बाल्य - वार्धक्य

सार्थबोध's picture
सार्थबोध in काथ्याकूट
7 Aug 2013 - 9:13 am
गाभा: 

असहाय्य आधी, दशाही तीच आता
बालपण ते नि, पदरी वार्धक्य आता ll १ ll

न समज; स्मृती, दिस असाच सरावा
बालपणी तेच अन्, प्रकार तोच आता ll २ ll

नव्हते मुखी दात, दंतपंक्ती लुप्त आता
बालपणी तसे, फिरुनी वार्धक्यी आता ll ३ ll

पाय तेंव्हा लुकलुकते, थरथर ही आता
तोल तेंव्हा नव्हता, तोल नाही आता ll ४ ll

अन्नास होतो परावलंबी, पाहतो वाट आता
तेंव्हा माय भरवी, लेकरे देतात आता ll ५ ll

लोळणे मल-मूत्रात, त्राण नाही आता
रडणे तेंव्हाचे, कण्हत असतो आता ll ६ ll

कथा देवाच्या ऎकी, अनुभव हाती आता
केंव्हा एकदा भेट?, व्हावी सुटका आता ! ll ७ ll

- सार्थबोध

प्रतिक्रिया

मनीषा's picture

7 Aug 2013 - 9:33 am | मनीषा

बालवयी खेळी रमलो
तारूण्य नासले
वृद्धपणी देवा आता
दिसे पैलतीर !
असा काहीसा हताश सूर जाणवला कवितेत.
पण वृद्धत्व नेहमीच इतकं केविलवाणं नसतं .

मदनबाण's picture

7 Aug 2013 - 9:39 am | मदनबाण

ह्म्म...

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 1:02 pm | प्रभाकर पेठकर

मुख्य फलकावर ह्या धाग्याच्या शीर्षका शेजारी (डाव्या बाजूला) 'काथ्याकुट' असे का दिसते आहे?

शेवटी तेच होणार. मिपाची खासियत नाही का ती?

बघा तुम्ही आणि मी सुरुवातही केली ;-)

प्रभाकर पेठकर's picture

7 Aug 2013 - 4:51 pm | प्रभाकर पेठकर

मला वाटते 'जे न देखे कवी' असे असेल तर वाचक धागा उघडतच नाहीत. म्हणून ही दिशाभूल.

विटेकर's picture

7 Aug 2013 - 4:44 pm | विटेकर

काथ्याकूट म्हनून उघड्ला तर कविताबाई ! आणि त्यावर कूट !

सस्नेह's picture

7 Aug 2013 - 9:54 pm | सस्नेह

कविता'कूट' म्हणा ना !

तिमा's picture

7 Aug 2013 - 5:15 pm | तिमा

पाय तेंव्हा लुकलुकते,

लहान मुलांच्या अडखळत चालण्याला 'लुकलुकते' हे डोळ्यांना खटकले. त्याऐवजी लटपटते, दुडदुडते असे काहीतरी योग्य वाटले असते. लुकलुकते,हे जनरली डोळ्यांना किंवा तार्‍यांना उद्देशून वाचले आहे.
कविता फारच निराश वाटली. म्हातारपण ही एन्जॉय करता येते.

संजय क्षीरसागर's picture

8 Aug 2013 - 5:49 pm | संजय क्षीरसागर

एंजॉय करायला सुरुवातीपासूनच मजेत जगायला हवं. निदान तारुण्यापासनं तरी. एकदा शरीराकडे पाहायचा दृष्टीकोन चुकला की शेवटापर्यंत छ्ळ (आणि मग अश्या कविता!)

सहमत. म्हातारपण एंजॉय करणारे लोक पाहिल्याने कविता तशी निराश वाटली. आणि लुकलुकणे हा शब्दही तसा औटॉफ प्लेस वाटतोय.

विजुभाऊ's picture

9 Aug 2013 - 10:26 pm | विजुभाऊ

आपण बालपण येन्ज्वाय कर्तो. त्रुन्पन यन्ज्वाय कर्तो. मंग म्हथार्पन यन्ज्वाय कर्याला कै हर्कत है?
कन्हत कुंथत जगायचै की रमत गमत यन्ज्वाय करत तुम्मीच ठर्वा रौ.