतु पुस्तक वाचायला चागले आहे)
आज मी पा वर लेख लिहून १ वाचक मित्र म्हणून असलेल्या कर्तव्याची थोडी तरी पूर्ती झाली.

भ ट क्या खे ड वा ला's picture

30 Aug 2013 - 1:26 am | भ ट क्या खे ड वा ला

सु शिं चा एक वाचक चाहता म्हणून ९० च्या दशकात केव्हातरी त्यांच्याशी ओळख झाली, कोकणात आले असता २/३ वेळा घरी सुद्धा आले होते. खेड मधील सु शी चे चाहते आणि सु शी असे १ दा "बसलो" होतो. तेव्हा सु शी नि सांगितलेल्या काही गोष्टी आज हि आठवतात. १९७९ नंतर सु शी नि रहस्य कथा लिहिली नव्हती, असे त्यांनी सांगितले होते. परंतु रहस्य कथांची पुनर्मुद्रणे निघत असल्याने आणि त्यांना महाराष्ट्रातील बहुतेक सर्व वाचनालयात मागणी असल्याने मी रहस्यकथा लेखक म्हणून ओळखला जातो. लेखन हाच माझा पोटापाण्याचा व्यवसाय असल्याने मला त्यात काही गैर वाटत नाही, पण त्यांच्या "दुनियादारी, कल्पांत, जाई,निदान,समांतर, प्राक्तन या व अशा कादंबर्यांवर बोलताना ते विशेष खुलत असत. त्याकाळी खेड ला फोन वगैरे नसल्याने जास्त भेटी होऊ शकल्या नाहीत, पत्र लेखनाचा हे कंटाळा असल्याने पुढे फार संपर्क राहिला नाही.
२००८ साली सुगंधा शिरवळकर यांचे एक पत्र आले (सु शी गेल्यावर ४/५ वर्षांनी ) सु शी च्या डायरीत माझा पत्ता आणि त्या समोर त्यांनी लिहिलेल्या काही वाक्यांमुळे त्यांनी हे पत्र पाठवले होते. "सु शी असे आणि तसे" या नावाचे एक पुस्तक त्या काढणार होत्या. त्या पुस्तकात एखादा लेख लिहावा अशा आशयाचे ते पत्र होते. त्यावेळी मी मुंबईत थोडा व्यग्र असल्याने लेख काहि लिहिला नाही परंतु खेड ला गेल्यावर ते पत्र खेड मधील सु शी प्रेमीना दाखवले त्यातील काही जणांनी लेख पाठवला. पुस्तक प्रकाशीत झाल्यावर वाचले.( काही वेळा पुनुरुक्ती आहे परंतु पुस्तक वाचायला चागले आहे)
आज मी पा वर लेख लिहून १ वाचक मित्र म्हणून असलेल्या कर्तव्याची थोडी तरी पूर्ती झाली.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 2:42 pm | अग्निकोल्हा

सुशीना साहित्यिक म्हणने म्हणजे चेतन भगतला विल्यम शेक्स्पिअर वा कॅटरिना कैफला माधुरि दिक्षित समजणे होय.

आदूबाळ's picture

30 Aug 2013 - 6:49 pm | आदूबाळ

QED :))

बॅटमॅन's picture

30 Aug 2013 - 7:33 pm | बॅटमॅन

असहमत. सुशिंचा मोठा चाहता वगैरे आजिबात नसणारा मीही सांगू शकतो की ही तुलना चूक आहे. बाकी त्या तृतीय दर्जाच्या चेत्या भगताबद्दल जितकी मुक्ताफळे उधळाल तितक्यांशी सहमत आहे. किंवा तिथेही असहमती-पण ती अशासाठी की त्याला शिव्या घालण्याने तो प्रकाशात राहतो आणि लोकांचे लक्ष तिकडे जाते. नकोच ते.

बाकी कॅटरिनाची निंदा दुर्लक्षित केलेली आहेच.

(कॅटरिनाप्रेमी) बॅटमॅन.

अग्निकोल्हा's picture

30 Aug 2013 - 7:40 pm | अग्निकोल्हा

सुशिंचा मोठा चाहता वगैरे आजिबात नसणारा मीही सांगू शकतो की ही तुलना चूक आहे.

तुम्हि म्हणताय म्हटल्यावर माझ्यापुरता विषयच संपला.

धमाल मुलगा's picture

30 Aug 2013 - 8:01 pm | धमाल मुलगा

साहित्य म्हणजे काय?

-(अज्ञानी) 'ढ'म्या

इनिगोय's picture

30 Aug 2013 - 10:58 pm | इनिगोय

लेख उत्तम.

मात्र सुशिंनाही सिनेमातले बदल मान्य झाले असते, हे वाचून हसू आलं. बहुधा लेखक दिग्दर्शकानेही स्वतःची अशीच समजूत घालून घेतली असणार...

चिगो's picture

5 Sep 2013 - 4:45 pm | चिगो

निर्मात्यांचा आणि सुगंधाजींचा दोघांचाही प्रामाणिकपणा आवडला.. उगाचा 'इडियट्स' गोंधळ नाही.. ;-)