नमस्कार मंडळी,
कामानिमित्त आपण जगभर विखुरलेले असतो. परदेशातील नोकरी स्वीकारताना तिथली सुबत्ता, आर्थिक स्थैर्य, स्वच्छता, कमी भ्रष्टाचारपणा हे तर भुरळ घालतचं पण २-४ वर्षाकरीता म्हणुन गेलोलो आपण नकळत कधी तिकडेच स्थिरावतो हे आपलं आपल्याच कळत नाहि. दर वर्षि भारतवारी केली कि ईथे बोकाळणारा भ्रष्टाचार, गलिच्छपणा, गर्दि, रोजच्या नोकरीसाठि होणारी धावपळ, दगदग पाहिली कि सध्या आहोत तिथे बरे आहोत, पुढे बघु हा विचार नकळत दृढ होत जातो.
पण त्याच बरोबर आपली संस्कृती, आपले सणवार, ती मातीत खेळण्याची मजा, ती होळीची बोंब ई. हे सगळं आपण, आपली मुलं फार मिस करतात असं वाटतं मग कधी कधी विचार येतो कि शेवटि हा सगळा आटापिटा कशासाठि, कुणासाठि? एका ठराविक मर्यादेपलीकडे जाउन आपण आणखि वेगळं काय मिळवतो?
मला तर हल्ली फार वाटतं कि हे सगळं सोडुन भारतात स्थाईक व्हाव पण वरील कारणांमुळे अजुन तरी विचार पुढे जातोय. घुसमट होतेय पण उपाय सापडत नाहिये.
तुमच्या बाबतीत काय? भारतात जे काम करतात त्यांना बाहेर सेटल व्हावसं वाटतं का?
प्रतिक्रिया
24 Jul 2013 - 2:39 pm | बॅटमॅन
जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला धागा...
माझ्यापुरते सांगायचे झाले तर परदेशात २-३ वर्षे अवश्य काढावीत पण त्यापुढे जाऊन सेटल होणे नको असे वाटते.
24 Jul 2013 - 3:17 pm | सौंदाळा
हेच म्हणायला आलो होतो.
बाकी दंगा आम्रविका खंडातील लोक थोड्या वेळात जागे झाल्यावर चालु होईलच.
एका परिचीतांचे सुपुत्र लग्न झाल्या झाल्या अगदी अजंट्-बिजंटाच्या मागे लागुन परदेशात गेले.मुल झाल्यावर परत येणार असं सांगत होते तेव्हा. ३ वर्षाने मुलगा झाला मग त्याची शाळेत जायची वेळ येईल तेव्हा. मुलगा अडिच वर्षाचा होऊन नर्सरीत जाऊ लागला त्यावेळी तो शाळेत एल. केजी(४ वर्षाचा)मध्ये जाईल तेव्हा.. आता हा मुलगा दुसरीत आहे. या मुलाचे आई-वडील भेटले की अजुन सांगत असतात आता १-२ वर्षात येणारच आहे आमचा लेक..
परदेशाची भुरळ पडली की सुटणं कठीण रे बाबा.
24 Jul 2013 - 2:50 pm | पिंगू
शेवटी आपले घर ते घर.. बाहेर जाऊन आठवणी येणारच. तेव्हा बॅट्याने जे सांगितले तेच केलेले उत्तम..
24 Jul 2013 - 2:54 pm | अक्षया
पण आपल्या देशाची ओढही तेवढीच असते.
पैसा,रहाणीमान ,आर्थिक स्थैर्य, स्वच्छता,हे तर आहेच आकर्षीत होण्यासारखे. थोडे दिवसजरी तिथे राहीले तरी लगेच सवय होते या सगळ्या गोष्टींची.
आपण जसे आपले शहर सोडुन खेड्यामधे रहायला जाउ शकत नाही. तिथल्या घराची कीतीही ओढ असली तरी शेवटी माणुस व्यवहारीक विचार करतो. आणि भावने पेक्षा व्यवहारीक मनच जिंकतं.
24 Jul 2013 - 3:26 pm | मी_आहे_ना
३ वर्षं अमेरिकेत राहून व्हिसा असूनही ठरवून परतलो. (अर्थात, हे आधीच ठरवून तसा प्लॅन करूनच गेल्याने काही अडचण आली नाही)
फायदे
१)बायकोला मुलाबरोबर 'एक्सक्लूझिव्ह' वेळ मिळाला (अर्थात मलाही) ;) त्याचं बालपण छान अनुभवू शकलो.
२)बरीचशी अमेरिका (आईबाबांसोबतही पूर्वेकडचा बराचसा भाग) बघून झाला, जे इथल्या पगारातून ट्रिप काढून शक्य नव्हते.
३)आर्थिक स्थिरता-जसे इथे आल्यावर फ्लॅट घेण्यासाठीचे डाऊनपेमेंट जमले (अर्थात, हा मुद्दा अंतर्भूत असतो), त्यामुळे आवाक्यातले गृहकर्ज घेता आले.
(तोटा असा नाही,जर-तर म्हणू ह॑वं तर)-
१) मुलाच्या कळत्या वयात इथे आल्याने त्याला तिकडचे राहणीमान आठवत नाही (कदाचित ही चांगली गोष्टही असेल,नाहीतर परतणे अवघड असते)
२) प्रत्येक गोष्टीत इकडची आणि तिकडची तुलना,कितीही नाही म्हणलं तरी,केली जाते
३)अजून थांबलो असतो काही दिवस तर जास्त पैसे साठले असते, पण इथले जागेचे भावही तितकेच वाढले असते हेही खरे,अनुभवले आहे.
24 Jul 2013 - 8:53 pm | ओसामा
एक प्रश्न : तुमच्या मुलाचे नागरिकत्व कोणत्या देशाचे आहे ?
25 Jul 2013 - 1:39 pm | मी_आहे_ना
भारतीय. तो ४ महिन्यांचा असताना गेलो आणि शाळेच्या वेळी(नर्सरी)परतलो.
25 Jul 2013 - 11:46 pm | ओसामा
अरे वा. तुम्ही इतरांसारखे नाहीत हे वाचून चांगले वाटले
24 Jul 2013 - 3:37 pm | गवि
"फॉर हियर ऑर टू गो" या शीर्षकाचं पुस्तक आठवलं. त्यात पानापानावर सापडणारी दोन्ही बाजूंनी एकामागोमाग एक बोलणारी आणि काहीही कन्क्लूड करु न शकणारी वाक्यं आठवली.
अमेरिकेत सेटल झालेल्या एका वयाने सिनियर स्त्रीच्या भारतातल्या आईने तिला स्पष्ट सांगितलं होतं की तिथे राहून तिथली हो. दोन्ही दगडांवर पाय ठेवून राहशील तर फरपट होईल. वाहत्या पाण्यात बेटं करुन बसलीस तर कधीच आनंदाने जगणार नाहीस.
शब्द नेमके आठवत नाहीत पण आशय काहीसा असाच असावा. बरेचजण अशा स्पष्ट कल्पनांनी तिथे सेटल होतात आणि आनंदी होतात. बाकी कायमचं परत येऊन भारतात राहण्याचे विचार कितीही येत असले तरी फार थोडे लोक खरंच स्वखुषीने असा निर्णय घेतात (अगदीच नाही असं नव्हे) पण प्रत्यक्षात ती एक हुळहुळणारी संकल्पनाच असते.
भारतात राहूनही वय वाढल्यावर बहुतांश माणसे त्याच त्या भूतकाळातल्या गोष्टी (संध्याकाळचे कट्टे, बाईकवरुन भटकंती इ इ) करत राहात नाहीत.
तसंच ,भारतातसुद्धा शहरी नवी पिढी मातीत खेळणं, सणवार, होळीची बोंब वगैरे मागे सोडून आलेली आहे. त्यांच्या मजेच्या कल्पना वेगळ्या आहेत (त्या आपल्या बालपणातल्या मजेपेक्षा नेहमीच कमी दर्जाच्या असतील असं नव्हे) तेव्हा इथे येऊन हे सर्व व्हायचं तर खेडेगावातच राहावं लागेल, जे परदेशातून परत आलेल्या माणसाला शक्यच नाही.
24 Jul 2013 - 3:52 pm | कपिलमुनी
आवडलं !!
24 Jul 2013 - 4:22 pm | मी_आहे_ना
अपर्णा वेलणकरांचे 'फॉर हियर ऑर टू गो' नक्कीच वाचनीय आहे.
25 Jul 2013 - 11:57 am | मंदार कात्रे
अगदी सहमत
24 Jul 2013 - 3:44 pm | गवि
या निमित्ताने सध्या चर्चेत असलेली ताजी बातमी आठवली. अनेक संसद-सदस्यांनी एक पत्र सह्या करुन ओबामांना दिलं आहे. त्यात म्हटलं आहे की नरेंद्र मोदींना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये.
अमेरिकेचा व्हिसा मोदींना मिळाला तर अन्य विरोधक सदस्यांचा काय प्रॉब्लेम होणार आहे नेमका?
अमेरिकावारी म्हणजे काही बक्षीस आहे का की जे मोदींना मिळू नाही दिलं म्हणजे समाधान मिळेल?? राज्यकर्त्यांचीच अमेरिकन व्हिसाबद्दल अशी भावना असल्यावर काय बोलावे. मनोरंजक.
24 Jul 2013 - 4:35 pm | खबो जाप
सगळ्यात सोपा उपाय, एखादी ऑन साईट प्रोजेक्ट देणारी कंपनी शोधा.
प्रत्येक किंव्हा दर दोन तीन प्रोजेक्ट नंतर नवीन ठिकाणी जाता येते आणि जवळपास सगळा खर्च कंपनी करते.
पैशाचे सोडा हो ते तर इकडच्या पगार मुळे शिल्लक राहतातच.
आणखी बॅटमॅन भाऊ म्हणले तसे परदेशात २-३ वर्षे राहायला काही हरकत,नाही पण शेवटी २ ३ वर्षा नंतर थोडे आणखी थांबू असे चालू हेतेचं.
24 Jul 2013 - 4:37 pm | ऋषिकेश
ही घ्या खास अशा कुंपणावरल्या मित्रांना समर्पित कविता.
बाकी विषय अजरामर आहे हे खरे!
24 Jul 2013 - 4:44 pm | मी_आहे_ना
मस्त कविता...शेयर केल्याबद्दल धन्स्
24 Jul 2013 - 5:02 pm | विजुभाऊ
परदेशाचे जाऊ देत.
गाव सोडून मुम्बैत स्थायीक झालेल्या किती जणाना परत गावाकडे परतता येते?
कारणे
१)मुलाना मुम्बै सोडून दुसरीकडे कुठेच दोन दिवसांपेक्षा जास्त रहावेसे वाटत नाही.
२)आपण गावी गेल्यानंतर इथे करायचे काय हा प्रश्न पडतो.
३)गावाकडे योग्य( हवा तेवढा) पगार मिळणारी नोकरी उपलब्ध नसते.व्यवसाय करायचा म्हण्टले तरी काय करायचा हा आपल्यापुढे प्रश्न असतो
४)मुलांच्या शिक्षणाची/उच्च शिक्षणाची सोय गावाकडे नसते.
या सर्वांमुळे गावच्या आठवणी काढत मुम्बैत बेटावरचे आयुष्य नाईलाजाने जगत रहान्याशिवाय पर्याय नसतो.
वरील सर्व गोष्टींत मुम्बै ऐवजी ( युरोप / अमेरीका व तत्सम प्रगत देश) आणि गाव या ऐवजी भारत हे शब्द घातले तरी काही फरक पडत नाही.
गावाकडे रस्त्याने जाताना निदान दोन चार लोक ओळखीचे भेटतात. गावाकडून मुम्बैत आलेल्याला कोणीच ओळखत नसते.
24 Jul 2013 - 5:09 pm | बॅटमॅन
हेही तितकेच खरंय!!
मुंबै-पुण्याकडचा लोंढा कधी थांबेल देव जाणे. उगीच त्या शहरांवरती फालतूचा लोड येणार नाही अन विकासही जरा ब्यालन्स्ड होईल. अन गावी राहूनही पैशे कमावता येतील ठीकठाक ते वेगळंच.
24 Jul 2013 - 7:24 pm | दादा कोंडके
मुबैचे जाउ देत.
गाव सोडून पुण्यात स्थायीक झालेल्या किती जणाना परत गावाकडे परतता येते?
______________________________________________________________
पुण्याचं जाउ देत.
गाव सोडून तालुक्याला स्थायीक झालेल्या किती जणाना परत गावाकडे परतता येते?
______________________________________________________________
तालुक्याचं जाउ देत.
वस्ती सोडून गावाला स्थायीक झालेल्या किती जणाना परत गावाकडे परतता येते?
______________________________________________________________
.....
...
..
24 Jul 2013 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
एखादी गोष्ट करण्याने आपल्याला काही (आर्थिक, मानसिक, इ.) किंमत मोजायला लागते.
ती गोष्ट न करण्यानेही काही ना काही किंमत मोजायलाच लागते.
वरिलपैकी जे आपल्याला परवडते ते करावे आणि फायद्याचा व्यवहार केला म्हणून खूष रहावे !
24 Jul 2013 - 7:32 pm | कवितानागेश
तसेही बाहेर गेलो म्हणजे एकटे झालो असं का समजायचं?
आईवडील नकीच इर्रेप्लेसेबल आहेत. पण मित्र कुठेही मिळू शकतत. सगळी माणसंच आहेत.
तश्याही वेगवेगळ्या काळात प्रायोरिटीज बदलतातच. त्या त्य वेळेस लक्षात घेतल्या म्हणजे झालं.
कुसुमाग्रजांचे एक मुक्तक वाचलं होतं छोटसं... प्रुथ्वीवरुन पाहिल्यावर एक चमकणारा गोल पाहिला.. मग लांब शिडीवरुन माणूस तिथे गेला, तो शुक्र होता.
तिथून पुन्हा अजून एक चमकणारा गोल दिसला... तो अजून एक लांब शिडी वापरुन तिथे गेला आणि परत पृथ्वीवर आला... अश्या प्रकारचं.. ते आठवलं.
24 Jul 2013 - 8:47 pm | सुधीर
जबरी शतकी पोटेन्शिअल असलेला धागा...
+१
कुठल्याही निर्णयाची (हा किंवा तो) किंमत ही मोजावी लागते हेच खरं. ज्या निर्णयाने कधीच खंत वाटणार नाही तोच निर्णय ज्याने त्याने घ्यावा असं मला वाटतं. थोड्याफार फरकाने मी_आहे_ना यांच्या अनुभवासारखाच माझाही अनुभव. निघताना डोळे पाणावले (तिच त्या निर्णयाची किंमत होती) पण निर्णय पक्का होता.
24 Jul 2013 - 7:51 pm | प्रभाकर पेठकर
मला प्रश्नच नीट समजला नाही. 'नोकरी न करण्याची खंत जाणवते का?' हा प्रश्न नोकरी न करणार्यांसाठी आहे असे सकृतदर्शनी दिसते आहे. त्यामुळे कुठे न कुठे नोकरी करणारे ९९ टक्के सदस्य ह्या चर्चेतून बाद ठरतात.
'स्वदेशात नोकरी करण्याची किंवा परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का? असा प्रश्न असेल तर परदेशात स्वतंत्र व्यवसाय करणारे चर्चेच्या बाहेर राहतात. स्वतंत्र व्यवसायात यश मिळाले तर 'परदेशात नोकरी न करण्याची खंत जाणवते का?' ह्याचं उत्तर 'नाही' एवढेच असेल आणि चर्चा सुरू व्हायच्या आधीच संपते. जर स्वतंत्र व्यवसायात यश मिळालं नाही तर 'यश मिळालं नाही' ह्याची खंत वाटू शकते आणि माणूस परदेशातच किंवा भारतात नोकरी शोधेल, ती मिळाली की नोकरीची खंत का वाटेल?
भारतात नोकरी करणार्यांना परदेशात नोकरी न मिळाल्याची खंत वाटते का? हा प्रश्न होऊ शकतो. पण तो फक्त ज्यांनी प्रयत्न केला आणि नोकरी मिळाली नाही त्यांच्या बाबतीतच होऊ शकतो. जी व्यक्ती भारतातील नोकरीतच समाधानी आहे, किंवा कांही वैयक्तिक कारणाने, नोकरीसाठी, परदेशी जाऊ इच्छित नसेल त्यांना खंत का वाटवी? तो त्यांचा विचारांती घेतलेला निर्णय असतो.
परदेशात नोकरी करणार्यांना, 'नोकरी न करण्याची', खंत कशी वाटेल? 'आपण परदेशात नोकरी करतो आहोत' ह्याची खंत वाटू शकते. पण तो दुटप्पीपणा ठरेल. तुम्ही परदेशातील नोकरी स्वखुशीने स्विकारली आहे. आणि सोडून जायचे म्हंटले तरी तुम्हाला कोणी अडवत नाही. मग 'खंत' कशाला?
परदेशात नोकरीचा निर्णय (स्वखुशीने) घेतला पण तो 'चुकला' अशी भावना निर्माण झाली आणि कांही कारणाने परतता येत नसेल तर चुकीचा निर्णय घेतल्याची खंत वाटू शकते. असा निर्णय स्वखुशीने परंतु पुरेसा विचार न करता घेतलेला असतो. परदेशातील राहणीमानाचा, वैयक्तिक आर्थिक फायद्याचा, ज्या उद्देशाने परदेशात स्थलांतरीत होण्याचा विचार केला असेल (जसे जास्तीची आर्थिक कमाई आणि शिल्लक, किंवा मुलांचे शिक्षण, भवितव्य इ.इ.) ह्या गोष्टींचा पुरेसा विचार न करता घाईघाईने निर्णय घेतला आणि फसल्याची भावना निर्माण झाली तर हातचे सोडून पळत्याच्या मागे धावल्याची खंत मनात निर्माण होते. 'परतीचे दोर कापून टाकून' आहे तिथेच परिस्थितीत सुधारणा करण्याचे प्रयत्न करणे हा, खंत करीत बसण्यापेक्षा, जास्त सकारात्मक मार्ग ठरतो. दोन दगडांवर, शक्यतांवर दोलयमान मनःस्थितीत पाय ठेवल्यास कुठेच समाधान, यश मिळंत॑ नाही. परदेशात पहिल्या १-२ वर्षात नोकरी सोडून भारतात परतण्याचा विचार मनांत आला आणि अमलात आणला तर कमीतकमी समस्यांना तोंड द्यवे लागते. ते परतणे यशस्वी होते. पण जर त्याहून जास्त काळ परदेशात राहिल्यास आणि नंतर स्वदेशी परतल्यास स्वदेशातील नोकरी-व्यवसायातील बदलत्या कौशल्यांना सामोरे जावे लागते, महागाईशी, दैनंदीन प्रवासातील गर्दीशी जे जुळवून घेतलेले असते त्याचा संबंध तुटून त्या समस्या पर्वतप्राय वाटू लागतात. नोकरीती सिनिऑरिटीत मागे पडून आपल्या ज्युनिअर असणारे पुढे गेले असतात. त्याने, परतल्यावरही पदरी निराशा येऊ शकते. भारतात परततानाही पुन्हा एकवार परतीचे दोर कापूनच जावे लागते. 'नाहीच जमले तर येऊ परत परदेशात' असा विचार तुम्हाला तिथेही समाधान मिळवू देत नाही.
एका मातीत (भारतात) रुजलेले रोपटे उपटून दूसर्या मातीत (परदेशात) लावायचे, रुजवायचे आणि तिथे रुजले की पुन्हा उपटून पहिल्या मातीत आणून लावायचे हे भयंकर धोकादायक ठरू शकतं. जे कांही करायचे ते पूर्ण विचारांती केले, जे परीणाम समोर आले ते स्वखुशीने स्विकारले तर कसलीच 'खंत' वाटत नाही.
24 Jul 2013 - 9:41 pm | धर्मराजमुटके
काका,
फारच बॉ KISS पाडलात......
24 Jul 2013 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
रोचक विषय व प्रतिसाद पण धाग्याच्या आशयाला व शीर्षक समर्पक वाटत नाहीये.
गविंनी उल्लेखलेले अपर्णा वेलणकर यांचे 'फॉर हिअर ऑर टु गो' हे पुस्तक मी पण वाचले आहे. लेखिकेने उत्तर अमेरिकेत स्थायिक झालेल्या शेकडो लोकांना बोलते करून त्यांचे अनुभव समर्पकपणे मांडले आहेत.
माझे स्वतःचे असे निरिक्षण आहे की या विषयाची तीव्रता जरा कमी होत आहे. दोन तीन दशकांपूर्वी संपर्काची वेगवान व परिणामकारक साधने उपलब्ध नव्हती. आज आपण कुठेही असलो तरी सहजपणे आपल्या भूमीबरोबर व माणसांबरोबर जोडलेले राहू शकतो. ऐनवेळी गरज पडल्यास प्रत्यक्षात धावती भेट देणेसुद्धा बरेचदा शक्य असते.
'फॉर हिअर ऑर टु गो' या पुस्तकात मांडलेले एक निरिक्षण फारच महत्वाचे आहे. परदेशात नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या बर्याच पुरूषांना व्यावसायिक यश मिळवून झाल्यावर आपल्या भूमीत परत जावेसे वाटते पण त्यापैकी बहुतेकांच्या सहधर्मचारिणींचा यास प्रखर विरोध असतो. त्यामागचे कारण असे की आपला समाज कितीही पुढारलेला असला तरी अनेक रुढी परंपरा यांचे जोखड स्त्रियांच्याच मानेवर अधिक असते. सासरचीच नव्हे तर माहेरची व परिचितांमधली अनेक मंडळी एखादी परंपरा न पाळल्यास घालून पाडून बोलायला टपूनच असतात.
परदेशात राहून या सर्व गोष्टींपासून सुरक्षित अंतरावर रहायची एकदा सवय झाली की मग परत त्या अवघडवणार्या वातावरणात जाण्यासाठी बहुतांश स्त्रियांची तयारी नसते.
24 Jul 2013 - 9:06 pm | श्रीरंग_जोशी
शेकडो लोकांना बोलते करून त्यांचे अनुभव समर्पकपणे मांडले आहेत.
कृपया वरील वाक्य 'शेकडो लोकांना बोलते करून त्यांचे अनुभव समर्थपणे मांडले आहेत' असे वाचावे.
यावरून आठवले - मिपावर एकेकाळी स्वयंसुधारणा करण्याची सोय होती....
24 Jul 2013 - 9:15 pm | सुधीर
+१ टू या विषयाची तीव्रता जरा कमी होत आहे.
24 Jul 2013 - 9:03 pm | दिपस्तंभ
भारतात जे काम करतात त्यांना बाहेर सेटल व्हावसं वाटतं का? मला तर नक्की आवडेल.. तसेहि मुळ गाव सोडुन आता आमच्या पालकांना २०-२५ वर्श झाली आहेत.. मग आम्हा मुलांना पैसा,रहाणीमान ,आर्थिक स्थैर्य, स्वच्छता या का नाही हव्याश वाटनार.. अंती याबाबत प्रत्येकाचा आपला आपला विचार असेल
24 Jul 2013 - 10:26 pm | जुइ
'फॉर हिअर ऑर टु गो' हे पुस्तक मी वाचले आहे. सामाजिक, आर्थिक, भावनिक पातळ्यांवर वेगवेगळे अनुभव उत्तमरीत्या मांडले आहेत. ह्या पुस्तकात असेही मांडले आहे की इथे येणारे सर्व लोक यशस्वी होतात असे नाही व बऱ्याच लोकांना अनेक कारणांमुळे परतणे शक्य नसते. अशा लोकांनी परदेशात राहून नशिबाला बोल देण्यापेक्षा आता आहे ती परिस्थिती कशी बदलता येईल ते बघावे मग खंत कमी वाटू शकते.
25 Jul 2013 - 12:12 am | उपास
धाग्याचं शिर्षक तरी गंडलय (वरती पेठकरकाकांनी म्हटलय तसं..) किंवा चर्चेचा सूर भरकटतोय.
नोकरी, हा एकच मुद्दा असेल तर पूर्ण वेगळ्या संदर्भाने लिहावं लागेल.
असो, ह्या संदर्भात पूर्वी मायबोलीवर 'परतोनि पाहे' मध्ये लिहिलेलं पोस्ट नंतर माझ्या ब्लॉग वर टाकलेय कुण्या देशांचं पाखरू...
चर्चा कुठल्या अंगाने जातेय हे बघून यथावकाश लिहिन.
25 Jul 2013 - 12:51 am | रेवती
शीर्षकामुळे समजण्यात जरा गडबड होतीये. असो.
मला कसलीही खंत वाटत नाही. माझ्या आजोबांनी, बाबांनी, काकांनी, आजेसासर्यांनी सगळ्यांनी भारतात बरीच स्थलांतरे केल्याने तसे करण्यास मला काही वाटत नाही. हामेरिकेत नवीन असताना आठवण यायची, वाईट वाटायचे पण त्याची तीव्रता हळूहळू कमी होत गेली आणि मग रुळूनच गेले. आपल्या कक्षेबाहेरचे जग पहायला मिळाले. आपल्या गृहितकांशिवाय इतरही आहेत हे समजले. आता परदेशात आहोत असे वाटत नाही तसेच भारत हा परदेश आहे असेही वाटत नाही. बाकी नोकरी करण्याचा मुद्दा असेल तर ती मी वाटले तर करू शकते पण नोकरीची अतोनात हौस मला नाही. ज्यांना आहे त्यांनी खुश्शाल करावी. पूर्वी केली ती हौसेने, आनंदाने केली. उगीच अधूनमधून क्षणभर काही वाटून गेले म्हणजे तसेच सारखे वाटत नाही, संधी मिळाल्यास येत्या काही महिन्यात सुरु करेनही. पण माझी काहीही तक्रार नाही. राहिला मुद्दा मुलांनी मातीत खेळाण्याचा आणि सणवाराचा! आमच्या मुलासकट अनेक मुले दिसेल त्या मातीत, वाळूत, मल्चमध्ये, झोपाळे, घसगुंड्या, मैदाने, तरणतलाव, बर्फ अशी खेळतात/धडपडतात. आम्ही आमचे सणवार जमेल तसे साजरे करतो. मुलगा इथले सणवार साजरे करवून घेतो. ;)
25 Jul 2013 - 11:18 am | मदनबाण
माझ्यापुरते सांगायचे झाले तर परदेशात २-३ वर्षे अवश्य काढावीत पण त्यापुढे जाऊन सेटल होणे नको असे वाटते.
वटवाघुळ मानवाशी सहमत ! :)
मी तर मला बाहेर पाठवु नये म्हणुन माझ्या पासपोर्ट एक्स्पायर्ड झाला होता त्यानंतर बराच काळ रिनुव्हच केला नव्हता.।एचवनबी साठी तर कधीच अप्लाय केला नाही. आता मात्र सध्य परिस्थीती पाहता आम्रविका खंडाची ५-६ महिने वारी करावीशी वाटु लागली आहे... कारण अर्थताच डॉलरा डॉलरा डॉलरा ! ;) ( ठांकु टु द अंग्रेज }
बाकी माझ्याच्यानं परदेशी कायम वास्तव्याची कल्पना देखील सहन होत नाही ! साला हे भोसमारीचे भ्रष्ट राजकारणी या देशाचं कितीही वाटोळं करुं दे... रोज खड्ड्यातल्या रस्त्यां मधुन प्रवास करावा लागुदे { प्राक्तन प्राक्तन म्हणजे काय ते म्हणजे खड्ड्यातले रस्ते. ;) }तरी देखील मेरा भारत महान !
अवांतर :- @ गवि:- अहो घरचे भेदी आपल्याकडे कमी नाहीत हे दाखवण्याची सध्या स्पर्धाच चालली आहे त्यात मोदी विरोध करताना ओबामाला देखील गाठु शकतो हे अधोरेखीत झाले. आपण आपल्याच देशातील नागरिकाला विरोध करण्यासाठी परदेशी व्यक्तीला घातलेले साकडे ! राजकारण्यांना देश आणि देशातील लोकांपेक्षा राजकारणातच रस आहे हे यावरुन कळले,थोडक्यात राजकारणासाठी / सत्ते साठी / विरोधासाठी काही वाट्टेल ते !
प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :- स्त्रीयांची नोकरी, मग ती परदेशी असो वा या देशात... एकमेकांना न्यूनगंड देण्याचा प्रयत्न करणे...(स्त्रीयाच स्त्रीयांना हा प्रकार करतात) हे सर्व पाहिल्यावर मला एक जालिय स्त्री आयडी आठवली... ती १२ महिने १३ काळ मी नोकरी करते हे तुणतुणे वाजवत बसावायची ! फार वैताग आणला होता त्याच त्याच तुणतुण वादनाने !
संदर्भ :- वरती द अंग्रेजचा उल्लेख केला आहे... ज्यांना त्यात रस असेल आणि वेळ असेल त्यांनी खालच्या दुव्याचा मार्ग धरावा. ;)
https://www.youtube.com/watch?v=o17iZgjlXGs
26 Jul 2013 - 5:56 am | स्रुजा
हे खूप खूप पटलं . मात्र काही प्रतिसादांमध्ये भारतात परत येणं म्हणजे गावी परत जाण्यासारखं आहे असं परत परत म्हणल जातंय . या गोष्टीवर मात्र माझा आक्षेप अहे.
मुंबई आणि एखादं गाव यात जेवढा फरक आहे तितका मोठा फरक परदेशात आणि भारतात नक्कीच नाही . मी गेले जवळपास वर्षभर कॅनडा मध्ये राहते आहे पण माझं हे मत कायम आहे. या ही आधी एक- दोन महिने कुठल्या न कुठल्या प्रोजेक्ट साठी कॅनडा अमेरिका करून झालंय , तेंव्हा ही हेच मत होतं आणि इथे इतके दिवस राहिल्यावर सुद्धा ते कायम आहे आणि कदाचित थोडं अजून पक्कं झालंय .
आम्हाला दोघांना ही इथून परत जायचं आहे आणि याचा आम्हाला पश्चात्ताप होणार नाही हे पण निश्चित . ९० च्या दशका मध्ये किंवा २००० पर्यंत साधारण जे लोकं परदेशात आले त्यांना भारतात आणि परदेशात खूप फरक जाणवतो . पण गेल्या १० - 1२ वर्षात मात्र infrastructure आणि साधनं भारतात पण खूप वाढली आहेत . सगळे brands , फूड चेन्स आणि एकून च राहणीमान प्रत्येकाचं सुधारलंय . malls आहेत , फिरायला चांगली ठिकाणं आहेत , बाहेर जाऊनमजा करणं , आठवड्याच्या शेवटी बाहेर जेवायला जाण या कुठल्याही गोष्टींना मागची पिढी पण आता निषिद्ध मानत नाही . इकडे फार मर्यादा असतात म्हणून बायकांना तिथे रहावसं वाटणं ही पण ९० मधलीच साधारण गोष्ट आहे . आता मुलींचे आई वडील आणि सासू सासरे सुद्धा मोकळ्या विचारांचे आणि स्वतःचं social life असलेले असतात . आणि या सगळ्या गोष्टींचा प्रमाण generalise करण्याइतकं वाढलेलं नसलं तरी निश्चित च भरपूर आहे . आता कुणी म्हणू शकेल की हे फक्त मोठ्या शहरांमध्ये आहे- बरोबर आहे . पण गावातली लोकं सुद्धा हळू हळू शिकून सावरून शहरात येतायेत , हळू हळू गावांमध्ये पण हे लोण पसरेल , वेळ लागेल पण हे होईल . आपल्यासारखी सगळी जण इकडे settle व्हायला लागली तर जास्तच वेळ लागेल , त्यामुळे अगदीच स्वदेस मधल्या शाहरुख खान सारखी सुधारणा नाही जमली तरी आपल्या क्षेत्रामधल्या चांगल्या संधींचा लाभ आपल्यापुरता उठवून भारतात अंती settle झालो तरी पुष्कळ आहे .
जॉब्स च्या संधी पण आता भारतात भरपूर वाढलेल्या आहेत . फक्त IT च नाही तर इतर ही क्षेत्रांमध्ये हळू हळू पण लक्षणीय आणि सातत्याने प्रगती होते आहे . आमचे Non IT वाले मित्र पण आमच्या इतकंच कमवतात तेंवा याची खात्री च पटते . आपले मित्र मैत्रिणी , नातेवाईक, comfort zone , मुलांसाठी खेळायला खूप cousins , लाड करायला आजी आजोबा , मामा, काका, आत्या, मावशी हे सगळे फायदे जितके नोंदवावे तितके कमीच .
इथे येउन dollars मध्ये पैसे कमावून तिकडे जाऊन घरकर्ज वगैरे फेडणं हे बरोबर आहे पण तोच एक मार्ग निश्चित च नाही . इथे आल्यावर paid vacation ला आल्यासारखं छान फिरून बिरून घ्यावं , नवीन अनुभव गाठीला बांधावा , आपल्या पूर्ण कुटुंबापासून लांब राहिल्यामुळे त्यांची आणखीन समजलेली किंमत लक्षात ठेवावी आणि मस्त पैकी घरी परत जावं . जमल्यास आपल्या कुटुंबियांची पण एखादी सहल करावी, सोन्याहून पिवळ .
पण पैसे कमावण्यासाठी किंवा भारतात जे मिळत नाही त्यासाठी सगळा सोडून इकडे settle होण्याजोगी परिस्थिती आता राहिली नाही हे मात्र खरं . स्वच्छता वगैरे मुद्दे आहेत पण ते ही हळू हळू होईल च अशी मला (कदाचित भाबडी ) आशा आहे .
आता एवढं सगळं मी इथे राहून बोलते आहे, भारतात या मग पांडित्य करा असा कुणी म्हणालं नाही म्हणजे झालं :)
26 Jul 2013 - 6:09 am | स्रुजा
आणि हा रेवती चा प्रतिसाद पण खूप पटला . जे काही कारणाने परदेशात सेटल झालेत त्यांना शेवटी भारत परदेश वाटत नाही ते महत्त्वाचं. नाही तर बर्याचदा इथले भारतीय भारतामधल्या भारतीयांना कमी लेखतात .. माती ची ओढ आणि संस्कृती या गोष्टी शेवटी बर्याचदा बोलाय्च्याच गोष्टी असतात. पु लं म्हणतात तसं संस्कार म्हणजे वरण भात तूप, दुसर्याचा पाय आपल्याला लागल्यावर पण आपण पहिल्यांदा केलेला नमस्कार अशा छोट्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात … या गोष्टी पाळायला स्थळ काळ बंधन नक्कीच नाही . पण … पण … भारतात आता ती जीवन सरणी किंवा राहणीमान मिळत नाही म्हणून इथे यावच लागलं असं आता राहिलेलं नाही .