गाभा:
नमस्कार मिपाकरानो,
मला ऑनलाईन मराठी कादंबरी पीडीएफ,ई-बुक स्वरुपात डाऊनलोड करायची आहे.मराठीतील वाचनीय कादंबरी डाऊनलोड करायचे संकेतस्थळ किंवा काही लिंक्स असतील तर सुचवा.धन्यवाद !
(संपादक मंडळीना विनंती आहे कि त्यांनी हा धागा लगेच तोडू नये.काही दिवसानंतर तोडला तरी चालेल.)
प्रतिक्रिया
17 Aug 2013 - 12:04 pm | मुक्त विहारि
नमस्कार मिपाकरानो,
बोला...
मला ऑनलाईन मराठी कादंबरी पीडीएफ,ई-बुक स्वरुपात डाऊनलोड करायची आहे.
मग करा ना.. आमची परवानगी कशाला?
मराठीतील वाचनीय कादंबरी डाऊनलोड करायचे संकेतस्थळ किंवा काही लिंक्स असतील तर सुचवा.
आधी गुगलून बघावे..
नाहीच मिळाले तर विचारवे..
उत्तर मिळेलच अशी आशा नसावी..
चित्ती असु द्यावे समाधान..
(संपादक मंडळीना विनंती आहे कि त्यांनी हा धागा लगेच तोडू नये.काही दिवसानंतर तोडला तरी चालेल.)
हे वाक्य बर्याच वेळा , बर्याच जणांनी आणि बर्याच धाग्यांवर आणि प्रतिसादांवर लिहिल्या गेले आहे..
शेवटी काय? तर आल्या संपादकांच्या मना तिथे कुणाचे चालेना...
चला टाईमपास झाला आता उत्तर देवून टाकावे..
काही मूलभूत शंका आहेत. त्यांचे निरसन केल्यास बरे.
१.तशा मराठीत बर्याच कादंबर्या आहेत आणि त्या बर्या पैकी बर्याच असतात. तुमची आवड काय आहे?
२.तुम्हाला ह्या कादंबर्या फुकट हव्या आहेत की विकत?
३.तुम्ही झोपण्या पुर्वी वाचता की झोप येण्यासाठी?
४.लॅप्टॉप वर वाचणार आहात की पी.सी. वर की टॅबलेट वर?
५.झोपून वाचणार की बसून?
आधी ह्या प्रश्नांची उत्तरे दिली असतीत तर जास्त बरे झाले असते..
तरीपण एकदा खालील साईट वर जावून बघा.
http://www.bookganga.com/eBooks/Home/eBookReader
17 Aug 2013 - 12:47 pm | तिमा
अहो मुवि, तुम्ही त्या 'जुदाई; सिनेमातल्या परेश रावळ सारखेच प्रश्न विचारलेत. पुन्हा शुद्धीवर आल्यावर त्यांना ती लिंक दिसू दे.
17 Aug 2013 - 10:51 pm | पुष्कर जोशी
मि असाच एक धागा लिहिला होता तो काही तासातच उडवल्या गेला मी पा चे या बाबतीत धोरण काय आहे ? आमी इथे मदत मागू नये काय ?
माझ्या धागांचे आरसे : http://aisiakshare.com/node/1995, http://aisiakshare.com/node/1846 मला इतर संकेतस्थळ माहित पण नव्हते ... पण अशा उडवा उडवी मुळे माहित झाले.. धन्यवाद संपादक मंडळ ...
18 Aug 2013 - 12:15 am | पाषाणभेद
बरेचसे नविन मिपाकर असा दुर्दैवी धागा काढतात. या असल्या मदत मागणार्या धाग्यांच्या नावामध्येच तो प्रश्न अंतर्भूत असावा असा नियम संपादकांनी करावा.
अन्यथा संपादकांनी दुरूस्त करावा. संपादकांना दुरूस्त करायला वेळ नसेल तर पडीक मिपाकर निवडून 'दुरूस्ते' असले मानांकन तयार करून त्यांचेकडून दुरूस्ती करवून घ्यावी.
उगाचच आपण काय मदत हवी आहे हे पाहण्यासाठी तातडीने धागा उघडतो अन त्यात फारसे काही तथ्य आढळत नाही.
मागे एकाने असलाच धागा काढला होता कुणाचे तरी नाव विचारण्यासाठी की काहीतरी. कालपरवाच एक धागा होता स्मार्ट फोनबद्दल. त्या भावाला फोन घ्यायचा होता.